रक्त पिशाच्छ.ऽऽ॥ 18+ भाग 14
फक्त 18+ प्रौढांकरीता..
शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..
लेखक:जयेश झोमटे (जेय)
ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य. कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू ळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे...ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी !
भाग 14
मित्रांनो एकदाची राहाजगडची होळी पेटली होती.
..पन कशाने?
सुखलेल्या काठ्यांनी, की शेणापासुन बनलेल्या गोव-यांनी, की झाडाच्या लाकडांनी ? अहो मुळीच नाही ओ साफ खोट आहे ते ! कारण राहाजगडची होळी मानवाने रचलीच नव्हती तर ती अशी लाकडांपासुन गोव-यांपासुन कशी पेटेल? दुस-यांच दुख आपल्या डोईवर घेऊन त्या दुखांना आग्नित कसं भस्मसात करेल ?
कारण ती होळी एका सैतानाच्या हातुन रचली होती...देवाच्या शुभकार्याला त्याने एका भल्यामोठ्या चित्तेच रुप दिल होतं. चेष्टा गम्मत केली होती..त्यात तीन प्रेत रचली होती. दया,माया , भावना, प्रेम ह्या सर्वांना धुडकावुन त्या बिचा-या मुलांची चिता त्याने होळीत रचली होती.
राहाजगड गावात रुश्या, भुष्या ,चिंत्या तिघांचेही जळाले प्रेत रात्रभर घरात पांढ-या कापडा खाली झाकून ठेवली होती. प्रेतासमोर एक दिवा तेवत होता.आणी त्या प्रेतांभोवती धाई मोकळून डोळे सुजेपर्यंत त्यांच्या आया-माया मोठ-मोठ्यांनी हंबरफडा फोडून रात्रभर रडत होत्या.
सकाळ होताच एकसाथ तिन्ही प्रेत राहाजगडच्या गल्लीबोलातुन मसनाच्या दिशेने निघाली. मयत जाताच गावातल्या बायका पाण्यात बुडवुन ठेवलेल तुळशीच कोपीत पाणि बाहेर ओतू लागल्या होत्या..जत्रेत ठोकलेले तंबु, उठले जात होते , दुकानदार , डोंबारी, पाळण्यावाले सर्वजन तोंड खाली पाडुन आप-आपल्या परतीच्या वाटेला निघालेले. कोणाचा हवा तेवढा माल संपला नव्हता- तर काही डोंबारी वगेरे ह्यांचा खेळच रंगला नव्हता -पन दुसरा दिवस अजुन शिल्लक आहे समजुन ते पुन्हा प्रयत्न करणार होते.पन गावात होळीच्या रात्री जे काही विचित्र घटनाक्रम घडल होतं..त्याने सैतानाची प्रचिती अक्ख्या गावासहीत-त्या जत्रेतल्या दुकानदारांना, बाहेरुन आलेल्या गावक-यांनाही झाली होती.ते थयथय करत आगीत नाचणारे जीवांच्या आकांताने ओरडणारे तीन प्रेत राहुन राहुन डोळ्यांसमोर येत ह्दयाचा थरकाप उडत होता. जत्रेतली सर्वजन जशी निघुन गेली..गल्लीबोळ सर्वकाही सामसुम होऊन भक्कास पडल - अक्ख्या गावाला सुतक लागल्यासारख चौहीदशेंना शांतता पसरली.आज धुळीवंदन असल्याने लहान-मुलांनी जे काही काळ.. रंगपंचमीला बादलीत रंग बनवुन ठेवले होते..त्यात आज तुळस पडली होती आणी तो लाल, हिरवा,पिवळा रंग सुद्धा जमिनीवर फेकला गेलेला. राहजगडमध्ये दिवसा उजेडातच गल्लीबोलात भटकी कुत्री गळाफाडून भेसुरपणे (आंय,आंय- उं उं उं) रडत-विव्हळत होती.बायका आप-आपल्या लहान मुलांना घेऊन घराची दार खिडक्या लावुन घरात बसलेल्या.
साधा एक चिटपाखरुही गल्लीबोलांत भटकताणा दिसुन येत नव्हता.
हा तसं म्हणायला काही सैनिक झुंडा-झुंडानी बाहेर फिरत होते-प्रजेच्या रक्षणासाठी.
