Rakt Pishachchh - 27 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 27

The Author
Featured Books
Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 27

॥…रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 27

 

संध्याकाळी 7 वाजता:

 

रामु सावकाराचा दुमजली वाडा आणि त्याभोवती चौकोनी आकाराने विळखा घातलेला चुन्या-मातीपासुन बनवलेला कठडा दिसत आहे.

कंपाऊडला असलेल्या लाकडी दोन झापांच्या गेटमधुन आत अंगणात सर्वकाही सामसुमलेल दिसत होत, रातकिड्यांची किरकिर काय ती थोडीफार कानावर येत आहे! अंगणात बजुलाच एक गोल पाचफुट कठड्याची काळ्या दगडांची विहिर दिसत आहे! त्या विहीरीवर एका

टोपशीवर थाली ठेवावी त्याप्रकारे एक गोल लाकडाच विशिष्ट पद्धतीच

दार बसवल होत...आणि तो दार लावलेला दिसत आहे ! त्या विहीरीच्या लाकडी दाराला एक छोठासा छेद पडलेला आहे आणि त्या छेदातुन

विहीरीच्या गर्भात दडलेला-अंधार दिसत होता.त्या अंधारात निट लक्ष देऊन व शांतपणे कान देऊन ऐकुन पाहता-कसलीतरी हालचाल एक आवाज कानावर येत होता.छम,छम,छम!

जणु विहीरीतुन कोणी वर येत असाव,या पाहुयात काय आहे विहीरीत! जिवंत आहे की ? मृत????

त्या विहीरीत कालसर अंधार दिसत होता. आजुबाजुला थोडफार नजरेस पडत असेल, तर त्या होत्या विहीरीच्या कालसर दगडी व

खालुन अंधारातुन वर-वर येणारा एक लहान मानवी आकार.

आणी तो आकार कोणि दुसरा-तिसरा नसुन होता,म्हाद्या -काशीच्या मुलीचा !म्हंणजेच चिंकीचा. पाच सहा वर्षाची छोकरी ती काय

धीट होती-पहा ना! यार्वशी प्रधानाने ज्यावेळेस तिला विहीरीत फेकली मग नंतर विहीरीच दार लावल, त्याचवेळेस ही लहानशी चिंकी पाण्यावर हातपाय मारत तरंगत होती, दहावीस मिनीटे असंच पाण्यावर हात पाय मारत तरंगत असताना तिला एक गोष्ट आठवली! की तिच्या घरी असताना एकवेळ तिच्या आईने तिला हिरकणीची गोष्ट सांगितली होती.त्याच गोष्टीला धरुन तीने आपला एक लहानसा हात विहीरीच्या दगडामधल्या भेगीवर ठेवला मग दुसरा पाय आत दुस-या दगडातल्या भेगीवर ठेवत हळू-हळू तीच क्रिया पुन्हा पुन्हा करत ती वर-वर चढु लागली.परंतु यश लगेच हाती येत नसत ना! शेवटी तिच्या सोबत ही तेच झाल.पहिल्या वेळेस पाच दगड चढुन गेल्यावर चिकट गडावरुन पाय घसरुन तीखाली पाण्यात पडली-पाण्याचा धप्प आवाज झाला.परंतु त्या छोकरीची हिम्मत अद्याप ड्गमगली नव्हती.तीने पुन्हा एकदा प्रयत्न केला ! तिच्या आईच वाक्य तिला आठ्वल! जीवन जगायच असेल तर लढा द्यावाच लागतो! हिम्मत हारुन चालत नसत !

तिच्या आईच वाक्य जणू त्या एवढ्याश्या पोरीच्या अंगात हिरकणी मातेसारख दृढ विश्वास जागृत करत होत.न हारता न शांत बसता दुपार पासुन ते आता संध्याकाळ पर्यंत तीने खूप वेळा प्रयत्न केला होता..आणि आताचा प्रयत्न होता तो शेवटच आंतिम!.. the final destination..

××××××××

" चला निघायचं का? " रामु सावकार आपल्या पुढ्यात उभ्या असलेल्या

यार्वशी, ढमाबाई, संत्या, लंक्या, शलाकाकडे पाहत म्हणाला.

