संध्यकाळीची वेळ होती बाहेर पाऊस पडत होता राघव गॅलरी मध्ये उभा राहून पाऊस न्यहाळात होता रीमा हि त्याला पाहत उभी होती एवढ्यात राघव च्या पापण्या ओल्या झालेल्या रीमा च्या नजरेस पडल्या
"राघव ये राघव "
"अरे रीमा तू कधी आलीस "?
"पांच मिनिटा पूर्वी जेव्हा तू पाऊस पाहण्यात गुंग होतास "
"हो का "
"काय रे काय झालं तू रडतोस "?
"काही हि रीमा कुठे"?
"मग तुच्या पापण्या ओल्या कश्या झाल्या "
"ते हो "
"अशाच "
"राघव तुला काय वाटत १0 वर्षाच्या ह्या आपल्या साथीला मी तुला ओळखत नाही "
"म्हणजे "
"तुच्या डोळ्यात उगाचच पाणी येणं शक्य नाही"
"काहीही रीमा तू जेव्हा कांदा चिरताना तुला हि रडू येतच ना "
'राघव त्या रडण्यात आणि तुच्या भावुक होण्यात फरक आहे सांगायच नसेल तर नको सांगू पण उगाचच कसली कारण देऊ नको हा घे आल्याचा चहा '
'चहा "
'हो बाहेर मस्त पाऊस पडत होता म्हणून केला '
"बर धन्यवाद मॅडम "
रीमा राघव च्या चेहऱ्याकडे पाहत होती
'काय झालं रीमा कशी काय पाहतेस मला"?
तुच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे
'तुला कसं का वाटते की काहीतरी झालं म्हणून
"राघव प्रेम करते तुझ्या वर बायको आहे तुझी तुझया मनाची अवस्था मला कळणार नाही तर कोणाला कळेल सांग ना "
"म्हणजे आज माझी सुटका नाही तर "
"नाही"
'तसं ही मला तुला सांगायला काही वाटत नाही कारण तु माझी मैत्रीण पहीली आणी बायको नंतर आहेस "
'अच्छा तर बोला'
समोर असलेल्या खुर्ची वर रीमा बसते
"रीमा काही वर्षापूर्वी आमच्या लग्नापूर्वी माझं ट्रान्स्फर पुण्याला झालेली माझी भटकंती ची नोकरी त्यामुळे आई बाबा गावी असायचे आणि मी मात्र फिरत असायचो सुदैवाने मला आता चांगली भटकंती न करणारी नोकरी मिळाली असो तर मी तेव्हा एकता नावाच्या सोसायटी मध्ये राहायचो त्यावेळची हि गोष्ट माझ्या समोरच्या इमारतीत एक मुलगी राहायची असाच पाऊसाचा काळ होता बाहेर पाऊस येण्याची शक्यता होती त्यामुळे मी पाऊसप्रेमी गॅलरी राहून पाऊस पाहत होतो ती हि आपल्या गॅलरीत उभी होती
ती आकाशाकडे एकटक पाहत होती तिच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव उमटलेले बाहेर वातावरण हि पाऊसाने ढगाळ झाले होते तेव्हड्यात सोसाटयाचा वारा आला तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले पण तिला कदाचित त्याचे भान नव्हते तिच्या मनात काहीतरी चालू होते तिचा कंठ दाटून आल्या सारखा वाटत होता अचानक ती रडू लागली आणि पाऊसाने हि आपली सरी बरसली एकीकडे ती तिचे दुःख होते तर एकीकडे पावसाच्या आगमनाने सुष्टी प्रफुल्लीत होताना दिसत होती तिनी आपले अश्रू पुसले आणि आत केली पण माझ्या मनात मात्र तिचे रडणे घर करून केले एकच विचार येत होता कि ती का रडत होती ?
