Antra in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | अंतरा

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

अंतरा

कॉलेजच्या अंतिम वर्षाचा अंतिम दिवस सगळे जण एकमेकांना शेवटचे भेटून घेत होते मग पुढे सगळे आपआपल्या वाटेने जाणार होते आता दररोज भेट होणार नव्हती  ह्यात अनंत ने ठरवलेले कि तो आज आपल्या मनातली गोष्ट सांगूनच टाकणार अनंताने तिला येताना पहिले आणि पळत जाऊन तिच्या समोर उभा राहिला 


"अंतरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझे प्रेम स्वीकार करशील "?


हे ऐकल्यावर अंतरा आश्चर्यचकित होऊन अनंत कडे पाहू लागली तर अनंत तिच्यासमोर गुलाबाचे फूल घेऊन उभा होता 


अंतरा ने विलंब न करता "काय प्रेम तुला माहित आहे का तू कोणाशी बोलतोस आणि प्रेम वैगरे मी मानत नाही अरे इथे माझ्याशी मैत्री करताना सुद्धा लोक विचार करतात आणि तू डायरेक्ट प्रेम वेडा आहेस का ?आणि हो मला त्या प्रेमात पडून दुसऱ्याच्या मनासारखं नाही जगायचं मी माझ्या मनाची राणी आहे समजले "


"कोण म्हणत अंतरा कि प्रेमात दुसऱ्याच्या मनासारखं जगावं लागत असं काही नसत प्रेम जर निस्वार्थी असेल तर "?


"पुरे पुरे मला नको ऐकवू तुझे प्रेम पुराण आणि हो मला तुझ्या प्रेमात काहीही इंटरेस्ट नाही त्यामुळे इथून निघून जा "


"अंतरा माझं म्हण ऐकून तरी घे "


"अंनत मला उगाच वेळ वाया घालवायला आवडत नाही त्यामुळे निघ उगीच कॉलेज च्या अंतिम दिवशी माझ्याकडून अपमान होण्यापूर्वी निघून जा "


"विचार कर अंतरा मला घाई नाही" असे सांगून अंनत तिथून निघून गेला 


"अंतरा तुला आणि प्रोपोस खूप डेरिंग केलं हा अनंताने अंतराच्या जिवलग मैत्रीणीने  वैशाली ने हसत हसत असे म्हणताच 


"वैशू त्यांनी डेरिंग केलं म्हूणन हि अंतरा त्याला भाव नाही देत कळले "


वैशू मात्र मनातल्या मनात अनंताच्या धाडसाचे कौतुक करत होती कारण अंतरा तशी बिंदास मुलगी अगदी रोखठोक तिला जो लढला तो नडला कॉलेज मध्ये वैशू तिची एकच अशी मैत्रिणी होती कारण त्या बालमैत्रिणी होत्या बाकी तिच्या वाटेला जाणे टाळायचे आणि त्यात अनंताचे प्रेमाचे पाऊल म्हणजे पण वैशूच्या मनात एक प्रश्न घुटमळत होता कि अशी कोणती गोष्ट आहे ज्या मुळे अनंत अंतराच्या प्रेमात पडला ?


अनंत तसा स्वभावाने चांगला होता त्यामुळे त्याचे मित्र हि जीवलगच होते अंनत अंतराला आपल्या मनातली गोष्ट सांगायला गेला आहे हे त्यांच्या मित्रांना माहित होते ते सगळे कॅन्टीन मध्ये चिंतेत बसले एवढ्यात अनंताला कॅन्टीन मध्ये येताना पाहत सगळेच बसलेले उठले आणि त्याला पाहत म्हणले "काय करून घेतलास ना अपमान आम्ही सांगत होतो अरे प्रेम करावं पण त्या मुलीवर नाही आणि काय रे अनंता त्या लेडी डॉन च्या प्रेमात तू कसा काय पडलास पडला तो पडलास अपमान हि करून घेतलास आम्ही सगळे दुरून पाहत होतो सोड तो विचार तुला चांगली मुलगी भेटले त्या लेडी डॉन पेक्षा चांगली कळले "


ह्यावर अनंत हसत हसत म्हणला "अरे तिनी माझा अपमान नाही केला तिचे बोलणे तसेच आहे आणि मुळात हे अचानक असे पुढे आल्यावर कोणीही तशी रिऍक्ट होईल आणी तुम्ही तिला लेडी डाॅन नका म्हणु एवढी काही ती वाईट नाही"


"वाह रे वाह प्रेम आंधळ असते हे माहित होतं पण आज खरंच पाहिले जी मुलगी तुला फटकळपणे बोलून गेली तु तिची बाजू घेतो अरे आता तर काय काॅलेज पण संपले आता कसा भेटणार आणी भेटलास तरी ती थोडीच विचारते अरे मित्रा ती कोणाचीच होऊ शकत नाही ती वैशाली ती ची एवढी चांगली मैत्रीण कशी आहे दैव जाणे"


"अरे ती तेवढी वाईट नाही म्हणून तर वैशाली तीची मैत्रीण आहे आणी तुम्ही माझी काळजी करू नका "


अनंताच्या अश्या बोलण्याने सगळेच मित्र रागात एकदम म्हणाले" काहीच कळत नाही तुझं तु एवढा तिच्यावर प्रेम कसा काय करू शकतोस? तु करशील रे पण ती थोडीच करणार तुझी प्रेम कहाणी सुरु होण्यापूर्वीच अधुरी रहाणार "


"तुम्हला जी ती दिसते तशी ती नाहीच आहे ती खूप प्रेमळ मुलगी आहे "


"काय फेकतोस दररोज तर तिला पाहतो तुला कधी दिसला तिचा प्रेमळपणा "


"अरे दोन महिन्यात पूर्वी  ती कॉलेज मधून घरी जात होती तेव्हा मी पहिले कि तिने एका भीक मागणाऱ्या मुलाला पाहून आपली गाडी थांबवली त्या मुलाला समोरच्या दुकानात जाऊन खूप सारे खाऊ खरीदी करून दूरवर त्याची आई बसलेली तिथे घेऊन गेली आणि २००० हजारची नोट देत तिला सांगितले कि "ह्याला असे भीक मागायला पाठवून नका त्याचे बालपण हिरावून घेऊ नका त्याला शाळेत पाठवा पाहिजे तर मी त्याचा शाळेचा खर्च करायला तयार आहे "


"बस हे पहिले आणि मी खरंच बिथरलो ज्या  अंतराला आम्ही ओळखतो ती हीच आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता आणि त्याच वेळी मी त्या अंतराच्या प्रेमात पडलो ते हि कायमचे मग सांगा अश्या मुलीच्या प्रेमात कोण पडणार नाही मी खूप दिवस झाले तिला सांगीन म्हणत होतो पण आज ठरवले कि तिला हि गोष्ट कळायला हवी "


सगळेच ऐकून आश्चर्यचकित झाले पण विश्वास मात्र ह्यावर कोणाचा बसेना "मित्रा जे तू संगितले ते खरे असेल किंवा माहित नाही पण तू आणि अंतरा कधीच एक होऊ शकत नाही हि  काळया दगडावरची रेख आहे "


"तुम्ही काहीही म्हणा पण अंतरा माझी च होणार "


"अनंता कशाला उगाच पायावर धोंडा मारून घेतोस अरे ती ने तुझ्या प्रेमाचा स्वीकारच केला नाही आणि तू भविष्याची स्वप्ने पाहतोस कसं होणार मित्रा "?


"माझं मन सांगतय माझं प्रेम तिला नक्की कळेल "


"तू तर तिच्या प्रेमात पुरता बुडलास आहे आम्ही सांगून तू काही ऐकणार नाहीस मित्र म्हणून आम्ही तुला फक्त तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ शकतो "


खरंच अंनतच्या मनासारख होईल की अंनताच्या प्रेमाची कहाणी अधुरी राहिलं?

"किसका हैं तुमको इंतजार मैं हूँ ना देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना" अंनताला गाण्याची आवड त्यामुळे त्यांचे गाणे म्हणणे चालू होते एवढ्यात त्याचा मोबाइल ची रिंग वाजली अनोळखी नंबर होता तरी त्याने उचला 


"हॅलो "


"हॅलो अनंत" 


"हा कोण बोलतंय "?


"अनंत मी वैशाली अंतराची मैत्रीण" 


"हा वैशाली बोल "


"अनंत सॉरी "


"का तू का सॉरी म्हणतेस "?


"अरे आज अंतराने "


"जाऊ दे वैशाली तू नको मनाला लावून घेऊस आणि खरं तर मला तिचा राग आलाच नाही कारण ती तशीच नेहमी बोलते "


"हो पण अनंत तू आणि तिच्या प्रेमात खरंच माझ्यासाठी तर आश्चर्याचा धक्काच होता "


"हो ना अगं माझ्या पेक्षा तू तिला जास्त ओळखतेस त्यामुळे ती दिसते तेव्हडी वाईट नाही "


"बरोबर अंनत मानलं तुला तू कसं ओळखलस "? 


अनंत ने भिकारी मुलाचा किस्सा सांगितला ते ऐकून वैशाली म्हणाली "हो रे ती खूप चांगली आहे पण तिचा चांगुलपणा मलाच माहिती होता पण बरं झालं तो तुला कळला "


"पण वैशाली ती एव्हडी प्रेमळ आहे तर कॉलेज मध्ये तिचा स्वभाव "


"त्यात तिची काहीच चूक नाही ती बिचारी काय करणार परिस्थितीने तिला बदले "


"म्हणजे"? 


"अंतरा आणि मी बालमैत्रिणी एकाच कडे राहायचो अगदी बालवाडी पासूनच्या म्हणून तर आज हि आमची मैत्री घट्ट आहे अंतरा खूप बोलकी हसरी खट्याळ अशी होती आम्ही चौथी मध्ये होतो तेव्हा तिनी मला सांगितलेले कि तिच्या आई बाबाचे मोठे भांडण झाले आहे आणि बाबांनी आईला मारले  आणि ते एकमेकांशी बोलत नाही एकाच घरात राहून त्या अबोल्यात अंतराची फरफट होत होती आईबाबा तिला वेगवेगळे फिरायला नेत  पण एकत्र कधीच जात नाही हे ती मला रडून सांगत असे आणि जे नको व्ह्याचये तेच झाले अंतरा पाचवीत पोचली आणि तिचे आई बाबा विभक्त झाले एवढ्या लहान वयात तिच्या मनावर एव्हडा मोठा आघात बसला तेव्हा पासून अंतरा अबोल आणि रागीट झाली ती नेहमी मला सांगायची माझे बाबा असे का वागले आणि त्या दोघानी माझा का विचार केला नाही जशी जशी ती मोठी होत गेली तिला कळले कि तिच्या आईबाबाचा प्रेमविवाह झाला होता प्रेम विवाह होऊन सुद्धा आपल्या साठी त्याचे प्रेम का नाही जागले ह्या विचाराने ती अस्वस्थ वह्यांची तिचा प्रेमावरचा विश्वास च उठला त्याचवेळी तिनी एक निर्णय घेतला आणि तो मला हि संगितला कि प्रेम आणि लग्न ती आयुष्यात कधीच करणार नाही "


"काय एवढे सहन केलंय अंतराने मग ती आता कोणासोबत रहाते "


"हो अनंत तिच्या डोळ्यातले अश्रू मी शाळेत पहिले ती आई आणी तिचे आजी आजोबा म्हणजे आईचे आईबाबा तिचे बाबा तर परत फिरकलेच नाही  आपले आई बाबा सोबत राहणार नाही हि गोष्ट तिला पटत नव्हती पण तिचे आईबाबा ना तिच्यासाठी मागे फिरले आज रागीट अंतरा सगळयांना दिसते पण मनातून खचलेली अंतरा मलाच माहित आहे मी देवाकडे नेहमी प्रार्थना करायची कि देवा अंतराला असा माणूस भेटू दे जो तिला खूप प्रेम करेल आणि ती आपला सुखी संसार सुरु करेल आणि तुला पाहून खरंच अनंत बरे वाटले तू तिला सुखी ठेऊ शकतो पण हे कसं शक्य होईल माहित नाही "


"तू चिंता करू नकोस वैशाली हा अनंत कधीच अंतराला अंतर देणार नाही रस्ता अवघड आहे पण देवाचा आशीर्वाद असेल तर प्रवास सुखकर होईल "


"देव करो असेच होवो मला अंतराला सुखात आणि आनंदात पाहायचे आहे "


"वैशाली एक काम करशील "?


