The Art of Living in Marathi Health by Pranav bhosale books and stories PDF | The Art of Living - जगण्याची कला.

Featured Books
Categories
Share

The Art of Living - जगण्याची कला.

The Art of Living

जगण्याची कला..!

                आपण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो. कधी यश, कधी अपयश तर कधी आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत सुद्धा नाही. आलेल्या अपयशाचे खापर आपण कोणाला देत असतो? स्वताला, देवाला कि नशिबाला? आता स्वताबद्दल च विचार करा ना, आयुष्यात खूप सारे अपयश सहन केले असतील, कधी नेतृत्व करायची संधी मिळून पण ती स्विकारली गेली नसेल. याच कारण काय? ‘आपण स्वतः’ होय! स्वताची जाणीव नसणे, आत्मविश्वासाची कमी, संभाषण कौशल्य या सर्व गोष्टी कमी असल्याने आपल्याला यश येत नाही. आणि आलेल्या अपयशाने आपण खचून जातो. मग राहतो तो तणाव, भूतकाळातील विचार आणि भविष्याची चिंता. जगण्याची कला काय शिकवते तर एक तणावमुक्त आणि आनंदी जीवन कस जगले पाहिजे.

                  आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत ४० पेक्षा अधिक कोर्स घेतले जातात, त्यामध्ये मेडीटेशन, योगा, हैप्पिनेस प्रोग्रॅम, युथ लिडरशिप प्रोग्रॅम आणि खूप सारे कोर्स ज्यांची खरच आजच्या युथ ला गरज आहे. मी गेल्याच महिन्यात युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम कोर्स करून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला जोडलो गेलोय. माझा अनुभव तर खूप अविस्मरणीय आहेच. पण मला असे वाटते प्रत्येक तरुणाने हा कोर्स केला पाहिजे. गेल्या ३ महिन्यापासून मी कोर्स बद्दल ऐकून होतो पण काही ना काही कामावाचून कोर्स करताच येत नव्हता.  शेवटी २३ जानेवारी च्या विनय सरांच्या कोर्स ला जॉईन झालो. खर तर मला आधी या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हता पण माझ्या मित्रामुळेच मला या कोर्स बद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये झालेला सकारात्मक बदल, विचार करायची पद्धत, आत्मविश्वास, आणि समाजाप्रती असलेली जाणीव.. या सर्व गोष्टीमुळे मला पण कोर्स बद्दल उस्तुकता लागली होती. अशाच एका संस्थेबद्दल जाणून घेऊयात “ The Art of Living ”

                  गुरुदेव श्री श्री रविशंकरजी  यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था १९८१ मध्ये स्थापन केली. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक व मानवहितकारी चळवळ आहे, जी तणावमुक्ती आणि सेवा उपक्रमांमध्ये अविरत कार्यरत आहे. ही संस्था जागतिक स्थरावर १५६ पेक्षा देशांमध्ये सक्रिय असून त्यांनी ३७ कोटीहून अधिक लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. “जोपर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसा मुक्त होत नाही, तो पर्यंत आपल्याला विश्व शांती मिळविता येणार नाही”, या श्री श्रींच्या शांतता तत्वाला अनुसरून सर्व कार्यक्रमांना दिशा मिळते. प्रत्येक व्यक्तीला तणावापासून मुक्ती आणि मन:शांती अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने तणावमुक्तीचे कार्यक्रम सुरु केले आहेत. यात श्वसन प्रक्रियेसह ध्यान आणि योगासनांचा समावेश आहे. या कार्यक्रमांमुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना तणाव, नैराश्य आणि हिंसक मनोवृत्तीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे.

               आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत घेतल्या गेलेल्या युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून खूप काही शिकता आले. तो कोर्स खूप छान प्रकारे बनवला गेलाय कि आपण कस तणावमुक्त जीवन जगल पाहिजे, आत्मविस्वास, वेळेचे नियोजन, या गोष्टी आत्मसात करण्यात आल्या. ७ दिवसाचा कोर्स खूप काही शिकवून गेलाय, मी तुम्हाला कोर्स मधील प्रोसेस सांगत नाही कारण त्याचा अनुभव तुम्हाला कोर्स करूनच मिळेल. अगदी प्रत्येक गोष्टी व्यावहारिक पद्धतीने समजून सांगितल्या जातात. अगदी स्वताबद्दल ची जाणीव ते गुरुकृपा. या सर्वासोबातच आर्ट ऑफ लिव्हिंग च्या कुटुंबाशी आपण जोडले जातो. मला आलेला अनुभव असा कि या जगात कोणीच सुखी नाहीये...! बेरोजगारी, भविष्याची चिंता, यामुळे तणावपूर्ण जीवन आणि ज्याकडे पैसा आहे त्यांना आरोग्याचा प्रॉब्लेम आहेत. आपण आपल्या समस्यावर किती विचार करत बसतो, विचार करतो देव आपल्याच वाट्याला का सर्व समस्या देतोय...! तिथ जाऊन एवढ समजल आपल्या समस्या कायच नाहीयेत, आपल्या समोरच्या लोकांना आपल्या पेक्षा किती खडतर गोष्टीना सहन कराव लागतय. आणि तुम्ही सक्षम आहात त्या समस्यांना तोंड देयला म्हणूनच तुमच्या वाट्याला त्या आलेत. त्यामुळे आलेल्या समस्यांवर कशी मात करायची हे आर्ट ऑफ लिव्हिंग ने शिकवलं.

                 युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून पुढील गोष्टी आत्मसात करता येतील.

१.       योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया.

२.       आत्मविश्वास व निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे.

३.       आनंदी, निरोगी शरीर व मन

४.       मन व भावनांवर नियंत्रण

५.       सवांद कौशल्य विकसित करणे.

६.       उत्तम नेतृत्व कौशल्य.

युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून पद्मासाधना, सुदर्शन क्रिया शिकता आली. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुदर्शन क्रियेमुळे खूप लाभ होतो. त्यामध्येच शारीरक लाभ, मानसिक लाभ, मनोवैज्ञानिक लाभ, नातेसंबंध सुधारण्यास मदत, अध्यात्मिक लाभ  होतो.  ‘WHO’ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्फत हे वेज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. ‘AIIMS’ सारख्या वैज्ञानिक संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार सुदर्शन क्रिया ही ‘कॅन्सर’ सारख्या भयानक रोग कमी करण्यावर  प्रभावशाली आहे. डिप्रेशन सारख्या लोकांना सुदर्शन क्रिया एक औषधासारखी काम करतेय. त्यामुळे नैराश्या आणि चिंता यापासून मुक्ती मिळतेय आणि आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होतेय.

            गुरुदेव श्री श्री रविशंकरजी  सांगतात – “ आर्ट ऑफ लिव्हिंग एक तत्व आहे, संपूर्ण जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. ती एखाद्या संस्थेपेक्षा चळवळ आहे. त्याचे मुख्य मूल्य म्हणजे स्वताम्ध्ये शांती शोधणे आणि आपल्या समाजातील विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणणे, परंपरा, धर्म, राष्ट्रीय्त्वे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्वत्र मानवी जीवनाची उन्नती करणे हे एकच ध्येय आहे याची आठवण करून देत आहोत”

              ५ मार्च २०२३ पासून युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम ची पुढील batch चालू होणार आहे. जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्हाला तर या कोर्स च महत्व समजलच असेल पण आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबामध्ये खूप सारे लोक असतील ज्यांना याची खरच गरज असेल. तर त्यांना याचा महत्व पटवून आणि तुम्ही सुद्धा या कोर्स चा भाग बनू शकता, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या number वर contact करावा.

Mob no – 8999076776