राहाजगड मसनात रुश्या, भुश्या, चिंत्या तिघांची प्रेत पांढ-या कापडात गुंडाळुन जमिनीवर ठेवली होती. प्रत्येक मुलाच्या प्रेतासमोर त्यांचे वडिल गळाफाडून छाती बदडवत रडत बसलेले. तर त्यांच्या मागे तीस-चाळीस मांणस हाताची घडी घालून उभे होते. आंबो सुद्धा नेहमीप्रमाणे त्या सर्व मांणसांपासुन दुर हातात कुदळ घेऊन उभ राहीलेला.शेवटी काहीवेळाने प्रेतांना गाडण्याची वेळ आली...तिथे जमलेल्या काही मांणसांनी पुढाकार घेऊन..त्या आक्रोश करणा-या पित्यांना धीर देत मागे नेल.आणी बाकी मांणसांनी एक-एक करत तिन्ही प्रेत खड्डयांत ठेवली..थोडीशी एक-एक मुठभर माती प्रेतांच्या कापडावर टाकली. काम झाल्यासारख लोक एक एक करत मसनाबाहेर पडू लागले..काहीवेळाने मृतकांच्या जवळचेही निघून गेले.
" आंबो ! पिरत गाडुन टाक बाबा हे घे !"
एका मांणसाने जातावेळेस आंबोच्या हातावर काही नाणी ठेवली, आंबो ने फक्त "जी" अस म्हंणतच मान हलवली.व हातात फायडा घेऊन प्रेत गाडायला निघाला.
प्रेतांच्या खड्डयांपाशी पोहचताच आंबोने एकवेळ खड्डयात पाहिल.
पांढर कापड..त्यावर थोडीशी माती पडलेली दिसत होती. आंबोने एकवेळ त्या प्रेतांवरशी लक्ष काढुन घेतल व डावीकडून-उजवीकडे पाहील , मातीच्या ढेकळांच्या कबरी नी त्यांवरुन वाहणार मंद धुक त्याशिवाय स्मशानात कोणिही नाही.. हे पाहुन झाल्यावर त्याने पुन्हा त्या प्रेतांकडे पाहिल व हलकेच दातविचकत खुदकन हसला"खिखिखी" व हातात असलेल्या कुदळने बाजूची माती खड्डयांत खच-खच आवाज करत टाकु लागला.
□□□□□□□□□□□□□□□
सहस्त्र हजारोवर्षांपुर्वी ज्याकाळी मानवाची पृथ्वीवर निसर्गामार्फत निर्मीती झाली.प्रथम हाता-पायांवर चालणारा मानव नंतर पायांवर चालु लागला.आणी पुढे जाऊन जशी जशी त्याला अक्कल येऊ लागली.. तसा तो...वेळोवेळ विविध प्रकारचे शोध लावत गेला -त्याच शोधांत त्याने प्रकाशात राहणारा देव शोधुन काढला. त्याचा स्वभाव त्याच आस्तित्व सर्वकाही ! मग त्याची पुजा करायला..सुरुवात केली.
पुढे जाऊन अशाच काही मांणसांनी रात्री पडणारा काळोख-अंधार ह्यांवर गुढ अभ्यास करुन..अंधारावर राज्य करणा-या सैतानी देवाच आस्तित्व शोधुन काढल. त्याला शोधुन..त्याची ही पुजा करायला सुरुवात केली. पुजा करतावेळेस पुढे जे घडल विलक्षण होतं.
समर्थकांची इच्छा पूरी होऊ लागली, हव ते मिळु लागल. सुख, धन, दौलत, ऐश्वर्य, वासना-प्रणय संभोगीकसुख सर्वकाही.
जसे काळ बदलत गेला हे समर्थक जे पहीले हातांच्या बोटांइतके होते त्यांची संख्य कलियुगात शंभर, हजार, लाखो, करोडो,अब्जाधीशां पर्यंत पोहचली.. लोक दैव सोडून हे अनोखे सैतानी दैवत पूजू लागले.घरात प्रकाश उजळवण्या ऐवजी अंधार माजवु, बाळगु लागले. सतत चांगल्या गुणांचा विचार करण्या ऐवजी वाईट हेतुंचा विचार करु लागले.सतत डोक्यात वासना, धनाचा मोह ठेवु लागले. ह्या प्रकाशाच्या सीमेपलिकडे जाऊन सैतानाशी आपल्या आत्म्याचा करार करु लागले...आपला आत्मा गहाण ठेवु लागले... आणी पिढ्यांन पिढ्यांपासुन त्यांचा वारसा पुढे पुढे चालत राहीला-चालत आहे.