"बोल अनंत "


"मला अंतराची खबर बात तू देत राहशील "


"हो नक्कीच माझ्या अंतराच्या सुखासाठी मी काहीही करेन पण एक विनंती आहे तू खरंच प्रेम करत अशील तरच नाहीतर प्लिज तिचे मन परत दुखवू नकोस कारण अगोदरच  ते दुखावले आहे "


"नाही वैशाली तुला माझ्यावर विश्वास नाही "


"तसं नव्हे "


"चिंता नसावी अंतराला सुखी ठेवणे माझी जबाबदारी "


"पण अनंत हे कस शक्य होईल "


"पाहूया "


"बरं अनंत ठेवते फोन "


"हो बरं परत बोलू आणि धन्यवाद तू फोन केला म्हणून मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली"


फोन ठेवताच नकळत अनंताच्या डोळ्यातून अश्रू आले "देवा किती रे सहन केलं माझ्या अंतराने आता तरी तिला सुखी ठेवण्यासाठी मला तुचा आशीर्वाद दे "


अनंताचे हे कळकळीचे सांगणे देव ऐकेल का ?

असेच दिवस जात होते अनंत अंतराची हकीकत ऐकल्या पासून अंतरा कडे खूपच हळवा झाला होता अंतिम वर्षाच्या परीक्षा संपल्या महिन्या भरात निकाल हि लागला तिघेही चांगल्या मार्काने पास झाले अंतरा आणि वैशाली ने नोकरी करण्याचे ठरवले तिथे अंनत हि नोकरीच्या शोधात होता आणि काही महिन्यातच तिघाना वेगवेगळ्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली अंतरा जरा हिरमुसली होती कारण तिच्या पासून वैशाली लांब होती पण वैशाली ने तिला समजवताच ती नोकरी साठी तयार झाली


अनंत अंतराची  खबर बात  वैशाली कडून घेत होता ह्याची खबर मात्र अंतराला नव्हती अश्याच एक दिवशी  अनंत ला वैशालीकडून अंतराच्या वाढदिवसा बद्दल कळले आणि तो हि उद्यावर येऊन ठेपला होता प्रेम करून हि तो तिला समोरासमोर शुभेच्छा देऊ शकत नसल्याने त्याच्या हिरमोड झाला होता पण क्षणात त्याला एक कल्पना सुचली आणि तो ऑफिस मधून बाहेर पडून शहरातल्या प्रसिद्ध मॉल मध्ये गेला आणि क्षणात तो एक मोठी पिशवी घेऊन आला त्याने फोन लावला आणि गाडी सुरु करून निघून गेला 


इथे वैशाली घड्याळात पाहत कोणाची तरी वाट पाहत होती अनंत दिसताच ती हसली 


"कसा आहेस "?


"मी मस्त तू "?


"मस्त "


"वैशाली हे घे ह्यसाठी मी तुला इथे बोलवले "


"काय आहे त्यात "?


"अंतरासाठी वाढदिवसाचे गिफ्ट उद्या वाढदिवस आहे ना "


"अरे हो पण हे गिफ्ट मी तिला कसे देऊ "?


"काळजी करू नकोस हे गिफ्ट मी दिले न सांगता तू दिले असे सांग "


"अरे पण ते बरं नाही वाटत "


"वैशाली तुला माहित आहे मी दिले सांगितले तर ती घेणार नाही प्लिज" 


"ओके ते हि बरोबर आहे "


"थँक्स वैशाली "


"अरे त्यात थँक्स काय चल निघते मी उशीर होईल मला केक पण घ्याचा आहे 


"केक "?


"हो रे आम्ही अंतराचा बडे रात्री  १२ वाजता केक कापून साजरा करतो "


"वाह "


"तुला यायला मिळालं असत तर किती मज्जा आली असती "


"मिळेल आपण सगळे एकत्र अंतराचा वाढदिवस साजरा करू "


"हॅट्स ऑफ अनंत तुच्या पोस्टीव्हिटी साठी "


"अरे पुरे काही नाही सगळं चांगले होईल "


"असेच होऊ दे चल मी निघते बाय "


"बाय "


वैशाली ते गिफ्ट आणि केक घेऊन घरी येते अंतराचे घर जवळच असल्याने ती १२ वाजण्याच्या आधी अंतराच्या घरी पोहचली टेबलं वैगरे सजवून अंतराची आई वैशाली चे आई बाबा आणि अंतराचे आजी आजोबा मिळून केक कापण्यात आला 


"अंतरा हे घे "


"काय "?


"गिफ्ट "


"एवढे मोठे "?


"हो "


"अगं पण तू माझ्या बडे ला माझ्या  आवडत्या चॉकलेटचा बॉक्स आणते ना "


"हो पण ह्या वेळी विचार केला आता काही अंतरा लहान नाही चॉकलेट खाण्यासाठी म्हणून हे तुला नक्की आवडेल उघडून तरी पहा "


"अंतरा ने पिशवीतील बॉक्स उघडला आणि ती एकदम आनंदित झाली तिच्या आवडत्या रंगाचा ड्रेस त्यात होता आणि तो हि तिला खूप आवडला "


"थँक्यू वैशू मला खूप आवडला असे म्हणत अंतराने वैशूला मिठीच मारली "


वैशू मनातला मनात म्हणाली "थँक्यू मला नाही अनंताला म्हण अनंत तू हि बाजी जिंकलास "आणि तिच्याकडे पाहत "थँक्स काय म्हणतेस आपल्या माणसांना थँक्स म्हणू नये "


"हो माझ्या वैशू तू तर माझीच आहे अगं उद्या तर मी हाच घालणार "


वैशू मनापासून सुखावली कारण अंतरा आपल्या खास दिवशी अंनत ने दिलेला ड्रेस घालणार होती


"हो नक्कीच घाल तुला शोभेल "


त्या दोघाचे मैत्री प्रेम पाहून सगळेच भावुक झाले


अंतराने आपल्या वाढदिनी तो ड्रेस घातला हे पाहून वैशू खुश झाली त्या  ड्रेस चे गुपित मात्र गुपितच राहिले दिवसा मागोमाग दिवस पूढे ढकलत होते अनंत अंतराची खबर बात घेत होता पण अजूनही त्याची नाव किनाऱ्याला लागली नव्हती पाहता पाहत वर्ष लोटले आता तरी लागेल का अनंताची प्रेमाची नाव अंतराच्या किनारी ?

एका वर्षा नंतर .........


सकाळची वेळ अनंत ऑफिस साठी तयार होत होता आई ने किचन मधून अनंत ला हाक दिली "अरे डब्बा घे नाहीतर विसरशील "


"हो आलो आई"


एवढ्यात त्याच्या मोबाईल वाजला त्याने पहिले तर वैशालीचा फोन तो हि सकाळ सकाळी म्हणून त्यांनी लगेच उचला 


"हॅलो हा सांग वैशाली "


"अनंत "


"काय कसे कधी "?असे म्हणत त्याने फोन  ठेवत आईला आवाज दिला "आई मला जरा काम आहे मी आज ऑफिसला नाही जाणार" म्हणत त्याने आपली गाडी स्टार्ट केली आणि गाडी येऊन हॉस्पिटल समोर उभी राहिली भराभरा जिना चढून तो त्या मजल्यावर पोहोचला त्याने पहिले तर सगळेच बाहेर होते ते हि एकदम दुखी अनंत ला पहातच वैशाली पुढे आली 


"अनंत आपली अंतरा "


"काय झालं अंतराला आणि कसे "?


तिने रडत रडत सांगितले "अनंत काल संध्यकाळी तिचे अकॅसिडेन्ट झाले आम्हाला कळताच आम्ही सगळे इथे पोहोचलो पण ती अजून पर्यंत शुद्दी वर आली नाही आणि डॉक्टर ती शुद्दीवर  आल्याशिवाय काही सांगू शकत नाही" असे म्हणतात 


अनंत चे हात पाय कापू लागले तरी हि त्याने वैशाली कडे पाहत म्हटले "नाही वैशाली आपली अंतरा शुद्दीवर  येईल आणि ती पटकन बरी होऊन घरी पण जाईल "


सगळ्यांचेच  अंतराचे आजी आजोबा आई वैशाली ची आई चे अश्रू थांबत नव्हते त्यात अनंत हि हताश होऊन झोपलेल्या अंतराकडे पाहत होता दुपार होत आली तरी कोणालाच ना भूक लागली ना तहान अनंत ला हताश पाहत अंतराच्या आजोबानी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हण्टले "बाळ तुला कधी पहिले नाही तू पण अंतराचा मित्र आहेस वैशाली सांगितले मला खरंच मैत्री काय असते ती मी आज अनुभवली सकाळ पासून तू हि आमच्याबरोबर बसून आहेस आता घरी जा आम्ही अंतराची खबर तुला देऊ "


"नाही आजोबा मी नाही जाणार अंतराला शुद्दीवर  येऊ दे "


"बाळा येईल रे ती पण तू उगीच इथे बसून दुपार होत आली भूक लागली असेल ना "


"नाही आजी आपलं माणूस असे पडले असताना कसली भूक "


"नाव काय बाळा तुझे "?


"अनंत "


"कधी अंतराच्या तोंडून नाही ऐकले असो तू जा घरी "


अनंत जायला तयार नव्हता वैशाली ने त्याला समजावले तसे तो घरी गेला पण मनात अंतराचा विचार घोळत होता


संध्यकाळच्या सूर्याला अस्ताला जाताना पाहत तो विचारात गडून गेला होता एवढ्यात त्याला वैशाली चा फोन आला आणि तो लगेच हॊस्पिटल मध्ये गेला अंतराला रक्ताची गरज होती अनंत ने धावपळ करून कुठून तरी रक्ताची व्यवस्था केली ह्या धावपळीत रात्रीचे ११ वाजले आजोबानी अनंताला घरी जाण्यास सांगितले पण आपली गरज लागेल म्हणून तो गेला नाही त्याच्याबरोबर तो हि तिथे थांबला कोणाचा डोळयाला डोळा लागत नव्हता देवाचा धावा सगळेच करत होते अनंत  ने घरी मित्र हॉस्पीटल मध्ये असल्याचे सांगितले 


रात्रीच्या १ वाजता अंतरा शुद्दीवर आली तशी नर्स ने डॉक्टर ना हाक दिली तसे डॉक्टर लगेच आले हे पाहता सगळेच अधिक चिंतीत झाले 


डॉक्टर ने अंतरा कडे पाहत म्हटले 


"हॅलो अंतरा "


"कोण कोण अंतरा "?


"तू आणि कोण "


"माझे नाव अंतरा आहे "


हे ऐकताच डॉक्टर स्वतःशी पुटपुटले "एस आय वास राईट म्हणत डॉक्टर बाहेर आले आणि तुमच्यापैकी कोण एकच आत येऊ शकतो हे ऐकल्यावर वैशाली आत आली अंतरा ला पाहत ती ने आपले डोळे पुसत 


"कशी आहेस अंतरा "?


"तू कोण आहेस "


"अगं मी वैशू तुझी मैत्रीण "


"माझी मैत्रीण मला आठवत का नाही "


हे ऐकताच वैशाली ने डॉक्टर कडे पाहत म्हटले "डॉक्टर "


"वैशाली मला संशय होता आणि तेच झाले अंतराचा स्मुर्तिभंग झाला आहे त्यामुळे ती तुम्हा कोणालाच ओळखणार नाही "


"काय डॉक्टर "?


"हो "


"पण डॉक्टर "


"हे बघ वैशाली हे सत्य तुम्ही सगळ्यांनी स्वीकारायला हवे आणि हो तिला आठवण्यासाठी काही त्रासदायक करू नका तिला जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल कारण ती खूप अशक्त झाली आहे "


"हो डॉक्टर" म्हणत वैशाली ने अंतरा कडे पहिले तर तिने डोळे बंद केले होते वैशाली ला हे सहन झाले नाही ती बाहेर येऊन ओक्शाबोक्शी रडू लागली आणि सगळे सत्य ऐकून सगळेजण हताश झाले 


अंतराची  आई हे सगळं ऐकून खाली कोसळणार होती पण अनंत ने लगेच सावरले आजी आजोबानी हि तिच्या आईची समजूत काढली 


अनंत हि हताश होऊन मनातला मनात देवाशी बोलत होता "देवा तिने कमी सहन केलेले कि आता तिची ओळखच तू तिला विसरायला लावलीस अंतरा तू ला माझा राग होता आता तर मी तुझ्यासाठी अनोळखी झालो "


अनंत अंतरासाठी अनोळखी राहील का ?

