घरी आल्यावर त्याने तिला तिच्या खोलीत आणून झोपवलं आणि तिला पांघरूण देऊन सर्व बाजूंनी उश्या लावल्या... तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत त्याने लाईट बंद केला आणि दार लावून त्याच्या रूमकडे निघाला.
थकून-भागून रूममध्ये आला शर्ट काढला फ्रेश व्हायला गेला ते झाल्यानंतर हातात सिगारेट पेटवून खिडकीच्या बाहेर पहात उभा राहिला..... आणि पाच वर्षांपूर्वीच्या विचारात मग्न झाला....
किती काय बदलून गेलं होत... वेळ तर निघूनच गेली होती पण........ ती सुद्धा बदलून गेली होती
ती अजूनही समुद्राकडे एकटक पाहत होती....आतातर अंधार होत आला होता....तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबल नव्हत....तिच्या फोनच्या आवाजाने ती भानवर आली.... तिने गालावरचे अश्रू पुसत बॅगेतून फोन काढला..... तिने तिच्या डोळ्यात आलेले अश्रू लपवत फोन उचलला.
"हॅलो." मिष्टि हळू आवाजात म्हणाली.
" दी कुठे आहेस तू??..... तुझ ऑफिस संपून 2 तास होत आले आहेत.... मी मगासपासून तुझी वाट बघत आहे." तिचा लहान भाऊ रुद्रांश बोलला.
" हो.... रुद्र... अरे ते मागच्या आठवड्यात ऑफिसला नव्हते गेले ना म्हणून जरा काम जास्त आहे.... निघाली आहे मी.... येते मी थोड्यावेळात." मिष्टि त्याला समजावत बोलली.
" बर.... लवकर ये.... नाहीतर मी येऊ का घ्यायला?" रूद्रांशने काळजीने तिला विचारलं.
" माझा लहान भाऊ कधी एवढा मोठा झाला?? हं??.... काही गरज नाहीये.... तू अभ्यास कर. मी येते नीट.... मी आल्याशिवाय दार नको उघडू." मिष्टि त्याला बोलली.
" हो दी.... ये... बाय बाय." त्याने हे म्हणून कॉल कट केला.
तिने एकदा तिच्या फोनमधल्या वॉलपेपर बघितला... तिचा आणि तिच्या लहान भावाचा मस्ती करतानाचा फोटो बघितला आणि तो क्षण आठवून हसली आणि तिथून उठली ते ही मनात एक दृढ निश्चय करून..... तिने बाहेर येऊन रिक्षा केली आणि त्यात बसून घरी निघाली.....मध्यम वर्गीय असल्यामुळे त्यांचं घर खूप मोठं नव्हत.... आई आणि वडिलांनी कष्टाने घेतलेला 1 बीएचके होता.... तिची बिल्डिंग आल्यावर तिने रिक्षा थांबवून रिक्षावाल्याला पैसे दिले आणि वर गेली.....
' मॅम नीट घरी पोहोचल्या आहेत.' तिला नीट घरी पोहोचली आहे हे पाहिल्यावर विराजने तिच्यावर नजर ठेवायला सांगितलेल्या माणसाने त्याला मेसेज केला.
मेसेजची रिंगटोन वाजल्याने सिगारेट पीत असलेला विराज भानावर आला आणि मेसेज बघितला..... ति नीट घरी पोहोचली आहे हे कळताच त्याने एक उसासा सोडला..... अजूनही त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजलं होत..... मीराला घेउन गाडीत बसल्याक्षणी त्याने त्याच्या माणसाला तिची काळजी घेण्यासाठी तिच्या पाळतीवर ठेवलं होत.
मिष्टिने घरच्या दारासमोर उभ राहून परत एकदा रडून रडून स्वतःचा केलेला अवतार ठीक केला आणि हसऱ्या चेहऱ्याने दारावरची बेल वाजवली.....रुद्रांक्ष ने दार उघडलं आणि तिला आत घेतल.
" रुद्र मी कितीवेळा सांगितल आहे बाहेर कोण आहे हे मोठ्यंदा विचारायचं आणि मगच दार उघडायच." मिष्टि थोडस रागवत त्याला म्हणाली आणि आत येऊन सोफ्यावर बसली....
रूद्रांक्ष ने तिला पाणी दिलं आणि तीच्यशेजारी बसत म्हणाला," दी मी डोअरहोल मधून बघितल आणि मगच दार उघडलं."
" हो... पण तरीही पुढच्या वेळेपासून विचार आणि मगच उघड." मिष्टि पाणी पीत म्हणाली.
" बर.... मी आता आवरते आणि जेवण बनवते." मिष्टि उठून रूम मध्ये जात म्हणाली.
" हो.... चालेल." रुद्रांश म्हणाला.
मिष्टि ने तिचं आवरलं आणि स्वयंपाक करायला लागली.
************************************
दारावर टकटक झाली...... विराजने सिगारेट विजवली आणि ॲश ट्रे मध्ये टाकली आणि तोंड धुवून टीशर्ट घातला...... त्याने दार उघडलं.....समोर मीरा उभी होती.... त्याने दार उघडल्यावर ती पटकन त्याच्या बेडरूम मध्ये शिरली आणि धडपडत त्याच्या बेड वर चढली आणि बेडवर उभी राहिली.... त्याला हात करून त्याला जवळ बोलावलं..... तो हसतच तिच्या समोर उभा राहिला.
" झोप झाली माझ्या प्रिन्सेसची??" विराज मीराला गुदगुल्या करत म्हणाला.
तिने हसतच मान हलवत त्याला उत्तर दिलं..... त्यांची मस्ती चालू असताना तिकडून गीताचा "मीरा बेबी."आवाज आला..... तिचा आवाज ऐकल्यावर त्याने मीराला व्यवस्थित उभ केलं तरीही ती हसतच होती.
