Ankilesh - 37 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 37

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 37

३७

@ डाॅ.अरूणा गावस्कर

त्या दिवशी अखिलेश डिपार्टमेंटमध्ये भेटायला आलेला. बिचारा परेशान झालेला. अंकिताचा पत्ता नाही. इकडे अंकिता घरात कोंडून घेतल्यासारखी बसलेली. माझा अंदाज खरा होता, तिला अखिलेशवर जबरदस्ती करण्यापेक्षा त्याच्यापासून दूर जायचे होते. तिचा हा कोडाचा आजार म्हणजे अगदी नको तेव्हा टपकलेला. कसा किती पसरेल ठाऊक नसताना..

"ममा, व्हाय मी? आय ॲम नाॅट फेअर. लहानपणापासून ह्या स्कीन कलरशी ॲडजस्ट केलं. आय लर्न्ट टू गेट ओव्हर इट. आता कुठे आय ॲक्सेप्टेड इट तर हे? डायरेक्ट डिपिगमेंटेशन? हाऊ वियर्ड विल आय लुक? माझ्याच मागे का लागलेय हे सगळं?"

तिच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याकडे काय उत्तर होतं? स्वत: मी काही फारशी गोरी नाही. पण अंकिता इतकी सावळी ही नाही. आपल्याकडे गोरेपणाला सुंदरता, नि सुंदरता हाच मुलींचा मुख्य गुण मानले जात असेल तर बिचाऱ्या अंकिताचा तरी काय दोष?

"मम्मी, आय विल लिव्ह अखिलेश.. आय वाँट हिम टू बी हॅपी.. इमॅजिन डेली लुकिंग ॲट द वियर्ड फेस.."

यावर मी तिची काय समजूत काढणार होते? मलाच स्वत:ला अखिलेशची खात्री नव्हती. कदाचित तो सोडणार नसेल अंकिताला, पण त्याच्या घरचे? चांगला डाॅक्टर, हँडसम मुलगा, त्याला कुठलीही चांगली मुलगी मिळेलच की. पुढे एकदा अखिलेश म्हणालेला,"मॅडम, आपल्याला पटणारे विचार असतात ते आपण किती फाॅलो करतो हे फक्त अशा वेळीच कळतं. म्हणजे व्हेन यू आर सब्जेक्टेड टू द टेस्ट. म्हणजे अंकिताचं कोड पाहून बाकी कोणी काही म्हणोत, जर माझ्या आईबाबांनी नाकारले असते तर आय वुड हॅव बीन हायली डिसअपाॅइंटेड. माझे बाबा माळकरी. आईनेच मला सारे चांगले वाईट शिकवलेले. त्यात त्यांनी अशावेळी माघार घेतली असती तर? अर्थात मी नसतं सोडलं अंकिताला.. कारण ती माझी अजून एक परीक्षा असती.."

अखिलेश इज अ थिंकर. त्याचे स्वत:चे विचार आहेत. आणि ते प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न तो करत असतो हे पुढेही कित्येकदा पाहिलेले मी. अंकिता तर त्याच्यावर कित्येकदा चिडते. म्हणजे तिच्या म्हणण्याप्रमाणे अखिलेश डझ एव्हरीथिंग ॲज अ ड्यूटी! आणि त्याला पटेल नि त्याच्या विचारात जे बसेल तसंच. त्यात काय चुकीचंय कोणास ठाऊक? पण मला वाटतं आम्हा बायकांना नवऱ्याच्या चुका काढून त्यांना परफेक्ट बनवण्यात जास्त इंटरेस्ट असावा! मला ही नाही सुरेंद्रच्या कित्येक गोष्टी खुपत असतात! उदाहरणच द्यायचं तर लग्नाआधी अंकिताला आवडणारा अखिलेशचा विनोदी स्वभाव हल्ली 'बिहेव्ह युवर एज' वर येऊन ठेपलाय!

काही असो, अखिलेशने काय जादू केली कोणास ठाऊक पण दोन दिवसांतच अंकिता परत नाॅर्मलवर आलेली. आज ही ती त्या कोडाशी झगडतेय. त्यावर इलाज नाही हे ठाऊक आहेच. पण थोडाफार मानसिक झगडा तर होतच असणार ना? पण काही वर्षांत ती सावरलीय. पहिल्यासारखीच उत्साहात असते नि त्याच उत्साहात फोटोबिटो पण काढत असते. त्या फोटोंत दिसणाऱ्या विचित्र चेहऱ्याशी तिने जुळवून घेतलंय. मला म्हणालेली ती,"अखिलेश म्हणालाय, मी आनंदात असेन तरच इतरांना आनंदात ठेवू शकेन. आणि जी न बदलण्या सारखी परिस्थिती आहे ती स्वीकारणे ही पहिली स्टेप टू हॅपीनेस आहे! आणि ही सेज, अल्टिमेट एम आॅफ लाइफ इज टू बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी. एकदा तो अल्टिमेट गोल समजलो ना आपण तर आपोआप सगळ्या सिच्युएशन मधून आनंदाने पुढे जाता येतं.."

