Shimplyache Shopis nko jiv adkla motyat - 2 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 2

Featured Books
Categories
Share

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 2

एक ९-१० वर्षाची मुलगी तिच्या आई बाबांना थांबवत होती..

पण ते काही थांबत न्हवते.....ती लहान मुलगी खूप रडून ओरडून त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होती पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता.....

ती लहान मुलगी "मम्मा प्लीज नको ना सोडून जाऊ..... आय प्रॉमिस मी कधीच मनू दि ला धक्का देणारं नाही...तिच्याशी भांडणार पण नाही....बाबा तू तरी नको जाऊं ना..."

ती मुलगी खूप रडत आणि जितकं ओरडून संगता येईल तितकं ओरडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती...

पण तिचे आई बाबा काही थांबलेच नाही..त्यांनी त्यांच्या जवळ असणारी ११-१२ वर्षाच्या मुलीला गाडीत ठेवलं आणि आपल सामान घेत निघून गेले....ती मुलगी किती वेळ त्या गाडीच्या पाठी धावत होती...

पण ती गाडी काय तिच्यासाठी थांबली नाही...ती मुलगी धपकन खालती कोसळली....
.
.
.तशी त्रिशा झोपेतून उठली , डोळ्यात पाणी होतंच....सोबत राग ही होता ' पुन्हा त्याच आठवणी ' अस स्वतःशी पुटपुटत ती उठली आणि आपले कपडे घेत बाथ रूम मध्ये गेली...

ती शॉवर खाली उभी राहत आठवत होती , कसे तिचे आई बाबा तिला सोडून गेले होते , सगळ प्रेम एकाच मुलीला दिलं...

आणि आता त्यांना आठवतंय की त्यांना अजुन एक मुलगी पण आहे...

तिने रागात भिंती वर हाथ मारला......पण तो भिंती वर न लागता लोखंडी खिळयाला लागला..

तिच्या हाथून रक्त येऊ लागलं..तिने तसाच हाथ पाण्याखाली धरला.....रक्त थांबत न्हवत....कस बस तिने आपलं आवरल आणि बाहेर आली..

हाताला औषध लावून पट्टी बांधली..आज त्रिशा ने लॉंग टॉप आणि जीन्स घातली होती..केसांची पोनी टेल बांधली आपल आयडी कार्ड बॅगेत भरत ती खाली आली..

तिने पाहिलं तर निलेश आणि मृणाल कोणत्या तरी विषयावर बोलत होते..

तिने बाजूला पाहिलं तर आज्जी आणि आजोबा पण होते , तस तिला बर वाटल....नाहीतर त्यांच्या सोबत बसणं तिला जीवावर आल होत..

ती आज्जी आजोबांना हसत गूड मॉर्निंग विष करत खाली आली....तिने मृणाल आणि निलेश कडे साफ दुर्लक्ष केलं..

आज्जी म्हणाली, "बर झाल आलीस ते लवकर घे नाश्ता कर आज... कॉलेज वरून यायला पण उशीर होईल काहीतरी खाऊन जा..."

"हो ग..." त्रिशा म्हणाली.

आज्जी ने तिच्या पुढ्यात मॅगी आणि कॉफी मग तिच्या जवळ सरकवला...आज तिचा नाष्टा हाच होता...कारण रोज ती सकाळी नाष्टा मध्ये पोहे खाऊन थकली होती....म्हणून आज्जी तिला दर गुरुवारी मॅगी नाश्त्यात द्यायच्या....त्यात तिची फेवरेट म्हणून ती खायला घेणार तेच...रियाने ती प्लेट बाजूला खेचली आणि तिच्या जवळ पोह्यांची डिश देत म्हणाली...

रिया (आई) "हे....मॅगी वैगरे सगळ unhealthy असतं ....हे पोहे घे....तुला आवडायचे ना.....म्हणून तुझ्यासाठी केले...."

त्रिशा ला आधीच राग होता त्यात तिने तिची मॅगी खात असताना खेचून घेतली....

त्रिशा ने तिने सरकवलेली पोह्यांची प्लेट जोरात खालती फेकून दिली...आणि रिया ला रागात म्हणाली...

त्रिशा "हे सगळ ना...ते तुझ्या मुलीला देत जा , मला नाही...आणि प्लीज किती वेळा सांगू तुला नको माझ्या जवळ येऊ....आणि जवळीक करण्याचा प्रयत्नही करू नको....."

त्रिशा तिला रागात म्हणाली...मृणाल तिच्या आई कडे पाहत होती....

रिया च्या डोळ्यात आपल्या मुलीची ओढ होती....की कधीतरी ती तिला आई म्हणेल...तिला माहित होत आज रिया किती आवडीने त्रिशा साठी बनवत होती....

पण....

