Hari - 9 in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | हरि - पाठ ९

Featured Books
Categories
Share

हरि - पाठ ९

हरिपाठ

२३
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४॥

२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्‍त ॥ ३॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४॥

२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १॥
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४॥

२६
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ १॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४॥

२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३॥
निजवृत्ति हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५॥

२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४॥
संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६॥


२९
कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १॥
मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २॥
देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४॥

कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १ ॥

मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २ ॥

देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४ ॥

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥

अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥

योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥

ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥

नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥

ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥

रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥

हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥

ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४

कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १ ॥

मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २ ॥

देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४ ॥

असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥

अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥

संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥

श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी