Ankilesh - 22 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 22

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 22

२२

@ अंकिता

दोनतीन दिवस मी कशीबशी थांबले नि शेवटी माझा संयम संपला. अख्खिला काहीही करून भेटायलाच हवे, त्याच्याशी बोलायलाच हवे. पण मी त्याला प्रपोझ करावे? नाॅट दॅट आय कान्ट डू दॅट पण तो खरंच तयार असेल ना? व्हाॅट इफ ही सेज यस जस्ट बिकाॅज ही कान्ट हर्ट मी? नाही, ही हॅज टू प्रपोझ! आणि तो ते कसे करेल?

गेल्या काही दिवसांचा स्ट्रेस एवढा होता की तो विचार करूनही मला रडू यायचे. त्यात त्या दिवशी अखिलेश दिसला नि आय कुडन्ट कंट्रोल मायसेल्फ. हाच तो.. ज्यासाठी आयॅम क्रेझी.. लुझिंग माय स्लीप.. आपोआपच ते गाणे आले मनात, धिस इज व्हाय धिस गर्ल लाँग्स टू बी क्लोझ टू यू..

त्या दिवशी कट्ट्यावर बसून मी काय बोलत होते कोणास ठाऊक. बट इट वाॅज फ्राॅम विदीन मी. मला म्हणायचे होते,आय कान्ट लिव्ह विदाऊट यू.. पण फक्त यू न म्हणता दॅट बाॅय म्हणाले मी. असे बोलले, ॲज इफ इट्स फाॅर समबडी एल्स! पण अख्खि माझा तेव्हाही जास्त डिस्टर्ब झाला नाही. रियल सर्जन मटेरियल आहे तो. कुल इन क्रायसिस! मग त्यानंतर जे काही झाले.. आय रिमेंबर एव्हरी मोमेंट आॅफ इट. ती मॅच.. म्हटले दॅटस् सिंबाॅलिक! मॅच मेकिंग ॲट द मॅच! अँड नो मॅच टू हिम! अख्खि प्लेड दॅट वेल दॅट डे. अर्थात आता मी काही अजून इंप्रेस होणार नव्हते. पण त्या सगळ्या टेन्शनमध्येही अख्खि वाॅज व्हेरी कुल. त्याने बाउंड्री लाइनवर कॅच पकडला तेव्हा, बॅटिंग करताना फिफ्टी केले तेव्हा वाटले, त्या कॅडबरी ॲड मधल्या मुलीसारखे ग्राउंडमध्ये जाऊन नाचावे! ती मॅच अख्खिच्या टीमने जिंकली.. सगळे सेंटर आॅफ द ग्राउंडमध्ये धावले.. पण सेंटर आॅफ अट्रॅक्शन कोण व्हावे? तर ग्राउंडबाहेर माझ्याकडे येणारा अख्खि! अख्खिने एक नाजूक फूल आणि हिरव्यागार गवताची बनवलेली अंगठी घालत भर ग्राउंडमध्ये सर्वांसमोर केलेले प्रपोझ! सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे होते. आय ब्लश्ड.. आय जस्ट कुडन्ट से अ थिंग.. आणि त्यानंतर टिअर्स रॅन डाऊन माय चिक्स.. आय कुडन्ट कन्टेन माय हॅपीनेस! नि त्यापाठोपाठ सगळ्यांच्या वाजलेल्या जोरदार टाळ्या..

आय स्टिल डोन्ट बिलिव्ह.. धिस हॅज ॲज्च्युअली हॅपन्ड. बट इट हॅज. अख्खि इज नेव्हर फ्लॅशी. नेव्हर अ शो आॅफ. बट ही हॅड प्राॅमिस्ड मी, मॅच संपल्यावर आय विल गेट माय सोल्यूशन. अँड आय डिड! आणि ते सोल्यूशन त्यानेच मला दिले. एवढे रोमँटिक प्रपोझ कोणी केले असेल कधी? दॅट ग्रास ब्लेड रिंग! आणि ते कलरफुल फ्लाॅवर! दॅट स्पाँटँनियस ॲक्शन आॅफ माय डिअर अखिलेश.. व्हाॅट मोअर डझ अ गर्ल रिअली नीड? ती गवताची अंगठी सुकली, ते फूल सुकलेय.. पण मी दोन्ही गोष्टी अजूनही जपून ठेवल्यात.. लाइक दोज प्रेशियस मोमेंटस् इन अ कंपार्टमेंट आॅफ माय हार्ट!

