Sparshbandh? - 7 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 7

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 7

संध्याकाळचे 6 वाजले होते..... तरीही मिष्टी अजून अविनाशच्या केबिन मधून बाहेर नव्हती आली..... विराजच कितीही केलं तरी तिच्या डेस्ककडे लक्ष जातच होत.....ऑफिस टायमिंग संपल होत.....विराज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा..... थोड्याचवेळात मिष्टी परत तिच्या डेस्कवर परत आली आणि तिने तिचा pc ऑन केला.... ऑफिस मध्ये जवळजवळ सगळेच निघून गेले होते.... जे राहिले होते ते पण निघायच्या तयारीत होते.... तरीही अजून ती कामातच होती.... अविनाश देखील निघाला होता....


अविनाशने जाता जाता मिष्टीला सांगून गेला....7 वाजायला आले होते तरीही ती अजून कामच करत होती.....


"पहिल्याच दिवशी एवढ्यावेळ थांबून कोण काम करत??" विराज मिष्टीकडे बघत म्हणाला..... विराजने थोड वैतागतच घडयाळ पाहिलं 7 वाजून 5 मिनिटे झाली होती..... त्याने परत एकदा तिच्याकडे पाहिलं... मिष्टीने तिचा डेस्क आवरला होता आणि ती निघाली होती..... ती जाताना बघून विराजनेही त्याचा लॅपटॉप बंद केला आणि तो बॅगमध्ये टाकून त्याने ब्लेझर अंगावर चढवल आणि त्याच्या केबिन लॉक करून बाहेर पडला.



मिष्टीने तिचा डेस्क आवरला आणि निघून गेली.....तीच्या पाठोपाठ विराजने पण त्याचा लॅपटॉप बंद केला आणि केबिन लॉक करुन ऑफिस बाहेर पडला......


मिष्टी खाली पार्किंग मध्ये कुठेच दिसत नव्हती..... विराजला वाटल घरी गेली असेल....मनातच तो थोडा हिरमुसला तिला परत पाहता आल नाही म्हणून..... मूळात त्याच आजचं काम कधीच झाल होत पण तिच्यासाठी तो जास्तवेळ थांबला होता.....मनातले विचार झटकून तो त्याच्या गाडीत बसला....


आज ड्रायव्हर नव्हता तोच कार चालवत होता..... का कोण जाणे पण त्याने ऑफिसच्या गेटपाशी आल्यावर त्याने गाडी थांबवली..... बॉसची गाडी थांबल्यावर तिथले गार्ड पण अलर्ट झाले.... विराजने काच खाली करताच त्यांनी त्याला लगेच सलाम ठोकला.....

"एक मुलगी इकडून गेली का??" विराजने विचारले.

त्या गार्डच्या चेहऱ्यावर बारा वाजले.... कधी नव्हे तेव्हा बॉसची गाडी थांबली आणि विचारून विचारून एक मुलगी इथुन गेली का हे विचारलं....

" सर तुम्ही नाव सांगितल तर रजिस्टर मध्ये चेक करून लगेच सांगतो." गार्ड म्हणाला.

" मिष्टी....मिष्टी देसाई." विराज पटकन म्हणाला.

" नाही सर....त्यांची सकाळच्या एन्ट्रीची वेळ आहे आताच्या एक्झीटची नाही...." गार्ड रजिस्टर चेक करत म्हणाला.

"व्हॉट??" विराज रागातच ओरडला.

त्याचा चढलेला आवाज ऐकताच त्या गार्डला घाम फुटू लागला....

" हो... हो सर..... वाटल तर तुम्ही स्वतः चेक करू शकता." तो गार्ड भित भित म्हणाला.


" शो मी." विराज त्याला म्हणाला.

विराजने चेक केलं तर खरच त्यात तिच्या जाण्याची वेळ नमूद नव्हती केलेली.

" पण ती तर माझ्या आधीच 2 मिनिट निघाली होती...." विराज मनातच म्हणाला.

" मला 10 मिनिटा पूर्वीपासूनच सीसीटीव्ही फुटेज दाखवा." विराज तिथल्या गार्डला म्हणाला.

" येस....येस सर." गार्ड म्हणाला.

गार्डने त्याला फुटेग दाखवलं.... कुठेच ती ऑफिस मधून बाहेर पडल्याच दिसत नव्हत.

