Rakt Pishachchh - 15 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 15

The Author
Featured Books
  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 15

रक्त पिशाच्छ 18+ भाग 15

 

फक्त 18+ प्रौढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..

लेखक:जयेश झोमटे (जेय)

रक्त पिशाच्छ 18+भाग 15

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य. कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू ळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे...ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी !

 

नुकतीच दुपार झाली होती.आकाशात तांबड्या आगीचा गोलाकार विशाल गोळा म्हंणजेच सूर्य डोक्यावर आला होता, दुपारच उन्ह असल्याने राहाजगडची सोनेरी वाळू सुर्याच्या प्रखर तेजाने तापून निघाली जात सोन्यासारखी चमकत होती.गरम हवेचे झुळुक घों-घों करत त्या सोनेरी मातीला समवेत घेऊन वाहत होते हलकेच अंगाला चटका मारुन पुढे निघुन जात होते.

[राहाजगडच्या जंगलात ]

झाडांच्या सावलीतुन एक घोडागाडी वेगाने पुढे-पुढे चालली होती. चालका च्या सीटवर लुकडा संत्या बसलेला...तर मागे त्याचा भाचा लंकेश बसलेला. ही मामा आणि भाचा दोघांचीही जोडी म्हंणजे अगदी मिळती जुळती क्वालिटी. हवसी, वासना, धनाचा लोभ दोघांनाही एकसारखाच म्हणुनच दोघांचाही स्वभाव एकसारखाच त्यामुळे यांच्याबदल जासग काही सांगायला नकोच.

घोड़ागाडीच्या दोन्ही तर्फे मोठ-मोठी हिरवी झाडे होती

..आणी त्या झाडांमधोमधुन ही घोडागाडी एका कालोख्या बोगद्यातुन जावी तशी अफाटवेगाने पुढे-पुढे जात होती. लंकेश राहुन-राहुन मागे पाहत होता कोणी मागुन येत तर नाही ना ह्याचा कानोसा घेत असावा.

आणि एकदाची खात्री झाली , की कोणीही मागुन येत नाही..तसा तो म्हणाला.

" ए माम्या एक इचारु का?"

" आर बोल की लगा , तु कवा पासन माझी परमिसन घ्याला लागला! हाहाहा !" संत्या घोडागाडी हाकलत पुढे पाहत हसत म्हणाला.

" आर तस नाय रे माम्या, म्हंजी मला जे इचाराच हाई ते जरा येगळ हाई!"

" असं तरीबी इचार लगा! बघु म्या सांगु शकलु तर?"

संत्याने अस म्हंणतच हातात असलेली ती चौकलेटी काठी (फट्ट)एक पाठीत फटका मारावा तशी एका घोड्याच्या पाठिवर हाणली.घोडा खिंखाळला ( तबडक-तबडक )विशिष्ट प्रकारच्या आवाजाने पावल वाजवत वेगाने पळू लागला.

" बर ठिक हाई ऐक!आपण ज्या मालकास्नी आणाला चाललु हाई..

ते नक्की माणुसच हाई का! की कणती मूर्ती हाई?"

" काय माहीत नाय र !" संत्या पटकन म्हणाला.

एक-एक झाड मागे सोडत घोडागाडी वेगाने पुढे जात होती.

लंकेशने पुन्हा मागे पाहील , सुनसान हिरव्यागार झाडीने व्यापलेली वाट दिसली...तस त्याने पुढे पाहील व उच्चारला.

" खरच माहीत नाय !" लंक्या चेह-यावर निराशेचे भाव आणत इतकेच म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर संत्याने फक्त मान नकारार्थी हळवली.

लंकेने सुद्धा मान हळवली, आपला एक हात मागे घेऊन जात कमरेत खोवलेला धार-धार सुरा बाहेर काढला आणि दोन्ही पाय खाली ठेवत हातांची वेगाने हालचाल केली.एका हाताने गळ्याला विळखा घातला तर दुस-या हातात असलेला सुरा गळ्याला लावून धरला.त्याच्या ह्या अशा

वेगवान आक्रमक पवित्र्याची जणु संत्याला कल्पनाच नव्ह्ती.कारण तो लंकेशच्या ह्या कृत्याने जरा घाबरलाच गेला.

