Kaay Nate Aaple? - 2 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | काय नाते आपले? - 2

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

काय नाते आपले? - 2

सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते....... सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न की मिताली इथे कुठून आली..... इथे तर तनुजा हवी होती...... मिताली सुन्न होऊन फक्त उभी होती...... चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते...... डोळे सारखे वाहतच होते...... मितालीचे बाबा तिच्या कडे आले..... ती मान खाली घालूनच उभी होती......



" मिताली, तू इथे कशी काय.....?? नवरीच्या वेषात तू काय करतेस इथे....?? " थोडासा रागीट आणि पाणवलेला त्यांचा आवाज ऐकून तिला अजूनच भरून आलं...... काहिच कळतं नव्हत..... ती शांतच उभी होती...... नजर खाली खिळलेली......


तनुजा थोडी समोर येते...... बाहेरच काहीतरी गोंधळ ऐकू येत होता म्हणून मितलीची आई पण लग्न मंडपात येते...... मितालीला नवरीच्या जागी बघून त्यांना आश्चर्य होत..... तनुजा लगेच त्यांना मिठी मारून रडत असते..... त्या तिला शांत करत असतात...... तिला काय झालं म्हणून विचारत असतात पण तनुजा एकसारखी रडतच असते...... मग त्या मितलीला विचारतात......


" हा सर्व काय प्रकार आहे......???? काय झालंय इथे.....?? " त्या अगदी रागात बोलतात...... पण मिताली सारखी रडत असते...... ती काहीच बोलतं नाही...... आई तिला हाताने हलवून विचारते, तरीही ती रडतच असते...... तोंडातून फक्त हुंदके बाहेर पडत होते...... ती काहीच बोलतं नाहीये बघून तिच्या आईला अजून राग आला...... आणि त्यांनी तिच्यावर हात उगारला...... मिताली दचकून मागे सरकली...... पण तनुजा ने तिच्या आईचा हात हवेतच झेलला.....


" आईsssss काय करतेस तू....... तिची काहीच चूक नाही ह्यात...... माझ्या म्हणण्यावर ती इथे बसली...... " तनुजा ने रडतच आईचा हात सोडला...... सगळे जण परत आश्चर्याने तनुजा कडे बघत होते...... अभिजित पण अगदी शॉक लागल्यासारखा तिच्या कडे बघत होता.......


" काय???? काय म्हणालीस तू......?? तुला लाज नाही का वाटत अस काही करायला....... तुझी लहान बहीण आहे ना ती...... आणि ती तिला असं करायला सांगितल....... तुला मुलगा पसंत होता ना...... तू स्वतः लग्नाला होकार दिलास ना......?? मग अस ऐनवेळी सर्व तिच्यावर का ढकललं तू......??" तिची आई तिला रागात विचारत असते...... बाबा लगेच समोर येऊन सुवर्णला बोलतात......


" तू थांब जरा..... घाबरलेली दिसत आहे ती...... तिला बोलुदे...... थांब तू...... " बाबा सुवर्णाला तनुजा पासून दूर करतात.....


" बाबा...... बाबा मला गिरीश......भेट....... भेटला होता..... " रडतच सांगितल तिने आणि परत सर्वांना मोठा धक्का बसला...... आता हा गिरीश कोण असा सर्व तिथल्या लोकांना प्रश्न पडला...... फक्त तनुजाचे घरचे सोडुन....... कारण गिरीष कोण आहे हे त्यांना माहीत होत.......


तनुजाच पाहिले लग्न ठरल होत..... गिरीष सोबत! त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम सुध्दा होत...... लग्ना आधीच त्यांचं नात बरच पुढे गेलेलं होत..... पण ऐन लग्नाच्या वेळी गिरीष लग्न करायचं नाही असं सांगतो...... नकार देतो......



काही तास अगोदर.........



मिताली तनुजा च आवरत असते...... थोड्याच वेळात तिला बाहेर बोलणार होते म्हणून रूम मध्ये ह्या दोघी असतात...... तेवढ्यात तनुजाचा फोन वाजतो...... त्या वरचा नंबर बघून ती घाबरते...... आणि फोन उचलत नाही...... पण सतत कॉल येतच असतो...... मिताली तिला उचल म्हणते तशी ती कॉल स्पीकर वर ठेवते.......


" ओळखल ना स्वीटहार्ट मला...... नक्कीचं ओळखल असणार...... लग्न करत आहात तनुजा मॅडम तुम्ही...... आणि आम्हाला सांगितलं पण नाही...... " पलीकडून कोणितरी असुरी हसत बोलत होत...... तो होता गिरीष..... तनुजा थरथरत होती...... तोंडातून शब्दच फुटत नव्हते तिच्या......


" बर चल सोड ते...... काहिच तासात तुझ लग्न आहे ना...... मग आज मला भेटायला ये नाहीतर मी सगळं काही तुझ्या सासरच्यांना सांगेन........ "


" ये ssss हे बघ...... ती कुठंही येणार नाही समजल...... आणि आता तुझ आणि तीच काहीच नात नाही समजल ना....... ठेव फोन...... " मितालीला खुप राग आला...... त्यांच्या लग्नाच्या वेळी असा सोडून गेला होता...... आणि आता परत काहीतरी बिनबुडाच बोलत होता......