विराजने जरा रागातच कपाळावर दोन बोट चोळली....

" ऑफिस मधून बाहेर पडली पण गेट मधून नाही.... अस कस शक्य आहे??..... ही गेली तर गेली कुठे??" विराज जरा काळजीत विचार करत मनात म्हणाला....

तेवढ्यात त्याचा फोन वाजला..... घरुन फोन होता.

"हॅलो." विराज फोन कानाला लावत म्हणाला.

" विराज बाबा मीरा बेबी तुम्ही कधी येणार हे सारखं विचारत आहे.... तुम्ही आल्याशिवाय काही खात पण नाहिये.....म्हणून तुम्हाला फोन केला" गीता मीराची आया म्हणाली.

" मीराला फोन द्या." विराज म्हणाला.

"हॅलो." मीरा आपल्या बोबड्या स्वरात म्हणाली.

" प्रिन्सेस बाबाला यायला थोडा उशीर होणारे.... प्लिज हट्ट न करता खाऊन घे...."

" नो....नो...नो..." मीरा हट्ट करत म्हणाली.

" प्रिन्सेस प्लिज....बर.....मी आल्यावर आपण आइस्क्रीम खाऊयात..... मग तर चालेल??" विराज मीराला लाडीगोडी लावत म्हणाला.

"पक्का प्रॉमिश??" मीरा म्हणाली जरा विचार करत म्हणाली.

" पक्का प्रॉमिश." विराज तिच्या बोलण्यावर थोडासा हसत म्हणाला.

" ओत्ते बाय... आता मी खाते." मीरा हसत म्हणाली.

" बाय प्रिन्सेस." विराज बोलला.

त्याने फोन ठेवून दिला....आता मिष्टी कुठे आहे?? हाच त्याच्यासमोर प्रश्न उभा होता.... एकीकडे ती कुठे का असेना आपल्याला काय अस एक मन म्हणत होत तर दुसर मन तिला शोधायला पाहिजे ह्याकडे धाव घेत होत.


त्याने मिष्टीला फोन लावला.... जेव्हा त्याने तीच्याबद्दलची माहिती काढायला सांगितल होती तेव्हा तिचा फोन नंबर पण त्याने सेव्ह केला होता..... आता असा कधी उपयोगी पडेल अस त्याला स्वप्नात पण वाटल नव्हत.... रिंग तर जात होती पण अजून कोणीही उचलत नव्हत...... 7-8 वेळा रिंग झाल्यानंतर तिकडून फोन उचलला गेला.....

"हॅलो." विराज म्हणाला.

तिकडून काहीच उत्तर नाही आल.... फक्त आवाज येत होता तो फक्त जोरजोरात घेतलेल्या श्र्वासांचा....

"हे...." विराजने परत एकदा आवाज दिला.... आता मात्र थोडे थोडे अस्पष्ट स्वर ऐकू येऊ लागले....

" म.... म....ला....श्र्वा... श्वास....ना... ही.... घे ता...... ये... येते..... प्लिज...... प्ली......ज.... वा.... च.... वा....." परत फक्त श्वासांचा आवाज येऊ लागला पण ह्या वेळी जोरजोरात न येता हळु हळू आवाज येत होता.... तिची शुद्ध हरपत असल्यासारखं......

" हेलो मिस मिष्टी.... हेय...... जागी रहा..... एक काम कर माझ्याशी बोलत रहा.... ऐकती आहे का माझ??.... मिस मिष्टी....."विराज मिष्टिला जागं ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता.

" MISS मिष्टी.....मला सांगा तूम्ही कुठे आहात ??.... हॅलो तुला आवाज येत आहे ना माझा??" मिष्टी कडून काहीही रिस्पॉन्स न आल्यामुळे विराज पॅनिक होत तिला विचारत होता.

" Sto...ra....ge room" मिष्टी एवढंच कसबस बोलू शकली.

" व्हॉट??.... तू storage room मध्ये कशी गेलीस??...... मी येतोय.... माझ्याशी बोलत रहा.... कळतय का तुला..... जागी राहण्याचा प्रयत्न कर....." विराज थोडा चिडत थोडा काळजीत बोलला.

" हो....." मिष्टी कशीबशी हळू आवाजत त्याच्या प्रश्नांना रिस्पॉन्स देत होती.....

विराज लगेच लिफ्टने वर ऑफिस मध्ये आला.....त्याला काय करावं काहीच सुचत न्हवत तो पटकन लिफ्ट मध्ये शिरला आणि 10th फ्लोरच बटण प्रेस केल...!!

त्याला आता अजिबात पेशंन्स न्हवते......कधी तिला बघतो आहोत असं झाल होत त्याला.....तो आतून घाबरला का होता ते त्याला पण माहित न्हवत....

10th फ्लोर येतच तो स्टोरेज रूम च्या दिशेने पटपट पावले टाकत चालू लागला...

...
त्याने पाहिलं तर स्टोरेज रूम चा दरवाजा अर्धा ओपन होता...!! विराज पटकन रूम मध्ये शिरला आणि मिष्टी ला शोधू लागला....

त्याची भिरभीरती नजर तिलाच शोधात होती...आणि फायनली त्याला ती दिसली....... ❤

तो लगेच तिच्याजवळ धावत पोहोचला तर ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती आणि तिच्या डोक्यातून रक्त येत होत...!! तो खालती तिच्याजवळ बसला आणि तिला जाग करायचा प्रयत्न करू लागला......

" मिस मिष्टी......" विराज तिच्या गालावर थोपटत म्हणाला....

ती डोळे किलकिले करत होती... आणि पुन्हा बंद करत होती......

"मिस मिष्टी... डोळे उघडायचा प्रयत्न करा , तो तिला जाग ठेवण्याचा प्रयत्न करत होता...." आता तो थोडं हायपर होत म्हणाला...

आता तो घाबरला होता कारण ती सारखी डोळे बंद करत होती.....


" मायरा... डोळे उघडायचा प्रयत्न कर , मायरा....... " विराज........

बाकी काहीही ऐकू नाही गेलं पण मायरा.... हा शब्द तिच्या डोक्यात एकदम फिट्ट बसला....

तिचे डोळे थोडे पाण्याने भरलेले होते आणि बारीक नजर फक्त त्याच्या ओठांवर होती.....ज्या ओठांनातून मायरा हे नाव बाहेर पडलं....

आणि तिथेच तिचे डोळे हि मिटले......... 💞



..........
...............


विराजची गाडी हॉस्पिटलच्या दिशेने जातं होती... त्याने आधीच हॉस्पिटल मध्ये एक बेड रेडी ठेवायला सांगितलं होत......

त्याच्या मांडीवर मिष्टीच डोकं होत...तिचे डोळे मिटलेले होते बहुतेक चक्कर आल्यामुळे.....

त्याने तिच्या डोक्याला रुमाल बांधला होता , ज्यामुळे रक्त तिथेच थांबेल...


गाडी हॉस्पिटल मध्ये थांबताच विराजने मिष्टीला उचलल आणि आत घेऊन गेला....

तो येताच डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या एका स्पेशल रूम मध्ये नेलं.....

विराजने तिला बेड वर झोपवलं तस डॉक्टर्स नी त्याला बाहेर जायला सांगितलं......

विराज थोडा ओरडत " पण डोक्यालाच लागलं आहे ना फक्त..?? मग मी इथेच थांबतो ना...."

डॉक्टर त्याला शांत करत म्हणाले, "हे बघा त्यांना अजून कुठे लागलं आहे का हे सुद्धा पाहावं लागेल....
तुम्ही हे पाहूच शकता त्यांच्या बॅक मधून पण ब्लिडींग होतय.....
So आम्हाला पाहावंच लागेल...."

ते असं म्हणताच विराजच्या कपाळावर आठ्या पसरल्या... त्याने त्याच्या कपड्यांकडे पाहिलं तर ते पूर्ण रक्ताने माखले होते.....

तिला हॉस्पिटल आणण्याच्या नादात त्याने पाहिलच आणि आता मेल डॉक्टर चेक करणार हे त्याला पटलं नाही तिच्या बद्दल इनसिक्यूर झाला तो.....

त्याने लेडीज डॉक्टरला तिला चेक करायला सांगीतल आणी बाहेर निघून गेला........

