A loan as well…. in Marathi Motivational Stories by Tushar Karande books and stories PDF | एक कर्ज असेही….

Featured Books
Categories
Share

एक कर्ज असेही….

नमस्कार मंडळी,

आज सकाळी नऊच्या सुमारास ऑफिसला आलो. जास्त ट्रॅफिक नसल्याने ,अर्धा तास आधीच , बायोमेट्रिक्स देऊन माझी हजेरी मी ऑफिसात लावली होती. ऑफिशियल काम चालू व्हायला अजून 30 मिनिट अवकाश होता , म्हणून पटकन एक कॉफीचा मग  पॅन्ट्रीमधून आणून मी माझ लॅपटॉपरूपी दुकान उघडल…..

आज ऑफिसचे काम चालू होण्याआधी जरा पर्सनल ईमेलवर नजर टाकूया , आणि किती पत्र [e-mails] आपल्या उत्तराची वाट बघतायत हे पाण्यासाठी माझा पर्सनल ईमेल मी ओपन केला. एक ई मेल चा मजकूर वाचायला घेतला आणि वाचता वाचता एक सुखद आश्चर्याचा धक्का मला बसला. तो मजकूर ….[थोडक्यात]

मिस्टर  ,

आमच्या बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही घेतलेले गृहकर्ज आणि त्या कर्जाचा शेवटचा हप्ता या महिन्यात पूर्ण होणार आहे तरी आपणास विनंती की शेवटचा हप्ता डेबिट झाल्यानंतर  कृपया ब्रांचमध्ये येऊन तुमचे अकाउंट क्लोजरचे काम पूर्ण करण्यात यावे ,ही विनंती.

धन्यवाद.

मजकूर वाचून मला इतका आनंद झाला की त्या क्षणी शब्दात मांडता येईना. आज  मी माझ्या गृहकर्जाच्या विळख्यातून मुक्त होणार होतो….पुढे दिवसभर ऑफिसची काम आटोपल्यावर घरी जाण्याआधी दादरला मठात स्वामीपुढें पेढे ठेवायला आणि त्यांचे आभार मानायला म्हणून मी गेलो. 

स्वामीना नमस्कार करून मागे फिरणार, इतक्यात एक हळूवार मुसमुसण्याचा आवाज कानी पडला. साधारण एक पन्नाशीची बाई डोळे पुसत स्वामी ना काहीतरी गाऱ्हाणे घालण्यात तल्लीन होती…तिच्या डोळ्यात आलेले दुखाश्रू पाहून तेथील गुरुजी पटकन त्यांना म्हणाले, “आई रडू नका चिंता करू नका स्वामी आहेत पाठीशी , तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील”

असे शब्द कानी पडले आणि त्या माऊलीचा चेहरा आणि मन दोन्ही सावरलासारखे वाटले.मलाही त्या शब्दांनी आपसुख बळ मिळाल्यासारखे झाले , आणि मी ही मनोमन सुखावून घरी जायला निघालो.

बिल्डिंगच्या आवारात पाय पडतो न पडतो तोच तळमजल्यावरच्या काकांचा आणि त्यांच्या मुलाचा भांडण्याचा आवाज कानावर टिपला…तसे हे भांडण आम्हाला काही नवीन नव्हत…दिवसातून एकदा तरी ही बापलेकाची जोडी भांडणरूपी तिसरे महायुद्ध रोज खेळत असत , आणि मग दोघेही एकमेकांवर शिव्याशापांची जी नामावली पढत ति  माझा सात पिढय़ात तरी कधी ऐकली गेली नसेल… असो…. 

घरी आल्यावर फ्रेश होऊन खिडकीजवळ एकटाच बसून असताना अचानक मनामध्ये विचार आला…या विचारांमध्ये मला माझ्या आयुष्यात आज पहिलेले तीन प्रसंग आठवले. त्या तीनमध्ये काहीतरी साम्य आहे याचा आवाज मनाच्या गाभारातून सारखा खुणावत होता.

तोच आज इथे तुमच्यासोबत मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.बघा तुमच्याही काही लक्षात येतंय का? तुम्हाला पटतंय का? कारणअसे अनुभव तुमच्या  ही आयुष्यात नक्कीच येत असावेत यात शंका नाही. 

प्रसंग  1 –  मी गृह कर्ज मुक्त झालो. म्हणजे पैशाच्या कर्जातून आज मी फ्री झालो.

प्रसंग  2 – .पुजारीनी त्या आईना दिलेला शब्दरुपी दिलासा आणि विश्वास.

