Veshantar ek Rahashymay Katha - 1 in Marathi Horror Stories by लेखक सुमित हजारे books and stories PDF | वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 1

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 1

कालचीच गोष्ट घ्या संध्याकाळचे आठ वाजले होते.अमेय आणि शमा दोघेही फिरायला गेले होते.जेवणाची वेळ ही झाली होती अजुन ते काही परतले नव्हते असं त्यांच्याबरोबर झालं तरी काय की अमेय आणि शमा जेवणाच्या वेळेलाही परतले नव्हते तिथे आप्पा अमेय शमा न आल्याने खुपच चिंतेत होते ते डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहत होते.
अमेयच्या दादाची तीच हालत होती. तो सारखा घराच्या वेशी पाशी चकरा मारत होता मनातल्या मनात बडबडत होता ही दोघे अजुन का नाही आले कुठे अडकले आहेत त्यांना काय झालं तर नाही ना इतक्या दूर जंगलात फिरायला कोण जात तरी मी त्याला समजावलं होते पण माझा ऐकेल तर शपथ ना सगळ्यांच्या जीवाला घोर लावून गेला आहे हा पोरगा याला काय म्हणाव आता एकदाच लवकर घरी येऊ दे म्हणजे मिळवल तिथे अमेय आणि शमा दोघे जंगलातून चालत असताना अमेयला एक कल्पना सुचते व अमेय ठरवतो की शमाची आपण गंमत करू आणि चालता चालता अमेय शमाला म्हणतो शमा ते बघ तुझ्या मागे एक माणूस लागला आहे चल लवकर चल जसा अमेय बोलतो तसा ती मागचा पुढचा विचार न करता घाबरूनच पटापट चालते ती चालताना एवढी घाबरलेली असते की मागे वळूनच पाहत नाही तिला अक्षरशः घाम फुटलेला असतो आणि अमेय तिच्या घाबरलेला चेहरा पाहून जोरजोरात हसायला लागतो शमाला काहीही कळत नाही की अमेय असा जोरजोरात का असतो आणि ती आणखीनच घाबरते याला कुठला भूताने पिशाचल तर नाही ना आणि ती घाबरत घाबरत अमेय जवळ जाते. व अमेयला विचारते अरे अमेय काय झाल तुला असा का करतोस तू जरा शुद्धीवर ये आणि अमेयच थोड्या वेळाने हसणं थांबत आणि अमेय हो हो शमा शांत हो जरा किती घाबरलीस आहे तू तुझी गंमत करत होतो जसा अमेय शमाला सांगतो तशी ती शांत होते आणि अचानक चिडते तिचा लालबुंद रागिष्ट चेहरा पाहून
अमेय मनातच म्हणतो आपलं काय खर नाय बहुतेक ही गंमत माझ्या जीवावर बेतते की काय आणि तितक्यात शमा बोलते काय रे अमेय तुला काय कळते की नाही काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला अस कोण करत का मी किती घाबरले होते जर माझा जीव गेला असता तर काय केलं असतं आणि ती धपाधपा अमेयला मारते अमेय म्हणतो अग बास लागतय मला खूप मारलस आता बास झालं हवे तर मी तुझी माफी मागतो पुन्हा अशी नाही करणार तुझी गंमत उभ्या आयुष्यात आणि शमा हळू हळू शांत होते आता रात्रीचे साडेअकरा वाजलेले असतात हळू हळू सगळीकडे शांतता पसरलेली असते हवा ही जोरदार चालू असते जंगलाकडून घरच्या जाणारा मार्गावर संपूर्ण काळोख पसरलेला असतो समोरच काहीच दिसत नसत वातावरण पूर्ण थंडीमय झालेल असत प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज येणास सुरुवात होते झाडावर लटकलेले वटवाघुळ यांचे लालबुंद झालेले डोळे पाहून अमेय थोडासा घाबरतोच आणि तो शमाला म्हणतो शमा चल आता आपल्याला निघायला हवे फार उशीर झालाय आपण खूप एका जागी थांबून आहे चल आता आपल्याला निघायला हवे तशी शमा आणि अमेय दोघेही तिथून निघतात निघताना अमेय थोडासा घाबरलेल्याच अवस्थेत असतो शमा अमेय दोघेही चालत असताना अचानक अमेयला कसला तरी विचित्र आवाज ऐकू येतात तसा अमेय अजुनच घाबरतो अमेयला घाम फुटू लागतो अंग ही भय ने थरथरायला लागतं हात पाय कापू लागतात आणि तो त्याच अवस्थेत शमाला घेऊन पटापट चालायला लागतो तो इतका पटापट चालत असतो की त्याला भानच उरत नाही की