ऋतू बदलत जाती....१९..
"मॅडम ..मॅडम.. मी सांगतो मला काही करू नका त्यांनी माझ्या फँमिलीला कोंडून ठेवलय कुठेतरी ..."ड्रायव्हर.
"तू त्यांची नाव सांग.. आम्ही त्यांना सेफली सोडवू.. माणूसकी तू जरी विसरला असला तरी आम्ही विसरणार नाही..."क्रिश.
त्याने विशालला त्या माणसांची नावे सांगितली.
********
आता पुढे...
सकाळपासून महेशी अनिकेतला टाळत होती.
नाश्ताही तिने मावशींच्या हाती त्याला दिला..
ती जिथे जात होती, तो बोलण्यासाठी तिच्या मागे तिथे येत होता .पण ती त्याला एकटी भेटत नव्हतीआणि घरात बरीच माणसं असल्यामुळे त्याला नीट तिच्याशी बोलता येत नव्हते.
नाश्ता झाल्यावर तो ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याला महेशी सावीच्या रूममध्ये सावीला तयार करताना दिसली.
"अरे वा माझी बबडी छान छान ड्रेस घालते... हा यलो ड्रेस ...खूप छान छान दिसतो माझ्या बडबडीला ...अनिकेत बोलत सावीशी होता पण त्याची नजर महेशीकडे होती ,तसं तिलाही हे जाणवत होत.
"तुला माहितीये सावी ..!! तुझा बाबां ना थोडासा बुद्धू आहे... गल सोबत कसे बोलतात ...त्याला नाही माहित..." अजूनही तो तिरकस नजरेने महेशी इकडे बघत होता.
महेशीने बेडवरचा पसरला आवरला आणि तो कपाटात ठेवत होती.
"महेशी आय एम सॉरी ...काल मी जे वागलो .......आय मीन तसे नव्हते करायला पाहिजे होते...पण त्याचं एक्सप्लेनेशन मी देऊ शकतो ..प्लीज ऐकून घेशील ."तो सावीकडे बघत बोलत होता.पण महेशी होती कुठे त्याच ऐकायला... ती तर केव्हाच तिथून निघून गेली होती.
त्याने मागे वळून बघितले आणि एक निश्वास टाकला.
" चॅटवर मारे समजदारी च्या गोष्टी करतेस... राग तर मात्र हिच्या नाकावर सदानकदा बसलेला असतो.. बघू रात्री वेळ भेटला तर. रात्री बोलेल..." त्याने सावीला उचलून आजीकडे दिले.
******
"आदिती अशी का बसली आहेस काय झाले.??".
"काही नाही ...मम्मी चा फोन होता म्हणे हौस फिटली असेल तर ये परत.....
मुलगा बघितला आहे त्यांनी माझ्यासाठी.... कुठला तरी..."अदीती.
" अग मग काय हरकत आहे.. लग्न तर कधी तरी करावाच लागेल ना..."महेशी.
"त्यांनी शोधला आहे म्हणजे तो मुलगाही तसाच असेल..... तो हि मला माझ्या मनासारखं काम करून देणार नाही ....मला सोन्याच्या पिंजऱ्यात नाही राहायचं ..."अदीती.
"पण मला सांग तू तुझ्या घरच्यांपासून असं किती दिवस पळशील.... तो क्रिशही तसाच आणि तुही..."महेशी.
"......."अदीती.
" बराच वेळा .......आपण आपल्या सोबत जे वाईट होतं त्यासाठी दुसऱ्यांना दोष देत बसतो... पण खरतर बर्याचदा आपल्यासोबत चुकीचं होण्यासाठी आपणच जबाबदार असतो .. .... तुझ्या बाबतीत सांगायचे झाले तर....मी असं म्हणेल..आपण समोरच्याचं मन वळवण्यासाठी पूर्ण प्रयत्नच करत नाही ..... आणि मी महान मी मन मारून जगते मी किती त्याग केला... वगैरे वगैरे बोलून स्वतःची समजून काढतो..नाहीतर तुझ्यासारखे सर्व सोडून येतो..... पण जरा विचार केला.... थोडासं डोकं लावलं तर आपण बऱ्यापैकी चांगला मार्ग काढू शकतो अदीती... "महेशी.