त्रिशा तिला आई म्हणणं तर दूरच जवळ पण येऊ द्यायची नाही...

त्रिशा ने रागात आपली सॅक घेतली आणि बाहेर आली...समोर असलेला अनिकेत पण तिला दिसला नाही....

आजी रियाला म्हणाल्या...

आज्जी "झालं तुझ समाधान?? मिळाली मनाला शांती हेच पाहिजे होत ना तुला??"

रिया "आई असं काहीच नाही आहे..मी फक्त..."

आजोबा मध्येच थांबवत म्हणाले,"बास रिया.....तुम्ही इथे परत आलात आम्ही काहीच म्हणालो नाही....जर तुमच्या येण्याने तिला त्रास होत असेल तर तुमच्या साठी दरवाजा उघडा आहे...राहत आहात मग रहा की खुशाल...माझ्या पोरीची अशी अवस्था करून , तिच्याकडून अपेक्षा ठेवता...."

रिया (आई)"नाही बाबा..मी फक्त..."

"एकतर आज पण तुझ्या मुळे ती न खाता गेली.....आता तरी दूर रहा माझ्या पोरीपासून...."आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या...कारण इतकी वर्षे त्यांनीच तिला सांभाळलं होत , त्यांचा त्रिशा वर खूप जीव होता...


आजोबा आज्जीला शांत करत वर घेऊन गेले...

रिया पण रडतच आपल्या रूम मध्ये गेली...

निलेश (बाबा)म्हणाले "थांब मनू मी आलोच..."

मृणाल उत्तरली "हो..."

निलेश पण रियाच्या पोठोपाठ गेला...मृणालने समोर पाहिलं तर अनिकेत चे डोळे आग ओकत होते...तो रागात मृणाल जवळ आला...

अनिकेत रागात म्हणाला "काय मूर्ख मुलगी आहे ही...अस कोणी करत का....तुम्ही घराच्या बाहेर का नाही काढत ?? तिच्यामुळे आंटीना किती त्रास झाला पाहिलं...."

मृणाल त्याला शांत करत म्हणाली "अनिकेत अरे तू शांत हो..राहिला प्रश्न मॉम चा तर तिचं तिच्याशी बोलायला जाते...आणि तिला घरा बाहेर काढायला आमचं घर नाही हे....तिचं आहे.... "

अनिकेत म्हणाला "अरे पण..."

मृणाल म्हणाली "अनिकेत तू शांत हो....रागीट आहे ती....स्वभाव आहे तिचा तो त्यामुळे तू शांत रहा...आणि मला कॉलेजला सोड.....आज कळेल कोणत हॉस्पिटल भेटणार आहे..."

अनिकेत "हममम...."

दोघं पण गाडीत बसून कॉलेजला यायला निघाले....
.
.
.
.
इथे त्रिशा हातातल्या जॉईनिंग लेटरकडे रागात पाहत होती... तिला ते त्याच क्षणी फेकून द्यायची इच्छा झाली होती.....

त्याच कारण म्हणजे तिला intern म्हणून अनिकेतच्या हॉस्पिटल मध्ये जॉईनींगच लेटर मिळालं होत....

तिच्या जवळ तिचे सर येत म्हणाले...
"
आता पर्यंत कॉलेज ची टॉपर तू होतीस..या पुढे एक चांगली मोठी डॉक्टर बनशील...पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा तुला.."

त्रिशा त्यांना हसत म्हणाली "थँक्यू सर."

सर म्हणाले "माहित आहे..तुला शुभेच्छांची गरज नाही....तू आहेसच हुशार पण तरी म्हटलं देऊन टाकू..."

तस त्रिशा हलकेच हसली...

इथे मृणालचा मूड ऑफ झाला होता..तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जॉईनिग लेटर मिळालं होत...

अनिकेतच्या नाही.....

म्हणून तिचं मन खट्टू झाले होते...तिने अनिकेत ला फोन लावला....

.
.
.
त्रिशा जात होती तर तिच्या जवळ पटकन पायल धावत आली....

पायल "त्रिशू अग किती शोधायचं...बर ते सोड कोणत्या हॉस्पिटल मध्ये नाव आल तुझे..."

त्रिशाने तिच्याकडे लेटर दिलं....

पायल खूश होत हसत म्हणाली "ए...हे तर भारीच बघ...मला पण याच हॉस्पिटल मध्ये मिळालं बघ..आता आपण दोघी सोबत ....मग तर मज्जाच...."

त्रिशाला पण जरा बर वाटल की जोडीला कोणीतरी आहे.... पायल तिची जवळची मैत्रीण होती...

आता अनिकेतच्या हॉस्पिटल मध्ये काय होईल काय माहित??...दोघी पण त्यांचे जॉईनिंग लेटर घेऊन हॉस्पिटल मध्ये जायला निघाल्या....




क्रमशः