cafe coffee and filing in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | कॉफी कॅफे आणि फीलिंग्स

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

कॉफी कॅफे आणि फीलिंग्स

आठवणी फक्त मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त नसतात तर काही ठिकाण हि आठवणींना उजाळा देत भावना समजून घेतात अश्याच एका ठिकाणाची गोष्ट माझ्या नव्या कथेमध्ये "कॉफी कॅफे आणि फीलिंग्स "

 


सकाळची वेळ रेडिओ वर "जब कोई बात बिगड जाये "गीत चालू होते एवढ्यात दरवाजाची बेल वाजली देशमुख आजोबानी रेडिओ बंद केला आणि दरवाजा उघडला आणि समोर 

"नमस्कार आजोबा" 

"कोण तू आणि मला आजोबा का म्हणतोस "?

"माफ करा तसा आपला परिचय नाही पण मिस्टर देशमुख म्हण्यापॆक्षा आपुलकीने आजोबा म्हणे मला साजेशे वाटले" 

"पण मी तुला नाही ओळखत "

"नाही आपली ओळख नाही पण मी तुमच्या कॅफे मध्ये दररोज येतो "

"बरं मग "?

"आजोबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आत येऊ शकतो "

"बरं ये "म्हणत आजोबानी त्याला आत बोलवले आणि हॉल मध्ये आपल्या झुलत्या खुर्चीवर जाऊन बसले तो हि समोर बसला 

त्याने आजूबाजूला पहिले तर निवांत शांतता होती आजोबानी आपल्या चष्म्यातून त्याच्यावर एक नजर मारत म्हण्टले 

"बरं तुझं नाव काय आणि माझ्याशी तुला काय बोलायचे आहे ?"

"आजोबा मी सौरभ देसाई "

"बरं मग "

"आजोबा मी असे ऐकलंय कि तुम्ही तुमचा कॅफे बिल्डर ला देत आहात" 

"हो मग हे बघ मी पहिलीच त्याच्याशी बोललो आहे तुझं जर बिल्डर अशील तर माफ कर मी दिलेला शब्द मागे फिरवत नाही "

"नाही नाही आजोबा मी बिल्डर नाही अहो मी तर एका कंपनीत नोकरी करतो "

"मग तुला माझ्याशी काय बोलायचे आहे "?

"आजोबा पिल्झ हा कॅफे बिल्डर ला देऊ नका "

"पण का "?

"आजोबा हा कॅफे नाही आठवणींचा साठा आहे "

"म्हणजे "?

"आजोबा ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी आणि साक्षी म्हणजे माझ्या  कंपनीतली सहकारी काही प्रोजेक्ट निमित्त  ह्याच कॅफे मध्ये येऊन काम करायचो तुमच्या कॅफेतल्या कॉफी मध्ये एक वेगळी जादू आहे आमच्या रोजच्या भेटीने मला कळलेच नाही कि मी कधी तिच्या प्रेमात पडलो तुमच्या कॅफेत तिला भेटण्याची मला खूप आतुरता वाटू लागली ती हि मनमोकळे पंणाने बोलत होती आमचे प्रोजेक्ट कंप्लिट वाहायला लागले तेव्हा मात्र तिच्यापासून दूर जाण्यासाठी मन तयार होईना पण मनाशी ठरवलं कि तिच्याशी बोलायचे आपल्या मनातले तिला सांगायचे म्हणून प्रोजेक्ट सम्बमीट करण्याच्या एक दिवस आधी आम्ही दोघे प्रॉजेक्ट बदल बोलत कॅफे मध्ये बसलो होतो मधेच मी तिला थांबवत म्हटले 

"साक्षी मला तुला काही सांगायचे आहे "

"अरे बोल ना असा काय विचारतोस "?

"साक्षी गेले दोन महिने आपण प्रोजेक्टवर एकत्र काम करतो अनोळखीतून एकदम मन मोकळे पणाने बोलायला लागलो आणि मी तुझ्या प्रेमात कधी पडलो मला कळेलच नाही "

"काय प्रेम? मस्करी नको करू सौरभ "

"खरंच साक्षी मी मस्करी नाही करत मी'खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो"

गंभीर होत साक्षी म्हणाली "काय हे तू काय  बोलतोस "?

"म्हणजे साक्षी तुला मी नाही आवडत "?

