Rutu Badalat jaati - 12 in Marathi Love Stories by शुभा. books and stories PDF | ऋतू बदलत जाती... - भाग..12

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

ऋतू बदलत जाती... - भाग..12



ऋतू बदलत जाती....१२.

"आजीने फोन स्पीकर वर टाकला होता त्यामुळे महेशिला हे ऐकू गेले. अनिकेत काय बोलला होता ते . तिलाही हायसं वाटलं..संध्याकाळी परत तिला त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं होतं. जेणेकरून तो संध्याकाळीही पोटभर जेवेल.. तिला आठवलं एकदा तो म्हटला होता मेथीची डाळ घातलेली कोरडी भाजी त्याला खूप आवडते, थोडीशी गुळचट चवीची मात्र.. त्याची आई बनवायची तशी. पण आई गेल्यावर त्याने ती भाजी खालीच नव्हती .कारण तसं कुणी बनवायच नाही. मग त्याने ती भाजी खाणंच सोडलं.
आज तीच भाजी बनवायची तिने मनाशी पक्के ठरवले.

आता पुढे....

अनिकेत ऑफिसमधून घरी येत होता ,रस्त्यात बार लागतो तिथे त्याने जरावेळ गाडी थांबवली, पण लगेच त्याच्या मनात काय आले ,त्याने गाडी परत सुरु केली आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली .शांभवी त्याच्या सोबतच होती.

"हॅलो ..मी डॉक्टर शांभवी पाटील यांच्या एक्सीडेंट केस ची चौकशी करायला आलो आहे.. कोण हँडल करतेय त्यांची केस मला कळेल का ...??अनिकेतने एका हवालदाराला विचारले.

"तुम्ही मिस्टर पाटील ना .. ?? हवालदार.
अनिकेतने मान डोलवली.

" विशाल सर हँडल करत आहे ही केस ....तिकडे आत केबिनमध्ये असतील.."हवालदाराच्या बोलण्यावर अनिकेतने मान डोलावली आणि तो त्या केबिनमध्ये गेला.

"हॅलो मिस्टर विशाल... मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना..??"अनिकेत आत येत बोलला.

"नो मिस्टर अनिकेत ...पण आज तुम्हाला इथं बघून थोड आश्चर्य नक्की वाटलं.."विशाल.

"मी माझ्या दुःखात एवढा गुरफटून गेलो होतो की, काही गोष्टीचा तपास, शहानिशा करायचेही माझ्या डोक्यात राहिलं नाही...."अनिकेत खुर्चीवर बसत बोलला.

"हा बरोबर आहे ते ....तुमची मनस्थितीच तशी होती.... पण आजीं यात लक्ष घालून होत्या ...त्या विचारपूस करत होत्या.."विशाल.

"मग काही कळलं का तुम्हाला...? एक्सीडेंट कसा झाला ते ..?नेमकं रिजन काय होतं .??.."अनिकेत.

"सर ..तो ट्रक तर निघून गेला होता, पण आम्हाला एक लिड भेटली आहे. त्या ट्रकचा नंबर आजच आम्हाला भेटला आहे, काही तासांमध्ये कुणाचा आहे ते कळेल..."विशाल.

"तुम्हाला काय वाटतं इन्स्पेक्टर.... एक्सीडेंट घातपात असेल का योगायोग...??"अनिकेत.

"आधीही मी तुम्हाला चौकशीत विचारलं होतं... पण कदाचित तेव्हा तुमची मनस्थिती नव्हती .... तुम्हाला कोणी शत्रू तर नाही ना..? जो तुम्हाला त्रास देण्यासाठी असं काही करू शकतो..??"विशाल.

"नाही सर ....माझे कोणी शत्रू वगैरे नाही आहेत.."अनिकेत.

"मग असं कोणी होतं का.. ज्यांना शांभवी मॅडम आवडत होत्या..??"विशाल.

"मि. विशाल ..!! काय विचारत आहात तुम्ही..??"अनिकेत.

"सॉरी सर... आम्ही सर्व बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करतो ..म्हणजे बऱ्याच वेळा एक तर्फी प्रेमामध्ये असल्या गोष्टी होतात... बरं
तुमच्या हॉस्पिटल मध्ये ....तिथं कोणी होतं का जे शांभवी मॅडमवर जलस होते.. किंवा त्यांना शांभवी मॅडम आवडत होत्या असं....."विशाल.

शांभवी तिथंच होती,ती सर्व ऐकत होती .तेव्हा तिला अचानक लक्षात आले ,त्या दिवशी नर्सने तिला फोन करून बोलावलं होतं ,हॉस्पिटलमध्ये कुठलेच डॉक्टर तेव्हा नव्हते. "म्हणजे यामध्ये त्या डॉक्टरांचा किंवा त्या नर्सचाही हात असू शकतो का..? घरी जाऊन या विषयावर क्रिशशी बोलावं लागेल.."ती विचार करत होती.

