" मिताली sssssss ए मिताली sssss " सुवर्णा ( आई ) मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली....!!
खूप वेळ आवाज दिल्या नंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली... दरवाजा उघडाच होता.....आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था पाहून शॉकच झाल्या....कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती... कदाचित मिताली पुस्तकं शोधात होती, आई रागातच तिच्या पाठी गेली आणी तिच्या पाठीत धपाटा घातला...!!
" आहsss....आई अग तू वेडी आहेस का..??? " मिताली चिडून म्हणाली....
" हो वेडी आहे मी...... उठ आता आणी हॉल आवर जा, " आई तिला दतावट म्हणाली..
" तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ मी.... काहीतरी काम करतेय.....मला टाईम नाही आवरायला, जाताना दरवाजा बंद करून जा... " मिताली पण तितकंच चिडून म्हणाली.
एकतर तीची प्रोजेक्टची बुक मिळत नव्हती आणी आईची कटकट मागे..... " माझ्याच नशिबात असे का लोक येतात देव जाणे... उद्या पर्यंत सबमिट नाही केले तर माझे 20 मार्क फुकटमध्ये जातील....."
मिताली टेन्शन मध्ये बोलत होती.......आई पुन्हा तिला चिडून म्हणाली....." ताईला पाहायला पाहूणे येत आहेत, जा पटकन जावून हॉल आवर थोडी तरी इज्जत ठेव आपली....मोठ्या घरचे आहेत.....अभ्यास राहूदे बाजूला तुझा...." आई तिला रागात म्हणाली....
" अग बाई आवरले मी.... जा आता डोकं नको खाऊस माझं " मिताली आता खरंच जास्त चिडली होती....
आई मग तोंड वाकडं करत निघून गेली......!! मिताली पसारा तसाच ठेवत हॉल आवरायला निघून गेली... सुवर्णा जेवणाचं पाहत होती..
तर तनुजा ( मिताली ची बहीण ) आपलं आवरत होती... मिताली चे बाबा शंकर बाहेर गेले होते सामान आणायला, आणी मितालीची आजी ( राधा ) देवघरात पोथी वाचत होती......अशी मितालीची छोटीशी फॅमिली.....!!
मितालीने सगळं नीट आवरलं आणी किचन पाशी आली आणी सुवर्णा ला म्हणाली....." मी सगळं आवरलं आहे , बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या....मला आवाज द्यायचा नाही " मिताली रागात म्हणाली.....
" ओय... पोरी पाहुणे येणार आहेत....मला मदतीला रहा जोडीला आणी पहिले हे फाटके कपडे बदल आणी साधा छानसा ड्रेस घालून ये... " सुवर्णा ऑर्डर सोडत म्हणाली...
" एक मिनिट याला फाटके कपडे नाही म्हणत हॉट पॅन्ट म्हणतात.... आणी मुलगा तिला पाहायला येतोय मला नाही..... " मिताली गाल फुगवत म्हणाली....
" हा हा काय ते हाट पॅन्ट ती कसली मला नको शिकवूस कार्टे जा आवर " सुवर्णा...
" म्हणून बोलते माझ्याकडून शिका जरा.... "मिताली हसतच म्हणाली...
" मी नाही शिकली म्हणून तर तुला शिकवतेय ना.... जा आवर आता नाहीतर पुन्हा फटका खाशील.... " सुवर्णा
मिताली पळतच आत गेली... पुन्हा रूम चेक केल्यावर तिला तिची प्रोजेक्ट बुक मिळाली तिने लगेच बॅग मध्ये ठेऊन दिली....
आणी रूम आवरून तिने छानसा एक कुर्ता घातला आणी त्या खाली प्लाझो घातला...!!
मिताली च्या विरुद्ध तनुजा... दिसायला ती एकदम गोरी पान होती.....साधं राहणीमान ती एका छोट्या कंपनीत कामाला होती....!! पण मिताली रंगाने सावळी पण दिसायला तनुजाहुन सुंदर होती... मितालीला फॅशन डिजाईनिंग करायची होती.....आणी मग एका मोठ्या कंपनीत काम करायचं होत....तिला हे असलं छोट्या मोठ्या कंपनीत काम करून काय भेटेल...
मिताली वेगळ्या विचाराची होती..... तिला साधं राहण म्हणजे सो कोल्ड बेहेनजी टाईप....असं वाटायचं पण ती एकदम मॉडेल टाईप होती....जे तोंडाला येईल ते बोलायची
अर्थात तिला घरातून परमिशन होतीच.......!!
[ बास झाली माहिती....]
थोड्या वेळात पाहूणे येतात मुलगा, मुलाची आई , बाबा आणि आजी येतात...
मिताली चे बाबा त्यांचं स्वागत करतात...!! "नमस्कार जोशी साहेब... या बसा."
" कसा आहेस शंकर..... " सचिन जोशी...
" मी मस्त रे....... अरे तुझ्या फॅमिली ची ओळख तरी करून दे..... " शंकर
" हो...... ही माझी बायको रुचिका जोशी, हा माझा मुलगा अभिजित जोशी... आता एका मोठ्या कंपनी मध्ये CEO च्या पोस्ट वर आहे...... ही माझी आई रुक्मिणी जोशी.. आणी मी सचिन जोशी तुला तर माहीतच आहे.... " सचिन....
" हो हो....नमस्कार वहिनी....नमस्कार आई " शंकर आईच्या पाया पडत म्हणाले.....
थोड्याचवेळात शंकर ने त्याच्या फॅमिलीशी ओळख करून दिली... पण तनुजा आणी मिताली आत मध्ये होत्या...!! सुवर्णा ने सगळ्यांना चहा, आणी नाश्ता दिला...... सगळे गप्पा मारत होते.....