दुसऱ्या दिवशी सकाळी ती मला सोसायटीच्या पार्किंग मध्ये भेटली मी तिला पाहून हसलो तर ती काहीही भाव न देता आपल्या सकूटी वर निघून गेली हे त्या वॉच मन काकांनी पाहिलं ते पुढे आले आणि मला म्हणाले
"राघव साहेब ती अशी का केली न हसता ह्याच्या विचार करत आहात ना तुम्ही"
मी काका कडे अचंबित होऊन पहिले तर ते म्हणाले" तुम्ही हसताना मी पाहिलं पण तीच असं जाण कोणालाही नाही आवडणार पण त्यात तिची काही चूक नाही" मग काकांनी मला तिची स्टोरी सांगितली आणि काका बोलू लागले
"ती माझ्या मित्राची मुलगी मीरा हे तिचे नाव खूप चांगली प्रेमळ हुशार अशी मुलगी वयात येताच लग्नासाठी तिच्या आई बाबांनी चांगली स्थळ शोधण्यास सुरुवात केली आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळावा हीच इच्छा होती त्याची असेच एक स्थळ आले मुलगा बिसनेसमॅन दिसायला पण साधा सरळ मग काय दोन्ही कडून होकार आला आणि मीरा ला राहुल हा जोडीदार भेटला नवं नवलाईचे दिवस सुरु झाले पण राहुल सतत आपल्या मिटींग्स प्रोग्रेस ह्यातच गुंतलेला असायचा मीरा साठी त्याच्या जवळ वेळच नसायचा असेच वर्ष होत आलं पण मीरा संसारात खुश नव्हती ती मानसिकरीत्या खूप खचली होती तिनी राहुल शी स्पष्ट बोलायचं ठरवलंअसेच एक दिवशी राहुल आपल्या लॅपटॉप वर काम करत होता ती समोर बसली राहुल आपल्या लग्नाला वर्ष झालं पण तुला माझ्यासाठी वेळ काढावासा कधी कसा वाटला नाही सतत तुच्या त्या मिटींग्स ह्यातच असतो तू माझा विचार तू कधी करणार राहुल ने तिला मागे पुढे न पाहता मला तुच्या साठी फुकट वेळ काढायला वेळ नाही मेटिंग्स मध्ये मला चार पैशे भेटतात तुला वेळ काढून काय करू मीरा ने हि सडेतोड प्रश्न विचारला मग लग्न कशाला केलंस त्याच उत्तर ऐकून मीरा कोलमडली मला लग्न करायचंच नव्हतं आई मागे लागली म्हणून नाही तर मला संसार ह्याच्यात काडीचा हि रस नाही हे ऐकून मीरानेआपले भविष्य अंधारात आहे हे पाहून न डगमगता माहेर गाठलं आणि त्याच्यापासून कायमच नातं तोडलं दुसरा लग्नाचा विचार तीनी सोडून दिला आई बाबा नाआणि विवाहित भावाला त्रास नको म्हणून तीने दुसरी कडे राहायचं ठरवलं आणि माझी ओळख असल्याने तिने इथे राहण्याचा निर्णय घेतला चांगल्या पोरीच्या जीवनाची त्या गधड्या मुळे वाट लागली "
हे सगळं ऐकून मन बधिर झालं तरीही मी काकांना प्रश्न केला कि "त्या मुलाच्या आई वडिलांनी काहीच केलं नाही" तर ते हि तसलेच आपलेच घोडे पुढे नेणारे असे काका म्हणाले मला उशीर होत होता त्यामुळे काकांचा निरोप घेऊन मी निघालो पण मीरा चा विचार मनातून जात नव्हता आणि सुदैवाने कि काय संध्यकाळी ती मला रस्त्यात उभी असताना दिसली पाऊस पडत होता मी तिला पाहून माझी बाइक स्लोव केली
"काय झालं तुम्ही इथे भर पाऊसात उभ्या का"?
"नाही सकूटी पंचर झाली आहे"
"अरे मग मी सोडतो तसे हि पाऊसात किती वेळ उभ्या राहणार उद्या सकाळी पंचर काढून घ्या "
तिला हि ते पटले आणि ती माझ्या बाईक वर बसली आणि आमची सफर सुरु झाली मात्र दोघेही गप्प होतो सोसायटीच्या कंपाउंड मध्ये शिरतात मी गाडी थांबवली तसे तिने थँक्स म्हणत ती गेली साधं माझं नाव सुद्धा विचारलं नाही
दुसऱ्या दिवशी मी मुदाम तिची वाट पाहत राहिलो ती बाहेर येताच "निघूया" असे म्हणताच तिनी "नको मी जाईन ऑटो ने "मी पण म्हणालो "कशाला सोडतो आणि तुमची सकूटी पण दुरुस्ती करायची आहे ना" तिला हे हि पटलं आणि ती माझ्या बरोबर आली तिचा नकार असताना हि मी तिच्या बरोबर सकूटी सारखे करे पर्यंत थांबलो तिला तिच्या ऑफिस ला सोडून मी माझ्या कामावर वेळेत रुजू झालो आणि ह्या पावसामुळेच आमची मैत्री जमली तुम्ही वरून मी तिला मीरा म्हणू लागलो आणि ती हि राघव
मग काय मस्त मैत्री सुरु झाली आम्ही बाहेर भेटायचो पण एकमेकांच्या फ्लॅट मध्ये नाही कारण लोकांच्या मनात उगाच शंका नको म्हूणन अशी आमची मैत्री दिवसें दिवस बहरत जात होती एकमेकांच्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी आम्ही करू लागलो ती नि हि निसंकोच पणे मला तिच्या आयुषाची काळी बाजू सांगितली पण मला काहीच माहित नसल्या सारखे मी वागलो आणि परत काहीतरी विनोद करून तिला भरभरून हसवलं अशी आमची मैत्री खूप घट्ट झाली होती पण मला तिला सुखी पाहायचं होत आणि मी हे करू शकतो हे माझ्या मनाने मला सांगितलं माझ्या मनात मीरा विषयी एक नाजूकसा असा कोपरा तयार झाला होता मी ठरवलं मी माझ्या मनातली गोष्ट तिला सांगणार आणि अश्याच एका संध्याकाळी आम्ही कॅफे मध्ये बसलेलो मैत्रीच्या गोष्टी चालू होत्या मी मीरा कडे पाहून म्हणालो
"मीरा मला तुला काहीतरी सांगायच आहे" मनात धाकधूक होती पण मी हिम्मत केली
ती ने पटकन हसत हसत "काय सांग काय सांगायचं आहे तुला "?
"मीरा माझा जोडीदार म्हूणन स्वीकार करशील "?
माझ्या ह्या प्रश्नाने ती गोधळली माझ्या कडे पाहत "नाही राघव हे अशक्य आहे तू असा विचार हि कसा करू शकतो माझा भूतकाळ तुला माहित आहे आणि तरी हि तू
"मीरा मला तुझा भूतकाळ माहित आहे पण तू तुझ्या भविष्य काळ विषयी का नाही विचार करत आयुष्य भर अशीच एकटीच कशी राहणार तू आणि तुला माझ्यावर विश्वास नाही आहे "
"हे बघ राघव तू खरंच एक चांगला मुलगा आहेस आणि तू तुच्या जोडीदाराला नेहमी खुश ठेवशील यात तिळमात्र शंका नाही एक मित्र म्हणून तू एव्हडा चांगला आहे तर साथीदार म्हूणन का नाही पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यावर मी अटळ आहे "
"हे बघ मीरा मान्य आहे तू खूप सोसलस पण एकदा तू पडलीस म्हणून चालायचं सोडणार का हे बघ नीट विचार कर मला घाई नाही आहे "
"राघव मला त्या धाग्यात परत गुंत्याचं नाही आहे मी तुचा स्वीकार एक चांगला मित्र म्हणूनच करेन आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे "
आणि ती थेथून निघून गेली मला हि तिला मैत्रीण म्हुणुन गमावयाच नव्हतं मी घरी आलो खूप विचार केला आणि ठरवलं मैत्री तर मैत्री मी तिला फोन केला पण तिनी उचला नाही दोन दिवस ती मला दिसली नाही मी वॉच मेन काकांना विचारलं तर त्यांनी तिची ऑफिसतर्फ़े राहण्याची सोय केली आहे असे सागितले हे कितपत खरे होते कि माझ्या पासून दूर जाण्याचा तिचा बहाणा मला तिनी कसली खबर दिली नव्हती फोन बंद येत होता संप्रर्क तरी कसा करायचा आणि माझी बदली झाली मी दुसऱ्या शहरात पोहचले पण पाऊस पडला कि नेहमी तिची आठवण येते आज ती कुठे आहे माहित नाही पण अजूनही एकटीच असेल
राघव चे डोळे भरून आले रीमा ने त्याला सावरले
राघव ने रीमा कडे पाहून "सॉरी रीमा आणि थँक्स ऐकून घेतल्याबद्दल "
"सॉरी कश्यासाठी खरंच तिला आधाराची गरज होती ती तू देत होतास म्हणजे तूच पहिलं प्रेम मीरा हो ना "
"असेल कदाचित पण माझं सर्ववस्व तू आहेस रीमा आणि गम्मत बघ ना तुम्हा दोघांची नाव पण उलट सुलट एकच होतात"
'अरे हो की"
"रिमा आपण आपल्या छवीला तिच्या मनपसंत जोडीदार निवडण्याचा अधिकार द्यायचा हा जे मिराच्या बाबतीत घडलं ते कुठल्याही मुलींच्या बाबतीत घडु नये एका निर्णयाने मिराचे आयुष्य एकटे पडले"
"बरोबर आहे तुझं पण वेड्या आपली छवी सहावीत आहे तिच्या जोडीदाराच्या गोष्टी लांबच्या गोष्टी आहेत"
"
हो ग ते ही खरंच आज तुझ्या शी मनमोकळ करुन बरं वाटलं खुप भाग्यवान आहे तुझ्यासारखी बायको मिळायला एवढी समजूतदार"
तेवढ्यात पाऊसाची जोरात झडप येते आणी दोघांवर येऊन बरसते.