"बरं मग आता माझ्या प्रश्नाचे तुझ्याकडे काय सोलुशन आहे..."अदीती.
"असा मुलगा शोधायचा.. जो तुझ्या स्वप्नांच्या.. कामाच्या ..आड येणार नाही आणि तुझ्या मम्मी पप्पानाही आवडेल..."महेशी.
"तुला वाटत नाही हे खूप कॉम्प्लिकेटेड टास्क आहे म्हणून..."अदीती.
"नाही बिलकुल नाही ...ईव्हन माझ्या नजरेत असा एक मुलगा ही आहे.."महेशी.
"कोण आहे तो मुलगा..??"अदीतीने भुवया गोळा केल्या.
"क्रिश....!! हो क्रिश आहे तो मुलगा ... घरचा श्रीमंत आहे तुझ्या आई वडिलांच्या स्टेटस चा आहे.... आणि तुझ्यासाठी तुझ्या मतांचा आदर करणारा ....तुला तुझ्या आवडीचं काम करू देणारा असाही आहे....."महेशी.
"क्रिश ....!!काहीतरी महेशी, त्याला कशाला मी आवडेल "मनात तर लाडू फुटत होते पण सांगेल कसे.
"आवडेल नाही ...!! आवडते ..!!त्याच्या नजरेत बघितला आहे मी .."महेशी.
"पण मग त्याच्या घरचे ...त्याचाही तर त्याच्या घरच्यांशी प्रॉब्लेम आहे..."अदीती.
"वेडा आहे तो... सर्वांनी त्याला आवडतो तसंच वागायला पाहिजे.. असा अट्टाहास आहे त्याचा... त्याची जॉइन फॅमिली आहे.. त्याचं असं म्हणणं आहे की तो सर्वांना जीव लावतो ...सर्वांची काळजी करतो..... पण बाकीचे त्याच्याशी तसच वागत नाहीत ....ते सर्व वाईट आहेत... असं त्याला वाटतं.. पण मला सांग घरातले बाकीचे लोकं त्याला जीव लावत नाही.... त्याची काळजी घेत नाही ....म्हणजे ते वाईट आहे असं कशावरून .......प्रत्येकाच्या प्रायॉरिटी वेगळ्या असतात.... प्रत्येकाचं मन सर्वांसाठीच संवेदनशील कसं असू शकतं??... आणि समोरचा आपल्यासाठी संवेदनशील नाही ...म्हणून तो वाईट असतो का..?? तो तुम्हाला जीव लावत नसेल.... पण तो इतर कुणातरी जीव लावतच असेल ना.... त्यांच्यासाठी तो संवेदनशील असेलच ना... त्यांच्यासाठी तो वाईट थोडीच असणार..."महेशी.
"म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का.. की कुणीच वाईट नसतं...??"अदीती.
"नाही ..!! मला असं म्हणायचं आहे की सर्वजण वाईटही असतात आणि चांगलेही..... आपल्याशी समोरच्याने कसं वागावं हे त्याचं त्यालाच ठरवू द्यावं ....."
आपण कशाला त्यांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घ्यायचा.... आपण आपल्या बाबतीत बघावं ... तुम्हाला सर्वांशी छान छान वागायला आवडते ..तुम्ही वागा... पण इतरांनी पण तुमच्याशी छान छानच वागायला पाहिजे हा अट्टाहास करू नका ...तुम्हालाच त्रास होतो.."महेशी.
"आता कळलं ...अनिकेत तुला त्याची मेंटाॅर का म्हणतो ते.. " मागून क्रीश आत येत बोलला त्याने ह्या दोघींचा बोलणं ऐकलेलं होतं...