ही सर्व सैतानाची समर्थक रक्तांचल महालाकडे निघाली होती.ज्या महालात तो द्रोहकाल होता.काही कारणास्त्व म्हंणा की काही भयाण विध्वंस घडवण्याची कल्पना म्हंणा! मायाविनी संदेश द्यायला आली होती म्हंणजे कारण काही खासच होत !

" हो सावकार ! मालकानी बोलावलय म्हंणजे वेळ घालवुन चालणार न्हाई!" यार्वशी तोंडातली तंबाखु थुंकत म्हणाले.

संत्या, लंक्या, ढमाबाई, शलाका फक्त ह्या चौघांच बोलण ऐकत होते.

यार्वशींच्या वाक्यावर सावकार हळुच हॉलमधुन स्वयंपाक घरात शिरला.

चुलीवरचा भाग पहिल्यापासुनच विलग झालेला, म्हंणजे दोन भागांत विभागला गेलेला...आता त्या जागी एक तळघरासारखा भुयारीमार्ग दिस होत. त्या मार्गातुन पांढरट धुक थंडीसहित वर येत होत.

" चला ?!" रामु सावकार अस म्हंणतच त्या धुक्यात शिरला, त्याच्या मागोमाग यार्वशी,मग लंक्या, शलाका शेवटला , ढमाबाई जाऊ लागल्या. सर्वात शेवटला लुकडा स्ंत्या जागेवर उभ राहुन , नाकपुड्या फुगवत... कसलातरी वास घेत होता !

" ए तायडे तुला कसला तरी कुजकट वास येतय का ग?" पुढे ढमाबाईंकडे पाहत संत्या म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर ढमाबाईंनी हलकेच मागे वळून पाहिल, व एक नाकपुडी हळकेच फुगवली.

" हम्म ! उंदीर मेल असल आज ! जाऊदे आल्याव बघु चल!"

ढमाबाईंनी जास्त काही न बोलता थेट पुढे चालायला सुरुवात केली.

परंतु संत्या मात्र आपल्याच विचारात गर्क झाला.

" उंदीर आज मेल ? म्हंणुन वास सुटलय ! मंग ती इहिरीत फेकलेली पोर बी मेली असल की तिच कस वास नय सुटल?ती मेली असल का?" संत्याने गालावर हात ठेवत स्व्त:लाच प्रश्ण केला.

" ए तायडे? तुम्ही व्हा पुढ म्या आलुच!" लुकडा संत्या अस म्हंणतच स्वयंपाक घरातुन बाहेर आला! इकडे ढमाबाईनी त्याची हाक काही ऐकली नव्हती! संत्या मोठ-मोठ्या ढेंगा टाकत स्वयंपाक-हॉल मागे सोडत वाड्याच्या दारात येऊन उभा राहीला.दारातुन त्याने एक कटाक्ष अंगणात टाकला.वर आकाशातल्या चांदण्याच्या निळसर उजेडात ती काळी विहीर दिसत होती-बाजुला गोठ्यात वासरु,गाई आणि दोन बैलांमधला एक बेल झोपला होता तर दुसरा जागा असुन चारा खात होता.संत्याला तर त्या जागा असलेल्या बैलाची नेहमी घृणावाटे.त्या मुक्या जनावराला संत्या नेहमी घृणास्पद , अत्याचारीक वागणूक द्यायचा त्याला मारायचा, तर कधी उपाशी ठेवायचा.आता ह्याक्षणी सुद्धा

संत्या त्या बैलाजवळ गेला, तो खात असलेला चारा संत्याने उचलून दुर ठेवल.

" बगाव तवा, चरत असतय मेल ! झोप गप्पऽऽऽ!" शेवटच्या वाक्याला त्याचा स्वर रागीटपणे उंचावला.नेहमीप्रमाणे त्या मुक्या जनावराने खेदाने मान खाली घातली , दोन पाय हळकेच वाकवुन मग हळूच मागचे पाय शरीर ही सैल सोडुन तो जमिनीवर मान टेकवुन डोळ्यांतुन अश्रु गाळत बसला.संत्याने कुत्सिक हसत त्या बैलाकडे पाहिल, मग त्या विहीरीच्या दिशेने निघाला...झोपाळा मागे सोडून संत्या विहीरीपाशी पोहचला.विहीरीला एक गोळ लाकडी दरवाजा लावून विहिर बंद केली होती. आतल काहीही दिसत नव्हत.

