Sparshbandh? - 8 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 8

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 8

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते..... विराजला तिच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न दिसत होते आणि मिष्टी ती तर त्याच्या गहिऱ्या डोळ्यात तिच्या साठी दिसणाऱ्या काळजीच कारण शोधण्यात गुंग होती.....

बाहेर काहितरी पडण्याचा आवज झाला आणि मिष्टी भानावर आली..... तिने लगेच त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला.....

" No..... Don't touch me." मिष्टीचे डोळे काठोकाठ भरले होते कधीही रडू येईल अशी तिची अवस्था झाली होती पण आवाजात कसाबसा राग आणून ती विराजला म्हणाली.

विराज सुन्न होऊन तीच्या डोळ्यात बघत होता.......विराज थोडा अजून लांब झाला तिच्यापासून , तेवढ्यात लगेच तिथून मिष्टीचा लहान भाऊ रुद्र तिथे आला...

" दि अग.....तुझ्या पाठीला लागलं आहे तुला धड चालता ही येते नाही आणि तु उभी का आहेस?? " रुद्र काळजीने तिला बेड वर बसवत म्हणाला.

" ते मला वॉशरूम मध्ये जायचं होत म्हणून मी उठले होते आणि पडले." मिष्टी आपले हुंदके रोखत म्हणाली.....

" ओके.....ओके....तु रडू नकोस....मी हेल्प करतो तुला " रुद्र असं म्हणते त्याने तिला हात धरून उठवलं आणि सावकाश तिला हळू हळू चालत तिला वॉशरूम पर्यंत नेल....

" तु जा मी इथेच बाहेरच थांबतो... " रुद्र........


मिष्टी आत गेली तस रुद्रच लक्ष विराज वर पडलं " सर तुम्ही इथे.....?? " रुद्र....

" उम्म्म......हो ते मी मिष्टीलाच भेटायला आलो होतो , तिची तब्येत कशी आहे हे विचारायचं होत... " विराज....

" ओके.....तुम्ही उभे का..?? बसा ना." रुद्र....

" ह्म्म्म...." विराज.....

मिष्टी वॉशरूम मधून बाहेर आली.....तस रुद्र पटकन उठून तिच्या जवळ गेला आणि तिला धरून पुन्हा बेड वर झोपवली.......

रुद्र : तुला भूक लागली आहे का..?? कारण थोड्यावेळ्याने औषधे घ्यायची आहेत.....

मिष्टी ने हळूच मान हो मध्ये हलवली....काल पासून तिने पण काहीच खाल्लं न्हवत.....

" मी घरून टिफिन आणला आहे....मगाशी तेच आणायला गेलो होतो.... " रुद्र बोलता बोलता जेवण प्लेट मध्ये वाढत होता......

" पण हे बनवलं कोणी...?? " मिष्टी ने त्याला विचारलं.....

" अग मीच बनवलं आहे.....तु खाऊन तर बघ तुला पण आवडेल..... " रुद्र खुश होत म्हणाला.....

त्याने तिला नीट बसवलं आणि तिला भरवू लागला....विराज हे सगळं मागे उभ राहून पाहत होता.....

" हे सगळं तु कधी शिकलास बर...?? खूप छान झाली आहे भाजी.... " मिष्टी खाता खाता खुश होत म्हणाली.....

" अग दी कधीच शिकलो होत....एकदा दोनदा प्रयत्न केला तेव्हा नीट नाही बनली....मग तू घरात नव्हतीस मग मी पुन्हा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी जमली...... तू बनवते तशीच नाही झाली पण खाण्यालायक नक्कीच झाली आहे म्हणून मी घेऊन आलो नाहीतर बाहेरूनच पार्सल मागवणार होतो.... " रुद्र.....

" मस्त बनलय.... माझ्यापेक्षा भारी बनली आहे.." मिष्टी हसत म्हणाली.

रुद्र तिला जेवण भरवत तिच्याशी बोलत होता , दोघं भावा-बहिणींच प्रेम पाहून विराज पण त्यांना पाहत राहिला......

दोघ एकमेकांमध्ये बिझी होते म्हणून विराज पण तिथून निघून गेला..... जाता जाता त्याने डॉक्टर्स ना मिष्टी साठी डेली नाश्ता , जेवण तिला जे जे हेल्थी फूड लागेल ते हॉस्पिटल मधूनच द्यायला सांगितलं.....

आणि ऑफिसला निघून गेला.....!!
.
.
.
.
.
.

