संतज्ञानेश्वर
“ज्ञानदेवे रचिला पाया “ या शब्दात ज्ञानदेवाचा जो गौरव होतो.तो ईसर्वअर्थानी खरा.आहे.आत्मविकाच्या वाटा खुंटलेल्या होत्या.पिढ्यान पिढ्या बहुसंख्य समाज अज्ञानाच्या
अंधकारात खितपत पडलेला होता.
अश्या परिस्थिती वेदांताचे सार असलेल्या गीतेवर भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ लिहून जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला.मानवी जीवनाशी अतूट नाते जोडणारे भक्ती साररखे सर्वगामी आणि सर्वस्पर्शी साधन त्यांच्या हाती देऊन तेराव्या शतकातील महाराष्ट्रात अठरा पगड जातींना अध्यात्मिक क्षेत्रात एकत्र आणण्याचे,त्यांच्यात एकात्म भाव निर्माण करण्याचे थोर
कार्य त्यांनी केले.ज्ञानदेवांनी अध्यात्मिक क्षेत्राततम्हराष्ट्रातील सर्व समाजाला भक्ती सारख्या एकात्म भावात गुंफन्याचे थोर कार्य
केलेच.अध्यात्म बिद्ये सारखे गहन शास्त्र मराठीत सहजच पणे निरुपाय येतेच.अमृतायेही पैजा जिंकेल अशी रसाळ शभ संपदा मिळवून मराठीत से
त असा काव्य ग्रंथाही निर्माण होऊ हे सिद्ध केले. पुंडलिक पासून चालत आलेल्या विठ्ठल भक्तीच्या परंपतेला त्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाच्या रूपाने तात्त्विक आधिष्ठाण प्राप्त करून दिले आणि शुद्ध भक्ती भाव शुद्ध नैतिक आचरण यांच्या बळावर माणूस जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करू शकतो याची ग्वाही त्यांनी दिली.
नांमहिमा
ज्ञानेश्वरांनी
सर्वात सुलभ आशा भक्ती मार्गाचा गौरव केलेला आहेत त्यात नामस्मरणाला सर्व श्रेष्ट स्थान आहे.भक्ती मार्गाचा तो गाभाच गौरविलेला आहे.नामसंकीर्तमाचे महात्म्य वर्णन करतांना ते म्हणायात कीर्तनाचेनी नाटनाचें ।नाशिले व्य वसाय
प्रायश्चित्ताचे । जे नामचि नाही पापाचे । ऐसे केले ।। ऐसिए माझेनी नआंघोशे । नाही
करिती विश्वाची दुःखें। अवघे जगची महासुखें । दुमदुमित भरले ।।तो मी वैंकुठी न
दिसे । एक वेळ भानू-बिंबिही न दिसे
। वरी घोगीयांची ही माणसे । उमरडोनी नाम।। तयापाशी पांडवा । मी हारापला गीवसावा।
येथ नामघोशु बरवा । करितो ते माझे ।।
नामाचे महत्व
सांगताना ते म्हणतात की,पाप योनीत जे
जन्मले आहेत,असे मूर्ख दगड
सुद्धा नामस्मरणाने तरुन जातात.नाम साधनेने,ऊँकाररूप परब्रम्हांसी एकरूप होता येते.नाम हे देवाचे द्वार असून
त्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने चारी मुक्ती साध्य होतात.’संजीवन नाम हे समाधीसाधन’
आहे.म्हणूनच
ज्ञानदेव म्हणतात ‘हरि मुखे म्हणा ।हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। या नामापरते तत्व अन्यथा नाही.नाम स्मरणासत नाम आणि स्मरण असे दोन भाग्य येतात.नाम स्मरणामुळे मनावरील इतर संस्कार दृढ होतात.आत्म जागृती होते आणि आत्मा -परमात्मा मिलनाचे सुख अनुभवता येते अशा रीतीने ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत अभंग गाथेत नाममहिमा समाजातील सर्व थरातील लोकांना केव्हाही,कोठेही कामाधाम करीत असतानाही आचरता येण्यासारखे एक अत्यंत प्रभावी साधन सांगितले आहे.द्न्यान.त्यांनी भक्तीयोगाचे व कर्मयोगाचे निरूपण केले आहे.परन्तु हे विसरता येत नाही की या दोन्ही मार्गांचा त्यांनी गीतेच्या आधारे ज्ञान योगाचे भक्कम तात्त्विक आधिष्ठाण प्राप्त करून दिले.
ज्ञानदेव ‘सर्व खल्विदं ब्रम्ह’या उपनिषद प्रणित अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते होते.जीव जगात आणि जगदीश्वर यांच्या मधील आभासिक आणि अज्ञानजन्य भेद ब्रह्मविद्येने
नाहीसा करून एकमिवाद्वितीय चिन्मय परब्रम्हाचे ज्ञान हाच अद्वैतसिद्धांत सर्वाना सुलभ करून सांगण्यासाठी त्यांनी गीतेवर भाष्य लिहिले.विश्व हे अज्ञानी लोकांना परब्रम्हापेक्षा भिन्न,जड आणि विविध वाटू लागले,तेव्हा या अद्वैत तत्वज्ञानाचा लोप होऊ नये म्हणून’विश्व ब्रह्मची केले’ म्हणजे हे चिन्मय ब्रह्मच आहे’ असे अद्वैत प्रस्थापित केली.
सर्व भौतिक विश्व अविद्येने जो पर्यंत
झाकलेले आहे,तो पर्यंत ते परातम्यापेक्षा वेगळे आहेअसें मानतो परंतु अविद्येचा पडदा दूर झाला म्हणजे परातम्यापेक्षा भौतिक विश्व हा दुसरा पदार्थ भिन्न आहे हे अज्ञान नष्ट होते.
व्यतिरेक पद्धतीने मायावादाचे निरूपण करतांस ज्ञानदेव म्हणतात’जे समस्त इये भुते । जन्मा आधी अमृते।माग पातली ब्याक्त ते। जन्मले या।।
येर मध्ये जे प्रतिभासे । ते निद्रिता स्वप्न जैसे।
तैसा आकारू हा माया वसे । स्वस्वरूपी। तैसे सकल हे भुते। जण पा मायाकरित । जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल।
या प्रमाणे पिंड ब्रह्मांडात सर्वत्र एकाच अविनाशी चैतन्य आहे.