"हे बघ सौरभ तू मला आवडतोस पण एक मित्र म्हणून प्रेम नाही रे मित्र आणि प्रेम ह्यात खूप फरक आहे तू एक चांगला मित्र म्हूणन मला पाहिजेस "

"म्हणजे तू माझ्या प्रेमाचा स्वीकार "?

"माफ कर सौरभ पण मी तुला एक मित्र म्हणूच स्वीकारू शकते असे म्हणून साक्षी निघून गेली प्रोजेक्ट हि संपले त्या दिवसापासून मी आणि  साक्षी  मनाने एकमेकांपासून दूर गेलो  एकाच ठिकाणी काम करत असताना सुद्धा मैत्रीचे नाते हि अनोखळी वाटू लागले पण आजोबा मी तिच्यावर मनापासून प्रेम केले होते त्या दिवसापासून आज पर्यत मी एकटाच कॅफे मध्ये येतो त्या टेबलाला न्यहाळात आठवणींच्या कॉफीची आस्वाद  घेतो आणि माझ्या अशांत मनाला शांत करतो त्यामुळे  प्लिज माझ्या त्या आठवणींना कोसळू देऊ नका "

आजोबानी त्याला पाहत म्हटले "म्हणजे प्रेमाचा विषय पण असे अशांत होऊन कसे होणार आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसाने आपल्यावर प्रेम करावे असे वाटते पण तसे होतेच असे नाही ना "जिंदगी है आगे बढते रेहाना चाहिये ये तू "असे म्हणत देशमुख आजोबा आत गेले आणि सौरभ बाहेर गेला त्याला बाहेर येताच गेटवर दोघे जण भेटले त्यांनी सौरभ ला पाहत विचारले "कॅफे देशमुख याचे हेच घर ना "?

आणि देशमुख आजोबाच्या दरवाजची बेल वाजली "आता कोण म्हणत ?"आजोबानी दरवाजा उघडला कॅफेच्या आठवणी दुसऱ्या भागातही दडल्या आहेत 

देशमुख आजोबांनी दरवाजा उघडला समोर तिघे जण उभे होते त्यातला एक म्हणजे देशमुख आजोबाचा नोकर "आजोबा तुम्हला हे भेटायला आले "असे म्हणत तो भरलेल्या सामानाच्या पिशव्या घेऊन आत गेला तसे आजोबानी त्या दोघाना आत बोलवले आजोबा मागोमाग ते दोघे येऊन सोफ्यावर बसले

आजोबानी त्या दोघांना पहिले तर युवक आणि युवती होती तसे ते दोघे जरा सरकावले

"सर आम्हला तुमच्याशी काही बोलायचे आहे "

"माझ्याशी "

"हो सर "

त्या युवतीने बोलण्यास सुरवात केली "सर प्लिज तुम्ही तुमचा कॅफे बंद करू नका "

"म्हणजे तुम्हला हि कळले तर "

"सर कळले म्हणजे अहो तो कॅफे म्हणजे आमचा जीव कि प्राण त्याला असे बंद होताना नाही पाहू शकत सर मी अमित आणि हि अवनी अहो आमच्या सुंदर नात्याची सुरवात तर तिथेच झाली आज हि आठवतो तो दिवस मी एकटाच त्या दिवशी कॅफे मध्ये आलो होतो आणि अवनी हि तेव्हा आमची ओळख हि नव्हती आम्ही अनोळखी होतो मी माझे आटोपून कॉउंटरट कडे वळलो तर तिथे अवनी आपल्या बॅग मध्ये काही शोधताना दिसली मी अवनीला खूप वेळा कॅफे मध्ये पहिले होते म्हणून सहज विचारले "काय झाल "?

त्यावर अवनीने मला पाहत "काही नाही असे म्हण्टले खरे पण तुमचा कॉउंटरमन हुशार "काही नाही कसे मॅडम पर्स विसरला वाटत मग काय मी तिचे पैसे दिले पण अवनी घ्याला तयार नाही तरी हि नेक्स्ट टाईम माझे द्या असे सांगून मी निघालो आणि मग काय चार पाच दिवसानी अवनी तर माझे उसने द्यायला जणू सज्ज च होती मी कॉफी टेबलं वर बसलेलो एवढ्यात अवनी माझ्यासमोर

"हॅलो "

"हॅलो "

"चार पाच दिवस तुम्ही इथे आलात नाही "

"का "?

