॥ रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 25
राझगड महाल तस म्हंणायला दोन मजली होत. पहिल्या मजल्यावर भलामोठ्ठा हॉल, त्यात खाली शाही फरशी ,शाही स्वयंपाक घर, आजुबाजुला सोफे-लाकडी खुर्च्या,टेबल-आणि त्यांवर काचेच्या फुलदाण्या होत्या. हॉलच्या डाव्या-उजव्या बाजुला दोन्ही तर्फे A आकाराच्या कोरिडॉर होत्या.
त्या कोरिडॉर मधल्या सर्व खोल्या बंदच होत्या. हा तस म्हंणायला महालात काम-करणारे नोकर चाकर काही खोल्यांच्यात राहत होते.हॉलमध्ये एक जिना होता जो दुस-या मजल्यावर घेऊन जायचा ! जिना चढतावेळेस हॉलमध्ये मधोमध लावलेला मोठा काचेचा झुंबर दिसायचा. पहिल्या मजल्या प्रमाणेच दुस-या मजल्याची रचना ही सारखीच होती. परंतु खालच्या मजल्यावर नोकर राहायचे आणि वर राझघराण्यातली माणस! महाराज-महाराणी, युवराज,युवराज्ञी.
जर महालात कोणि अतिथी आलेच तर त्यांच्या ही राहण्याची सोय वरच्याच खोल्यांत केली जायची.रघुबाबांची ही सोय वरच्याच एका खोलीत केली होती. एक लाकडी काचेच विशिष्ट प्रकारच दार दिसत होत.त्या दाराबाजुलाच एक उभा स्टूल होता-त्यावर एक फुलदानी ठेवलेली आणि त्यावर भिंतीवर एक मोराची पेंटींग अडकवलेली.
रघुबाबा त्याच खोलीत खाली फरशीवर मांडी घालुन डोळे मिटुन बसले होते.तखोलीची दार खिडक्या सर्व लावुन त्यांनी खोलीत अंधार जमवला होता आणि समोरच एक मेणबत्ती पेटत ठेवलेली,ज्या कारणाने खोलीत तांबडा उजेड पसरलेला. रघुबाबांचे दोन्ही हात गुढघ्यांवर ठेवलेल्या अवस्थेत होते, जे की त्यांनी आता उचलुन आपल्या छातीच्या दिशेने आणले मग हळुच दोन्हीकडून दोन्ही हातांच्या पंजांची बोट विशिष्ट पद्धतीने तर्जनी मध्यमा जोडुन घेत एक डोळ्याचा आकार तैयार केला.समोर जळत असलेल्या मेणबत्तीची हळणारी ज्योत तांबरट प्रकाश फेकत जळत होती..की अचानक तीचा रंग बदल्ला, तांबरट रंग जाऊन तिथे हिरवा रंग आला.रघुबाबांचे श्वास वाढले-कपाळावर घाम जमा होऊ लागला.-काहीतरी विलक्षण शक्ति ते तैयार करत होते, जे वय जास्त झाल्याने थोडी जड जात होती, म्हणूनच श्वास फुलले असावे.
त्या मेणबत्तीवर जळणारी हिरवट प्रज्वलित ज्योत-एका विलक्षण दैवी चुंबकीय शक्ति मार्फत मेणबत्तीवरुन विलग झाली.हवेत तरंगत तरंगत तो हिरवट प्रकाश रघुबाबांच्या त्या तर्जनी मध्यमा जोडलेल्या डोळ्यासारख्या आकारातुन थेट आत जात छातीत घुसली तस त्याचक्षणी रघुबाबांच सर्व शरीर थर-थरल काहीक्षण हिरव्या रंगाने चमकुन उठल - मग काहीवेळाने मंद गतीने तो प्रकाश कमी कमी होत नाहीसा होऊन जात ! खोलीत काल अंधार पसरला.