दुसऱ्या दिवशी ची सकाळ ची ती वेळ वैशाली ने अंतराची आवडती पुरणपोळी तिच्यासाठी खास बनवून घरून आणली होती अंतराचे आजी आजोबा आणि आई बाहेर बसल्या होत्या पण कोणाचीच आत जाऊन तिच्याशी बोलण्याची हिम्मत होत नव्हती वैशाली तिथे  येताच तिला हे सर्व लक्षात आले  तिने सगळ्यांना समजावले कि त्यांना अंतराला खुश ठेव्याचे आहे आणि बरंच काही तसे अंतराची आई ने आणि आजी आजोबानी  हे सत्य चढ अंतराकरणाने स्वीकारले आणि वैशाली त्याना आत घेऊन गेली 


अंतरा बेड वर डोळे मिटून होती वैशाली ने हाक देताच तिने डोळे उघडले 


"कशी आहेस अंतरा ?"


"मी माझे नाव अंतरा आहे "?


"हो आणि हे बघ मी ओळख करून देते "


"मी तुझी मैत्रीण वैशाली पण तू मला प्रेमाने वैशू म्हण्याची हि तुझी आई "


आईने अंतराला जवळ घेत कुरवाळले तशी अंतराने आई कडे पाहत विचारले 


"तू माझी आई आहेस "?


"हो अंतरा मी तुझी आई  आणि हे तुझे आजी आजोबा "


आणि अंतराने चार हि बाजूनी पहिले ती काहीतरी शोधत आहे असे वैशाली ला जाणवले 


"काय झालं अंतरा "?


"वैशाली ना तू माझे बाबा नाही आलेत "?


हे ऐकल्यावर चारही जणांच्या पायाखालची जमीन सरकली पण स्वतःला सावरत वैशाली म्हणाली "अगं तुझे बाबा ना कामानिमित्त परदेशात असतात ?


"मग माझे असे झाल्यावर ते मला पाहायला आले नाही "?


"नाही नाही त्याना फोन लावला होता पण फोन बंद आहे त्याचा पण आम्ही खबर करू त्याना "


"बरं चालेल "


"ते सोड तू हे घे तुझी आवडती पुरणपोळी आणली "


"मला पुरणपोळी आवडते "?


"हो घे" 


आजी आजोबाना उभे पाहता अंतराने त्याच्याकडे पाहत म्हण्टले "आजी आजोबा तुम्ही उभे का बसा ना "


"हो बाळा बसतो आम्ही बाहेर आहोत उगीच इथे गडबड नको तू निवांत खा आणि आराम कर असे म्हणून आपले डोळे पुसत आजी आजोबा बाहेर आले आणि बसले अंतराने आई कडे पहिले तिचे डोळे डबडबले 


"काय झालं आई कशाला रडतेस "?


"अगं काही नाही तू लवकर बरी हो असे तुला पाहायला बरे नाही वाटत आणि तू होणार बरी हे मला माहित आहे माझी अंतरा काही कमजोर नाही "असे म्हणून ती डोळे पुसू लागली 


वैशाली ने प्रसंग ओळखता "काकू तुम्ही बाहेर बसा मी बसते इथे "असे म्हणून अंतराच्या आईला बाहेर पाठवले 


"मस्त लागली पुरणपोळी "


"हो ना मीच बनवली "


"आपली कधी पासून मैत्री आहे "


"अगं आपण बालमैत्रिणी "


"हो का"? 


"हो "


एवढ्यात अनंत बाहेर आला होता तो अंतराची विचारपूस करत होता आजोबा त्याला आत जाण्यासाठी सांगते होते पण अंनत ने नकार दिला तसे आतून वैशाली ने अनंत ला पहिले आणि ती बाहेर आली 


"अनंत तू कधी आलास "?


"मघाशी अंतरा कशी आहे"?


ब"री आहे तू ये ना आत "


"नाही नको वैशाली "


"अनंत तिला काही आठवत नाही आणि तिला स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यावरच तुला समाधान मिळेल हे मला माहित आहे "


तसा अनंत वैशाली च्या मागे गेला 


"अंतरा हा बघ कोण आलाय ?"


अंतराने अनंत कडे पहिले अनंताच्या मनात धडकी भरली


"कोण हा" असे म्हणताच अनंत ने सुस्कारा सोडला 


"अगं हा आपला कॉलेज मित्र आपली चांगली मैत्री आहे आणि तो कालपासून इथेच आहे "


"हो का पण मला काहीच आठवत नाही थँक्यू "


"थँक्यू कशाला आपल्या माणसांसाठी केलं तर काय बिघडलं आणि  राहू दे अंतरा तू आठवून  त्रास नको करू घेऊस असे अंनत असे म्हणताच 


अंतरा ने त्या दोघांना पाहत "खरंच मी खूप लकी आहे कि मला तुमच्यासारखे मित्र आणी मैत्रीण आहे  "


हे ऐकल्यावर वैशाली हसली  पण अनंताला मात्र काय बोलावे सुचेना कारण त्याला माहित होते  कि तो  अंतरासाठी लकी कि अन लकी आहे  आणि हे लकी पण थोडेच दिवसाचे आहे ?


खरंच अंतरासाठी अनंत लकी ठरेल ?

अंतरा मानसिक रित्या अशक्त असल्याने तिला हॉस्पिटल मध्ये अजून काही दिवस ठेवण्यात आले त्यामुळे सगळ्यांचीच हॉस्पिटल वारी वाढली त्यात वैशाली अंतरा सोबत खूप  वेळ घालवू लागली तशी अंतराची आणि तिची गट्टी बऱ्यापैकी जमली  त्याच्या त्या गट्टीत अंनत हि न डगमगता सहभागी होऊ लागला  त्याच्या गप्पा रंगात यायच्या वैशाली आणि अनंत अंतराला हसवत ठेवण्याचा पर्यंत करत होते अश्याच एका दुपारी 


"अंतरा बाळा घाऊन घे "


"नको आई भूक नाही "


"अगं भूक नाही कशी आता खाल्ले तर तुला ताकद येईल आणि औषध पण घ्याची आहे "


"आई आज वैशाली नाही दिसत "


"अगं ती ला मी तिच्या ऑफिस मध्ये पाठवलं उगीच इथे बसून काय करणार नोकरी हि महत्वाची आहे ना ती ऐकत नव्हती पण मीच समजावले तशी गेली "


"हो तुझी पक्कम पक्की मैत्रीण ना ती बाळा लवकरात लवकर बरी होऊन घरी चल आणि त्यासाठी खा आणि औषध पण घे आणि हो आराम हि पाहिजे "


"हो आजी आजोबा माझ्या मुळे तुम्हला त्रास होतो ना "?


"वेडे काहीपण बोलू नकोस "


"मीच भरवते तुला तू काही ऐकणार नाही "


"नको आई "


"काय नको "म्हणत अंतराच्या आईने अंतराला भरवायला सुरवात केली आणि आजी आजोबा आणि आईच्या गप्पा गोष्टी हि सुरु झाल्या मध्येच आई कडे पाहत अंतराने विचारले "आई बाबांना फोन लागला कधी येणार ते "?


आईला काही सुचेना आजोबानी सावरत म्हण्टले "अगं सकाळीच लावत होतो पण लागला नाही ते जहाजवर असतात कामाला तिथे नेटवर्क मिळत नाही "


"हो अंतरा नाहीतर पळत आले असते "आपले डोळे पुसत अंतराची आई म्हणाली 


"हो का आई माझे बाबा कसे दिसतात मला आठवत हि नाही फोटो असेल मोबाईल मध्ये दाखव ना "


अंतराची आई गडबडली पण तिला अचानक सुचले "अगं तो माझा मोबाईल बिघडला आहे तो दुरुस्ती करायला तिला आहे मग दाखवते पहिली तू हे खा आणि औषध घेऊन आराम कर "


"हो बाळा बरोबर बोलते आई "


असे म्हणून अंतराला सोडून तिघेही बाहेर आले अंतराच्या आईचे डोळे डबडबले पाहून आजी आजोबा हि हळहळले त्यानी तिला सावरत म्हटले  


"उमा माहित आहे तुझ्या मनात काय चाल  असेल "


"बाबा काय देऊ उत्तर जे उत्तर दिला लहानपणी देऊन गप्प केले मग तिने कधीच तो प्रश्न मला नाही विचारला पण आता काय उत्तर देऊ कि तुझे बाबा आपल्यासोबत राहत नाही "


"नाही उमा तिला हे सत्य कळता कामा नये पहिली तिची मानसिक अवस्था चांगली नाही त्यात हे नको उमा थोडे दिवस आपल्या त्रास झाला तरी आपण नाटक करू "


"हो उमा बाबा बरोबर बोलतात "


संध्यकाळी वैशाली आली तिला त्यानी अंतराचे बाबाना विचारणे हि गोष्ट सांगितली तशी ती हि म्हणाली "तिला खरी गोष्ट कळता काम नये आपण नाटक करू आणि मी ह्यात जरूर मदत करेन "


काय होईल जर अंतराला सत्य कळले तर ?

अंतरात सुधारणा झाल्याने डॉक्टर ने अंतराला घरी जाण्याची परवानगी दिली पण काळजी घेण्यास हि सांगितली आणि अंतराची रवानगी घरी झाली सगळ्यांनी अंतराला खुश ठेवण्याचे ठरवले तिला कोणता हि त्रास होऊ नये ह्याची काळजी घेत होते अंतरा वैशाली आणि अनंत ची गट्टी मस्त जमली होती अनंत तिला हॉस्पिटल मध्ये रोज भेटायला जायचा तसा तो आता घरी येऊ लागला तासांन तास त्याच्या गप्पा मस्ती हसणे चालू असायचे


अश्याच एका संध्यकाळी वैशाली कामावरून आल्यावर अंतराला भेटायला नेहमी प्रमाणे आली त्याच्या गप्पा सुरु झाल्या अंतराने घड्याळाकडे पहिले तर संध्यकाळचे ६.३० वाजले तिनी वैशाली पाहत विचारले 


"वैशाली आज अनंत येणार नाही का अजून आला नाही "?


अनंत चे नाव अंतराच्या तोंडी ऐकून ती भारी खुश झाली 


"येणार मला काही न येण्याचे म्हण्टले नाही येईल तो "आणि एवढ्यात अनंत आत येतो त्याला पाहत वैशाली म्हणते 


"१०० वर्ष आयुष्य आहे तुला अनंत आताच अंतरा तुझी आठवण काढत होती "


हे ऐकताच अनंत आतून खुश झाला हसत हसत तो म्हणाला "खरंच अंतरा "


"हो अनंत तू नेहमी ६ वाजता येतो आज ६.३० वाजले म्हणून मी वैशालीला विचारले "


"नाही आज जरा काम होते "


"अनंत काम आहे तर तू रोज नको येउस उगीच तुला त्रास कशाला"


"नाही नाही अंतरा अगं त्रास कसला आपल्या माणसासाठी त्रास नसतो  "


त्याचे ते प्रेमळ बोलणे वैशाली हसत हसत ऐकत होती तिने मनो मन देवाला प्रार्थना केली "देवा ह्याची जोडी सत्यात उतरव "


एवढ्यात अंतराच्या आई ने त्याच्यासाठी चहा आणला चहा घेत घेत गप्पा सुरु झाल्या आणि अचानक अनंत ची नजर घडयाळावर पडली बराच वेळ झाला होता त्यांनी दोघांना पाहत म्हण्टले 


"चला मी निघतो "


"अनंत जेवून जा आता" 


"नाही नको अंतरा घरी वाट पाहत असतील "


वैशाली ने हसत हसत अनंत ला म्हण्टले "अरे अनंत अंतरा एव्हडी सांगते तर थांब ना घरी कळव कि खास मैत्रिणीच्या घरी जेवून येतो म्हणून "


"हो अनंत थांब अरे आई पण म्हणत होती अनंताला आज जेवायला थांबवू "


अंतराचा आग्रह पाहून तो थांबला सगळे एकत्र जेवणास बसले अनंताला हे क्षण हवे हवेसे वाटत होते नकळत पणे पण हे क्षण तो मनापासून जगत होता पण त्याला भीती होती अंतराच्या स्मृती परत येण्याची ती जर आली तर तो कायमचा दूर होणार होता सगळे अंतरा ची स्मृती लवकर येऊ दे साठी देवाचा धावा करत होते तर अंनत ला देवाकडे काय मागू हेच कळत नव्हते आज अंतराचा थांबण्याचा आग्रह पाहून तो खरंच सुखावला होता पण हेच सुख त्याला पुढे मिळेल ?

