Ankilesh - 27 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 27

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 27

२७

@ डाॅ.अरूणा गावस्कर

शेवटी द टाॅम कॅट वाॅज बेल्ड! म्हणजे सुरेन्द्रच्या डोक्यात ती अखिलेशची माहिती मी घातली! अगदी वेळ साधून. परीक्षेला काही आठवडे होते, त्यात सुरेन्द्र काही गडबड करणार नाही याची खात्री होती. नि परीक्षा होईतोवर बराचसा तो निवळेल.. कमीत कमी पूर्ण विचार तरी करेलच.. मी त्याला ओळखते चांगली. माझा अंदाज चुकायचा नाही! पण त्या आधी त्याने काय काय गोंधळ घालावा? केतन काय हातातून गेला जशी जगातील सारी मुले संपलीत. ही वाॅज सो डिस्टर्बड्. मग तो कुठला तरी डाॅक्टर्स मॅरेज ब्युरो! त्यातून आली चार दोन स्थळं. पण ह्याच्या क्रायटेरियात बसतील तर! खरे तर बरेच झाले नाही फिट बसले ते! कारण उगाच त्याच्या डोक्यात किडा वळवळत बसला असता. मग त्या किटकनाशनात कितीतरी वेळ गेला असता कोणास ठाऊक. नि त्याच बरोबर शक्ती नि युक्तीचा किती प्रयोग करावा लागला असता कोणास ठाऊक. त्यापेक्षा त्याची स्वत:ची हौस पुरी होई पर्यंत वाट पाहिली मी. आणि दॅट स्ट्रॅटेजी वर्कड! शेवटी सुरेन्द्रला मॅनेज करणे म्हणजे अशा आयडिया कराव्याच लागतात..

पण अखिलेशची माहिती काय दिली, सुरेन्द्र भलताच अपसेट झाला. अंकिताची परीक्षा नसती तर नक्कीच त्याने घर डोक्यावर घेतले असते. त्यात त्या ब्युरोचा काहीच उपयोग होत नाही पाहिल्यावर अजूनच डोके फिरलेले. तशात अखिलेशच्या फायनल मेडिसिन प्रॅक्टिकलला तोच एक्झामिनर! सुरेन्द्रनेच सांगितले मला ते.

मी म्हटले,"चला, त्या निमित्ताने मुलगा पाहून तर झाला.. कसा वाटतोय अंकिता'स चाॅईस?"

"चाॅईस? माय फूट! हे बघ, ही इज अ स्टुडियस यंग बाॅय. हुशार आहे. आणि उगाच कोणाही स्टुडंटला डिसकरेज करणाऱ्यातला मी नाही. प्रथम मी टीचर आहे.. मग अंकिता'ज फादर! ॲज अ टीचर आय कान्ट हार्म अ गुड स्टुडंट. पण त्याचा अर्थ हा नाही.. की आय विल गेट माय डाॅटर मॅरीड टू एनी रमेश, सुरेश अँड महेश.."

टाॅम, डिक आणि हॅरीचे त्याने मराठीकरण इन्स्टंटली करून टाकले! त्याच्या बोलण्यातला अखिलेशबद्दलचा पहिला भाग तसा वाईट नव्हता. त्यामुळे प्रथम दर्शनात तरी अखिलेशला त्याने बाद केले नाही.. बाकी डिटेल्स कॅन बी वर्कड आऊट यावरच समाधान मानून गप्प बसले मी. म्हटले मैं हू ना! शेवटी मी आहेच.. मास्टर स्ट्रॅटेजिस्ट..