××××××××××
सावकाराच्या वाड्यात दुस-या मजल्यावर जी बंद खोली होती.त्या खोलीचा दरवाजा आता उघडला गेलेला.त्या उघड्या दारातुन लाल प्रकाश..आणि पांढरट धुक बाहेर पडत होत. दरवाज्यातुन आत जाताच
त्या खोलीत सैतानाची सोन्याची ऊभी मूर्ती दिसत होती. एका रानटी श्वापदाचा भुकेजलेल्या अवस्थेत जसा विद्रूपने जबडा वासावा ,त्याचे धार-धार दात बाहेर यावे -डोळे वटारले जावे तसा त्या सैतानाचा जबडा वासला होता.
त्यातून चार सोन्याचे टोस्कूले दात बाहेर आलेले-वटारलेल्या डोळ्यांमधुन विस्तवासारखी बुभळ दिसुन येत वाफ निघत होती.मूर्ती पुढे रामु सावकार उभा होता! त्याच्या अंगावर खाली एक लाल धोतर सोडुन काहीही नव्हत.कपाळावर एक काळ्या रंगाच सरळ रेषेच टीळा ओढलेल.डोळ्यातल्या बुभळांचा रंग रक्त उतरल्या प्रमाणे लाल झालेला.रामुच्या हातात एक सोन्याच ताट होत-त्या ताटात
एक सोन्याची वाटी ठेवलेली, त्यात लाल रक्त होत.(दुस-या वाटीत पांढरट वीर्य!) ती थाली हातात घेऊन रामु उजव्या बाजूने गोल-गोल फिरवत होता.रामुच्या मागे-शलाका ,लंकेश,यार्वशी, संत्या,ढमाबाई अशी सर्वजण ऊभी होती. सैतानाच्या मूर्तीच्या पायांखाली म्हाद्याच कलेवर पडलेल.त्या निर्जीव कलेवराचे डोळे त्या सैतानाच्या मुर्तीवर एकटक खिल्ले गेलेले.जणु ते जिव नसलेले शरीर ही घाबरत होत -त्या सैतानाच्या मूर्तीला पाहुन.खोलीत एक निर्जीव मेलेली शांतता पसरलेली.
अगदी मृतक शवागारात उभ असल्यासारख भासत होत.
"ते प्रेत माझ्या पायांखाली आणा!" रामुचा चिरकस आवाज आला.
संत्या-लंक्या दोघांनीही लागलीच हालचाल केली-म्हाद्याच प्रेत उचलुन त्यांनी रामुसावकाराच्या पुढ्यात ठेवल.संत्याने न विसरता डोक्यात रुतून बसलेला तो रक्ताळलेला वरवंटा उपसुन काढला..मग पुन्हा जागेवर येऊन उभा राहीला.रामुने ठरल्या प्रमाणे वीर्य रक्तात कालवल,आणी ती वाटी प्रेतावर ओतणार! मग ते प्रेत मांस,हाड,डोळे सर्व काही घाणेरडा वास सोडत त्या खोलीत जळणार,कुजका वास सर्व दिशेना पसरणार! की तेवढ्यात.त्या खोलीतल्या अशांततेला भेदत मोडत तो किन्नरी हास्यमय आवाज घुमला.
" हिं,हिं,हिं,हिं,हिं!" किन्नरी हास्याचा आवाज येताच रामुच्या हातुन त्या वाटीतल द्रव खाली पडायच थांबल.रामुने आपल्या वटारलेल्या डोळ्यांनी आजुबाजुला तिरकसपणे पाहिल.
" कोण हाई ?" रामु सावकाराने पुन्हा एक कटाक्ष आजुबाजुला टाकला.मागे उभे सर्वजणांनी ही तो आवाज ऐकला होता.सर्वजन आजुबाजुला पाहत होते परंतु दिसत मात्र कोणिही नव्हत.
" म्या म्हंतु कोण हाई इथ? निट इचारतुय तर नीट सांग! न्हाईतर फरफटीत घेऊन येईण!" रामुचा आवाज वाढला.ती जी कोणती अनोलखी शक्ति इथ आस्तित्वात आलेली! तिच्यामुळे कार्यात विघ्न निर्माण झाल होत.
