Rakt Pishachchh - 18 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 18

The Author
Featured Books
Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 18

॥रक्त पिशाच्छ ॥ 18+ भाग 18

राहाजगड जंगलातल्या कालजल नदीच्या दुस-या टोकावर

महाराज, रघुबाबा, यार्वशी प्रधान, कोंडूबा, आणी त्यांच्या मागे हातात तलवार, भाला, अंगावर चिळखत लावुन सैनिक उभे होते.

" चला महाराज..!" रघुबाबा म्हंणाले.

तसे त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली !

पावले वाढवुन सर्वजन गुहेच्या दिशेने निघाले, ज्यात तो सैतान गाढ निद्रेत झोपला होता?सहज एकाचवेळेस दहा-बारा जन सोबत चालु शकतील अशी वाट होती ती.डावी-उजवीकडे मोठ मोठ्या झाडांच्या सजीव आकृत्या उभ्या होत्या.आणि त्या झाडांमधुन गेलेल्या पायवाटेतुन सर्वजन चालत निघालेले.त्या विशाल हिरव्याजर्द झाडांच्या जाडजुड फांद्यांवरच्यां पानांनी सुर्याचा प्रकाश रोखुन धरला होता -ज्याने खाली अंधार व थंडी पसरली होती.काहीवेळातच सर्वजन त्या गुहेसमोर पोहचली. एका दानवाच्या मुखा सारखा भलामोठ्ठा आ त्या गुहेच्या द्वाराने वासला होता...आणि त्या गोल मुखापल्याड होता..अंधार.

" पेटवा र मशाली !"

कोंडूबाने मागे वळुन सैनिकांकडे पाहिल. कोंडूबाच्या म्हंणण्या प्रमाणे पुढ़च्या काहीक्षणातच तिथे दहा-बारा मशाली पेटल्या.

" महाराज,प्रधानजी, तुम्ही इथच थांबा ! म्या...कोंडूबा आण ही मशाल घेतलेली सैनिकच आत जातु ! बाकी समदी इथच रहावा!" रघुबाबा

म्हणाले. त्यांचे हे बोल महाराजांनी कसलेही आटो-पिटा न टाकता मान्य केले-तसा ही उलट उच्चारी त्यांचा स्वभाव नव्हता..व हातात दुसरा पर्यायही त्यांच्याकडे शिल्लकही नव्हता.

महाराजांनी पुन्हा होकारार्थी मान हलवली , त्यासरशी सर्वप्रथम रघुबाबा त्यांसमवेमत कोंडूबा मागुन हातात धगधगत्या मशाली घेतलेले सैनिक त्या दानवी गुहेच्या कालमुखात घुसले.

इकडे बाहेरुन महाराज,यार्वशी प्रधान त्या गुहेत पुढे पुढे जाणा-या मशालींचा उजेड तो पर्यंत पाहत राहिले...जो पर्यंत त्यांना त्या काळ अंधाराने गिळला नाही.

×××××××

राहाजगड गावात वर आकाशात पांढ-याशुभ्र ढगांना काली काजळी चिकटली होती...एकप्रकारे मृत्युच काल सावट पसरल होत राहाजगड गावावर! आणी त्या आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांमध्ये एक-दोन वेळा काही बिन आवाजाच्या निल्या विजाही कडाडत होत्या.

" अर हे काय इपरीत हाय म्हंणायच! फ्क्सत गावावरच काळ ढग आलत! बाकी पुढ तर समद सफेद हाई ! " एक गावकरी मुखाचा आ वासुन -डोळे मोठे करुन वर आकाशात पाहत म्हणाला.

" गौड ब्ंगाल नाय बा....सैतान आलाय सैतान! इपरीत घडणार हाई

आता समद! गावाला नजर लागलीया! "

दुसरा गावकरी त्या प्रथम गावक-याच्या वाक्याला दुजोरा देत बोलला.

त्यांच्या मागे उभे असलेले गावकरीही असंच काही-बाही कुजबूज करत होते. आणि ती चर्चा ती कुजबुज नक्कीच काही साधारण नव्हती त्यात भय, मरणाची भीती लपली होती.

××××××××

राहाजगडच्या मसनातला तो दोन झापांचा लोख्ंडी गेट हवेच्या धक्क्याने आतल्यादिशेने कर-करत उघडला. गेट पुढे खाली एक उतरणीचा मातीपासुन बनलेला रस्ता दिसुन येत होता. जो पुढे चालुन गेल्यावर खाली लाल मातीच्या ढेकलांखाली झोपलेल्या मृत प्रेतांच्या कबरी लागायच्या. आताह्याक्षणी त्या कबरींभोवती वर आकाशात पसरलेल्या ढगांच्या काळ्या छायेचा चिकटद्रव चिकटला जात पुर्णत मसनात धुरासारख धुक वाहत होत. आज सकाळी ह्या मसनात रुश्या.. चिंत्या...भुश्या...! असे तीन प्रेत गाडली गेली होती...हे ते प्रेतांवरच्या लाल ताज्या मातीने समजुन येत होत. मसनातच एकाबाजुला आंबोच

चेटकीणीसारख दिसणार कौलारु छप्परच घर होत. त्या घरावर असलेल्या कौलांमधोमधच्या नळीतुन पांढरट धुर बाहेर निघत होत.

घराच्या पुढ़च्याबाजुचा दरवाजा बंद होता की अचानक तो दरवाजा उघडला,त्या उघडलेल्या दारातुन आंबो बाहेर आला.

" बा..?.." घरातुन मेघावतीची हाक ऐकु आली.

" काय..ग मेघे ?" दारात उभ राहूनच आंबो म्हणाला.

" बा..! मला भाजीसाठी टामाटी पायजी व्हती, तू बागेतुन घेऊन येशील

का? माझ जरा पाय दुखतायत या!" आतुन आवाज आला.

" व्हइ! आणतु की!" आंबोने हसतच मान डोलावली.

आपल्या मागे दार ओढुन घेतल आणि बागेच्या दिशेने निघाला.

काहीवेळा अगोदर ज्या लाल मातीच्या ढेकलांखाली रुश्या चिंत्या...भुश्या ! तिघांच्याही कबरी बुंजलेल्या दिसल्या होत्या. त्या आता रिकाम्या होत्या...जणु कोणीतरी उकरल्यासारख्या किंवा ते प्रेत बाहेर आले असावेत!किती भयान मनाचा थरकाप उडवणारी कल्पना, नाही का.? आणि जर हीच कल्पना सत्यात उतरली तर?

×××××××

रघुबाबा व त्यांच्याबाजुलाच हातात धगधगती तांबरट मशाल घेऊन कोंडूबा उभे होते. त्या दोघांच्याही चेह-यावर मशालीचा तांबडा प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात कोंडूबाचा चेहरा जरासा आश्चर्यकारकपणे

उजळलेला.

"बाबा , तुम्ही म्हणाल्या परमाण इथ तर खरच तलघर हाई ! म्हंजी खाली तो सैतान बी असणार की !" कोंडूबाने रघुबाबांकडे पाहील! बाबांच्या

चेह-यावर जरासे विचारमग्न भाव पसरलेले....जणु डोक्यात कसलेतरी विचारचक्र चालु असावेत.

" बाबा..! बाबाऽऽऽऽऽऽऽ!" कोंडूबाने आवाज दिला ! दुस-या हाकेला

रघुबाबांची विचारमग्न तंद्री जराशी भंग पावली.

