Rutu Badalat jaati - 20 in Marathi Love Stories by शुभा. books and stories PDF | ऋतू बदलत जाती... - भाग..20

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

ऋतू बदलत जाती... - भाग..20



ऋतू बदलत जाती....२०

"माल तर गेला आता आपला जीव कसा वाचवायचा ते सांग... "स्टॉक किपर.

" तुला आपल्या जीवाची पडलीए...तो माल त्याच्या जागेवर नाही पोहोचला तर... तो भाऊ पुरं खानदान संपवेल.. ईकडे फाशी टाळू शकतो...तिकडे नाही..... काहीही करून तो माल मिळवावा लागेल..."मानमोडे.

********

आता पुढे....

महेशी शी बोलून क्रिश सावीच्या रूम मध्ये गेला. सावी बेडवर झोपली होती. क्रिश ने सावीच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या माथ्यावर ओठ टेकवले .त्याचे डोळे भरून आले होते, डोळ्यात खुप सारे प्रेम साठवून तो फक्त तिला बघत होता.

" क्रिश काय झालं ...?"मागून महेशी त्याच्या हालचाली टिपत होती.

"महु ..बघ ना... किती गोड दिसते ही झोपल्यावर .!! .."क्रिश.

"महू...!! शंभू ..sss"महेशीचे डोळे भरून आले.

"अनिकेत वर गेलीए पुर्ण...."क्रिश.

"डोळे सोडून...!डोळे अगदी तुझ्या सारखे आहेत बघ.."महेशी

क्रिश ने तिच्या कडे वळून बघितले.

"शंभू..!!"महेशी पुटपुटली,क्रिश ने त्यावर मान डोलावली .

"महू...थॅक्यु...तुझ्या मुळे मला अनिकेतचं प्रेम भेटलं...सावी भेटली...."क्रिश ने महेशीचा हात हातात घेतला.

"माझ्या मुळे नाही... तुझेत ते..तुला भेटणारचं होते..."महेशी.

"अहं...तु उधार दिले होते ते..पण मी आता परत करतेय हं...निट सांभाळशील..."हसू आणि आसूंचा समिश्र मेळ क्रिशच्या चेहऱ्यावर होता.

"असं नको बोलू शंभू...."महेशीने क्रिश ला मिठी मारली आणि ढसाढसा रडायला लागली,बराच वेळ ती तशीच त्याला पकडून रडत होती .

"महू सोड मला...त्या अदीतीने पाहीले तर
भलताच काही विचार करेल..." क्रिश थोडा मस्करीत बोलला.

महेशीही सावरली तिने तिचे अश्रू पुसले.

"शंभू.. पण.. हे.. कसं झालं ..??तू क्रिश च्या अंगात कसं काय गेली??".महेशी.

" नाही माहिती हे कसं शक्य झालं ...कदाचित जसा वेळ जात असेल तसे एका आत्म्याला इतर शक्त्या भेटत असतील..."क्रिश.

" आणि क्रिश तो कुठे आहे...??"महेशी.

" तो पण ह्या शरीरात आहे पण झोपलेल्या अवस्थेत...जेव्हा मी
जाईल तेव्हा तो झोपेतून जागी होईल कदाचित..."क्रिश.

महेशी आता सरळ शांभवीला ऐकू शकत होती. दोघीजणी बराच वेळ गप्पा मारत होत्या. गप्पा मारता मारता शांभवीने महशिला ते सर्व सांगितले. मेल्यावर सुद्धा त्या ड्रायव्हरने तिच्या शरीराची कशी वाताहात केली होती ते ...महेशीला एकूण खूप दुःख झाले ,तिला त्या ड्रायव्हरचा खूप राग येत होता .आत्ताच्या आत्ता जाऊन त्याचा गळा आवळावा ,असेच महेशीला वाटत होते... तेवढ्यात सावीही उठली क्रिशने लगेच तिला उचलले आणि छातीशी कवटाळले. तो पटापट सावीचा चेहरा वरती पप्पी घेत होता, अखेर सावी त्याच्यामुळे वैतागून रडायला लागली,
तेव्हा कुठे क्रिश थांबला.

"तू खेळ तिच्यासोबत तोपर्यंत मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते..."महेशी.

"महू मला तुझ्या हातचे कांदा भजी खायची आहेत.. करशील का माझ्यासाठी ...??"क्रिशने हळूच महेशीला विचारलं .

