३१
@ अंकिता
त्या दिवसानंतर अख्खि आणि माझ्या रिलेशनशिपला एक सँक्शन मिळाले. पपांनी कितीही नाही म्हणत होईना, परमिशन तर दिली. नंतर एकदा मला पंडित गुरूजींबद्दल कळले, म्हणजे पंडित गुरूजी हॅड टोल्ड डॅड दॅट धिज वाॅज गोइंग टू हॅपन एनी व्हिच वे! अर्थात हे सांगायला कोणी फाॅर्च्युन टेलर कशाला हवा? मला ही ते ठाऊकच होते! बट देन आय वाॅज हॅपी दॅट पंडित गुरूजी हॅड बेल्ड द कॅट! मी अख्खिला हे म्हणाले, तर अख्खि न्यू भास्कराचार्य पंडित. रादर पंडित गुरूजी न्यू अखिलेश वेल. खरंतर वेल इनफ टू टेल डॅड अबाऊट हिम! थोडक्यात झालं काय की पपा स्टाॅप्ड हिज मिशन ग्रुम फाईंडिंग आणि काॅन्स्न्ट्रेटेड आॅन अखिलेश! सो व्हाॅट एव्हर हॅज टू हॅपन, विल आॅलवेज हॅपन!
त्यानंतर मग काय? आय वाॅज आॅन द क्लाऊड नाईन! आय वाॅज थ्रिल्ड दॅट माय इंटरकाॅलेज लव्हस्टोरी वाॅज रिचिंग द लाॅजिकल एंड. मध्ये तीन वर्षे थांबायचंय. ते ही ठीकच. अख्खिचे सर्जरी नि माझे फार्म्याकाॅलाॅजीचे पीजी संपले तोवर. म्हणजे त्या तीन वर्षांत माझ्या किती केईएम ट्रिप्स झाल्या असत्या? पण आय डिड अ स्मार्ट थिंग. देशपांडे मॅडमना भेटून आय एन्शुअर्ड अ सीट ॲट केईएम. ममाला त्याबद्दल आॅब्जेक्शन नव्हते, पण पपा? त्यासाठी देशपांडे मॅडमनी एका प्रोजेक्टवर मला अपाॅइंट करून टाकले! देन आॅनवर्डस कमीतकमी आमची भेट तर व्हायची इझिली. सर्जरीत अख्खि तसा बिझी असायचाच. पण तरीही वेळात वेळ काढून भेट व्हायची. काहीच नाहीतर मी त्याच्या वाॅर्डात जाऊन बसायचे.
एकूण थिंग्स वेअर गुड. एकदा मी अख्खिला म्हणालेले,"आय कान्ट बिलिव्ह डियर.."
"हुम?"
"हुम काय? कान्ट बिलिव्ह व्हाॅट विचार!"
"ठीक आहे, व्हाॅट?"
"हेच. आपली ही इंटर काॅलेजिएट लव्हस्टोरी.."
"बट मॅडम, ही आता रिॲलिटी आहे. म्हणजे तुला त्यावर विश्वास ठेवावा लागेल. नव्हे, ठेवावाच लागेल!"
"तू स्टुपिड आहेस.. मी तेच म्हणतेय.. असे सगळे घडेल यावर विश्वास बसत नाही.."
"अगं, जिथे इच्छा तिथे मार्ग! सच्चे दिलसे मांगो तो.."
"अखिलेश भी मिल जाते हैं! आणि नो मिस्टेक्स.. अखिलेश मीन्स द गाॅड आॅफ धिस होल युनिव्हर्स! आय चेक्ड इट इन डिक्शनरी! नाहीतर तुला वाटेल मी तुझ्याबद्दलच बोलतेय की काय!"
"बोला, मॅडम. पुअर फेलो हॅज टू लिसन. न ऐकून जाणार कुठे?"
त्या दिवसांत मग कधी वेळ मिळाला तर सी शोअर.. कधी आइस्क्रीम खायला स्नोमॅन्स.. एक दोनदा वुई इव्हन वेंट फाॅर मराथी ड्रामाज. नो मच हिंदी मुव्हीज, दे वेअर फेव्हरीट नायदर हीज नाॅर माईन.. नाटक कळलं नाही तरी मी जायचे त्याच्याबरोबर. अर्थात, ओव्हर आॅल कळायचे पण त्यातील बारीक डिटेल्स कसे कळणार मला? आज तो लिहितो. पण मी ते वाचत नाही. ही मस्ट बी अ गुड रायटर पण मला न ते कळतं, ना आवडतं. कामं सोडून लिहित काय बसतो हा? घरची कामं एवढी पडली असताना? घरची कामं म्हणजे एक न केल्यास दिसणारा डोंगर आहे.. पण काम संपवले तर त्याचा मागमूसही दिसत नाही. काइंड आॅफ अ थ्यांकलेस जाॅब. पण हे आताचं. तेव्हा मला त्याच्या रायटिंगचं कौतुक होतं. त्याच्या ह्युमरचं होतं आणि त्याच्या डिसिप्लिनचंही होतं. नाऊ दॅट ह्युमर इज इरिटेटिंग, रायटिंग इज अ वेस्टेज आॅफ टाइम आणि डिसीप्लिन? वेल, आय डोन्ट फाइंड हिम डिसिप्लिन्ड! अर्थात हे सारे सुपरफिशियल. जनरली आय डोन्ट ॲडमायर हिम आॅन हिज फेस. बट ही हॅज बिन अ गुड हजबन्ड.. जस्ट हे तुमच्या माझ्यात ठेवा. धिस हजबन्ड क्लास पीपल.. त्यांना चांगलं म्हटलं की डोक्यावर चढून बसतात! इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना वाटते, हाच का तो ज्याच्यासाठी रात्री जागवल्या? ज्याची स्वप्ने पाहिली.. त्या रात्र जागवण्यावरून आठवलं..
यस, ही वाॅज द वन आय आॅलवेज ड्रेम्ट अबाऊट.. म्हणजे ते गाणं आहे तसं..
देअर इज अ वंडर इन मोस्ट एव्हरीथिंग आय सी.. नाॅट अ क्लाऊड इन द स्काय,
गाॅट द सन इन माय आईज..
अँड आय वोन्ट बी सरप्राइज्ड इफ इट्स अ ड्रीम!
मला आठवतं एकदा चौपाटीवर बसलेलो आम्ही. समोर समुद्र.. आजूबाजूला ती सँड. ही वाॅज प्लेइंग विथ द ड्राय सँड.. तो म्हणाला,"वुई चेरिश धिज मोमेंटस.. कॅच देम इन अवर माइंटस्.. द डेज वोन्ट कमबॅक.. दे विल फ्लो लाइक द सँड इन धिस फिस्ट!" खरंय ते. पण हे स्वप्न नव्हते तर सत्य होते!
मी म्हणाले ही त्याला,
एव्हरीथिंग आय वाँट द वर्ल्ड टू बी.. इज नाऊ कमिंग ट्रू इस्पेशियली फाॅर मी.. अँड द रिझन इज क्लिअर, इट्स बिकाॅज यू आर हिअर..
तो समुद्र किनारा, लाटांचा आवाज, जोरदार वारा.. थंडगार वाळू.. बाजूला तो, त्याचा उबदार हात.. मला वाटायचं, आॅन द टाॅप आॅफ द वर्ल्ड लुकिंग डाऊन आॅन क्रिएशन..इज द लव्ह दॅट आय हॅव फाउंड, एव्हर सिन्स यु हॅव बीन अराउंड.. यस, युवर लव्ह हॅज पुट मी ॲट द टाॅप आॅफ द वर्ल्ड!
ते पण काय दिवस होते! दोज वेअर द डेज! प्राॅबॅबली द एज इज लाइक दॅट! म्हणजे फ्युचरचा पत्ता नाही, प्रेझेंट मध्ये नायदर यू आर मॅच्युअर्ड, नाॅर यु आर टू यंग टू बी कन्सिडर्ड इममॅच्युअर.. खूप जास्त रिस्पाॅनसिबिलीटी नाही.. अँड अ लाॅट टू लुक फाॅर्वर्ड टू! अर्थात आॅल धिस वाॅज लेस्ड विथ समथिंग व्हिच बाॅदर्ड मी अ लाॅट, खरंतर इज बाॅदरिंग इव्हन नाऊ.. पण आय सेल्ड थ्रू.. खरंतर आय ॲम स्टिल सेलिंग थ्रू.. आॅल थ्यांक्स टू माय अखिलेश.. मला हिंदी गाणी विशेष आवडत नाहीत, पण हे गाणं इज व्हेरी क्लोझ टू माय हार्ट..
जब कोई बात बिगड जाए.. जब कोई मुश्किल पड जाए .. तुम देना साथ मेरा..
माय अखिलेश.. त्याला हे सांगावं लागलंच नाही कधी.. ही डीड जस्ट दॅट..