"नाही ते त्या दिवसाचे पैसे "

"कॉम ऑन अहो काय घेऊन बसलात माझ्या लक्षात सुद्धा नव्हते "

"नाही नाही मी कोणाचे उसने नाही ठेवत "

"घ्या पैसे "

"राहू द्या "

"नाही नको प्लिज घ्या"

"ओके घेतो

"तुम्ही घेतली का कॉफी "

"नाही घेणार आता "

"कोणी येणार आहे का "?

"नाही "

"मग सोबत कॉफी घेऊया का पण चालेल तुम्हाला ?"

"हो चालेल "

"आणि तो दिवस आमच्या पहिल्या भेटीचा कॅफे च्या भितींवर कोरला गेला अनोळखीतून ओळख झाली मैत्री झाली मते पटायला लागली वरचेवर भेटणे आणि तो दिवस संध्यकाळचे चार वाचले होते मी कॅफे मध्ये अवनीची वाट पाहत बसलो होतो आणि अवनी आली दोघांची आवडती कॉफी ऑर्डर केली आणि गप्पा सुरु झाल्या मला काहीतरी सांगायचे होते पण अवनीला हि काही सांगायचे आहे हे मला जाणवले

"हो सर आणि मग मी च पुढाकार घेतला आणि सरळ अमितला विचारले आणि आज आमचे सुंदर नाते तुमच्या समोर आहे ते ही फक्त तुमच्या कॅफे मध्ये अहो आमच्या पहिल्या प्रेमाचे ठिकाण म्हणजे कॅफे आणि त्याला असा तुटताना कसे पाहू शकतो प्लीज सर "

आपले डोळे पुसत आजोबा म्हणाले"हे बघा मला कळतात तुमच्या भावना पण. माझी ही काही अडचण आहे त्यामुळे या तुम्ही" म्हणत आजोबांनी त्याचा निरोप घेतला

दुसऱ्या दिवशीची सकाळ देशमुख आजोबा ना सकाळ सकाळी तयार होताना पाहून त्याच्या नोकर रघु ने विचारले

"काय आजोबा आज सकाळी कुठे निघालात"?

"कॅफे मध्ये निघालो आज दिवस भर तिथेच असेन "

"पण आजोबा तुम्ही तर कॅफे मध्ये फक्त महिन्याला एकदाच जातात मग आज "?

"नाही आज मनात आले मी येतो "असे म्हणून आजोबा आपल्या गाडीतून निघाले

गाडी येऊन कॅफे जवळ थांबली सकाळची वेळ कॅफे मध्ये बरीच गर्दी होती आजोबानी आत प्रवेश केला आणि काउंटर सीट वर जाऊन बसले त्यांनी एक नजर कॅफे वर मारली तर कॅफे माणसाच्या आवाजाने गजबजला होता त्यात मधुर संगीत हि चालू होते हळू हळू गर्दी ओसरू लागली

आणि काउंटर वर एक पस्तिशीतील तरुणी पैसे देण्यास उभी राहिली आजोबानी तिचे पैसे घेतले आणि तिला सुटे देण्यासाठी ड्रॉवर उघडला तर तिने हळू आवाजात आजोबा कडे पाहता विचारले

"तुम्हीच ह्या कॅफे चे मालक ना "?

आजोबानी तिला मानेने होकार दर्शवला तर ती आजोबाना पाहत म्हणाली "बरं झालं तुमची भेट झाली सर मी असं ऐकलंय कि हा कॅफे आमचा काही दिवसाचा सोबती आहे तुम्ही हि जागा बिल्डर ला देणार आहात ऐकून खूप वाईट वाटले हा माझ्यासाठी फक्त कॅफे नाही माझ्या आयुषाचा परिवर्तक आहे "

"परिवतर्क "?

"हो सर चुकलेल्या वाटेवरून सरळ मार्ग मला ह्या कॅफे ने दाखवला "

"म्हणजे "?

"आता सर्व चांगला आहे फक्त ह्या कॅफे मुळे कॉलेज चे दिवस प्रेमाचे वारे वाहणारे मी हि ह्या प्रेमाच्या वाऱ्यात भरकटली होती काय बरोबर काय चूक काहीच कळत नव्हते ज्या मुलावर मी प्रेम करायचे तो फक्त माझ्याशी प्रेमाचे नाटक करत असे माझ्या भावाने मला त्या मुला पासून दूर राहा असे खूपदा सांगितले पण मी मात्र त्याच्याशी भांडायचे ह्यामुळे आमच्या घरात खूप कलह निर्माण झाला होता मी तुमच्या कॅफे मध्ये कधीच आले नव्हते पण त्या दिवसाने मला तुमच्या कॅफे बदल माझ्या मनात खरंच एक वेगळी जागा निर्माण केली

माझा भाऊ मला घेऊन ह्या कॅफे मध्ये आला आणि जे मी समोर पहिले ते मी ज्या मुलावर प्रेम करत होते तो कोणा दुसऱ्या मुलीबरोबर प्रेमाच्या बाता करत होता मी सरळ त्याला जाप विचारला तर त्याची बिखरेलली अवस्था पाहून कायमचे नाते तोडून निघून गेले घरी आल्यावर भाऊ ची माफी मागितली आणि नवीन आयुष्याला सुरवात केली आणि आज मी माझ्या सुखी संसारात खुश आहे पण खरंच त्या दिवशी ह्या कॅफे ने मला त्याचे खरे रूप दाखवले नसते तर आज माझं आयुष्य बिखरलं असत म्हणून त्या दिवसापासून आज पर्यंत कॅफे मध्ये येणे सोडले नाही आणि जेव्हा कळले कि कॅफे जमीनदोस्त होणार खूप वाईट वाटले "असे म्हणून तिचे डोळे भरले तिनी पैसे घेतले आणि निघून गेली

आजोबा मात्र हताश झाले त्यांनी एक नजर कॅफे कडे पहिले त्या अबोल भिती "आम्हला जमीनदोस्त करू नकोस" असे त्यांना काहीतरी सांगत होत्या

"देशमुख देशमुख "

"अरे घनश्याम तू "

"काय रे कुठे गुंतला आहेस आणि तू आज कॅफे मध्ये बरं झालं तू इथेच भेटलास नाहीतर मी आज संध्यकाळी घरी येणार होतोच"

"नाही रे आज मनात आलं आणि आलो बरं कसा आहेस "?

"मी मजेत पण हे मी चे ऐकलंय ते खरं आहे का ?

"काय "?

"तू कॅफे ची जागा बिल्डर च्या घशात घालतोस अरे पण कसली गरज आहे तुला चांगला कॅफे चालतोय मग हा निर्णय म्हणजे "?

"तू जे ऐकलंस बरोबर आहे हि जागा मी बिल्डर ला देत आहे "

"पण का "?

"कॅफे तर चालत आहे ना मग "?

"काय सांगू तुझ्यापासून कधी काही नाही लपवले आपली मैत्री तशी आहे पण हि गोष्ट मात्र मी लपवली "

"पण का तुला काही पैशाची गरज भासली का "?

"नाही रे देवाच्या दयेने मी खुश आहे "

"मग "

"घनश्याम तुला तर माहित आहे मी इथे एकटाच असतो वसू होती तेव्हा कशाची चिंता नव्हती पण आता नाही रे एकटेपणा खायला उठतो वय हि झालंय एवढ्या मोठ्या घरात मी एकटा रघु असतो रे पण तो आपल्या कामात वसू होती तेव्हा मी बिंदास असायचो पण ती मला सोडून गेली ती कायमची एकटं सोडून "

देशमुख आजोबांचे डोळे भरलेले पाहून त्याचे मित्र घनश्याम हि भावुक झाले

"अरे देशमुख रडतोस कसला "

"नाही रे रडत नाही वसू ची खूप आठवण येते तिला देवाने असे अचानक पणे नेले नसते तर आज मी एकटा पडलो नसतो "

"हे बघ देशमुख जे झाले त्याला आपण रोखू नाही शकत मला कळत कि एकटेपणा किती त्रासदायक असतो पण तू कॅफे मध्ये येत जा तुला बरं वाटेल पण तू तर कॅफे मोडायला तयार झालास अरे हा कॅफे इतर कॅफे सारखा नाही आहे अरे कॅफे म्हटल्यावर फक्त तरुणाई दिसते पण तुझ्या ह्या कॅफेत सगळ्या वयाची माणसे येतात खिशाला परवडणारी कॉफी पितात सुख दुःख वाटतात तुला माहित आहे एक मुलगा त्याला मी ह्या कॅफेतून ओळखतो आज हि येणार तो नेहमी येतो तो मुलगा तुझ्या कॅफे मध्ये यायचा एक गिटार घेऊन पण तो एक शार्प शूटर होता पण तुझ्या कॅफेत तो आपल्या कामासाठी यायचा पण इथे येउन त्याचे मन परिवर्तन झाले आणि तुला माहित आहे कि तो आता गुन्हेगारी सोडून एका हॉटेल मध्ये गिटार वाजवण्याचे काम करतो "

"काय पण हे तुला "?

"त्यानेच सांगितले तो नेहमी येतो आणि एक दिवशी आमचे बोलणे झाले आणि त्याने मला सत्य सांगितले कि कश्या प्रकारे ह्या कॅफेत येउन त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली "

""हो रे खूप जण ह्या कॅफेशी मनाने जोडली गेली आहे मला पण खूप लोकांनी आपल्या मनातल्या भावना सांगितल्या म्हणून तर आज मी इथे आलो नेहमी मी एक व्यवसायिक म्हणून यायचो पण आज मनाने पहिले कि लोक ह्या कॅफेशी किती जोडले आहे

"मग कशाला बिल्डर ला हि जागा देतो आणि तू एकटा म्हणतोस अरे माधव आहे ना "

"माधव तीच तर दुविधा आहे "

"म्हणजे "

"सांगतो ऐक "

गेल्या महिन्यातली गोष्ट माधवचा सकाळी सकाळी फोन आला पाहून जरा बरं वाटलं म्हणून लगेच उचला

"हॅलो बाबा "

"हा बोल माधव आज सकाळ सकाळी आज कशी आठवण झाली "?

"बाबा जरा काम होते "

"काम बरं बाबा बोल "

"बाबा स्पष्टच बोलतो "

"काय रे काय झालं "

"बाबा तुम्ही तिथे एकटेच असता आणि आमच्या जीवाला इथे घोर म्हणून मी एक निर्णय घेतला आहे "

"कसला निर्णय "?

"बाबा तुम्ही इथेच लंडन मध्ये कायमचे राहायला या "

"काय अरे पण इथे आपले घर आहे कॅफे आहे त्यावर पण लक्ष द्यायला हवे ना "

"बाबा घर काय रघु पाहिलं तसेच हि आपण दोन वर्षांनी एकदा पाहून जाऊ "

"आणि कॅफे त्यावर पण लक्ष हवे ना "?

"त्याची चिंता तुम्ही करू नका "

"म्हणजे "?

"बाबा मी एका बिल्डर शी बोललो आपला कॅफे सेन्टर मध्ये आहे जागा हि भरपूर आहे एक बिल्डिंग कशीच उभी राहील"

"म्हणजे "?

"बाबा आपण ती जागा बिल्डर ला देऊ "

"काय म्हणजे कॅफे जमीनदोस्त "

"हो बाबा तो पैसे पण चांगले सांगतो मग काय हरकत आहे "

"अरे पण कॅफे "?

"बाबा तुम्ही असेपर्यत पाहाल मग कोण लक्ष देईल मी इथे माझ्या कामात व्यस्त आहे तुमचे नातं नातू तर आपल्या कामात मग त्या पेक्षा

पैसे घेऊन तुम्ही कायमचे इथे या आमचे लक्ष हि तुमच्यावर राहील "

"पण तू हा निर्णय मला न सांगता "

"बाबा तुमचे वय झाले आहे कशाला उगीच त्रास इथे या मस्त राहा "

"अरे पण तो कॅफे आजचा नाही तुला माहित आहे ना अरे आपले घर कॅफेच्या पैशानीच चालले आणि आता त्याला असे जमीनदोस्त करायचे "

"बाबा मान्य आहे पण आता आपली चांगली परिस्थिती आहे ना मग कशाला तुम्ही तिकडे एकटे घर राहू द्या मी येईन काही दिवसासाठी कॅफे च तेवढे पाहू "

"पण माधव तुम्हीच इथे का नाही येत "

"काय बाबा लंडन सोडून इथे बाबा आम्ही तिथले स्थानिक झालो आहोत माझा व्यवसाय पण जमला आहे त्यामुळे ते शक्य नाही म्हणून तर तुम्हला इथे येण्यासाठी सांगत आहे आई होती तेव्हा तुमची काळजी नव्हती पण आता तुम्हला एकटं ठेवणं जमणार नाही आणि ह्यावेळी मी काही ऐकणार नाही "

"आता मला सांग घनश्याम मी काय करू "?