खरंच आहे ते. पण त्या पंचविशीच्या वयात इतके शहाणपण.. मॅच्युरिटी. उगाच नाही अखिलेश वाॅज अँड इव्हन नाऊ इज फेव्हरीट आॅफ सुरेंद्र. फक्त तोंडावर इतरांना तो अखिलेशबद्दल काही ही सांगत असो! अँड ही हॅज हिज ओन वियर्ड एक्सप्लनेशन फाॅर इट.

अखिलेश मॅनेज्ड द सिच्युएशन वेल. अंकिताचं लग्न झालं. केईएममधल्या क्वार्टर्समध्ये दोघं रहायला गेले. दोघांचे जाॅब्स.. आता एकुलती एक अखिलेशसारखी गोरीपान मुलगी, आमची नात जाह्नवी.. अगदी श्रीमंती नसली तरी ओढाताण होईल अशीही आर्थिक परिस्थिती नाही.. एकूण सारं काही मार्गी लागलेलं.. सुरेंद्र इज रिलिव्हड आणि हॅपी.. कारण त्याचा हॅपीनेस इज फुल्ली लिंक्ड टू अंकिता'स हॅपीनेस. सगळं काही सुरळीत सुरू.. वुई आर हॅपी सीइंग देअर हॅपीनेस..

एकच विचार येतो, विचार आयुष्यात किती महत्वाचा आहे. विचारी असणं, योग्य गोष्टी समजणं नि त्यांना योग्य ते महत्व देत आपलं आयुष्य एका स्वत: आखलेल्या रस्त्यावर मार्ग क्रमण करत राहणं.. शेवटी काय आनंद आणि समाधान मिळवण्यासाठीच तर सारी जीवनभराची धडपड असते. आम्हाला तो आनंद भरभरून मिळतोय.. माझ्यासारख्या रिटायर्ड बाईला अजून काय हवं, नाही का?

*****

@ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर

यस. इट्स हॅपन्ड द वे आचार्य गुरूजी टोल्ड मी. ते मला एक चांगली गोष्ट होणार म्हणून त्या साळवीशी अंकिताच्या लग्नाबद्दल बोललेले.. चांगली की वाईट कोणास ठाऊक! पण ते होणारच. अखिलेशशी बोललेलो मी. दोनवेळा. घरी एकदा नि क्लिनिकवर, एकट्याने. द बाॅय सीम्स ग्राउंडेड विथ हेड फर्मली आॅन द शोल्डर्स. द फॅमिली सीम्स टू बी गुड. हे फक्त पैशांचं जमलं असतं तर! कुणी म्हणेल अंकितासाठी म्हणून मी त्यांना मदत करू शकलो असतो. तसं माझ्याकडे कमी काय आहे? पण आय हॅव गाॅन थ्रू धिज डेज. मला त्याची लेव्हल बघायची होती. म्हणजे काय आहे, की डाॅक्टर म्हणून पेशंटशी बोलताना आय कॅन सी थ्रू देअर टाॅकिंग. गुरूजींनी कसं मला पकडलेलं नि म्हणालेले, आयॅम हायडिंग समथिंग, तसंच हे. तर त्या अखिलेशशी बोलताना मला जाणवलेले, द बाॅय इज जेन्युईन. आणि त्याला मी पैशांची केलेली मदत पटायची नाही. इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू. म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाला गरज पडली तर मदत करणे वेगळे नि गरीबाला मदत करणे वेगळे. दुसरा गरजू असतो.. त्यात स्वाभिमानी असेल तर तो नक्कीच हर्ट होणार. हा साळवी बाॅय वाटतो तरी तसा आहे. माझ्या त्या स्ट्रगलमधून मी शिकलो ते एक, कुणाच्या अशा सेन्सिटिव्ह पाॅइंटला उगाच टच करू नये. मी त्याला प्रॅक्टिससाठी मदत करू शकतो. अगदी शब्द टाकला तर मोठ्या हाॅस्पिटलात अगदी पास झाल्या झाल्या कामाला लावू शकतो.. बट द बाॅय इज टू सेन्सिबल. त्याला ही काॅर्पोरेट हाॅस्पिटल्स नको आहेत. त्या मोठमोठ्या फाइव्हस्टार बिझिनेस माॅडेलवरील हाॅस्पिटलापेक्षा तो केईएममध्येच राहिल म्हणतोय.. पैशांपुढे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये नो काॅम्प्रोमाइझ. ते माझं ही पॅशन नि मिशन आहे. तर मी त्याला काय समजवणार?