" हिं,हिं,हिं,हिं,हिं!" पुन्हा तो आवाज आला! संत्या,यार्वशी,लंक्या,ढमाबाई,शलाका सर्वांच्या नजरा आजुबाजुला पाहु लागल्या.
" मले फरफटीत आणणार तु! मले ऽऽऽऽऽऽऽऽऽऽआं!" शेवटच्या वाक्याला त्या शक्तीचा स्वर उंचावला.
" व्हई! तुलाच. कोण हाईस कोण तु?इतक्या रुबाबात बोलणारी!"
रामुने प्रश्ण केला.
" मी!" अंधारातुन एकच किन्नरी स्वर उच्चार बाहेर पडला. त्या आवाजासरशी , खोलीत पसरलेल्या काळ्या अंधारात बदल होऊ लागला. अंधाराच्या काळ्या पडद्यांवर लाल रंग जणू रक्तासारखा खालून वर -वर वारुळातल्या मुंग्या हातावर चढाव्या तसा भिंतीवर चढु लागला. त्या अंधाराला लाल रक्त गिळू लागला. अंधार बाजुला सारला जात त्या खोलीत लाल रंग पसरला. रामुच्या पुढ्यात जी सैतानाची मूर्ती होती त्या मूर्ती पुढे एक काळा-निळा मिश्रित एक गोलाकारातला लहान डब्या एवढा पोर्टल काळा धुर निघत भिंगरी सारखा फिरु लागला.प्रत्येक सेक्ंदाला तो पोर्टल आपली काया वाढवत-वाढवत जात जेमतेम पाचफुट इतका मोठा झाला आणी त्याचक्षणी प्रथम एक ऊभी जाड काठी त्या पोर्टलमधुन बाहेर आली..मग एक पांढरट हाडमांस चिकटलेला पाय ही बाहेर आला.मग दुसरा पाय-मग एक काळे कपडे डोक्यावर त्रिकोण टोपी अशी एक आकृती बाहेर आली.
" ए कोण हाईस तु? आण इथ काय करतीस? " रामु आपल्या पुढ्यात जे काही अवतरल होत-त्याला उद्देशून प्रश्नकरत म्हणाला.
" मी माया..! हिं,हिं,हिं! "
" कोण माया?" रामु पटकन म्हणाला.मागे उभे सर्वजन त्या आकृतीलाच पाहत होते.काळे कपडे-त्यांवर काहीस विशिष्ट प्रकारच चिकटद्रव चिकटलेल. पाचफुट आकाराची ऊभी आकृती आणि तिच्या हातातएक ऊभी जाड काठी होती.
" दिस जाता , रात होई!"
" अंधाराच सावट,तसे चौही दिशेना पसरी."
"मृत्युची धुन जशी- रानकिडे किरकीरी!"
" समंध ब्रम्हांडावर,फिरवीते मी ! "
" मायविनी मी -मायाविनी !"
शेवटच वाक्य(मायाविनी) ऐकून रामुचे डोळे विस्फारले समोरच्या आकाराकडे तो डोळे फाडून-फाडून पाहू लागला.हातातली ती थाली
एका बाजुला तोल जात थेट खाली जमिनीवर पडली तिचा विशिष्ट प्रकारचा काहीक्षण आवाजा होत राहिला-आणि जस तो आवाज थांबला त्याने क्षणार्धात आपले दोन्ही गुढघे वाकवले मान खाली घातली
एका सैतानी देवाला मान आदर तिथ्याने केलेला नमस्कार होता तो!
रामु सावकार झुकताच मागचे यार्वशी, संत्या,ढमाबाई सुद्धा तसेच खाली झुकले.परंतु शलाका? ती जागेवरच ऊभी होती.एकटक मायाविनी कडेच पाहत होती.मायाविनीच लक्ष शलाका कडे गेल.