"हो शंभू ..मी करेल तुझ्यासाठी ..आलेच दहा मिनिटात करून... "एवढं बोलून महेशी आजीच्या रुम मध्ये गेली, तिने क्रिशच्या अंगात शांभवी आहे असं आजीलाही सांगितलं ,आता आजी शांभवीशी समोरासमोर गप्पा मारू शकणार होत्या त्या लगबगीने सावीच्या रूममध्ये आल्या.

त्यांच्यामागून अदितीही सावीचा रूम मध्ये आली. सुरुवातीला क्रिश आणि आजीच्या गप्पा ऐकून आधी तिला थोडं विचित्र वाटत होतं... पण नंतर हळूहळू तिला कळत गेलं.. क्रिशच्या अंगात शांभवी आहे ते.. तिला किंचितशी भीतीही वाटली. पण नंतर हळूहळू तिही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाली .तेवढ्यात महेशीने कांदाभजी आणि सावीसाठी लापशी करून आणली होती. क्रिश कांदाभजी वर तुटून पडला .आजी कौतुकाने क्रिश कडे बघत होत्या.

"शांभवी !! मला वाटतं बेटा आता तू अनिकेतशीही बोलायला हवं त्यालाही सत्य कळाला हवं... "आजी.

"हो आजी मी बोलणार आहे त्यांच्याशी ....त्या गुन्हेगारांचे नावही कळली आहेत ...आणि अनिकेत... महेशीचे आता ठीकठाक सुरू आहे ..... कदाचित आता ती वेळ जवळ आली आहे..." तिचा कंठ दाटून आला होता ,बाकीच्यांचेही हुंदके बाहेर पडायचे बाकी होते ,पण फक्त सावीचा हुंदका बाहेर पडला. ती रडत होती तिला कळलं होतं की काय?? ... की तिची आई जाणार आहे... का तिला भूक लागली होती..?? तिचं तिलाच माहिती...

क्रिश ने सावीला जवळ घेतलं आणि महेशी कडून लापशीची वाटी घेऊन तो स्वतः तिला भरूवू लागला.

तो दिवस सरला, रात्र व्हायला लागली ,आता शांभवीला वाटलं की आपण क्रिशला मोकळं करू पण तिला बाहेर निघता येत नव्हतं.
ती बाहेर निघायचा प्रयत्न करत होती तर क्रिशच दोन पावलं पुढे चालत होता...
बराच वेळा करून पण तिला त्याच्या शरीराच्या बाहेर निघता येत नव्हतं..

रात्रीचे दहा वाजले होते ,अनिकेत अजूनही घरी आला नव्हता ,आजींनी त्याला फोन केला पण काम आहे.. उशीर होईल... असं सांगून ठेवून दिला. क्रिशने म्हणजे शांभवी ने सावीला झोपवण्याचा प्रयत्न केला पण सावीला महेशी ची सवय झाली होती, त्यामुळे ती क्रिश जवळ झोपत नव्हती, रडत होती. अखेर महेशीनेच झोपायला घेतलं... सावी सोबत महेशीचाही डोळा लागून गेला .
अकरा वाजले होते तरी अनिकेत घरी आला नव्हता. क्रिश च्या शरीरात अडकलेली महेशी हॉलमध्ये सोफ्यावर बसून अनिकेतची वाट बघत होती.

***********

"रात्रीचे बारा वाजलेत मिस्टर विशाल ....आता तरी सांगाल का काय मॅटर आहे ??.."अनिकेत पोलिस स्टेशनमध्ये बसून त्याला विचारत होता.

"सर तुमच्या वाईफच्या ॲक्सीडेंट मागे या दोघांचा हात होता...."विशाल.

"पण तिचा ॲक्सिडेंट करून त्यांना काय भेटणार होते....??"अनिकेत.

"ते तर ..ते दोघं भेटल्यावरच नक्की काय ते कळेल ...पण माझा असा कयास आहे... की कदाचित तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी त्यांचा हा प्लान असेल...."विशाल.

"माझं लक्ष डायव्हर्ट करून त्यांना काय भेटेल?? त्यापेक्षा माझाच एक्सीडेंट केला असता तर...." अनिकेतचा गळा भरून आला.

"मि. अनिकेत सावरा स्वतःला... कदाचित त्यांचा मॅडम सोबतही काही प्रॉब्लेम असू शकतो... मी आता तसं काही सांगू शकत नाही ......"विशाल.

"तो ड्रायव्हर ...त्याला माहिती असेल ना मग रीजन..."अनिकेत.