" ए माम्या लंकेश नाव हाई माझ -रावण हाई म्या. आता सांगतु का न्हाई ! की वढ़ु..सुरा..? "

लंक्याने गळ्यावरचा विळखा थोडा मजबुत केला.

"स..स.. सांगतु सांगतु समद..तु ह्यो सुरा काढ पाहीले "

संत्या जिवाच्या आकांताने ओरडलाच..!

□□□□□□□□□□□

" काय ? रघुभट्ट?" महाराजांनी अस म्हंणतच खाडकन डोळे उघडले , व यार्वशी प्रधानजींकडे पाहून पुढे बोलले ले." कोठे आहेत ते ?"

" क्षमा असावी महाराज त्यांना आम्ही इथे येण्याचा आग्रह केला होता "

" मग?"

" परंतु की ते म्हणाले. की आम्ही तुमच्या समवेत महालात येऊ शकणार नाही, तुम्ही स्व्त:हा जाऊन महाराजांना वेशीवर घेऊन या!"

" अच्छा ठिक आहे.. चला निघुयात मग? " महाराज पटकन आपल्या

खुर्चीवरुन उठले , त्यांनी महाराणींकडे एक कटाक्ष टाकला.

" येतो आम्ही..!" त

" ठिक आहे !" महाराणी इतकेच म्हणाल्या,नी महाराज लागलीच निघुन गेले. महाराणी एकटक त्यांच्या पुढे पुढे जाणा-या पाठमो-या आकृतीकडे पाहतच बसलेल्या, महाराज घोडागाडीत बसले, तर यार्वशी प्रधान आपल्या काळ्या घोड्यावर.घोडागाडी चालकाने हळूच काळ्या काठीने घोड्याच्या पाठीला स्पर्श केला..तसा तो पांढरा घोडा प्रथम खिंखाळला व तबडक तबडक आवाज करत घोडागाडी निघुन गेली. महाराणी सुद्धा माघारी जायला वळल्या.. परंतु पुन्हा त्यांच्या कानावर एक घोडागाडीचा आवाज आला.त्यांना मनोमनी वाटल महाराज पुन्हा आले की काय? तसे महाराणी ताराबाईनी हळूच त्या दिशेला वळून पाहिल व त्यांच्या तोंडून काही शब्द निघाले.

" शलाका!"

□□□□□□□□□□□□□□□□

"हाहाहा..हह्हा.." विचित्रपणे हसत.लंकेशने संत्यामामाच्या गळ्यावरचा विळखा तो चांदेरी रंगाचा , धारधार पातीचा सुरा काढुन घेतला.

" काय माम्या हवा निघली वाटत! हा..हा..हा!"

" म..म..म्हंजी?" संत्या म्हणाला.

" अर मामा...नाटक करुत व्हतू मी! आता तु राहीला आपला माणूस

तुला..म्या मारिल का?"

" म्हंजी हे नाटक व्हत तर!" संत्याने घोडागाडी चालवतच एक कटाक्ष लंक्यावर टाकला व लागलीच पुढे वळून पाहिल.

" हा मंग तुझ्याजवळुन शिकलो की, बेस हाय की नाय?"

" व्हर बाबा भारी हाई! पन माझ्या संग करु नको? आता वय झालत नव्ह ! "

" अर काय बोलतुस! " लंकेशने डोळे तोंड मोठ केल.

"तुझ न वय ? आर केस अजुन काळ हाईत नव्ह तुझ? "

" ते मी रंगवतो नव्ह न्हाव्या कड जाऊन! हिहिही..ही.!"

संत्या सुद्धा आपले बारीक दात दाखवत खजील होत असला.

" आर तरीबी तु अजुन जवान हाईस की माम्या,म्या पाहील नाय व्हय!"

" क..क...काय..पाहिल हाई तु?" संत्याने मान पुढेच ठेवली, डोळे तिरकसपणे मागे नेले..आणी एक आवंढा गिळला.त्याच्या ह्या वाक्यावर लंक्या जरा निर्लज्जपणाचा आवा आणत हसला व म्हणाला.

" हेच की तु वाड्यात कामाला आलेल्या बायकांना..!"

