Rakt Pishachchh - 20 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 20

The Author
Featured Books
Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 20

॥ रक्त पिशाच्छ ॥ 18+ भाग 20

लेखक:जयेश झोमटे (जय)

महाराणी, युवराज्ञी रुपवती दोघीही घोडागाडीत बसुन महालाच्या दिशेने निघालेल्या, घोड़ागाडी चालक अगदी वेगाने घोडागाडी दमडावत होता.

तबडक, तबडक आवाज करत घोडागाडीला बांधलेले सफेद घोडेही हवेच्या वेगाने पळत आपल काम चोख पार पाडत होते. आकाशात चंद्र दिसत होता, त्याचा निळसर उजेड समंद पृथ्विवर पहुडलेला.त्याच उजेडात घोडागाडीच्या दोन्ही तर्फे रेगिस्तानसारखी दुर-दुर पर्यंत पसरलेली काळी वाळु दिसत होती. हा तसं म्हणायला काही-काहीवेळाने एक सुकलेल चेटकीणीसारख्या अस्तव्यस्तपणे झाडाची काया सेक्ंदासाठी पूढुन यायची आणि तशीच मागे निघुन जायची. महाराणी, यू.रा:रुपवती दोघीही घोडागाडीत गप्प बसलेल्या, वेगाने पळणा-या घोडागाडीमुळे रुपवतीचे केस हवेने चेह-यावर तर कधी डोळ्यांसमोर येत होते. मग रुपवती ते केस हळुच आपल्या हातांनी बाजुला सारत होती. असंच पुन्ह एकदा तीच्या डोळ्यांसमोर केस आले , तिने कृतीप्रमाणे ते बाजुलाही सारले, केस बाजुला सारताच तिला डोळ्यांसमोर जरास दुर श्रीकृष्णाच मंदिर दिसल. मंदिरात प्रवेश करणा-या चौकटीमधुन चंदेरी प्रकाश किरणे कमी जास्त होत चमकत होती.

" इतक्या रात्री मंदिरात कोण असेल?" यु.रा:रुपवतीने स्व्त:लाच मनोमन प्रश्न केला.काहीवेळ ती असंच विचार करत राहीली तेवढ्यावेळेतच घोडागाडी वेगाने मंदिराजवळ पोहचली जात होती , त्याचक्षणी यू.रा:रुपवतीच्या मनात जत्रेच्या पहिल्या दिवशी भेटलेल्या त्या म्हाता-या

मांणसाचा विचार आला.

" घोडागाडी थांबवा चालक! " रुपवती अचानक पटकन म्हणाली.

आतिचा तो आवाज ऐकून महाराणींनी तिच्याकडे वळुन पाहिल.

"आईसाहेब , आम्ही जरा मदिरात जाऊन येतो!" घोडागाडी आतापर्यंत थांबली गेलेली.

"ठिक आहे लवकर या !" महाराणी म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर होकारार्थी मान हळवुन रुपवती मंदिराच्या दिशेने जाऊ लागली.

रुपवतीने मंदिराबाहेर आपल्या चपला काढल्या, मग मंदिराच्या पाषाणाच्या पाय-या चढल्या , समोर लकाकती पाषाणाची बोगद्यासारखी आत जाणारी भिंत होती.युवराज्ञीने आपली पाऊले वाढवली व आत जाऊ लागली. आत श्रीकृष्णाची उभ्या मूर्ती आणि पायांखाली तेवणा-या दिव्याला सोडून काहीही नव्हत, की अचानक श्रीकृष्णाच्या त्या उभ्या मूर्तीमधुन पिवळससर प्रकाश किरणे बाहेर पडू लागली,त्या प्रकाशातुन काहीवेळाने पिवळसर धुळीकणसुद्धा बाहेर पडली जात त्या धूलीकणांमधून एक लहान मुलाची आकृती तैयार झाली. हात, पाय,डोक ,सर्व शरीर निळ्या रंगाच असुन हि-या पेक्षा प्रखरपणे चमकत आहे, गोल निळ्या चेह-यावर दोन पाणीदार टपोरे काजळ घातलेले डोळे आहेत,डोळ्यांवर पातळ थोड्या जाडश्या काळ्या भुवया आहेत,ओठ जरासे गुलाबी असून त्यांवर एक मंद स्मित हास्य आहे.डोक्यावर एक मोर -मुकुट लावलेल असुन वाढलेले काळे केस आहेत , गळ्यात सोन्याची काही विशिष्ट आभूषणे आहेत, दोन्ही हातांत दोन सोन्याचे कडे आहेत,खाली एक भगवी, आणि त्यावर रेषांची डिजाइण असलेल धोतर असुन , कमरेला एक पिवळसर मोराचा प्ंख अडकवलेली बांसुरी आहे. आता तुम्हा सर्वांच्या मनात एकच नाव आल असेल -श्रीकृष्ण! नाही का? आणि ते अगदी बरोबरच आहे म्हणा.

हा अवतार आहे बालश्रीकृष्णांचा. परंतु ते अवतार घेऊन का आले आहेत ? कशासाठी,कुणासाठी आले आहेत? या पाहुयात पुढे

" बाबा !"

बाहेरुन रुपवतीचा आवाज व ती सुद्धा आत आली.आत येताच समोरच दृष्य पाहुन तिचे डोळे जरासे मोठे झाले, तोंडाचाही आ-वासला.

..कारण....समोर..कारण समोर...! उभे होते...????

×××××××××××××

आंबोच घर

आंबोच्या घरात प्रथम एक वीस×वीसची खोली होती आणि त्याच खोलीतुन मधोमध एक दरवाजा दिसत होता..ज्या पलिकडे स्वयंपाक घर होत! स्वयंपाक घरात बत्ती जळत होती.आणि त्या बत्तीच्या तांबडसर प्रकाशात भिंतीवर अडकवलेल्या मांडणीत ठेवलेली ताट,चमचे,प्लेटस, ग्लास इत्यादी दिसत होते.खोलीत मेघा चुलीजवळ एक चौकोनी पिरा घेऊन त्यावर बसली होती, तिच्या डाव्याबाजुलाच एक चार सळ्यांची खिडकी होती ,खिडकीतून चंद्राचा प्रकाश समोरच्या पेटत्या चुलीवर पडला जात अस दिसुन येत होत की त्यावर दोन गोल भांडी ठेवली आहेत, एका भांड्यात भात शिजत आहे तर -दुस-यात वरण.

भाजीसाठी टोमेटो आणायला आंबो केव्हाचा गेलेला तो अजुन परतला नव्हता, म्हणुनच भाजी अद्याप बनवली नव्हती

" ह्यो बा कुठ राहिला कुणास ठावुक , इतका ऊशीर लावतय!"

मेघा स्व्तशीच अस म्हंणतच तिने एक कटाक्ष खिडकीतून बाहेर टाकला , तिला चंद्राच्या निळ्या उजेडात समोर पाचफुट कठड्याची दगडी बांधकामाची विहीर दिसली व त्या विहीरीपासुन पुढे चंद्राच्या उजेडात काळी-निळी पडलेली श्रापीत बाग ही दिसली , ज्या बागेत एक द्रुष्ट अमानविय भयाण शक्तिच मंजर सावजा समवेत मृत्युच खेळ-खेळत होत. बाहेरुन दिसणारी ती साधीशी बाग आता क्लिष्ट,पाश्वी ,आसुरी आनंद बाळगणा-या शैतानी शक्तिने झपाटून टाकली होती. ज्यात प्रवेश करता तर येत होत....पन... बाहेर पडन. असंभव आहे!

अंधारात चार पायांवर कोळ्यासारख चालत.एका सापासारख पाळापाचोळ्यातुन वाकड,तिकड सरपटत-तर कधी एका हिंस्त्र माकडासारख केकाळत-ओरडत उड्या मारत ते ध्यान येत होत.

कंदीलाच्या प्रकाशात धुक्यातुन वाट काढत आंबो बागेबाहेर घेऊन जाणा-या वाटेपर्यंत पोहचला होता. चाळीस-पन्नास पावलांवर

आंबोच घर दिसत होत आणि स्वयंपाक घरातल्या खिडकीसमोर बसलेली मेघा ही.

" मेघे!" आंबो ने स्वयंपाक घराच्या खिडकीजवळ बसलेल्या

मेघाला पाहत आवाज दिला. त्याचक्षणी आंबोच्या कानांवर एक

विचीत्र ओरडण्याचा आवाज पडला,तो आवाज नक्कीच सामान्य नव्हता. मानवाची जोड त्याला नव्हती-ते आवाज होत भेसुर, रागीट,सुडभावनेने पेटुन उफाळून निघालेल. आंबोच्या बागेतल्या झाडांवरुन एक काळसर आकार फांद्यांवरुन उड्या घेत पुढे-पुढे येत होता.ज्याला ना आकार होत नाही उकार , एक प्रेत जळतावेळेस