" अं..!" रघुबाबांनी कोंडूबाकडे पाहिल व पुढे म्हणाले." काय म्हणालासा,कोंडू?"

" बाबा! म्या म्हंणलु की तुम्ही बोलल्यापरमाण इथ तलघर हाई म्हंजी त्यो सैतान बी असल की!" कोंडूबांच्या ह्या वाक्यावर रघुबाबा काहीक्षण पुन्हा विचारात बुडाले-व आपली बाजु मांडत म्हणाले.

" तु म्हंणतोस तसंच होवो बघ!" रघुबाबा....अस म्हंणतच पुढे जाऊ लागले , त्यांच्या ह्या वाक्यावर कोंडूबांनी मनातच म्हंटल" बाबा अस का म्हणाले.!" तीन-चार पावल चालुन रघुबाबा थांबले , समोर खाली जाण्यासाठी दगडाच्या पाय-या होत्या.

" पाय-या हाईतसा पुढ़.. निट या पोराव!"

कोंडूबांनी हातातली मशाल खाली झुकवली व काहीसेकंदानी पुन्हा

वर आणली.. आपला प्रथम पाय त्या दगडी पायरीवर ठेवला एक-एक पायरी उतरुन खाली येऊ लागले. त्यांच्या मागो-माग रघुबाबा,मागुन सैनिक येऊ लागले. कोंडूबांनी तलघराची अखेरची पायरी संपवली,तलघरात प्रवेश केला. त्यांच्या मागुन रघुबाबा हातात मशाली घेतलेले सैनिक ही आले. रघुबाबांनी एककटाक्ष त्या पुर्णत तलघरात

टाकला, त्यांना थोडासा बदल जाणवला. गेल्यावेळेस तलघरात दगडी खांबांवर पेटत्या मशाली अडकवल्या होत्या,आता मात्र तेथे काहीही नव्हत.ते गोल-मटोल खांब रिकामे होते. आणी गेल्यावेळेस अंगाला झोंबणारी थंडी सुद्धा गरमीत बदलली होती. हे सर्व झालेले बदल रघुबाबांनी ओळखले होते.

" बाबा ! " कोंडूबा हलक्या स्वरात म्हणाले परंतु त्यांचा आवाज अगदी चौहू दिशेना गुंजला होता.

" काय ?" रघुबाबांनी कोंडूबांकडे पाहिल, कोंडूबाचा एक हात खांद्यावरुन सरल रेषेत वर आला-हाताच्या पाचही बोटांमधली तर्जनी पुढच्या दिशेने होती..तसंच डोळे तोंड डोक सर्व लक्ष पुढे होत. रघुबाबांनी सुद्धा पुढे पाहिल. समोर एक साधीशी पेटी होती पुसटशी तपकीरी रंगाची.

×××××××××××

नाग्या काल रात्री त्या सैतानाच्या तावडीतुन सुटुन जंगलातुन वापस आला होता....परंतु त्या घटनेचा त्याच्या मानसिकतेवर इतका परिणाम झालेला की तो एका खुळ्यासारखा वागु लागलेला... त्याच्या डोक्यावरच परिणाम झालेला. नाग्या एकटाच स्व्त:शी

बडबडत असायचा -कधी खिदळायचा....रडायचा-तर कधी एका गुरासारखा ओरडायचा. त्याच ते ओरडन मनात धस्स करायच भीतीला पाझर फुटायच. आपल्या लेकाची ही अवस्थापाहुन नाग्याच्या आईची अवस्थ दयनीय झाली होती...हसरा खेळता पोर न जाणे कसली नजर लागली होती-खात नव्हता की पित नव्हता. नाग्याच्या वडीलांच घर जेमतेम दहा फुट उंच व दोन खोल्यांच होत...वर कौलारु छप्पर होत... प्रथम एक शेणाने सारवलेली खोली दिसुन येत होती..त्याच खोलीत एका मातीच्या भिंतीत खोवलेल्या सपाट लाकडावर शंकराची लालमातीची लहान मूर्ती दिसत होती...मूर्तीसमोर दिवा तेवत होता. दुसरी खोली होती ती स्वयंपाक घराची.आत एक चुल पेटली होती.चुलीवर एक गोल तवा ठेवला होता..त्यावर तांदळाची सफेद भाकर भाजत ठेवलेली...आणि चुलीसमोरच नाग्याची आईबसली होती.तिच्या मागे अंधारी मोरी होती. इकडे नाग्या आपल्या घराच्या दोन झापांच्या दरवाज्यासमोर शुन्यात नजर लावून बसला होता. तोंडातुन काही हलकेच एकटा पुटपुटत होता.

" रुश्या गेला , भुश्या गेला, चिंत्या बी गेला..खिखिखी! आता समदी मरणार हाईत ! मरुन जिती व्हणार हाईत ! कारण...त्यो आलाय ना ! !आलाय त्यो ! माहीती हाई मला सोडणार नाय कुणाला त्यो ! रक्ताचा पाट वाहाणार हाई..हिहिहिही"नाग्या एकटाच दात विचकत हसला,आणी पुढच्याक्षणाला त्याचे ते ओठ दुमटले जात नाकातल्या होलांमधुन दोन फुगे बाहेर आले व तो एका लहान मुलासारखा पाचही बोट तोंडात टाकुन रडू लागला. नाग्याच्या रडताना हलणा-या खांद्यांमागे शेणाने सारवलेल्या भुईवर एक बाहुला पालथा पडलेला दिसत होता. आज सकाळीच जत्रेतुन आपल खेळण्याच सामान घेऊन परतीची वाट धरणा-या एका दुकानदाराला नाग्याने पाहिल.. त्या दुकानदाराकडे डाव्या-उजव्या दोन्ही हातांमध्ये दोन मोठ्या कापडी पिशव्या होत्या , डोक्यावर एक मोठी गोल टोपली होती. त्या डोक्यावरच्या टोपलीतुनच ह्या बाहुल्याचे अर्धे लालसर केस बाहेर आलेले दिसत होते. नाग्याच्या डोक्याला असाकाही शॉट बसला होता..की तो एका पाच-सहा वर्षाच्या लहान मुलासारखा वागु लागलेला....त्याने तो बाहुला पाहिजे म्हणुन आपल्या वडिलांमागे तगादा लावला लहान मुलांसारखे हात पाय झाडू लागला.नाग्याच्या वडीलांनीही मग जास्त आढेवेढे न घेता त्या दुकानदाराला थांबुन तो बाहुला विकत घेतला व

नाग्याच्या वडिलांनी तो बाहुल नाग्याकडे सोपवला...काहीक्षण नाग्याने तो बाहुल हाती घेऊन त्याच निरीक्षण केल. बाहुल्याच्या आत मऊ लुसलुशीत कापूस भरलेल, u आकाराच्या चेह-यावर दोन कालेसे बोरांएवढे ठिपके होते..त्या ठिपक्यांवरच्या काल्या दो-याने रेखाटलेल्या भुवया पातळ होत्या. तोंड म्हणायला तस काळ्या धाग्याने विशिष्ट प्रकारे हसत आहे अस ओवल होत. डोक्यावर लालसर धाग्यांनी बसवलेले केस रक्तासारखे वाटत होते.अंगावर काहीही नव्हत फक्त खाली दोन भागांत विभागलेल काल धोतर होत. नाग्याच्या वडीलांनी ज्यावेळेस तो बाहुला विकत घेतला त्यावेळेस त्यांनाही तो बाहुला जरासा विचित्रच वाटला.परंतु हा राहिला साधारणसा निर्जीव बाहुला , भले चांगला दिसो किंवा वाईट काय फरक पडतो ! तो काही जिवंत थोडी ना होणार आहे !