तिच्या लालसर चमकणा-या खोबण्या शलाकाकडे पाहू लागला.तिने शलाकाच्या दिशेने पावले उचल्ली.चार पाच पावल चालून ती शलाकाजवळ पोहचली ही! काळ्या साडीत शलाकाच्या पांढरट दुधाळ त्वचेला पाहुण तिने आपली मान हळकेच पुढे केली.तस शलाकाला दिसल.त्या काळ्या त्रिकोणी टोपी आत ना चेहरा होता नाही कोणि मानव तर त्यात होत..एक धुरकट आकार. ज्यात दोन लालसर खोंबण्या डोळे म्हनुन चमकत होते.भयाण पोकळी सरसरुन काटा आणणार दृश्य.
" तु मानव नाहीस! त्याची दुसरी पत्नी आहेस ! अंधाराची अर्धांगीनी !
दिसतय मला दिसतय सर्व , हिं,हिं,हिं,हिं!"शलाका कडे पाहुन मायविनी किन्नरासारखी हसत बोलली.
मग ती हळूच वळली पुन्हा मूर्तीसमोर येऊन ऊभी राहीली.
" उठ सैतानी समर्थका उठ? " मायविनीच्या आज्ञेंसरशी रामु उठला-मग यार्वशी,लंक्या,आणि संत्या उठला-त्याने म्हशीसारख्या माजलेल्या ढमाबाईंनाही उठायला मदत केली.
" क्षमा असावी पाताळपुत्री मायाविनी!परंतु मी अस ऐकल होत..की आपण!"
" शुऽऽऽऽऽऽऽऽऽ!" रामु पुढे काही बोलणार तोच मध्येच मायाविनीने आपल्या हाताच बोट उचलून तोंडावर ठेवल.
" वेळ कमी आहे माझ्याकडे! तुला जे काही बोलायचं असेल! ते आजरात्री रक्ततांचळ महालात बोलु! ह्या सर्वांना घेऊन रात्री महालात ये! हिं,हिं,हिं,हिं " मायाविनीने अस म्हंणत शलाकाकडे पाहिल व ती पुन्हा पोर्टल मध्ये घुसली.तसा त्या खोलीतला लाल रंग भिंतीवरुन खाली-खाली येत नाहीसा झाला आणी तो पोर्टल ही गायब झाला.
" रामु सावकार आम्हाला वाटत तो भटूरडा ह्याच मायाविनी विषयी आम्हाला सांगत होता. ?" यार्वशी रामु सावकाराच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत म्हणाले.तसा रामु वळला त्याने एकवेळ डोळे मोठे करतच यार्वशीकडे पाहिल.
" खुपच शक्तिशाली आहे म्हंणत होता ही मायाविनी! इतकी की एकेकाळी ह्या मायाविनीने अक्षरक्ष स्वर्गातल्या देवांची पळता भुई थोडी केली होती. आणि मग देवांनी कंटाळून , त्रिरुप असलेल्या तीन देवांनी अजुन एक अवतार तैयार केला.-श्रीकाळ! " यार्वशी बोलत होते..लंक्या ,ढमाबाई,संत्या ,शलाका ,सर्वजन ते ऐकत होते.
" मग त्या श्रीकाळ ने हीच अंत केला-"
" ठिक हाई यार्वशी ! आता या तुम्ही! रातच्याला आपल्याला रक्तांचळ महालात जायचय समद्यांना " रामु सावकार मध्येच पटकन म्हणाला.
बोलताना त्याचे डोळे डाविकडून-उजवीकडे फिरत होते.
जणु त्या कप्टी डोक्यात काही विचाचक्र सुरु असावेत!
××××××××××
राहाजगडच जंगल:
एन दुपार झाली गेलेली. दुपारचा सूर्य आकाशातुन खाली धरतीवर अक्षरक्ष आग ओकत होता ज्याने अंगाची लाही-लाही होत होती.
म्हंणुनच काय ते सर्व पक्षी पाखर जंगलात आप-आपल्या घरट्यात आराम करत बसलेले.राहाजगडच जंगल म्हंणायला घनदाट,मोठ-मोठ-मोठ्या झाडांनी ,विचित्र पक्षी-पाखर,घातक जनावर , आणि शेवटला रहस्याने भरलेल होत.जी रहस्य कधीच उलगडणार नव्हती!
