१६
@ अंकिता
दॅट सायकलिंग आयडिया वाॅज अ मास्टरस्ट्रोक! अख्खि इज अ जिनियस! एनी वे वीक डेज मध्ये वेळ मिळाला नसताच कधी. संडे के संडे म्हणत अख्खि भेटतोच. म्हणजे एकदा त्याच्या सवयीनुसार तो हे गाणे म्हणालाच..
मी निघताना म्हणाले, सी यू नेक्स्ट संडे.. तर हा म्हणतो .. मेरी जान आना संडे के संडे! त्यातले मेरी जान हे शब्द त्याच्या तोंडी आले खरे, पण त्यानंतर त्याने जीभ चावली.. काही असो मला ते कळलेच! आणि आवडले ही.
त्यामुळे अजून एक गोष्ट झाली. ती म्हणजे
संडे डायरी! मी त्यानंतर सुरू केले ते दर रविवारी नोट्स काढल्यासारखी डायरी लिहायला. आमचे बोलणे काय झाले, व्हाॅट आय वाॅज थिंकिंग वगैरे सारे मी लिहून ठेवायचे. आज ते वाचतानाही टाइम मशीन मधून मागे गेल्यासारखे वाटते.. आम्ही गप्पा कसल्या मारायचो? तर वाॅर्डात काय काय झाले, राउंडवर कुणी काय शिकवले, सर्जिकल पोस्ट होती त्याची तेव्हा तर तो खूप खुशीत होता, एकदा म्हणालेला,"आपण एकाच काॅलेजात असतो तर किती मजा आली असती?" आय वाॅज स्टार्टल्ड बाय हिज कमेंट.. मग पुढे म्हणाला,"धिस सर्जिकल दास इज टू गुड. आपण एकमेकांना ना सर्जरी केसेस प्रेझेंट केल्या असत्या. म्हणजे प्रॅक्टिस केवढी झाली असती!"
दास हे सर्जरीच्या एक पुस्तकाच्या आॅथरचे नाव आहे. मला स्वत:ला ही कापाकापी आवडत नाही. मेडिसीन बेस्ट. मी त्याला म्हटले ही एकदा,"सर्जन म्हटला की काटे नि सुरी घेऊन कापणारा. मेडिसीन इज बेटर अँड टफर!"
"असेल, बट आय लाईक सर्जरी.."
"काही नाही कळलं तर उघडून बघा आत काय आहे ते?"
"खरंय!"
मला वाटलं तेव्हा, असं होत असतं तर ह्याचे हार्ट उघडून पाहिलं नसतं मी? किंवा माझं हृदय उघडून दाखवायलाही मी तयार होते! आणि यात गंमत म्हणजे, हृदयाचा आपल्या इमोशन्सशी काहीच संबंध नाही! ते बिचारे धडधडत असते. सगळी गडबड तो नामानिराळा राहणारा ब्रेन करत असतो. पण ह्या प्रेमशास्त्रात क्रेडिट किंवा डेबिट, सगळे बिल फाडले जाते ते हार्टाच्या नावे! आम्ही मेडिकल स्टुडंट्स पण सगळी फिजिआॅलाॅजी माहिती असूनही हेच करतोय! सेकंड इयरच्या क्लिनिकल टर्मस् म्हणजे सगळीच गंमत असते. वाॅर्डातून फिरायचे, ॲप्रन घालून, गळ्यात स्थेथोस्कोप लटकवून. कुणी काही शिकवायला आले की त्यातले किती समजते कोणास ठाऊक. नुसते पेशंटशी बोलून त्याच्याकडून हिस्टरी काढणे कठीण. मग बाकीचे तर अजूनच कठीण. पण आमची डिस्कशन्स व्हायची त्यात हाऊ टू टेक हिस्टरी हाच एक मोठा विषय असायचा. बाकी माझ्या लँग्वेजवरून अख्खि कधी काही बोलायचा नाही पण हिस्टरी टेकिंगसाठी मराथी नीट यायलाच पाहिजे म्हणायचा. यू नीड टू अंडरस्टँड द इंट्रिकसीस आॅफ पेशंट्स लँग्वेज. तो माझ्याच बरोबरचा पण जणू मेडिसीनची जन्मापासून समज असल्यासारखा बोलायचा. अवर जाॅब इज लाइक अ डिटेक्टीव्ह.. हिस्टरी, एक्झामिनेशन कोरिलेट करून मग ट्राय टू क्रॅक द केस! मला त्याची गंमतही वाटायची नि कौतुकही. खरेतर माझ्या घरी माझ्या हे लहानपणापासूनच बघण्यात आलेले. माय पेरेंट्स कॅन टीच मी एनिथिंग इव्हन ॲट होम. बट अख्खि हॅड अंडरस्टूड अ लाॅट आॅन हिज ओन!
