ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार........ वीर म्हणाला....
अरे गप्प शांत हो नाहीतर आपला आवाज त्यांना ऐकू जाईल.... अनूश्री वीरला समजवू लागली.....
नाही खोट आहे हे सध्या तर विश्वासच बसत नाही आहे माझा..... वीर म्हणाला.....
तेरी मेरी दोस्ती...... अस म्हणत अनूश्रीने वीरच्या तोंडावर हात ठेवला..... व म्हणाली.... शांत हो हे वाक्य पूर्ण नको करू आताच आपल्याला सगळ्यांनाच आधी एकत्र याव लागेल.... जर हे वाक्य त्यांना ऐकू गेल तर एकमेकांना ओळखण नंतर अजूनच अवघड होईल... कारण ते त्याचाही वापर करतील.......
अस म्हणत अनूश्रीने वीरच्या तोंडावरचा हात काढला....
पण तु इथे कशी पोहोचलीस पण थॅंक्स गॉड तुझी तरी भेट झाली... मी तर नाउमेदच झालेलो कि आता आपली भेट होणारच नाही म्हणून.... अस म्हणता म्हणता वीरच्या डोळ्यात अश्रू तरळले... ते पाहून अनूश्रीच्या डोळ्यातही अश्रू तरळले.... त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली...
पण परत वीरच्या लक्षात आले की वेळ कमी होत चाललाय......
बर अनू तू इथे कशी पोहोचलीस ते सांग ना....... वीर म्हणाला.
हो हो सांगते पण नंतर आधी बाकिच्यांना शोधूया का आपण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे..... अनूश्री म्हणाली....
हो शोधूया पण आधी आपल्याला पुस्तक शोधाव लागेल.... त्याची वेळ संपत आली आहे..... वीर म्हणाला...
हो मला पण त्या स्त्रीने पुस्तकाच सांगितले.... अनूश्री म्हणाली...
कोण कोण स्त्री कोण भेटल तुला...... वीर विचारू लागला...
सांगते सांगते सगळ नंतर पण आधी पुस्तक शोधूया....
हो शोधूया ...... वीर म्हणाला
कसे कसे आले ते दोघ एकत्र सांगितलेल ना त्यांच्यापैकी कोणालाच एकत्र येवू द्यायच नाही..... तो म्हातारा समोरच्या बाईला ओरडून म्हणत होता.....
हा मी मी तो प्रयत्न करत होते पण ती मुलगी लयच हुषार निघाली ती ने....... अस म्हणत ती मुलगी कशी वीरपर्यंत पोहोचली ते ती सांगणार होतीच तोपर्यंत त्या माणसाने त्या बाईच बोलण मध्येच तोडल...
ए त्या मुलीची हुषारी ऐकण्यात काही रस नाही हा मला.... आधी जा आता त्या दोघांना काहीही करून परत वेगळ कर.... तोपर्यंत मी बाकिच्यांचा पण बंदोबस्त करतो.... आता यांना संपवायची तयारी केली पाहिजे.... खूप खेळवून झालय एकदास संपवूया आता यांना आणि बदला घेवूया..... हा हा हा..... तो माणूस म्हणाला......
अरे वीर ते पुस्तक शोधायच कस काही मार्ग माहिती आहे काय? तेव्हा वीर संक्षिप्त स्वरूपात त्या सभापंडपात झालेली घटना कथन करतो......
अरे त्यांचा अर्थ तुला मिळालेला कॉईन तोच तर नसेल ना पहिला मार्ग..... अनू म्हणाली.....
अग हा असू शकत पण त्यांनी तर तो त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आणायला सांगितलेला.... मग कॉईन कस काय पहिला मार्ग असू शकतो...... वीर विचारू लागला..
अरे पण वीर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तु तिथे जातोस का? या गोष्टीवरून त्यांनी तुझ्यातल्या खरेपणाची पारख केलीच असेल कि...... बर ते जावू दे तुला आता पटत नाही आहे ना सोड आपण दुसरा मार्ग शोधू म्हणजेच पहिला मार्ग असू शकतो कि नाही ते पण समजेल..... अनू म्हणाली....
वीर आणि अनू पुस्तक शोधायला परत निघतात..... पण त्यांच्या नकळत कोणीतरी त्यांचा पाठलाग करत हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत असत. ......
अनूला याची जाणीव होते ती मागे वळून पाहते तेव्हा समोर एक स्त्री दिसते ती जोरात वीरला आवाज देते.... तस वीरही लगेच मागे बघतो......
अनूला एक प्रकारचा आवाज ऐकू येतो.... अनू ये अनू अग इकडे ये ना..... आपल्याला सगळ्यांना शोधायला जायच आहे.... असा कावेरीचा आवाज ऐकू येतो......