सो दॅट थियरी आॅफ प्रपोझल इन दॅट ड्रामा वाॅज नाॅट करेक्ट? वन डझन्ट नीड टू टेल अदर? इथे तर प्रपोझ करावेच लागले.. नाहीतर कशी काय पुढे सरकणार होती आमची प्रेमकथा? बट आॅन द अदर हँड, हे तसं नाहीये.. सगळे काही आमचे ठरले होतेच. वुई कुड जज द लव्ह फाॅर इच अदर इन इच अदर्स आईज.. त्यावरती फायनल सिग्नेचर.. शिक्का.. म्हणजे ते प्रपोझल. त्यादिवशी ते अचानक झाले कारण दॅट वाॅज नीडेड, पण नसते झाले तर? नंतर कधीतरी झालेच असते. बट आय वुड हॅव मिस्ड द मोस्ट रोमँटिक मोमेंट आॅफ माय लाईफ! इतके दिवस मी या दिवसाची वाट पाहात होते. सात आठ महिन्यांपासून ज्याची स्वप्ने पाहिली, फायनली आय गाॅट हिम. पहिल्या नजरेत आवडलेला तो पहिला नि शेवटचा कुणी. मी त्याला अशीतशी सोडणार थोडीच होते? कितीही अडथळे आले तरी आय वुडन्ट लिव्ह माय ड्रीम.. अखिलेश.. आता तू आहेस नि मी आहे!

त्या दिवशी त्या रिंग सेरेमनीनंतर काय बोलावे सुचेना मला. मी तशी बोल्ड, बडबडी आणि बिनधास्त. पण आय वाॅज सो ओव्हरव्हेल्मड! मी काय बोलणार होते? मॅच नंतर सगळे अख्खि नि माझ्या भोवती गोळा झाले.. दे चियर्ड.. कुणीतरी कुठूनतरी केक आणला.. आम्ही दोघांनी मिळून तो कापला नि एकमेकांना भरवला! द होल स्टेडियम वाॅज द विटनेस! एखाद्या सिनेमातही ठरवून इतका रोमँटिक सीन घालता येणार नाही. त्यानंतर अख्खिला सोडायची इच्छाच होत नव्हती. मग सह्याद्रीत बसून काॅफी झाली.. दोघेही आम्ही तसे गप्प होतो. अख्खि एकच बोलला,"नाऊ आॅन आपल्याला एकमेकांना भेटण्यासाठी एक्स्क्यूझेस शोधायला नकोत!"

"लाइक व्हाॅट?"

"संडे माॅर्निंग सायकलिंग!"

"म्हणजे?"

"टू टेल यू फ्रँकली, आजवर तुमच्या काॅलेजबाहेर ग्राउंड आहे हेच मला ठाऊक नव्हते.. नायदर डू आय हॅव अ सायकल! पण.."

"बट दॅट वाॅज ब्रिलियंट! तुला अशाच आयडिया सुचतात का रे? की आधी विचार करून ठरवतोस?"

"अशाच म्हणजे?"

"नथिंग.." इथे मला खरोखरच लाजायला झाले. गुडघ्यावर बसून माझ्या बोटात अंगठी घालणारा अखिलेश माझ्या डोळ्यासमोर आला.

"नाही सांग ना.."

"म्हणजे लाइक हाऊ यू प्रपोझ्ड टुडे.."

"ते.. दॅट वाॅज ॲट द स्पर आॅफ द मोमेंट.."

"रियल सर्जिकल मटेरियल आहेस तू.. कुल इन क्रायसिस!"

"क्रायसिस! क्राइंग बेबी समोर बसलेली म्हणून क्रायसिस?"

"तू ना.. मी रागावेन .. बोलणार नाही मग..!"

"हुं.. आता प्रपोझल इज ओव्हर.. सो ओव्हर टू अंकिता मॅडम फाॅर.."

"मॅडम काय रे! मी तुला मॅडम दिसतेय?"

"नाही.. मड्डम दिसतेयस.. चल घरी जायला वेळ होईल तुला.."