प्रसंग  3 – बाप लेकांच भांडण आणि त्यात त्यांनी एकमेकांना वाहिलेली शब्दरुपी शिव्याशापांची लाखोली.

काय? काही लक्षात येतंय का? काही साम्य आहे का या तीन घटनांमध्ये?

चला मी सांगतो मी काय बोध घेतला या तीन घटनांचा ,  माझ्या दृष्टिकोनातून. 

पहिल्या घटनेत मी कर्जमुक्त झालो होतो.पण ते कर्ज होतं फक्त पैशांच….अशी कर्ज प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात एकदा तरी घेतच असतो , त्याचे स्वरूप मात्र वेग वेगळी असतात….कदाचित गृहकर्ज , वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादि… 

पण इतर दोन प्रसंगांमध्ये  घडत असलेल्या घटना आणि त्यात असलेली प्रत्येक व्यक्ती ही काही अंशी कर्जबाजारी आणि कर्जमुक्त होत होती…आणि ते कर्ज म्हणजे शब्दांच कर्ज.

होय …हे आहे एक प्रकारचे शब्दरूपी कर्ज.जे आपण रोजच्या जीवनात कधी कमी करत असतो तर कधी वाढवत असतो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं? शब्दांत कर्ज कसे असू शकत? उत्तर अगदी सरळ आहे…

गुरुजींच्या मुखातून आलेले शब्द हे त्या आईच्या चिंतेचं ओझं नक्कीच कमी करत होते , त्या माऊलीच्या मनाला खूप मोठा दिलासा मिळत होता.कारण ते शब्द सकारात्मक [पॉजिटिव] होते.

बापलेकाच्या भांडणामुळे त्या दोघांच्या मनांमध्ये फक्त तिरस्कार आणि राग हे दोन भाव उत्पन्न होत होते आणि वाढतच जात होते. कारण ते शब्द नकारात्मक [ निगेटिव्ह] होते.त्यामुळे अशा प्रसंगांना नकारात्मक शब्दरूपी कर्जाची देवाणघेवाण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

जरा विचार करा….जर मनुष्य जन्मात, शब्दच नसते तर??? .मुक्या प्राण्यांप्रमाणे आपण असतो तर आपलं जीवन कसं दिसलं असतं?  खरतर शब्द आहे म्हणून मनुष्य जन्माला अर्थ आहे , कारण या शब्दातूनच माणूस नावाचा प्राणी आपल्या भावना, क्रिया प्रतिक्रिया, विचार व्यक्त करत असतो.

हे शब्द म्हणजे एक प्रकारचे शस्त्र परमेश्वराने आपल्याला बहाल केलेल आहे. पण त्याचा वापर कसा करायचा याचा निर्णय त्याने सर्वस्वी आपल्यावर सोपवल आहे. आणि म्हणून मनुष्य नावाचा प्राणी आपल्या सर्व चांगल्या भावना ,  विचार , कृती , ही चांगल्या शब्दात व्यक्त करू शकतो आणि  त्याचवेळी एखादी व्यक्ती आपला राग, द्वेष, कर्मठता ही वाईट शब्दांनी बोलून व्यक्त होण्यास मुक्त असते. 

मग अशाने होत काय? 

जेव्हा आपण चांगले शब्द वापरून चांगले [Positive] बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच प्रकारचे पॉजिटिव वायब्रेशन  म्हणजे ऊर्जा आपण यूनिवर्समध्ये किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो. त्याचा परिणाम अगदी सरळ आहे. जर तुम्ही चांगल देत असाल तर त्याच्या बदल्यात हे ब्रह्मांड तुमचा पदरात चांगल्या गोष्टी देत राहत 

याला एक युनिव्हर्सल लॉसुद्धा कारणीभूत आहे….”वॉट यू गिव इट विल कम टु यू”.

आणि या सर्व गोष्टींची उत्पत्ती कुठून होते तर आपण वापरत असलेला “शब्दांमधून” 

दिवसभरात आपण किती वेळा स्वतःशी आणि इतरांशी सकारात्मक आणि नकारात्मक बोलत असतो.

आणि ते बोलताना कोणत्या कोणत्या शब्दांचा वापर करत असतो याचा विचार कधी आपण करतो का?

आलेल्या परिस्थितीला पटकन रिअॅक्ट होणं हा मनुष्याचा एक स्थायी स्वभाव…. आणि म्हणूनच आपण कोणत्याही गोष्टीला रिऍक्ट होताना सकारात्मकपेक्षा ,  नकारात्मक उत्तरदेण्याचा आपला जास्त कल असतो.