" ए.....ए....बाबा...! गप्प राई....!" संत्याने गर्रकन मान मागे वळवली व पटकन म्हणाला.

सांगतु ना..मी...तुला..माहीती! "

" हा बोल..बोल..! म्या ऐकतु!"

" पन हे कोणाला सांगु नको..! न्हाई तर बोंबळा म्हणायच."

" अर न्हाई रे मामा! तु आपला बेश माणुस हाइस..नव्ह मग म्या तुला अस अडकवील का? ही बात फक्सत आपल्यात राहिल बघ! चल तु तुझ प्रवचन ऐकीव !"

" ठिक हाई ऐक तर !" अस म्हंणतच संत्याने तोंडावाटे एक सुस्कारा सोडला व सांगायला सुरुवात केली

" मला जेवढ माहीती हाई त्यानुसार शंभर-दीडशे वर्षापुर्वीची गोष्ट हाई.."

□□□□□□□□□□□□□□□□

" नमस्कार करते महाराणी..!" शलाकाने खाली वाकून मरा: ताराबाईंचे चरण स्पर्श केले.

" सुखी रहा बाळ!" म.रा: ताराबाई म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर शलाकाच्या चेह-यावर हळूच एक हसु आल.

" महाराणी एक विचारु!" शलाका खाली पाहतच म्हणाली.

" नाही!" महाराणींच्या वाक्यावर शलाकाने जरा चमकुनच वर पाहिल , तिच्या चेह-यावर जरा भांबावुन गेल्यासारखे भाव पसरले होते. जे पाहुन महाराणीं गालातच हसल्या..व म्हणाल्या.

" अंग बाळ! मला माहीतीये तुला काय विचारायचय..ते - हेच ना की आम्ही तुला इथे का बोलावलं आहे! " महाराणीं काहीक्षण मंद स्मित चेह-याने शलाकाकडे पाहिल व पुढे म्हणाल्या.

" बरोबर ना?" शलाकाने फक्त होकारार्थी मान हलवली.

"बाहेर खुप गरम होतय नाही ! चल आपण आत जाऊयात बोलुयात!"

महाराणी म्हणाल्या.शलाकाने पुन्हा गपगुमान खाली पाहत पुन्हा मान हलवली. दोघीही महालात जाऊ लागल्या.

□□□□□□□□□□□□□□□□□

" मला जेवढ माहीत हाई तेवढ सांगतु म्या तुला- तस बी आता तु काय लहान राहिला न्हाई - एक नी एक दिस तुला बी त्याच चाकर व्हायचंच हाई! " संत्या काहीवेळ थांबून पुढे बोलु लागला.

" शंभर - दिडशे वर्षांपुर्वीची गोष्ट हाई, त्यावेळेस आपल्या इकड काही मोजकीच मांणस व्हती जी की सैतानाला पुजाची त्याला मानाची.

कारण सैतानाकड आपण जे काही मांगु ते आपल्याला लगीच मिळायच, धन-दौलत , ऐश्वर्य,समध परकारच सुख ! आण हे तर काइच न्हाई लंक्या..सैतानाला पुजणारा माणुस कधी बी म्हातारा व्हू शकत न्हवता.. ! पन त्यासाठी सैतान देवाला..लेय मोठा नैवेद्य दाखवाला लागायचा..त्याची चाकरी कराला लागायची ! जस की मी बोल्लु आपल्या इकड सैतानाला पुजणारी ले कमी मांणस हाईत -त्यातच

तुमचे पुर्वज सामील व्हते. काय नाव व्हत दाजींच्या पुर्वजाच..." संत्या

रस्त्यावर नजर ठेवत डोक्याला हात लावतच विचार करु लागला.

मागे लंक्या एकटक त्याच्याकडे पाहत होता. हिरव्यागार झाडांची आकृती एकापाठोपाठ मागे-मागे जात होती..जणु दोघे बुलेट ट्रेनमध्येच बसले असावेत.

" हा आठवल..!" भस्मा ! " संत्यामामाने टीचकी वाजवली.