जस प्रेतातुन काळधुर बाहेर निघत-तशी ती काळी धुआंधार आकृती होती. जेमतेम सहा-फुट मोठी..जीला फक्त धार-धार नख्यांचे दोन बलदंड फुगीर हात होते, हवेत उडत ती धुआंधार आकृती समोर धुक्यात

दिसणा-या कंदीलाजवळ जात होती जिथे आंबो उभा होता. त्या आकृतीला खाली पाय नसुन एक वळ-वळवणारी शेपटी होती व पुर्णत शरीरातुन वाफ निघाली जात त्या वाफेतून वातावरणात दुर्गंध पसरत होता. तिच्या त्या काळसर थोबाडावर ,असलेल्या खोंबण्यातल्या लालसर डोळ्यांना तो कंदील दिसला -ज्या कंदीलाला पाहुन ती चेकाळली,रागावली तीने जबडा वासला भयंकर गर्जन केली. तो आवाज ऐकुन इकडे मेघाच्या काळजात चर्रर्र झाल "आं " दचकुनच तीने खिडकीतून बाहेर पाहील, त्या चंद्राच्या निळसर उजेडात गुढघ्यांन इतक्या धुक्यात तिला आपला बा हातात कंदील घेऊन पाठमोरा उभा असलेला दिसला. आंबो ला पाहताच त्या काळ्या सावलीने आपले काळे धार-धार नखांचे हात पुढे केले,तोंडातुन एक भयंकर गर्जन करत हवेतुन आंबोच्या दिशेने वेगाने झेप घेतली.

" बा...!" मेघाने आपल्या पित्याला हाक दिली. न जाणे का परंतु मेघाच्या मनाला काहीतरी भयंकर घडणार आहे, अस वाटु लागल..

चिंतेने मन सतावु लागल.

" बा, ला काय झालं? तो अस का वागत हाई? माझी हाक का घेत नाय हाई ?" मेघाच्या मनात प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. की तेवढ्यात ह्दयाचा थरकाप उडावा-मानवाच्या डोळ्यांना त्याच्या बुद्धीला एक विलक्षण धक्का बसावा, काहीतरी वेगळच दिसावे,घडावे अस दृष्य दिसाव, तस घडल गेल. मेघाच पुर्णत शरीर जागेवरच थिजल, डोळे फाडुन हातात येतील इतके मोठे झाले, तोंडाचा आ वासला जीभ थोडीशी बाहेर आली.आंबो हातात कंदील घेऊन जागेवर पाठमोरा उभा

होता. की तोच ज्याप्रकारे एक विमान हवेतुन खाली वेगाने लैंडिंग करतो

त्याचप्रकारे री काळी सावली धुक्यातुन चित्कारत,वेगाने आंबोच्या दिशेने येत होती, तीचा वेग इतका प्रचंड प होता , की आजुबाजुच धुक डाव्या-उजव्याबाजुला फेकल जात होत. मेघावती ने त्या काळ्या आकारास पाहिल ,त्या आकाराला पाहुन तिच्या मनात नवल,आश्चर्य, काळजी ,भीती,सर्व भावनांचा उदय एकाक्षणी उफाळून वर आला.

सर्वप्रथम नवल-आश्चर्य तर तिला ह्या गोष्टीच वाटल , की ह्या जगात कलियुगात अद्याप ही अशा भुताखेतांचा वावर,अस्तित्त्व शिल्लक आहे.

दुसर तर मनात आलेली ती भीती,व काळजी दोन भावना जराश्या वेगळ्या होत्या. भीती तर त्या ध्यानाच हिडिस -विद्रूप रुप पाहुन आली होती,काळजी आपल्या पित्याच्या जिवाला काही हानि न होवो ह्यासाठी आली होती-परंतु ती तर पाहण्यावाचुन काहीही करु शकत नव्हती! त्या ध्यानाला मारण्यासाठी त्याच अंत करण्यासाठी ती कोणी जादुगार थोडी ना होती? तिच्या हाती होत फक्त आणि फक्त पाहण बस्स!

समोरुन येणा-या आपल्या मृत्युला पाहून टरकीफाय आंबोची हालत बिघडली , हात -पाय सर्वच्या सर्व निकामे झाले , आवसानच गळाले होते त्याचे ते विद्रूप ध्यान पाहून ,जे कोणत्याही क्षणी त्याच्या नरडीचा घोट घेणार होत, मांसाचे लचके तोडून...हाता पायाचा खिम्मा करुन अक्षरक्ष भुकेल्या भुजंगप्रयात हावरटलेल्या कुत्र्यासारख खाणार होत.