"नाही सर ...माझ्या माहितीत असं कोणी नव्हतं .. ती सर्वांशी मिळून मिसळून नीट वागायची..."अनिकेत.

"त्यांच्या काॅलेजमध्ये.... वगैरे ..."विशाल.

" हे मला तिच्या मैत्रिणीला विचारावे लागेल ...तस मला समजलं तर मी तुम्हाला कळवतो...."अनिकेत.

"मीही बघतो..."विशाल.

" हो तुम्हाला कळलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा... आजीशी आता कॉन्टॅक्ट करायची गरज नाही ...मी अव्हेलेबल असेल आता..."अनिकेत.

"तुम्हाला सावरलेलं बघून बरं वाटलं मिस्टर अनिकेत ... तसं मी तुमच्या आजीच्या मैत्रिणीचा चा नातू आहे ...त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख आहे... पण तुम्ही म्हणत असाल तर मी ह्या केसचं त्यांच्याशी डिस्कस नाही करणार..."विशाल.

"तसं नाही मिस्टर विशाल... पण आता पर्यत ठिक होत..पण आता यापुढे मी लक्ष देणार म्हटल्यावर उगाच आजीला त्रास कशाला...."अनिकेत.

"हो चालेल... मिस्टर अनिकेत मला फक्त तुमचा नंबर देऊन ठेवा ...सो आय कॅन कॉन्टॅक्ट यु डायरेक्टली.. " विशालने त्याच्याशी सुवर्णा विषयी बोलणं टाळलं, कारण क्रिश आणि आदिती ने त्याला शांभवी विषयी सर्व सांगितलेलं होतं आणि सुवर्णा बद्दल सांगणं म्हणजे शांभवी बद्दल सांगणं आलच म्हणून त्याने ते टाळलं... खूप वेगळी केस होती त्याच्यासाठी ही.

अनिकेत निघून आला,
त्याच्यासोबत शांभवी ही घरी आली.

आल्या आल्या तो सावीच्या रूमकडे गेला. तिथे महेशी सावीला फ्रेश करून तयार करत होती. तिच्याशी बोलत बोलत...
"आज माझ्या बबडीला गार्डन मध्ये खेळून कसं वाटलं..?? छान छान वाटलं का..?"महेशी.

"अले हे काय झालं? डास चावला का..?? उद्या आपन गार्डनमध्ये ना क्रीम लावून जावू ...आता मी काहीतरी लावून देते माझ्या बबडीला.. नाहीतर खाज सुटेल ना तिथे ...." बोलत बोलत ती सावीला तयार करत होती जेव्हा पूर्ण तयारी झाली तीने तिच्या गालावरती ओठ टेकवले.
"खूप गोड दिसते माझं सोनू.. चल आपण आता बाहेर जाऊ ...आजी सोबत खेळायचे ना बाबुला...? "महेशी सावीला घेऊन वळली तोच अनिकेतला धडकली.

"सांभाळून महेशी.. "अनिकेतने तिच्या दंडाला पकडून तिला सावरले.

"सॉरी ते माझं लक्ष नव्हतं..."महेशी.

"बघितलं मी ते ...दोघीजणी खूपच बिझी होत्या.. मी आलोय ह्याकडेही तुमचं लक्ष नव्हतं... "असं म्हणत त्याने सावीला महेशी कडून घेतले.

अनिकेत सावीला घेवून बाहेर आला .बाहेर आदिती क्रिश आणि आजी बोलत होते.
शांभवी सोफ्यावर बसली होती.शांभवी क्रिश ला रूम मध्ये चलायला सांगत होती,तेवढ्यात अनिकेत आला आणि शांभवी नेमकी जिथे बसली होती तिथेच बसत होता कि..
"अनिकेत ...शांभवी..!!!" क्रिश जोरात ओरडला.
अनिकेत सोप्यावर बसता बसता थांबुन गेला.

शांभवी लगेच तिथून दूर झाली.

"काय झाले तुम्ही ओरडले का... आणि शांभवी !! असं का ओरडले..??".अनिकेतने सोफ्याकडे बघत क्रिश ला विचारले.

"सॉरी मला तिथं काहीतरी चमकताना दिसलं.. मला वाटलं पिन वगैरे असेल.. म्हणून तुम्हाला थांबवलं...आणि ते सावी च्या ऐवजी शांभवी निघाले...."क्रिश कसतरी सावरत बोलला.

"इथे तर काहीच नाही आहे.."अनिकेत.

"हो ती उठून गेली ना.....!!"क्रिश पटकन बोलुन पडला.