संडे सायकलींग सुरू होते. वीकचे सहा दिवस रविवारची वाट पाहण्यात जायचे. कुणी काही विचारू नये म्हणून मी बुक्स उघडून बसायचे. अर्थात स्टडीजकडे दुर्लक्ष नव्हते पण हाफ द टाइम युज्ड टू बी जस्ट डे ड्रीमिंग. आणि अर्थातच आॅल द ड्रीम्स अबाऊट माय हीरो! हीरो म्हटल्यावर आठवले, माय हीरो युज्ड टू कम आॅन हीरो सायकल. मोस्ट आॅफ द टाइम्स. म्हणजे मध्ये मध्ये त्याची सायकल चेंज व्हायची. मला वाटायचे याच्याकडे अशा किती सायकली आहेत? एक दोनदा मी विचारले ही,"आज सायकल वेगळी दिसतेय! नाइस वन!"
त्याच्यावर आधी त्याने दुर्लक्ष केले. मग एकदा म्हणाला,"इट्स जस्ट अ व्हेइकल! डेस्टिनेशन इज इम्पाॅर्टंट!"
जसं काही मला ठाऊकच नव्हतं ते. त्यात मी ॲड करणार होते, नुसतं डेस्टिनेशन नाही, द जर्नी इज इक्वली इम्पाॅर्टंट! पुढे मला कळले ते हे की त्यातली कुठलीच सायकल त्याची स्वत:ची नव्हती! ही गोष्ट खूप नंतरची. म्हणजे सायकलिंग बंद झाल्यावर.. ते नंतर सांगेनच.. उगाच सगळा क्रम उलटापालटा व्हायला नको. पण आय हॅड माय ओन कार अॅट माय डिस्पोझल.. ही कुडन्ट ओन अ सायकल.. हे खरे. अशातशाने माझ्यात काहीच फरक पडणार नव्हता. त्या काळी मोबाईल आज सारखे असते तर? हे इमोशनल एक्स्चेंज सोपे झाले असते? बट नो! अनादी काळापासून, अगदी भाषा ही डेव्हलप नव्हती झाली तेव्हापासून ही एक्स्चेंजेस होतच आली आहेत. शेवटी काय मोबाईल इज जस्ट अ व्हेईकल.. फायनल डेस्टिनेशन अँड जर्नी टुवर्डस इट इज मोअर इंपाॅर्टंट. आणि फॅसिनेटिंग सुद्धा!
आमची स्टोरी मात्र एकदम हळूहळू पुढे जात होती. त्याला मी आवडत होते, ते दिसतच होतं. मी मात्र मुद्दाम कधीकधी हिंट देत होते. तो ऐकून न ऐकल्यासारखा करायचा. आजही त्याची ही सवय कायम आहे. म्हणजे मी काही सांगायला गेले की त्याचे लक्ष नसतेच.. पण ते खरेखुरे. आधी तो लक्ष नसल्याचे नाटक करायचा!
नाटकावरून आठवले..
मध्ये एकदा षण्मुखानंद हाॅल मध्ये नाटकाला गेलेलो आम्ही. नाटक कोणाचे? तर कुठले तरी इंटरकाॅलेजिएट. मराथी रायटिंग आणि ड्रामात अख्खिला मोठाच इंटरेस्ट. आज तो उगाच लिहित असतो. एखाद दोन पुस्तकेही आहेत त्याची पब्लिश्ड. मी वाचली नाहीत कारण इतके हाय लेव्हल मराठी नाही कळत मला. पण तेव्हा मला कौतुक होते त्याचे.
तर ते नाटक.. द प्रपोझल नावाचे होते. आय रिमेंबर स्पेसिफिकली कारण इट वाॅज अ काॅमेडी, व्हेअर अ बाॅय अँड अ गर्ल ट्राय टू प्रपोझ अँड एव्हरी टाइम समथिंग आॅर अदर कम्स अप. नाटक हिंदीत होते. मला ते आमच्या दोघांच्या सिच्युएशन सारखे वाटत होते, अर्थात द ॲक्च्युअल प्रपोझल वाॅज बिईंग ॲक्च्युअली डिलेड बाय अस! आय डिडन्ट वाँट हिम टू टेल मी हाऊ ही इज नाॅट फिट फाॅर मी! आणि पुढे एकदा त्यानेच सांगितले, ही डिडन्ट वाँट टू मिस मी.. जोवर सुरू आहे तोवर ठीकच.. त्या 'प्रपोझल' नाटकाचे रीतसर इन्व्हिटेशन नव्हते. पण अख्खिच्याच मित्राचे नाटक होते. अजूनही त्यातील काही गंमती आठवतात.. त्यातील हीरो प्रास्ताविक म्हणून म्हणतो.. वह चांद दिख रहा है ना.. एक आसमांपर.. एक जमींपर.. वेळ रात्रीची, दोघे एका बागेत बसलेले.. पाठी पांढरा दिवा.. तो दाखवत ती म्हणते, नहीं. ठीक से देखो.. वह तो एक दीया है.. चांद नहीं. और अगर तुम मेरी तुलना चांद से कर रहे हो.. तो कह देती हूं.. चांद इज फुल्ल आॅफ क्रेटर्स आणि खड्डे! हे शेवटचे शब्द हिंदीत काय होतं आठवत नाही. पुढे ती हीरोला प्रपोझ करायचा प्रयत्न करते.. ऐसा लगता है वक्त थम सा गया है.. त्यावर तो म्हणतो.. स्टँड स्टील? याद है हम बचपनमें स्टॅच्यू स्टॅच्यू खेला करते थे. तुम क्या अब वक्त के साथ खेल रही हो.. नाटकभर दोघे एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतात.. शेवटी विना प्रपोझलच समजून घेतात.. अगदी आमच्या पॅरलल सिच्युएशन. अख्खिनेच तर हे मुद्दाम लिहून घेतले नसेल? नाटकानंतर अख्खि गप्पच होता. मीच म्हटले,"हाऊ पीपल आर सो स्टुपिड? दे डोन्ट नोटिस द क्युपीड?" अख्खि सीम्ड इंप्रेस्ड विथ द्याट ऱ्हायमिंग.. पण तो काही बोलला नाही..
नाटकाचा एपिसोड संपला. फक्त त्या दिवशी षण्मुखानंद मधून ममाला ही बाहेर पडताना पाहिले मी! घरी आले तर ती काही बोलली नाही. तिने मला पाहिले की नाही गाॅड ओन्ली नोज! अगदी पहिल्यांदा तिने मला ते केईएम बद्दल विचारलेले, त्यानंतर कधीच तो विषय तिने काढला नाही. आयदर शी इज कन्व्हिन्स्ड किंवा सायलंटली आॅब्जर्व्हिंग. पुढे हा सेकंड आॅप्शनच करेक्ट होता ते कळले मला. आणि तिला हे सारे खूप आधीच कळलेले फक्त पपांपासून बचाव, माझा अन तिचाही, म्हणून ती गप्प बसलेली!
एकूण ते दिवस अगदी मंतरलेले होते. संडे के संडे लाइफ! मध्ये मध्ये स्टडी ब्रेक्स! अजूनही काही गोष्टी घडल्या, घडत होत्या आजूबाजूला. पण अख्खिचा चष्मा लावलेल्या मला दिसतील तर ना!