आंबोने एकवेळ हळुच शेवटच मेघाकडे मागे वळून पाहील, नकळत त्याच्या चेह-यावर एक स्मित हास्य आणि डोळ्यांतुन अश्रु बाहेर आले.

त्या ओळावलेल्या डोळ्यांत मेघाच्या बाळपणीपासुन ते आतापर्यंतच्या सर्व आठवणी कशा एकाक्षणात झळकुन गेल्या-एक चित्रपट जस मोठ्या पडद्यावर दिसाव ,त्याप्रकारे ती आयुष्यभराची चित्रफित आंबोला दिसली. कस त्याने त्याच्या पत्नीच्या मृत्यु नंतर आपल्या लेकिला वाढवल होत,अंगा खांद्यांवर खेळावल होतं..! सर्वच्या सर्व आठ्वणी जशा मनातुन उफाळून आल्या होत्या..पन आक्रोश,रडण्यासाठी शेवटची भेट घेण्यासाठी वेळ होता कुठे.

हीच त्याची शेवटची वेळ होती का? उभ्या आयुष्यात मानव पैशाच्या मागे धावतो , पैसा कमावला, श्रीमंत झाला -की मग त्याला गर्व, अहंकार एका लोख्ंडाला गंज चढावी तसा चढत जातो , त्या अहंकाराने त्याची माणसा दूरावली जातात ,आपल्या स्व्त:च्या मांणसा सोबत सुद्धा त्याला वेळ घालवायला वेळ नसतो, मग जेव्हा- मग जेव्हा म्हातारपण सुरु होत, शरीर एकच जागी पडुन राहत, मरण येण्या अगोदर त्या दहा मिनीटांन अगोदर जिवनात आपण काय केल , काय नाही त्याची कसोटी डोळ्यांसमोर एका चित्रफिती प्रमाणे फिरु लागते- परंतु तो पर्यंत वेळ निघुन गेलेली असते, हाती उरतो तो फक्त पश्चात्ताप-असो पुढे वाचा ! मेघाने आपल्या पित्याकडे पाहील ,

आंबोचे ते हसु..ते पाणावलेले डोळे काहीतरी सांगत होते?त्या डोळ्यांत उभ्या आयुष्यात एका बापाच आपल्या लेकीवर असलेल प्रेम दिसत होत,जे मेघाला जाणवल होत. पुढे काय घडणार आहे हे सुद्धा तिला कळल होतं. आंबोने नकळत आपला डावा हात आशिर्वाद द्यावा तसा मेघाच्या दिशेने केला. वेळेला जणु मानवाच्या तर्कापल्याडची मर्यादा उरली नव्हती, 0:25xचा व्हिडिओ जसा प्ले व्हावा तशी वातवरणातली वेळ धावत होती.आंबोच ते हसु पाहुन मेघाच्या

मनातल्या भावनेचा उद्रेक जसा एकाच क्षणी विस्फ़ोटका सारखा फुटून आला डोळ्यांतुन आसवांच्या धारा जश्या पुरा सारख्या वाहु लागल्या,

" नाय बा ,नाय..अं..आ...अं..!" हुंदके देतच मेघाने खिडक्यांवरच्या सळ्यांवर हात ठेवला. त्याचक्षणी अगदी वेगाने पुढुन धुक्यातुन चित्कारत(आ..आ..आ..आ आवाज करत ) येणा-या त्या काळ्या सावलीने आपले धार -धार नख्यांचे हात आंबोच्या छाताडात घुसवले ,

प्रथम त्वचा फाडून..आतली सफेद कात मग मांसात रुतून थेट त्या विषारी नखांनी आंबोच्या काळजात मार्गक्रमण केल, तसा आंबोच्या तोंडातुन ,डोळे,कान,नाक सर्व अवयवांतुन लालसर -कालपट रक्त निघाल जात त्या वेदनांसरशी तोंडातली जीभ,डोळे जीभ बाहेर येत देहातला आत्मा बाहेर पडला ,आंबो क्षणात गतप्राण झाला.

"बाऽऽऽऽऽऽऽऽऽ" आपल्या बापाचा जिव गेला हे पाहुन मेघाच्या मुखातुन एक आर्तकींकाळी बाहेर पडली. तोंडातुन निघालेली ती किंकाळी जशी बाहेर पडली त्याचववेळेस तेवढ्यातच तिच्या सळ्यांच्या खिडकीवर ठेवलेल्या हातावर एक पांढरट-हाड मांस चिकटलेला नख वाढुन ती काळपट झालेला अमानविय हात पडला. तो हात पाहुन तिच्या मनातली भीती पुन्हा उत्तेजित झाली. तिने आपला हात खिडकीवरुन काढून घेतला,चार पावले मागे सरली, चुकीन तिचा पाय पी-याला अडकुन ती खाली कोसळली, तो हात अद्यापही खिडकीवरच होता. तो हात पाहुन तिच्या भावनेचा बांध क्षणात बंद झाला होता.भीतीने मनात वाईट अघोरी विचार येऊ लागले.आता त्या मसनात आपण एकटेच आहोत! त्या वाईट शक्तिने आपल्या बापाचा कसा जिव घेतला. आता बळी म्हणुन त्या मसनात कोणी दुसर शिल्लक असेल तर ते आपण आहोत ह्याचा अर्थ आता, त्या वाईट शक्तिचा हेतु साध्य होण्यासाठी ती आपल्याकडे येणार , आलीये.आता कोणत्याही क्षणी ती आपलाही घात करणार.मेघाच्या मनात भीतीमय विचार उत्पन्न होत-होते....

तेवढ्यात तिचा हात आपल्या पोटावर गेला. आपण गरोदर आहोत हे तिला आता ह्याक्षणी जाणवल, आपल्यावर जर कधी हल्ला झाला. आपण त्या वाईट शक्तिच्या हातुन मारलो गेलो , तर आपल्या होणा-या मुलाच काय?त्याने तर अद्याप ह्या जगात ही प्रवेश केला नव्हता! आपल्या आईवडिलांचा चेहराही पाहिला नव्हता! त्याच्या सोबत असं का व्हाव ? त्याची काय चुकी आहे ?.

" नाय म्या माझ्या पोरास्नी काहीही होऊ देणार नाही!"

मेघाने पोटावर हात ठेवतच मनात निश्चय केला,काहीही करुन मसनातुन बाहेर पडायच! आपला व आपल्या होणा-या मुलाचा जिव वाचवायचा बस्स!

" मेघेऽऽऽऽऽऽऽ.!" मेघा आपल्या विचारांत गाढ गुंतली होती ,तेवढ्यात हा घसा खाकरुन बोलणारा आवाज आला. जो की तिच्या कानांत शिरला..तिने समोर खिडकीत पाहिल,तो पांढराशिफ्ट हाताचा पंजा..व त्या हातावरची काळी-निळी बोट विशिष्ट पद्धतीने सळीवर पकड पकडुन हालचाल करत होती.

" मेहघे...ऽऽऽऽऽऽऽऽ" पुन्हा तो घसा खाकरुन बोलण्याचा आवाज आला.

बाहेर रातकिड्यांची किरकिर वेगाने वाजू लागली होती, बाहेर मसनात एका झाडावर बसलेला लालसट वटारलेल्या डोळ्यांच अपशकुनी कारस्थानी घुबड मनमोहक मृत्युची शिळ (व्हुव्हुव्हव्हू) आवाज करत वाजवत होता. आजुबाजुला मसनात सर्वत्र पसरलेल्या गाढ धुक्यात..

लाल माती खाली गाडलेली प्रेत , मातीच्या ढेकळांवरुन हात बाहेर काढून बोट फिरवत ,मग मग एक-एक करत बाहेर पडू लागली होती.

जणु समंद प्ंचक्रोशीतल्या ओळखीच्या राहजगड मसनात आजरात्री प्रेतांची जत्राच भरली होती. पुन्हा आलेल्या त्या आवाजाने मेघाची पाचावर धारण बसली, कारण समोर...कारण समोर!"

××××××××××

श्रीकृष्णाच्या मंदिरात असलेल्या उभ्या पाषाणापासुन बनलेल्या मूर्तीच्या पायांखाली ,पाषाणापासुन बनवलेलाच एक गोल काला दिवा होता,त्यातली वात अगदी मंद अशक्तपणे पेटलेली होती..तितक्यात दिव्यासमोर एक हिरव्या-लाल जाडसर बांगड्यांचा गोरापान हात आला..त्या हाताच्या पाच बोटांत एक चांदीचा ग्लास धरला होता..त्या हाताने तो ग्लास थोड वाकवुन त्यातल पाणी त्या..दिव्यात ओतल...पाणि दिव्यात जाताच वात प्रखरपने चमकुन उठली तसा तो हात मागे गेला. युवराज्ञी रुपवती होती ती ,आणि तिच्या मागे मंद स्मित चेह-याने तिच्याकडे पाहणारा तो म्हातारा होता. साक्षात देवाने रुप घेतल होत, पण का?कशासाठी? अस तर नाही ना की युवरज्ञीवर काही भयानक धोका उद्भविणार होता..त्यासाठी साक्षात प्रभु आपल्या लाडक्या भक्ताला वाचवण्यासाठी रुप घेऊन आले होते?