रिझल्ट लागला. अंकिताचा तो चांगलाच लागणार होता. ती आहेच तशी हुशार. म्हणजे तिचा आय क्यू तसा जास्तच आहे. महत्वाचे म्हणजे सुरेन्द्रच्या लाडाकोडाने ती बिघडलीही नाहीये. त्यामुळे ती आयुष्यात सुखी व्हावी. त्यात अखिलेशसारखा तिचा चाॅइस.. आय वाॅज व्हेरी हॅपी. काय आहे, श्रीमंती कित्येकदा अळवावरच्या पाण्यासारखी असू शकते. फायनान्शियल कंडिशन इज फ्लुईड.. ती कधी बदलेल सांगता येत नाही. पण मेहनत करणाऱ्या हायली क्वालिफाईड डाॅक्टरला त्याबद्दल इतका विचार कशाला करायला लागावा? अखिलेश नि अंकिता दोघे ही डाॅक्टर, अगदी चैनीत नाही राहिले तरी व्यवस्थित जगू शकतीलच की.

परीक्षा संपल्यावर एकदा अखिलेशला घरी बोलावले मी. मुद्दाम यावेळी सुरेन्द्रला सांगून! परीक्षा होऊन गेलेली, अंकिता नि अखिलेश दोघेही तसे रिकामेच होते.. त्यात दोघांना मी ती बातमी दिली,"द न्यूज हेडलाइन इज.. द कॅट इल बेल्ड!"

यावर अखिलेश ने काय म्हणावे?

"कॅट म्हणजे? मांजर पाळलीय नवीन? मला आवडतात मांजरी. फक्त दुधात तोंड घालतात ते सोडून!"

"स्टुपिड.. मम्मीने तुला घरी मांजर पाळली तिच्या नेमिंग सेरेमनीला बोलावलेय वाटतं? तरी बरंय, यू आर अ रायटर! एवढी पण भाषा कळत नाही!" अंकिताने चिडवण्याची संधी सोडली नाहीच.

"नाही. ते नाही. आय हॅव इन्फाॅर्मड अंकिता'स डॅडी अबाऊट बोथ आॅफ यू!"

"मग काय म्हणाले पपा?"

"काय म्हणणार? एक्स्पेट द एक्स्पेक्टेड! बट नेव्हर द लेस.. ही इज इंप्रेस्ड विथ अखिलेश.."

"इव्हन आय ॲम मॅडम. एक्झामिनर म्हणून सर वाॅज सो हेल्पफुल टू आॅल."

"मम्मी मग आता?"

"आता? मला काय ठाऊक? मी माझं काम केलं. आता अखिलेश.. तू डाॅ.गावस्करांकडे येऊन अंकिताचा हात माग.."

"मम्मी.. ओन्ली हँड? फक्त हात मागितला तर माझं काय? नाही, तसं आयॅम अटॅच्ड टू द हँड.. चालेल.."

"अंकिता.. चालेल काय? वाघाच्या गुहेत.."

"अखिलेश.. यू आर काॅलिंग माय डॅड अ टायगर?" अंकिता लटक्या रागात बोलली. खरेतर मी त्याला टाॅम कॅट म्हणत होते. त्यापेक्षा टायगर बरा! पण अखिलेशने येऊन भेटावे वगैरे काही माझ्या मनात नव्हते.. पण इट वाॅज अ पार्ट आॅफ द स्ट्रॅटेजी. अखिलेशला भेटायला सुरेन्द्र बोलावणारच.. मला ठाऊक होते. अखिलेशला स्वत: येऊन बोलण्याहून हे सोपे वाटावे.. एवढाच एक उद्देश. थियरी आॅफ रिलेटिव्हिटी हीच असावी!

"ठीक आहे, मी बघते काय कसं ते.. पण बी रेडी.."

"अखिलेश.. तुला सांगतेय ममा.. अँड धिस टाइम पपा इन नाॅट अ टीचर! ही इज अ ब्राइड्स फादर!"

"मला हे माहिती असतं तर.."

"तर काय? यू वुडन्ट हॅव फाॅलन फाॅर मी? पण एव्हरी डाॅटर हॅज अ फादर.. तेव्हा मी नाहीतर अजून कोणी.. डाॅ.गावस्कर नाही तर अजून कोणी.."

"बाप रे! थर्ड इयर वाॅज इझियर दॅन धिस.."

शेवटी मीच म्हणाले,"घाबरू नकोस.. मैं हूं ना.."