"पिनला का पाय आहेत मिस्टर क्रिश..!! उठून जायला..?? "अनिकेत.

शांभवीने डोक्याला हात मारला. आदितीही हसायला लागली..

"हा म्हणजे मला म्हणायचं होतं की कदाचित माझा भास असेल."क्रिश..

"बाय द वे मिस्टर क्रिश.. तुम्ही काय करता...??"अनिकेत.

"ते सोनवणे बिल्डर्स कडे असतो ..मी... इथे जमिनीच्या खरेदी साठी आलेलो ... आजी म्हटल्या की इथेच थांब.. म्हणून थांबलो आहे..."क्रिशने खरी ओळख टाळली नाहीतर एवढे दिवस काम सोडून तो ईथे काय करतोय ..उगाच डोक्याचं दही करा.

"ओ अच्छा..! कुठे सुरू आहे मग व्यवहार जमिनीचे ..??"अनिकेत.

"अरे यार.. काय सांगू याला आता..."
"ऍक्च्युली व्यवहार सुरू नाही आहेत ..ते आम्ही फक्त ईकडे जमिनी बघून राहिलो आहोत... इकडे म्हणे स्वस्त आहे जमिन.. तर कुठे काय प्रोजेक्ट उभा करता येईल तेच बघत आहोत..."क्रिश तोंडात येईल ते बरडला.

"ओ अच्छा ..माझी काही मदत लागली तर सांगा..." अनिकेतला जरी त्याचे कारण पटले नसले, तरी अनिकेतने तसे दाखवले नाही.

"अनिकेत मी काय म्हणते.. सर्व जेवायला थांबलेत तुमच्यासाठी ..तूम्ही जाऊन हात पाय तोंड धुऊन घ्या... आम्ही पानं वाढतो.."आजी.

त्याने सावीला आजीकडे दिले आणि तो वर निघून गेला.

"क्रिश काय झाले होते..?? काय गडबड करत होतास तू...?? अदीतीने हसू दाबत त्याला विचारले.

"खूप हसू येत आहे ना तुला बघतोस नंतर.!!"क्रिश.

"अरे पण का ओरडला तू..??"अदीती.

"शांभवी बसली होती तिथं.. तिच्या मांडीवर बसला असता तो.. म्हणून ओरडलो.."क्रिश.

सर्वांनी ऐकून डोक्याला हात मारला ,शांभवी मात्र खजील झाली...

आज परत सर्वजण जेवायला बसले होते ,महेशी सोडून. अनिकेत ने बघितलं, ती थांबलेली आहे म्हणून...

" महेशी तूम्ही पण बसून घ्या ...सर्वजण ज्याच्या त्याच्या हाताने घेईल ..नाहीतर मावशी वाढतील.. सावी खेळतेय इथे प्रॅममध्ये ... बसा तुम्ही"अनिकेत.

अनिकेतच बोलणं ऐकून आजी थोड्या सुखावल्या आणि महेशीलाही बरं वाटलं..
ताटातली मेथीची भाजी बघून त्याने आजीकडे बघितले.

"हा ते महेशी ने केला स्वयंपाक.. आम्हाला माहित नव्हतं ती काय करणार आहे ते.... नाही तर आधीच सांगितलं असतं तिला... दुसरं काही घेता का तूम्ही?"आजी.

त्याने महेशीकडे बघितले, तिचा चेहरा पडलेला होता.

"राहू दे.. मी हेच खातो.." का कुणास ठाऊक पण त्याला त्या भाजीला नकार द्यायची इच्छा नाही झाली.

पहिला घास तोंडात गेल्याबरोबर त्याला त्याच्या आईची आठवण झाली. पुढचे घास अगदी सहज गेले, बरीच भाजी त्याने फस्त केली होती .आजी तर तोंड आवासून त्याच्याकडे बघत होत्या. शांभवीही चकित झाली, तो मेथीची भाजी कधीच खात नव्हता..

शांभवीला आता नक्की खात्री पटली होती.
"तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहात.. तू मैत्रीखातर तुझं प्रेम माझ्यासोबत वाटलं महेशी ..खरच तुझा त्याग तुझ्या प्रेमाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही..." शांभवीच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते.

आता परत बर्‍याच वर्षानंतर पोटासोबत त्याचं मनही तृप्त झालं होतं... साधीशीच भाजी पण तरीही त्याला तृप्ततेचा आनंद देऊन गेली.