विराज तिच्या रूम समोरून नुसता इकडे तिकडे चकरा मारत होता...... तिचे डोळे..... सेम डोळे ज्यांनी त्याला वेड केलं होत.....तेच डोळे मिटताना त्याच्या हृदयात असंख्य कळा उठत होत्या..... पहिल्यांदा समुद्रावर असताना एकमेकांशी झालेली नजरानजर अजूनही त्याच्या हृदयात घर करुन बसली होती.....
.
.
पण तिची ही अवस्था झाली कशी??
असं काय झाल की घरी निघाली असताना तिला स्टोरेज रूम मधे जाव लागलं??
असे असंख्य प्रश्न विरजच्या डोक्यात येत होते.... पण ह्या सगळया प्रश्र्नांची उत्तरं मिष्टी शुद्धीवर आल्यावरच मिळणार होती......उत्तरांसाठी त्याला अजून संयम ठेवून वाट बघावी लागणार होती पण त्याचा संयमच आता संपत चालला होता.....


विराजचा तेवढ्यात फोन वाजला.....

" डॅडा अजून तिती वेल लागणारे तुला यायला??" मीरा विराजने फोन उचलल्या क्षणी म्हणाली.(डॅडा अजून किती वेळ लागणारे तुला यायला??)

" अजून थोडावेळ प्रिन्सेस..... लगेच येतो मग मी घरी..... ठीके....." विराज तिला म्हणाला.

मीराने एक उसासा सोडला आणि म्हणाली," ओते..... लवतर ये..... मी तुझी वात बघते."(ओके..... लवकर ये...... मी तूझी वाट बघते.)

तिने फोन ठेवून दिला......


1 तासाने डॉक्टर्स बाहेर येतात....विराज तिला भेटायला आत जाणार तोच डॉक्टर बोलतात.....

"तुम्ही जरा माझ्या केबिन मध्ये या.....थोडं बोलायचं आहे......"

विराज नाईलाजाने त्यांच्याबरोबर जातो.....

डॉक्टर जरा सिरीयस होत विचारतात , "या आधी त्यांचं कधी ब्रेन ऑपरेशन झालं आहे का...???"

विराजला प्रश्न पडला.....तो म्हणाला " i डोन्ट know डॉक्टर पण तुम्ही का हे विचारत आहात?? "

डॉक्टर आश्चर्यचकित होत म्हणाले ," कारण त्यांच्या डोक्यावर ऑपरेशन्सच्या काही खुणा आहेत ज्या कि केसांमुळे दिसत नाही आहेत...."

विराज म्हणाला,"ओके.....मला यातलं काही माहीत नाही कारण त्या माझ्या ऑफिस मधल्या फक्त एम्प्लॉयी आहेत......" विराज हे डॉक्टर ला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता की स्वतः च्या मनाला हे त्यालाच कळत नव्हत....

डॉक्टरांनी विचारले ,"रिअली?????"

विराज नजर चुकवत " ह्म्म्म " म्हणाला आणि उठून बाहेर गेला........!!



विराजने पाहिलं तर तिच्या डोक्याला पट्टी बांधली होती , सलाईन पण लावली होती....

विराजने तिच्या भावाला पण इन्फॉर्म केल होत , त्यामुळे तो सुद्धा आला होता.....

विराजला घरी तर जायाचं न्हवत पण उगाच इथे थांबलं कि चर्चा सुरुवात होतील लोकांच्या.....त्या पेक्षा नकोच...... आणि मीरा ही घरी होती.... घरून आधीच एक- दोनदा फोन येऊन गेले होते.....

एकदा विराजने झोपलेल्या मिष्टी कडे डोळे भरून पाहिलं आणि जड मनाने हॉस्पिटलच्या बाहेर पडला....

घरी पोहचता पोहचता बराच उशीर झाला त्याला....रात्रीचे 10 वाजायला आले होते..... त्याने गाडी पार्क केली आणि तडक त्याच्या रूम मध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढू लागला...... हॉल मध्ये सगळे टीव्ही पाहत बसले होते.....तो आल्याक्षणी सगळ्यांच लक्ष त्याच्याकडेच गेलं होत..... त्याचा रक्ताने माखलेला शर्ट पाहून सगळे शॉक झाले होते.....

