Ankilesh - 35 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 35

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 35

३५

@ अंकिता

इट वाॅज टफ. स्टेइंग अवे फ्राॅम अख्खि. पण नंतर तो आलाच. आय वाॅज सो हॅपी. मला माहिती होतं तो येणारच. खरं तर तो काय बोलणार ते ही ठाऊक होतं. त्याला हे व्हिटिलिगोचं कारण पुरेसं नाही हे ही माहिती होतं. सिनेमात अशा वेळी हीरो किंवा हिराॅइन दुसऱ्याच्या मनातून उतरण्यासाठी काहीबाही ट्रिक्स करतात. मग जो दुसरा किंवा दुसरी असेल तो किंवा ती दु:खभरे गाणं वगैरे गातात. पण ना हा सिनेमा होता, ना मी हिराॅइन होते.. फक्त अख्खि माझा हीरो होता! तेव्हा असं सारं माझ्याकडून तर होणार नव्हतं. पण अखिलेश समोर आला नि माझा तो निश्चय लगेच बर्फासारखा वितळून वाहून गेला. मला अखिलेश हवा होता. स्कीनवरचे चार डाग त्याला माझ्यापासून दूर लोटू पाहात होते.. काहीच दिवसांपूर्वीचे ते लेप्रसीबद्दलचे आमचे डिस्कशन आठवले मला. कारण नसताना मला अखिलेशशी खूप भांडावंसं वाटत होतं. आज ही अपसेट झाले मी की त्याच्याशी भांडल्याशिवाय बरं वाटत नाही. कित्येकदा तर तो म्हणतो ही,'इंटरनॅशनल समस्या सोडल्या तर बाकी साऱ्या माझ्यामुळेच होतात.. सी हाऊ पाॅवरफुल आय ॲम!' कारण बहुतेक वेळी भांडण्याची सुरूवात 'धिस इज बिकाॅज आॅफ यू' नेच होत असते!

त्या दिवशी मी एकटीच होते घरी. समोर तो दिसला नि डोळ्यांत पाणी आलं. त्याच्याशी तोडून बोलले. माहिती होतं यात त्याची चूक काही नाही. पण म्हणाले,"यू आरन्ट बाॅदर्ड अबाऊट मी. तू जा. आय डोन्ट वाॅंट यू .."

बिचारा अख्खि. करणार काय होता. थोडा चिडला. म्हणाला,"यू हॅव नो राइट टू डिसाईड आॅन युवर ओन! म्हणजे कमीतकमी मला कारण तर सांगायलाच हवं की नाही?" पण मग तो नाइलाजाने जायला निघाला.. नि मी त्याला म्हणाले,"मला सोडून नको जाऊस!"

त्यावर तो म्हणाला,"हेच आधी डायरेक्ट सांगता आलं नसतं का?"

आय टेल यू, धिस हजबन्ड क्लास पीपल डोन्ट अंडरस्टँड सायकाॅलाॅजी आॅफ द वाइफ. असं त्याला ब्लेम केल्याशिवाय मी शांत कशी झाले असते? लग्न झालं नसलं नि तो हजबन्ड नामक पोस्टवर नसला तरी काय झालं?

मग त्या डागांबद्दल डिस्कशन झालं. त्याची मतं तशी मला ठाऊकच होती. फक्त काही वर्षांत सगळं दिसणंच बिघडलं तर त्याला काय वाटेल याची चिंता होती.

"हे काय झालं अख्खि.. सी, तीन दिवसात एवढं वाढलंय सगळं.."

"डिअर अंकिता मॅडम, स्टिग्मा सोडला तर त्या डागांत तसं घाबरण्यासारखं काय आहे? धिस इज नाॅट गोइंग टू काॅज एनी सिस्टेमिक इशू.. असं ही दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं. दिसणं आपल्या हाती नाही. असणं हाती आहे.. बी गुड. टू सेल्फ अँड अदर्स.."

"पण धिज आर डिसफिगरींग. आणि आयुष्यभर ते तसेच राहणार आहेत. तुला कसं बघवेल सारं?"

"नाऊ धिस इज इन्सल्टिंग मी.. टेल मी, व्हाय शुड आय नाॅट बी अँग्री?"

"पण.. सी हाऊ अग्ली दे लुक.."