"अरे देवा हि दुविधा आहे तर इथे आड आणि इथे विहीर "

"म्हणून तर मी हा निर्णय मनावर दगड ठेऊन घेतला आहे मला पण कॅफे तोडायचा नाही पण काय करू "

"तुला काय वाटत नाहीतर माझ्या घरी ये राहायला कायमचा माझी सोबत असेल "

"अरे पण माधवला आवडणार नाही "

"ते हि आहे च कारण तो तुझा मुलगा आहे "

"चल मी येतो काळजी घे "असे म्हणून घनश्याम निघून गेले आणि देशमुख आजोबा भरलेल्या डोळ्यांनी कॅफे कडे पाहू लागले कारण कॅफे काही दिवसाचा सोबती होता

मोबाईलची रिंग वाजत होती पण देशमुख आजोबाना त्याची जाणीव नव्हती कि ते फोन टाळत होते माहित नाही पण तिथे रघु आला

"आजोबा आजोबा फोन वाजत आहे उचला तो "

"जाऊ दे रे मला नाही बोलायचे "

"काय झालं आजोबा कॅफे तुन आल्यापासून पाहतो गप्प गप्पच आहात "

एवढ्यात रघूचा फोन वाजला त्याने तो उचला

"हॅलो रघु "

"हा भाऊ बोला "

"अरे बाबा कुठे आहेत फोन का उचलत नाही "

आजोबाची परिस्थिती लक्षात घेता रघु म्हणाला "ते ना जरा बाहेर फिरायला गेले आहेत आणि मोबाइल इथेच ठेवून गेले "

"बरं आल्यावर सांग त्यांना माझा फोन आला होता म्हणून "

"हो माधव भाऊ "

फोन ठेवता क्षणी आजोबा म्हणाले "बरं झालं तू कारण सांगितलंस ते "

"पण आजोबा तुम्हला फोन का नाही घ्याचा काही बिनसलं का ?"

"नाही रे तसे काही नाही पण मला नाही बोलायचे "

"लहान तोंडी मोठा घास घेतो आजोबा काही चुकलं तर माफ करा कॅफे च्या बाबतीत तुम्ही चिंतेत आहात ना मला कळत हो इथलं सगळं सोडून तिथे राहायला जाणे जड जातंय तुम्हला पण काय करणार मुलगा तुमचा त्याचे नाही ऐकले तर"

"तेच कळत नाही मला अरे त्या कॅफेने मी माझ्या आयुषाची सुरवात गेली त्याला असे जमीनदोस्त होताना कसा पाहू शकतो माझ्या मागे त्यांनी काही केले तरी मला फरक पडत नाही पण माझ्या समोर म्हणे बिल्डर चांगले पैसे सांगतो "

"आजोबा तुम्ही काळजी करू नका बोला एकदा त्याच्याशी "

"नाही रे तो नाही ऐकणार आता तो लंडनवासी झालंय ज्या कॅफे मुळे त्याचे बालपण शिक्षण झाले त्याला असे तोडण्यास सांगताना त्याचे मन कसे नाही दुखत जाऊ दे मलाच यातना होणार आहे "

असे म्हणून आजोबा डोळे पुसत आत गेले आणि रघु त्याच्याकडे पाहत देवाला सांगडे घालू लागला "देवा आजोबांचे मन नको दुखवू माधव भाऊला समज येऊ दे "

सकाळ सकाळी देशमुख आजोबा कॅफे मध्ये गेले कॅफे काही दिवसाचा सोबती आहे हे लोकांना माहित असून हि नेहमी सारखी गर्दी होती ते आत शिरले तर त्यांना एक मुलगा कॅमेरा मध्ये कॅफेचे फोटो काढताना दिसला

आजोबांनी आज काउंटर सीट वर न बसता कॅफे मध्ये फेरफटका मारण्यास सुरवात गेली प्रत्येक टेबल वर कॉफी बरोबर गप्पा चालू होत्या कुठे हसू फुटत होते तर कुठे प्रेम बहरत होते तो मुलगा जाण्यासाठी निघाला आजोबानी त्या मुलाला विचारले

"काय रे काढलेस फोटो "?