आणि ते आधीचे दिवस! नुसते आठवूनही अंगावर काटा येतो. ते कोडाचे डाग उठले, हातावरून पसरायला लागले. अरूणा तर म्हणाली, हिचं लग्न आता विसरून जा. अखिलेश मात्र ठाम होता. ही हेल्ड हिज ग्राउंड फर्मली. अर्थात माझी अंकिताही आहेच गुणाची. पण लग्नात असे गुण कोण बघत बसतो? त्यामुळे अगदी त्याच्या घरी थोडीफार खळबळ उडालीच असणार, तो कितीही नाही म्हणत असला तरी, पण त्यावर मात करत पुढे गेला. म्हणजे तशी त्याची आई मोठ्या मनाची, पण लग्न होईतोवर ते कोड पार वाढलेलं. चेहऱ्यावर चित्रविचित्र डाग घेऊन ती कुठे मिरवणार होती? त्या डागांमुळेच नाही, तर अखिलेशच्या आग्रहाखातर रजिस्टर लग्न पार पडलेले.. असं पण मोठमोठे सोहळे करून पार पाडलेली लग्नं यशस्वी होतातच असं कुठंय? लोकं काय चार दिवस बोलतील.. गप्प होतील. कोडाच्या डागवाली मुलगी म्हणून हिणवतील. पण शेवटी आयुष्यात प्रेम महत्वाचे, त्यावरच संसार चालतात..

अखिलेश चांगलाच आहे. हुशार आहे. अगदी पहिल्यांदा पाहिले तेव्हाच आवडलेला मला. अशी मुलं देव बनवतो की नाही हल्ली कोणास ठाऊक!

पण उगाच कोणाची नजर नको म्हणून मी कोणासमोरच त्याची स्तुती करत नाही. थोडं विचित्र वाटेल कोणाला, पण माझ्या काळजाचा तुकडा कोणाला द्यायचा तर एवढी काळजी नि एवढी अंधश्रद्धा मान्य व्हायलाच हवी. लग्न ठरवायला साळवींच्या घरी जाणं झाले. मि.साळवी एकदम साधा माणूस. स्वभावाने चांगला. नि अखिलेशची आई.. लहानपणी वाचलेल्या शामच्या आईची आठवण यावी अशी. तशा आया आई म्हणून इथून तिथून सारख्याच असतात. तशीच ती असणार यात नवल नाही. पण सुनेला खरोखरीच पोटच्या पोरीसारखी माया लावणारी आई तशी ग्रेटच म्हणायला हवी. काही असो, माय डाॅटर इज हॅपी. नि माझ्यासाठी तेच महत्वाचे..

आज दोघांचा संसार सुखी असल्याचे पाहून भरून येते.. फक्त कोणाच्या तोंडावर बोलून दाखवत नाही मी.. आणि अखिलेशची स्तुती तर चुकूनही करत नाही.. यात अजून एक माझ्या स्वभावाची गंमत आहे.. अगदी तरूणपणी शिकलेली एक गोष्ट. आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल कोणी चिडवणार असेल तर आपणच आपली थट्टा करून घ्यावी.. म्हणजे कोणाला पाठीमागे बोलायला विषयच सोडू नये! म्हणजे तसा मी बुटका. उंची कमी.. कोणी त्यावरून बुटल्या म्हणण्याआधीच आपण जाहीर करुन टाकावे.. लिसन टू धिस बुटबैंगण प्लिज किंवा डोन्ट लूक ॲट माय फिजिकल हाइट .. सी हाऊ हाय माय थिंकिंग गोज! असं काही बोलल्याने लोकांच्या हातचा एक्काच आपण काढून घेतो की नाही?

तेच लाॅजिक इथे! अखिलेशला उगाच दीड दमडी वगैरे म्हटल्यानंतर लोकांची तोंडं आपोआप बंद होतात! माणसाच्या मानसिकतेचा हा असा माझा अभ्यास आणि काय!

बाकी माझा देवावर विश्वास नाही, पण याबाबतीत अंकिताला सुखासमाधानात ठेवल्याबद्दल त्या जिथे कुठे असलेल्या साकार वा निराकार देवाचे मात्र मी आभार मानायला विसरत नाही..