एक मोठ जांभळीच झाड दिसत होत. त्या जांभळीच्या झाडाला ही-यासारखी जांभळ फुटली होती. त्याच जांभळीच्या झाडावर एक काला माकड बसलेला.तो आपल्या केसाळ हातांनी बाजूची जांभळ तोडुन एक-एक बी सहित तोंडात टाकून खात होता.त्याची हीच क्रिया पुन्हा-पुन्हा सुरु होती. तेवढ्यात त्या झाडापासुन पुढे चार पाच घोड़ागाड्या येऊन थांबल्या.तो माकड त्या पुढे थांबलेल्या घोडागाडीना पाहत राहिला! चार गाड्यांच्यातुन सैनिकांसारखे कपडे घातलेली मांणस एकापाठोपाठ उतरली.मग एका गाडीतुन एक काळी लुंगी घातलेला -खांद्यांवर झोळी घेतलेला माणुस उतरला-जो की रघुबाबा होता. रघुबाबां नंतर मागुन महाराज उतरले...आणि शेवटला
घोडागाडी चालवणारा संत्या पुढुण उतरला.
" कोंडू काम झाल नव्ह?"
रघुबाबांनी कोंडूबाकडे पाहिल, तसे थोड दुरुन एका घोडागाडीतुन लगबगीने उतरुन ते चालत त्या दोघांजवळ आले.
" महाराज!" प्रथम कोंडूबांनी महाराजांना कमरेत लवुन प्रणाम केल व पुढे म्हणाले.." तुम्ही सांगील्या प्रमाण, पुर्णत गावाला गोल आकारात! वेशीआत चंदनाच्या एकफुट काठ्या जमिनीत रोवल्या आहेत! "
" आण गोंड्याच्या रशश्या ?" मध्येच रघुबाबा म्हणाले.
" जी बाबा! गोंड्याची बी व्यवस्था झाली हाई ! " कोंडूबा स्मित हास्य करत म्हणाला.
" वा लेय भारी !" रघुबाबा खुश होत म्हणाले. त्यांच्या ह्या वाक्यावर कोंडूबाची नजर त्यांच्या खांद्यांपासुन मागे गेली. त्याला दिसल ! मागुन पाच सैनिक प्रत्येकाच्या हातात लाल- पिवळ्या रंगाच्या जाडजुड रशश्या
होत्या...आणि ते सर्व ह्याच दिशेने येत होते.
" बगा बाबा झाला तुमच काम !" कोंडूबाने रघुबाबांच्या मागे हात केला.
त्यांच्या खुणेसरशी महाराज-रघुबाबा दोघांनीही वळून मागे पाहिल.
" या आणा इकड?" कोंडूबा त्या सैनिकांना बोलले.त्या सैनिकांनी ती लाल पिवळी गोंड्या सारखी दिसणारी लाल-पिवळी जाड दोरी
रघुबाबांच्या समोर खाली ठेवली.मग ते पाचही सैनिक बाजुलाच उभे राहिले.
" रघुबाबा? एक विचारु ?" बाजुलाच उभा संत्या न राहवुन म्हणाला.
" हा बोल की!"
" ही येवढी मोठी दोरी तुम्ही कशापाई मागवली हाई? आण ती बी गोंड्यावाणी दिसती हाई! काय गावाला बांधायची हाई व्हय ! हिहिही "
संत्या स्व्त:च्याच वाक्यावर जरासा हसला.
" कळल!कळल!" रघुबाबा अस म्हंणतच पाच सहा पावल चालुन पुढे गेले. त्यांनी एकवेळ खाली पाहिल. त्यांच्या नजरेस खाली जमिनीत एक फुट चंदनाची काठी रोवलेली दिसली.मग त्यांनी डावि-उजवीकडे वळून पाहिलं.दुर-दुर पर्यंत त्या चंदनाच्या काठ्या वीस मीटर अंतर सोडुन पार गावाला गोल गराडा घालून आल्या होत्या.