इतक्या दिवसात सुरेन्द्र गप्प कसा काय याचा विचार करत होते मी.. की त्याची काही पॅरलल स्ट्रॅटेजी सुरू आहे? नंतर काही दिवसांनी कळले मला, त्याच्या गुरूंनी त्याला सारे सांगितलेले.. अखिलेश नि अंकिता विवाह टाळता येणार नाही.. नि त्यानंतर त्याने हा असा रिझाइन्ड टू फेट असा पवित्रा घेतलेला! मग मध्ये कोणीतरी इंग्लंडमधील डाॅक्टर मुलाचे स्थळ आले तरीही सुरेन्द्र जागचा हलला नव्हता! ह्या गुरूजींना सुरेन्द्रच्या आयुष्यात मोठे स्थान होते. सुरेन्द्र पण तसेच काही मोठे कारण असल्यावाचून गुरूजींकडे जायचा नाही. काहीही असो, त्यामुळे का होईना, अगदी भूकंप व्हावा अशी बातमी ऐकूनही घरात शातंता होती!

आणि एक दिवस तर त्याने सपशेल नांगी टाकली.. ती ही रीतसर लग्नाबद्दल काही ही डिस्कशन न होताच! मला म्हणाला,"होऊन जाऊ देत तुमच्या मनासारखं.. पण माझं एक तरी ऐका.. दोघांचे पोस्ट ग्रॅज्युएशन होईतोवर लग्न पुढे ढकला.. ती तीन वर्षे तरी अंकिता सुखात राहिल माझ्या घरात. नंतर आहेच ते.. स्ट्रगल! त्या अपकमिंग डाॅक्टर बरोबर!"

इतके दिवस सुरेन्द्र बिचारा आपुलाच वाद आपणासी घालत असावा. शेवटी स्वत:च स्वत:शी काॅम्प्रोमाईज म्हणून हा तोडगा काढला असावा. मला त्या ही स्थितीत त्याच्याबद्दल वाईट वाटलेच. त्याची मते ही त्याच्या गरीबीशी झगडण्यातून आणि अंकितावरच्या आत्यंतिक प्रेमातून आलेली होती. असेही काळजावर दगड ठेवूनच तो अंकिताच्या लग्नाला तयार झाला असता. ती लग्न होऊन सासरी गेली की त्याची काय अवस्था होईल याचा तर मला विचारही करवत नव्हता. अंकिताच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी 'एक दिवस ही सासरी जाईल' म्हणून रडलेला वेडा सुरेंद्र मी पाहिलेला. अशा सुरेंद्रला एका साध्या घरातील मुलाशी अंकिताचे लग्न.. कसे पचनी पडणार होते? तरीही आता त्या दृष्टीने त्याचे स्वत:चे प्रयत्न सुरू होते.

मग एके दिवशी त्याने अंकिताला समोर बसवले, आपल्या मतांबद्दल मोठे प्रास्ताविक केले.. नि म्हणाला,"आर यु शुअर तुझ्यासाठी हाच मुलगा चांगला आहे? आजकाल सोसायटीत गंमत म्हणूनही लग्नं होतात. अगदी लव्हमॅरेजेस. वर्षानुवर्षे कोर्टिंग. मग लग्न.. नि मग पटत नाही म्हणत डायव्होर्स.. लग्न इज अ कमिटमेंट. त्यात मेनी फॅक्टर्स प्ले अ रोल. त्यातील मुख्य.. फायनॅन्शियल कंडिशन. त्या सगळ्याची तयारी हवी. नंतर क्षुल्लक कारणाने सोडून देणार असशील तर.. प्रश्न अख्ख्या आयुष्याचा आहे.. थिंक प्राॅपर्ली.. आणि आय विल मीट द बाॅय वन्स.."

अंकिताची ही अपेक्षा नव्हती.. न फटाके फुटले न आवाज झाला.. भास्कराचार्य पंडित गुरूजींची कृपा आणि काय!