अनू हळूहळू त्या आवाजाच वेध घेत मागे वळून त्या दिशेने चालू लागते......
वीरला जाणवत कि अनू मागे नाही आहे तो मागे वळतो व पाहतो तर अनू हरवल्यासारख स्वतः च्याच तंद्रित चाललेली असते..... वीर तसच धावत जातो आणि तिला मागे खेचतो.....
अनू अनू कोठे चाललेस तू तरी आपल्याला त्या खोलीत बॅटरी मिळाली म्हणून पाहू तर शकलो नाहीतर परत या अंधाराने आपल्याला वेगळ केल असत... अरे हो रे.....
पण तू कोठे चाललेलीस अचानकच......
अरे तिथून कावूचा आवाज.... म्हणजे अजून पण आपल्याला वेगळ करण्याचा प्रयत्न चालू आहे... चल आता आपण कोठेही लक्ष न देता पुस्तक शोधूया....
अस म्हणत झालेली गोष्ट विसरत ते दोघे परत एकमेकांसोबत चालू लागतात.....
वीरच्या एक खोली लक्षात येते जिथे तो काही न बघता तसाच पुढे आलेला त्याला राहून राहून तीथच आपण चूक केली अस वाटत असत....
ये अनू आता आधी आपण एका वरच्या खोलीत तपासूया .....
हो चालेल चल ना मग.... ते वेळ संपत आलाय म्हणून एकमेकांचा हात पकडत धावत धावत त्या खोलीत जावू लागतात......
तोपर्यंत मागून कोणीतरी अनूचा पाय ओढू लागत.....
अनू चल ना काय झाले आपल्याला लवकर पोहोचायच आहे नाहीतर वेळ संपून जाईल.....
अरे माझा कोणीतरी पाय धरला आहे तू तू जा पुढे मी येते नंतर आपल्याला ते पुस्तक मिळालच पाहिजे... तू जा मी येतेच.....
नाही मी अस सोडून तुला नाही जाणार आपण एकत्रच जायच मग काहीही होवो.... मला त्याची पर्वा नाही.....
ये वीर अस नको करू तु जा सगळ्या मित्रांना वाचवण तुझ्याच हातात आहे तु जा तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे अस म्हणून अनूश्री वीरला पुढे जा अस विणवते....
पण तो तिच काहीच न ऐकता तीच्या पायाच्या पुढे बॅटरी मारतो तसच खिशात ठेवलेल्या काड्यापेटीची काडी पेटवून तिचा पाय पकडणाऱ्या त्या टोकदार नख असलेल्या हातांवर मारतो तस ती बाई विव्हळत दूर पळत जाते....
नंतर हळूहळू वीर अनूचा हात धरत तिला वर उठवतो..... व ती पुढे जावू लागतात तोच तेथील भिंती हलू लागतात वीर समजतो कि आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आता दोनच मिनिटू शिल्लक आहेत ते पुस्तक शोधायला....
ते लक्षात येताच दोघांच्याही जीवाची धडधड वाढते पण ती दोघ तशीच सार बळ एकवटून त्या खोलीत शिरतात....
वीरच्या हातात असलेला कॉईन अचानकच प्रकाशमान होतो ती खोली पूर्ण प्रकाशून जाते.... त्याला आता अनूच बोलण पटत कि हाच पहिला मार्ग होता......
तो जसजस पुढे जात होता तसतसा कॉईन आणखीनच चमकू लागतो एके ठिकाणी गेल्यावर परत निरभ्र होतो यावरून त्यांच्या लक्षात येत कि योग्य मार्गावर जात असताना कॉईन चकाकतो.....
वीरला आणखी एका गोष्टीच आश्चर्य वाटत कि मगाशी जेव्हा आपण इथे आलेलो तेव्हा तर झाड फुले असल्यासारखच सुगंध येत होता... पण आता इथे झाड वगैरे काहीच दिसत नाही आहेत कदाचित ती सुद्धा एक मायाच होती......
वीर कोठे हरवलास आपल्याकडे एकच मिनिट आहे चल लवकर घाई कर... अनूश्रीच्या बोलण्याने वीर भानावर आला.....
वीर एका कपाटाच्या इथे जातो तस तो कॉईन त्याच्या हातातून आपोआपच हवेत तरंगत खालच्या बाजूस जातो... वीर त्या कपाटाखाली हात घालतो त्याच्या हातास ते पुस्तक लागते तो ते पुस्तक ओढून घेतो....
तस तिथल्या भिंती कोलमडू लागतात वीर तसच पुस्तक हातात घेतो. ते कपाट त्याच्या अंगावर पडणार असत तोवर अनू त्याला लगेच बाजुला ओढते मग दोघे तिथून पळू लागतात....