महेशीच पोट तर त्याला असं जेवतांनाच बघून भरून गेलं होतं. ती केव्हाचीच त्याच्याकडे बघत होती.अदितीने तिला कोपराने मारून भानावर आणलं. महेशीने प्रश्नचिन्ह घेऊन तिच्याकडे बघितलं तेव्हा तिने डोळ्यानेच खुणावलं ताटाकडे बघ.. खरंच तिने एकही घास खाल्ला नव्हता, सर्वजण तिला बघत गालात हसत होते . त्यांना बघून ती ओशाळली आणि खाली मान घालून जेवू लागली. पण भरभर खाताना तिला ठसका लागला तेव्हा दाबून ठेवलेले आदीतीचे हसू जोरात फुटले.. बिचारा अनिकेत ह्या सर्वांपासून अनभिज्ञ होता, तिला ठसका लागला तर त्याने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे धरला आदीतिकडे मात्र तो रागाने बघत होता. बिचारीचे हसू लगेच गायब.. पण तिचं हसू जसं गायब झालं तसं क्रिशला हसू फुटलं... त्याने क्रिश कडे पण रागात बघितलं .. क्रिशचं तोंड बघून , आजीला हसू फुटले. मग मात्र तीघ खळखळून हसायला लागले.. त्याच्या माथ्यावर आडवा रेषा जमा झाल्या महेशीला ठसका लागला, तिला त्रास होतोय आणि हे हसून राहिलेत... त्याला थोडे विचित्र वाटलं पण त्यांचं हसू काही थांबत नव्हतं अखेर त्यानेच दुर्लक्ष केलं आणि मेथीच्या भाजी वर लक्ष केंद्रित केलं..

जेवण झाल्यावर शांभवी क्रिशला पकडून रूममध्ये घेऊन गेली.

"बोल शांभवी काय सांगत होती तू..
काही झाले का आज तिकडे फॅक्टरीमध्ये ,
ऑफिसमध्ये.."क्रिश.

"तिकडे तर काही झालं नाही ..पण अनिकेत आज पोलिस स्टेशनला गेला होता .....मला वाटतं तो पहिल्यांदाच गेला असेल.. "शांभवी.

"हा मग काय झालं तिकडे..?. "क्रिश सोफ्यावर रेलून बसत बोलला .

"तू सकाळी इन्स्पेक्टर विशाल ला भेटला होतास ना.. "शांभवी.

"हो त्यांनाच भेटलो होतो .".क्रिश.

"त्यांना माझ्याबद्दल तर सांगितलं ना..??"शांभवी.

"हो सांगितले मी त्यांना.. सुरुवातीला त्यांचा विश्वास बसत नव्हता.. मग आजीशी बोलल्यावर त्यांचा थोडा बसला विश्वास... का ते अनिकेतला काही बोलले का ह्यावर.."क्रिश.

"नाही ते काही बोलले नाही ... त्यांनी सुवर्णा चा विषय सुद्धा काढला नाही.. फक्त त्यांनी तो ट्रक नंबर भेटला आहे हे सांगितले...पण जेव्हा ते दोघं बोलत होते.... तेव्हा मला क्लिक झालं की..त्या दिवशी.. हॉस्पिटल मधून नर्स चा फोन होता.. की क्रिटिकल डिलिव्हरी आहे.. आणि हॉस्पिटलमध्ये कुठलेच डॉक्टर नाही आहेत ...पण ती डिलिव्हरी तेवढी क्रिटिकल नव्हती ...तर मला ती नर्स ... तिथले डॉक्टर यांच्यावर थोडा संशय येतोय.. "शांभवी.

"त्या डॉक्टरांच आणि त्या नर्सच तुझ्यासोबत काही वाकड आहे का..?? " क्रिश थोडा सरळ होऊन बसला.

"ते हॉस्पिटल अनिकेत नेच बांधलं आहे... हॉस्पिटल च्या डॉक्टरर्स...नर्सच माझ्या सोबत काहीच वाकडं नाही ...एक दोन जण जलस व्हायचे पण ते एवढी मोठी गोष्ट करणार नाहीत.. मला वाटतं सुवर्णा सारखाच... ह्या कटात त्या नर्सचा किंवा तिथल्या कुठल्या डॉक्टरचा सहभाग असू शकतो.. मला धरून पाच डॉक्टर आहेत हॉस्पिटल मध्ये ...ऐरवी कुणी न कुणी असतं तिथं पण एकाच दिवशी सर्व चे सर्व जण गैरहजर... म्हणून थोडा संशय येतोय.."शांभवी.

"ठीक आहे ..मी बोलतो विशालशी..."क्रिश.

" त्या पेक्षा एक करशील का..?? उद्या तू मला हॉस्पिटलमध्ये सोड.. मी तिथं सर्वांना ऑब्जर्व करते ..काही ना काही तर ते एकमेकांशी बोलतीलच..."शांभवी.

"हम हे ठीक राहील..."क्रिश.

ऋतू बदलत जाती...
पानगळ उलटून...
वसंताची हळूच...
चाहूल देती...
ऋतू बदलत जाती...

क्रमक्षः...

******

भेटूया पुढच्या भागात...

©® शुभा.