पण ते कितपत योग्य आहे?

या शब्दांची जादू इतकी महान आहे की आपले अनेक साधू, संत किंवा योगी पुरुष जेव्हा कोणास काही आशीर्वाद देत त्या [म्हणजे त्यांचे शब्द.] सत्य झालेल्या घटनां आपल्या इतिहासाने नमूद करून ठेवले आहे.

आपल्या सर्व ग्रंथांमध्ये याचा प्रयोग आणि उल्लेख , आशीर्वाद किंवा शाप या रूपात आढळतो.

म्हणजेच आपण बोलत असलेला प्रत्येक शब्द  मग तो चांगला असो की वाईट यात खूप ताकद असते. कुणाचही नशीब बदलण्याची.

आपले पूर्वज आणि आताची वडीलधारी मंडळी सुद्धा आपल्याला नेहमी सांगतात. , लेकांनो… बोलताना शब्द जरा जपून वापरत चला…. कारण तो परमेश्वरसुद्धा आपल्या प्रत्येक शब्दाला तथास्तु म्हणत असतो. पण ही समजआपण खरंच मनावर घेतो का? 

याच्याउलट समजा जेव्हा आपण आपला राग, द्वेष, मत्सर व्यक्त करताना वाईट शब्दांचा वापर करत असू , तर त्या प्रकारचे नकारात्मक वायब्रेशन आपण निसर्गा मध्ये प्रवर्तित करत असतो आणि म्हणूनच अशावेळेस आपण जे देतअसतो त्याच प्रकारच्या नकारात्मक [Negative] लहरी आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रुपातून येत असतात. 

वाइट किंवा निगेटिव्ह शब्द वापरण्याचा अजून एक मोठा तोटा म्हणजे शब्दरूपी कर्ज.

असे नकारात्मक शब्दरूपी कर्ज आपण जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा त्या शब्दाचा किती खोलवर परिणाम त्या दुसऱ्या व्यक्तीवर होत असेल, त्याच्या मनाला किती आघात झाला असेल याचे मोजमाप आपल्याला कधीच करता येत नाही.

आपण घेतलेल्या पैशांच्या कर्जांवर किती व्याजदर आहे आणि ते कधीपर्यंत फिटणार याची कल्पना आपल्याला असते.आणि असे कर्ज फिटल्यावर आपल्याला त्या बँकेशी किंवा बॅंकेला आपल्याशी काही देणेघेणे नसते.कोणतेही भावनिक तार त्यामध्ये गुंफलेली नसते.

पण या शब्दरुपी कर्जाचे तसे नाही…. चुकीच्या आणि नकारात्मक शब्दरूपी कर्जामुळे विखुरलेली नाती आणि त्यांना त्यावर झालेल्या जखमा मी फार जवळून पाहिलेली आहेत. कालांतराने त्या जखमांवर कितीही मलम लावायचा प्रयत्न केला तरी जखमेची खपली ही राहतेच. …जी कधीही भरून निघत नाही.

आजच्या आधुनिक काळात प्रत्येक कुटुंबामध्ये जे काही छोटे मोठे वाद असतात त्या या शब्दरूपी कर्जामुळेच…

हां किंवा ही मला असं का बोला किंवा बोली.
याने किंवा हिने माझ्यावर हेच आरोप केले.
त्याचे किंवा तिचे  ते शब्द मी कधीच विसरू शकणार नाही.
तुला माझी शपथ आहे ,तू या गोष्टी पुन्हा करणार नाही. 
मला वचन दे तू असं कधी वागणार नाही. …                                                                                       

 ही आणि अशी बरीच वाक्य.…. आपण रोजच्या जीवनामध्ये ,  सभोवताली ऐकतच असतो.
मी स्वभावाने प्रॅक्टिकल आहे, अस आधी मला वाटायचं…पण काळाच्या ओघात जेव्हा मी सेल्फ अॅनालिसिस करुन लोकांच्या प्रतिक्रिया विचारल्या , तर 10 पैकी 8 जणांच हे उत्तर होते की मी प्रॅक्टिकल कमी आणि इमोशनल जास्त आहे.

काही अंशी ते चांगलं आहे,  पण बहुतांशी जास्त दुःख देणार आहे.

कारण हे शब्दरूपी कर्ज जेव्हा इमोशनल लोकांच्या वाटय़ाला येतं तेव्हा असे लोग त्याचा खूप जास्त विचार करतात.आणि स्वतः.जास्त त्रास करून घेतात.