"ओके. समज हे उलट झाले असते.. तुझ्याऐवजी मला झाला असता हा आजार.. तू मला सोडून गेली असतीस.."

"पण तसं झालं नाहीए ना.."

"सो आॅल दॅट डिस्कशन आफ्टर दॅट ड्रामा आॅन लेप्रसी वाॅज जस्ट अ डिस्कशन? सी, इफ यू एलिमिनेट मी आॅन धिस बेसिस, इट्स इनजस्टीस टू मी. आणि टू युवर सेल्फ ॲज वेल. तुला हे करायचा अधिकारच नाही. दो जिस्म मगर एक जान म्हणायचं आणि वागायचं त्याच्या उलट? हे नाही होऊ शकत. असं बोलायचं एक नि करायचे भलतंच.. वुई आरन्ट पाॅलिटिशियन्स. आपण सेन्सिबल,सेन्सिटिव्ह नाॅर्मल लोक आहोत.."

"थिंक अगेन अखिलेश. सगळं आयुष्य तुझ्यापुढे आहे. काही वर्षातच हा चेहरापण विद्रुप होईल. कथा कादंबऱ्यांत सगळीकडे सौंदर्याचे वर्णन येत असतं. नि यू विल बी गेटिंग अप टू सी समवन विथ धिज पॅची स्कीन, डेली. अ पॅचीडर्म.."

"ओके.. थिंक अदर वे राउंड. आय डेव्हलप सम ग्रेव्ह इलनेस.."

"डोन्ट से दॅट अखिलेश. प्लिज.."

"मग तो आजार विसर, सगळं काही विसर.. कीप द हँड आॅन युवर हार्ट आणि प्रामाणिकपणे सांग.. तुला मी खरंच नकोय? एकदा सांग तसं, आय विल लिव्ह यू अलोन.."

धिस वाॅज द मोमेंट, आता ह्याला तसं सांगितलं की..

"यस. आय डोन्ट वाँट यू. मला तुझ्याबरोबर नाही रहायचं. यू गो.. यू गो अवे.. आणि यू गो अहेड.."

"अहेड? गो अहेड? म्हणजे कुठे?"

पुढे काही न बोलता अख्खि जायला निघालेला. मी पाठोपाठ धावत आले नि त्याचा हात पकडत म्हणाले,"डोन्ट गो अवे.. मला सोडून जाऊ नकोस.."

थोडा सांगण्याचा सिक्वेन्स वरखाली झाला असेलही. तो तर नेहमीच तसा होत असतो. एकदा सांगायला बसले ना मी की अशीच 'क्लाउडेड' होत असते..

त्यानंतर अखिलेशने आयुष्यभरासाठीचा धडा दिला. त्याने सांगितलेले अजूनही पुरते आहे. डाॅ.अंकिता साळवी. दॅट मॅडम विथ व्हाइट पॅचेस.. व्हिटिलिगो.. माझी ओळख झालीय. फोटोत माझा चेहरा अगदीच विचित्र दिसतो. इतर सर्वांना, विशेषत: मुलींना आपल्या चेहऱ्याचे कौतुक असताना मला स्वत:चा चेहरा बघवत नाही. पण तरीही मी तो लपवत नाही.. अगदी फोटो काढून मिरवणं ही सोडत नाही मी. मेंटली आय हॅव ट्राइड टू कीप धिस डिसफिगरमेंट बिहाइंड..

कारण एकच, त्या दिवशी अख्खिने घेतलेले वचन..

"ठीक आहे. नाही सोडून जात, पण माझ्या काही अटी आहेत.."

"अटी? म्हणजे?"

"कंडिशन्स.. त्या पाळल्यास तरच पुढे काही होईल. नाहीतर आय विल गो माय वे.."

"बोल.."

"आय नीड फ्यू प्राॅमिसेस फ्राॅम यू.."

"प्राॅमिसेस? माझ्याकडून? मी काय देणार तुला?"

"यस. यू कॅन आणि यू हॅव टू.. तू मला प्राॅमिसेस दे.. अँड दे आर मेंन्ट टू बी केप्ट.."

"ओह गाॅड!"