"त्यो गोंडा आणा?" रघुबाबा पुढे पाहतच म्हणाले.त्यांच्या नजरेस एक जांभळीच झाड दिसत होत-ज्यावर एक काळा माकड बसलेला.
त्या पाच सैनिकांनी पुन्हा त्या लाल-पिवळ्या दो-या मोठ्या कष्टाने उचलल्या आणि रघुबाबांसमोर ठेवल्या..मग पुन्हा मागे जाऊन उभे राहिले. महाराज कोंडूबा सर्वजन एकटक रघुबाबा काय करत आहेत ह्याकडे पाहत राहिलेले...गेल्यावेळेस त्या घंटागाडीची वेळ थांबवल्याची
करामत सर्वांनी पाहिली होती-सर्वांना कळून चुकले गेलेले की हा बाबा कोणी साधारण माणुस नाही. जादूगार आहे!
" संत्या? " रघुबाबांनी संत्याला हाक दिली.
" जी रघुबाबा!"
" माझ्या कापडी झोळीत एक मेणबत्ती हाई ! ती आण माझ्याकर ?"
"जी बाबा !" संत्या अस म्हंणत निघुन गेला.
मागे दहावीस सैनिक उभे होते.त्यातलेच दोन जण कुजबूज करु लागले.
" अरे ह्यो म्हातारा येडा झाला का! येवढा उजेड असताना मेणबत्ती कशापाई पेटवतीया !" पाहिला सैनिक.
" काय माहित भो !पन बाबा लेय पोहचलोला माणुस हाई! गेल्यावेळेस काचेच्या बाटलीतुन सूर्य थांबवला होता! आता ह्या मेंणबत्ती मधुन
काय करील काय माहीत!" दुसरा सैनिक बाबाचा मोठा भक्त असल्या सारखा म्हणाला.संत्याने घोडागाडीत असलेल्या बाबांच्या कापडी झोळीतुन एक मेंणबत्ती बाहेर काढली. तडक ती रघुबाबां जवळ घेऊन आला.ती मेंणबत्ती रघुबाबांकडे सोपावून पुन्हा मागे जात जागेवर उभा राहिला.रघुबाबा मांडी घालुन जमिनीवर बसले मग ती मेंणबत्ती जमिनीत एक छोटासा खड्डा खणून त्यात खोवली.
रघुबाबांनी ठरल्याप्रमाणे दोन्ही हात उचलुन आपल्या छातीच्या दिशेने आणले.. मग हळुच दोन्हीकडून दोन्ही हातांच्या पंजांची बोट विशिष्ट पद्धतीने तर्जनी मध्यमा जोडुन घेत एक डोळ्याचा आकार तैयार केला.
मग हळूच डोळे मिटले.पाहता-पाहता मिनीटे उलटू लागली.
पाच मीनिटे,मग दहा -मिनीटे अस होऊन एकदाचा अर्धातास उलटून गेला.
" अरे काय अंडी घालत बसलाय का हा !" एक सैनिक म्हणाला.
" आर गप्प की लेका ! कोणी ऐकल तर कामावरण काढतील!"
" हा काढू दी की! मग घरी बसुन अंडी घालू ह्या म्हाता-यावाणी हिहिही!" तो पाहिला सैनिक हलकेच दात विचकत हसला.
त्याच्या ह्या वाक्यावर दुस-याने टाळी द्यायला हात पुढे केला..
की अचानक वर आकाशातल्या ढगांचा रंग बदल्ला, पांढरा रंग जाऊन तिथे कालपट जऊल आल्यासारखा रंग जमा झाला.रघुबाबांचे श्वास वाढले-कपाळावर घाम जमा होऊ लागला.-पुन्हा त्या विलक्षण शक्तिला ते तैयार करत होते, जे वय जास्त झाल्याने थोड जड जात असाव.. म्हणूनच श्वास फुलले असावे.ती मेंणबत्ती बाबांनी न पेटताच जमिनीत खोवली होती. ती मेंणबत्ती आता एक बल्बच बटण दाबताच झपकन पेटावी तशी पेटली गेली.परंतु ती ज्योत तांबरट प्रकाशमय नव्हती.
