Rutu Badalat jaati - 16 in Marathi Love Stories by शुभा. books and stories PDF | ऋतू बदलत जाती... - भाग..16

Featured Books
Categories
Share

ऋतू बदलत जाती... - भाग..16



ऋतू बदलत जाती....१६

"अच्छा.. ठीक आहे " तो बाहेर गेला पण दरवाजाच्या बाहेरच थांबला .दहा एक मिनिटे तो तिथेच घुटमळला. मग त्याने त्याचा मोबाईल उघडला.

" हाय राधा.. झोपलीस का? मला झोप नाही येत.. गप्पा मारायच्या का ..??"अनिकेतने
मेसेज टाईप केला आणि तो सावीच्या दरवाज्याजवळ उभा राहून पाठवला . बरोबर त्याच वेळी सावीच्या रूममध्ये एक मेसेज टोन वाजली. त्याचं काळीज क्षणभर थांबलं.....

आता पुढे.....

अनिकेतने त्याचा मोबाईल आधीच सायलेंट करून ठेवलेला होता.


"अनिकेतने आज मला राधा म्हणून हाक मारली..?? नाही कदाचित भास असेल माझा.... नेहमी माझं त्यांच्यासोबत राधा नावानेच संभाषण होतं ना म्हणून...... कदाचित काय ..भासच असेल... तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली.

महेशीने मोबाईल हातात घेतला आणि इकडेतिकडे बघितलं, अनिकेत जवळपास तर नाही ना.??. रुमच्या बाहेर येवून तिने हॉलमध्ये इकडे तिकडे नजर फिरवली पण अनिकेत तिला समोर आढळला नाही.

ती आत मध्ये गेली आणि रिप्लाय केला .
"हो ..चालेल"राधा.

"उद्या गणपती बसणार आहेत ना ..मग झाली का तुझी गणपतीची आरास तयार करून..??".. अनिकेत मेसेज टाईप केला.सोफ्याच्या मागून उठून परत तीच्या दरवाजाजवळ गेला आणि पाठवला.त्याने इकडे पाठवल्या बरोबर ..तिकडे महेशीच्या मोबाईलची रिंग वाजली.
त्याचं हृदय आता थोड धडधड करायला लागलं होतं..

हो झाली आरास करून..."राधा.

" राधा हे हरतालिका व्रत कशासाठी करतात.."अनिकेत.

" तुम्हालाही करायचंय का हरतालिका ?? हा हा... पण आजची संपली बरका हा हा ..."तिच्या विनोदाकडे त्याचं लक्षच नव्हतं.तो फक्त मेसेज टोन चा आवाज आणि पाठवल्याचा वेळ जुळवत होता. त्याला कळलं होतं महेशीच कदाचित राधा आहे, पण अजून खात्री करण्यासाठी तिचा मोबाईल बघावा लागेल. त्याने पुढे रिप्लाय दिला नाही .तो वर रूमकडे निघून गेला.

" नाईंटी नाईन परसेंट महेशीच राधा आहे..." त्याला झोप लागत नव्हती ,तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत पडला होता.

"शांभवी ...! माझी मेंटाॅर ..माझी राधा.. कदाचित तुझी महेशीच असेल... तुलाही माहित नव्हतं का शांभवी ?? कि महेशीच राधा आहे हे.... तु लपवले होतेस का माझ्यापासून हे...? बऱ्याच वेळा जेव्हा मी राधाचा विषय काढायचो तेव्हा तुझ्या डोळ्यात एक भीती दिसायची.... नाही नाही तिला नसेल माहिती ...जर तिला माहिती असतं ...तर महेशीला शोधण्यासाठी तिने प्रयत्नच केले नसते ... माझी शांभवी अशी नव्हती .
शांभवी मला म्हटली होती.. की तिने महेशीला सांगितलेलं... मला तु आवडतोस म्हणून.. म्हणूनच महेशीने मागे पाऊल टाकले असेल का..? काहीही अनिकेत तू काही विचार करतोस.. राधा तुला फक्त मित्र मानत होती.. म ..ती आमच्या लग्नात का नाही थांबली??... का नाही मला तिची ओळख सांगितली ?? ओळख सांगितली असती तर काही बदललं असतं का??कसं नसतं बदललं..? तिलाही माहीत होतं माझ्या मनात तिच्याविषयी काय आहे ते.. म्हणूनच नसेल ती बोलली...आणि तिच्या मनातही????.. राधा तू फक्त शांभवीची मैत्री निभावलीस माझी नाही... शांभवी साठी तु माझा त्याग केलास आणि माझ्याकडूनही बरंच काही करून घेतलं...

तू विचारलं होतंस ना राधा की शांभवीच तुझं पहिलं प्रेम आहे ना??? नाही ..नाही राधा ...'राधा माझं पहिलं प्रेम होती... आणि मला समजतय तुझही पहिलं प्रेम मीच होतो...हो तुलाही प्रेम होतं नाहीतर तु थांबली असतीस माझ्या लग्नाला... तुला नाही बघितलं जात होतं ना? ...
आश्रमात शांभवी ला भेटायला यायचो... तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्या विषयाची जी ओढ होती... आता मला समजली... का होती ती ओढ... मी तेव्हा तुला चुकीचं समजलो..."अनिकेत मनात बोलत होता.