□□□□□□□□□□□□□□

एक चौरस आकाराची भलीमोठ्ठी खोली दिसुन येत आहे! खोलीत

एक उभट आरसा दिसुन येत -त्याभोवती काही सौंदर्यप्रसाधनाची सामग्री दिसुन येत आहे! खोलीत एक चौकोनी आकाराचा पलंग सुद्धा दिसुन येत त्यावर दोन स्त्रीयांच्या आकृत्या बसल्या आहेत.

महाराणी आणि त्यांच्याबाजुलाच शलाका.खोलीचा दरवाजा उघडा होता त्या दरवाज्यातुन महालात काम करणारी एक चौदा वर्षाची मुलगी हातात चांदीचा गोल ट्रे घेऊन आत आली..त्या ट्रेवर दोन चांदीचीच ग्लास होती.

" मधु- बाळ ये.." महाराणी त्या चौदा वर्षाच्या मुलीला म्हणाल्या. मधु म्हंणजेच राझगड महालात काम करणा-या एका नोकर दामपत्याची गुणी मुलगी होती. मधु महाराणींजवळ गेली.

"तो ट्रे इथे ठेव पाहु?" महाराणी हलकेच स्वरात उच्चारल्या. मधुने तो ट्रे

पलंगाशेजारी असलेल्या टेबलावर ठेवला. पुन्हा महाराणींजवळ आली.

" बाळ, आम्ही ह्या ताईंशी काही खाजगीत बोलणार आहोत तर तु आता वर येऊ नकोस ! आणी जर कोणी आमच्याविषयी कोणीकाही विचारल तर महाराणी आराम करत आहेत असं सांग!" महाराणी पुन्हा प्रेमळ हलकेच स्वरात म्हणाल्या. लहान मुलांना प्रेमाने सांगितलेल गोष्ट समजणार नाही अस कधी होईल का? नाही ना? मग तसंच झाल.

मधुने हसतच तोंडातले सव्वी सत्तावीस दात बाहेर काढले बाकीचे किडून पडलेले.. त्यातच महाराणींकडे पाहत ती हसली....व आल्या पावलाने दरवाज्यातुन निघुन गेली..

□□□□□□□□□□□□□□□□

" भस्मा हे तर कोण्या राक्षसाच नाव वाटतय न्हाई का ! "

लंक्या मागून आपली बाजू मांडत म्हणाला.

" अर! तु मधी बोलु नगस र ऐक फ्क्सत?" संत्या जरा रागावच म्हणाला.लंक्याने फक्त मान डोलावली तसा तो पुढे सांगु लागला.

" भस्मांचा जवा जन्म झाला..तवापासानच त्यांना आईकाला कमी येत व्हत. आईकाला कमी येत म्हंटळयाव लोक मज्जा मस्ती करणारच नव्ह,!" संत्याच्या ह्या वाक्यावर लंक्याने फक्त मान हलवली.

" पन भस्मारावाना हे मुळीच आवडत नसायच, की कोणि आपली चेष्टा मज्जा मस्ती करावी..त्यांना थोडसच ऐकाला कमी येत व्हत म्हंजी ते काही पुर्ण बहिरे नव्हते..माझ्या म्हंणण्यानुसार ते बहिरे नव्हतेच..त्यांच्या कानाच्या ज्या नसा व्हत्या..ज्या कानांना रक्त पुरवठा करत्यात..त्या अधू झाल्या व्हत्या..काम नव्हत्या करत ! पन थोड-थोड ऐकु यायच..