इकडे विहीरीत चिंकी दगडांचा आधार घेत मोठ्या मेहनतीने कठड्यापाशी पोहचली गेलेली.वितभर अंतरावर बाहेर पडण्याचा मार्ग होता , म्हंणजेच तो लाकडी दरवाजा.चिंकीने एक हात हळुच वाढवला , तो दरवाजा आता ती खोलणार होती! की तितक्यात त्या लहानगी चिंकीच्या कानांवर पावलांचे आवाज ऐकु येऊ लागले.तिने आपला हात आता माघारी घेतला. कारण वरुन जे कोणी आल होत! त्याला आपल्या असण्याच ठाव जाणु द्यायच नव्हत...नाहीतर जिवावर बेतणार हे तिला ठावूक होत.

" वास तर येत नाय? म्हंजी जिती असल क काय?" संत्याने स्व्त:लाच प्रश्न केला. चिंकीने हा आवाज ऐकला! तिला कळून चुकल की वर जे कोणी आहे! ते आपण मेलो की जिवंत आहोत हे पाहण्यासाठी आल आहे ! आणि कोणत्याही क्षणी तो हे दार उघडेल.लहानग्या चिंकीच्या ह्दयाची धडधड वाढु लागली.लहानशी छोकरी ती भले काय करणार होती! त्या संत्यासोबत हाणामारी करणार होती? त्याच्या सोबत लढा देणार होती? तो संत्या काही लहान मुलगा तर नव्हता! भला मोठ्ठा माणुस होता...तो तिला अलगद मारु शकणार होता.पन तस नक्की होणार होत का? संत्याने त्या दाराची कडी खोल्ली-त्या कडीचा आवाज त्या निर्जीव शांततेत कर्रकर्रत घुमला, चिंकीला तर आता आपण ही मरणार हेच वाटु लागल! भले तो वरुण आलेला माणूस मोठाच असणार

आपण लहान काय करु शकतो? चिंकीने आता हार पत्कारली..! पन तेवढ्यात तिला युवराज्ञी रुपवतीने सांगितलेली एक म्हण आठवली.

शक्ति पेक्षा युक्ती श्रेष्ट!

" भलेही आपण लहान असू! पण बुद्धीने तर नाहीच आहोत !" चिंकी मनातल्या मनात म्हणाली. तिने आजुबाजुला विहीरीत डावि-उजवीकडे पाहायला सुरुवात केली-तिच्या भिरभिरणा-या नजरेस काहीतरी दिसल ज्याला पाहुन तिच्या चेह-यावर हलकेच हसु आल.

××××××××

घोड़यांच्या पावलांचा विशिष्ट प्रकारचा (तबडक,तबडक) आवाज होत-होता.रघुबाबा,महाराज, संत्या तिघेही आप-आपल्या ख-या रुपात आले गेलेले.संत्या घोडागाडी चालक म्हणून बसला जात त्याचा चेहरा पुन्हा जवान झाल हे पाहून टरकीफाय आनंद झळकत फेकत होता.

परंतु मागे बसलेले रघुबाबा चिंताग्रस्त दिसत होते.घोडागाडीच्या उजव्या बाजुला गोलाकारातला च्ंद्र जणु धरतीवर आल्यासारखा मोठा दिसत होता.इतक मनमोहक वातावरण असून सुद्धा कुठेतरी निराशा संभवत होती.वादळापुर्वीची शांतता म्हंणतात ते हेच का?

काहीवेळाने घोडागाडी राझगड महालावर पोहचली! प्रथम रघुबाबा , मग महाराज घोडागाडीतुन उतरले.महाराजांनी एक कटाक्ष बाबांवर टाकला! त्यांच्या चेह-यावर अद्यापही निराशजनक भावना होती.

×××××××××

चिंकीच्या भिरभिरणा-या नजरेस एक छोठासा गोल दगड दिसला.

