Aaropi - 16 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | आरोपी - प्रकरण १६

Featured Books
  • किट्टी पार्टी

    "सुनो, तुम आज खाना जल्दी खा लेना, आज घर में किट्टी पार्टी है...

  • Thursty Crow

     यह एक गर्म गर्मी का दिन था। एक प्यासा कौआ पानी की तलाश में...

  • राम मंदिर प्राण प्रतिष्ठा - 14

    उसी समय विभीषण दरबार मे चले आये"यह दूत है।औऱ दूत की हत्या नि...

  • आई कैन सी यू - 36

    अब तक हम ने पढ़ा के लूसी और रोवन की शादी की पहली रात थी और क...

  • Love Contract - 24

    अगले दिन अदिति किचेन का सारा काम समेट कर .... सोचा आज रिवान...

Categories
Share

आरोपी - प्रकरण १६

प्रकरण १६
कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर पाणिनी पटवर्धन कनक कडे वळला, “कनक तुझ्या लक्षात आले का?” तो एकदम एक्साईट होऊन म्हणाला.
“काय लक्षात आलय का?”
“अरे सगळंच चित्र स्पष्ट झालंय. येतंय का लक्षात? तो साहिर सामंत खरं बोलत होता ! संपूर्ण सत्य नाही पण खूपसं खरं बोलत होता. आता माझ्या लक्षात आले आपल्याला नक्की काय करायचे ते कोणाशी आपली गाठ आहे ते.””
“काय लक्षात आलय पण तुझ्या पाणिनी?”
“अरे तो वॉटर कुलर हलवला गेला होता.”
“हलवला गेला होता म्हणजे? आणि त्या वॉटर कुलर च काय?”
“अरे ,मधुरा महाजन च्या बेडरुममध्ये वॉटर कुलर होता.. बहुदा ती शुद्ध केलेले पाणी फक्त पीत असावी या शिवाय खालच्या मजल्यावर एक वॉटर कुलर होता. कारण मी तो बघितल्याच आठवतय. तिच्या बेडरूम मधला वॉटर कुलर आता हलवला गेलाय.”
“तुला कसं माहिती की तो हलवला आहे?”
“कारण त्या आंधळ्या बाईचा त्याला धक्का लागला, साहिर चा नाही.कोर्टात साहिर जे म्हणाला की माझा धक्का नाही लागला, ते खरंआहे.” पाणिनी म्हणाला
“आंधळ्या बाईचा ! ” कनक आश्चर्याने उद्गारला
“बरोबर. आंधळ्या बाईचा आपण फार सावध नव्हतो कनक, आपण त्या घरात गेलो होतो तेव्हा. काहीतरी आपल्या नजरेतून सुटलं. तो साहीर सामंत आहे ना, तो काहीतरी तिथून बाहेर नेणार होता. पोलिसांना वाटत होतं की 2000 रुपयाच्या नोटे ची चोरी झाली आहे. आता मधुरा जोपर्यंत इस्पितळात आहे तोपर्यंत कोणाला त्या घरात शिरणे शक्य नव्हतं, पण साहिर सामंत ला जर क्षिती ला त्या घरात पुन्हा आणायचं जमलं असतं, तर तो खरोखर त्या कुटुंबाचा सच्चा मित्र धरला असता.”
“ते ठीक आहे; पण ही काय भानगड आहे आंधळ्या बाईची?”-कनक
“खरं म्हणजे त्या बाई पेक्षा आपण सगळे आंधळे झालो होतो कनक. मला अत्ता आठवलं की पहिल्यांदा क्षिती अलुरकर माझ्या ऑफिसला आली तेव्हा ती मला म्हणाली होती की ते घर म्हणजे एक झपाटलेलं घर आहे. रात्री-अपरात्री तिथे पाय वाचल्याचे आवाज येतात काहीतरी बोलण्याचे आवाज येतात लक्षात येतय कनक? याचा अर्थ असा आहे आपण जेव्हा त्या घरात होतो रात्री त्या वेळी साहिर व्यतिरिक्त तिथे कोणीतरी होतं. आपण कोणीतरी येण्याची वाट बघत होतो तेव्हा आपल्यालाही असे चालल्याचे आणि खसखस पिकल्या चे आवाज येत होते.साहिर ने साक्षीत तेच सांगितलं.साहिर सामंत व्यतिरिक्त कोणतरी वावरत होतं.”
“एवढ्या अंधारात?”
“कनक लक्षात घे. आंधळ्या लोकांना दिवस आणि रात्र फरक पडत नाही त्यांच्या दृष्टीने सर्व अंधारच असतो त्या आंधळ्या बाईला त्या मधुराच्या घराच्या आतली अत्यंत इत्यंभूत माहिती आहे. जसा आपल्या स्वतःच्या शरीराचा एखादा अवयव माहिती असावा तशी.” पाणिनी म्हणाला.
पाणिनी ला काय म्हणायचं आहे ते पटकन कनक च्या लक्षात आलं.
“ बापरे हे असेल तर वेडच लागेल मला.”
“कनक, घाई करू या थोडी. तुझ्या त्या स्त्री गुप्तहेराला, जी, मी सांगितल्याप्रमाणे आंधळ्या बाईची ॲक्टींग करणार होती,तिला भेटूया. तिचं पुढे काय झालं बघून येऊ या”
“चल लगेच तुझी कार घेऊ या की माझी?” कनक ने विचारलं
“तुझी घेऊ आणि तूच चालव मला गाडीत बसल्या बसल्या जरा विचार करायचा आहे”
“आत्तापर्यंत विचार करून तू चांगलीच मुसंडी मारली आहेस या प्रकरणात पाणिनी”
“आपल्या आधीच लक्षात यायला होतं की मधुरा आणि ती आंधळी विक्रेती बाई म्हणजे सरिता, एकमेकींच्या साथीमध्ये काहीतरी मोठा गेम करताहेत आणि त्या आंधळ्या बाईला मधुरा च घर खडान खडा माहिती आहे. अगदी त्याच्यातल्या फर्निचर सकट, सगळं कुठे काय ठेवले हे सगळं सगळं माहित्ये तिला.”
“पण मग कोणी तिथला वॉटर कूलर का हलवेल?” --कनक
“तोच तर महत्वाचा मुद्दा आहे. वॉटर कुलर तिथून हलवला गेला होता पण मधुरा महाजन ला परत तो तिथे आणायला वेळ मिळाला नाही .संधी मिळाली नाही .ज्या माणसाने मधुरा महाजन ला पकडलं आणि तिच्या डोक्यात बॅटरी मारली त्याला माहीत नव्हतं की तो वॉटर कुलर तिथून हलवला गेला आहे, किंवा तो वॉटर कुलर पुन्हा होता त्या जागी ठेवणे आवश्यक होतं ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही.”
“अरे पाणिनी, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो वॉटर कुलर कोण कशाला हलवेल? त्याचं काय महत्त्व आहे या प्रकरणात?”
“याचं कारण तो वॉटर कुलर ज्या भिंतीला टेकवून ठेवला होता, त्या कुलर चे मागे असलेल्या भिंतीकडे किंवा तो वॉटर कुलर कार्पेट वर ज्या ठिकाणी ठेवला होता त्या कार्पेट च्या खाली असलेल्या फरशी कडे तिला जायचं असावं.”
“अरे बापरे ! तू काहीतरी भयानकच तर्क लढवतो आहेस. मला तर काही समजत नाहीस झालय”
“मला असा संशय आहे कनक, की या सगळ्याची पाळंमुळं ग्लोसी कंपनी च्या संचालक मंडळापर्यंत पोहोचणार आहेत.”

