The love I experienced.....! in Marathi Love Stories by Vishal Chaudhari books and stories PDF | मी अनुभवलेल प्रेम.....!

Featured Books
Categories
Share

मी अनुभवलेल प्रेम.....!


काही नाती कशी जुळतात हे माहीतच पडत नाही....
कोण, कधी, कसा आणि कुठे आपल्या जवळ येतो, हे सगळं काही इतक्या लवकर घडतं, आपण काही विचारही करू शकत नाही... ते आपल्या मनावर ताबा करून घेतात. सतत त्यांचाच विचार मनात चालू असतो... त्यांच्याकडे बघत रहावं, तासनतास बोलत रहाव असं मनाला वाटतं... त्यांच्याशी बोलणे नाही झाल्यावर मन घाबरते. प्रत्येक क्षणी एक वेगळाच आनंद असतो. त्यांना न भेटताच त्यांना मिळवून घेतले असे वाटते, त्यांची वाट पहात रहाणे, त्यांना सर्व काही सांगण्यास उत्सुक असणे, त्यांच्याशी बोलण्यासाठी बहाणे शोधत बसणे, कधी कधी त्यांच्याशी नाराजीही व्यक्त करने खूप आवडत असते... त्यांच्यावर हक्क असल्यासारखा वाटते. ते आपल्या आयुष्यात येणार नाही हे माहीत असूनसुद्धा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावेसे वाटते.. ते आपल्याला मिळणार नाही हे माहीत असूनसुद्धा त्यांना आपल्या आयुष्यातून गमवण्याची भीती वाटते,कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं... ते आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात आणि आपल्या साठी खूपच आवश्यक होऊन बसतात. कधी कधी आपण त्यांच्या बद्दल विचार करत असतो की काश...! ते आपल्याला आधी भेटले असते. त्यांच्या आठवणीत आपल्या डोळ्यात अश्रूही येतात. आपण एका वेगळ्या जगात जगायला सुरुवात करतो. जिथे फक्त प्रेम आणि प्रेम असते...
अशीच काही गोष्ट माझ्या आयुष्यात पण घडलीय...
मी आयुष्यात खूप निवांत होतो. ती माझ्या आयुष्यात येण्या अगोदर. त्यानंतर आयुष्यात अचानक कधीतरी एक अशी अनोळखी व्यक्ती येते....जी मित्रही नाही, सोबतीही नाही, तरीही मनाला खूप आवडणारी. तिच्याशी खूप काही बोलणे होते, हजारो सुख-दु:खही तिच्यासोबत वाटून घेतो, ज्या गोष्टी आपण कोणासोबत शेअर करत नाही त्यागोष्टी तिचासोबत शेअर करतो. ती एक अनोळखी आहे, पण ती अगदी मनापासून ओळखीची वाटते,जसे काही माघच्याजन्माच नातच. तिच्याशी काही नात नाही, तरीही तिच्या सर्व काही गोष्टी मनापासून एकावसे वाटते. तिच्यावर माझा अधिकारही नाही, तरीही मला तिच्यावर हक्क व्यक्त करायला आवडते, कधी कधी माझा काहीही ऐकण्याचा मूळ नसतो, पण ती बोलत असते तेव्हा तिच बोलण ऐकत रहाव असे वाटते,आणि आता तीच आणि माझं मैत्रीचं नातं खूप घट्ट झाले आहे. आता तिची अशी सवय लागली आहे, की मी प्रत्येक क्षणी फोनकडे वेड्या सारखा पहात असतो, तिच्या मेसेज ची वाट बघत बसतो. ही गोष्ट खरच आहे की एखाद्याची सवय लागणे हे प्रेमात पडण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. ती ऑनलाईन आली की तिचा प्रोफाइल पहात राहतो. खूप छान वाटतं मनाला. मनाला आशा लागलेली असते की ती मेसेज करेल. तिचा मेसेज आला की असे वाटते ती स्वतः माझ्यासमोर आहे, कारण तिच्याशी बोलता बोलता एका दुसऱ्याच विश्वात हरवून जातो. ती माझ्यापासून दूर आहे तरीही माझ्या जवळच आहे असे वाटते. तिच्या एका हाय साठी मी खूप अधीर होतो, मला वाटतं मी तिला भेटलो की काय, पण सगळं निरर्थक वाटतं. तिच्याशिवाय सर्व काही स्वप्नासारखे वाटते. तिच्या आठवणीत येवढा हरवलेला असतो की काही काम करावेसे वाटतही नाही. तिचे सेव्ह केलेले चॅट वाचत राहतो किंवा तिचे क्युटशे फोटो बघत बसतो आणि भूतकाळात हरवून जातो, आणि त्या नंतर तिच्या विचारांमध्ये झोपी जातो. ती माझ्यासाठी एक बेस्ट फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड आहे म्हणजेच मितवा सारखी. ती मला माझ्या सर्वात जवळची वाटते. किती सुंदर आहे आमचं नातं एकमेकांशी, ना तिने कधी मला बांधल ना मी कधी तिला सोडल आणि ना मी कधी तिला बांधल ना तिने मला कधी सोडल. आता किती वर्षे झाली तिच्याशी बोलून तिला भेटून, आता आठवणीतच तिला भेटून घेतो. मला रात्री झोपतांना नेहमी आठवत, की कधी-कधी रात्री उशिरापर्यंत बोलता बोलता अचानक झोपून जायचो आणि आज त्याच गोष्टी आठवत-आठवत रात्र निघून जाते. मला तर तिची खूप आठवण येते, मग आठवण आल्यावर तिला बघण्यासाठी मन आतुरतेने वाट बघत असते तिला भेटावेसे पण वाटते पण ते शक्य नाहीय. मी माझ्या मनाला समजवत असतो, की आपल नशीब येवढं चांगल नाहीय की भेट होईल. समुद्राच्या दोन किनाऱ्या सारखी सोबत आहे आमची,मी या टोकाला तर ती दुसऱ्या टोकाला. आमचं नशीब अस की आम्ही सोबत असूनही एकमेकांचे नाही आणि सोबत तर चालत आहोत पण जोडीदार म्हणून नाही. आमच्या आयुष्याचा रस्ता तर एकच आहे पण डेस्टिनेशन वेगवेगळी आहे. आता असे वाटते जसे दिवस आणि रात्र सारखे सु:ख-दु:ख येतात आणि जातात पण एक तिच दु:ख जे कधीच गेले नाही आणि एक तिच सुख जे कधीच आल नाही. शेवटी येवढंच सांगेल की तिचासोबतचा प्रवास अगदी छोटा होता पण ती आयुष्यभराची आठवण बनून गेलीय. आता तिच्या आठवणी येवढ्या गोळा होत चालले आहे माझ्या कडे, की कधी कधी असे वाटते आयुष्यात आठवणींची पण स्पर्धा असायला हवी होती, की कोणाजवळ किती आठवणी आहे, तर पहिले पारितोषिक मलाच भेटले असते. लोक अगदी बरोबर सांगतात, की प्रेम का करू नये हे जाणून घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी प्रेम केले पाहिजे.........!