ज्याला पाहुन तिच्या चेह-यावर एक हास्य आल.तिने तो दगड उपसुन काढला ,मग त्या दाराकडे पाहुन भुवया हलकेच ताणुन धरल्या ! व एकटक दार उघडण्याचीवाट पाहू लागली.संत्याने हळकेच कडी खोल्ली!दोन्ही हातांनी तो जाडजुड दार! दात ओठांवर चावत धरुन पुर्णत जोर लावत दुस-या दिशेला भिरकावला, तसा तो दार मागे जात सताड उघडा पडला.

वर आकाशात जरी चंद्र उगवला असला तरी विहीरीत मात्र अंधार दिसत होता.संत्याने मान थोडी कठड्याच्या दिशेने खाली आणली..मग हळकेच दोन्ही डोळे छोठे केले...नी जसे-ते डोळे छोठे केले..त्याचक्षणी अंधारात त्याला आपल्या चेह-यापासुन फक्त एकफुटावर दगडांचा आधार घेऊन ऊभी असलेली व दात-विचकत आपल्याकडेच हासणारी चिंकी दिसली.तिला पाहुण त्याचे डोळे मोठे व्हायला लागले की तोच चिंकीने आपल्या ओठांचा डोळ्यांत अंगार भरुन चंबु बनवला , दुस-या हातात असलेला तो गोल दगड घेतलेला हात मागे घेऊन जात अगदी वेगाने पुढे आणत तो दगड थेट स्ंत्याच्या कपाळावर मारला!

" ए आये !" कट्ट हलकासा आवाज होत ! संत्याच्या कपाळावरची कवटी फुटली.एक तीव्र सनक डोक्यात झिंनझिंनली जात , रक्ताच पाझर चालणीतुन माती चालावी तशी रक्ताची धार जमिनिवर पडु लागली.

संत्या एका फटक्यात जमीनदोस्त झाला.जमिनिवर पाठणावर पडून हात कपाळाला लावुन संत्या दोन्ही पाय जोर-जोरात जमिनिवर आपटू लागला, विव्ह्ळु लागला.इकडे चिंकीने हीच संधी साधुन विहीरीतल्या कठड्यावर ऊभी राहत थेट खाली जमिनीवर उडी घेतली! त्या संत्याकडे एक नजर ही न टाकता ती थेट पुढे पळणार की संत्याने तिचा पैजण असलेला पाय धरला.

" ए कार्टे, हरामखोर रांxचे ! थांब कुठ पळते !" कसाबसा संत्या आपला तोल सांभाळत जागेवर उभा राहिला. चिंकीने हातात शस्त्र , स्वतच्या बचावासाठी घेतलेला दगड पुन्हा संत्याला मारण्यासाठी पुढे आणला होता..की तो हात त्याने अडवला.तो दगड चिंकीच्या हातातुन हिसकावुन घेऊन विहीरीत फेकला.

:" ए कार्टे! आता काय करशील ग ! लय हाऊस हाईना तुझ्या आईला भेटायची! हाहाहाहा ! कधीच मेली तुझी आई ! सैतानाला खायला दिली..आम्ही ! आणि आता तुला पन देऊ !" संत्याने आपला एक हात वर घेऊन जात तिप्पट वेगाने खाली आणत त्या बिचा-या लहानग्या मुलीवर हात उचल्ला, ती बिचारी त्या माराने खाली पडली. वर आकाशात निळसर प्रकाशाला जणु काजळीफासली जाऊ लागली.चंद्रासमोर काळ्या ढगांनी गराडा घालायला सुरुवात केली.वातवरणात हवेचे झोत वादळासारखे फिरु लागले.वातावरण जणु निसर्गदेवताच संत्याच्या विकृतीवर क्रोध पावू लागला.संत्यापासुन वीस मीटर अंतरावर गोठ्यात खाली मान घालून झोपलेल्या त्या बैलाने खाडकन डोळे उघडले..जागेवर उभा राहिला, उभ राहताक्षणीच त्याच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज झाला..तो आवाज ऐकुन चिंकीने डोळे उघडले..तेवढ्यात उभ्या आसमनांत एक विजेचा बार फुटला.तिमीराच्या कालोखी भिंतीवर जणु एक तीव्र शक्तिशाली आघात झाला असावा की काय? समंद अंधार काहीसेकंदासाठी नाहीसा झाला.राहाजगडचा एक घर नी घर त्या प्रकाशाने लक्खपणे उजळला, तोच उजेड संत्याच्या चेह-यावर ही पडला.कपाळफुटून त्यातुन जाडसर रक्त पुर्णत चेह-यावर चिकटल गेलेल.आणी ज्या ठिकाणी घाव बसला होता त्या जागी काळसर सूज उतपन्न झाली होती.