लवकरच ते गाडीने ग्लॉसी कंपनी च्या आवारा पाशी पोचले दोघे गाडीतून खाली उतरले
“माझी गुप्तहेर बाई तिथे आहे. तिचं अजून तरी त्या आंधळ्या बाईशी भांडणं वगैरे झालेला दिसत नाही.”-कनक
दोघेही त्या गुप्तहेर बाई जवळ गेले ती बाई आपलं डोकं खाली घालून आणि आपल्या मांडीवर एक टोपली घेऊन पेन्सिली विकत बसली होती.”
पेन्सिली केवढ्याला आहेत? पाणिनीने विचारलं
“तुम्हाला द्यायचे तेवढे द्या.” ती बाई म्हणाली. तिच्या आवाजात कुठल्याही भावभावना नव्हत्या “दहा रुपयापासून सुरुवात आहे, बॉल पेन हवी असतील तर वीस रुपयापासून सुरुवात आहे. नंतर फक्त वस्तू बदलून मिळणार नाहीत एवढं लक्षात ठेवा.”
ओजस पेन्सिली तपासायच्या निमित्ताने खाली वाकला. ती बाई त्याच्या कानात कुजबुजली. “पंधरा मिनिटांपूर्वी एक माणूस बॉलपेन खरेदी करायला आला होता. यांने पैसे देताना माझ्या टोपलीत एक चिठ्ठी टाकली”
“मला दाखवतेस का ती चिठ्ठी?” पाणिनी न विचारलं
“आत्ता दाखवली तर आपल्याकडे लक्ष असणाऱ्या माणसांना संशय येईल. त्या चिठ्ठीवर फक्त आकडे आहेत. बाकी काही नाही. आकडे लिहिलेल्या दोन ओळी आहेत.”
“आम्ही तुझ्यासाठी टॅक्सी पाठवायची व्यवस्था करतो. तुझी बॅग, बॉल पेन ,पेन्सिल ,सगळं घेऊन त्या टॅक्सीत बस आणि कनक च्या ऑफिस मध्ये जा तुझ्याबरोबर ती चिठ्ठी पण घे.” पाणिनी म्हणाला.
“म्हणजे मी इथे आणखी थांबायची गरज नाही?” त्या गुप्तहेर बाईने विचारलं
“नाही आता थांबायची गरज नाही. तू तुझं काम चांगलं केलंस. इथून निघून जा पटकन. खऱ्या आंधळ्या बाईने तुला शोधून काढायच्या आत”.
“मला वाटलं मी त्या बाईशी काही वादविवाद करावेत आणि ते रेकॉर्डिंग करून घ्यावं असं तुमच्या मनात आहे.”
“आधी होतं तसं मनात. पण मध्यंतरी काही घटना घडली आहे त्यामुळे त्यांची आता आवश्यकता नाहीये. नेमकं काय आहे त्याचे चित्र माझ्या मना समोर बरोबर उभ आहे. आता त्यामुळे रेकॉर्डिंग वगैरे काही गरज नाही.”
पाणिनीने अर्थपूर्ण नजरेने कनक कडे बघितलं त्याने आपल्या खिशातून काही पैसे काढले. आणि तिच्या टोपलीत टाकले आणि खालची दोन बॉलपेनने उचलली आणि ती पाणिनीच्या हातात दिली. “कोणी बघत असेल आपल्या कडे, तर राहू देत.”
“पाणिनी आणि कनक दोघेही तिथून चालत आपल्या कार पाशी गेले. तिथून त्यांनी एक टॅक्सीला हात केला आणि त्या स्त्री गुप्तहेर साठी टॅक्सी पाठवली.
“आता पुढे काय करायचं?” कनक ओजसने पाणिनी ला विचारलं.
“ आपण आता असं करू, आपण त्या मधुरा महाजन च्या घरात जाऊ. आणि तो वॉटर कुलर तिथं हलवण्याचे कारण काय आहे ते शोधून काढून काढू.”
“ते करताना आपण पकडलो गेलो तर? लक्षात आहे ना ?पोलिसांनी आपल्याला त्या घरापासून लांबच राहायचं अशी आज्ञा दिली आहे”
“हो, आज्ञा दिली आपल्याला, पण मी माझ्या अशिलाच प्रतिनिधित्व करतोय, मी पोलिसांचं प्रतिनिधित्व करत नाहीये मी. माझ्या आशिलानी मला घरात जायचं नाही अशी आज्ञा दिलेली नाही.” पाणिनी म्हणाला
“पण त्यांनी आपल्याला पकडलं तर आपली स्थिती फारच अवघड होणार आहे.”
“अवघड होणार आहे हे खरंच आहे पण तरी आपल्याला थोडी जोखीम पत्करून भराभर हालचाली करावी लागणार आहे. आपण काय करतो आहोत हे त्यांना कळायच्या आत आपल्याला त्या हालचाली कराव्या लागणार आहेत.” पाणिनी म्हणाला.
“हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे पण एक लक्षात येते की मधुरा महाजन आणि ती अंध विक्रेती, ती, सरिता मणिरत्नम या दोघींचा काहीतरी संबंध आहे हे नक्की” कनक म्हणाला.
“कनक, ग्लॉसी कंपनीच्या निवडणुका आहेत, संचालक मंडळाच्या. आणि त्यात जोरदार हाणामाऱ्या चालू आहेत. एकीकडे चंद्रवदन विखारे, जो कंपनीच्या अध्यक्षांशी म्हणजे मनिरत्नम् शी चांगले संबंध ठेवून आहे, याच चंद्रवदन ची आई, म्हणजे म्हणजे शेफाली, ती एखाद्या नागिनी साठी सारखी ग्रीष्म महाजन च्या मिळकतीवर दबा धरून बसली आहे. या सगळ्या वरून आपण एक निष्कर्ष असा काढू शकतो की त्या कंपनीत कोणीतरी एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला त्या कंपनीतली अंतर्गत माहिती उपलब्ध आहे आणि ती व्यक्ती या अंध व्यक्तीला म्हणजे सरिताला या सगळ्या बातम्या पुरवते आहे.” पाणिनी म्हणाला
“म्हणजे दोन व्यक्ती, एकावर एक कुरघोडी करणाऱ्या.” कनक म्हणाला “आता सगळ्यात पहिल्यांदा कोणाला झटका देणार आहोत आपण?”
“साहिर सामंत ला. पण मला नाही वाटत की तो वॉटर कुलर तिथून हलवण्यात आल्याचं आणि त्याला कोणाचा तरी धक्का लागून तो पडल्याचं महत्व साहिरला समजलं असेल म्हणून” पाणिनी म्हणाला.
“पाणिनी, आपण त्या घरात राजरोसपणे प्रवेश करणार की हळूचकन प्रवेश करणार आहोत आत्ता?” कनक घाबरून विचारलं
“आपण आपली कार राजरोसपणे त्या घराच्या समोर उभी करणार. आपल्याकडे असलेली किल्ली लावून आपण दार उघडणार आणि स्वतःचं घर असल्यासारखे आत शिरणार.” पाणिनी म्हणाला.
“समजा पोलिसांनी नजर ठेवली असेल त्या घरावर तर?” – कनक
“तस असेल तर आपण पाच दहा मिनिटे जरा बाहेर रेंगाळू, अंदाज घेऊ आणि मग आज शिरू.”
पाणिनी आणि कनक ने गाडीतून उतरून घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
“ कनक, मला तरी इथे कुठे पोलिस ठेवलेले दिसत नाहीत.”
“आपल्याला दिसत नाहीत याचा अर्थ पोलीस नसतीलच असं नाही.”- कनक म्हणाला
“खरं सांगू का तुला, कनक, मी मलाच दोष देतोय. मीच सापळ्याला अमिष लावलं आणि दुसरे कोणीतरी येऊन त्यात बसेल अशी अपेक्षा केली पण आपणच फसलो”.
“ते जाऊदे सगळं पाणिनी, मला अजून भीती वाटते की पोलिसांनी या घरात येऊ नका असे सांगितले असताना सुद्धा आपण येथे आलोय.”
“मी तुला मगाशी सांगितलं ना कनक, माझ्या अशिलाच्या हिता साठी काय करायचं हे पोलिसांनी मला सांगू नये, ते मी ठरवणार.” पाणिनी म्हणाला आणि त्याने निर्धास्तपणे स्वतः जवळची किल्ली दार लावून दार उघडलं.
“अरे ! तू एकदम दार काय उघडलंस? तू आधी दारावरची बेल पण वाजवली नाहीस. घरात कोणी असेल तर?” कनक ओजस घाबरून म्हणाला.
पण त्याच्याकडे लक्ष न देता पाणिनी आज शिरला होता. आणि जिन्याच्या पायऱ्या चढायला लागला होता. तो धक्का लागून तुटलेला वॉटर कुलर पोलीसांनी तिथून हलवला नव्हता. आणि त्या कार्पेटवर तुटलेल्या काचेचे तुकडे ही तसेच होते.
“लक्षात येतय का तुझ्या कनक काय घडलं असावं? तो वॉटर कुलर मुळात ज्या जागी ठेवला होता तिथून तो हलवला गेला होता पण तू पूर्णपणे उचलून दुसरीकडे ठेवला गेला नव्हता. थोडासा उचलला होता आणि नंतर ओढत ओढत पुढे आणला गेला होता कारण त्या वॉटर कुलरच्या खुरांची खूण पडल्ये बघ कार्पेटवर. मूळ जागेपासून तो वॉटर कुलर उचलून आत शिरण्याच्या दाराच्या समोर ठेवण्यात आला होता. म्हणजे कोणी आत आलं तर एकदम नकळतपणे त्याला धडपड अशा पद्धतीने.”