१६६ च्या वरच्या मजल्यावर खिडकीतली सीट..

"आज सोडायला येतोयस.. काही काम?"

"मला? आता कामाच्या कारणाची गरज नाही! आणि आता नाही आलो तर मड्डम विल गेट अँग्री!"

"मड्डम? आता मी खरेच रागावेन.."

"तुला सांगू .. उगाच प्रपोझ केलं आज.. आजवर तू कधीच रागावली नव्हतीस माझ्यावर. आता कमिटमेंटला चार तास नाही झाले तर आॅलरेडी थ्रेटनिंग विथ धिस?"

"अख्खि.. जाऊ देत. आयॅम टू हॅपी टू गेट अँग्री.. आजच्या दिवस सोडते तुला. मग बघतेच तुझ्याकडे!"

बस चाललेली. वारा मस्त येत होता. मी हळूच त्याचा हात पकडला.. एकाएकी तो वाकला.. चालत्या बसमध्ये कानात पटपुटला,"अंकिता, आय लव्ह यू.."

भरलेल्या बसमध्ये मी काय रिॲक्ट करणार होते.. एक्सेप्ट फाॅर ब्लशिंग?

"अजून दोन दिवस आहेत यार.."

"कशाला?"

"कशाला काय? मेरी जान मेरी जान संडे के संडे.."

"दोन नाही तीन. मॅथ्स कच्चंय तुझं. त्यापेक्षा यार व्हाय डोन्ट यू चेंज द काॅलेज? शिफ्ट टू नायर!"

"मॅड आॅर व्हाॅट! एकतर नाॅन जीएस गर्लफ्रेंड.. आणि आता काॅलेजही सोडू? यह इमान बेचने जैसा है.. जीएसएमसी इज नाॅन निगोशिएबल.."

"बस.. जस्ट बिकाॅझ मी आज रागावणार नाही म्हणाले म्हणून सूट घेऊ नकोस.. तुला जीएस मधली गर्लफ्रेंड हवी होती?"

"मी कुठे असं म्हणालो?"

"जाऊ देत. फर्स्ट टाइम आहे सो माफ किया. बट रिमेंबर लास्ट इयर अ नायराईट वाॅज युनिव्हर्सिटी टाॅपर. आणि तुला काय वाटलं मी पण माझे काॅलेज सोडून येईन?"

"ओके.. वुई आर डिस्कसिंग जसं काय हे आपण करू शकतो.. किती सुंदर संध्याकाळ.. तू मी आणि ही बस.. मस्त थंडगार वारा.. झाडावर पक्ष्यांचा चिवचिवाट.. समोर सूर्य अस्ताला जातोय आणि अंकिता अखिलेश जोडीचा उदय होतोय.."

"अख्खि.. इतके हाय लेव्हल.. मराथी.. अस्त काय.. उदय काय? हू इज धिस फेलो उदय? आय नो वन उदय गुप्ते.."

अख्खिने कपाळावर हात मारून घेतला.. म्हणाला,"मॅडम अजून वेळ गेली नाही.. उदय गुप्ते? आणि तुझ्याइतके इंग्रजी मला येत नाही.."

भाषा? प्रेमाला न भाषेचा न जात, धर्म वगैरेंचा अडसर असतो कधी. खरेखुरे प्रेम हे सारे अडथळे पार करत पसरते सगळीकडे नि हेच प्रेम हे या जगाच्या अस्तित्वाचा पाया आहे! हे इतके भले मोठे वाक्य एकदा अख्खि म्हणालेला.. त्याच्या एका नाटकात लिहिलंय त्याने ते वाचून दाखवताना..

त्या दिवशी घरी आले तर ती प्रपोझलची बातमी माझ्या आधीच घरी पोहोचलेली. कर्टसी डाॅ.मुग्धा देशपांडे! त्या मॅचच्या वेळी मॅडम देशपांडे पण एक स्पेक्टॅटर होत्या! त्यांनीच हा पोस्ट मॅच मॅच मेकिंगचा रिपोर्ट ममाला लगेच दिला होता!

घरी पोहोचल्या पोहोचल्या आईने स्वागत केले.. वेलकम मिस अंकिता.. साॅरी, टू बी डाॅ.मिसेस अंकिता साळवी!