आण जे कोणि आपली थट्टा मस्करी करत्यात..त्यांच काय बी चिडवनी भ्स्म्यारावांनी जर कधी ऐकल तर ते त्याला तुडवल्याशिवाय राहत नव्हते..पार हाडमोडुन ठेवीत असत...त्या पोर असो की कोण मोठ माणूस. अशातच त्यांचे मित्र कमी आण दुश्मन वाढलेले. हे त्यांचा त्या समोरच्या मांणसाला पाहुन वागण्याचा दृष्टीकोन व्हता...म्हंजी दुश्मन त्यांनीच बनवल होत..पुढील मांणसांना मात्र अस काय बी वाटत नव्हत. अशातच त्यांच वय वाढत वाढत जाऊ लागल. जर त्यांना कोणि समजुन घेऊन बोलत असल तर त्या व्हत्या..पुतळाबाई..म्हंजीच भस्मारावांच्या आई..आपल्या लेकावर त्यांचा ले जिव व्हता.. पन एकेदिवशी आजारपणात त्या गेल्या आण त्यासोबतच त्याच दिवशी भस्मारावांचे वडिल बी झटक्यान गेले. भस्माराव क्षणात पोरके झाले..आईबाप गेल्याच्या दुखाणे ते आता दिवसरात्र घरातच बसु लागले.. त्यांनी आपली आई बरी व्हावी ह्यासाठी ज्या दगडाच्या देवाला साकड घातल व्हत..ते पुर न झाल्याने..भस्म्यारावांनी रागाच्या भरात त्या दगडांस्नी एका लाल कापडात गुंडाळल..आण अमुश्याच्या रातीला घराबाहेर पडले.तुला सांगतु लंक्या जोराच्या इजा कडाडत व्हत्या..आकाशात काळ ढग दाटुन आल व्हते..वातवरणात घों-घों करत वारा वाहत व्हता. आण ह्याच अशा इचीत्र वातवरणात भस्म्याराव मसनात पोहचले..पीरित गाडतात तस ते देव मातीत गाडल." आर माणुस नाहीस तु मूडदा हाईस मूडदा.. मला असा बहिरा जन्माला घातला म्हणुन, माझ्या आई-बापाला अस माझ्यापासुन हिरावुन घेतल म्हणुन त्या जागी थुंकु लागला.मोठ-मोठयांनी एक सैतान वरडावा तसा गळाफाटेस्तोवर वरडू-रडू लागला. भस्माराव ज्या मसनात उभ व्हत त्याच मसनात एक कृतांत नावाच मांत्रीक एका इज्ञेची परिक्षा कराला आला व्हता..! कृतांत म्हंजी यम -यमाचा दुसरा नाव लंक्या..ह्यो मांत्रिक म्हंजे सैतानाला पुजणारा ले ताकदवर मांत्रिक. त्यांनी भस्मारावांचा आवाज ऐकला आण त्यांच्या जवळ आले..त्यांच अस इचीत्र वागण्याच कारण इचारल तीन चार वेळा एकच वाक्य परत बोलवुन..त्व्हा कुठ जाऊन भस्मारावांनी जसच्या तस..कृतांत मांत्रिकला आपला नशीबाच खेळ कळवला. ते ऐकुन त्या मांत्रिकाला बी ले वाईट वाटल.पन भस्मारावांनी देव मातीत गाडल हे पाहुन त्यो म्हणाला.

" ए पोरा! तुला ऐकाला कमी येत नव्ह...आण तुझी आई बाप बी मारल त्या देवान , पन तु माझ एक काम केल तर म्या तुला ऐकायची शक्ति देईन,तुला हव ते देईन..मी!"

" तैयार हाई म्या पन काम काय हाई!" मागचा पुढचा विचार न करता भस्माराव पटकन म्हंणाले.त्यांच्या ह्या एका निर्णयाने ह्या देशात सैतान पुजणा-या टोळीचा जनम झाला.

" तुझ्या घरात एक देव वसवाया लागल!"

" आर पन आताच ह्याला गाडल की,आण तसबी ह्यो काय कामाच न्हाई !"

" आर पोरा...! ह्या जगामंधी काय एकच देव न्हाई हाई !"

कृतांतच्या चेह-यावर एक हास्य होत.भयान विद्रूप काळजाचा ठोका चुकावणार हास्य.

" ऐक ! " अस म्हंणतच त्या कृतांतने भस्म्यारावांना सांगाला सुरवात केली.

" तुझ्या घरात ही मूर्ती घेऊन जा ! " कृतांतने अस म्हंणतच-आपल्या झोळीतुन -एक फुट काळ्यापाषाणाची टोस्कूले दात बाहेर आलेली-वटारलेल्या काळ्या डोळ्यांची..! एक सैतानी मुर्ती भस्मारावांकडे दिली.