" नाही त्याला माहिती नाही .. असं तो म्हणतो... त्याची बायको हेमा तुमच्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती..... तीही आम्हाला भेटला नाही अजून ...कदाचित मानमोड ने तिला गायब केलेलं असेल..."विशाल.
अनिकेत तसाच शांत बसून होता..अजूनही काही बातमी आली नव्हती...रात्रीचा एक वाजत आलेला.

"सर तुम्ही घरी जाऊन आराम करा.. उद्या या..."विशाल.

कसा आराम करू मि. विशाल ...तुम्हाला कळत नसेल माझी मनस्थिती काय आहे ते... माझ्या बायकोचा एक्सीडेंट ज्यांनी केला ते लोक फरार आहेत... माझ्या गोडाउन मध्ये ड्रग्ज सापडलेत ....हाऊ कुड आय...??"अनिकेत.

"सर..प्लिज..."विशाल.

"ओके.."तो रागात उठला.
"मि.विशाल मला अपडेट्स देत रहाल...."अनिकेत बाहेर निघत बोलला.

"मि.अनिकेत....अजून एक.. तुमच्या गोडाऊन मधल्या ड्रगजसाठी तुम्हाला चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. ... ते ड्रग्ज तुमच्या मालकीच्या गोडाऊन मध्ये भेटले....सो...."विशाल पाठीमागून त्याला आवाज देत बोलला.

अनिकेतने थोडे रागात त्याच्याकडे बघितले.

"सर आय नो यु आर इनोसंट ...पण फॉर्मॅलिटी करावीच लागेल ..."तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता याल इकडे...

"मी त्याआधी ईथे असेल मिस्टर विशाल ..जोपर्यंत ते लोक सापडत नाहीत तोपर्यंत माझ्या जिवाला चैन पडणार नाही...."अनिकेत.

अनिकेत घरी आला हॉलमध्ये बसून क्रिश टीव्हीवर मराठी सिरीयल बघत होता. सिरीयल मधला इमोशनल सीन पाहून त्याचे डोळे भरून आले होते, अनिकेतने त्याच्याकडे बघितले आणि नकारार्थी मान डोलावली आणि तो वर जायला निघाला.

"किती उशीर अनिकेत... केव्हाची वाट बघतेय मी... आय मीन बघतोय मी..." क्रिशने स्वतःची जीभ थोडी चावली आणि वाक्य सुधारलं.

"तुम्ही फ्रेश होऊन या मी जेवण गरम करून ठेव..ते..तो.. "अनिकेतला क्रिश आज थोडा विचित्रच वाटला.

"नाही नको.. मला भूक नाही .." तो वर गेला येताना अनिकेतच्या हातात एक पिशवी होती , त्यातून बॉटल चा किनकिनण्याचा आवाज येत होता.शांभवीला थोडी शंका आली. क्रिशही मग त्याच्यापाठी वर गेला.

रूम मध्ये गेल्या गेल्या अनिकेतने ब्लेझर काढून बेडवर फेकले , आणलेला बॉटल्स काढून तिथल्या टिपॉयवर ठेवल्या, तो न थांबता ग्लासवर ग्लास रिचवत होता.

" अनिकेत ..मी पण तुम्हाला कंपनी देऊ शकतो का??"क्रिश.

"ये नक्कीच ...पण जास्त नाही भेटणार ...ह्या सर्व बॉटल फक्त माझ्यासाठी आहेत.. आजच मला त्या संपवायच्याय ...उद्या ती महेशी नाहीतर फेकून देईल त्या ....महेशी नाही.. राधा ...राधा फेकून देईल.. "अनिकेतने एक बॉटल फस्त केली होती, नी आता त्याला थोडी चढायला लागलेली.

क्रिश त्याच्याजवळ जाऊन बसला एक हाताने त्याच्या गालावरून हात फिरवला.

"नका ना घेऊ येवढे ....! कशाला स्वतःला त्रास करून घेता.... तुमची राधा आहे ना तुमच्याजवळ आता..."क्रिश.

"हो माझी राधा आहे... पण ती रागावली माझ्यावर ..मी...मी तिला मिठी मारली ..... ती चुकीचं समजतेय मला..".
अनिकेत अचानक रडायला लागला.

" काय झालं अनिकेत रडता का आहेत तुम्ही ...???"क्रिश.

"माझी शांभवी .. माझ्या मुळेच गेली.... त्या दोघांनी तिला मारलं ....माझ्याशि वैर होतं तर ...मला मारायला पाहिजे होतं ना.... शांभवीला का मारलं??"अनिकेत नशेच्या धुंदीत बोलत होता.

"तुम्ही शांभवी वर खूप प्रेम करत होते का अनिकेत??"क्रिश भाऊक झाला.

" हो माझ खूप प्रेम होतं शाम्भवी वर ..."अनिकेत.

"आणि मग राधा...??"क्रिश.

"राधा..!!... राधा नावाने माझे पूर्ण आयुष्य व्यापलयं.. तिच्या फक्त शब्दांनीच माझ्या आयुष्यातील आई बाबांची कमी भरून काढली
... मला कोणत्याच मित्राची ..मैत्रिणीची गरज भासू दिली नाही तिने ....नाही कुठल्या भावंडांची..... सर्व होती ती माझी.. प्रिय सखी.... ती दिसत नव्हती तरीही मी खूप प्रभावित झालो होतो ....जर ती माझ्यासमोर असेल तर... ?? ..तिला प्रेयसी... बायको.. बनवायची खूप इच्छा होती ....माझं पहिलं प्रेम होती ती..... पण तिला नको होतं हे दुसरं नातं... तिला फक्त सखी बनून रहायचं होतं माझ्या आयुष्यात..... मी हट्ट नाही केला... मला तिला दुखवायचं नव्हतं .. तिची इच्छा नाही ... मनाच्या एका कोपऱ्यात हे गुपित अगदी जपून ठेवलंय..... "अनिकेत जराही न अडखळता बोलत होता,कदाचित झोपेतही तो बोलू शकला असता एवढी ती त्याच्यात भिनली होती.

"आणि शांभवी...तिच्याही प्रेमात पडला तुम्ही..??"क्रिश.

"हम्म... एका दिवशी आश्रमात शांभवी भेटली. स्वभाव आणि दिसायला ही गोड होती, लगेच भरली मनात ती... मला अपेक्षित असलेला प्रेयसीचे आणि पत्नीचे प्रेम शांभवी ने भरभरून दिलं मला ...मी राधेला मनाच्या एका कप्प्यात ठेवून शांभवीवर भरभरून प्रेम करत होतो ...खूप सुखाचा होता संसार आमचा.... पण ती गेली आम्हाला सोडून ...मला आणि माझ्या सावीला सोडून गेली .... "-त्याने परत एक ग्लास रिकामा केला.

क्रिशचेही डोळे भरून आले...अनिकेतने तिच्यावरही प्रेम केले होते.महेशीवरचं प्रेम जरी वरचढ होतं तरी शांभवीवरही त्याचं तेवढचं प्रेम होतं.

"पण राधा ..ती आली ना आता परत मग तूम्ही आता करा तिच्याशी लग्न.. ती तुम्हाला आणि तुमच्या सावीला सांभाळून घेईल...."शांभवी आता अनिकेतच्या मनात डोकावून बघत होती.त्याच्या मनाचा कल बघत होती.

"काय!! राधा शी लग्न करू... तिच्या इच्छेविरुद्ध! आणि माझा शांभवीशी प्रतारणा करू..... नाही..!!! शांभवी ..मी ..नाही मी तुझ्याशी प्रतारणा करणार नाही .."तो.. स्वतःला समजवत होता....

"आणि शांभवीच म्हटली तुला की राधा शी लग्न कर तर मग तू करशील...???"खरंतर शांभवी अनिकेतच्या वाक्यावर आतून सुखावली होती,पण तिला स्वार्थी बनून चालणार नव्हते.

"शांभवीची इच्छा... मी राधा शी लग्न.. मी राधा शी लग्न..." आता त्याला खूप चढली होती, झोप त्याच्या डोळ्यात आली होती.. तसा सोफ्यावर तो आडवा झाला .शांभवीने एक उसासा सोडला. तिने त्याच्या केसातून हात फिरवला , त्याचे पाय सरळ करून क्रिश च्या रूम मध्ये निघून आली. तिने परत क्रिशच्या शरीराबाहेर निघण्याचा प्रयत्न केला. तिने आधी डोकं बाहेर काढले ...आणि ह्यावेळेला तिला ते जमलंही ती क्रिशच्या शरीराबाहेर निघालेली होती....

ऋतू बदलत जाती...
काही देती...
काही घेवूनही जाती...
व्यवहार निरंतर हे.....
असेच चालती......
ऋतू बदलत जाती.....

क्रमक्षः....

भेटूया पुढच्या भागात....


हॅलो,दिप्ती कदम, साॅरी मला तुझे मॅसेज वाचता आले नाही, अजूनही माझा सिल्वर प्लॅन आहे,तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता,अथवा इमेल करून शकता।

धन्यवाद!

©®शुभा.