हे त्यांच व्यक्तीगत मत होत. नाग्याच्या हाती तो बाहुला सोपवताच नाग्या त्याच्यासोबत खेळु लागला, बोलु लागला. काहीतास त्या बाहुल्याशी खेळुन झाल्यावर आता नाग्याला त्याचा कंटाळा येऊ लागला, तसा त्याने तो बाहुल तसाच भुईवर सोडुन दिला आणि दरवाज्यात जाऊन बसला...मग आतापर्यंत पुढे काय झाल ते आपण पाहीलच आहे.

मित्रांच्या आठवणीनेरडताना नाग्याचे खांदे हळत होते. त्या दोन्ही खांद्यांमागुन तो पालथा पडलेला बाहुला दिसत होता. काहीक्षण असेच निघुन गेले होते... की अचानक मागे त्या बाहुल्याच्या पाचही बोटांची हालचाल झाली. एक हात कोप-यापासुन मागे गेला-दुसरा हात ही तसच मागे गेला आणि खाडकन त्या बाहुल्याने कमरेइतका शरीराचा भाग वर उचल्ला, मग हळुच ज्याप्रकारे एका रेस मध्ये रनिंग करण्या अगोदर जसा एक प्लेयर गुढघा वाकवुन आपल्या पोजीशन मध्ये असतो त्याप्रकारे एक गुढघा वाकवला....मग दुसरा गुढघाही तसंच वाकवला आणि पाठीच्या हाडांचा कट-कट हाड मोडली जावी तसा आवाज होत उभा राहिला.

" नाग्याह्याऽऽऽऽऽ...." नाग्याच्या कानांवर एक घोगरा आवाज पडला.

त्या बाहुल्याची मान अजुनही खालीच होती. जी की आता हळु-हळू कट-कट आवाज होत वर उचल्ली जात होती... बाजुला भिंतीवर असलेल्या शंकराच्या मूर्ती समोर जलनारा दिवा बिन हवेच्या झोतासरशी फड-फड करायला सुरुवात झाली....ती तांबडी ज्योत डावीकडून उजवीकडे हेलकावे खावु लागली. आता कोणत्याहीक्षणी ती वात विझणार हे विधीलिखीत होत.....आणि तसंच झाल. वात विझली.त्या बाहुल्याने आपली मान शेवटी नाग्याच्या दिशेने वलवली-काहीवेळा अगोदर दिसलेला तो बाहुल्याचा विचित्र चेहरा आता अजुनच अल्टीमेट्रिक्स रुप घेऊन आला होता. ते बोरीएवढे दोन काळे डोळे आता तपकीरी रंगाने लकाकत होते.. दोन सफेद चीर असलेले बुभळ नाग्यावर स्थिरावले होते..डोळ्यांवरच्या पातल भुवया आता गर्द जाडसर झाल्या होत्या. ज्या की क्षणा-क्षणाला हालचाल करत वर खाली होत ताणल्या जात होत्या...काळ्या दो-याने कोरलेल ते तोंड आता जबडा विचकुन हसत होत..हसताच आतले लाल रक्ताने माखलेले दात दिसत होते.

नाग्याच्या कानांवर त्या विद्रूप विचित्र बाहूल्याच रुप घेऊन आलेल्या

अमानविय ध्यानाचा आवाज पडला, तो घोगरा आवाज नाग्याच्या कानातल्या पडद्यांवर पडताच त्याची हालचाल थांबली डोळ्यांतले अश्रु गालावरच थांबले , तोंड नी डोळे वरच्या भुवया जराश्या विस्फारल्या गेल्या.नाग्याने मागे वळायला सुरुवात केली -मागे काय ध्यान उभ आहे ह्या पासुन नाग्या पुर्णत अजाण होता. नाग्याच्या डोक्यावर जरी परिणाम झाला असला..तो वेडा झाला असेल , तरी भीतीला काही वर्गवारी थोडीना होती ? की बाबा तु शहाणा , गरीब, श्रीमंत , रागीट,वेडा आहेस,म्हणुनच मी तुला घाबरवणार नाही! सपशेल खोट आहे हो ते ! कारण भीती ही एक फ्री एजंट आहे, ती कोणाच्याही मनात घुसू शकते ,

एका मुकप्राण्याच्या, जमिनीवर रेंगाळणा-या, हवेत उडणा-या किटकाच्या मनातही ती घुसु शकते, तर मानव काय चीज आहे.

नाग्याच्या वेड मनात एक संदी कोपरा होता, भीतीचा. त्या कोप-यात

आता वेडेवाकड्या विचित्र विचारांनी आपली भलीमोठ्ठी रांगच्या रांग लावायला सुरुवात केली होती.नाग्याला कालच सर्व आठवल.. काल रात्री नाग्या जेव्हा जंगलातुन एकटाच येत होता-तेव्हा काहीतरी कोणततरी विपरीत ध्यान त्याच पाठलाग करत होत-झाडांवर बसुन..पाळापाचोळ्यातुन सरपटत अंधारात लपून बसत....ते जे काही होत ते..नाग्याच पाठलाग करत होत....नाग्याच्या रक्ताची चटक त्याला लागली होती..तर कधी ते ध्यान त्याला घोग-या आवाजात शिव्याशाप देत होत.परंतु नाग्याच्या गळ्यात असलेल्या काळ्या दो-यामुळे ते जवळ

काही येत नव्हत. आणि अशातच नाग्याने गावची वेस गाठली होती.

परंतु त्या आवाजांनी नाग्याच्या काळजात मेंदूत भयनिर्माण केल होत..

मनातल्या कान्याकोप-यात अंधा-या गल्लीत जी भीती अडकून बसली होती..ज्याने नाग्याला येड लागल होत.परंतु आज आताह्याक्षणी ते ध्यान नाग्याच पाठलाग करत डोग धरुन त्याच्या घरापर्यंत पोहचल होत. एका गरमभट्टीतल्या आगीत एक चमचा अगदी तांबडा होईस्तोपर्यंत तापवावा आणि हातावर लावावा, व हातावर त्या चमच्याचा डाग कायमस्वरुपी रेखाटावा तसा तो घोगरा आवाज नाग्याच्या कानांवर रेखाटला होता..जणु तो आवाज नाग्याच्या मनात असलेल्या भीतीमय संदीकोप-याची चावी होती.जी की कानांतुन घुसत थेट मनात संदीकोप-याच्या होलात जाऊन भयाला एका फट्क्यात बाहेर खेचणार होती. थर-थरत्या ओठांनी..कपाळावर जमलेल्या घामाच्या द्रवबिंदुंनी

नाग्याने मागे वळून पाहील.की तोच...अचानक..