दिवस भर भर जात होते पण अंतराला काही आठवत नव्हते त्यामुळे ती बैचेन झाली होती अश्याच एके दिवशी ती काहीतरी शोधत असताना तिच्या आईच्या नजरेस पडली 


"अंतरा काय झालं काय शोधत आहेस "?


"हा आई आपल्याकडे अल्बम आहे ना तोच शोधत होती तू कामात होतीस म्हणून तुला नाही सांगितले "


अल्बम चे नाव घेता आईच्या डोक्यावर आठ्या पडल्या "पण तुला कशाला हवा अल्बम "?


"आई तुम्ही सगळे माझ्यावर एवढे प्रेम करता पण मला काहीच कसं आठवत नाही ह्याच मला वाईट वाटते त्यासाठी फोटो पाहून तरी काही आठवेल "


"तसं काहीही नाही बाळा तू वाईट वाटून घेऊ नकोस "


"नाही नाही कसं वाईट वाटू नकोस आई सांग ना कुठे आहे अल्बम "


"अगं मागे आम्ही घर सफाई केली ना तेव्हा माळ्यावर आहे तो आता कोण काढणार "?


"पण आई अल्बम कोण माळ्यावर ठेवत "


"अगं ठेवला तो आता कुठे मिळणार बरं ते जाऊ दे तू काय खाणार आहेस काय बनवून देऊ तुला सांग "


"नको आई काहीही नको भूक नाही मला" 


"बरं मी किचन मध्ये आहे काही लागलं तर सांग आणि हे बघ आजोबानी तुझ्यासाठी हे पुस्तक आणलं वाचत बस मन हि शांत होईल "


असे म्हणून आईने पुस्तक अंतराच्या हातात ठेवून आपला काढता पाय घेतला त्याच संध्यकाळी अंतराशी गप्पा मारून अनंत घरी निघण्यास बाहेर पडला आणि आजोबानी त्याला थांबवले 


"अनंत निघालास "?


"हो आजोबा "


"वेळ असेल तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे "


"हो नक्कीच बोला आजोबा  "


"जरा बाहेर बोलूया "


असे म्हणून आजोबा आणि अनंत बागेत आले आणि सोफ्यावर बसले 


"अनंत मला तुझ्याशी अंतरा विषयी बोलायचे आहे "


"अंतरा विषयी "


"हो मला वैशाली नी तुझ्याबद्दल सांगितले आहे अंनत तू खूप चांगला मुलगा आहेस माझ्या नातीचा हात तुझ्या हातात देताना मला कसलाच  संकोच नाही "


"पण आजोबा हि अंतरा ती नाही आज तिची स्मृती गेली म्हणून मी तिच्याशी बोलू शकतो नाहीतर मला पुढ्यात उभे गेले नसते"


"माहित आहे खूप अपमान केला ना तिनी तुझा तरीही तुझे प्रेम कमी नाही झाले "


"आजोबा ते कधी कमी होणार नाही "


"मग साथ देशील ना माझ्या नातीचा "


"मी तयार आहे पण ती तयार नाही "


"होईल तयार ती का नाही होणार जेव्हा तिला कळेल कि तू तिच्यासाठी काय काय केलंस तिची स्मृती परत आली तरी ती तुला मनापासून स्वीकारेल "


"आजोबा सध्यातरी माझा लग्नाचा विचार नाही कारण अंतराची अवस्था अजून हि चांगली नाही त्यामुळे एक वर्ष आपण थांबूया मग पाहू जे होते ते पण अंतरा तयार झाल्याशिवाय खूप अवघड आहे "


"चिंता करू नकोस अनंत माझा विश्वास आहे अंतरा तुला स्वीकारेल "


आजोबाचा विश्वास पाहून अनंताच्या विश्वासाला आणखी बळ आले तो  आजोबाचा आशीर्वाद घेऊन हसत हसत घरी परतला पण  आजोबाचा विश्वास खरा ठरेल ?

अंतराला घरात बसून कंटाळा आला होता अश्याच एका दुपारी दुपारचे जेवण करून आराम न करता तिने आपले कपाट उघडले आणि ती काही आठवत का ते पाहू लागली पण प्रत्येक खणात लक्ष देता तिला काही आठवले नाही पण एक डायरी नजरेस पडली आणि तिनी ती लगेच उघडली आणि त्यातली पाने वाचू लागली ती एक दैनंदिन डायरी होती ज्यात अंतरा दर दिवसाबद्दल लिहायची अंतरा वाचता वाचता तिथे च बसली एक एक पान ती लक्षपूर्वक वाचू लागली तिनी भराभर पाने  चाळली  तशी तिच्या चेहऱ्याचे हाव भाव बदले 


संध्यकाळ होत आली म्हणून आई अंतराच्या खोलीत तिला चहा घेऊन  आली आणि अंतराला कपाटा समोर बसलेलं पहिले आणि तिने अंतराला हाक दिली 


"अंतरा बाळा इथे काय बसलीस "?


अंतरा आईच्या आवाजाने उठली आणि सरळ जाऊन आईला मिठी मारली आईला काहीच कळेना 


"अगं काय झालं "?


"आई मला सगळं आठवत "


"काय"? 


"हो आई" 


"हे ऐकल्यावर आईने देवाला हात जोडत "देवा पावलास "अगं पण कसं आठवलं ?


"आई हि बघ माझी डायरी ज्यात मी दररोज त्या दिवसाबद्दल  लिहायची "


"देव पावला" म्हणत आई आणि अंतरा हॉल मध्ये आले आईने आजी आजोबाना हाक दिली तसे ते हि आले अंतराने आजी आजोबाना मिठी मारली आजी आजोबाही अंतराच्या स्मृती येण्याने आनंदित झाले त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले 


एवढ्यात वैशाली आणि अनंत घरात शिरले आणि आजोबानी त्यांना पाहत म्हटले अंतरा "हे बघ दोघे आले "


अंतरा पाठमोरी उभी होती ती मागे वळली आणि त्या दोघाना पाहत राहिली 


वैशाली ने तिला असे पाहताना विचारले "काय झालं अंतरा कशी काय पाहते "?


"वैशू हा तुच्याबरोबर काय करतोय"? 


"अंतरा तू मला वैशू म्हणालीस खूप बरे वाटले आणि हा अगं अनंत आपला मित्र "


तेव्हड्यात आजोबा म्हणाले 


"वैशू बाळा आपल्या अंतराला सगळं आठवलं "हे ऐकताच वैशू आणि अनंत ने एकमेकांच्या तोंडाकडे पहिले अनंत ला तर धडकी भरली 


"वैशू तुला मी काही विचारते हा इथे काय करतोय "?


"अगं अंतरा तो आपला कॉलेज मित्र ना तू बरी नसताना तो आपल्या सोबत होता "


"काय पण त्याला मी बरी नव्हते हे कोणी सांगितले "


अनंत ला पाहत अंतरा म्हणाली "हे तू इथे येण्याची हिम्मत कशी केलीस "?


"अंतरा असे का बोलतेस अगं अनंत ने खूप मदत केली "आई ने अंतराला म्हण्टले 


"नाटक करतोय तो तुमच्या सहानभूती ने मला मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा  पण एक लक्षात ठेव अनंत माझी स्मृती परत आली आहे मला तेव्हा तुच्या खोट्या वागण्याने मला  फसवलं अशील पण आता मी ती विसरभोळी अंतरा नाही आणि हो आता निघून जा इथून "


"निघतो मी अंतरा पण तुला एवढच सांगायच आहे "मी कधीही तुला फसवलं नाही आज हि माझं प्रेम तेवढेच आणि तेच आहे "


"निघ अनंत मला तुझं प्रेम पुराण नाही ऐकायचं "


आजोबा अंतराला पाहत म्हटले "बेटा अंतरा असं नको बोलू त्याला "


"नाही आजोबा निघतो मी येतो "असे म्हणून अंनत निघून गेला 


अंतराने रागाने वैशाली कडे मोर्चा वळवला 


" तू सांगितले ना त्याला काय गरज होती तुला "?


"हे बघ अंतरा अनंत तुझ्यावर  किती प्रेम करतो ते मीच नाही सगळयांनी पहिले आहे विचार त्याना तुझ्या काळजी पोटी तो आमच्याबरोबर रात्रभर हॉस्पिटल मध्ये कसा बसून असायचा "


"पुरे वैशू पुरे तुला माहित आहे मला प्रेम आणि लग्न ह्या विषयाचा किती तिरस्कार आहे सो प्लिज असे म्हणून ती आपल्या रूम मध्ये गेली वैशू हि दुखावली ती हि न बोलता निघून गेली 


अनंत ला तर हि संध्यकाळ नकोशी वाटायला लागली नेहमी तो अंतराला भेटायला मिळणार म्हूणन संध्यकाळचा वाट पाही पण आज तो खूप दुखावला होता कारण अंतराच्या म्हण्याप्रमाणे त्यांनी तिला फसवलं नव्हतं तर त्याच प्रेम खरं होत आणि आहे पण तो तिला कसे पटवून देणार हे त्याच्यासाठी मोठे संकट होते 


अंतराचे वागणे घरात कोणालाच पटले नव्हते तरी पण तिला त्रास नको म्हणून परत कोणी तो विषय घरात काढला नाही संध्याकाळ होत आली वैशाली येण्याची वेळ हि टळून गेली तरी वैशाली काही अंतराला भेटायला आली नाही हे पाहून अंतराची चिडचिड सुरु झाली वैशाली चे घर जवळ असल्याने ती तिच्या घरी गेली तर वैशाली बाहेरच उभी होती तिला पाहत 


"वैशू तू आज मला भेटायला का आली नाहीस "?


"मला वेळ नाही मिळाला "


"वैशू तुला मला भेटण्यासाठी वेळ नाही "


"हो का "?


"मला माहित आहे वैशू तू माझ्यावर रागावलीस सॉरी मी असे तुला बोलायला नको होते "


"नाही अंतरा हे तुझे आयुष्य आहे "


"वैशू आपल्यात  कधी तुझे माझे झाले माझ्या घरातल्यानसोडून तुझ्याशिवाय मला जवळचे कोण आहे वैशू तुला माहित आहे ना मला त्याचा  राग आहे सॉरी पण त्याचा राग मी तुझ्यावर काढला" म्हणून ती रडू लागली 


वैशाली ला तिचे रडणे सहन नाही झाले तिने लगेच तिला मिठी मारली "वेडाबाई मी कधी तुझ्यावर राग करू शकते पण मला काल तुझा राग आला होता पण अंतरा मी तुझ्या भल्या साठीच बोलत होते अनंत खूप चांगला मुलगा आहे पहा ना तू एवढे अपमान करून सुद्धा तो तुझ्यासाठी धावून आला खरंच अंतरा तो तुझ्यावर खूप प्रेम करतो तो तुला सुखात ठेवू शकतो "


"वैशू पुरे मला त्याच गुणगान नको सांगू आणि हो तुला माहित आहे प्रेम आणि लग्न हा माझ्यासाठी तिरस्काराचा विषय आहे "


"अंतरा मला माहित आहे तू लहानपणी काय सहन केलंस पण त्या साठी तू तुझे आयुष्य असेच जगणार आहेस का? अंतरा प्रेम करणे वाईट नाही आणि आयुष्य भर तू काही एकटीच राहणार आहेस? अंतरा मी तुझ्यावर अनंत चे प्रेम थोपवत नाही आहे तू त्याला समजून घे पटलं तर हो म्हण नाहीतर सरळ नकार दे अंतरा अनंत ने खूप मदत केली आहे तुला जेव्हा रक्ताची आवश्यकता होती तेव्हा रात्रीची त्याने व्यस्था केली  मी नाही तुझी आई आजी आजोबा सुद्धा त्याच्या स्वभावाला भारावून गेले ते उगीच नाही "


"वैशू मला त्यात पडायचं नाही तर नको ते आणि प्लिज तू मला जबरदस्ती करू नको आपली मैत्री मला प्रिय आहे "


"ओके अंतरा मला वाटले ते मी सांगितले बाकी सगळे तुझ्यावर आणि आपल्या मैत्रीबद्दल ती तर कधी तुटणार नाही पण मला तुला सुखात पाहायचं आहे एव्हडीच माझी इच्छा आहे "


होईल का वैशाली ची इच्छा पुरी ?

