Pahile Na Mi Tula - 4 in Marathi Love Stories by Omkar Ashok Zanje books and stories PDF | पाहिले न मी तुला - 4

Featured Books
Categories
Share

पाहिले न मी तुला - 4

१० चोरी चोरी चुपके चुपके
बरेच दिवसानंतर आज सगळ्यांना मोकळा वेळ मिळाला.
"चल यार पियुष लय बोर झालंय" साहिल म्हणाला
"हो रे पियुष स्पर्धेच्या नादातून कितीतरी दिवसातना आज मोकळा वेळ मिळालाय"
"कुठे यायचं बोल"
"कॅफेत जाऊ रिप अन् डीप"
"ओके चल मग"
दोघेही चालत चालत रिप अन् डीप कॅफेच्या दिशेने निघाले ..
दोघे आत गेले.
आणि समोर बघतात तर काय.. समोरचे दृश्य थक्क करणारे होते.
त्यांच्यासमोर कविता आणि कबीर दोघेजण कॉफी पीत बसले होते. पियुष आणि साहिलला बघताच त्यांचा थरकाप उडाला आणि दोघेही उभे राहिले. कवितांच्या चेहऱ्यावरची रिअॅक्शन तर पाहण्यासारखी होती.
आपल्या बॉयफ्रेंडसोबत कुणी मित्रांनी पकडल्यावर काय रिअक्शन असते हे ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहिती..
त्यात महत्त्वाचं म्हणजे कॅफेत लागणाऱ्या गाण्यांमध्ये नेमकं हे गाणं लागल ते पियुष आणि साहिल च्या एंट्रीलाच .
"तुने मारी एंट्री दिलमें बजी घंटी यार
टन टन टन टन.."
इकडे टन टन आणि कविताच्या हृदयात धड धड धड..!!
आणि जेमतेम दोन तीन मिनिटात सर्वजण एकमेकांकडे बघत उभे होते .
अशाप्रकारे कविताचे भांडे आपल्या मित्रांसमोर फुटले.

कविताने घरी आल्यानंतर मोबाईलचा मेसेज बॉक्स उघडला.
"आज त्या पियुषनी आनी साहिल्यानं आपणाक पकडल्यान. उद्यापासून दुसरीकडं भेटूक व्हया." कविता
" उद्या कुठे भेटायचे मग" कबीर
" करमरकर मिसळ "
"का बरं "
"अरे तुमच्या पुण्यात जशी पुणेरी मिसळ फेमस आहे ना तशी महाडात करमरकरांची मिसळ खूप फेमस आहे तुफान गर्दी असते तिथे आपण तिकडे भेटायचं का"
" ए मंद उलट फेमस ठिकाण म्हटल्यावर तिथे सगळ्यांची ये-जा असणार तिथं तर आपण पहिले पकडले जाऊ"

"बरं मग दुसरीकडे खय तरी भेटू'
"उद्या दादली पुलावर भेटू"
"डन"
"बाय जी एन"


११ पहिली भेट
सगळं ठरलं.. 'अमर पेये' मध्ये भेटायचं असं दोघांनीही ईटीच्या पुस्तकातून ठरवलं. ही त्यांची पहिली भेट असणार होती. पियुष आणि प्रिया दोघांनी एकमेकांचे चेहरे पाहिले नव्हते. आज ते कळणार होते. पियुष आज खास तयार होऊन आला होता. निळे चेक्सचे शर्ट आणि जीन्स आणि बॉडी स्प्रे मारून पियुष तयार होता.
"साहिल घरी जाताना मला शिवाजी चौकात सोड"
"का रे काही काम"
" हो अरे एक काम आहे "
"चल मी पण येतो "
"अरे जाईन मी" पियुष अडखळत
"बस काय एवढीच दोस्ती"
"ओके मग चल" पियुष म्हणाला
दोघेही रवाना झाले. दोघांनी एन्ट्री केली तोच त्यांना कविता समोर दिसली. ती मैत्रिणीसोबत लस्सी पीत होती. तिने हात केला. या इकडे या सगळ्यांना बघून पियुष आणखी उदास झाला. सगळ् पाण्यात गेलं त्याची नजर आजूबाजूला त्या मुलीला शोधत होती.
मी एक मिनिटात आलो. पियुष बाजूला आला आणि तिला शोधू लागला. दूरवर एका कोपऱ्यात त्याला एक तरुणी पाठमोरी दिसली . ती एकटीच बसली होती. पियुष सगळ्यांची नजर चुकवून तिकडे जाऊ लागला.
प्रिया.. कुणीतरी जोरात हाक मारली. त्या तरूणीने शेवटी मागे वळून पाहिले. तिचा गहूवर्ण, गालावरची खळी, मोकळे सोडलेले केस, चेहऱ्यावर अजिबातच नसलेला मेकप, तरीही खुलून दिसणारा चेहरा, जांभळ्या कलरचा लांब कुर्ता आणि वाईट कॉम्बिनेशन सलवार आणि ते छोटेसे डोळे आणि प्रिया नाव ऐकताच क्षणार्धात तिचा चेहरा बदलला.
"ओह गॉड अनु इथं कशी काय आली " जीभ बाहेर काढत प्रिया मनातल्या मनात म्हणाली.
मागून अनु आली तसा पियुष मागे फिरला.
हि ती नाही वाटतं ही मुलगी तिच्या अनुसोबत आली वाटतं.
पियुष पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये आला. पण तो विचारांत हरवलेला अजून सुद्धा त्याची नजर बाहेरच तिला शोधत होती.
इकडे अनु आणि प्रियाचं खूप मोठा संभाषण झालं. शेवटी प्रियान कसलं तरी तिला कंविन्स केलं आणि तिचा डाऊट दूर केला. दोघींनीही आवडती मँगो मस्तानी ऑर्डर केली. वरची चेरी खात-खात प्रिया विचारात मग्न झाली तो आला की नाही..
अशा प्रकारे पहिल्या भेटीचा सपशेल फिस्कटला. कारण दोघांनाही हे सगळं नवीन होतं. त्यामुळे एकमेकांना पाहण्याचा हा चान्स गेला.