×××××××××××

गुहेबाहेर महाराज, यार्वशी प्रधान व त्या दोघांच्याही मागे तीस-चाळीस

सैनिक उभे होते. गुहेच्या अवतीभोवती एकही झाड नव्हत ज्यामुळे

सुर्याचा प्रकाश त्या सर्वांच्या अंगावर पडत होता.परंतु सुर्याच्या प्रकाशात उब नव्हती..कारण सूर्यदेव आता अर्ध्यातासांवरच आपल्या परतीची वाट अडवुन डोंगरमाथ्यावर उभ राहीले होते

" प्रधानजी?.." महाराजांच सर्व लक्ष पुढे त्या अंधा-या गुहेतच होत.

" जी महाराज! "

" समर्थांविषयी काही कळालऽऽऽ" महाराज पुढे काही बोलणार तेवढ्यात समोर गुहेत काही हालचाल झाली व एक आवाज सुद्धा आला.

"आणा र आणा वर त्या पेटीला.!"

आवाज कोंडुबांचा होता. महाराज यार्वशी प्रधान दोघेही समोर पाहत होते. त्या गुहेच्या वासलेल्या काल्या तोंडात काही हालचाल होत-होती.

सर्वप्रथम कोंडूबा मशाल हाती घेऊन बाहेर आला, मग मागोमाग रघुबाबा आले.. त्यांच्या चेह-यावर अजुनही गंभीर विचारमग्ण भाव होते. जे महाराजांच्या डोळ्यांनी अलगद टीपले. रघुबाबा कोंडूबा दोघेही जसे बाहेर आले..त्यांच्या मागुन पाच सहा सैनिक ही आले.... त्यांच्या हाती एक ऊभी कबरीसारखी पेटी होती.

" आणा र आणा? ठेवा इथ..!" कोंडूबा म्हणाले. तसा त्या पाच -सहा सैनिकांनी ती पेटी महाराजांपासुन ठिक दुर दहा पावलांवर जमिनीवर ठेवली. आजूबाजूला जेवढे सैनिक होते..ते आता सर्व वर्तुळाकारात उभे राहिल्र होते आणि त्या सर्वांच्या नजरा कुतूहलाने त्या कबरीवर स्थिरावल्या गेलेल्या.आत काय असेल? कबर उघडताच आतुन काय ध्यान बाहेर येईल..? त्याचा आकार उकार कसा असेल?

नाना त-हेचे प्रश्ण सर्वांच्या मनात येत होते. रघूबाबांनी एक कटाक्ष सूर्यावर टाकला...तो पुसटसा अर्धवट भगवा आकार डोंगरमाथ्यावरुन खाली-खाली जायला सुरुवात झाली होती. रघुबाबांनी हलकेच एक हात

आपल्या कापडी पिशवीत टाकला...व तो लागलीच बाहेर ही काढली-

आता त्यांच्या हातात एक जादूई घंटागाडी(हौरग्लास) होती. तीची रचना पुढीलप्रमाणे : दोन अरुंद मानेने जोडलेले काचेचे बल्ब आणिएक बल्ब रिकामा तर दुस-या बल्बमध्ये होती ,वाळु-सामान्यतपणे पाहता घंटागाडीचा उपयोग वेळ मोजण्यासाठी केला जातो प्राचीन काळी घंटागाडीचा उपयोग फार वेगाने होत असे...परंतु आताच्या युगात मात्र इतका होत नाही -असो पुढे पाहा. रघुबाबांनी पिशवीतुन काढलेली ती घंटागाडी काही साधारण नव्हती-या पाहूयात.

" हे बघा , सूर्य कवा बी अस्तला जाईल ! म्हणुनच मी ही जादूची घंटागाडी काढली हाई..ह्या घंटागाडीमंधी येळ थांबवुन ठेवण्याची समता हाई.जो पर्यंत ही वरच्या काचेतली समदीच्या समदी वाळू खालच्या काचत पडली जात नाय...तो पर्यंत सूर्यअस्ताला जाणार नाय! आण एकदा का समदी वाळु खालच्या काचेत गेली..! का लगीच काळूख व्हील. म्हणुनच ही जादूची वाळु खालच्या काचेत जायच्या अगोदर ती पेटी उघडुन आतल्या सैतानाचा अंत करावा लागल. "

सर्वांनी रघुबाबांच्या ह्या वाक्यावर होकारार्थी मान हलवली. तसे रघुबाबांनी ती घंटागाडी तळहातावर धरली, त्यांनी आपले डोळे मिटले..नी पुढे जे काही घडल फार चमत्कारीक होत.

ती घंटागाडी बिन आधाराने रघुबाबांच्या तळहातावरुन हलकेच वर आली आणि हवेतच जादूई शक्तिने एका जागेवर थांबली....घंटागाडी हवेत थांबताच वातवरणातली हवा, नी हवेने ऊडणारा पाळापाचोला सर्वकाही जागेवरच स्तब्ध उभ राहिल...आणी ती वरच्या काचेतली वाळु वेगाने सोनेरी रंगाने चमकत खालच्या काचेत पडू लागली.

" करा सुरुवात !" रघुबाबा घाईतच मोठ्याने ओरडले. तसा दोन-चार सैनिकांनी पुढे होत - कबरीच झाकण उघडण्यासाठी कुठे काही खटका वगेरे मिळतो का ते पाहायला सुरुवात केली. एक-दोन जणांनी तर अक्षरक्ष झाकण उपटण्याचाही निष्फळ प्रयत्न केला परंतु यश काही केल्या हाती आल नाही.

" तलवारीन वार कर ही घे!" एका सैनिकाने आपल्या सैनिक मित्राला तलवार दिली, ती तलवार घेऊन त्याने हात वर नेला आणि तिप्पट वेगाने खाली आणत त्या कबरीच्या लाकडावर हाणला -तसा पुढच्याक्षणाला त्या धार धार तलवारीची पात वाकली जात दोन तुकडे झाले.

" थांबा र तुम्ही" कोंडूबा कबरीजवळ आले. " ह्या कबरीत त्यो सैतान लपला हाई ! ही कबर अशी नाय उघडणार " कोंडूबाने त्या सर्व सैनिकांवर एक कटाक्ष टाकला , व मोठ्याने ओरडले.

" आर ए सोन्याऽऽऽ!.. आर मर्दा.. ये की बाह्येर ?" कोंडूबांच्या वाक्यावर त्या गोल वर्तुळाकार गर्दीतुन हात-पाय बलदंड फुगीर असलेल्या शरीरयष्टीचा सोन्या बाहेर आला. सोन्या म्हंणजे कोंडूबांच्या हाताखाली वाढलेला त्यांचा एक आवडता सैनिक कमी आणि चेला जास्त होता. कोंडूबांच्या दोन्ही पायांना स्पर्श करुन तो कबरीजवळ उभा राहिला. एक धार-धार कटाक्ष त्या कबरीवर टाकला...

" सोन्या...घे?" कोंडूबांनी अस म्हंणतच एक गदा हवेत सोन्याच्या दिशेने भिरकावला , जो की सोन्याने हलकेच हवेतच झेलला.

सोन्याने एक कटाक्ष कोंडूबांकडे टाकला, कोंडूबांनी हळूच एक हात उंचावुन पाचही बोटांमधल(तर्जनी) एक बोट त्याला दाखवल ,जणु एका वारातच कबर उघडायला पाहिजे असा त्याचा अर्थ असावा?

सोन्याने होकारार्थी मान हलवली.

" जय बजरंग बळी !"

घंटागाडीतली ती सोनेरी वाळु घळा-घळा वेगाने खाली पडत होती....तसा इकडे त्या सर्वांचा जिव टांगणीला येऊ लागला होता.

शेवटची मुठभर वाळु त्या घंटागाडीत उरली होती. इकडे सोन्याने

बजरंग बळीच नाव घेत तो सोनेरी गदा वर हवेत उचल्ला.. वरचे दात खालच्या ओठांनी चावुन धरले आणि वेगाने गदा असलेला हात खाली-खाली आणायला सुरुवात केली. प्रत्येक जण डोळेफाडुन

पुढे काय घडेल हे पाहत होता ! की तेवढ्यातच अचानक ती घंटागाडीतली वाळु संपली ! स्विच बंद करताच खोलीत अंधार पसरावा तसा अंधार पृथ्वीतलावर पसरला - नी त्याचक्षणी त्या कबरीवरही गद्याचा एक जोरदार चांदेरी ठिंणग्या उडवत प्रहार झाला.

त्या प्रहाराने कबरीच झाकण खटका उघडला जाव त्याप्रकारे खट आवाज होत किंचीतस उघडल गेल.

" मागे व्हा समदे !" रघुबाबा पुन्हा मोठ्याने ओरडले.

××××××××××

आंबोची बाग म्हणायला तशी साठ-सत्तर फुटांवर गोल आकारात पसरलेली. बागेत टॉमेटो, काकडी, वांगी,हिरव्या लहान मोठ्या फुग्या मिरच्या, आंबे -सीताफळ, पेरु नाना त-हेची फळ , भाजी लावली होती.

काही झाड इतकी मोठी झालेली की ज्यांमुळे दिवसाच उजेड बागेत किंचीतस पोहचत ही नव्हत. सूर्यदेव केव्हाचेच अस्ताला निघून गेले होते. संध्याकाळ झाली जात चौहीदिशेना अंधार पसरला गेलेला.

हातात कंदील घेऊन त्या कंदीलाच्या तांबड्या प्रकाशातुन गुढघ्यां इतक्या धुक्यातुन वाट काढत आंबो एक-एक झाड मागे सोडत पुढे पुढे जात होता. टॉमेटोच झाड शेवटच्या टोकाला होता.रातकीड़यांची किरकिर उभ्या आसमंत गगनी वाजत , आंबोच्या कानांत ही जात होती. बागेत पसरलेला अंधार खासच नैसगिर्क वाटत नव्हता कारण तो अंधार कृत्रीम अमानविय शक्तिने जो साकारला होता. ज्याप्रकारे गढुळ पाण्याखालच काही दिसत नसत , त्याचप्रकारे तो गढुळ अंधार होता...

त्या गढुळ अंधारापल्याड काय वावरत आहे-सरपटत आहे, ह्या पासुन आंबो न जाणिवहिंत होता. त्या अंधार काजवासारख्या चमकणा-या पिवळ्याजर्द चीर पडलेल्य डोळ्यांपासुन , लुक-लुकणा-या च्ंद्रेरी हिंस्त्र जनावारांच्या नेत्रांपासुन, वखववखणा-या भुकेल्या पोटी सरपटत तर कधी झाडांच्या फांद्यांवरुन उड्या मारणा-या त्या सर्व ध्यानांपासुन आंबो अजाण होता.कंदील हाती घेऊन एक-एक पाऊल पुढे वाढवत आंबो जसा पुढे सरसावत होता, तसे मागुन तीन रुश्या,भुश्या,चिंत्या तिघांच्याही दलभद्री आकृत्या येत होत्या.

पांढ-याशिफ्ट कचकड्याच्या बाहुलीसारख्या दिसणा-या तोंडाच्या दलभद्री नग्ण आत्मे. लाज , लज्जा, शरम सर्व विकुन टाकलेले अभद्र ध्यानमय आत्मे. चालत -चालत आंनो बागेच्या खोलात आला होता.

समोर पुढे मसनाच दगडांच कंपाउड दिसत होत. आंबो गुढघे वाकवुन खाली बसला.खाली जमिनीवरुन गुढघ्यांन इतक धुक वाहत होत. त्याच धुक्यात आंबोने हातातला जलता कंदील ठेवला. पुढे

टॉमेटोच छोठस झाड होत त्यावर सात-आठ लाल रंगाचे टॉमेटो लटकलेले एक हात वाढवुन आंबोने एक टॉमेटो काढला मग दुसराही काढला , मग तीसराही , परंतु चौथ्या फेरीला मात्र त्याचा हात थांबला

डोळे जरासे वटारले गेले त्यातले पांढरट बुभळ स्पष्ट दिसु लागले.

कारण मागे.......मागे काहीतरी उभ होत. आकाशात उगवलेल्या चंद्राच्या उजेडात त्याची सावली खाली पडली होती जी पाहुनच आंबोचा हात थांबला. आंबोच्या खांद्यांमागुन त्या ध्यानाच्या अंगावरचा तो कालपट चिपचिपीत कपडा क्ंदीलाच्या तांबड्या उजेडाने लकाकत होता.त्याच्या हातात असलेल्या मोठ्या काठीचा अर्धा दांडा दिसत होता.की तेवढ्यातच मागुन

" आंबोऽऽऽऽऽऽऽऽ. माग बघऽऽऽऽ " असा खोल खर्जातला घोगरा आवाज आंबोच्या कानांवर पडला.

आंबोच्या मनाला आज सकाळपासुन कसलीतरी विलक्षण भीती जाणवत होती- काहीतरी वाईट घडन्याची चाहूल लागलेली.

लहाणापासुन ते मोठे होईपर्य्ंत इतकी वर्ष ह्या जागेत राहिलेल्या आंबोना

आज मात्र ही जागा परकी वाटत होती.राहजगडमध्ये घडणा-या

विचित्र घटनांची वार्ता त्यांच्या कानांवर ही पडलेली , त्यासहीतच मेलेल्या मांणसांचे हाळहाळ करुन केलेले निघृण खून, त्यांच्या मृतदेहांची झालेली भयाण अवस्था सर्वकाही आंबो ने पाहिल होत. जे सर्व आता डोक्यात येऊन मग कल्पनाशक्तिने डोळ्यांसमोर बिभत्स आकार घेत..मनात धडकी भरवत होत.

" को...को...को..को...कोण हाई मांग!" शेवटच्या वाक्याला आंबोने

एक आवंढ़ा गिळला.

" ए थांब, थांब !माग वळू दे त्याला हिहिहिही!" आंबोच्या मागे एक चिंचेच झाड होत त्या झाडाच्या फांदीवर दोन पांढ-याशिफ्ट नग्ण शरीराच्या रुश्या , भुश्या दोघांच्या मृत आकृत्या बसलेल्या. दोघेही जबडा विचकुन ते पांढरट बुभळमय डोळे वटारुन हसत खिदळत

आंबोच्या भीतीची, त्याच्या ह्या अवस्थेवर हसत होते.

" हा हा..वळू दे वळू दे..! सकाळी हा भें×××द आपल्याकड बघुन कसा हसत होता.!" जाड-जुड शरीरयष्टीच पांढरट रुश्याच प्रेत म्हणाल. त्याच्या ह्या वाक्यावर बाजुलाच बसलेला भुश्या पटकन....

"खिखिहिहिखिहिही!खवखवखव..." घशा आतुन खवखवत हसला.

" हा हा..! असंच हसला , " दुजोरा देत ते प्रेत बोलल.

आंबोचे हे सर्व वाक्य ऐकुन डोळे विस्फारलेले - आज सकाळी जे तीन प्रेत त्याने गाडले होते..त्यांच्याकडे पाहुनच तो हसला होता.

" ह्याचा..अर्थ.! ह्याचा अर्थ..! ती प्रेत जिती झाली हाईत " आंबो मनातल्या मनातच म्हणाला." म्हंजी ! म्हंजी गावत फिरणारा तो सैतान इथ बी आला हाई तर! त्यान जर मेघाला काय केल तर?" स्व्त:च्या जिवाला धोका असताना ही बापाच काळिज पोरीच्या जिवाची पर्वा करत होत.

एकंदरीतच म्हणायचं यर बाप-लेकीच प्रेम शब्दांत मांडण ही शक्य नाही...ते अनुभवण्यासाठी , वडील व्हाव लागत. आंबोच्या मनात नाना त-हेचे विचारचक्र सुरु होते.की तेवढ्यातच मागुन धप्प असा आवाज झाला ,त्या आवाजाने आंबोची तंद्री भंग पावली. काहीतरी वरुन खाली पडलेल , किंवा उडी मारलेली असा तो आवाज होता.बागेत मोठ-मोठी झाडे होती , त्या झाडांची पिकुन सोनेरी झालेली पान गळुन खाली जमिनीवर अस्त्तव्यस्थपणे पडलेली. की अचानक त्या पानांवर एक चर्रर आवाज होत पांढरट पाय पडला... त्या पायाची ती पांढरट त्वचा हाडांना चिकटली होती , पायांची नख जराशी काली पडलेली.

गुढघे टेकवुन आंबो एकटक पुढे पाहत होता...विस्फारलेल्या नेत्रांनी एकापाठोपाठ आवंढा गिळत होता.आजुबाजुची रातकिड्यांची किरकिर जराशी अमानविय शक्तिचा नंगाणाच चालु असल्याने थांबली गेलेली.आजुबाजुचा कृत्रीम अमानविय अंधार -धुक आता जास्तच गढुळ झाल होत. खाली जमिनीवर धुक्यात ठेवता वाहत असणारा तो कंदीलच आता ह्या सैतानांच्या तावडीतुन सुटण्याची एक आशा होती.

मृत्युची भीतीहा एक असा रोग आहे जो भल्या-भल्यांना गारद करतो

साक्षात देवाला ही , तर आपण साधारण मनुष्य काय आहोत? नाही का?

आजूबाजुला परिसरात अशी काही निर्वाण शांतता पसरलेली, की मुंग्याची ही पुट-पुट ऐकू येईल. आणि त्याच शांततेत तो आवाज घुमला..!" चर्र..चर्र...चर्र...! " आंबोच्या मागुन पालापाचोला तुडवत ते ध्यान येत होत. पहिल पाऊल पडळ ते अगदी मंद गतीने , दुसर पडल ते जरास मोठ्या आवाजाने आणि तिसर पडल ते अगदी वेगाने आणि चौथ्या पावलाने अगदी वेग पकडला ("चर्रर.. चर्र चर्र पाचोला तुडवत) ते ध्यानआंबोच्या दिशेने धावत येऊ लागल. तो आवाज जसा जवळ येऊ लागला आंबोच्या काळजाची धड-धड वेगाने दौडू लागली, पाहता-पाहता त्या पावलांचा आवाज अगदी जवळ आला- आणि त्याचक्षणी आंबोच्या मुखातून वटारलेल्या भयभीत डोळ्यांसहित एक किंचाळी निघाली जात त्याने मागे वळुन पाहील.

××××××××××××

"ए लंगड्या नाग्या.वळखला का? " आपला एक हात वर करून तो बाहुला नाग्याला आपली ओळख पटवुन देत त्याच्याकडे दात विचकत पाहत म्हणाला.आकाशात कालअंधार भरुन आलेल. म्हणायला नाग्याच घर गावच्या घरांपासुन जरा लांबच शेवटच्या टोकाला बांधलेल ज्याने घराभोवतीचा सर्व परिसर सुनसान होता ,.

" को...कोण हाईस तु! " नाग्याने प्रश्न केला. त्याच्या ह्या प्रश्णावर तो बाहुला पुन्हा दात विचकत हसला ,हसताना त्याचा जबडा वासला जात आत काहीतरी लालसर रेषांसारख चमकल -ते तपकीरी रंगाचे डोळे लकाकले गेले. व एक घोगरा पाश्वी स्वर बाहेर पडला भांड्यांवर भांडे आपटावा तसा....धातुवर धातू घासावा तसा.

" म्या ह्या....! हव हव हवहव्हव स्स्स्स..! " विचित्ररित्या ते ध्यान हसल व त्याने आपला उजवा हात जरासा वर उचल्ला. नाग्याच्या आईच्या नुकत्याच चुलीवर भाकरी टाकुन झाल्या होत्या, आता ती भाजी मेथीची भाजी कापणार होती..परंतु त्यासाठी विला मिळत नव्हता तर तीने बाजुलाच असलेला धार-धार काळा सुरा घेतला..व भाजी कापायला सुरा मेथीच्या दिशेने घेऊन जाऊ लागली...की तोच अचानक तिच्या हातुन तो सुरा कोणी अज्ञात शक्तिने खेचावा तसा खेचला गेला...आणि हवेत उडून थेट स्वयंपाक घराच्या दारातुन बाहेर येत...त्या बाहुल्याच्या

हातात आला. तो धार धार पातीचा सुरा पाहुन नाग्याची पावले मागे सरु लागली.

" म्या कोण हाई माहीतीये का " मागे मागे सरणा-या नाग्याला पाहत तो बाहुला बोलला." म्या तुझ मरण हाई! काल त्या दो-यामुल वाचला पन आज तो दोरा बी तुझ्या गळ्यात नाय " त्या बाहुल्याच्या दोन डोळ्यांतले ते तपकीरी बुभळ आसुरी लकाकीने चमकले...जबडा वितभर वासला जात तांबड्या रंगाने आत विस्तव असल्यासारखा चमकला , त्या बाहुल्याने अस म्हंणतच जागेवरुन एक अमानविय झेप घेतली..तो सुरा असलेला हात हवेतच मागे घेतला..आणि जसा नाग्याजवळ पोहचतोना पोहचतो...त्याचक्षणी तो सुरा असलेला हात पुढे आणत थेट नाग्याच्या वासलेल्या तोंडात घुसवला...मग आत जाऊन गळाफाडून..रक्ताच्या चिळकाड्या उडवत बाहेर आला.

" नाग्याव..ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" नाग्याची आई दोन्ही हात कानांवर ठेवुन मोठ्याने ओरडली. तिचा तो आक्रोशमय आवाज ऐकुन नाग्याच्या निर्जीव देहाच्या छाताडावर बसलेल्या त्या ध्यानाने गर्रकन आपली मान वळवून तिच्याकडे पाहिल व दात विचकत किन्नरासारख (हिहिहिहिही) हसून त्या उघड्या दारातुन रक्ताळलेल्या सू-यासहीत पळ काढला.

xxxxxxxxxx

" मागे व्हा समदे !" रघुबाबांच्या वाक्यावर सगळे मागे झालेले.

