Ankilesh - 7 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 7

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 7

@ अखिलेश

अंकिता तशी वेडी आहे. वेडी म्हणजे एखादी गोष्ट हवी असेल तर ती प्रयत्न काही केल्या सोडत नाही. त्या गोष्टीचे वेड लागते तिला. त्यावेळी तिला माझे वेड लागले असावे. पुस्तक विकत घेण्याची सबब ही किती लंगडी आहे हे तिला दिसत नव्हते का? बुक स्टोअर काॅलेजच्या आत नाही हे तिला माहिती नव्हते का? आणि एका पुस्तकासाठी तिने मला शोधत यावे हे किती अतार्किक आहे हे तिला समजले नसेल का? पण 'वेडात निघाले वीर मराठे सात' सारखी ती एका वेडात निघालेली. मग त्यासाठी ती काहीही करेल.. वीर दौडले असतील घोड्यांवरून तर ही बी ई एस टी च्या बस मधून! पुढे मला कळले ते हे की, तिने बसमधून प्रवास सुरू केला त्याला कारण मला बरे वाटावे म्हणून नव्हते. मला इंप्रेस करावे म्हणून तर नाहीच. तर पुढे ती सवय व्हावी म्हणून! नि त्या आधी माझी न तिची जोडी जुळणारच.. हे तिने गृहितच धरले होते! म्हणजे त्यात माझा तर होकार धरलेलाच, पण आपल्या आईवडलांचा देखील! तिचे वडील या सर्वास कधीच राजी होणार नाहीत हे माहिती असूनही!

पण ती आहे अशीच. अगदी सम पीपल हॅव नियर व्हिजन.. म्हणत तिने हिंट दिलेली! म्हणजे मला जवळची अंकिता दिसत नाही? शी वाँट्स टू बी माय गर्लफ्रेंड! आहे की नाही अट्टल वेडी?

इमॅजिन.. अंकिता आणि मी.. आमची ती रोमँटिक जोडी.. एक सुंदर असं तळं आहे. आजूबाजूला गर्द झाडी. नीरव शांतता आहे सगळीकडे. त्या तळ्यात लाल बससारखी दिसणारी एक होडी आहे.. आम्ही दोघेच बसलो आहोत.. हाथोंमें हाथ हैं.. तेरा मेरा साथ है म्हणत बोट वल्हवतोय मी.. ती वेड्यासारखी बघतेय माझ्याकडे.. इतक्यात वरून टपकन एक पान पडतं झाडाचं.. अंकिता गायला लागते.. कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को..

अशी वेडी ती.. माझ्यासमोर उभी! गंमत सांगायची तर नंतर एकदा तीच म्हणालेली,"यू नो अखिलेश, माय पॅथाॅलाॅजी इज स्ट्राँग.. विचार का?"

"का?"

"कारण तू.. तुझ्यामुळे मी कारण नसताना अजून एक ते राॅबिन्सनचं पुस्तक विकत घेतलं! आय हॅव टू काॅपीज आॅफ द सेम बुक!"

"मग दुसरं काहीतरी घ्यायचं होतंस!"

"तुला बोलायला काय! आय कुड थिंक ओन्ली दॅट मच देन.. आॅल बिकाॅज आॅफ यू..!"

त्या दिवशी आम्ही कॅंटीनमध्ये बसलेलो. बसताना मी खिसा चाचपलेला, खोटे कशाला सांगू? आपल्याकडे आलेल्याला कमीत कमी आपल्या पैशाने चहा काॅफी तरी पाजता यायला हवी. बाकी कुणाला नाही तरी आपल्या भावी गर्लफ्रेंडला तरी! नशिबाने तेवढे पैसे होते खिशात.

"काय घेणार?"

उगाच मला एका तुटलेल्या जोडप्याचा कवितामय संवाद आठवला.. लग्न होऊन तिच्या घरी गेलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या घरी पोहोचलेला तो, ती विचारतेय.. काय घेणार.. यावर तो मनातल्या मनात म्हणतो, देशील का हवेय ते सारे? काही कारण नसताना मला ती कविता आठवली.

"काॅफी. फिल्टर.."

"वाॅव! इव्हन आय लाईक फिल्टर काॅफी!"

इथे लाइकचा खरेतर सवाल नव्हता. नेस्कॅफेपेक्षा फिल्टर काॅफी स्वस्त.. इतकाच हिशेब होता.

मग गरमागरम काॅफी बरोबर गप्पा झाल्या. खरे सांगतो, अंकिता छान होती, एखाद्या परीसारखी दिसतही छान होती. आजवर मी तिला टाळावे कसे हा विचार करत होतो, त्यात खरेतर तिनेच मला टाळले तर विषय सोपा होईल असा विचार होता. पण गरम काॅफीच्या एकेका घोटाबरोबर तो मागे मागे पडत गेला. अंकिताचे हसणे, बोलणे, दिसणे सगळे एकाएकी अजूनच आवडायला लागले. फक्त माझ्यासाठी ती भेटण्याची कारणे शोधत यावी? नक्कीच काहीतरी संकेत आहे हा. ती चांगलीच आहे, फक्त 'मेरे हालात की आंधी में बिखर जाएगी' .. हीच एक चिंता होती.

"व्हाॅट फाॅर पीजी?" अंकिताचा प्रश्न.

"मी? कोणास ठाऊक! सर्जरी बहुतेक. तू?"

"आय डोन्ट नो! पण क्लिनिकल काम केले की कळेल काय आवडते ते.."

"ते ही खरंच. पण मला ना इथेच सर्जरी डिपार्टमेंट मध्ये काम करायचेय. त्या नाइट इमर्जन्सीस.. फ्रँटिक सर्जरीस, ओ.टी. आणि मोमेंट टू मोमेंट सर्जिकल डिसिजन्स.. तुला सांगतो, आय गेट अ ग्रेट काइन्ड आॅफ अ हाय. अगदी एखाद्या वाॅरफ्रंटवर असल्यासारखे. इट्स टफ लाईफ. पण मला आवडते.. इमॅजिन, सर्जरी कॅन क्युअर सो मेनी थिंग्स!"

"म्हणजे नाइफ इज युवर लाईफ?"

"यस!" पुढे विथ य वाईफ लाइक यू म्हणायला हवे होत! "तुझं काय?"

"मी नाही विचार केला अजून. कदाचित गायनॅक.. नाहीतर नाॅन क्लिनिकल.."

"आय हेट नाॅन क्लिनिकल. इमॅजिन अ डाॅक्टर नाॅट डिलिंग विथ अ पेशंट?"

"आय डोन्ट नो. पण कोणीतरी बेसिक ब्रांचेस करायला नकोत? बट सर्जिकल ब्रांचेस गेट अ लाॅट आॅफ मनी.."

"आय डोन्ट नो. मनी इजन्ट माय प्रायाॅरिटी. शेवटी माणसाला काय लागते? फेअरली डिसेंट लिव्हिंग इज इनफ. म्हणजे माझ्यापुरतेच हे.. बाकी एव्हरीवन इज फ्री टू डिसाइड फाॅर सेल्फ.."

"तू म्हणतोस ते खरेय. इव्हन आय ॲग्री. मनी शुड बी अ बायप्राॅडक्ट आॅफ द प्रॅक्टिस. अँड नाॅट द एम.."

चला. या मुद्दयावर पटले आमचे. मी बोललो ते माझे खरेखुरे विचार होते. ते तिला पटावेत.. खरेतर तिचे विचार पण तसेच असावेत? एकूण काहीतरी खिचडी शिजणार दिसतेय.. फक्त त्या अकबराच्या गोष्टीतल्या बिरबलाच्या खिचडी सारखी न शिजो म्हणजे झाले!

आम्ही कितीतरी वेळ बोलत बसलेलो. आता माझ्या विचारांचा लंबक पूर्णपणे तिच्या बाजूला झुकला होता. ती क्षणोक्षणी मला अजूनच आवडत होती. त्यात एका क्षणी बाकी सारे होईल मॅनेज वाटून गेले. सध्या ती समोर होती त्यामुळे माझ्या त्या दोन मनांना परत वादावादी करायला समोर येणे शक्य नव्हते. पण तिकडून कैलास मात्र समोरून येताना दिसला. माझ्या समोरच अंकिताला पाहून गुपचुप पुढे निघून गेला. आता कैलासला मला चिडवण्याचा आयता विषय मिळणार..

इतक्यात अंकिताचा फोन वाजला..

"आय ॲम हिअर ओन्ली ममा.. आय विल कम.. सून." म्हणत तिने तो मोबाईल ठेवला. तेव्हा खूपच कमी जणांकडे असा मोबाईल दिसायचा. तेव्हा कँटीनमधले सगळे आमच्याकडे पाहात होते..

"साॅरी.. माझी मम्मी.. शी इज लाइक दॅट ओन्ली!"

"आॅल मदर्स आर लाइक दॅट! लकीली माझ्याकडे हा मोबाईल नाही!" पुढे मनातच म्हणालो,'सो नो ट्रॅकिंग बाय माय मदर!'

एकूण तिच्या बोलण्यावरून ती घरी न सांगता आली असावी. म्हणून गाडी तिकडेच सोडून आली असेल का? मी काही विचारण्याच्या आत अंकिता म्हणाली,

"यू नो, शी इज इन फार्म्याक डिपार्टमेंट. अँड डॅड इज मेडिसिन हेड.."

"चांगलंय, घरातच दोन डाॅक्स! गुड फाॅर गायडन्स!"

"गायडन्स? नो! बट आय गाॅट डिस्टिंकशन्स आॅन माय मेरीट .. लोक म्हणतात पेरेंट्स नी पुल लावला.. आय नो आय डोन्ट नीड दॅट. तुला सांगू पण, इफ आय वाॅज अ डंबो, माय फादर वुड हॅव डन दॅट. ही कॅन डू एनिथिंग फाॅर मी. पण माय माॅम इज मोअर ग्राउंडेड. मी फेल झाले ना तरी शी वोन्ट पुट इन एनी वर्ड. शी फिल्स आय शुड बिकम स्ट्राँग ॲंड फेस द वर्ल्ड! व्हेरी अनलाइक माॅम्स.. पण आहे हे असे आहे.. चल. आय नीड टू गो.. नाहीतर माॅम विल काॅल अगेन."

"अजून कुठलं नकोय ना पुस्तक? फार्म्याक.. फाॅरेन्सिक?"

"सध्या नको. लागलं तर परत येईनच.."

ती परत येण्याची सोय करत असावी.. 'नाहीतरी मला काहीतरी रिझन हवेच आहे..' ती अगदी हळूच पुटपुटली, पण मी ते ऐकलंच..

ती निघाली. मी सोडायला बस स्टाॅपवर आलो. बसला गर्दी खूप. अशा बसेस मध्ये चढायला प्रॅक्टिस लागते. मला वाटलं ती टॅक्सी पकडून जाईल. पण नाही. दोन बसेस सोडल्या, तिसऱ्या बसमध्ये चढली ती. तशाच गर्दीत. तिला पाहून वाटले, ही खरंच माझ्यासाठीच इतकी वेडी झालीय की काय?