" बाबा?" यू.रा:रुपवतीने एक गिरकी घेतली. तसे तिला दिसल समोर तो म्हातारा तिच्याकडेच पाहुन मंद स्मित हास्य करत होता.

" काय..ग पोरी!" त्या म्हाता-यान विचारल.

" संध्याकाळी कुठे होतात तुम्ही? दिसला नाहीत!"

" तु आली व्हतीस व्हय इथ?"

" नाही..तस नाही !मी घोडागाडीतुन जाताना एक कटाक्ष इथे टाकला होता.म्हंटल तुम्ही बाहेर असला तर दिसला असतात ना "

" असं व्हय! पन कुठ गेलती तुम्ही?" त्या म्हाता-याने प्रश्ण केला.त्याच्या ह्या प्रश्णावर यू.रा:रुपवतीच भान काहीक्षण हरवल व ती म्हणाली.

" असंच थोडस काम होत बाहेर! "यु.रा: रुपवतीने शलाकाच प्रकरण सांगितल नाही.परंतु तो तर साक्षात परमात्मा होता..अखंड सृष्टिचा निर्माता रचेता होता...त्यापासुन काय लपणार.नाही का?

" बर ते जाऊद्या..! तुम्ही कुठे होतात..? आणि आता ह्या मंदिरातच राहणार आहात का? त्यापेक्षा आमच्या बरोबर चला ना?" यु.रा: म्हणाली.

" येईन की..!" तो म्हातारा जरासा हसला." पन एका अटीवर !"

" अट? कसली अट?" युवराज्ञीच्या वाक्यावर त्या म्हाता-याने आपला

मळकट हात समोर केला, त्याच्या हातात एक लाल-पिवळा दोरा होता..आणि त्या दो-यात ओवळा गेलेला...एक शक्तिशाली..लॉकेट

सुर्यांशी..! काळोखाला दुर ठेवणारा-कालोखाच्या रक्षकांना , त्यांच्या मालकांना , भुत,प्रेत,पिशाच्च समंद हिडिस जिवांना दुर ठेवणारा साक्षात....त्रिकाळ शक्तिचा ठेवा असलेला सुर्यांशी.

" हे काय आहे?" यु.रा:न समजुन म्हणाली.

" हा..! माझ्या पोरीसाठी बनिवला व्हता मी, लेय लाडाची व्ह्ती माझ्या.."

"होती म्हंजे बाबा!"

" होती न्हाई ग हाई! पन कुठ हाई ते ठाव न्हाई,मेल्यामंधी हरवली ना बारीक व्हती तव्हा,पुन्हा कधीच भेटली नाय, तसबी आता माझ वय झाल हाईत ,कुठून शोधणार तिला ! मंग.म्हणुन तुच आता माझी पोर समजुन म्या तुला ह्यो धागा देतू..घालशील नव्ह?"

त्या म्हाता-याच्या वाक्यावर यू.रा:रुपवतीने काहीक्षण विचार करण्यात घालवला व काहीवेळाने म्हणाली.

" घालेल ना.पन माझी ही एक अट हाये!"

" तुझी बी अट हाई व्हई " त्या म्हाता-याने डोळे डावीकडून-उजवीकडे फिरवले."बोल बाई बोल,काय अट हाई तुझी!"

" तुम्हाला माझ्याबरोबर आताच्या आता महालात रहायला याव लागेल!"

" आता.! नाय..ग नाय..! आता नाय जमणार उद्या येईल की."

तो म्हातारा जरासा गोंधळून म्हणाला.

" का ? आज काय होणार आहे बर?"

" अंग काय होणार न्हाई ," तो म्हातारा जरासा हसला. " कस हाई ना..

माझ एक मित्र हाई.. तो भेटाया येणार हाई आता! तर त्याच्या संग बोलुन,काही येळ घालून.. मंग मी उद्या येईण की!"

" अच्छा कोण मित्र?" यु.रा: रुपवती जरा डोळे छोठे करत म्हणाल्या.

ज्या नजरेला पाहुन त्या म्हाता-याचे शब्द अड्खळत बाहेर पडू लागले.

" जाऊदे..! तुझा माझ्यावर इश्वासच न्हाई ,नग घालुस तु..ह्यो दोरा." अस म्हंणतच तो म्हातारा पाठमोरा वळला. युवराज्ञीला वाटलं आपण जरा जास्तच बोल्लो.ज्याचा त्या बिच-या बाबांना राग आला ते दुखावले गेले.