" हे बघ भस्म्या पोरा! एक गोष्ट लक्षात ठिव ! आजपासन तु सैतानाच पोर हाईस..लेक हाईस..तवा.ह्या मुर्तीची पुजा करायची.आण ह्या देवाला नैवेद्य दावायच -? पन ह्या दगडावाणी वरण- भाताच न्हाई..! "

भस्मारावांच्या चेह-यावर जरा आश्चर्यकारक भाव होते..कृतांत पुढे काय बोलेल ते ऐकुन घेण्यासाठी.

" तर ताज्या रक्ताच..नैवेद्य दावायच..! फ्क्सत बाई माणसाच्या रगताच दावायच. -बाप्याच न्हाई. आण अजुन एक तुला एकुन शंभर बायांच

नैवेद्य ह्या मूर्तीला दावायच हाई. तवा त्यासाठी तुला शंभर लगीन कराव लागतील..! जसा-जसा तु बळी देत जाशील तस तु जवानच राहशील..तुला हव ते मिळल...तुला पाहिजे तसंच घडल..हव त्या बाईशी लगीन करु शकशील." कृतांतच्या एकनी एक शब्दात तथ्य भरल होतं..कारण बोलताना त्याचा आवाज धार-धार डोळे भुवया क्षणा-क्षणाला बारीक मोठ्या होत-होत्या. भस्म्याराव ते ऐकुन मनातल्या मनात लाडू फुटल्यावाणी हसत होते. आकाशात द्विंतीय युद्ध चालु असल्याप्रमाणे क्षणाला-क्षणाला विजा कडाडत होत्या.

" पन एक गोष्ट लक्षात ठिव भ्स्म्या पोरा..!" कृतांत भ्स्म्यारावांना स्वपनातल्या दुनियेतुन खाली आणत म्हणाले.

" तु ज्या ज्या बाईशी लगिन करशील, त्या त्या बाईच बळी वर्षाच्या शेवटच्या राती ठरलेलच असल.तु कती बी लगिन कर..पर पीरिम करु नको! कारण जर ठरलेल्या दिशी बळी भेटल नाय तर कोप बसल..खंगत खंगत जाशाल.. " अस म्हंणतच कृतांतने ती काळी पाषाणाची मूर्ती भस्म्यारावांकडे सोपावली व जाऊ लागले.

" अहो बाबा ! पन मला ऐकाची शक्ति तर द्या की.! "

भस्माराव पाठमो-या कृतांत मांत्रिकाला म्हणाले. त्यांच्या ह्या वाक्यावर कृतांत पाठमोराच हसला त्याचे काळे ओठ फाकले व पाठमोराच म्हणाला.

" अर एवढा ऊशीर काय बही-यावाणी बोलत व्हतास का माझ्याशी."

आता कुठे जाऊन भ्स्म्यारावांच्या मेंदुंची तार छेडली गेली. दोन-दोन तीन-तीन वेळा एकच वाक्य परत ऐकुन घेण्याची सवय असलेल्या भस्म्यारावांच्या चेह-यावर एक कधीही शब्दांत न वर्णन करन्या प्ल्याड़च हसु आल. पुढच्या दिवसापासन भ्स्म्यारावांनी सैतानाची पुजा अर्चा करायला सुरुवात केली- अशातच त्यांनी नवव्यानऊ च्या पुर जाऊन लगिन केली. पन एकाच गावात राहून न्हाई..तर वर्षा-वर्षाला जागा बदलुन कित्येक गावात त्यांनी आपला बस्तान मांडल.आणी मग ते शेवटच्या बळीला म्हंजीच शंभराव्या बळीच्या येळेस इकड आले..

राहाजगडला ! आण इकड येऊन त्यांच्या इज्ञेत जाम मोठ घोल झाला. कारण..."

□□□□□□□□□□□ʼ□□□

महाराज, रघुबाबा-संत्या यार्वशी प्रधान , सर्वजन एका तंबुत बसले होते. रघुबाबांनी कालरात्री वस्तीतल्या याक्षिणी विद्ये पासुन ते तळघरातल्या घटनेपर्यंत सर्वकाही जसेच्या तसे त्यांना सांगीतल होतं.