"ऐक. प्राॅमिस नं.१. यू प्राॅमिस दॅट, हा आजार कितीही वाढला तरी तू पहिल्यासारखीच काॅन्फिडंट राहशील. २.ॲट नो स्टेज यू विल हेट सेल्फ. नो सेल्फ पिटी. ३.देअर इज द होल लाइफ अहेड. तेव्हा प्रिपेअर युवर सेल्फ फाॅर अ लाँग ड्राॅन बॅटल. इस्पेशियली स्वत:शी. ४.यू विल ॲक्सेप्ट युवरसेल्फ ॲज इट इज. ५. कम व्हाॅट मे.. तू मला सोडून जाणार नाहीस.."

मी ऐकत होते. माय अख्खि वाॅज ॲट हिज बेस्ट. मला म्हणालेला तो सायकियाट्रिस्ट हो, पण ही इज हिमसेल्फ अ गुड काऊन्सिलर! पण खरं सांगू ना, तो म्हणालेला, इफ ही वाॅज इन माय प्लेस.. तर मी ही हेच केलं असतं. ब्युटी इज स्कीन डिप.. हेच टाइमलेस सत्य आहे..

मी म्हटलं त्याला,"माय प्राॅमिस.."

अख्खिला इंग्रजी गाणी कळत नाहीत.. तरीही त्याला मी एक गाणं ऐकवलंच.. "प्राॅमिस, आय विल नेव्हर लीव्ह यू.. ते टायटॅनिकचं साँग ऐकलंयस? नसशीलच.. ऐक मग..

यू आर हिअर, देअरीज नथिंग आय फियर

अँड आय नो, दॅट माय हार्ट विल गो आॅन

वुई विल स्टे फाॅर एव्हर धिस वे

यू आर सेफ इन माय हार्ट अँड

माय हार्ट विल गो आॅन अँड आॅन"

अख्खिने माझ्याकडून ती प्राॅमिसेस घेतली. त्यांचा अर्थ बराच डीप होता. आपण काळे किंवा गोरे असतो.. उंच किंवा बुटके.. जाड किंवा बारीक.. स्वत:च्या दिसण्यावरच इतका सेल्फ काॅन्फिडन्स म्हणा किंवा स्वत:ची किंमत म्हणा का अवलंबून असावी? असेही जगात परफेक्ट म्हणावं असं कोण आहे? उगाच इन्फिरिआॅरिटी काॅम्प्लेक्सनेच कित्येक अर्धमेल्यासारखे जगत असतात. बट माय अखिलेश इज डिफरंट. खरं सांगू ना, तर हे क्रेडिट अखिलेशच्या आईचं. यस, आय काॅल हर आई. ते ही 'अगं आई' .. लग्नानंतर मुली सासूला 'अहो आई' म्हणून हाक मारतात. पण 'अहो आई' आणि 'अगं आई' मधला फरक कळत असेल तर आमचे रिलेशन कसे आहे हे लगेच कळावे. तर अखिलेशच्या आईने त्याला हे स्वाभिमानाने जगायला शिकवले. पैशांची गरीबी ही माणसाच्या दरिद्री जगण्याचे कारण ठरू नये. ती स्वत: फार शिकलेली नाही पण जीवनाची समज तिला आहे. त्यामुळेच अशी मी त्यांच्या घरात इतक्या सहज सामावून जाऊ शकले. पण ते अजून नंतर. म्हणजे माझ्या त्या कोडाच्या आजाराची चिन्हं दिसल्यावर अखिलेशने मुद्दाम घरी नेलं मला. त्याचे घर म्हणजे छोटं वन रूम किचन. बाजूला त्याचे अभ्यासाचं टेबल. एक टेबल लँप.. समोरच्या कपाटात अख्खिची सारी पुस्तकं.. जागा छोटीच पण व्यवस्थित. मनात जागा असेल तर प्रत्यक्ष राहण्याची जागा कमी पडू नये..

अखिलेश त्या दिवशी गेला. तीन दिवसांनंतर माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटायला लागलं.. यस, स्ट्रगल असणार आहे, पण एका निगेटिव्ह गोष्टीसाठी अख्खिसारखी पाॅझिटिव्ह साथ नाही सोडायची.. हॅड टू कीप माय प्राॅमिसेस.. आणि रिमेन हॅपी. स्वत: आनंदात असलो ना तरच वन कॅन मेक अदर्स हॅपी.. आणि आय आॅलवेज वाँटेड आॅल द हॅपिनेस फाॅर माय अख्खि..