हिरवट होती.
त्या हिरवट ज्योतीला पाहुन ज्या सैनिकाने बाबांची खिल्ली उडवली होती त्याचे डोळे हा विलक्षण प्रकार पाहुन विस्फारले गेले...तोंडाचा आ तो आवासलाच गेला. जांभळीच्या झाड़ावर बसलेला काला माकड ही त्या सैनिकासारखाच बाबांकडे पाहु लागला.
त्या मेणबत्तीवर जळणारी हिरवट प्रज्वलित ज्योत-एका विलक्षण दैवी चुंबकीय शक्ति मार्फत मेणबत्तीवरुन विलग झाली.हवेत तरंगत तरंगत तो हिरवट प्रकाश रघुबाबांच्या त्या तर्जनी मध्यमा जोडलेल्या डोळ्यासारख्या आकारात जाऊन थांबला.एका माणिका एवढा त्या हिरव्या ज्योतीचा आकार होता.रघुबाबांनी दोन्ही हात विलग केले.
एकवेळ त्या हिरवट माणिक येवढ्या चमकणा-या ज्योतीकडे पाहिल..
तिचा हिरवा प्रकाश त्यांच्या चेह-यावर डोळ्यांत पड़ला होता.
रघुबाबांनी एकवेळ त्या लाल-पिवळ्या दोरीकडे पाहिल..मग त्या हिरव्या ज्योतकडे.त्यांनी आपला एक हात वाढवला मग हवेतच ती ज्योत पकडली.एक हलकासा पिस पकडावा तशी ती ज्योत रघुबाबांच्या हाती आली..मग त्यांनी हलकेच त्या हिरव्या ज्योतीवर दाब दिली..तशी ती ज्योत हवेतुनच अलगद हळूवारपणे त्या लाल-पिवळ्या दोरीच्या दिशेने जात थेट त्या दोरीआत शिरली. काहीक्षण ती दोरी हिरव्या रंगाने प्रखर प्रकाश फेकत चमकुन उठली...मग तो प्रकाश मंद-मंद होत नाहीसा झाला.एक दोन मिनीटा पुरता घडलेला हा अतर्कनी,अवर्णनीय असा प्रकार सर्वांनी उभ्या डोळ्यांनी अंगावर शहारा येईपर्यंत पाहिला होता.काय-काय विचार प्रश्ण मनात सर्वांच्या मनात उमटले जात होते?
शब्दांत वर्णन करण्या पल्याड होत.ढगांवर साचलेली काली काजळी काही मिनीटांत बाजुला सारली गेली, तसे रघुबाबा हळकेच आपल्या जागेवरुन उठले.
" कोंडू!" रघुबाबांच्या हाकेसरशी कोंडूबा तिथे चालत आला.
" म्या काय म्हंणतु नीट ऐक! " कोंडूबांनी होकारार्थी मान हलवली.
" ही दोरी ! डाव्या बाजुनी ह्या चंदनाच्या काठ्याना बांधात नेहायची आण उजव्या बाजुनी परत यायच! आण हे काम सूर्य अस्ताला जायच्या
अगोदर व्हायला हव ! "
" जी बाबा ! तुम्ही काय बी काळजीत राहू नगा! म्या लागलीच सुरुवात करतु!" कोंडूबा अस म्हंणतच बाकीचे सैनिक घेऊन ती दोरी बांधत आपल्या कामाला लागले.
"महाराज ,तुम्हाला काय काम हाई का?"
रघुबाबा महाराजांना म्हणाले.
" नाही ओ बाबा ! बोलाना ?" महाराज जरासे हसत म्हणाले.
" ठिक हाई ,संत्या घोडागाडी गावात घे?"
" जी रघुबाबा!" संत्याने अस म्हंणत घोड्याच्या पाठिवर हात मारला प्रथम तो खिंखाळला मग धाऊ लागला.
××××××××××
क्रमश: