Kuchh pane ke liye kuchh khonahi padta hai - 3 in Marathi Short Stories by Dr.Swati More books and stories PDF | कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 3

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 3

कुणाल पुरता जाणून होता की बाळासाठी रसिकाने तिचं करियर पणाला लावलं होतं.
तिनं नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या करीयरच्या उच्च बिंदूवर असताना नात्यांसाठी एवढा मोठा त्याग करण्यासाठीही धैर्य आणि समजूतदारपणा लागतो. तो रसिकाने दाखवला म्हणूनच आज त्यांचं बाळही निरोगी आहे आणि कुणाल स्वतः हा त्याच्या करियरमध्ये प्रगती करू शकला.
याचा अर्थ आज त्यांच जे हसतं खेळतं आणि सुखी कुटुंब आहे त्याचं बऱ्यापैकी श्रेय रसिकाला जातं.

आज पुन्हा ती आपल्या करिअरची नवीन सुरवात करू पाहत आहे. अशा वेळी आजच्या सारखं अनुभव तिला येतच राहणार आहेत. पण तिनं निराश न होता याचा सामना करायला हवा.

खूप विचाराअंती त्यानं ठरवलं की एक दोन दिवस जावू द्यावेत. मग आपण तिच्याशी बोलूया.

दुसऱ्या दिवशी कुणाल ऑफीसला गेल्यावर हातातील सर्व काम बाजूला ठेऊन रसिका शांत बसते आणि स्वतः विचार करायला लागते की नेमकं काय कारण असावे बरं आपल्या या अचानक आलेल्या निराशेचं?

मन शांत झाल्यावर तिचं तिलाच एकेक पदर उलगडू लागतो.
तिला याचं वाईट वाटतं की आपल्या हाताखाली शिकलेली आणि आपल्याला खूप ज्युनियर असणारी व्यक्ती आज आपल्यापेक्षा खूप मोठ्या पदावर आहे.
आपण जर बाळासाठी नोकरी सोडली नसती तर आज आपण तिथं असतो. यदाकदाचित ही नोकरी मिळाली तर आपल्याला तिच्या हाताखाली काम करावं लागणार, तिला मॅडम म्हणावं लागणार.. तिचा हुकूम ऐकावा लागणार.. जे रसिका अगोदर करत होती तेच आता तिला ऐकावं लागणार..हे रसिकाला सहन होत नव्हतं. आपण बाळासाठी नोकरी सोडून खरचं योग्य निर्णय घेतला का त्यावेळी याचीही तिला आता शंका यायला लागली होती.

मनात विचारांचं काहूर माजलं होतं. डोकं सुन्न झालं होतं. थोडा चेंज म्हणून ती टी. व्हीं. लावते. खूप चॅनल्स बदलल्यानंतर एका चॅनेलवर कोणती तरी सिनेमा चालू असतो. सुरवातीला नुसतं चेंज म्हणून सिनेमा बघणारी रसिका हळू हळू त्या सिनेमात गुरफटून जाते.

काय असतं बरं त्यात??

सिनेमा संपतो आणि एखादं कोड अलगद उलगडाव तसे तिला काहीतरी सापडत आणि तिच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्न भाव येतात. कधी एकदा कुणाल येतोय आणि त्याला सर्व सांगते असं तिला होऊन जातं.

त्या सिनेमातील नायिका रसिकासारखीच करीयरच्या सुरवातीला खूप यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगत असते. अचानक तिला कॅन्सरचं निदान होतं आणि तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. तरीही हार न मानता ती आणि तिचं कुटुंब याचा कसं सामना करतं.. आजारपणातून पूर्ण बरी होऊन परत ती जिद्दीनं तिच्या आयुष्याची आणि करिअरची अगदी नव्यानं सुरवात करून त्यात कशी यशस्वी होते.. अशा आशयाचा तो सिनेमा असतो.

संध्याकाळी कुणाल येतो तेंव्हा रसिका त्याला हे सर्व सांगते.
कुणाल शांतपणे ऐकून घेतो. तो तिचा हात हातात घेतो आणि तिला समजावतो की आयुष्यात कधीतरी असे प्रसंग येतात की त्यांना आपलं करियर किंवा फॅमिली यापैकी एका गोष्टीची चॉईस करायची असते. त्यावेळी ज्याच्या त्याच्या प्रायॉरीटी नुसार जो तो निर्णय घेतो. तुला त्यावेळी तुझं बाळ महत्वाचं वाटलं म्हणून तू नोकरी सोडलीस आणि तू काही काळ आई म्हणून तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलंस. आता पुन्हा तू स्वतः ला एक करियर वूमन म्हणून सिद्ध करायला बाहेर पडली आहेस तर आज जसा प्रॉब्लेम आला तसे अनेक प्रॉब्लेम तुला येतच राहणार आहेत. कारण तू काही वर्ष या क्षेत्रापासून दूर होतीस. म्हणून तू निराश होऊ नकोस. तुझ्यात ती पात्रता आहे की तू लवकर स्वतःला होतीस त्या पोजिशनला नक्कीच पोहचशील. स्वतःवर विश्वास ठेव.

रसिकाच्या आता लक्षात येतं की अरे, आपण उगाच छोट्याश्या गोष्टीचा बाऊ केला होता. आपणच आपल्या स्वतः वर किती अविश्वास दाखविला..
धाग्याला बसलेली गाठ आपण किती हळुवारपणे सोडवतो अगदी तस तिच्या मनाला बसलेली निराशेची गाठ एक सिनेमा बघून सुटते.

ती मनोमन ठरवते की जरी या नोकरीत सिलेक्ट नाही झाले तरी दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत राहायचं आणि जिथं नोकरी मिळेल तिथं पुन्हा नव्यानं स्वतःला सिद्ध करायचं.

बऱ्याच स्त्री पुरुषांच्या वाट्याला असे प्रसंग येतात की ज्यामुळे त्यांना आयुष्यात बऱ्याच गोष्टी मनात असूनही करता येत नाहीत. कारण प्रत्येक वेळेनुसार आपली प्रायॉरीटी वेगळी असते. त्यावेळी त्या त्या क्षेत्रात आपल्या पुढं कोणीतरी निघून गेलेला असतो.अशा वेळी निराश न होता आपण आपली कर्तव्ये पार पाडत राहायची. आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी न करता, आपल्यात काल काय कमी होती अन् आज मी काय शिकलो यावर लक्ष दिलं की अशी विनाकारण येणारी निराशा कमी होईल, असं मला वाटतं...