रामु सावकाराच्या पुर्वजांनी सुद्धा आपला आत्मा गहाण ठेवुन सैतानाची चाकरी केली होती. आबा-पंजोबा-वडिल ह्या सर्व पुर्वजांनी सैतान मनी वसवला होता त्याचे गुणगाण-गायले होते..राम उर्फ रामु सावकार सुद्धा काही अमृताने धुतलेला नव्हताच - त्या महाधुर्त क्प्टी पाताळयंत्री माणसाने..सुद्धा आपल्या पुर्वजांच्या पाया-परंपरेला पुढे सुरु ठेवल होतं.आणी तो एकटाच त्यात सामिल नव्हता..तर त्याच्या परिवारातले सुद्धा होते.समजा टोपलीतला एक कांदा नासला म्हंटल्यावर. तो कांदा स्व्त:हुन दुस-यांच विचार करेल का? की आपल्या मुळे दुसरेही नासतील? खराब होतील? म्हणुन मी टोपलीतुन एकटाच बाहेर पडतो.? अस करेल का तो? नाही ना! मग तसंच राम्यानेही केल होतं स्वतच्या अंगाला लागलेली किड बायको ढमाबाई -मुलगा लंकेश
ह्यांत उतरवली होती.
[रामु सावकाराच्या वाड्यात]
वाड्यातल्या दाराची चौकट ओलांडताच समोर एक मोठा हॉल दिसत होता. खाली फरशी त्यावर लाकडी सोफा , त्याचप्रकारच्या खुर्च्या, लहान-लहान स्टूल त्यांवर फुलदाण्या ठेवलेल्या दिसत होत्या.. भिंतींवर काही-बाही पेंटींग्स लावलेल्या दिसत होत्या. हॉलमध्ये एकुन दोन दरवाजे होते..डाव्याबाजुला असलेला दरवाजा त्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर तिथे एक स्वयंपाकघर लागत होत. आणी उजव्याबाजुला असलेल्या दरवाज्यातुन प्रवेश केल्यावर समोर एक कॉरीडोर दिसत होती.म्हंणजेच दोन्ही तर्फे मिळुन एकुण चार खोल्या होत्या.वीस×वीस च्या बंद दारांच्या...आणी समोर एक भिंत होती..त्यावर एक उघडी खिडकी दिसत होती ज्या खिडकीतुन आत येणा-या प्रकाशात हे सर्व दृष्य दिसत होतं. त्या डाव्याबाजुच्या दरवाज्याजवळच एक लाकडी जिना सुद्धा दिसत होता. जो की वर चढुन गेल्यावर समोर पुन्हा एक अंधारलेली कॉरीडोर दिसत होती.दोन्ही तर्फ दोन-दोन असं मिळुन एकुण चार बंद खोल्या दिसत होत्या. खाली ज्याप्रकारे समोरच्या भिंतीवर खिडकी दिसत होती तस वर नव्हत कारण समोर खिडकी ऐवजी एक बंद दरवाज्याची खोली होती.
सकाळच्या उन्हात रामुसावकाराच्या वाड्यातल शेणाने सारवलेल अंगण कस चमकुन उठल होत. अंगणात असलेला लाकडाचा झोपाळा विशिष्ट प्रकारच्या आवाजाने मागे-पुढे झुलत होता. त्यावर हडळीसारख्या जाड-जुड शरीरयष्टीची सावकाराची बायको ढमाबाई आपल्या डोक्यावरचे केस सोडुन बसलेली.तिने अंगावर एक हिरवी साडी नेसलेली. तिचा गोल फुटबॉल सारखा चेहरा आणि बारीक कपाळावर एक रुपयाच्या आकारायेवढा लाल-भडक रगतासारखा कुंकू पोतला होता. त्या कुंकवाच्या डाव्या-उजव्याबाजुला असलेल्या दाट गर्द भुवयांखाली..असलेल्या डोळ्यांत काजळ भरल होत...आणी त्या काजळामुळे समोरुन पाहणा-याला ते डोळे एका घुबडासारखे भेदकपणे वटारलेले दिसायचे.जे डोळेपाहुन समोरचा जागीच गार व्हायचा. इकडे वाड्याच्या दाराची चौकट ओलांडून आतुन एक सुकलेल्या शरीरयष्टीचा माणुस हातात एक सोनेरी ताट घेऊन बाहेर पडला. त्याच नाव आहे संत्या...तो ढमाबाईंचा एकमेव सख्खा भाऊ आहे.अंगात लहापणापासुन मेहनत ह्या नावांच बीज जणू ह्या मांणसात रोवलच नसाव..कारण बाहिणीची हमाली करणारा -तिच्या पैशांवर एशोआरामात जगणारा -धुर्त माणुस आहे हा संत्या..त्यातच हा सुद्धा सैतानाचा नोकर आहे.