जे सर्व ऐकून महाराजांना , त्यांसमवेत प्रधानजीनी सुद्धा धक्का बसला होता. आश्चर्यकारक गोष्ट कळली होती त्यांना मानवाच्या तर्कापल्याड काय काय ह्या पृथ्वीतलावर अस्तित्त्वात आहे..ह्याची नुस्ती माहीती कळली होती त्यांना आणि जेव्हा ते अभद्र ध्यान आपल्या वाकड्या तीकड्या कायेचा दर्शन त्यांसहित बाकीच्या ह्या धोक्यापासुन अजाण असलेल्हा राहाजगड वासियांन घडवणार होत.तेव्हा त्या सर्वांची प्रतिक्रिया कशी असेल? कोणी गाव सोडण्याच्या तैयारीत असेल? तर कोणि त्यापासुन लढा देण्याचा?किंवा खुद्द ब खुद्द मृत्यु स्विकारण्याच

असेल?

" मग ह्या रक्तभक्षकांपासुन- वाचण्याचा काही पर्याय नाही का! आमची राहाजगडची प्रजा , दिवसाही ह्या अभद्र धोक्यापासुन घाबरलेली आहे अजाण आहे! ज्यावेळेस आमच्या प्रजेला हे कळेल तेव्हा काय घडेल ह्याची आम्ही कल्पना ही करु शकत नाही! कृपया आता तुम्हीच काय तो उपाय करावात रघुबाबा !"

प्रधानजींनी आपले दोन्ही हात रघुबाबांसमोर जोडले. महाराजांनी एकवेळ यार्वशी प्रधानजींकडे पाहिल मोठी गर्वाची गोष्ट होती..की असा प्रधान राहाजगडला मिळाला होता.जो की धोक्याच्या क्षणालाही स्व्त:च्या हिताच विचार सोडून प्रजेच विचार करत होता.

"महाराज तसं सांगायचं तर ही प्रजात आपल्या देशातली न्हाई, त्यामुळ ह्यावर उपाय मात्र जस्ट ठाव नाई..पन एक उपाय हाई ! "

" अहो मग बोलाना तुम्ही! वाटलस तर आताच्या आताच अमळात आणु तो उपाय!" महाराज खुर्चीत ताठ बसत म्हणाले.

" ठिक ऐका तर !" रघूबाबांनी एक धीरगंभीर कटाक्ष सर्वांवर टाकला.

" म्या अस ऐकलय की दिवसा ह्यो रक्तभक्षक झोपलेला असतुया. आण रातच्याला बाहेर पडतुया -कारण ह्यांस्नी सुर्याचा प्रकाश वर्जित हाई...कारण ह्यो सैतान म्हंजी एक मेलेल जित प्रेत. हाई ! की ज्यांस्नी एकदा उजेडाचा स्पर्श झाला की त्याची चामडी शरीर जळाया लागतीया. तर महाराज म्या अस म्हंतु.आपल्याला त्याचा ठाव बी माहीती हाई- तए आपण चाळीस -पन्नास सैनिकांची मशाली -टिटव्यांची फौज घेऊन त्या तळघरात जायच -आणि त्याच्या पेटीत तो सैतान आता झोपला असल..तर त्या पेटीला बाहेर आणायच आण..!"रघु बाबा पुढे बोलणार की तोच मध्ये त्यांच्या मागे उभे असलेला संत्या डिवचला.

"सुर्याच्या प्रकाशात उघडायची! हा आण सैतान खल्लास"

संत्या म्हणाला. तसे त्याच्या ह्या वाक्यावर रघुबाबांनी स्लोमोशनने मान त्याच्याकडे वळवली -तसा तो तोंडावर हात ठेऊन गप्प उभ राहिला.

रघुबाबा हळूच जागेवर उभ राहीले-डोळे वटारुन त्यांनी आपला एक हात हवेत उंचावला आणि जोरात खाली आणत संत्याच्या........

पाठिवर ठेवला.

" वा..हुशार हाईस की लेका ! हाहाहा!" अस म्हंणतच रघुबाबा हसले., तसे महाराजांच्याही चेह-यावर नकळत हसु आले. मनात कुठेतरी त्या अभद्र शक्तिचा अंत होईल..ह्या कारणाने मनात सुखाची सुप्त भावना चरम सीमेवर पोहचली होती.

□□□□□□□□□□□□□□□□□□

 

क्रमश :

 

लेखक:जयेश झोमटे (जेय)