इकडे पाठमोरा उभा असलेला तो म्हातारा गालातल्या गालातहसत होता.

जणु त्याने यू.रा: रुपवतीच्या मनातले बोलच ओळखले असावेत.

" माफ करा बाबा ! मी जरा जास्तच बोल्ले ,द्या त्या दोरा. घालते मी!"

यु.ज्ञी:रुपवतीच्या ह्या वाक्यावर त्या म्हाता-याने गर्रकन वळून मागे पाहिल.त्याने तो लाल-पिवळा दोरा ज्यात सुर्यांशी लॉकेट होता..तो यु.रा:रुपवतीकडे दिला..! आपल्या हातात तो दोरा घेऊन युवराज्ञींने एकवेळ त्या दो-यातल्या सुर्यासारख्य सोनेरी लॉकेटकडे पाहिल..तसा तिला भास झाला की तो सुर्यासारखा दिसणारा लॉकेट तांबड्या रंगाने चमकला आहे...तिने तो लॉकेट आपल्या गळ्यात घातला...व लागलीच समोर पाहिल. तसा तिला धक्काच बसला,कारण समोर,कारण समोर आता...त्या म्हाता-याच्या जागेवर...कोणिही उभ नव्हत!

" बाबा ??" युवराज्ञीने हलकेच गिरकी घेतली.तसे तिला श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवलेल्या ग्लासातल पाणी पिताना तो म्हातारा बाबा दिसला.

" हुश्श्श इथे आहात तुम्ही ! मला तर वाटल !"

"काय निघून गेलो..हाहा हाहा" तो म्हातारा बाबा जरासा हसला , परंतु ते जरास हास्य ही युवराज्ञीने पाहताच तो मनावर असलेला काहीवेळा अगोदरच क्षीण कसा झटकन निघुन गेला..एकदम फ्रेश -फ्रेश वाटु लागल.

××××××××××××××

मेघाच सर्व लक्ष त्या चार उभ्या सळ्यांच्या खिडकीत होत...आणि त्या सळ्यांच्या खिडकीवर तो हात ठेवलेला होता...जो की आता हळु हळु खाली निघुन गेला. हात निघुनजाताच आता त्या खिडकी बाहेरुन

पांढरट धुक वाहु लागल..काहीवेळ बाहेरुन कसलीच हालचाल झाली नाही हे पाहुन मेघाला धीर आला.. तिच्या मनात आता उत्कंठा निर्माण झाली..ती त्या खिडकीजवळ जाऊ लागली.! पांढरट धुक पाहता-पाहता वाढु लागल..इतक की बाहेरच चांदण्याचा प्रकाशही रोखला गेला..

मेघाने बाजूला खालीच ठेवलेली बत्ती उचल्ली , त्या बत्तीच्या हुकामध्ये

चुकुन एक लसुन मगाशी मेघा खाली पडली तेव्हा उडून नेमका त्यात फसला होता हे मेघाला ठावुक नव्हत. बत्ती उचलुन मेघा गुढघ्यांवर

चालतच खिडकीच्या दिशेने निघाली. बत्तीचा तांबडसर उजेड तिच्या घामाने ओलावलेल्या चेह-यावर पडत होता..साडीचा पदर जरासा खांद्यांवरुन बाजुला सरकला जात आतले दोन फुगीर वक्षस्थले , उघडी पातळ मादक कंबर दिसत होती...काहीवेळातच मेघा खिडकी जवळ पोहचली ही. कसलीही-हालचाल बाहेरुन होत नव्हती..जणु युध्दा पुर्वीची ही शांतता तर नव्हती ना ?

एक हात मेघाने खिडकीवर ठेवला,दुस-या हातातली बत्ती थोडी खिडकीच्या दिशेने बाहेरच काही दिसत ह्यासाठी पुढे केली.

इकडे मंदिरात म्हाता-या बाबांनी आपले डोळे बंद केले.त्या बंद डोळ्यांआड त्यांना मेघावर ओढावलेली भयान निर्माण झालेली परिस्थिती दिसली.

"काय झाल बाबा ? " यु.रा:रुपवती म्हणाली.

" काय नाय गो बाई!" ते म्हातारे बाबा जरासे हसले व एकटक आपल्या स्व्त:च्या मूर्तीकडे पाहु लागले.