" तायडे...! ए तायडे...! " संत्या दात विचकत चौकट ओलांडून पाय-या उतरुन अपल्या बाहिणीला हाकामारत पुढे पुढे येऊ लागला "
" कय झाल संत्याऊ....! " ढमाबाईंनी झोपाळा थांबावला, आणी काजळाने भरलेले डोळे वटारुन-वटारुन मान क्षणाला क्षणाला कोंबडीसारखी वर वर करत बोलु लागली.
" कोण मेल..? कशापाई वरडतुया.!"
"अंग तायडे कोण...मेल ते सोड...! तुला पान खायले आणले ते बघ. "
" काय पान..?" पान हे नाव ऐकुन ढमाबाईंच्या चेह-यावर एक हस्य आल ज्याने त्या थोबाड विचकुन हसल्या. हसताच त्यांच्या त्या थोबाडातले रोज-रोज पान खावुन किडलेले -लाल र्ंगाने माखलेले दात दिसले. संत्याने ते सोनेरी रंगाच ताट ज्यात दहा-बारा पान बनवले होते ते ताट हळूच ढमाबाईंच्या दिशेने पुढे केल.एका लहान मुलासारखे चौकलेट पाहील्यासारख ढमाबाईंनी हिरव्या विड्यातल्या पानांकडे पाहत दोन्ही हात चोळले आणि एक पान उचलून हलकेच तोंडात कोंबला.चार पाच सेकंद मचाव-मचाव करत तोंड हलवल, आणी मग कसतरीच तोंड वाकडतिकड करत तो तोंडातला पान खाली जमिनीवर थुंकला. " थु ". हाताने तोंड पुसल.
"काय झाल तायडे..! पान का थुंकला..?" संत्या ने प्रश्ण केला.
" कोणी बनवलाय ह्यो..पान?"
ढमाबाई गरजल्या..काजळाने भरलेले डोळे वटारले गेले. ढमाबाईंचा आवाज वाड्याच्या प्रत्येक भिंतींवर मिसाईलच्या आघाता प्रमाणे आदळला.त्या आवाजाने हळूच वाड्याच्या चौकटीतुन
एक स्त्रीबाहेर आली.रंगाने सावळी, शरीरयष्टीने पातळ अंगावर एक साधीशी साडी घातलेली.गळ्यात एक मंगळसुत्राच्या काळ्या दो-या ऐवजी काहीही नव्हत. हीच नाव होत काशी. गरीब घरातली स्त्री होती बिचारी. नवरा मधुकर मध्या काही कामाचा नव्हता दिवसभर दारु पिऊन टिंग असायचा.काशीला एक सात वर्षाची पोर होती..तिच्यासाठी ही बिचारी सावकाराच्या वाड्यावर काम करायची. मध्या दारुसाठी पैसे मागत असे-तिला मारहाण करत असे परंतु काशी आपल्या लेकीसाठी जगत होती डोळ्यांतले अश्रु लपवत होती.
"जी मालकीण बाई..म्या....म्या...बनवल पान..!"
काशी झोपाळ्याबाजुला ऊभी राहुन मान खाली घालुनच म्हणाली.
" तु बनवल नव्ह पान? मंग त्यात तंबाखु काय तुझा बा घालाल व्हय?तुला माहीती हाई नव्ह? मले बिना तंबाखुचा पान आवडत न्हाई.."
ढमाबाई पुन्हा गरजल्या-त्यांचे ते वटारलेले भेदक डोळे काशीला खाऊ की गिळू ह्या नजरेने पाहत होते.
" म...म..मालकीण बाई..टा...टाकली हाई की..! त..त..तंबाखु!"