विराज कामात आपल मन व्यस्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता पण सारखं सारखा राहून मिष्टीचाच विचार मनात येत होता.....

"खरंच हि मायरा नाही का...??? कि हीच मायरा आहे?? काहीच समजत नाही आहे मिष्टी , मायरा ,..... Aahhhh its so complicated......"

विराजने लॅपटॉप मधील फाईल्स मध्ये " 🌎 " या कलेक्शन मध्ये असलेले मायराचे फोटो पाहू लागला......

आणि एकीकडे मिष्टीचा सुद्धा........ दिसायला अगदी सारख्याच होत्या फरक इतकाच कि मिष्टी च्या खालच्या ओठाला जॉईन एक तीळ होता.....आणि मायराच्या ओठाला जॉईन तीळ नव्हता.....

त्याने पुन्हा लॅपटॉप बंद केला... "अजून किती शोधू तुला...?? मायरा.... कुठे आहेस तु?? तुला माहीत तरी आहे का कि मिरा....तुझीच मुलगी आहे....निदान तिच्यासाठी तरी पुन्हा परत ये आमच्याकडे...... "

विराज डोळे बंद करून मनात बोलत तो त्याच्या हातातल्या रिंग वरती हात फिरवत तिला आठवत होता...

ही तीच रिंग होती जी मायरा ने त्याच्या हातात घातली होती....!!

विराज ने डोळे उघडले आणि दीर्घ श्वास सोडत मनातले विचार झटकले आणि कामाला लागला....

.....
.......
.........

असेच 2-3 दिवस गेले...... मिष्टी आता बरी झाली होती , त्यामुळे तिला डिस्चार्ज ही दिला.....

खूप दिवसांनी घरी आल्यावर तिला जरा बर वाटलं , दारात पाऊल ठेवता तिला एक कमी पणा जाणवला तो म्हणजे कि आपल्याला घरी आपुलकीने मायेने आत घेण्यासाठी कोणीच नाही....

तिच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं.....रुद्र तिला पाठून म्हणाला...

" अग दी आत तरी चल ना... माहीत आहे तू खूप दिवसांनी घरी आली आहेस... मग काय बाहेरूनच घर पाहणार आहेस का...??? " रुद्र... असं बोलतच तिने पटकन डोळे पुसले आणि आत आली...

मिष्टी रूम मध्ये गेली...... आणि तशीच बेड वर आडवी झाली नाही कि तिचा फोन वाजला......


Unknown नंबर होता...... म्हणून तिने कॉल कट केला पण सारखा सारखा त्याच नंबर वरून call येत असल्याने तिने तो उचलला.....

" hello....... " मिष्टी........

" Hello... " समोरून.....

तो एका मुलाचा आवाज होता....

" आपण कोण?? " मिष्टी......


" ते महत्वाचं नाही राणी.... मी फक्त इतकच सांगायला कॉल केला की मी येतोय...... इंडिया मध्ये लवकरच ❤ मग तू फक्त माझीच.......... Byy किट्टू " असं बोलत समोरच्याने कॉल ठेवून दिला......

इथे मिष्टी ला काही सुचलं नाहि.. " किट्टू?? आता हि कोण ?? आणि हा मुलगा कोण होता बर.... आणि ह्याने मला का कॉल केला... 🙄 असो चुकून लागला असेल....... " असं बोलून तिने डोक्याला जास्त ताण न देता तो विषय सोडून दिला..........

...
......

इथे लंडन मध्ये........


" पहिले चेहरा ओळखण्यात धोका खाल्ला पण यावेळेस नाही....... 😈 तिची सगळी माहिती मी मिळवली आहे... ते पण फक्त 1 तासात , आणि मला हे ही समजलं आहे की ती माझी " किट्टू " च आहे....... " तो....

असं म्हणत हातातल्या फोटो कडे पाहत बिअर पित होता....

समोर बरीच माणसं होती... ती माणसे फक्त तो काय बडबडत आहे हे ऐकत होती.... पण त्याला अडवण्याची किंवा थांबवण्याची कोणाच्यातच हिंमत नव्हती.

" माझे इंडियात जाण्याचे तिकीट्स लवकरात लवकर बुक करा.....मला माझ्या किट्टू जवळ जायचं आहे..... " तो ऑर्डर देत म्हणाला.....

तो ऑर्डर देताच एक गार्ड "हो." म्हणत तिथून निघून गेला.......

.....
........

इकडे विराज अजूनही मिष्टी आणि मायरा ह्यात खूप गोंधळत होता..... नक्की कोण आहे हेच त्याला उमजत नव्हत पण एक मोठं वादळ त्यांच्या जीवनात येणार होत हे नक्की होत.....आता ते वादळ त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याला कोणत्या वळणावर नेऊन सोडणार होत हे फक्त नियतीलाच माहिती होत......पण आता त्या वादळापासून सगळे अनभिज्ञ आपले आयुष्य जगत होते.....

थोड्याच दिवसात लगेच मिष्टीने परत ऑफीस जॉइन केलं.....तिला लवकरात लवकर जहागीरदार इंडस्ट्रीज मधला प्रोजेक्ट संपवायचा होता.....

जेव्हा कधी मिष्टीला विराज आठवायचा तेव्हा त्या storage रूम मध्ये त्याच्या तोंडातून आलेला एकच शब्द तिला सारखा आठवायचा.....तो एकच शब्द मग तिच्या डोक्यात आणि विचारात असायचा "मायरा".....

" कोण आहे ही मायरा??....तिचा आणि विराज सरांचा संबंध काय??....मुळात म्हणजे मला वाचवताना त्यांना ती का आठवावी??" असे बरेच प्रश्न तिच्या मनात होते पण विरजला विचारायची तीच्याकडे हिंमत नव्हती.....

"Ahhhhhh...... मिष्टी......ती मायरा कोणी का असेना.....तुला काय फरक पडतो त्याचा..... विराज सरांनी आपल्याला वाचवलं त्यांचे आभार मान आणि त्यांच्या बद्दल विचार करायचं थांबव.....आधीच तूझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्सची कमी नाहीये.....उगाच दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची गरज नाहिये तुला....." विराजचा विचार डोक्यात आल्यावर मिष्टी स्वतःचीच समजूत काढायची आणि विराज चा विचार करणाऱ्या मनाला गप्प करायची.....


आजचं तिचं कामाचं reporting म्हणजेच प्रोजेक्ट चा प्रोग्रेस रिपोर्ट अविनाश नसल्यामुळे तिला विराजलाच sumbit करायचा होता..... जॉईन झाल्यापासून ती शक्यतो त्याला टाळत होती....त्याच्यापासून लांब लांब राहायची.....आणि विराजला हे तिचं वागणं जाणवत होत आणि तिच्या अश्या वागण्याचा थोडा त्रास देखील होत होता..... पण तो ही मुद्दामून तिच्यापासून लांबच राहायचा.....

मिष्टी ने त्याच्या केबिनच्या दरवाज्यावर नॉक केलं.....

"कम इन." आतून विराजने काम करता करताच उत्तर दिलं....

मिष्टीने त्याच्या समोर ती फाइल ठेवली आणि तशीच उभी राहिली...... इतक्या वेळ काहीच कोणी बोललं नाही म्हणून विराजने त्याच लॅपटॉप मधून म्हणजेच कामातून डोक वर काढल 🤭 आणि त्याच्या डेस्क समोर उभ्या असणाऱ्या मिष्टीकडे पाहिलं......

ती खाली पाहून आपल्या बोटांशी चाळे करत होती..... पण त्यावरून तिला काहितरी बोलायचं आहे हे त्याला कळलं..... हॉस्पिटल नंतर पहिल्यांदा आज तिला तो निरखून अगदी जवळून पाहत होता.....साधा ब्लॅक कुर्ता आणि रेड लेगिंस तिने घातली होती.....सिंपल बट elegent दिसत होती ती......

" काही बोलायचं आहे का ??" शेवटी ती काही बोलत नाही म्हणून विराजनेच बोलायला सुरुवात केली.

" हो....तुम्हाला thank you म्हणायचं होत.....ते त्या दिवशी मला वाचवून तुम्ही मला हॉस्पिटल मध्ये नेल त्याबद्दल खरच मनापासून Thank you." मिष्टी म्हणाली.

" माझ्या ऑफीस मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणं माझं कर्तव्यच आहे..... पण मी तुमचं thank you नाही स्वीकारू शकत...." विराज तीच्याकडे बघत म्हणाला आणि हे वाक्य ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तिच्या इंनोसन्स वर मनातल्या मनातच हसत होता.....

" का नाही स्वीकारू शकत??" मिष्टीने न कळून त्याला विराजला विचारलं......



क्रमशः......