"हो कॅफे बंद होण्याआधी एक आठवण म्हणून "असे म्हणून तो गेला आणि आजोबा मिश्किल हसले

११ वाजण्याच्या सुमारास एक माणूस आजोबाना शोधत आला आणि आजोबा पाहत म्हणाला

"मी सुर्वे बिल्डर तुम्ही मिस्टर देशमुख ना "?

"हो बरोबर ओळखस ये बस "

"बरं तुम्ही कॅफे कधी खाली करता "

"एक कॉफी आण रे" म्हणत आजोबानी वेटर ला हाक दिली तशी कॉफी टेबल वर आली

"ह्या पहिली कॉफी प्या "

"कॉफी होईल हो पण तुम्ही कॅफे कधी खाली करता "

"कॉफी आवडली तुम्हला "?

"हो का "?

" हि कॉफी एकच माणूस करतो जो माझ्या बरोबर कॅफे सुरु झाल्यापासून आहे वय झालं तरी बनवण्याची पद्धत नाही बदली अशीच हि २० माणसं ह्या कॅफेशी जोडली आहे आणि ते आपला कॅफे आहे असे समजून गेली कित्येक वर्ष वावरताना "

"मग त्यात काय आणि मला हे सगळं ऐकण्यात काही रस नाही "

"पण मला सांगायच आहे ह्या कॅफे वर त्याचे पोट चालते "

"म्हणजे अहो हा कॅफे बंद झाला कि तुम्ही त्यांना पैसे देणारच ना मग मिळेल त्याना दुसरे काम त्यात काय "?

"पैसे तर मी देणारच आहे पण हि जी लोक इथे येतात त्याचे काय "

"म्हणजे "?

"ते तर आपले पैसे देतात "

"तुम्हला काय म्हण्याचे तुम्हला हि जागा द्याची नाही तर हे बघा मी माधव शी बोलो आणि त्याने मला हि जागा विकणारच असे सांगितले आहे "

"पण मला विकायची नाही "

"काय "?

"हो ह्या कॅफेशी मीच नाही लोकांच्या भावना जोडल्या आहे आणि मला त्या तोड्याच्या नाही "

"अहो पण माधवाने थांबा मी त्यालाच फोन लावतो "

माधव शी तो बिल्डर बोलतो आणि आजोबांकडे फोन देतो"

"बाबा मी हे काय ऐकतो "

"माधव मी एकटा राहतो म्हणून तू मला सगळं सोडून ये म्हणतोस पण तुला माहित आहे का ह्या कॅफेमुळे लोक एकटेपणा विसरतात सुख दुःखाच्या गप्पा करतात मी माझ्या साठी त्याच्या भावनांना नाही तोडू शकत ह्या सगळ्यानपाहून मला ना खूप हेवा वाटतो तुला माहित आहे काही लोक घरापर्यंत पोहोचली हा कॅफे तोडू नका म्हणून सांगण्यासाठी अरे ती इथे येतात पैसे देऊनच कॉफी पितात पण एक ओढ त्यांना दूर करू शकत नाही तर माझं काय झालं असेल मी असे पर्यत हा कॅफे चालू राहील माझ्या मागे तू काहीही कर पण ज्या कॅफेला मी माझ्या हात उभा केला तो मी असा मोडू नाही शकणार ठेवतो मी "

त्या बिल्डर ला फोन देत आजोबा म्हणाले "या तुम्ही "

तो बिल्डर तिथून रागारागात निघून गेला तसे आजोबा काउंटर वर आले आणि सगळ्यांना पाहत म्हणाले "मला तुम्हला काही सांगायचे आहे हा कॅफे मी बिल्डर ला देणार होतो पण आज मी असे सांगू इच्छितो कि तो निर्णय मी मागे घेतला आहे मी हा कॅफे कोणाला तोडू देणार नाही माझ्या जीवात जीव असे पर्यंत हा कॅफे सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील

हे ऐकल्यावर कॅफे मध्ये एकच जलोष झाला आजोबा हसत हसत कॅफेतून बाहेर पडले आणि कॅफेच्या भिंती परत एकदा भावनांना उजाळा देण्यासाठी तयार झाल्या


*****************************समाप्त **********************************************************