याचा अनुभव मी घेत असताना, यातून मला बरंच काही शिकायला मिळालं.अजूनही शिकतोच आहे.पण सर्वसाधारणपणे…एक कौटुंबिक आयुष्य जगत असताना मला जर या शब्दरूपी कर्जापासून थोड दूर राहायचं असेल आणि सर्व गोष्टींचा समतोल राखायचा असेल तर मी काही साधे नियम पाळतो…

जैसे कि…..

कोणत्याही नकारात्मक/वाईट ,  शब्दरुपी कर्जाची परतफेड करण्याच्या भानगडीत मी पडत नाही.अर्थात कोणताही अपशब्द किंवा तेवढ्याच ताकदीचा वाईट शब्द मी त्या व्यक्तीला उत्तर म्हणून देत नाही.असे जर मी केलं तर त्या व्यक्तीत आणि माझात फरक तो काय राहणार?


तू योग्य आहेस आणि तू सुखी रहा हा महामंत्र मी बोलून माझ्या वाटय़ाला लागतो.म्हणजे काय तर त्याने दिलेली शब्दरूपी कर्जाचा शिदोरीचा मी भावनिकरीत्या स्वीकार करीत नाही.


मी त्यांना मनातून माफ करतो.अशाने माझा स्वतःचा Aura क्लीन आणि स्ट्रॉन्ग राहण्यास मला मदत मिळते.


अशा व्यक्तीशी मी तथास्तू राहतो.अर्थात जेवढा तेवढ्यात…अशाने ते एक नात टीकवण्याच कर्तव्य ,  पण त्याच वेळी त्या व्यक्तीशी कोणतीही भावनिक लागे बंधु नसल्याचं समाधान.


जर एखाद्याविषयी चांगलं बोलता आलं नाही , तर वाईटही बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही याची जाणीव कायम मनात ठेवतो. त्यामुळे आयुष्यात येणार्या प्रत्येक व्यक्तीला किंवा घटनेला आपल्या जीवनात काय आणि किती स्थान आहे याच्या मोजमप लावणं मला सोप जात.


खूप आनंदी असताना मी कुणाला कोणतेही वचन देत नाही.असे वचन देऊन मी स्वतःला कोणत्याही बंधनात घालून घेत नाही.आणि समोरच्या व्यक्तीला कोणताही आशेवर ठेवत नाही.

माझ्या बोलण्याने कधीही कळत नकळत कुणाची मने दुखावली असतील तर त्यांची माफी मागायला मी कधीच कमीपणा घेत नाही.कारण शेवटी मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे , आणि चुका या माणसांकडूनच होतात.


कधी कोणत्या गोष्टींचा राग येत असेल , मन स्ताप होत असेल तर अशा वेळेस पटकन रिॲक्ट होण मी टाळतो. थोडावेळ शांत राहण्याचा मी प्रयत्न करतो. अशाने मनामध्ये कितीही वाईट शब्दांचं वादळ उठलं तरी ते , शब्दरूपी उमटायला मी व्वावच  मिळवू देत नाही.


आलेल्या वाईट परिस्थितीवर मात करून त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी या पॉजिटिव शब्दांमध्ये खूप ताकत आहे.याची अनेक उदाहरणे आहेत.त्यातीलच एक उदाहरण म्हणजे लुईस हे.

कॅन्सरवर मात करणारी एक स्त्री ,फक्त पॉझिटिव्ह विचार आणि शब्द यांचा वापर करून आपल्या असाध्य रोगावर मात करणारी आणि जगाला एक खूप मोठा संदेश देऊन जाणारी.

Ref – You Can Heal Your Life: Hay, Louise

असे हे शब्दरूपी अस्त्र तुम्हाआम्हा सर्वांकडे आहे… आणि ते कसं वापरावं याची मुभा आपल्याला आहे.

जर ते सकारात्मक वापरले तर आपली आणि इतरांची एक उत्कृष्ट जीवनशैली घडवायला आपणच कारणीभूत असू.

पण हेच अस्त्र जर नकारात्मकदृष्ट्या वापरले तर –  शब्दरूपी कर्जाचे ओझे आपण दुसऱ्यांच्या माथी तर मारूच पण त्याचे व्याजरुप दुःखमय जीवन आपण आपल्याकडे आकर्षित करत राहू  , याची काळजी मात्र तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे.

धन्यवाद.

Tushar Karande