काशी काफ-या आवाजात खाली मान घालूनच म्हणाली. जणु तीची हिम्मत-किंवा लायकी नसावी त्या नजरेला नजर भिडवण्याची.
" असं..! म्हंणजे म्या खोट बोलती हाई.. का...ग..रां××चे! थांब तुले दाखीवतीच." ढमाबाईंनी पुन्हा
झोपाळा थांबवला एक हात झोपाळ्याच्या साखळीवर ठेवला, जागेवरुन उठु लागल्या, परंतु उठता काही येईना !
कशी उठणार म्हणा? खाऊन पिऊन बसलेली म्हैस -दोन जणांशिवाय उठणार कशी! एक चेंडू जागेवर अपटावा त्याचप्रकारे ढमाबाई त्या बिचा-या फळीवर आपला अगडबंब देह आपटत होत्या.
" ए संत्याऊ हात दे की बैला..!" ढमाबाईंनी संत्याकडे पाहील.संत्याने आपल्या बाहिणीच्या वाक्यासरशी आपल्या दोन्ही हवा निघुन गेलेल्या
हातांकडे पाहिल,निव्वळ सुखलेल्या काठ्यांसारखे हात होते ते.
" ए तायडे ! काऊन मस्ती करु राहीले तु माझी.. ! अंग म्या कुठ बैलासारख दिसतुया..! एकवेळ तु म्हशीसारखी असशील.." काडी पैलवान संत्या जोराच्या भरात काहीतरीच बरळून गेला होता..हे त्याला काहीवेळाने कळून चुकल , जेव्हा ढमाबाईंनी त्या बारीक कपाळावरच्या भुवया ताणल्या...! ज्या पाहुन त्याने तोंडावर हात ठेवला.
"मेल्या! मुर्द्या तुझ्या फुलासारख्या बाहिणीवर संकट येऊन ठेपलेन आण तू मजा घेतस!"
" कुठ हाई फुल..! कुठ हाई फुल..?" संत्याने भुवया उंचावुन आपल्या बाहिणीकडे पाहिल व नंतर डावीकडून उजवीकडे डोळे फिरवले.
" अर फुल गेल उडत.. तु आदी मले हात देऊन उठीव!"
" ठिक हाई तायडे-ठिक हाई..! तुझा भौ तुझ्यासाठी जिव द्याला पन तैयार हाये..! " संत्याने एकवेळ आपल्या सुकलेल्या काठी हातांकडे पाहील व एक आंवढा गिळला "हा माझा लाकडावाणी सागवानाचा हात आता उपटला तरी चालल. पन तुला ऊठवनारच!"
हाड़कुल्या स्ंत्या पुढे सरसावला, त्याने आपला काठीसारखा हात ढमाबाई म्हंणजेच आपल्या बाहिणीच्या जाडजुड हातावर ठेवला.
आता समजा पिसाळलेल्या कुत्र्याच्या अंगावर हात टाकला तर तो चावणारच नाही का? ढमाबाईंच्या अजस्त्र हाताच्या पंजावर संत्याने
आपला अशक्त हाडमांस चिकटलेला हात ठेवला. जो की ठेवताच
ढमाबाईंना असाकाही आवळून धरला की आतुन हाड तुटल्यासारख कट आवाज झाला. परंतु वेदनासहन करत संत्याने पायाच्या देठापासुन पर्यंतची सर्वच्या सर्व ताकद लावुन ढमाबाईंना एक म्हैस दलदलीतुन बाहेर काढावी तसा झोपाळ्यावरुन वर उचल्ल..आणी ज्यासरशी ढमाबाई झोपाळ्यावरुन वर उठल्या त्याचवेळेस ढमाबाईंच्या हातात असलेल्या संत्याचा हात सुटला जात तो थेट पुढच्या दिशेने छातीवर झोपाळ्याच्या फळीवर आदळला.त्यासरशी तो झोपाळा आपो-आप संत्याच्या सताड उघड्या डोळ्यांच्या शरीराला घेऊनपुढे मागे झुळू लागला.