तर सचिन मितालीच्या बाबांना म्हणाला....." अरे ज्या कारण साठी आलो आहोत... ती आहे कुठे बोलावं कि तिला...... "
तस सुवर्णाने तनुजाला बोलावली.........तिला पाहून अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला...... सुंदर अशी साडी नेसून तनुजा आली होती...... खूप सुंदर दिसत होती ती........!!
तनुजा शंकर यांच्या बाजूला बसली...... त्यांनी तनुजा ची ओळख सांगितली..... अभिजीतची नजर राहून राहून तनुजा वरच पडत होती..
तोच त्यांनी मितालीला बोलावलं.. ती आपली केस सावरात बाहेर आली.....!! आणी अभिजित तिला पाहून शॉक झाला.....
हीच होती " ती... " मला आजही तो दिवस तसच्या तसा आठवतोय......पण ही इथे काय करतेय????
तनुजाने तिच्याबद्दल त्यांना सांगितलं... ती काय शिकतेय तिला काय करायचं आहे.......
पण मगाशी पडणारी तनुजा वरील त्याची नजर आता... मिताली वर स्थिरावली होती.......!!
तनुजा आणी अभिला एकांतात बोलायला वेळ दिला... मिताली ला पाहून आजीने तोंड च वाकडं केल....कारण घरात फक्त तीच सावळी होती.... बाकी सगळे एकदम गोरे, हेच खटकलं पण त्यांना तनुजा खूप आवडली......
थोड्या वेळाने पाहुणे जातात....
असेच दोन दिवस जातात व नवऱ्या मुलाकडून होकार येतो... तनुजाला पण अभिजित आवडलाच असतो.. म्हणून ती पण होकार देते... लग्न लवकर करायचा विचार असतो...त्यामुळे साखरपुडा , हळद आणी लग्न एकाच दिवशी ठरते........!! त्यामुळे घाई गडबडीत तर असतेच.....
मिताली ने स्वतः चे कपडे स्वतःच डिजाईन केले होते.. आणी एका चांगल्या टेलर कडून शिवून घेतले होते.....!!
बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो.... आज तनुजा लग्नच आणी अभिजितच लग्न होत.....सगळे गडबडीत असतात,
साखर पुडा , हळद पार पडते आता लग्नाची वेळ असते........तनुजा पुढचं आवरायला निघून जाते......
मिताली फोटो शूट करण्यात बिझी होती....!! करवली जी होती.....ती
पंडितजींनी मुलीला आणायला लावल.....
लग्नाची वेळ झाली होत आली होती.....!!
आईने मिताली ला तनुजा ला आणायला पाठवले...... पण खूप वेळ होऊन जातो तरी मिताली तनुजा ला घेऊन नसते आली......
मग शेवटी आईच दुसऱ्या मुलींना तनुजा ला घेऊन येण्यास सांगतात.....मग आई सुद्धा दुसऱ्या रूम मध्ये निघून जाते.... कारण मुलीच लग्न होताना आई ला पाहायचं नसत.......!!.तनुजा अभिजित च्या बाजूला बसते , त्याचा हलका ओझरता स्पर्श तिला होत होता.....!! पण अभिजित च्या बाजूला बसलेली..... ती तनुजा न्हवतीच ती मिताली होती....
तिचा त्या नवरीच्या वेशात जीव गुदमरत होता.......!! आता.... सात फेरे होते दोघेही उभ राहून सात फेरे घेत होते........!! मिताली ला सारखं एकच वाक्य आठवत होत..... " मी....लग्न व्हायच्या आधी नक्कीच येईल..."
.
.
.
.
.
.
.
मिताली च्या डोळ्यातून अश्रू पडत होते, डोळे रडून रडून सूजले होते..... ती नवरीच्या वेश्यात अभिजित च्या बाजूला बसली होती. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.... सगळं काही हातातून सुटत आहे , माझी स्वप्न सगळी सगळी एका क्षणात धुळीला मिळत आहेत......!! तिच्या डोळ्यात खूप तिरस्कार होता पण... त्याला तर ठाऊकच नसत कि त्याच्या बाजूला मिताली आहे ती........
माझी फसवणूक केली तिने....... खोटं बोली ती मुद्दाम तीने मला त्याच्या बाजूला बसवलं......!!
कारण लग्न गुजराथी पद्धतीने होणार होत.... अशी रुचिकाचीच इच्छा होती..... कारण ती सुद्धा एक गुजराथीच होती.....
त्यामुळे घुंगटमुळे कळून नव्हत येत कि....तनुजा नाही तर मिताली आहे...
सात फेरे ही झाले आणी विवाह संपन्न झाला...... " आज पासून तुम्ही दोघे पती पत्नी " पंडितजी म्हणाले.
असं म्हणताच तिथून आवाज आला " नाही........ " सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर तनुजा उभी होती............ नवरीच्या वेश्यात होती....थोडि घामाने बिझलेली, घाबरलेली..... बावारलेली
अभिजित ने चमकून बाजूला पाहिलं....आणी बाजूला असलेल्या मुलीच्या डोक्यावरून पदर बाजूला काढला.... तर ती मिताली होती......!!
अभिजित ला तर काहीच सुचेनास झालं.... तो तर आता रागाने लाल झाला होता.....!!
क्रमशः .....
काय आहे नातं आपलं??
मैत्रीच??
प्रेमाच???
नवरा-बायको च??? कि फक्त जबरदस्ती च्या नात्यात बांधल गेलेलं नावा पुरतीचं असलेलं एक नातं...खरंच काय आहे आपल नातं...??
तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे ना..?? अभिमित च नातं काय असेल..?? मग वाचत रहा " नातं काय आपलं "