आता रात्रीचे दोन वाजले होते. तो उठून परत खाली आला, त्याचं चित्तच लागत नव्हतं, जोपर्यंत तो खात्री करत नाही ,की महेशीच राधा आहे ते.., तो सावीच्या रूम मध्ये आला ,महेशी सावीला कवटाळून झोपली होती .शेजारीच टेबललॅम्प जवळ महेशीचा मोबाईल पडला होता.. खरं तर कोणाला न विचारता त्यांच्या मोबाईल ला हात लावणे चुकीचं आहे ,पण अनिकेत हे करणार होता. त्याला शंभर टक्के खात्री करायची होती.

" महेशी ..महेशी .."त्याने महेशी ला आवाज देऊन बघितलं ,ती गाढ झोपेत होती .त्याने हळूच तिचा मोबाईल उचलला आणि तो हॉलमध्ये आला. मोबाईल लॉक होता ,पॅटर्न लॉक होता ,मग आता खात्री कशी करायची,त्याने वेगवेगळे पॅटर्न करून बघितले, पण तो उघडत नव्हता.

"राधा झोपली का?? मला अजूनही झोप येत नाही आहे ..."त्याचं डोकं आज भलतच चालत होतं.
त्याने त्याच्या मोबाईल वरून मेसेज पाठवला. आणि खरंच दुसऱ्या क्षणाला तो मेसेज महेशीच्या मोबाईलवर धडकला त्याला पॅटर्नची गरज नाही पडली, तिचा मोबाईल अनलॉक करायची गरज नाही पडली .त्याला कळलं .. हो महेशीच राधा आहे ते..!

आनंदाचा झटका आल्यासारख झालं ,काय करू नी काय नाही ..?? हसावे का रडावे?? त्याला काहीच कळत नव्हते ..तो उठून बेचैन सारखा हॉलभर फेऱ्या मारायला लागला , सावीच्या दरवाज्या पर्यंत जात होता ,परत मागे फिरत होता.वर त्याच्या रूम कडे जात होता परत खाली येत होता ..काही कळत नव्हते त्याला.. काय करावे ते...

"मी उठवू का आता तिला ..सांगू का तिला .. मला कळले ,तूच माझी राधा.. !नाही, अनिकेत नाही, इतक्या सहजासहजी नाही ....तिने किती त्रास दिला तुला ..किती वाटायचं ...तुला तिला भेटायची किती इच्छा व्हायची ...पण ती नाही भेटली... आता आपणही तिला छळायचे ... तिच्याकडूनच काढून घेईल मी.. तिच सांगेल तिच्या तोंडाने की ती राधा आहे ते ...."
महेशीने ठरवलं होतं की अनिकेत ओळखेल तीच राधा आहे ते ...आता अनिकेत ने हि ठरवलं कि महेशीच सांगेल मीच राधा आहे ते.... बघू कोणाच्या मनासारखं होतं ते....

त्याने महेशीचा मोबाईल परत तिच्या रूम मध्ये जसाचा तसा ठेवून दिला आणि वर येऊन निवांत झोपला.

******

"हा क्रिश.. बघितली का तुम्ही जमीन ..??तुमची काही हरकत नसेल तर माझ्याकडे आहेत काही जमिनी ...मी दाखवू शकतो तुम्हाला.. सकाळी डायनिंग टेबलवर नाश्ता करत करत अनिकेतने क्रिशला सांगितले.

क्रिश काहीसा गडबडला, मग त्याला वाटले बघायला काय हरकत आहे .
"चालेल मिस्टर अनिकेत ...जेव्हा तुम्हाला वेळ असेल.. तेव्हा मला सांगा ..आपण जाऊ बघायला. "

"दुपारी लंच टाईम नंतर तुम्ही भेटा मला.."अनिकेत .

"अनिकेत ..आज ऑफिसला उशीरा जाल ..आज बाप्पाचं आगमन होतेय ... त्यांची पूजा वगैरे झाली... जेवण करून मग तूम्ही ऑफिसला जा.."आजी.

तेवढ्यात महेशी पोह्यांच्या ताटल्या घेऊन आली . घरात बाप्पाची स्थापना आहे ,म्हणून महेशी छान तयार झाली होती .अनिकेतने तिच्याकडे बघितले आज तिच्याकडे बघण्याची त्याची नजर वेगळी होती. त्याला त्याची राधा दिसत होती समोर वावरतांना..पटकन उठून तिला एक कडकडून मिठी मारावी .असं वाटत होतं .

शांभवी मात्र अनिकेत कडे बघत होती. तो महेशीला जसा बघत होता ते.. त्याच्या नजरे मधले भाव टिपत होती.पण तीला त्या गोष्टीचा त्रास झाला.