" विराज बाबा आत येऊ का??" गीताने बाहेरून विचारलं.
" हो या ना गीता काकू." विराज ने त्यांना आत बोलावलं.
" आपली लबाड मुलगी कुठे गेली हां??" गीता काकूंनी जरा हसत विचारलं...... हे ऐकताच मीरा विराजच्या मागे लपली आणि खुदुखदू हसायला लागली.
" काय केलं आमच्या प्रिन्सेसने??" विराज मीराला पुढे घेत म्हणाला.
" एका लबाड मुलगी बाबा बरोबर जेवायचं म्हणून अजून जेवली नाही आणि पळत निघून इकडे आली.... हो की नाही??" गीता काकू म्हणाल्या.
" मला बाबा बरोबर आज जेवायचा आहे.... चल ना प्लिज आज." मीरा विराजला लाडात म्हणाली.
विराजनेही जास्त आढवेढे न घेता तिला उचलून घेतलं आणि तिला जेवायला घेउन खाली आला....
अर्थात घरातले सगळे सदस्य डायनिंग टेबल वर बसले होते.....अर्थात विराज च्या जोडीला मिरा ला पाहून सगळ्यांची तोंड वाकडी झाली..... विराज ने दुर्लक्ष केल त्यांने मिरा ला त्याच्या बाजूलाच बसवलं....
मेड ने मिरा ला साधी खिचडी वाढली कारण.. आताच बाहेर इतक फिरून आलेत म्हणुन विराज नेच तिला सांगितलं... विराज ने रोटी आणि भाजीच घेतली त्याला सुद्धा खायची इच्छा न्हवती आज........
सगळे शांततेत जेवत होते... मीरा स्पून आपटत खात होती..
( लहान पोर कधीच नीट खात नाहित, एकतर अंगाला लावून खात असतात... )
तोच विराज ची आई हळूच पुटपुटली.." दिवसा तर शांत नसतेच च...वरतून रात्री च जेवण पण सुखाने करून देत नाही.."
विराज ने ऐकलं पण काहीच म्हणाला नाही.....मिरा मस्ती करत खात होती...मध्ये मध्ये विराज ला गमती जमती सांगत होती....
विराज पण तीच बोलणं मन लावून ऐकत होता..त्याला तीच मध्येच बोबड बोलणं..आवडत होत , त्याने हळूच तिच्या गलावर ओठ टेकवले....
तशी ती मस्त लाजली..आणि त्याला दात दाखवू लागली...विराज हलकेच हसला...!!
मिरा ने थोड पुढे झुकून पाण्याचं ग्लास घेतला आणि तो जड लागल्याने..विराज च्या आई च्या ताटात पडला...
सगळे आता काय होईल म्हणून शांत झाले......आई चा तर पाराच चढला.....
आई : अग ए नालायक कार्टे.........डोळे फुटले का तुझे, ही ही मुलगी ना मुद्दाम करते हे सगळं.... "
आई बाबांकडे पाहत म्हणायला सुरुवात केली....
" अहो, पाहिलत का..?? ही मुलगी मला त्रास द्यायला मुदाम् करते....ही मुलगी विराज तू..... " आई बोलत होती कि.... विराज रागात उठला...
विराज : बास यार... आई ती लहान आहे, थोडं तरी समजून घे..... यार रोज रोज ची कटकट तुमची, सुखाने शांतता नाही या घरात....त्यापेक्षा मी आणि मीरा च जातो दुसरीकडे.......
विराज रागात म्हणाला... तस सगळे शांत झाले.. विराज ने मिरा ला उचलल आणि रूम मध्ये जातं होता...
आई : इतकं टोचतो का आम्ही तुला... कि तुला दुसरीकडे जयच आहे....??
विराज : आता जे झालं त्यामुळे मला कोना सोबत जेवायची इच्छा होत नाहीं.... आणि राहायची तर मुळीच नाहीं.....
" गीता.......,मिरा आणि माझं जेवण रूम मध्ये पाठव आणि या पुढे आम्ही दोघे रूम मध्येच जेवू..... " विराज सगळ्यांवर एक कटाक्ष टाकत म्हणाला.....
गीता पण दोघांचं ताट घेऊन त्यांच्या पाठोपाठ गेली....
विराज ने मीराला भरवलं... आणि स्वतः पण खाऊन घेतलं, एका नोकराने येऊन सगळं साफ केल आणि निघून गेले....
मिरा : डॅडी आज मी इथेच तुज्या कुशीत झोपू, प्लिज.......
मिरा बारीक तोंड आणि ओठांचा चंबू करत म्हणाली......
विराज : व्हाय... रोज झोपतेस ना मग आज पण झोप.....
मिरा : नो..... मी तुला कडलं करून झोपणाल,
मिरा गाल फुगवून म्हणाली.... विराज ने केसातून हात फिरवला आणि तिला जवळ घेतली...
आणि लाईट्स ऑफ करून तिला कुशीत घेऊन झोपला........ ती पण गप्पा गोष्टी न करता झोपून गेली........ एक तोच तर होता तिला जवळ च... तिचा बाबा, तिचा डॅडी, तिची आई सगळं सगळं काही..... तोच होता...
ती पण निवांत त्याच्या छातीत तोंड घालून झोपली,...... ती झोपताच विराज उठला....!! तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले....आणि बाल्कनीत जावून बसला......
जुन्या आठवणीनं मध्ये हरवला............
तेव्हा सुरुवात झाली होती या सगळ्याला... त्याच्या प्रेमाला आणि न कळालेल्या रहस्याचा उलगडा समजायला.....!!
क्रमशः...