संध्यकाळाची वेळ वैशाली नेहमी प्रमाणे अंतराला भेटायला अंतराच्या घरी आली पण अंतराच्या खोलीत न शिरता  आजी आजोबाच्या खोलीत गेली 


"आजोबा आजोबा "


"काय ग वैशू"


"आजी आजोबा कुठे आहेत"?


"काय झालं बाळा आज अंतराला न भेटता मला भेटायला आलीस "?


"आजोबा कारण तसेच आहे अहो अनंत चा फोन बंद का होता माहित आहे त्याचे अकॅसिडेन्ट झाले आहे "


"काय पण तुला कसे माहित "?


"आजोबा मी त्याच्या कामावर गेलेले तिथे  कळले म्हणून तडक सिटी हॉस्पिटल मध्ये गेले आणि तिथे जे पहिले "


"म्हणजे अनंत बरा आहे ना "?


"आजी नाही तो बेशुद्द आहे आणि तो फक्त अंतराचे नाव घेत आहे डॉक्टर जे म्हणे आहे कि अंतरा जो पर्यंत त्याच्या समोर येत नाही त्याच्याशी बोलत नाही तो शुद्दीवर  येणे खूप कठीण आहे "


"काय अरे देवा हे आणि काय "?


"वैशू मी पाहून येतो त्याला "


"मी पण येते "


"नाही नको उगीच अंतराला कळले तर "


"आजी तुम्ही चिंता करू नका मी जाते आजोबा बरोबर"


आजोबा आणि वैशाली हॉस्पिटल मध्ये पोहोचता अंनत चे आई वडील आणि भाऊ चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले पाहून आजोबा ना हि वाईट वाटले त्यांनी हळूच आरशातून पहिले तर अनंत बेडवर झोपला होता अनंत ची आई पुढे आली 


"बाबा तुमची नातं अंतरा ना प्लिज तिला इथे यायला सांगा माझ्या अनंताच्या जीवाचा प्रश्न आहे "


हे ऐकताच आजोबा भावुक होत म्हणाले 


"अनंताला काही होणार नाही काळजी करू नकोस ""असे सांगून वैशू आणि आजोबा बाहेर पडले वैशू ने अंतराची ओळख अनंत च्या आई बाबाना सांगितली होती 


निराशलेला चहेरा घेऊन आजोबा घरी परतले आई आणि आजी हि चिंतेत होती अंतरा मात्र आपल्या खोलीत होती तिला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती 


"काय हो कसा आहे "?


"काही सांगू शकत नाही त्याला फक्त एकच व्यक्ती बरी करू शकते ती म्हणजे अंतरा "


"काय "


"हो आम्हला अंतराला समजावे लागेल नाहीतर अनंत च्या उपकाराची फेड होणार नाही आणि मुख्य म्हणजे त्याच्या जीवाचा प्रश्न आहे"" 


"पण बाबा अंतराला कोण समजवणार "


"मी बोलेन तिच्याशी "


"पण ती तयार होईल "


"देव करो ती तयार होवो एवढच आपण म्हणू शकतो त्याचा जीव तिच्यात अडकला आहे ती त्याला सावरू शकते "


"खरंच अंतरा सावरू शकेल का अनंत ला कि अनंत चा जीव तिच्यातच अडकून राहील ?

"अंतरा बेटा अंतरा "


"काय आजोबा "?


"मला थोडं तुझ्याशी बोलायचे आहे "


"कशा बद्ल "?


"ऐकून तरी घे इथे बस "


"बोला आजोबा "


"बेटा अनंताचे अकॅसिडेन्ट झाले आहे आणि तो गंभीर आहे बेशुद्ध आहे आणि फक्त तुझे नाव घेत आहे डॉक्टरांचे असे म्हणे आहे कि तू त्याला भेटल्याशिवाय तो शुद्दीवर येणार नाही "


"मग आता अकॅसिडेन्ट काय ?चांगली नाटक चालवली आहे आणि तुम्हला मूर्ख बनवत आहे "


"नाही बाळा मी माझ्या डोळ्याने पहिले आहे तो नाटक नाही करत "


"वाह म्हणजे तुम्ही त्याला पाहून हि आलात पण तिथे जायची काही गरज होती का "


"बाळा असे कसे तू म्हणतेस आपल्या वेळी तो धावून आला तर आपण त्याच्या वेळी "


"आजोबा मी  नाही बोलवलेले त्याला "


"बाळा बोलावले नाही बोलावले हे महत्वाचे नाही पण तुझ्या प्रेमापोटी तो आपल्या साठी धावला हे महत्वाचे आहे "


"मग तुमचे म्हणे काय आहे कि मी त्याला भेटू आजोबा तुम्हला असे नाही वाटत कि तुम्ही त्याला माझ्यावर धोपवत आहात "


"नाही बाळा मी त्याला  का म्हणून तुझ्यावर  धोपवु "


"मग तुम्ही मला का सांगायला आलात तो हॉस्पिटल मध्ये असू दे नाहीतर आणि कुठे माझ्याशी त्याचा काय संबंध आणि हो तो प्रेम करतो म्हणून मी त्याच्यावर प्रेम करावे असे तुम्हला वाटत असेल तर माफ करा ते शक्य नाही कधीच नाही तुम्हला पण माहित आहे मला प्रेम ह्या विषयांवर चीड आहे सांगा आजोबा माझे काय चुकलेले म्हणून माझे आई बाबा प्रेम विवाह करून हि वेगळे झाले त्या वेळी त्यांनी माझा विचार नाही केला माझे बालपण कसे केले हे तुम्हला माहित आहे ना मग तुम्ही मला प्रेमावर विश्वास ठेव म्हणून तुम्ही कसे सांगता 


"नाही बाळा मी तुला त्याच्यावर प्रेम करावे असे नाही मला माहित आहे आणि तुझ्या बालपणीच्या यातना खूप आहेत पण सगळेच जण तसे नसतात मुळात प्रेम हे वाईट नाही ती एक भावना असते एकमेकांच्या मनाला जोडण्याची पण तुझ्या आईबाबांसाठी ती दुर्देवी ठरली   पण माणुसकीच्या नात्याने तरी तू तिथे जावे असे मला वाटते "


"पण मला नाही वाटत "


"बेटा एक माणूस म्हणून तरी आपली जबाबदारी पार पाडावी तुझ्यासाठी त्याने खूप केले त्यात तुझा खारीचा तरी वाटा असायला नको का आणि तू तिथे फक्त एक माणूस म्हणून जा कारण त्याच्या जीवाचा प्रश्न आहे आणि आपल्या मुळे कोणाचा जीव गुदमरून जावा हे पाप आपल्या माथी नको आता तिथे जावे कि नाही हे तुझ्यावर आहे प्लिज हे लक्षात घे येतो मी "


 अंतराच्या डोळ्यात उत्तर शोधत आजोबा तिथून निघून गेले पण काय असेल अंतराचे उत्तर ?


"बाबा आम्ही आलो असतो ना अंनत ला पहायला ""


"नको उमा तिथे आपण सगळे गेलो तर परिस्थिती काही बदलणार नाही उगीच त्याच्या आई वडिलांना त्रास होईल "


"हो उमा हे बरोबर बोलतात आपण इथे बसून त्याला बरे वाटू दे म्हणून प्रार्थना करूया त्या खेरीस आपल्या हातात काहीच नाही "


"चला मी निघतो " असे आजोबानी म्हटले आणि पाऊल घराबाहेर ठेवण्यात एवढ्यात त्यांना हाक आली 


"थांबा आजोबा "


"काय अंतरा "?


"आजोबा मी येते तुमच्याबरोबर "


"काय खरंच "


"हो "


आणि प्रश्न न विचारता "चल तर" असे म्हणत दोघेही घराबाहेर पडले  अंतराचे असे जाणे आई आजी आजोबा साठी हि नवलाची गोष्ट होती पण आजोबानी तिला काही प्रश्न केले नाही ते हॉस्पिटल मध्ये पोहोचले अंतराला पाहतच अंनतची आई पुढे आली ती रडत रडत अंतराला पाहत म्हणाली 


""बाळा माझ्या अंनत ला वाचावं आता तुझं त्याला वाचवू शकते तिचे ते रडणे पाहून अंतरा काहीच बोलली नाही अंनतच्या बाबानी आईला सांभाळत गप्प गेले तशी अंतरा पुढे सरकवली तिने दरवाजातून पहिले तर अंनत बेड वर झोपला होता तिने दरवाजा ढकला आणि आत गेली 


डोळे मिटून असलेल्या अंनत च्या तोंडी मात्र "अंतरा अंतराचा" जप चालू होता हे पाहून अंतराला काही सुचेना ती जरा पुढे सरकावली तिने एक नजर अंनत कडे पहिले तर तो कुठल्या परस्थिथीत आहे ह्याची जाणीव तिला झाली आणि अचानकपणे  तिच्या तोडून अनंत अनंत अशी हाक आली पण अनंत ने  काही उत्तर नाही दिले हे पाहून तिनी परत एकदा हाक दिली 


"अनंत डोळे उघड मी अंतरा आली आहे" हे ऐकताच हळू हळू अनंत ने डोळे उघडले 


"अंतरा तू आलीस "असे म्हणून पुन्हा तो बेशुद्ध झाला अंतराने डॉक्टरांना हाक मारली डॉक्टर येऊन त्याला इंजेकशन दिले अंतरा आजोबा बरोबर बाहेर थांबली डॉक्टरनी आता त्याला डिस्टर्ब करून नका असे सांगितल्याने अंतरा आणि आजोबा घरी परतले अंतरा वाटेत हि काहीच बोलली नाही घरी हि ती काही न बोलता आपल्या रूम मध्ये गेली आजोबानी घडलेला प्रकार आजीला आणि आईला सांगितला 


रात्रीच्या जेवणासाठी सगळे बसले पण काहीही न बोलता अंतराने जेवण केले आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली आजी आजोबा आणि आई ने  अंनतसाठी देवाकडे हाथ जोडले एवढ्यात आजोबाचा फोन वाजला आजोबानी लगेच उचलला आणि बोलता बोलता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदले आजी आणि आई त्याच्याकडे पाहत राहिले पण नक्की कोणाचा असेल फोन ?

सकाळ उजाडली आणि घरात कुठे बाहेर जाण्याची घाईही चालू होती रात्री अनंताच्या बाबाचा फोन आला होता कि अनंत शुद्धीवर आला आहे त्यामुळे आई आजी आणि आजोबा त्याला भेटण्यासाठी चालले होते एवढ्यात अंतरा हि तयार होऊन आली आईने तिला सहज विचारले 


"अंतरा कुठे बाहेर जात आहेस नाही आम्ही बाहेर जात आहोत घराला कुलूप लावावे लागणार म्हणून विचारले "


"आई मी तुमच्याबरोबर हॉस्पिटल मध्ये येत आहे" 


हे ऐकून आईला आश्यर्य वाटले पण तिनी तिला ते जाणवू न देता गप्प राहिली सगळे हॉस्पिटल मध्ये पोहोचले जेव्हा अंतरा येऊन गेली अनंत शुद्दीवर येऊन बोलायला लागला होता आई आजोबा अंतरा आणि आजी आत गेले अंनत त्याच्याशी बोलला तो शरीराने अशक्त होता पण  अंतरा ला समोर पाहून तो मनाने खूप ताकतवान झाला होता सगळे बोलून बाहेर आले अंतराला समोर पाहत राहावे असे त्याला वाटत होते पण अंतराला तो रोखु हि शकत नव्हता 


असेच दिवस जात होते अंतरा त्याला हॉस्पिटल मध्ये वैशाली बरोबर  रोज भेटायला येऊ लागली थोडा वेळ बसून निघून जायची  हि अनंत हि तिच्या ह्या वागण्याने खुश होता अश्याच एके दिवशी वैशाली कामामुळे आली नाही आणि अंतरा एकटीच गप्पा मारत होती अनंत ने अंतराला बोलता बोलता म्हटले 


"अंतरा मी खूप खुश आहे तू माझ्यासाठी दररोज भेटायला येत आहेस आणि एवढी चांगली बोलत आहेस आणि काय हवंय मला आता फक्त तुझ्या साथी जी गरज आहे आणि  मला ती मिळाली कि आणखी काही नको "


हे ऐकताच अंतरा अंनत ला पाहत राहिली अनंत ने अंतराला पाहत विचारले "अंतरा देशील ना मला साथ "


ह्यावर अंतराने स्वतःला सावरत म्हण्टले "अनंत तू पहिली ठीक होऊन घरी जा मग आपण बोलू आणि हो तुला मला अंधारात नाही ठेवायचं माझ्या आयुष्यात प्रेमासाठी जागा नाही असे म्हणून ती निघून गेली 


अनंत मात्र तिच्या मनात आपली जागा शोधू लागला 

अंतराने त्या दिवसापासून अनंत ला भेटणे टाळले झालेला प्रकार तिनी रागात घरी सांगितला अश्याच एक दिवशी आजी आजोबा बोलत बसले होते आणि त्याचे बोलणे अंतराच्या कानावर पडले


"अहो आपण अनंत ला भेटायला त्याच्या घरी जाऊ या का "?


"हो जायला तर हवे "


"हो आजोबा जा ना जा आता तो ठीक झाला आहे मग कशाला गाठीभेटी वाढवतात त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं ना तुम्हला मग उगीच आणखी आपलेपणा नका ओतू "


"अंतरा अगं असे नको बोलू बाळा आम्ही फक्त त्याची विचारपूस करायला जात आहोत  "


"का तो आता ठणठणीत झाला आहे त्याला पाहायला जायची गरज नाही  परत त्याची ती नाटके सुरु होतील आणि मला  त्याची ती नाटके नाही पाहायची मी तिथे आजोबा फक्त तुम्ही सांगितले म्हणून माणुसकी च्या नात्याने जात होते  आणि त्यानी केलेल्या मदतीची  परतफेड हि झाली पण आता नाही मला असे वाटते कि तुम्ही हि त्याच्याशी संपर्क ठेवू नये "


"पण अंतरा तो काही वाईट मुलगा नाही खरंच तो खूप चांगला आहे "


"आजोबा तो तुम्हला वाटतो मला नाही आणि मला वाटून हि नाही घ्यायचे "


आजी आजोबाना वातावरण तापेल ह्याची जाणीव झाली म्हणून त्यानी हसत हसत म्हण्टले "बरं तुझ्या मनासारखं होईल "असे म्हणून आजी आजोबा आपल्या खोलीत गेले अंतराने आजोबा ना तडकाफडकी सांगितले होते पण ती हि कुठे तरी पहिल्यादाच मनाने चलबिचल झाली होती 


तिथे अनंत ला अंतराच्या दररोज भेटीने  सूर जुळत होते असे वाटत होते आणि अचानक अंतराच्या तुटक  बोलण्याने तो आतून तुटला होता तरी हि त्याचे मन त्याला अंतराच्या वाटेकडे डोळा लावून बसण्यास सांगत होते पण  अंतरा पकडेल का अंनतच्या मनाची वाट ?

अंतराची  नजर चुकवून अंतराचे कुटुंब अनंताच्या संपर्कात होते पण  अंतराच्या आई ला मात्र हा लपंडावाचा खेळ नकोसा झाला होता तिने अंतराशी थेट बोलायचे ठरवले आणि तो दिवस उजाडला 


अंतरा आपल्या खोलीत डायरीत  काहीतरी लिहीत  बसली होती आई ने तिला आवाज दिला


"अंतरा बिझी आहेस का ?"


अंतराने आईकडे पाहत म्हटले "नाही गं असे का विचारतेस "?


"नाही वेळ असेल तर थोडे बोलायचे होते "


"आई तुला कधी पासून माझी परवानगी घ्यायची गरज वाटली "


"तसं नव्हे उगीच तुझी चिडचिड नको म्हणून म्हणते मग उगीच तू स्वतःला त्रास करून घेणार "


"म्हणजे तुला नेमके काय बोलायचे आहे "?


"अंतरा मला जे बोलायचे आहे त्याचा अंदाज तुला आला असेल फक्त तू न काही बोलता एकदा माझं म्हणणं ऐकून घे मग जो निर्णय घ्याचा तो घे मी तुला नाही रोखणार "


"हा म्हणजे आजोबा झाले आता तू मला कळत नाही कि तुम्ही त्या अंनतला एवढे का भुलला आहात "?


"अंतरा माझं ऐकून घेणार आहेस का "?


"बरं बोल तू काही नवीन थोडंच बोलणार तू हि त्याचेच गुणगान करणार "


"अंतरा का नको करू अगं तो आहेस तसा ज्याला कोणीही नाव ठेवू शकत नाही आम्हाला काही त्यानी भूरळ नाही पाडली पण त्याचा निर्मल आणि सुस्वभावानी आमचे मन जिकंले बाळ मला माहित आहे तुझे बालमनाने खूप सोसले आहे तुझे बाबा आपल्याशी असे वागले म्हणून सगळेच पुरुष वाईट नसतात आणि प्रेम हि वाईट नसते ती एक भावना असते एकमेकांच्या मनाला समजून घेण्याची आपलेसे करण्याची "


"मग आई तुम्ही का नाही समजून घेतले ?का नाही आपलेसे केले तुम्ही हि प्रेमच केलेलं ना ?


"हो बाळा आमचे हि एकमेकांवर प्रेमच होते ते हि खूप एकमेकांचा जीव होतो आम्ही  "


"मग एकमेकांचा जीवाचा अंत का झाला हेच होते का प्रेम ते "?


"माहित नाही असे का घडले आमचे तुटले म्हणून सगळेच प्रेम करणारे वाईट नसतात अश्या  हि जोड्या पहिल्या ज्या  अखेरच्या श्वासपर्यंत सोबत आहेत "


"मग तुझं काय म्हणणं आहे "?


"बाळा प्रेम लग्न ह्याची तुला चीड आहे पण हेच कारण पकडून तू आयुष्यभर एकटी नाही राहू शकत ?


"मी एकटी का राहणार तुम्ही आहात ते "


"बाळा आयुष्यात जोडीदाराची साथ खूप गरजेची असते त्यामुळे मला असे वाटते कि तू ह्या गोष्टी डोक्यातून काढून अनंताच्या प्रेमाचा स्वीकार करावा "


"काय ?आई हे तू काय बोलतेस जोडीदाराची साथ तुला पडली का गरज सांभाळा केलास ना माझा एकटीने आणि आपण खूप खुश आहोत त्यात "


"बाळा तुला काय वाटत मला गरज वाटली नाही तुझ्या बाबाच्या साथीची पण काय करणार तुझ्या बाबानी माझ्याकडे पाठ केली आणि निघून गेले तुला वाढवताना त्याची कमी जाणवायची मग काय कोणाच्या खाद्यांवर डोके ठेवून रडणार होते म्हणून एकटीच मनातल्या मनात येणारे अश्रू रोखत होते तुला काय वाटत मला तुझ्या बाबाची आठवण येत नाही खूप येते पण येताना एक प्रश्न घेऊन येते "तू असा  का वागलास "?तुला माहीत आहे अंतरा तुझ्या बाबासाठी मी जीवापाड होते माझ्यावर खूप प्रेम होते त्याचे पण ते कदाचित नियतीला मान्य नव्हते म्हणून एका सहीवर सगळे नाते संपवून तो निघून गेला बेटा तो एकटेपणा खूप त्रासदायक असतो आणि त्याचा अनुभव मी घेतला आहे तो एकटेपणा तुझ्या नशिबी येऊ नये हेच मला वाटते "अंतराच्या आईचे डोळे डबडबले अंतराने प्रथमच आईला असे काही बोलताना पहिले होते लहानपानापासून तिनी अंतरा समोर तिच्या बाबाविषयी कधीच विषय काढला नव्हता अंतराच्या प्रश्नांना तिनी कित्येकदा नजर आड केले होते 


अंतराचे हि डोळे भरून आले तिनी आईचे डोळे पुसत म्हण्टले "आई केवढ सहन केलंस तू आज पहिलीच वेळ तू बाबासाठी माझ्यासमोर रडलीस पण आई आपले बाबा एवढे कठोर का झाले गं माझ्यावर पण ते किती प्रेम करायचे पण तुमच्या डिवोर्स नंतर ते मला भेटायला आलेच नाही मला पहिली खूप आठवण यायची पण समज आली तेव्हा ठरवलं कि त्या माणसाची आठवण नाही काढायची ज्याने आपल्याला एवढे त्रास दिले जाऊ दे आई मला माझी आईच मोठी आहे त्या माणसापेक्षा पण आई बाबा आणि तुझ्यात वाद कसा निर्माण झाला "?


"नको बाळा ते मात्र विचारू नको "


"म्हणजे "?


"काय सांगू तुला कि तुझ्या बाबानी दुसरा संसार थाटला तो हि संपत्ती साठी "


"काय "?


"हो"


"असे कसे वागले आपला विचार नाही आला त्याला  तुझ्या प्रेमाचा तरी विचार का केला नाही "


"जाऊ दे बाळा नको त्रास करून घेऊ जे झाले ते माझे नशीब होते पण बाळा मला तुझा सुखी संसार पाहायचा आहे "


"आई एवढे पाहून आणि तू मला लग्न कर म्हणतेस अगं तो माणूस तुझ्यावर खूप प्रेम करायचा पण सोडून गेला ना "?


"बाळा तो माणूस तसा वागला म्हणून अनंत हि तसाच वागेल असे नाही आणि अनंत खूप चांगला मुलगा आहे आणि हो तुझे  लग्न तर करायचेच आहे मग अनंत का नाही "?


"आई मला लग्न नाही करायचे "


"बाळा असे नाही होऊ शकत तुला लग्न आज न उद्या करावेच लागणार बाळा आम्ही तुझ्याबरोबर किती दिवस असू मग तुला कोणाची साथ वैशू चे लग्न झाले कि ती आपल्या संसारात तिला बिचारीला कुठे वेळ असणार मग आम्ही कोणाच्या भरवश्यावर तुला ठेवू तुझं सांग आमच्या डोळ्यसमोर तुझी जबाबदारी योग्य माणसाच्या हाती दिली कि मी एकदा मोकळी झाले बाळा अनंत ला एकदा समजून घे खरंच तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तू हॉस्पिटल मध्ये असताना पहिले आहे आमच्याबरोबर तो उपाशी डोळे मिटून देवाला हात जोडून बसून राहायचा बाळा आयुष्यात एकटेपणा कधी कधी चांगला वाटतो पण कधी कधी तो जीवघेणा ठरतो आणि जे माझ्या बाबतीत घडले तेच तुझ्या बाबतीत घडेल असे नाही प्रत्येकांच्या नशिबात देवाने वेगेवेगळे लिहिलेले असते  विचार कर बाळा" म्हणत आई डोळे पुसत निघून गेली मात्र अंतरा विचारांच्या विळख्यात सापडली 

अनंत हॉस्पिटल मधून घरी परतला  तरी तो आपल्याच विचारात मग्न असे अंतराचे ते तुटक बोलणे त्याला असह्य जात होते हे त्यांनी आपल्या आईशी बोलून दाखवले होते आई म्हणजे त्याची जवळची मैत्रीणच जणू त्यामुळे तो आई शी सगळे बोलून जायचा अश्याच संध्याकाळी अंनत खिडकीबाहेर आकाश पाहण्यात मग्न होता आणी त्याची आई तिथे आली आईने तिला हाक दिली 


"अनंत अरे चहा घे "पण अनंताने काही उत्तर दिले नाही हे पाहून तिनी परत एकदा हाक मारली तसे अंनत ने आईकडे पहिले आणि म्हणला "अंग तू कधी आलीस "


"जेव्हा तू विचारात मग्न होता हे घे  चहा आणि काय रे एवढा काय विचारत करत बसलास "


"काही नाही गं "


"अंनत जरा बस मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे "


"काय बोलायचं आहे "


"अनंत हॉस्पिटल मधून आल्यनंतर पाहत आहे तू विचारत गडून जात आहेस एव्हडा विचार नको करुस आताच आजारपणातून उठलास परत जीवाला कशाला त्रास देतोस "


"म्हणजे आई मी कुठे त्रास देत आहे आणि विचारात नाही आई "


"आई आहे मी तुझी मला सर्व कळत अनंत स्पष्टच बोलते तू अंतराचा विचार सोडून दे "


"काय ?हे काय बोलत आहेस तू आई अगं मी तिच्यावर किती प्रेम करतो तुला माहित आहे "


"तू करतोस पण ती करते का करत असती तर ती तुला भेटायला आली असती आणि आपल्या घरातल्याना तुला भेटण्यापासून रोखले नसते अनंत ती तुझ्यावर प्रेम नाही करत मग तू कशाला तिचा विचार करतोस "


"आई तसे नाही काही अंतरा हॉस्पिटल मध्ये यायची ना "


"हो यायची पण त्या दिवशी जे तिने बोलून दाखवले त्यावरून हे स्पष्ट आहे कि ती तुझ्यावर प्रेम नाही करत "


"आई तिचे असे म्हणे का आहे हे तुला माहित आहे ना" 


"हो अनंत माहित आहे तिने आपल्या लहानपणी जे सोसले ते खूप वाईट होते तिची आई एव्हडी चांगली असून हि तिचे बाबा असे  वागले हे पाहून वाईट वाटते पण त्या गोष्टीला पकडून अंतरा तुझ्या प्रेमाचा अपमान करते असे तुला नाही वाटत मान्य आहे जे झाले ते वाईटच होते पण सगळेच वाईटच आहेत असे नाही ना तुझ्या सारखा एव्हडा प्रेमळ साथीदार मिळणे नशिबाची गोष्ट आहे हे तिला कसे कळत नाही "


"नाही आई अंतरा हि खूप चांगली आहे थोडे तिचे विचार वेगळे आहेत आणि बघ तू अंतरा च तुझी सून होणार "


"अनंत स्वप्न आणि सत्यात फरक आहे इथे ती तुझे प्रेम स्वीकारायला तयार नाही आणि सून म्हणून कशी येईल अनंत मला वाटते तू उगीच तिच्यात गुंतत आहेस तिचा विनाकारण विचार करून तू स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तिच्या हुन सरस मुलगी तुला मिळेल "


"नाही आई अंतरा हुन सरस माझ्यासाठी कोणीच नाही प्लिज आई मला अंतराला अंतर देण्यास सांगू नकोस "


"अनंत अरे तू तिच्यासाठी एव्हडा जीव तोडतोस पण तिला काही जाणीव आहे का नाते दोन्ही बाजूनी समजले तरच नाते टिकते "


"आई समजेल तिला "


"कधी ?अनंत तुला  माहित वेळ काळ सांग अख्य आयुष्य तिच्या वाटेकडे डोळे लावून बसणार आहेस का ?अनंत जे चित्रपटात दाखवतात ते खऱ्या आयुष्यात नाही घडत आमच्यासाठी विचार बदल आणि अंतराला विसरून जा "


"पण आई "


"अनंत मला तुझे काहीच ऐकायचे नाही अंतरा हा विषय आजपासून बंद "


"आई तू असे का म्हणतेस "


"कारण मी तुझी आई आहे नाही पाहवत तुला असे एव्हडा जीव लावून जर कदर नसेल तर कशाला हवे असले नाते "


"आई अंतराला माझ्या प्रेमाची जाणीव होईल ""


"असे तुला वाटते मला नाही स्वप्न पाहणे चांगले असते पण फक्त स्वप्नात रमून जाणे नाही येते मी विचार कर असे सांगून आई निघून गेली 


अनंत मात्र निराशेच्या स्वरात म्हणाला "आई तुझे कुठेच चुकत नाही तुझे म्हणे हि खरे आहे पण तू सांग अंतरा मी तुला कसे विसरू "?

असेच दिवस जात होते आई ने समजावून हि अंतराने कुठलेच पाऊल अनंताच्या दिशेने वळवले नव्हते अंनत आपल्या भाबड्या मनाला अंतराची आशा दाखवत होता पण त्याला हि अंतराच्या अश्या वागण्याने अंतरा पासून दूर जाण्याची भीती सतावत होती दोघांच्या ही आई काळजीपोटी व्याकुळ झाल्या होत्या दोघाच्या नशिबी काय लिहिले आहे हे देव जाणे असे त्याचे म्हणे होते कारण एकीकडे प्रेम करणारा होता तर दुसरीकडे प्रेमाचा तिरस्कार 


अश्याच एका सकाळी दरवाजावरची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला 


"अंतरा तू "?


"हो "


"आज अचानक "


"मला अनंत शी थोडं बोलायचं आहे "


"आत ये तो आपल्या खोलीत आहे मी बोलवते त्याला "


"नाही नको काकू तुमची हरकत नसेल तर मी त्याच्या खोलीत जाऊन बोलते "


"नाही मला काही प्रॉब्लेम नाही अंतरा तू जाऊ शकते पण एक सांगू का मला नाही माहिती तू काय बोलणार आहेस ते पण प्लिज तो पहिलीच दुखावलेला आहे आणि त्याला दुखावू नकोस जे आहे ते स्पष्ट सांग "


अंतरा ने काहीही उत्तर दिले नाही पण एवढे विचारले" प्लिज खोली दाखवता का "?


"हो "असे म्हणून अंनतची आई पुढे आणि त्यामागे अंतरा गेली अनंत खिडकीबाहेर पाहत उभा होता तो दरवाजाच्या दिशेने पाठमोरा उभा असल्याने अंनतला हाक देत आई म्हणाली 


"अंनत अरे पहा अंतरा आली आहे तुला भेटायला "


हसत हसत अनंत म्हणाला "आई माझ्या मनाच्या शांती साठी चांगलं आहे ती इथे येणे आता तरी मला शक्य वाटत नाही   "


हे ऐकून आई म्हणाली "अरे मागे वळून तरी पहा "


अंनत ने मागे वळून पहिले तर खरेच अंतरा उभी होती 


अंतराला पाहतच त्याच्या चेहऱ्यावर हसू आले त्यानी हसत हसत म्हण्टले "अंतरा तू इथे अगं उभी कशाला बस  "


अंनतची आई अंतरा येण्याने सुखावली "तुम्ही बोलत बसा" असे म्हणून तिने काढता पाय घेतला 


अंतरा खुर्चीवर बसली समोर असलेल्या खुर्चीवर अनंत बसला त्याच्या चेहऱ्यावर  आनंद ओसंडून वाहत होता 


अंतरा मात्र गप्प आहे हे पाहून "काय झालं अंतरा बोलत का नाहीस "?


"अनंत मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे "


"अगं बोल ना मग अशी गप्प का "


"अंनत तू माझ्यावर प्रेम का करतो "?


हे ऐकल्यावर अंनत थोडा गप्प झाला हे ऐकून अंतरा ने विचारले 


"काय झालं गप्प का "?


"अंतरा मी ह्या विषयवार बोलले तुला आवडेल "?


"का नाही प्रश्न मी विचारला म्हणजे उत्तर हि मला अपेक्षित आहे 


असे तुझे म्हणे आहे तर "ऐक अंतरा तुझ्यावर प्रेम का करतो म्हणजे ?प्रेम हे करावं लागत नाही ते आपणच होत "


"पण मीच का अंनत "?


"तुच का ?"


"कारण तू मला आवडलीस ते हि मनापासून "


"काय पण का ?माझा स्वभाव तुला माहित आहे कॉलेज मध्ये पण माझा स्वभाव रोखठोक होता मग अशी मुलगी कोणाला आवडू शकते मुळात मी तुझ्याशी कधीच चांगली वागले नाही ते असताना सुद्धा "


"अंतरा तुझा स्वभाव जरी रोखठोक असला तरी तुझं मन तसे नाही आहे तू ना फणसासारखी आहेस वरून काटेकोर पण आत प्रेमळ रसाळ  "


"म्हणजे "?


"अंतरा मला तू तशीच वाट्याची रोखठोक पण जेव्हा मला तुझे मन जाणवले तेव्हा तू खरी अंतरा सापडलीस आणि त्याच अंतराच्या प्रेमात मी पडलो "


"म्हणजे हे कोड्यात टाकून बोलणे बंद कर सरळ सरळ सांग "


"अंतरा मला हि तू खूप रागीट वाटायची पण त्या दिवशी जे मी पहिले आणि माझे मत काय माझे मन हि तुझे झाले एके दिवशी तू  गाडीवरून घरी  जाताना मी हि तुझ्या मागेच होतो तो एक योगायोग समज किंवा देवाचा संकेत तुझे खरे रूप जाणवू देण्यासाठी तू त्या भीक मागण्याऱ्या लहान मुलाला शेजारच्या दुकानात घेऊन गेलीस त्याला खूप सारे खाऊ दिलेस तिच्या आई जवळ जाऊन पैसे देत सांगितले "कि ह्याला भीक मागायला पाठवू नका त्याचे बालपण हिरावू नका त्याला शाळेत पाठवा पाहिजे तर मी खर्च करिन बस अंतरा हे ऐकल्यावर माझे डोळे आणि मन हि तुझ्यासाठी उघडले ते कायमचे मग तुझं सांग अश्या मुलीशी कोण प्रेम नाही करणार "


"तरीही तुला माहित आहे ना मी सांगितलेले तुला कि प्रेम आणि लग्न ह्याची मला चीड आहे तरी तू इतकी वर्ष वैशाली शी माझी ख्याली ख़ुशी का विचारायचा ?"


"अंतरा तुला त्या गोष्टीची चीड येणे स्वाभाविक आहे जे तू लहानपणी सोसले आहे ना "?


"काय हे तुला कोणी सांगितले "?


"अंतरा मला कोणी सांगितले ?का सांगितले ?हे महत्वाचे नाही पण ज्या प्रेमाला तू परकी झालीस ते प्रेम मी तुला देऊ इच्छितो तुला सुख समाधानात द्यावेसे वाटते पण अंतरा जर तुझी परवानगी असेल तरच कारण प्रेम हे जबरदस्ती नाही आपुलकीने होते "


"जर मी नाही म्हटले तर तू काय करशील "?


"अंतरा तू नाही म्हटले तर तो तुझा निर्णय मी हसत हसत स्वीकारेन "


"आणि मग काय कोणा दुसऱ्याशी लग्न करशील ना "?


"नाही अंतरा तू नाही म्हणालीस तर मी आजन्म अविवाहित राहीन "


"काय "?


"हो अंतरा हे मी खोटं नाही सांगत पुरावा नाही आहे माझ्याकडे पण तू पाहशील तू माझे पहिले प्रेम आहे आणि माझा जीव माफ कर अंतरा पण जे खरं आहे ते सांगतो तू नाही मग मी कोणावर दुसरे प्रेम कसे करू शकतो "


"अनंत तुला नाही वाटत असे करून तू तुझेच नुकसान करून घेणार आहेस "


"माझे नुकसान तू नसण्याने होणार आहे मी कोणा दुसऱ्या मुलीशी लग्न केले तरी मी सुखी नाही राहणार आणि मी दुसऱ्या मुलीचे आयुष्य उध्वस्त नाही करू शकत त्यामुळे तू नाही तर मी एकटाच राहणार तो हि आजन्म "


"बोलायला हे खूप सोपे आहे पण सत्यात उतरवणं खूप कठीण आणि तुला काय वाटत आजन्म तुला तुझे आई वडील अविवाहित राहायला देतील शक्यच नाही "


"अंतरा हा माझा निर्णय आहे त्यात माझे आईबाबा कसे हस्तक्षेप करू शकतात "


"अंनत तू तुझ्या आई वडिलांचे मन दुखावणार तर "


"नाही अंतरा माझे आईबाबा खूप समंजस आहेत ते माझ्या भावना समजून घेतील"


"म्हणजे तुझा निर्णय पक्का आहे तर  "?


"हो अंतरा पक्का"


"अंनत अजूनही विचार कर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे "


अंनत ने हसत हसत म्हण्टले "माझे आयुष्यच तूच  आहे मग प्रश्न कुठला "


अंनतच्या अश्या बोलण्याने अंतरा जरा गप्प झाली तिला गप्प पाहून अंनत म्हणाला "थँक क्यू अंतरा तू इथे आलीस माझ्या मनातले सगळे ऐकून घेतलेस हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे "


अंतरा ने अंनत वर एक नजर टाकली आणि ती तिथून  निघून गेली अंतराला अंनत चे उत्तर मिळाले होते पण तिचे मन बदलेले का ?

अंतरा अंनत कडे गेलेली ह्याची खबर तिनी घरात दिली नव्हती पण अनंतने सगळी खबरबात अंतराच्या घरच्या कानावर घातली होती अंतरा अनंताच्या भेटी नंतर खूप अस्वस्थ जाणवत होती पण घरातल्यानी तिला काहीच विचारले नाही दोन दिवसांनी अश्याच एका संध्यकाळी अंतरा बाहेर जाते म्हणून आपली गाडी घेऊन बाहेर पडली 


आणि दरवाजाची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला 


अंतराला पाहून अनंत ची आई चिडली तिने रागाने विचारले "आता कशाला आली आहेस "?


अंतराने त्यांना पाहत म्हटले "मला अनंताला भेटायचे आहे "?


"पण का त्या दिवशी येऊन गेलीस आणि परत काय भेटायचे "


"मला बोलायचे आहे त्याच्याशी आत येऊ" 


अंतराचा आवाज ऐकून अनंत बाहेर आला 


"अंतरा तू "?


"अनंत तयार हो "


"म्हणजे अंतरा "?


"अनंत तू हॉस्पिटल मधून घरी बसून बसून कंटाळा अशील जरा बाहेर जाऊया तुला बरं वाटेल "


हे ऐकून आई गप्प झाली अंनत अंतराला पाहत राहिला 


अंतराने परत हाक दिली" अनंत तयार होतोस ना "?तसा अनंत तयार व्हायला गेला अंनत ची आई गप्पच आहे हे पाहून अंतरा म्हणाली 


"काळजी करू नका काकू अनंत ला सुखरूप आणेन आजारातून बाहेरची हवा खूप फायदेशीर असते "तो पर्यंत अंनत तयार झाला आणि अंनत आणि अंतरा घरातून बाहेर पडले अंनत च्या आई ने देवाला हात जोडले 


अंनत गाडीत गप्प आहे हे पाहून अंतराने कार चालवत त्याला  विचारले "काय झालं गप्प का "?


"काही नाही पण आपण कुठे जातो हे कळेल का "?


कळेल कळेल असे म्हणून गाडी एका रेस्टोरंट कडे येऊन थांबली 


अंतराने अंनत ला हसत हसत म्हण्टले "उत्तर" तसे दोघेही उतरले 


दोघेही चालत चालत आत गेले अंतराने वेटर ला काही विचारले तसे वेटर पुढे आणि हि दोघे मागे असे खुल्या गार्डन मधील टेबलं जवळ येऊन थांबले टेबल फुलांनी सजवलेले होते हे पाहून अंनतला काही समजेना तसे अंतराने त्याला बसण्यास सांगितले तसे दोघेही समोरासमोर बसले अंनत ने आजू बाजूला पहिले तर एक तिसरी ख्रुचीपण तिथे होती ते पाहून अंनत ने अंतराला विचारले अंतरा आपण इथे आणि हि तिसरी ख्रुची कोणी येणार आहे का ?


"हो अंनत मला काही सांगायचे आहे आणि हि सजावट पण त्या माणसासाठी "


"त्या माणसासाठी म्हणजे "?


"ज्या माणसावर मी प्रेम करते तो माणूस "


"म्हणजे प्रेम कोण माणूस आणि तुला तर प्रेम ह्या ची चीड आहे "


"नाही नाही मला प्रेमाची चीड होती पण जेव्हा पासून त्याला भेटले  त्या माणसाने माझे मन बदले म्हणून तर मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही "


"काय "?


"हो "


हे ऐकून अनंत थोडा गंभीर झाला 


"हे बघ मी तुला सांगणार नव्हते पण तू माझ्यासाठी आजन्म अविवाहित राहू नये म्हणून तुला सांगते तू लग्न कर "


"अंतरा मी तुला सांगितले आहे मी तुझ्या शिवाय कोणाशीच लग्न करणार नाही पण त्या माणसाला जरूर भेटेन जो तुझा साथीदार असेल कधी येणार तो "?


"येईल लवकरच "


"तो खूप चांगला आहे तुला भेटून त्याला आनंद होईल माझ्यावर खूप प्रेम करतो तो आणि मी हि "


हे ऐकून अनंत हसत हसत म्हणाला "ऐकून बरे वाटले कि तू कोणावर तरी प्रेम करतेस "


"मग तो आहेस तसा मन लावणारा "


अनंताच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले तसे अंतराने फोन उचला आणि बोलू लागली "आत ये गार्डन मध्ये माझा मित्र आणि मी वाट पाहतो "


हे ऐकून तर अंनतला अंतरांनेच आपल्याला अंतर दिल्याचे जाणीव झाली पण तो माणूस कोण असेल हि मात्र पाहण्याची उत्सुकता मात्र त्याला बसू देत नव्हती कोण असेल ती व्यक्ती ?

अंतराचे कोणावर प्रेम असू शकते ह्यावर अनंताचा विश्वास बसेना तरी पण त्याच्या मनाला त्या माणसाविषयी उत्सुकता होती अंतराने अनंत कडे पहिले तर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलेले जाणवले तसे ती म्हणाली "अनंत तुझे डोळे बंद कर "


"का अंतरा "?


"अरे कर तरी त्या माणसाला तुला पाहायचं आहे ना "?


अंनतने रागाच्या भरात म्हण्टले "त्याला पाहायला मी माझे डोळे का बंद करू "?


"अरे रागवतोस का "?


"मी कुठे रागावतो "?


"कुठे रागावतो मग तुझा आवाज का चढला "


अंनत ने निराशेत म्हण्टले "जाऊ दे कोण आहे बोलावं त्याला मला पाहायचं आहे "


अंतरा ने हसत हसत म्हण्टले "बरे बरे म्हणून तर मी सांगते डोळे बंद कर "


अंनत ला अंतराचे ते हसणे अजब वाटले तरी त्याने डोळे बंद गेले आणि लगेच वेटर तिथे आला आणि त्याने अंतराच्या हातात काहीतरी दिले 


अंतराने ते हातात घेतले आणि समोर धरले आणि अनंताला डोळे उघडण्यास सांगितले तसे अंनत ने डोळे उघडले अनंतने आजू बाजू पहिले पण त्याला कोणीच दिसले नाही 


"अंतरा कुठे आहे तो माणूस ज्या साठी मला डोळे बंद करायला सांगितले" 


"हा पहा"


"कुठे "?


"अरे इथे पहा "


अंनत ने पहिले तर अंतराने त्याच्यासमोर आरसा पकडला होता आणि अनंत ला आपलेच रूप त्यात दिसत होते


"अंतरा हे काय आहे मला समजेल  "?


"अनंत आणखी तुझी उत्सुकता नाही वाढवणार शांत हो ह्या आरश्यात ज्याचे प्रतिबिब  दिसते तोच माणूस ज्याला तू शोधत आहे "


"म्हणजे "?


"म्हणजे अंनत तुझं आहेस ज्यावर मी प्रेम करते "


"काय अंतरा "?


"हो अनंत "


"पण तू तर माझ्यावर प्रेम  "


"अनंत माझं मत माझं मन तू बदलस मला तुझ्यावर प्रेम करायला लावलेस "


हे ऐकून अंनत खुश झाला त्याच्या चेहऱ्यावर  हसू परतले तो हसत हसत म्हणाला "काय खरंच अंतरा "?


"हो अनंत प्रेम काय असते हे तू मला शिकवलंस माझ्या प्रेमाची परिभाषा तू बदली तुझ्या सारखा साथीदार मिळणार तर आणखी काय हवंय "


"म्हणजे अंतरा तू लग्न "


"हो अनंत मी तुझ्याशी  लग्न करणार आहे माझा बाबा वाईट वागला म्हणून सगळेच वाईट असतात हे मी गृहीत धरून बसले होते पण आईने मला समजावले आणि तुझ्या त्या दिवशी बोलण्याने माझे मन मलाच हजार प्रश्न करू लागले आणि मला उत्तर सापडले कि तुझं माझे सर्वस्व आहे "


"अंतरा हे खरे आहे कि मी स्वप्न पाहत आहे "


"नाही अनंत तू स्वप्न नाही हे सत्य आहे "


"अंतरा पण मला काहीच कळत नाही "


"अनंत शांत हो ह्या अंतराने तुझे प्रेम स्वीकारले आहे ते हि मनापासून "


अंनतचे डोळे भरले त्याला रडताना पाहून अंतरा म्हणाली "वेड्या रडतोस काय खूप रडलास माझ्यासाठी पण आता नाही "


"नाही अंतरा मी कुठे रडतो अगं हे तर आनंदाचे अश्रू आहेत पण ती तिसरी व्यक्ती कोण जिच्या बरोबर तू बोलत होतीस आणि हि तिसरी खुर्ची "


अंतरा हसत हसत म्हणाली" अरे ते मी नाटक केले हे सर्व तुझ्यासाठी होते "


काय अंतरा पण हे तुला सुचले 


अंतरा हसत हसत म्हणाली वैशू ची आयडिया 


काय 


हो मी वैशूला माझ्या मनातली गोष्ट सांगितली तर तिने मला तुला जरा फिरवून घे म्हण्टले 


काय म्हणजे वैशू पण 


चल आता हस जरा खूप राग आला असेल ना 


नाही नाही अंतरा असे म्हणून दोघेही हसू लागले अनंतने अंतराचे आवडते आईस क्रीम मागवले आणि दोघेही प्रेमाच्या रंगात विरघळे दोघेही घरी परतले ते आनंदाची बातमी घेऊन दोघांच्या घरी आनंदाचे वातावरण झाले अंतराचे नवे रूप पाहून सगळेच खुश होते असेच दिवस जात होते दोघेही आपापल्या कामावर रुजू झाले पण भेटीगाठी वाढत होत्या जी अंतरा अनंत चे नाव घ्याला सुद्धा रागराग करायची तीच अंतरा आता आपल्या घरी अनंत बदल भरभरून बोलत असे आणि आजी आजोबा  आणि आई ते मनसोक्त ऐकत असत 


अशेच वर्ष निघून गेले आता मात्र लग्नाची तयारी सुरु झाली दोघेही लग्नाच्या तयारीत आकांत बुडले होते अंनत ने तर आपल्या अंतराला नाव ठेवणाऱ्या मित्रांना पहिली पत्रिका दिली आणि आपले खरे प्रेम सिद्ध केले अंतराच्या घरी तयारी चालू होती पण अंतराची आई थोडी निराश होती कारण अंतराचे बाबा असून हि पोरी च्या लग्नाला नाही ह्याचे दुःख तिला झाले होते तिचे ते दुःख अंतराने ओळखले आणि आईला हिम्मत देत आईला एकटीला कन्यादान कर असे सांगितले पण आपल्या रिवाजात ते बसत नसल्याने आजी आजोबानी अंतराचे कन्यादान करण्याचे ठरवले पण अंतराने आपल्या आईला एक अट घातली ती म्हणजे कन्यादान करतेवेळी तिनी तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवावा  


तयारी जोरात चालू होती वैशू तर खूपच खुश होती कारण दोघेही तिचे जवळचे होते आणि अंतराला सुख मिळणार होते ती हि तयारी जोमाने करत होती असेच दिवस गेले साखरपुडा उरकला आणि अनंताच्या नावाची हळद अंतराला चढली आणी सप्तपतीच्या  बंधनात ते दोघे अडकले अंतराची पाठवणी करताना आई आजी आजोबांचे डोळे भरले पण अंनतने त्यांना धीर दिला गृह्प्रवेशावेळी अंतराला उखाणा घेण्यासाठी सांगण्यात आले आणि अंतरा ने हि न डगमगता भन्नाट असा उखाणा घेतला 


"अंनत ने केले माझ्यावरचे प्रेम व्यक्त 


पण मला मुळीच नव्हता रस त्याचात 


प्रेम ह्या शब्दाची यायचा राग 


पण अनंताने शिकवला मला प्रेमाचा नवा भाग 


नव्याने समजू लागले प्रेमाची महती 


अभिमान आहे मला सौ .अंतरा अंनत देसाई म्हणुन घेण्याची "


ह्या उखाण्यावर टाळ्यांचा गडगडाट झाला प्रेमाचा तिरस्कार करण्याऱ्या अंतराचा अंनत सोबत सुखी संसार सुरु झाला 

******************************समाप्त *****************************************