*******
"साहेब ड्रायव्हर ने तुमचे नाव उघडले आहेत..."हवालदार.
"काय..!! "एक जन
"विशाल सर तुम्हाला अटक करायला तिकडे येत आहे ..शक्य झालं तर लवकरात लवकर अंडरग्राउंड होऊन जा... सुवर्णा ला पण अटक केली आहे... ... "एका हवालदाराने एक फोन केला.
"आता काय करशील.."दुसरा जन.
"साल्या ने तोंड उघडलं त्याच्या बायकोलाच ठोकतो आता..."एक जन.
"ओ मानमोडे...आधी जे केले तेच निस्तारत नाहीये.... अजून कशाला वाढवतोय...."दुसरा जन.
"ती हेमा तर बोलली होती तिचा नवरा... तोंड उघडणार नाही..."मानमोडे.
"ते सोड आता आपण काय करायचं ते सांग..."दुसर्याला जरा घाम आला होता.
" सर्वात आधी माणसाला सांगून गोडाऊन खाली करावे लागेल तो अनिकेत आता रोज.. येतोय फॅक्टरीत.. "मानमोडे...
"आधी आधी ईथून निघू मग बोलू..."दुसरा जन.
त्या दोघांनी गाडी काढली आणि ते गोडाऊन कडे निघाले..
*******
विशाल पोलिसांची गाडी घेऊन अनिकेतचा ऑफिसच्या खाली आलेला होता.
"मिस्टर विशाल तुम्ही ईकडे...??"अनिकेत.
"हो मिस्टर अनिकेत ड्रायव्हरने तोंड उघडलय.."विशाल पटकन आत घुसत ईकडेतिकडे बघत बोलला.
" काय म्हणाला तो...???" अनिकेतने अधिरतेने विचारले.
"मिस्टर अनिकेत !! आता आपण नंतर बोलु.. सध्या फक्त मी एवढेच सांगू शकतो ..... तुमच्या फॅक्टरीचा स्टोअर किपर आणि तुमच्या ऑफिसमधला एक माणूस यात ईन्हाँल्व आहे... "विशाल.
"काय..!!"
"का रे भेटला का तो मानमोडे.." विशालने समोरून येणाऱ्या हवालदाराला विचारले.
" नाही सर...मला वाटतं त्यांच्यापर्यंत ही न्युज गेलेली असेल.. तो स्टॉक किपर पण गायब आहे..."हवालदार.
"जाऊन जाऊन जातील कुठे ....??चला रे..."विशाल.
"मिस्टर विशाल मला सांगाल का काय म्हणाला तो ड्रायव्हर... ??"अनिकेत तिथं असलेल्या चार पाच हवालदारांची लगबग बघून विशाल ला बोलला.
"मिस्टर अनिकेत मी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये सांगेल.. आता आम्हाला त्या लोकांना पकडणे जास्त महत्त्वाचे आहे.." विशाल घाईघाईत बाहेर निघताना बोलला,अनिकेतही त्याच्या मागे बाहेर पडत होता.
" मी पण येतो तुमच्या सोबत.. मला रस्त्यात सांगा..."अनिकेत.
"मिस्टर अनिकेत तुम्ही घरी जा ...आम्ही आमचं काम झालं की तुम्हाला कळवू ...प्लीज कोऑपरेट..." विशाल गाडी सुरू करत त्याच्या समोरून निघून गेला.
विशालने दोन-तीन फोन फिरवले आणि नाकेबंदी करायला सांगितली. सर्वांच्या मोबाईल वर त्या दोघांचे फोटो पाठवले.
*********
"मानमोडे उगाच मी तुमच्या फंदात अडकलो... जागोजागी नाकेबंदी केली आहे...." आता या जंगलात किती दिवस राहायचं..त्या आधीच्या हवादारकडून त्यांना ही बातमी कळली होती .