"एवढ्या लवकर अनिकेत...तुम्ही नॉर्मल झालात...महेशीकडे एवढ्या लवकर तुम्ही वळायलाही लागला....तुम्हाला आता माझी आठवण नाही येत??" वैरीमन! तीला महेशी आणि त्याचं जमावं असही वाटतं होतं पण ..स्वतःसाठी वाईटही वाटतं होतं..
"असो..जे तुझयं तुला त्याची ओढ असणारचं...मीच मध्ये आली."..शांभवी तेथून निघून गेली.

आजी आणि क्रिशच्या ही हे लक्षात आले. अनिकेत एकटक महेशीला बघतोय ते.. आजींनी गालात हसतच थोडा घसा खाकरला.

"अनिकेत नाश्ता करता ना..? आजी."

"आजी मी सावीची फाईल बघितली ..तिची एक लस डीवू आहे... लवकरच द्यावी लागेल .."महेशीने टेबलवर पडलेली फाईल आजीला दाखवली.

"हो चालेल.. आपण जाऊन येऊ ...दुपारून..." आजी काही बोलायच्या आधी अनिकेतच बोलला. आजीने तोंडात बोट घातले.

नाश्ता करून अनिकेत आणि क्रिश बाप्पाला आणायला बाहेर निघून गेले.

"महेशी मोदक वगैरे करून झाले का बाळा..?"आजी.

"हो...सकाळीच करून ठेवले मी.."महेशी.

"दे ती डिश इकडे .. आणि हो त्या माळा आणल्यात का महादूने ??त्याही सर्व इथे आणून ठेव... सर्व इथे मांडून ठेवू ... बाप्पा आले की मग गुरुजी पण येतीलच.."आजी.

आजी आणि महेशीने सर्व तयारी करून ठेवली.

"महेशी बेटा हे घे आज हे घाल .."आजी.

"आजी ही पैठणी..??"महेशी.

" हो घाल छान दिसशील तू तिच्यात.. आणि ते गजरे माळशील."आजी.

महेशी सावीच्या रूम मध्ये जाऊन तयार झाली.

"आजी महेशी कुठे आहे..??"अदीती.

"अरे आदिती बेटा तू आलीस..."आजी .

" हा महेशीला बरं नाही आहे ना ..??"अदीती.
तेवढ्यात सावीच्या रूमचा दरवाजा उघडून महेशी बाहेर आली.

अदीती महेशीकडे आश्चर्याने बघायला लागली.

"असं काय बघतेस...??"महेशी.

"तू आजारी होतीस ना मग ..??"अदीती.

"कोणी सांगितले तुला मी आजारी होती अस..??"महेशी.

" अगं काल रात्री क्रिश चा फोन होता त्याने सांगितल..""अदीती.

महेशी आणि आजी हसायला लागल्या.
" म्हणून ..म्हणून त्याने तुझ्या मोबाईलवर फोन करायला नाही सांगितलं मला ...नालायक कुठेय तो..??अदीती.
.
"बाप्पाला आणायला गेलेत ..येतीलच ऐवढ्यात"आजी.
" आला कि बघतेस त्याला "अदीती.

"जाऊदे सोड ..तुझ्याशिवाय करमत नसेल त्याला" महेशीने अदीतीला बघून डोळा मारला.

"ए कुठल्या कुठे नको जाऊ... असं काही नाही आहे...."अदीती.

"बर सोड जा तयार होवून ये.."महेशी.

गुरुजी आणि बाप्पांचे आगमन सोबत झाले .मोठ्या जल्लोषात बाप्पांना घरात आणण्यात आले.
साज्रसंगीत अनिकेतच्या हातून बाप्पाची पुजा झाली,बाप्पाच्या आगमणाने घरात प्रसन्न वातावरण होते.

बरेच पंचपक्वान्नांचा नैवेद्य बाप्पाला चढविण्यात आला.महेशीने खास उकडीचे मोदक बनवले होते. पूजा करताना सुद्धा आज अनिकेत चे लक्ष सारखे सारखे महेशी कडे जात होते .पैठणी मध्ये ती भलतीच सुंदर दिसत होती.
पूजा झाल्यावर आजीने सर्वांना जेवायला वाढायला सांगितले.
पुरण पोळी, आमटी ,भात बाप्पांसाठी आज स्वादिष्ट बेत होता.
"गणपती बाप्पा मोरया.".म्हणत सर्वांनी मोदकांवर ताव मारला.

***

"महेशी..येतेस ना...??"अनिकेत.

"एवढी घाई कसली करतोस...तिला चेंज तर करू दे..."आजी.

"नाही...ते.. डॉक्टर निघून जातील.."त्याने सावीला कडेवर घेतले .

""अदीती तु पण चल...."महेशी.

"अगं तिला कशाला....तिला काम असेल ना राहू दे तिला.."अदीती पाय पुढे टाकतचं होती कि अनिकेत महेशीचा हात पकडून तिला बाहेर घेवून आला.

ऋतू बदलत जाती..
जुने सोबती रस्त्यात...
अचानक भेटून जाती...
आणि रनरनत्या उन्हात..
जणू झाड बणून सावली देती..
ऋतू बदलत जाती.....

क्रमक्षः..

****
भेटूया पुढच्या भागात...

©शुभा.