मेघा एकटक धुक्यातुन बाहेर काही दिसत का ते पाहत होती.परंतु तिला पाहायच तरी काय होत? कशाला नाही ती उठाठेव ती करत होती? गप्प गुमान ह्या जागेतुन निघून जायच? स्व्त:चा जिव वाचवायचा,नाहीते उद्योगधंदे करण्याची काय गरज होती तिला ? उगाच्ंच का स्व्त:च्या जिवाची पैज लावायची..!

मेघा एकटक समोर पाहण्यात मग्न होती,की तेवढ्यात मागुन काहीतरी ताट वगेरे पडण्याचा आवाज आला,त्या निर्जिव शांततेत तो आवाज घुमला..मेघाने लागलीच धड-धडत्या काळजासहित मागे वळूनी पाहिल..तिला अंधारात दोन लहानसे डोळे लुक-लुकताना दिसले..व वेगाने ते दोन डोळे तीच्याच दिशेने जमिनीवरुन सरपटत आले. समोरुन

काय दिसेल.-कसला आकार असेल..हे सर्व पाहण्यासाठी मेघाने छातीत श्वास अडकवून धरला..नी त्याचक्षणी अंधारातुन एक लहानसा उभट चेह-याचा , मोठ्या कानांचा,दोन दातांचा,लहान-लहान पायांचा..मागे शेपूट असलेला उंदीर मेघाच्या बाजूने (चुईचुइ करत)निघुन गेला.

"हुंंहंहंहू.....हुन्हं....!" छातीत इतकावेळ दबा धरुन ठेवलेला श्वास मेघाच्या तोंडातुन मोठ्या ड्यामचे दरवाजे खोलताच पाणी वेगाने बाहेर पडावा तसे बाहेर पडला..आणि जसा श्वास बाहेर पडला.त्याचक्षणी त्या सळ्यांच्या खिडकीतुन दोन पांढरट थंडगार प्रेतासारखे( मयताचे) हात बाहेर आले ,..त्या हातांनी पाठमो-या मेघाचा गळा आवळला..ह्या अचानक मागुन झालेल्या प्रहाराने मेघाला सुटण्याचा मार्ग काही मिळाला नाही..तिचे हात-पाय श्वास न मिळाल्याने झाडले जाऊ लागले..

की त्याचक्षणी मेघाच्या हातात असलेली ती बत्ती खिड़कीवर फुटली..काच,फुटून,रॉकेलच स्पर्श त्या लसणाला झाला,..तसा तो लसुण

लसूण..तापला..त्यातुन लहान बुड-बुड्या निघाल्या जात तो रॉकेल..एका विशिष्ट प्रकारच्या लयीने चमकला जात, एक स्फोट झाला..त्या स्फोटात असलेल्या आगीने थेट त्या रुश्या,भुश्या,चिंत्या तिन्ही ध्यानांवर झडप घातली..एकाचवेळेस एकुण तीन पांढ-याफट्ट शरीराचे नग्ण प्रेत वाकडे-तिकडे हातवारे करत, ओरडत,विव्हळत बाहेर जळू लागले...! फटाके वाजावे तसे फटफट,स्मशानातल प्रेत जलाव तस चट-चट आवाज होत..सर्वत्र लसणाचा भाजलेला..वास पसरला..!

×××××××××

 

" युवराज्ञी! " रुपवतीच्या कानांवर घोडागाडी चालकाचा आवाज पडला.

" जी चालक !" युवराज्ञी म्हणाल्या.

" महाराणींनी आपल्याला बोलावले आहे!" तो चालक म्हणाला.

" ठिक आहे आलोच आम्ही !"

"जी!" अस म्हंणतच तो चालक निघुन गेला.

" बाबा,येते मी ! " युवराज्ञी अस म्हंणतच जाऊ लागल्या ,एक दोन पावल चालून ती थांबली तीने मागे वळून पाहिल. व म्हणाली.

"आम्ही उद्या तुम्हाला नेहायला येऊ !" यु.रा: रुपवतींच्या ह्या वाक्यावर

त्या म्हाता-या बाबाने फक्त होकारार्थी मान हलवली...तश्या युवराज्ञी निघुन गेल्या.

"सत्याचा विजय ! असत्यावर पिढ्यांन पिढ्या होत..आला आहे आणि ह्या पुढेही होत राहिल..! " अस म्हंणतच त्या म्हाता-याच्या चेह-यावर एक हास्य पसरल" सत्यासाठी खोट बोलन कधीच पाप नसत!"

त्या म्हाता-या बाबांच्या शरीराच पुन्हा एकदा धूलीकणांत रुपांतर झाल..व त्या श्रींच्या मूर्तीत खेचल..गेल...ते कायमच.

 

क्रमश: