त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंतर त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे सरळ पुढच्या दिशेने जावू लागते..
त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे तिला पुढे चालत गेल्यावर खरच त्या भिंतीच्या पलिकडे पाण्याचा आवाज ऐकू येतो. तिला मनोमन खूप आनंद होतो कारण तिथूनच तिला पुढचा मार्ग मिळणार असतो पण तितकच भयाचे भाव पण दाटून येतात. कारण तिथे सगळ्याच गोष्टींपासून धोका असतो.. काही वेळ जावाव कि नको अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते तरीसुद्धा आपल्या मित्रांसाठी आपल्याला गेलच पाहिजे तसही इत राहिलो तरी कधीना कधी काळ आपल्याला घेऊन जाणारच आहे त्यापेक्षा आपण प्रयत्न करूया अस स्वतः शीच ठरवून जायला तयार होते..
कावेरी ती भिंत पाडण्यासाठी हातात एक दगड घेते आणि त्या भिंतीवर जोरात आदळते. आधी तर तिला वाटलेले भिंत पडायला वेळ लागेल पण आश्चर्य म्हणजे ती भिंत लगेचच खाली कोसळते जणू काय ती जागा सुद्धा तिची वाट पाहत आहे...
जस ती भिंत खाली कोसळते तस लगेचच ती चे पाय वरवर सरकतात व पाण्याचा प्रवाहच्या प्रवाह तिच्याकडे मोठ्या लाटेच्या स्वरूपात येवू लागतो ते पाहून ती तर गोंधळूनच जाते ती त्या पाण्यात बुडण्यापासून स्वतः ला वाचवण्यासाठी हात पाय हालवण्याचा प्रयत्न करते पण तीचे हात पाय खांबासारखे ताठ होतात जणू काय ते सुद्धा आता तिच्या विरोधातच आहेत.. पाणी तर नाकातोंडात शिरत आल होत. पण तिला असही होत त्या जागी हे त्या स्त्री कडून कळालेलच असत.
ती स्वतः चच डोक जोरात हलवते तस डोक्यातला चाप खाली पडतो ती तसच थोडस खाली वाकत चाप तोंटात धरते आणि स्वतः च्याच हातावर पायावर वार करते तस हात पाय हलू लागतात तस ती तरंगत पुढे पुढे जावू लागते...
अचानकच ते पाणी वायूच्या रूपात परिवर्तीत होत इतक कि ती सुद्धा तो वायू जिथे घेऊन जाईल तिथे वाहत जाईल अशाप्रकारे तरीही ती जोर लावत हात पाय जमिनीवरच ठेवण्याचा प्रयत्न करते.. पण तरीही वायूच्या शक्तीपुढे तिची शक्ती विफल ठरत असते.. तिला त्या जागेतून आणलेल्या मातीची आठवण येते आता मातीच आपल्याला मातीवर उभ राहायला मदत करेल अस म्हणून ती ओढणीत बांधलेली माती स्वतः च्या हाता पायाला आणि चेहऱ्याला लावते तस तीचे पाय आपोआपच खाली येऊ लागतात.
ती कशीबशी खाली येतेच तोवर आभाळातल्या चांदण्या एक एक करत तिच्यावर आदळण्यासाठी खाली वेगात येवू लागतात एक चांदणी तर इतक्या वेगात येते कि ती ने काही हालचाल करण्याआधीच तिच्या पायावर पडते तस ती चा पाय पेट घेतो तिला कळतच नाही काय कराव पाय जळत आलेला त्यासोबत तिचा वेदनेने जीव पिळवटून निघत होता.. ती ने पटकन ओढणी हातात घेतली आणि पायावर जोरजोरात त्याचे फटके मारु लागली तशी आग विजली.. पण परत आणखी बऱ्याच चांदण्या खाली येत होत्या ते पाहून ती ने एका दगडाचा सहारा घेतला..
ती तो दगड हातात घेऊन ते चांदण्यांचे वार चुकवत चुकवत पुढे चालली. काही वेळाने चांदण्या परत आकाशात परतल्या जणू काय त्यांची वेळ संपली. ती थोड पुढे गेली तोवर तिला दरदरून घाम फुटला कारण तिला श्वासच घेता येईना. ती एकसारखा प्रयत्न करत होती पण काही केल्या तिला श्वासच घेता येईना.. आता तर अशी अवस्था झाली कि आपला प्राणच जाणार आहे. तरीही थोड अजून पुढे जा अस करत करत मनातल्या मनात स्वतः ला प्रेरित करू लागली व तसच पुढे पुढे जावू लागली..
पुढे गेल्यानंतर पुन्हा श्वास घेता येऊ लागला तेव्हा ती च्या जीवात जीव आला. ती मोकळा श्वास घेऊ लागली तोवर समोरून आगीचे गोळे येऊ लागले. ते तसेच चुकवत चुकवत ती पुढे जावू लागली.. पण तिला याची कल्पना नव्हती की तिच्या मागूनही आगीचे गोळे येत आहे.. थोडी गरमी जाणवू लागल्यावर ती ने मागे वळून पाहिले तर दहा पावलांवरून जोरात आगीचा गोळा येत होता. तीने खालची माती उचलून गोळ्याप्रमाणे एक करून त्यादिशेने फेकली तसा तो गोळा तुटला व आगीचे कण आजूबाजूला विखुरले गेले त्या जागेने पेट घेतला तस ती तिथून पळत दुसऱ्या दिशेने जावू लागली...
ती चालत चालत पुढे गेली तोवर तिला जमीन वर येत आहे अस जाणवू लागल तीच्या पायाखालची जमीन हादरू लागली ती खाली वर होवू लागली व कावेरीला वर ढकलून परत वेगात खाली येवू लागली यामुळे कावेरीच पूर्ण शरीर वर खाली अस कोसळू लागले. तिचा वेग नंतर इतका प्रचंड वाढला कि आता कावेरीच डोक फुटून त्यातून रक्त येईल याची जाणीव होताच कावेरीने त्या जागेतून आणलेली एक वनस्पती खाली आदळली तशी जमीन शांत झाली. तिला थोड बर वाटल ती मनाशीच म्हणली तरी बर ही वनस्पती आपण घेऊन आलो आधी तर वाटलेल हिची गरज लागणार पण असु दे म्हणून सोबत ठेवली ते बर झाल.
ती परत पुढे जावू लागली तोवर आकाशातून खाली येत ढग तिला वर ओढू लागले तिचा तर स्वतः वरचा ताबाच सुटलेला इतकि त्या ढगांची क्षमता अफाट होती.. काळ्या ढगात धुरकटलेले ते ढग आज तिचा काळ बनून तिला स्वतः कडे ओढत होते.. ती ने पाठिमागे बांधलेल एक अवजार सुतळी काढून हातात घेतल व त्या ढगासमोर लावल तस ते ढग दूर जावू लागले ती परत जमिनीवर येऊ लागली... ते अवजार रामायणात ज्या काठीपासून रामाने सीतामातेसमोर लक्ष्मण रेषा तयार केलेली त्या काठीपासून बनलेल होत. कावेरीच सुदैव कि काय तिला ते त्या खड्ड्यात सापडलेल. व ती येताना सोबत घेऊन आलेली..
ती परत पुढे पुढे जावू लागली तस तिला समोर एक प्रकाशाने लख्ख उजळलेली जागा दिसू लागली. पण तो प्रकाश इतका तीव्र होता तिला आपली दृष्टी जाईल कि काय असच वाटू लागल ति ने पटकन ओढणी डोळ्याला बांधली व त्यातून पुढे बघू लागली.. पुढून एक राजा तिच्यासमोर येवू लागला.. तो तिला म्हणाला आलीस तुझीच वाट पाहत होतो. तुला मार्ग दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे.. आता अंधारान कहरच गेलाय आमच्या राजवाड्याच्या निम्म्या जागेत स्वतः च स्थान उभ केलय आम्हाला कोणाची तरी गरज होतीच.
पण तुम्ही तुम्ही कोण आहात. ते सांगण्याची आता वेळ नाही आहे.. आधी तुला आम्हाला दहा मिनिटात एक सांकेतिक भाषा शिकवायची आहे तुला लक्ष देऊन दहाच मिनिटात ती भाषा हस्तगत करावी लागेल आहेस तयार. जरी तयार नसशील तरी मनाची तयारी कर कारण हि भाषाच तुला आणि तुझ्या मित्रांना बाहेर पडण्यासाठी मदत करू शकते.
कावेरी थोडा विचार करते आणि तयार होते.. राजा तिला ती भाषा शिकवायला सुरू करतो त्या भाषेतले ते शब्द इतके कठिण असतात. कि कावेरीला लक्षात ठेवण कठिणच जात होत तरीही ती आपल्याला आता बाहेर पडायचच आहे असा निश्चय करून शिकवलेले शब्द आपल्या भाषेतल्या एखाद्या शब्दाशी जोडून लक्षात ठेवत असते...
दहा मिनिटात ती भाषा शिकवून राजा आपोआपच गायब होतो. व परत तिथला प्रकाश नाहीसा होतो. त्या भाषेच चिंतन करत करत ती परत पुढे जावू लागते.. ती पुढे जाते तर तिला वाटेत कोणीतरी बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत दिसत.. ती त्याच्या जवळ जवळ जावू लागते.