“पाणिनी, तू त्या वॉटर कुलर बद्दल एवढं काय सांगतो आहेस सारखं? माझ्या लक्षात येत नाही, वॉटर कुलर कशाला हलवला असेल?” कनक ने विचारलं
“पण पाणिनी चे तर त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो खाली गुढघ्यावर बसून वॉटर कुलर मूळ जागी होता त्या जागेची पाहणी करण्यात गुंतला होता. त्याने आपल्या खिशातून एक छोटासा चाकू काढला. पेना च्या आकाराचा.
आणि चाकूने त्यांने कार्पेट च्या कडा कापायला सुरुवात केली. त्या कडा कापल्यावर त्यांने तिथंल कार्पेट वर उचललं.
“आता हे बघ या कार्पेट च्या खाली एक चोर कप्पा आहे.” पाणिनी म्हणाला.
कपाळावर आठ्या पाडून पाणिनी दाखवत होता त्या दिशेने कनक ने बघितलं. तोपर्यंत पाणिनी ने आपला चाकू त्या फटीत घालून लाकडाची फळी उचकटून बाहेर काढली.
“बापरे ! नोटा भरलेला कप्पा ! 100 आणि 2000 च्या नोटा ! ” कनक एकदम उद्गारला.
पाणिनीने पटकन त्या चोरकप्प्याचा दरवाजा लावून घेतला आणि त्याच्यावर कार्पेट चा तुकडा होता तिथे ठेवला.
“ठीक आहे कनक, लगेच बाहेर जाऊ”
“बाहेर जाऊ म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचंय पाणिनी?”
“मला म्हणायचे तेच लगेच बाहेर पडू”
“अरे, पण हे पैसे असे इथेच सोडून बाहेर जायचं ?त्याचं काय करायचं ठरवलं आहेस तू ?”कनक ओजसने विचारलं.
“त्यात आपल्याला करण्यासारखं काय आहे?” पाणिनीने प्रतिप्रश्न केला.
“आपल्याला हे सगळं पोलिसांना सांगावं लागणार आहे”-. कनक
“तसं तू केलंस की लगेच ती शेफाली पुढे येईल आणि ती सांगेल की हे पैसे म्हणजे तिच्या मृत नवर्‍याच्या एकूण मिळकतीचा भाग आहेत त्यामुळे ती त्या पैशाचा ताबा घेईल”
“ते खरं असलं तरी आपण आता ते पैसे असे उघड्यावर ठेवून जाऊ शकत नाही. समजा ते पैसे दुसऱ्या कोणाची तरी असतील तर किंवा चोरीचे असतील तर?” कनक ने विचारलं
“ते पैसे आपण तिथे ठेवले नाहीत हे तर नक्की आहे”. पाणिनी म्हणाला.
“तू ऐकणार नाहीस पाणिनी परमेश्वर करो आणि मधुरा महाजन शुद्धीवर येवो म्हणजे आपल्याला तिच्याशी मोकळेपणाने बोलता येईल या सगळ्याविषयी” कनक म्हणाला.
“मला आता बरोबर अंदाज यायला लागलाय काय घडलं असाव याचा.” पाणिनी म्हणाला. “शेफालीने जरी तिच्या मृत नवऱ्याच्या सगळ्या मालमत्तेवर हक्क सांगितला असला आणि त्याचा ताबा घेतला असला तरीसुद्धा मधुरा महाजन हुशार असावी त्यापूर्वीच तिनं तिच्या ताब्यात असलेल्या सगळ्या मालमत्तेचे रुपांतर रोख रकमेत केलं असावं आणि ते घरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवले असावं. समाजाला आणि शेफाली ला दाखवण्यासाठी ती साध, गरिबीचं जीवन जगत असावी पण प्रत्यक्षात मात्र तिच्याकडे भरपूर पैसे असावेत आणि तिने अशा जागी ते दडवून ठेवलेले असावेत. शेफाली ला याची काहीही कल्पना येऊ न देता. आता तू म्हणतोस ते मलाही पटतंय कनक, की मधुरा महाजन जर शुद्धीवर न येताच मृत्यू पावली तर मग मात्र आपण अडचणीत येऊ.”
“पण ती शुद्धीवर आली तर?” कनक ने विचारलं