एकदा त्याने ठरवले की नथिंग कॅन शेक हिम.. ड्यूटी इज प्राइम.. आणि लव्हिंग द लव्हड वन्स इज हीज ड्यूटी. एकदा त्याने ते कन्फेस केलंच होतं माझ्याकडे.. म्हणालेला,"अंकिता, मी फक्त सेल्फिश आहे, म्हणजे जे बरोबर वाटतं ते केलं नाही तर उगाच अस्वस्थ व्हायला होतं. आणि दॅट पुट्स अ लाॅट आॅफ लोड आॅन माय हार्ट. त्यापेक्षा फाॅलो व्हाॅट इज राइट अँड सेव्ह वन्स स्कीन! धिस इज प्युअरली सेल्फिश! पण काही लोक ना हे विसरतात. तात्पुरत्या गेन्स साठी दे लूझ देअर मेंटल पीस. आय वुड नेव्हर डू दॅट. मेंटल पीस हॅपीनेस आणि रात्रीची शांत झोप आर द ओन्ली मोटिव्ह्स व्हिच ड्राइव्ह मी! आणि त्यानंतर हॅपीनेस एनी वे फाॅलोस.."
मी म्हटले ना.. फाॅर हिम ड्यूटी इज फर्स्ट.. व्हाॅट इज राइट हे फर्स्ट.. बाकी सगळं नंतर. ही वुडन्ट डू इट फाॅर लव्ह आॅफ इट.. मी हल्ली चिडत असते त्याच्यावर. घरी कधी वेळेवर येणं नाही, सदा हाॅस्पिटलात वाॅर्डात घुसलेला तो.. इमर्जन्सीच्या दिवशी नि त्यानंतर एक दिवस त्याला काही सुचत नाही. ओटी च्या दिवशी तो प्रिआॅक्युपाइड असतो.. मग नीट बोलणार नाही.. जितकी काॅम्प्लिकेटेड केस तेवढा ही इज इन हिज ओन शेल.. एवढ्या सगळ्यातून हाऊ विल ही फाइंड टाइम फाॅर मी? थोडाफार मिळाला वेळ तर आहेच त्याचं लिहिणं.. आय लुझ माय कुल. लाइक एनी ड्युटीफुल वाईफ.. ही वुड से! पण या सगळ्याच्या मागे आहे ते त्याचं डेडिकेशन टू हिज ड्यूटी. एकदा चिडून त्याला म्हटले ही मी.. एव्हरीथिंग फाॅर यू इज ड्यूटी.. रादर ड्यूटी इज एव्हरीथिंग फाॅर यू.. इट्स नाॅट लव्ह दॅट मेक्स यू डू थिंग्स.. इट्स युवर ड्युटी!
खरं सांगते, आजकाल माझी ही चिडचिड होते खरी.. मग मला मनात नसताना ही असलं काही बोलावं लागतं.. माहिती असूनही, ही इज अ जेम आॅफ अ पर्सन.. पण तो तसा आहे म्हणून तर माझे सारे काही ऐकून घेत असतो!
ते दिवस परत येणार नाहीत. तो त्या दिवसांना मंतरलेले दिवस म्हणतो.. खरंय ते. ती भेटण्याची उत्सुकता.. बोलण्याची आतुरता.. फ्युचरचे प्लॅनिंग नि या सर्वामागे कधी कशाबद्दल नसलेला डाऊट.. वुई नेव्हर फेल्ट, वुई विल एव्हर फेल इन अवर प्लान्स.. त्यामुळे वुई वेअर आॅलवेज हॅपी.. अर्थात अजूनही आयॅम हॅपी.. फक्त त्या हॅपिनेस मागे काही न काही थोडा फार तरी डाऊट.. थोडेफार टेन्शन .. असं काहीतरी असतंच. इट्स नाॅट प्युअर फिलिंग आॅफ हॅपिनेस नाऊ.. तेव्हा जसा तो होता.. डिस्पाइट द चॅलेंजिग सिच्युएशन..
पपांना म्हणे पंडित गुरूजींनी सारे सांगितलेले.. त्यात ही पण एक गोष्ट.. आय वुड सफर फ्राॅम धिस इलनेस.. त्यांनी नक्की काय सांगितलेले ते ठाऊक नाही.. पण माझे डायग्नोसिस झाले तेव्हा पपांना मला वाटलं तेवढा धक्का बसला नाही हे खरं.. तेव्हा सुरू झालेली माझी लढाई आजही सुरू आहेच.. पण मध्ये खूप काही घडून गेले आहे..