प्रिया कॉलेजवरून घरी आली.
"कसा गेला आजचा दिवस" आजीने विचारले
" मस्त गेला "प्रिया म्हणाली " खूप दमले आजी कॉफी बनवून आण ग आपल्यासाठी"
"हो आता बनवते थोड्याच वेळात "
आजीने 2 कॉफीचे मग आणले. आणि दोन्ही कॉफी प्यायला बसल्या. तेव्हा आजीने नेहमीप्रमाणे रेडिओ सुरू केला. संध्याकाळी आपकी फर्माईश नावाचा कार्यक्रम लागला होता. नेहमीप्रमाणेच सुपरहिट मराठी गाणी त्यावर लागायची.
प्रिया म्हणाली "काय ही जुनी गाणी आजी तुला आवडतात ग"
" प्रिया जुन्या गाण्यांना किती अर्थ होता माहिते का आता हेच गाणे बघ ना "
रेडिओवर पहिलंच हिट गाणं लागलं.
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले ।।
प्रिया ते गाणं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले. जणू ते गाणं तिच्यासाठीच वाजवले होते.


१२ ट्रेजर हंट - २
स्थळ- नाना नानी कट्टा
नाना: चला आज पोराना गरमगरम भज्या बनवू.
नानी: हं.. बरोबर बोलताव.
मेकॅनिक्सचा टॉपर असलेला अक्षय गहन विचारात होता. खूप विचारानंतर त्याचा गुंता सुटला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो उभा राहिला
"अरे मिळालं" तो मोठ्याने ओरडला त्याने आपल्या टीमला सांगितलं की "मी एकदा प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांच्या केबिनच्या एका बाजूला मोठे दालन आहे. त्यात सर्व जवळपासच्या पर्यटन स्थळांचे फोटो आहेत" सगळ्यांचे डोळे आनंदाने चमकले . बाजूच्या गटातली मुलं तर त्यांच्या बोलण्यावर टपूनच बसलेली. शेवटी त्यांनाही जिंकायचं होतं. काही कळायच्या आत समोर दोघेजण सुसाट धावताना दिसले.
एक अक्षय आणि दुसरी अनु..
बाकीचे सर्वही कॉलेजकडे जीव तोडून पळत सुटले. प्रिन्सिपलची केबिन जवळ येऊ लागली. अक्षयने बाजूला पाहिले. अनु एकदमत्याच्या बाजूलाच धावत होती. त्यांच्या डोळ्यासमोर कबड्डीची मॅच आली. मागच्या वेळी हिच्यामुळे आपली चॅम्पियनशिप गेली. आज नाही त्याने चटकन आपला पाय आडवा करत तिच्या पायात गुंतवला. तिला पाडण्यासाठी पण अनु ही चतुर होती. तिने चटकन त्याला घट्ट पकडले. यामुळे झालं असं की वेगामुळे ते एकमेकांवर आदळले..
अनु आणि तिच्या अंगावर अक्षय. दोघांना एकमेकांच्या स्वतःच्या श्वासाचा आवाज आणि हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती आणि एकमेकांच्या डोळ्यात ते गुंतले. जवळजवळ दोन मिनिट उलटली तरी हे असेच. त्यांच्या पाठोपाठ लगेच प्रिया आणि पियुष होते. पियुषने एक मोठी उडी घेतली आणि तो सरांच्या केबिनच्या दारावर धडकला. परमिशन घेऊन तो आत गेला.
तो बाहेर आला ते नाचत-नाचत.. एव्हाना अक्षय अनु सावरले होते. सगळे मेंबर्स तिथं पोचले .पियुषने विनर चिठ्ठी सगळ्यांना दाखवली. यासोबत टीम राजगडचा मोठा जल्लोष आणि नोटीस बोर्डवर गुण रायगड १ राजगड १..
आता नेने करंडक विजेता ठरण्यासाठी एकच फेरी शिल्लक होती. हे टास्क तब्बल पंधरा दिवसांनी डिस्प्ले होणार होतं. त्यामुळे पुन्हा एकदा कॉलेज सुरू झालं. म्हणजे कॉलेज सुरूच होतं आता या सर्वांचे लेक्चरला जाणं सुरू झालं ...