दहा-बारा सैनिकांनी पेटत्या मशाली हाती धरलेल्या, त्या उजेडात ती पेटी, आणि बाकीचही सर्वकाही अगदी स्पष्टपणे दिसून येत होत.

कबरीच्या उघडलेल्या त्या किंचीतश्या झाकणातुन पांढरट धुक बाहेर यायला सुरुवात झालेली, काहीमिनीटे ते धुक बाहेर येऊ लागल.आणि मग बंद ही झाल. रघुबाबांनी एका सैनिकाकडून एक भाला घेतला..

तो भाला हाती घेऊन त्याच पुढच धारधार टोक त्या कबरीच्या झाकणात घुसवल.व भाल्याच्या शेवटच्या बाजुला धरुन ते झाकन वर वर नेहायला सुरुवात केली व ते झाकण उघडल. झाकण उघडताच आजुबाजुला सैनिकांच्यात कुजबुज सुरु झाली.

" येताळ...हाई की ह्यो बाबोव ! " एकजन म्हणाला.

" आर बापरे येतोबा हाई ह्यो तर कोप बसलाय वाटत गावावर !"

दुसरा सैनिक म्हणाला.

" म्हंजी हे समद हा येताळ करीत व्हता का काय? " सैनिकांच्या चर्चेला उधाण आल होत.जो त्या आपल्या बुद्धीत येणा-या खुलेपणाने बोलत होता.

" गप्प बसा र..समदी काय चाललंय तुमच ! " कोंडूबा जरा खेकसत म्हणाले , तशी मागुन चर्चा बंद झाली. रघुबाबा एकटक कबरीत पाहत होते.कबरीमध्ये एक लुकडासा पांढरट त्वचेचा टक्कल पडलेल्या डोक्याचा म्हातारा छातीवर गुणाकार आकारात हात ठेवुन डोळे मिटून झोपला होता. कारण त्याच्या नाकातुन थंड वाफ बाहेर येत होती. म्हणुनच तो मृत आहे हे ठरवण चुकीच होत.नाही का?

" ए सोन्या उठव ह्या म्हाता-याला ! " यार्वशी प्रधान म्हणाले. तसा लागलीच तो कबरीपाशी पोहचला.

" नाय थांब. अस नग करु पोरा!" रघुबाबा मोठ्याने ओरडले त्यांचा एक हात सोन्याला थांबवण्यासाठी पुढे सरसावला.परंतु जे व्हायला नको होत तेच झाल सोन्याने आपला हात त्या म्हाता-याच्या हातावर ठेवला होता की तेवढ्यातच त्या म्हाता-याने खाडकन आपले हिरवे लुकलुकणारे डोळे उघडले. नाकातुन एक मोठा श्वास घेत, थंड वाफेसहित तो श्वास बाहेर सोडला (खऊट वास),...! गर्र्कन मान वळवुन सोन्याकडे पाहिल. त्याचे ते हिरवे बुभळ त्यात ती एक विजेसारखी काली वाकडी चीर , तो पांढराशिफ्ट चेहरा आणि ते किळसवाण कालपट दातांच हसु जे पाहुन बलदंड शरीरयष्टीच्या सोन्याची पाचवरण धरण बसली, मनात कोठेतरी लपून बसलेली ती भीती झटदिशीबाहेर आली. थर थरणा-या ओठांवर, काव-या बाव-या नजरेत ती भीती स्पष्ट दिसु लागली. सोन्याने आपला हात त्या म्हाता-या पिशाच्चाच्या हातावरुन काढून घेण्यासाठी उचलला की तोच त्या पिशाच्चाने आपल्या पांढराफट्ट हाताने सोन्याचा हात पकडला व बलदंड शरीरयष्टीच्या सोन्याला अलगद आप्ल्या तोंडाजवळ ओढुन घेतल. अमानवीय शक्ति होती ती, भले मानवाची- मानवीय शक्ति

त्या काळशक्तिपुढे कस तग धरणार.नाही का? धारधार पातीच्या तलवारीचा वार प्लास्टीकचा तलवारीने कस रोखल जाऊ शकत? तसंच इथे होत. अमानविय शक्तिला रोखण्याकरीता मायावीदैवी शक्ति हवी होती. मगच त्या दोन्ही तलवारींच एक जोरदार मिलन होऊन ठिँणग्या उडणार होत्या. सोन्याचा गळा त्या म्हाता-या पिशाच्चाच्या सुळे बाहेर

आलेल्या दातांपासुन फक्त 1 इंचावर होता...सोन्याच्या गळ्यात असलेली रक्तनटीकेची नस ते पिशाच्च लाल गालत पाहत होत..की तोच

त्या म्हाता-याने जास्त घाई न करता वेगाने आपले धार-धार सुळ्या

सारखे दात सोन्याच्या मानेत खुपसले. तो थंड स्पर्श सोन्याच्या आतील रक्तासहीत त्याचा आत्माही खेचु लागला..तशी ती वेदना सोन्याला जाणवु लागली. हात पाय सर्व काही अक्षरक्ष सुखले जाऊ लागले..

बलदंड फुगीर शरीर फुग्यातली हवा बाहेर निघावी तसे सुखल जाऊ लागल. सोन्याच्या मुखातुन एकापाठोपाठ गूरा सारखे ओरडण्याचे आवाज बाहेर पडु लागले...हात पाय वेगाने झाडले जाऊ लागले..

" अव वाचवा की त्याला ! ए सोन्या..ए सोन्या..!" कोंडूबा अस म्हंणतच

त्या कबरीच्या दिशेने जाऊ लागले , त्यांना सोन्याची ही अवस्था पाहवत नव्हती.

" थांब कोंडु! एकवेळ वाघाच्या तोंडच शिकार वाचु शकतु आपन! पन सैतानाच्या..! " रघुबाबांनी डोळे मोठे केले"कधीच नाही"

" मंग ह्या नराधम चांडाळाला असंच बळी घ्यावासाठी सोडुन द्यायच व्हय!"

" नाय कोंड्या , आता ह्याच दिवस भरल हाईत ! अजुन वेळ गेलेली नाऊथांब जरा!"

धप्प आवाज होत सोन्याच निर्जीव शरीर खाली पडल.त्या म्हाता-या पिशाच्चाने बलदंड शरीराच्या सोन्याच्या शरीरातल्या रक्तासहित त्याची

शक्तिही लुचली होती. आता सोन्याच प्रेत सुखुन पांढरफट्ट होऊन पडल होत. आणि ते म्हातार पिशाच्च कबरेतुन बाहेर येत एकटक सोन्याच्या प्रेताकडेच पाहत होत.

" हिहिहिही! " दात विचकत ते ध्यान हसल. " आणि मग मुसमुसत रडत बोलु लागल "साला म्या बी असंच...असंच फुगलेलो व्हतो..हुं.हुं...हू..! आण मंग एकदिशी त्यो सायबावानी दिसणारा सैतान भेटला, मला म्हंल

चल र गज्या आण करु...मज्या..! मंग त्यान मला ह्या गुहेत आणल..! मंग..! हंन....हुं....हू..." एका बायल्या सारखा तो म्हातारा रडु विव्ह्ळु लागला. रघुबाबा एकटक त्याच सर्व बोलण ऐकत होते.

" म्ंग. मंग पुढ काय झाल?" रघुबाबांनी भुवया आक्सत प्रश्न केला.

