Kaay Nate Aaple? - 6 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | काय नाते आपले? - 6

Featured Books
Categories
Share

काय नाते आपले? - 6

तर तनुजा अभि शी बोलायचा प्रयत्न करत होती....मिताली ला जाताना बघताच तो पण निघाला तनुजा च न ऐकता.......!!


त्याने मिताली च्या हातातले बॅग्स घेतले आणी दोघेही निघाले.......!!


पन का कोण जाने तनुजा च्या मनात वेगळेच विचार चालू होते........

रात्री अभि आपल्या रूम मध्ये झोपणार च होता कि त्याच्या फोन ची मेसेज ट्यून वाजली , त्याने मोबाईल पहिला तर तनुजा चा मेसेज......

" मला तुझ्याशी खुप महत्वाचं बोलायचं आहे , एकदाच भेट अभि प्लिझ......... 🙏🙏🙏 "


अभि ने तो मेसेज पाहिला आणि विचारात पडला......

इथे मितु आपले सोन्याचे काही दागिने विकायच्या तयारीत होती..

मला माझ्या गरजा पण पूर्ण करायच्या आहेत , job लागे पर्यंत थोडा फार मनी तरी सोबत असलाच पाहिजे...

एकदा का एक्साम होउदे मग अजून 1 महिना फक्त या घरात काढणार नंतर मी एकदा कमवायला लागली कि यांच्याकडे काय माझ्या आई बाबांकडे पण जावं नाही लागणार मला...

मिताली विचार करत म्हणाली..तिने आपलं सामान रूम मध्ये अगदी व्यवस्तिथ सेट केल...

आता तिला फक्त स्वतः चाच विचार करायचा होता.. बाकी कोणाचाच नाही....

इथे अभि विचार करत होता कि तनुजा ने त्याला का भेटायला बोलावलं असेल , इतकं होऊन ही आता काय बाकी राहील आहे का? कि हिने भेटायला बोलावलं आहे....

अभि विचार करत होता , पण रागात उगाच आपण न भेटण्याचा निर्णय नको घेऊया आधी डोकं शांत ठेवून विचार करतो....

मग बघू बाकीच......

रात्र ही आता खूप झाली होती , अभि झोपायला बेड वर पडला तोच त्याच्या मेसेज ची ट्यून पुन्हा वाजली..

" उद्या सकाळी 11 वाजता sunrise कॅफे जवळ ये , मी वाट पाहिलं... " 💬

अभि ला आता काही सुचलंच नाही , इतकं बोलतेय तर आपण एकदा भेटुनच यावं असा विचार त्याच्या मनात आला.....

त्याने तिच्या मेसेज वर काही रिप्लाय नाही दिला , आणि ऑफिस ला उद्या येणार नाही असा मेल टाकून दिला....!! आज रात्र भर काय झोप लागणार नाही , काय सांगायचं असेल तिला........

अभि विचार करत रात्री उशिरा कधी तरी झोपी गेला..



सकाळी..



मिताली आपली बॅग घेऊन कॉलेज ला जायला निघाली , तोच बाबांनी तिला अडवलं ' अग मिताली , नाश्ता तर करून जा...'

ते असं म्हणताच आजी च्या भुवया उंचावल्या , त्यांना असं पाहून मिताली म्हणाली " उम्म्म... नाही नको मला मी बाहेर खाऊन घेईल काहीतरी " मिताली असं म्हणताच बाबांचा चेहरा पडला....

मिताली काहीही न म्हणता बाहेर पडली तस बाबांनी रुचिता ला इशारा केला तस त्या गपचूप बाहेर पडल्या आणि मिताली च्या हातात टिफिन दिला....

" नाश्ता नाही तर निदान डब्बा तरी घेऊन जा , तुला काय आवडत माहीत नाही पन मी जे बनवलं आहे ते कदाचित तुला आवडेल... " रुचिता..

असं म्हणत आत गेली... मिताली त्या डब्ब्या कडे पाहू लागली , डोळ्यातलं पाणी टिपत तिने तो टिफिन बॅग मध्ये भरला....

यावेळेस तिला तिच्या घरंच्यांची जास्त आठवण येत होती , आई पण अगदी अशीच न विसरता डब्बा तिच्या बागेत ठेवून द्यायची....







अभि गॅलरी मध्ये उभ राहून तिला जाताना पाहत होता...

थोड्यावेळाने स्वतः च आवरून अभि खालती आला....

बाबा : आज तु ऑफिस ला नाही गेला??

अभि : नाही ते जरा आज माझं काम होत , सो आज मी लिव्ह घेतली....

अभि कॉफी छान मग तोंडाशी लावत म्हणाला....

आई : अरे मग घरी होता तर मिताली ला कॉलेज ला तरी सोडायला जायचस , बिचारी इतक्या लांब कशी जातं असेल.......

आई थोडं काळजी च्या सुरात म्हणाली.....तोच आजी म्हणली..

आजी : जाईल तिझ ती , काही गरज नाही तिची काळजी ग
करायची.. बोलताना कशी चुरूचुरू बोलते , अजिबात संस्कार नाहीत त्या पोरीला.....

बाबा : आई आता तु शांत बस बघ , लहान आहे ती , मोठ्यांशी कस बोलावं कळत नाही तिला... आपण तिच्याशी प्रेमाने वागलो तर ती पन वागेल.....

आजी : प्रेमाने आणि तिच्याशी.....?? मुळीच नाही..19 वर्षांची आहे ती कार्टी....

या वयात तर आम्हाला मुलं होती , आम्ही तर 4 पासूनच लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी करायचो.... आम्हाला सगळं काही येत होत...

तिच्या परीक्षा संपूदे मग कशी फैलावर घेते तिला मी.......

आजी तोंड वाकडं करत म्हणाली...


अभि : मी येतो.....

म्हणत त्याने मग खालती ठेवला आणि निघाला......यांची बडबड ऐकण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट न्हवता.....


....
....

मिताली कॉलेज ला पोहोचली आज राहुल कॉलेज ला न्हवता येणार पण कॉलेज सुटल्यावर तिला भेटणार होता , एक्साम आता येत्या 5 दिवसात सुरुवात होणार होत्या..

म्हणुन खूप कमी जन कॉलेज ला येत होती , आणि घरीच अभ्यास करत होती...

एक दोन लेक्चर्स गेले आणि बाकी तास ऑफ च गेले , मग मिताली लायब्रेरी मध्येच जाऊन बसली.....

बरीच जन होती तिथे , मिताली एक कोपरा पाहून तिथेच बसली....


.....
........

इथे अभि sunrise कॅफे जवळ आला होता , त्याने आजू बाजूला पाहिलं तर तनुजा दिसत न्हवती...

तोच त्याला तनुजा चा कॉल आला....

तनुजा :- मी कॅफे मध्ये आहे अभि... तु आत ये , आणि left साईड ला ये...

अभि :- ओके....


अभि कॅफे मध्ये आला आणि left साईड ला त्याने पाहिलं तर तनुजा एकदम last च्या टेबल जवळ बसली होती....


अभि तिच्याच समोर च्या खुर्ची वर येऊन बसला आणि तिला म्हणाला...

अभि : काय बोलायचं होत माझ्याशी??

तनुजा : इतकी काय घाई आहे तुला अभि , काहीतरी ऑर्डर कर मग आपण निवांत बोलू....

अभि : हे बघ मला दुसरीकडे सुद्धा जायचं आहे , काय बोलायचं आहे ते पटकन बोल.......

तनुजा : बर बर.. तु चिडू नकोस

अभि : ह्म्म्म....

तनुजा : हे बघ अभि माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे रे... त्यादिवशी लग्न मंडपात मी मुद्दाम न्हवते पळून गेले आणि...

अभि : आणि काय??? तुला हे सगळं मागच काढायचं असेल तर प्लिझ नको काढूस , कस तरी मी मनातून ते सगळं काढून टाकलं आहे.... आता प्लिझ

तनुजा : अभि अरे तु माझं ऐकून तरी घे , जसा माझा पास्ट होता तसा तुझा पण काहीतरी पास्ट असेलच ना...??माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अभि... जेव्हा तु मला पाहायला आला होतास तेव्हाच मी तुला माझा जोडीदार म्हणुन पसंत केल होत.....

आणि त्यादिवशी खूप घोळ झाला मी मिताली ला लग्न मंडपात बसवले होते.. पण ते फक्त काही वेळा साठीच मी पुन्हा येईपर्यंत लग्न झालं हि होत तुमचं......

तुला असं वाटतय का , कि मला काहि त्रास झाला नसेल?? झाला मला पण खूप त्रास झाला अभि...

अभि : मग आता त्याच मी काय करू तनुजा?? झालं आता ते सगळं होऊन गेलं आता त्याच गोष्टी घेऊन बसण्यात काही अर्थ नाहि....

तनुजा : अभि अरे असं कस विसरू मी हे सगळं?? इतकं सोपं आहे का हे सगळं विसरणं?? तुला मितु सोबत पाहून माझं मन आतून खातंय त्याच काय??


अभि : मला यावर काहीही बोलायचं नाही , चूक तुझी आहे तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या मिताली च पण आयुष्य खराब झालं... किती सफर करावा लागतोय तिला त्याच काहि नाही का तुला...??


तनुजा : तीच काय मध्येच तु घेऊन बसला आहेस , तुला असं वाटत असेल ती चांगली पण मी सुद्धा तिची बहीण आहे तिला चांगलच ओळखते.....


अभि : म्हणजे...??


तनुजा : तिचा आधीच एक बॉयफ्रेंड आहे , राहुल नाव त्याच बघाव तेव्हा त्याच्याच बरोबर फिरत असते ती.....
अभ्यासाच्या नावाने... मिताली फक्त पैश्यांची हौरी आहे तो राहुल श्रीमंत आहे म्हणुन त्याच्या बरोबर असते...आता पण कॉलेज च्या नावाने फिरतच असेल ती.......


अभि : तु उगाच तीच नाव खराब करत आहेस तनुजा..

अभि यावेळेस जरा रागातच म्हणाला....


तनुजा : अभि तुला का इतका राग येत आहे मी तिला इतकं बोलत आहे तर???? तुला ती आवडू तर नाही लागली ना..., कि तुमच्यात काही.....

अभि : just shut up तनुजा , आमच्यात असलं काहीच नातं नाही आहे आम्ही तर एकमेकांना नवरा बायको हि मानत नाहि आणि मुळात आम्ही वेगवेगळ्या रूम मध्ये राहत असतो.......


तनुजा : काय?? तुम्ही वेगवेगळ्या रूम मध्ये राहता , लग्न झालं असूनही......

अभि : मुळात मिच तिला बायको मानत नाहि मग तिला मी माझ्या रूम मध्ये राहायचा अधिकार तरी का देऊ?


तनुजा : तुम्ही दोघ मग एकत्र तरी का राहत आहात??? तु तिला डिवोर्स का नाही देत अभि.......

तसही तुझं तिच्यावर प्रेम नाहीच आहे मग?? अभि मी तुझं लग्न होऊन हि तुझ्यावर अजून प्रेम करते..... मिताली ला डिवोर्स देऊन तु आपला विचार करूच शकतोस ना..?? कारण या लग्नाला काही अर्थ नाहीच आहे अभि.....


अभि : मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे.........



असं म्हणत अभि तिथून उठला आणि कॅफे च्या बाहेर आला.....


मनात विचारांचा गोंधळ सुरुवात झाला होता , तो कार मध्ये बसला आनी निघाला....




रिश्ता यह कैसा हैं नाते यह कैसा हैं
रिश्ता यह कैसा हैं नाते यह कैसा हैं
पहचान जिस से नहीं थी कभी
अपना बना हैं वही अजनबी
रिश्ता यह कैसा हैं नाते यह कैसा हैं
रिश्ता यह कैसा हैं नाते यह कैसा हैं

तुम्हे देखती ही रहो मैं हमेशा
मेरे सामने यूँ ही बैठे रहो तुम
करो दिल की बातें मैं खामोशियो में
और अपने लबो से न कुछ भी कहो तुम
रिश्ता यह कैसा हैं नाते यह कैसा हैं
रिश्ता यह कैसा हैं नाते यह कैसा हैं.


मिताली बराच वेळ अभ्यास केल्या नंतर तिला आता भुकेची जाणीव झाली होती.....

आणि रुचिता ने दिलेला डब्बा हि , मिताली ने बॅग ची चेन ओपन करून टिफिन बाहेर काढला , आणि तो खोलून पाहिला.....

त्यात पाव भाजी होती , तिला आश्चर्य वाटलं इतक्या सकाळ सकाळी त्या पाव भाजी बनवत होत्या... ते तिच्यासाठी करत होत्या कि??? हे माहीत न्हवत तिला...

पाव भाजी ला पाहुन तिला अजूनच भूक लागली , तिने पॅक केलेले पाव ओपन केले...

आणि ती खाऊ लागली...

" उम्म्म खरंच खूप छान बनली आहे " मिताली हळूच म्हणाली.......


......

..........

कॉलेज सुटताच मिताली कॉलेज बाहेर आली तर राहुल गेट बाहेर तिचीच वाट पाहत होता....

मिताली धावताच त्याच्या जवळ गेली आणि खुश होत त्याला काहीतरी सांगत होती आणि हळूच राहुल ने तिला वन साईड हग केल...

हे सगळं अभि लांबूनच कार मधून पाहत होता , हे पाहताच त्याची स्टेरिंग वरील पक्कड घट्ट झाली....

मिताली राहुल च्या पाठी बाईक वर बसली आणि दोघ पण घराच्या apposit साईड ला निघून गेले.......

अभि ने मग गाडी घराकडे वळवली........!! आता त्याच्या मनात वेगळेच विचार चक्र चालू होते......

त्याला तनुजा च बोलणं आठवत होत...' तिचा बॉयफ्रेंड आहे....'



संध्याकाळी 5 वाजता मिताली घरी आली , सगळे हॉल मध्येच बसले होते.....

ती इतक्या लेट आलेल पाहून आईनी तिला विचारलं " तुझं कॉलेज 1 ला सुटत ना? मग इतका लेट कसा... "?

मिताली : actully ते आमचे एक्साम्स जवळ आलेत तर एक्सट्रा lectures होते , मग मी लायब्ररि मध्ये अभ्यास करत बसले होते....
.आणि टाईम कसा गेला ते कळलंच नाही.....

आई : बर...... तु जा फ्रेश हो

मिताली : ह्म्म्म......

मिताली आपल्या रूम मध्ये निघून गेली , पण ती इतकी खोटारडी कशी असू शकते हे अभि ला सहन नाहि झालं.........

आता त्याला तनुजा खरी आणि मिताली खोटारडी वाटत होती.........!! आपण खरंच तनुजा चा पुन्हा एकदा विचार केला पाहिजेच.....




अजून पुढे वाचायचं आहे... 😗 पण मी नेहमी प्रमाणे इथेच थांबतेय 🤭

आता बघूया अभि काय निर्णय घेतो..........