चिंकीने आपला एक हात हळुच त्या बैलाच्या दिशेने वर केला व म्हणाली.

" नंदीमामा! वाचव !" नियतीचा काय करीष्मा म्हणावा ! त्या लहानग्या मुलीचे शब्द जणु त्या मुक्या जनावरास ही ऐकू गेले की काय? त्या बैलाने थेट एक दोन वेळा शिंगे असलेली मान डाविकडुन-उजवीकडे हळवली आणि एका मिसाईलच्या वेगाने वा-यासारखा पळत पायाखालची माती हवेत ऊडवत संत्याच्या दिशेने निघाला.

पुन्हा एकदा आकाशात एक विज कडाडली विजेच्या प्रकाशात त्या बैलाला संत्याचा लाल रंगाने रक्ताळलेला चेहरा ! डोळ्यांत आपल्यावर केलेले अन्याय दिसले-तो लाल रंग पाहून तर तो बैल अजुनच चवताळला.जमिनिवर पडलेल्या चिंकीकडे कुत्सिकरीत्या हसणा-या

त्या संत्याची नजर हळुच पुढे गेली.कारण पुढुन अंधारातुन घंटीचा आवाज येत होता. हळु-हळू जवळ यावा तसा.संत्या एकटक त्या अंधारात पाहू लागला की तेवढ्यात वीज कडाडली.त्या लक्ख प्रकाशात संत्याला तो अवाढव्य आकाराचा बैल ! त्याला आपल्याच रोखाने वेगाने येताना दिसला. येवढी वर्ष ज्या मुक्या जनावराला संत्याने छळळ होत! त्याला मारल होत -तेव्हा तो मुक जनावर शांत गप गुमान सहन करत होता-ज्याने संत्याची हिम्मत वाढतच गेली होती.पन आज संत्याला त्या मुक्या जनावराच खर रुप कळल. वाईटा समवेत वाईट घडतच! तो आहे पाहत आहे , वेळ येते प्रत्येकाची येते. तो आणतो-परमार्थ!

पुढुन माती उधळत येणा-या त्या बैलाने अगदीवेगाने संत्याच्या लुक्ड्या शरीराला एक धडक दिली.त्या धडक्याने संत्या थेट हवेत उडाला जात विहीरीत पडला.स्ंत्याच नशीब आज त्याच्या बरोबर नव्हतच,कारण विहीर खोल असुन त्याला पोहता येत नव्हत, काहीवेळ पाण्यावर हात पाय झाडून शेवटी -नाका तोंडात पाणि जाऊन संत्या बुडाला-तो कायमचा , मृत्युच्या दल-दलित.

तो पांढ-या रंगाचा नंदीसारखा दिसणारा बैल हळुच चिंकी जवळ आला.

चिंकी जमिनीवर अद्यापही पडलेल्या अवस्थेत होती. बिचारीने सकाळपासुन विह्रीतुन बाहेर पडण्यासाठी इतका खटाटोप केलेला, की शरीरातील ताकद संपली होती. जी की संत्याने तीच्यावर केलेल्या मराने अजुनचखालावली गेलेली. कशीबशी चिंकी जमिनीवर ऊठून ऊभी राहीली.

तिच्या समोर तो बैल उभा असुन एकटक तिच्याकडेच पाहत होता.

" नंदीमामा! मला रुपवती ताईकडे घेऊन जाशील का !"

चिंकीच्या वाक्यावर त्या बैलाने तिची भाषा समजल्यासारख डाविकडून:-उजवीकडे आपल डोक तीन चार वेळा हलवल, मग हळुच दोन पाय वाकवुन तो खाली बसला.

लहानगी चिंकी सुद्धा मग एक ढ्यांग टाकून बैलावर बसली.तसा तो बेल पुन्हा उभा राहीला आणि मग वेगाने सावकाराच्या वाड्यातुन बाहेर पडला.. राझगड महालाच्या दिशेने पोहचण्यासाठी.

 

 

क्रमश :