त्याची आई लगेच त्याच्या जवळ येत म्हणाली," विराज तू ठीक आहेस ना?? कुठे लागलं आहे का तुला?? हे रक्त..... रक्त....कस लागलं??"

त्याने काहिच उत्तर नाही दिलं....त्याच्या आईचा हात स्वतःवरुन हटवत तो लांब झाला.

" मला काहीही झालेलं नाहीये....." एवढंच सांगून तो तडक त्याच्या रूम मध्ये निघून आला.

त्याची आई त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे हताश होउन पाहू लागली.....

रूम मध्ये आला तर मीरा तिच्या टेडी बिअरला कवटाळून शांत झोपली होती..... विराजची वाट बघत त्याच्याच रूम मध्ये ती कधी झोपून गेली तिला कळलं पण नाही..... विराजने त्याचे कपडे बदलले आणि तिच्यापाशी आला..... व्यवस्थित पांघरूण घालून तिला कुशीत घेतलं....मीराने झोपेतच लगेच टेडी बिअरला सोडून त्याच्या कुशीत शिरुन गाढ झोपून गेली.... तो हसतच तिला थोपटू लागला....

दुपरच्या जेवणानंतर त्याने काहीच खाल्ल नव्हत..... पाणी प्यावं म्हणून त्याने शेजारी असलेल्या टेबल lamp वर पाहिलं.... दूधाचा भरलेला ग्लास ठेवला होता.... विराजने तो ग्लास घेतला आणि दूध पिऊन परत ठेऊन दिला.... सारखा सारखा मिष्टीचा विचार मनात येत होता....आज इतकी धावपळ झाल्यामुळे त्याला कधी झोप लागली त्यालाही कळेलच नाही.....

थोड्यावेळाने त्याची आई त्याच्या रूम मध्ये आली आणि बापलेकीला अस गाढ झोपलेल पाहून मायेने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला.... त्यांना चांगलच माहिती होत तो आल्यावर काही जेवणार नाही पण उपाशी पोटी झोपू नये म्हणुन त्यांनीच तो दूधाचा ग्लास तिथे ठेवला होता.....

त्या मीराचा जरी राग राग करत असल्या तरी त्यामागेही कारणे होती...एकदा दोघांकडेही मायेने पाहून त्या रूमचा दरवाजा लावून झोपायला निघून गेल्या....


दुसऱ्यादिवशी....


विराज जेव्हा हॉस्पिटल मध्ये आला तेव्हा मिष्टीचा भाऊ तिथे नव्हता आणि मिष्टी उभी राहून चालत कुठे तरी जातं होती....

पाठीला जखम असल्याने तिला व्यवस्थित चालता ही येत न्हवत.....ती पडणार कि विराजने पटकन तिचा हात धरून तिला सावरले आणि....

तिला सावकाश बेड वर बसवले.............


" You idiot girl 😡😡.... have you lost your senses?? "..... विराज रागाने असं बोलताच ती त्याच्याकडे पाणी भरलेल्या डोळ्यांनी पाहू पागली....


तिचा इनोसेंट लूक पाहून तो पण क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला....... त्याक्षणी खूप क्यूट वाटली ती त्याला...... हॉस्पिटलचा गाऊन तिच्या अंगावर नव्हता तिचा अंगावर साधासा ड्रेस होता....


हाँ पहले पहल तुमसे मिली जो निगाहें
तो ये दिल ने कहा था अरे यही तो है वो
जिसे ढूंढ रहे थे जज़्बात तुम्हारे
चलो शुक्र करो कि जिसे चाहा था
आज तैनूमिल गया वे... 💞


दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते..... विराजला तिच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न दिसत होते आणि मिष्टी ती तर त्याच्या गहिऱ्या डोळ्यात तिच्या साठी दिसणाऱ्या काळजीच कारण शोधण्यात गूंग होती.....

बाहेर काहितरी पडण्याचा आवज झाला आणि मिष्टी भानावर आली..... तिने लगेच त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला.....

" No..... Don't touch me." मिष्टीचे डोळे काठोकाठ भरले होते कधीही रडू येईल अशी तिची अवस्था झाली होती पण आवाजात कसाबसा राग आणून ती विराजला म्हणाली.

विराज सुन्न होऊन तीच्या डोळ्यात होऊन बघत होता.......




क्रमशः.....