" अरे अरे...... तू मिताली आहेस का...... तू मध्ये न पडलेलीच बर काय....... आणि तनुजा तू जर आली नाही ना...... तर व्हिडिओ आहे माझ्या जवळ...... तूझ्या होणाऱ्या नवऱ्या पर्यंत पोहाचवायला वेळ नाही लागणार मला काय...... पत्ता मॅसेज करतो अर्ध्या तासात हजर रहा......" त्याने असं बोलतच फोन ठेऊन दिला.......


तनुजाला भीती वाटायला लागते...... गिरीष काहीही करू शकतो माहीत होत तिला...... आपण जर भेटायला गेलो नाही तर तो नक्कीच व्हिडिओ दाखवेल...... ठाऊक होत तिला...... तिने पटकन कपडे चेंज केले...... आणि मितलीला तू मझ्या जागी बस...... मी वेळेवर येईन तो वर तू सांभाळून घे....... असं सांगितल....... ती नाही म्हणत होती...... पण तिने ऐकल नाही तोंडाला ओढणी लपेटून ती मागच्या बाजूने बाहेर पडली......



आता.....


तनुजा सर्व सांगून शांत बसली...... सगळे जण आता कुजबुज करतं होते...... घरातील मंडळी खूप टेन्शन मध्ये होती....... अभिजित तर बस सुन्न उभा होता...... तेवढ्यात त्याची आजी पुढे आली आणि बोलू लागली......


" तूम्ही फसवणूक केली आमची...... आम्हाला खोटं बोलून तुम्ही आमचा विश्वास घात केला...... तुमच्या मुलीचं पाहिले लग्न ठरून मोडल होत सागितलं नाही तुम्ही....... " आजी बरच काही बोलत होत्या...... मितलीचे बाबा खाली मान घालून बसलेले होते...... काय बोलणार होते ते...... तनुजा ने एकदा त्यांना विश्वासात घेऊन जर अस सांगितल असत तर आज मितालीच लग्न नसत झालं...... आणि ह्यातून काही ना काही मार्ग नक्की निघाला असता.......



" आई, आता बोलून काहीच फायदा होणार नाही...... लग्न तर झालं...... आपण काहीच करू शकत नाही आता........ " रुचिका मध्यस्ती करत बोलते.......



" नाही...... नाही....... मला हे लग्न नाही मान्य...... जरी झालं असेल तरी मी नाही स्वीकारत ह्या लग्नाला....... " तिला तिचे स्वप्न डोळ्या पुढे दिसत होते...... लग्नाच्या बंधनात अडकले तर आपली स्वप्न धुळीत मिसळतील...... पण आता तर लग्न झालंच होत...... तीच कोणी काही ऐकणार नव्हत आता....... शेवटी तिला मान्य करावं लागलं...... आई बाबांच्या इज्जतीचा प्रश्न होता शेवटी! तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली असं दिसतं होत तिला........ बराच वेळ वाद चालू होता...... कन्यादान झालं आणि तिला वाटी लावलं...... अभिजित आणि मिताली करायच म्हणून सगळ काही करतं होते......


ते घरी आली..... पण आजी तिला घरात घ्यायला अजिबात तयार नव्हती....... हि मुलगी माझ्या घरात राहणार नाही अस सांगितल त्यांनी...... मी हिला कधीच माझी नातसून म्हणून स्वीकारणार नाही अस स्पष्ट शब्दात सांगितल....... पण सचिन आणि रूचिकाने खुप समजल तेव्हा तयार झाल्या आणि त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या...... मितालीला खूप वाईट वाटत होत...... तिची काही एक चूक नसताना तिला एवढी मोठी शिक्षा मिळत होती...... तिच्याशी कोणीच नीट बोलत नव्हत...... रुचिकाने तिला एक रूम दिली आणि बदलायला कपडे दिले...... तिला खूप एकट एकट वाटत होत...... काही बाही विचार येत होते मनात...... उद्या पूजा होती...... रडण्यात आणि विचार करण्यातच सकाळ कधी झाली तिला समजल सुद्धा नाही......



सकाळी उठून फ्रेश झाली...... रुचिका तिला साडी नेसण्यात मदत करत होती..... पण बोलत मात्र काहीच नव्हती...... त्यांना ही काहीच करण्याची इच्छा नव्हती..... पण करावं तर लागणार होतच...... आजी पूजेला येत नव्हत्या...... तिला रडायला येत होत सारखच...... इथे कोणी नीट बोलत नव्हत...... सर्व असून सुद्धा नसल्यासारखं वाटत होत तिला...... तिच्या घरचे कोणीच नव्हत आलं पूजेला...... कशीतरी पूजा पार पडते....... जेवणं वैगेरे करून परत ती रूम मध्ये येते आणि रडत असते....रडता रडता तशीच झोपून जाते....... रात्री तिला अभिजितच्या रूम मध्ये पाठवतात...... तिला खूप भीती वाटत असते..... ती रूम मध्ये पाऊल टाकणाराच की अभिजित तिच्या समोर येऊन उभा राहतो......



" मी तुला माझी बायको मानत नाही...... भलेही लग्न झालं असेल तरीसुध्दा...... त्यामुळे तुला माझ्या रूम मध्ये येणाच्या काहीच अधिकार नाही...... तू कुठेही झोप कुठेही रहा...... I don't care......! " म्हणत तो धाडकन तिच्या तोंडावर दरवाजा आपटतो...... ती दचकून मागे सरकते.......



क्रमशः.....