“जर ती शुद्धीवर आली आणि आपण तिच्याशी बोलू शकलो तर मग आपली स्थिती जरा बरी म्हणायची वेळ येईल. मग आपल्याला अशा तऱ्हेने गोष्टी हाताळायला लागतील की पोलीस आपोआपच या घरावर दोन तीन हवालदार नेमतील, मधुरा महाजन मरेपर्यंत किंवा शुद्धीवर येईपर्यंत.” पाणिनी नं उत्तर दिलं.
“आणि तोपर्यंत काय पाणिनी?”
“सगळ्यात प्रथम आपण इथून लगेचच बाहेर पडायचं कनक.”
पाणिनी म्हणाला.
ते दोघे घराच्या बाहेर जायला निघाले पण दारात इन्स्पेक्टर तारकर संपूर्ण पोलिसी गणवेशात त्यांची वाट अडवून उभा होता.
“अरे तारकर! कधी पासून उभा आहेस तू इथे?” आवाजात शक्य तेवढा सहजपणा आणत आणि आपण घाबरलो नाही असं दाखवत पाणिनी म्हणाला.
“तुमच्या दोघातले सर्व संवाद मी ऐकलेत पाणिनी पटवर्धन. चला तुम्हाला सापडलेल्या खजिन्याची आपण मोजदाद करू.”
इन्स्पेक्टर तारकर ने त्या कार्पेट खालच्या चोर कप्प्याचं दार उघडलं तेव्हा आश्चर्याने त्याच्या तोंडातून शीळ बाहेर पडली. आणि आतल्या नोटा बघून त्याचे डोळे विस्फारले.
“बापरे ! ठीक आहे एक काम कर, या सगळ्या नोटा बाहेर काढ आणि त्या टेबलावर रचून ठेव. आपण त्या सगळ्याची मोजदाद करणार आहोत.” आपल्या हाता खालच्या पोलिसाला उद्देशून तारकर म्हणाला.
“आपण पोलीस चौकीतून आणखीन पोलिसांची मदत घेऊ या का? मोजायला?” त्या हाताखालच्या पोलिसांनी तारकर ला विचारलं.
“आत्ता नको. आत्ता तू इथं मला साक्षीदार म्हणून हवा आहेस. म्हणजे आपण दोघांनाही एकमेकांना साक्षीदार म्हणून राहायचं. तू आता हे पैसे बाहेर काढून टेबलावर ठेवून लगेच मोजायला सुरुवात कर. नंतर आपण दोघांनी पंचनाम्यात लिहून काढू की मी पैसे मोजले तेव्हा ते योग्य होते. त्याला तू साक्षीदार होतास .आणि तू मोजले तेव्हा ते योग्य होते आणि या गोष्टीला मी साक्षीदार होतो”. त्या पोलिसाने तारकर च्या म्हणण्यानुसार सर्व नोटा बाहेर काढून टेबलावर रचून ठेवल्या.
“तारकर नीट बघ त्या नोटा बाहेर काढल्या नंतर” पाणिनी म्हणाला
“का? कशासाठी?”
“खाली तळाला एखादं पाकिट किंवा कागदाचा तुकडा असू शकतो.” पाणिनी म्हणाला.
“नाही, तसं काही दिसत नाहीये ते.”
“नक्की खात्री आहे? तुझी बघ परत एकदा. काहीतरी असल पाहिजे.” पाणिनी म्हणाला.
“तुला नेमकं काय म्हणायचंय पाणिनी? काहीतरी म्हणजे नेमकं काय?”
“माझ्या डोक्यात आहे एखादा मृत्युपत्र तिथे ठेवलेल असावं म्हणजे मयत ग्रीष्म महाजनच्या हस्ताक्षरातलं. व्यवस्थित लिहिलेलं आणि त्यावर तारीख घातलेलं.”
“नाही. तू म्हणतोस तसं तिथे काहीही नाहीये. नोटांच्या खाली पूर्ण रिकामी जागा आहे. आता आपल्याला नोटा मोजायला सुरुवात करायच्ये.”
“हे सगळे शंभर रुपयांच्या नोटा मध्ये असलेले पैसे आहेत आणि सगळी पन्नास पन्नास नोटांची बंडलं आहेत असं दिसतंय” पाणिनी म्हणाला. “अर्थात एखाद्या बंडलात ५० पेक्षा जास्त नोटा असणं किंवा ५० पेक्षा कमी नोटा असण हेही स्वाभाविक आहे, पण त्यावर मात्र पन्नास चं बंडल असल्याचं लिहिलेले आहे.”
त्या नोटांच्या बंडलांकडे तारकर ने नजर टाकली.
“प्रत्येक बंडल पन्नास चे आहे असं गृहीत धरलं तर एकूण पंधरा लाख रुपये तरी होतात.” पाणिनी म्हणाला.
“अच्छा तू आणि कनक मी इथे पोचण्यापूर्वी नेमकं काय करत होतात पाणिनी म्हणजे तुला या नोटांच्या बदलाबद्दल खूप सविस्तर माहिती आहे असे दिसतय.मला जाणून घ्यायचे आहे तुझं म्हणणं काय आहे” तारकर म्हणाला
“तू माझा सल्ला विचारत असशील तारकर, तर मी तुला असा सल्ला देईन की हे पैसे आपण इथेच याच घरात ठेवू या. घरावर नजर ठेवायला एक पोलीस अधिकारी नेम. आणि हे पैसे घ्यायला या घरात कोण येत आहे याच्यावर लक्ष ठेवू.” पाणिनी म्हणाला.
तारकारला हसू आलं. “पटवर्धन, मला माहिती आहे या पैशाच्या मागे इथे कोण आलं ते. तुझीच अशील क्षिती अलुरकर इथे आली. केवळ इथे आलीच नाही तर ती पकडली गेली. तिच्या आत्याकडून म्हणजे मधुरा महाजन कडून. आणि त्यामुळेच आपली चोरी उघड होऊ नये म्हणून तिने हातातल्या बॅटरीने मधुराच्या डोक्यावर दणका मारला पण काहीतरी करून तुला स्वरचित गोष्ट सांगितली त्यामुळेच तू आणि तुझा मित्र ओजस, या दोघांनी हे पैसे इथून लांबवायचे दोनदा प्रयत्न केलेत. पहिला प्रयत्न केलात त्यावेळेला इथे सामंत तुम्हाला या घरात भेटला आणि आता या दुसऱ्या प्रयत्नात मी तुमच्या आड आलो. एकंदरीत पाणिनी, वकील म्हणून तुला मिळणाऱ्या फी पेक्षा ही सापडलेली रक्कम खूप जास्त आहे”. तारकर म्हणाला
“अच्छा ! म्हणजे आता तुझी मजल माझ्यावर चोरीचा आरोप करण्यापर्यंत गेली तर ! “पाणिनी उदगारला.
“चोरी? छे छे ! चोरी अजिबात नाही. तू फक्त हे पैसे सापडवलेस. आणि त्या मागचा तुझा उद्देश साहिर सामंत ला लटकवण्याची होता. म्हणजे हे सापडलेले पैसे हे मधुरा महाजन च्या मिळकतीचा एक भाग आहेत म्हणून तू दाखवणार होतास. तू पुढे जाऊन तुझी अशील क्षिती अलुरकर करला निर्दोष मुक्त करून मधुरा महाजन च्या मृत्यूनंतर या पैशाचा कायदेशीर वारस म्हणून क्षिती असल्याचं दाखवणार होतास. खरं आहे की नाही पानिनी? यापेक्षा वेगळे काही तुझ्या मनात होतं, असं दाखवणारा पुरावा आत्ता तरी माझ्याकडे नाहीये.
पाणिनी, या गोष्टीचा उपयोग सरकारी वकील खांडेकर कशा पद्धतीने करून घेतील हे तुला माहित्ये. सापडलेले पैसे हाच मधुराला मारण्याचा प्रयत्न करण्यामागे क्षिती अलुरकर चा हेतू होता हे ते सिद्ध करतील. किमान या प्राथमिक तपासणीत तरी ते सिद्ध करतीलच. भलेही तू तुझ्या हुशारीमुळे वरच्या कोर्टात हे प्रकरण जाईल तेव्हा तू क्षितीला सोडवशील सुद्धा कदाचित, पण आता तरी तू यात पूर्ण अडकला आहेस लक्षात ठेव. वास्तविक तू पोलिसांना तुला माहित असलेलं सर्व काही सांगायला पाहिजे होतंस.”
“पण तारकर मला खरंच काही माहिती नव्हतं. आजा फक्त अंदाज होता किंवा मला संशय होता.” पाणिनी म्हणाला.
“माझं ऑफिस चौवीस तास उघडे असतं पाणिनी. आता मी आमच्या हेड ऑफिस ला फोन करून पोलिसांची कुमक इथे बोलावून घेणार आहे” तारकर म्हणाला
“म्हणजे या सापडलेल्या पैशाची बातमी तू सर्वांसमोर उघडी करणार आहेस?” पाणिनी ने विचारलं.
“जेव्हा एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात एखाद्या ठिकाणी सापडते तेव्हा आम्ही ते दडवून नाही ठेवू शकत. सर्वसामान्य जनतेसमोर ही बातमी द्यावीच लागेल मला. पुढच्या वीस मिनिटात अॅडवोकेट खांडेकर यांच्या कानावर मला ही बातमी घालायला लागेल. तुला आणि दोघांनाही धन्यवाद. आता तुला इथे थांबून ठेवण्याची काही गरज नाही. तुमच्या दोघांच्या सहकार्याबद्दल आभार. आजचा दिवस संपण्यापूर्वी तुला खांडेकरां कडून काहीतरी समजेलच. आता सध्या तरी मी तुम्हाला सोडून देतोय.” तारकर म्हणाला.
पाणिनी आणि कनक ओजस दोघेही तिथून बाहेर पडले.
“आता पुढे काय करायचं?” कनक ने विचारलं.
“सांगतो तुला काय करायचं ते पुढे. जरा इथून बाहेर पडून पुढे जाऊ मग सांगतो.” पाणिनी म्हणाला. दोघे चालत चालत निघाले. “आपण आता बचाव पक्षाच्या वतीने त्या आंधळ्या स्त्रीवर म्हणजे सरिता मणिरत्नम वर
कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स इशू करणार आहोत. आणि हे काम वाटतं तेवढं सोपं नसणार आहे. दुसरं तुला काम असं करायचंय, की या घरावर पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजू ला तुझे गुप्तहेर नेमून मला त्याचे अहवाल तू द्यायचे आहेस. त्याच बरोबर त्या ग्लॉसी कंपनीच्या आवारात सुद्धा तू तुझे हेर नेमायचे आहेत. आणखीन एक महत्त्वाचं काम, ते म्हणजे मीनल गोखले हिच्यावर सुद्धा बचाव पक्षाच्या वतीने कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावणी करायची आहे.”
“मीनल गोखले म्हणजे त्या सरिताच्या शेजारी राहणारी आणि त्या सोसायटीची “मॅनेजर बाई?” कनक ने आश्चर्यानं विचारलं.
“हो. तीच ती बाई” पाणिनी म्हणाला
“का? त्या बाईला कशाला यायला पाहिजे कोर्टात साक्ष द्यायला?” कनक ने विचारलं.
“ लक्षात येतय का तुझ्या कनक, त्या मीनल गोखलेनेच आपल्याला चक्क गंडवलं. म्हणजे आपण सरिता मणिरत्नम च्या दारावरची बेल जेव्हा वाजवत होतो त्याच वेळेला ती कविता या मीनल गोखले ला फोन करत होती आणि तिला ती ती विचारत होती की या सगळ्या प्रकरणी काय प्रगती आहे आणि काय चाललंय आणि जेव्हा तिला कळलं की आपण तिच्या अपार्टमेंटमध्ये येऊन तिला भेटायचा प्रयत्न करत आहोत, त्याच वेळेला या मीनल गोखले ने तिला मागच्या जिन्याने बाहेर काढून तिच्या स्वतःच्या घरात नेऊन दडवून ठेवलं. म्हणजेच आपण जेव्हा मीनल गोखले बरोबर सरिता च्या घरात शिरून दुसरा मजला तपासत होतो, त्या वेळेला सरिता मीनल गोखले च्या घरात सुरक्षित होती माझं तर असं म्हणणं आहे तो दुसरा मजला म्हणजे केवळ दाखवण्याची गोष्ट आहे ती मीनल गोखले ही सरिता बरोबरच राहते एकत्र. म्हणजे बाहेरून दाखवायला दोन घर आहेत प्रत्यक्षात एकच घर आहे पाणिनी म्हणाला.”
“तुला कशावरून असं वाटतंय ?” कनक ओजसने विचारलं.
“कारण त्या जागेत कोणी राहात असेल, कोणाचा वावर असेल असं वाटलं नाही,आत गेल्यावर मला. म्हणजे त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर. म्हणजे मला तर असं वाटतंय ती संपूर्ण घर त्या अंध सरिता मणिरत्नम च्या मालकीचं असावं आणि फक्त दाखवण्यासाठी शेजारचं घर मीनल गोखलेचे दाखवण्यात आले असाव.” पाणिनी म्हणाला.
“ तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणण्यापूर्वी“ ही गोष्ट तिच्याशी बोलावी असं नाही वाटत तुला,पाणिनी?” –कनक
“नाही , आत्ता आधी बोललो तर ती सावध होईल आणि आपली हकीगत खरी आहे असं भासवण्यासाठी युक्त्या प्रयुक्त्या करेल. या उलट तिला समन्स देऊन कोर्टात बोलावलं तर शपथ पूर्वक खोटं बोलायच धैर्य ती नाही दाखवणार.” पाणिनी म्हणाला.

“ओके ठीक आहे. तुझी कोर्टातली स्ट्रॅटेजी ठरवण्यात तूच एक्सपोर्ट आहेस. मी त्याच्यात पडत नाही. पुढे काय करायचे आपण? कनक ओजसने विचारलं.
“दरम्यानच्या काळात असे घडण्याची शक्यता आहे की सरकारी वकील खांडेकर सगळ्या वर्तमानपत्र वाल्यांना बोलावून आणि अगदी न्यूज चॅनेल वाल्यांना सुध्दा बोलावून त्या चोर कप्प्यात नोटा सापडल्याच्या बातमीचा मोठा गवगवा करतील. ते मुद्दाम या गोष्टीवर भर देतील की जिच्यावर हल्ला झाला, आणि जी हॉस्पिटलमध्ये मृत्युशय्येवर आहे, तिच्याच घरात ही मोठी रक्कम सापडली आणि ही सापडलेली रक्कम हाच एक मोठा पुरावा आहे, हल्लेखोराचा, हल्ला करण्यामागे काय हेतू होता हे सिद्ध करणारा. या सगळ्याचे श्रेय ते तारकर ला द्यायला मागेपुढे बघणार नाहीत. ते हे सांगायला कमी करणार नाहीत की तारकर च्या हुशारीमुळे पाणिनी पटवर्धन आणि त्याचा खाजगी गुप्तहेर मित्र यांचे सगळे प्लॅन धुळीला मिळाले.” पाणिनी म्हणाला.
“पाणिनी,त्या अंध विक्रेती सरिता हिच्या साक्षीवर तू तुझ्या बचावाचा संपूर्ण डोलारा उभा करणार आहेस?” कनक न विचारलं
“मी अगदी तसेच करणारे.” पाणिनी म्हणाला.
“तुला असं वाटतंय पाणिनी, की त्या कंपनीच्या आवारात पेन्सिल विक्री करणं म्हणजे एक हेरगिरी होती त्या आंधळ्या बाईने केलेली?” कनक ने विचारलं
पाणिनीने आपली मान होकारार्थी हलवली.
“पण मला सांग पाणिनी तू म्हणतोस तसं त्या कंपनी मध्ये नोकरीला असणारी एखादी व्यक्ती जर त्या अंध स्त्रीला म्हणजे सरिताला काही माहिती देऊ इच्छित होती तर ती व्यक्ती तिथे तिच्या टोपलीत चिठ्ठ्या कशाला टाकेल? ती तिला फोन करून करू शकेलच की ? किंवा पत्र लिहून कळवू शकेल किंवा मेल करू शकेल.”
“नाही, त्याला तसं करायचं नव्हतं. कनक, कारण तो ज्या वेळेला तिच्या टोपलीत कंपनीच्या अंतर्गत माहितीची टाकत होता, त्याच वेळेला ती आंधळी स्त्री त्याला काही सूचना सुद्धा देत होती म्हणजे थोडक्यात एकाच वेळेला माहितीची देवाण-घेवाण ते करत होते.” पाणिनी म्हणाला.
“म्हणजे ती सरिता, त्याला काही सूचना किंवा आज्ञा देत होती?”—कनक
“एकदम बरोबर कनक ! “ पाणिनी म्हणाला