" मंग काय , त्या सायबान मला उघड्या बायका दाखवल्या" हिहिहिही खिखिखी" त्या म्हाता-याने निर्लज्जपणाचा आव आणत रघुबाबांना डोळा मारला व तसाच निर्लज्जासारखा हसु लागला" -सोना पैका डाग-दागीने समद्याच आमिष दाखीवल आण जवल -जवळ येऊन त्या

रांxxxxच्यान लुचल मला साल्यान ! "

" कोण होता तो सायबावाणी दिसणारा सैतान ? कोण होता तो..!"

रघुबाबा त्या सैताना बदल जाणुन घेण्यासाठी उत्तेजित झाले होते,कान टवकारले जात त्या पिशाच्चा मुखातून निघणा-या स्वरांना टिपण्यासाठी अधीर झालेले की तोच अचानक त्या म्हाता-या पिशाच्चाने आपला पवित्रा बदलला -जबडा विचकुन धार धार दात बाहेर काढले आणि ते हिरवे डोळे चमकले आणि एका रानटी श्वापदासारखी रघुबाबांच्या दिशेने उडी घेतली. कोणत्याही क्षणी ते पिशाच्च रघुबाबांच्या नरडीत दात घुसवु नआत्मा मलिन करणार..! की तोच पुढची क्रिया अगदी वेगाने घडली.रघुबाबांना बाजुला ढकलुन यार्वशी प्रधान त्यांच्या जागेवर आले , तलावार केव्हाचीच म्यानातुन काढुन हाती घेतली होती..पुढुन ते पिशाच्च अगदी वेगाने त्यांच्या अंगावर आलेल..यार्वशी प्रधानांनी आपल्या हातांची वेगाने हालचाल केली..तलवारीच पुढच टोक थोडवर पुढच्या दिशेने उंचावला..तसा हवेतुन पुढुन येणा-या त्या पिशाच्चाच पोट थेट त्या तलवारीच्या धार-धार पातीत घुसल..आणि पुढच्याक्षणाला....त्या म्हाता-या पिशाच्चा च्या शरीरातुन धुर निघाल जात त्याची जागेवरच राख झाली.

" हे काय केलसा तुम्ही ?" रघुबाब यार्वशी प्रधानजीं जवळ आले !

यार्वशींनी आपली तलवार म्यानात ठेवली व रघुबाबांकडे वळुन पाहिल.

" क्षमा असावी बाबा , "यार्वशी प्रधानजींनी खेदाने मान खाली घातली.

" परंतु ते जे काही ध्यान होत ते तुमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला करणार होत..आणि ,आणि आम्हाला तेव्हा काही सूचलंच नाही !आम्हाला फक्त तुमच्या जिवाची पर्वा होती बस्स ! आणी जर अनवधानाने आमच्या हातून काही चुकी घडलीच असेल ,तर आम्ही आता ह्याक्षणीच प्रधान पदाचा राजिनामा देत आहोत." यार्वशी प्रधानजींनी आपली तलवार म्यानातुन उपसुन काढली..ती जमिनिवर ठेवण्यासाठी वाकले , परंतु रघुबाबांनी त्यांचे खांदे पकडले.

" नाय प्रधानजी , तुमची काय बी चुकी नाय! आता जे झाल ते झाल..

होणा-याला कोण थांबु शकत नाय!" रघुबाबांनी अस म्हंणतच यार्वशींच्या डोळ्यांत पाहिल..त्या दोन डोळ्यांत त्यांना सत्याची चमक दिसली. यार्वशी प्रधानजींनी पुन्हा आपली तलवार म्यानात ठेवली.

" महाराज ! " रघुबाबा महाराजांन जवळ आले. " महाराज , त्या सैतान स्नी आपल्या येण्याची चाहुल आधीच लागली व्हती ! म्हणुनच तो सावध झाला जात त्या चांडाळांन हे समद एक षडयंत्र रचल व्हत आपल्या समोर , ज्यान तो फरार व्हील ! आण मांझ मन मला अस सांगतय त्यो सैतान एकटा नाय!"

" एकटा नाही म्हंणजे ?" महाराज जरासे आश्चर्यकारक पणे म्हणाले.

" म्हंजी," रघुबाबा पुढे काही बोलणार की तोच जंगलात कोठेतरी एका रानटी श्वापदाची विव्हळ फुटली...व्हुव्हूऽऽऽऽऽऽ.. जी ऐकुन रघुबाबांनी

क्षणार्धात आजुबाजूला दुर असलेल्या अंधारात बुडालेल्या झाडांकडे पाहिल...रघुबाबां त्या अंधारात काही सात-आठ फुट पिवळ्याजर्द डोळ्यांच्या आकृत्या दिसल्या , तोंड वासून लाल गाळुन त्या सर्वसैनिकांकडे भुकेल्या नजरेने पाहाणा-या आकृत्या दिसल्या. द्रोहकाल ने डसलेल्या ,लुचलेल्या ,त्या पिशाच्चमय आकृत्या होत्या...त्याचे सैनिक होते. त्या मशालींच्या धग-धगत्या तांबड्या उजेडाला ते सर्व घाबरत होते..नाहीतर आतापर्यंत त्या पिशाच्च सैन्याने ह्या सर्वांची नरडी फाडली असती..एक नी एक मानवाच्या हाडा मांसाचा खूळखुळा बनवला असता.

" महाराज ! आपण ह्या ईषयावर महालात बोलु! आता सांजयेळेला ह्या जंगलात थांबण धोक्याच हाई! त्यो सैतान जरी ह्या जागेत नसला, तरी बी त्याचा काहीसा अंश ह्या जागेत हाई." रघुबाबांनी पुन्हा एक कटाक्ष त्या अंधारात टाकला. पांढ-याफट्ट चेह-याचे पिशाच्च तेथे भटकत होते. रघुबाबांच्या ह्या वाक्यावए महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली , व प्रधानजींना तस कळवल. सोन्याच तस्ं म्हणायला कोणीच नव्हत म्हणुनच त्याच प्रेत आता त्याच जागेत दफनवुन ,सर्वजन काहीवेळाने

निराश होऊन जंगलातुन बाहेर पडले.

 

क्रमश :

 

वाचकांशी संवाद..! सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची माफी मागतो की भाग यायला खुप ऊशीर झाला. त्याच कारण तसंच होतं. सद्या उन्ह खुप वाढलय आणि आमच काम ही.सद्या दोन आठ्वडे work time is हाrd झाल होत.फोन घ्यायला वाचाण करायले ही वेळ काही मिळत नव्हत. मनात कोठेतरी ही सल टोचत होती..की आपले वाचक भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत आर्ध्या हुन जास्त वाचकांनी सीक्रेटला मेसेज करुन भाग कधी येईल म्हनुन विचारना केली..काहीनी एक दोन शिव्या ही दिल्या..परंतु त्या शिव्यांमध्ये तुमच माझ्या कथेवर असलेल प्रेम कळ्ंल..���������!

आणि म्हणूनच दोन दिवसांसाठी सुट्टि घेऊन भाग पुर्ण केला आता रात्रीचे तीन वाजले आहेत आणि भाग लिहून झाला..आहे..! ���...

तोच मी आता प्रकाशीत करत आहे..भागांना रिस्पॉनस मिळत न्गी नो प्रोब्लेम..कथा subcription मध्ये ही जाऊ शकतो..���������<