"बस फक्त रात्री फॅक्टरीतून माल बाहेर पडू दे... एकदा का तो बंदरावर पोहोचला की मग आपण बाहेर पडू.."मानमोडे.
*****
अनिकेत फार टेन्शनमध्ये होता. तो तसाच फॅक्टरीत गेला, त्याला काही कळत नव्हते . नेमके काय कळले पोलिसांना ते...विशालने फॅक्टरीमध्ये दोन पोलिस पहारेकरी ठेवले होते ,सर्व फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होती.अनिकेत जाऊन त्याच्या केबिन मध्ये बसला.
"सर आत येऊ का...??" फॅक्टरी तला एक कामगार अनिकेतच्या केबिन मध्ये डोकावला .
"..हम.." अनिकेत.
" सर मला बरेच दिवसापासून मला एक गोष्ट सांगायची होती..."कामगार.
"कोणती..??"अनिकेत.
" सर आपल्या गोडाऊन च्या माला मध्ये दुसरा पण माल आहे ..."कामगार.
"दुसरा कसला माल .??. काय बोलतोय तू ??स्पष्ट बोल ...कसला दुसरा माल..??"अनिकेत.
"सर माझं नाव मध्ये नका येऊ द्या... तो स्टॉक किपर आणि मानमोडे काहीतरी करत होते ...मी एका दिवशी रात्री बघितले होते काहीतरी गडबड आहे सर...."कामगार.
"तुला माहीत नाही का..?? नेमकी काय गडबड आहे ते ..."अनिकेत.
"नाही सर ..या मोठ्या लोकांच्या फंदात आमच्यासारखी गरीब माणसं पडून जीव देतात.. आज पोलिस आले होते म्हणून म्हटलं तुमच्याजवळ सांगू... म्हणजे तुमच्यावर नाही येणार काही...."कामगार.
"ठीक आहे ..तु जा ..तुझं नाव कुठेच येणार नाही मी बघतो काय ते..."अनिकेत.
तो माणूस हात जोडून निघून गेला. अनिकेतने लगेच विशाल ला कॉल केला.
" विशाल माझ्या फॅक्टरीच्या गोडाऊन मध्ये काहीतरी गडबड नक्की आहे ..तुझ्या माणसांना जरा चेक करायला पाठव...??"अनिकेत काळजीत होता,ह्याच्याने त्याच्या व्यवसायावर नक्कीच परीणाम होईल ते तर होतचं... पण शांभवीशी काय संबंध ...??
*****
"साहेब गोडाऊन वर छापा पडला आहे ...तुमचा माल पकडला गेला आहे..."हवालदार.
मानमोडेने हातातला फोन जमिनीवर जोरात आपटला.' साल्या त्या ड्रायव्हरच्या.. त्या हेमा ला तर मी जिवंतच नाही सोडणार..."
"काय झाल आता.."स्टॉक किपर.
"आपला दहा करोडचा माल पकडला गेलाय... तो अनिकेत आता फॅक्टरीत यायला लागला म्हणून मी आज रात्री तो हलवणार होतो... पण पोलिसांनी आज छापा मारून तो माल जप्त केलाए..."मानमोडे.
"तो ड्रायव्हर बोलला का??.."स्टॉक किपर.
"त्याला कुठे माहिती होतं हे...आजचा दिवसच खराब...."मानमोडे.
"माल तर गेला आता आपला जीव कसा वाचवायचा ते सांग... "स्टॉक किपर.
" तुला आपल्या जीवाची पडलीए...तो माल त्याच्या जागेवर नाही पोहोचला तर... तो भाऊ पुरं खानदान संपवेल.. ईकडे फाशी टाळू शकतो...तिकडे नाही..... काहीही करून तो माल मिळवावा लागेल..."मानमोडे.
ऋतू बदलत जाती....
भरती राणी...
समुद्रात दडलेलं..
किणारी आणती...
ऋतू बदलत जाती...
क्रमक्षः..
*********
भेटूया पुढच्या भागात...
©®शुभा.