" थांब आता तुले दाखवतेच !" ढमाबाईने डोळे वटारुन काशीवर एक जळजळीत कटाक्ष टाकला..व अस म्हंणतच खाली वाकल्या. काशी बिचारी गरीब स्त्री गप्प जागेवर ऊभी राहीली होती...पुढे जे काही घडणार होतं ते सहन करण्याशिवाय तिच्याकडे काहीही पर्याय शिल्ल्क नव्हता.खाली शेनाने सारवलेल अंगन होतं..त्यावर मगाशी ढमाबाईंनी आपल्या तोंडातुन चावून थुंकलेला तो पान खाली पडला होता. तो तीने आपल्या जाडजुड हाताच्या पंज्यात उचलुन घेतला , पुन्हा ऊभी राहीली. पुन्हा एक जळजळीत कटाक्ष काशीवर टाकत दुसरा हात वाढवुन तीच तोंड पकडून बळजबरीने उघड केल..व दुस-या हातात असलेला तो पान तिच्या उघड्या तोंडात कोंबला.
" चाव -चाव.. !"
ढमाबाईंनी अस म्हंणतच तिच तोंड दोन्ही हातांत अवळुन धरल , आणी विशिष्ट पद्धतीने हलवुन- बिचारीच्या खांद्याला एक धक्का देत जमिनिवर पाडल. झोपाळा संत्याला घेऊन अजुनही मागे-पुढे झुलत होता.. त्या झोपाळ्यावर संत्या एका मेलेल्या प्रेतासारखा
हात पाय स्थिर सोडून डोळे-जिभ सताड बाहेर काढुन पुढे मागे झुलत होता.की तेवढ्यात.
"काय चाललंय इथं ?"
ढमाबाईंच्या कानावर एक भारदस्त घोगरा आवाज आला, तो आवाज ऐकुन तिचे काहीक्षण डोळे घाबरगुंडी उडाल्यासारखे मोठे झाले...तिने मागे वळून पाहिल.
" तुम्ही !" ढमाबाईं समोर रामु सावकार म्हंणजेच तीचा धनी उभा होता.आणी रामु सावकारा बाजुलाच एक चौवीस पंचवीस वर्षाचा तरुन उभा होता-त्याच नाव आहे लंकेश.
" व्हई म्याच...!" रामु सावकाराने एकवेळ झोपाळ्याकडे पाहिल.मागे-पुढे झुलणा-या त्या झोपाळ्यावर संत्या डोळे सताड उघडे ठेवून एका मेलेल्या प्रेतासारखा झुलत होता.
" काय चाललंय इथ..? आण ह्यो कोण मेलाय ह्यो झोपाळ्यावर ?"
" अव काय बोलताय सा तुम्ही..मेला न्हाई काय.. ! जिता हाई की ! "
ढमाबाईंनी अस म्हंणतच-संत्याच्या पाठीमागचा शर्ट धरला.आणी एका कापसाच्या पोत्याप्रमाने त्याला अलगद मागे खेचला. जमिनीचा स्पर्श संत्याच्या पायांना होताच एकवेळ त्याच्या पुर्णत शरीराची सिस्टीमच परत आल्यासारखे त्याने दोन तीन वेळा डोळे मिचकावले.
त्याच्या डोळ्यांसमोर एक साठ सत्तर चा टक्कल पडलेला गोल चेह-याचा... कपाळावर लाल उभ कुंकु लावलेला
. नाकाखाली सरळ पांढरट मिशी असलेला...आणी चिनीगोटी येवढ्या डोळ्यांचा..रामु सावकार म्हंणजेच त्याचा दाजी उभा होता.
" दा..दाजी तुम्ही कव्हा आल म्हंणायचं?" संत्या म्हणाला खरा , पन त्याच्या ह्या वाक्यावर रामु सावकाराने कसलेही प्रतिउत्तर दिल नाही.
" काशीबाई..! " रामु सावकाराने काशीकडे पाहत आपले हात जोडले म्ह्नाला. "मालकीणबाईं जवळून आम्ही तुमची माफी मागतो! आता तुम्ही आजच्या दिवसाची सुट्टि घ्या आण आता घरला जावा!" रामु सावकाराच्या वाक्यावर काशी जमिनीवरुन उठली.. हाताचा डोफरा फुटला होता.. तो दुस-याने हाताने धरलेला..त्यातुन रक्त गळत होत." आण हो काशीबाई!" रामु सावकाराचा काळजीपुर्वक आवाज आला , काशीने मागे वळुन पाहिल."जी सावकार!" काशी जमिनिकडे खाली पाहत म्हणाली.
" हाताला लागलय तिथ हळद लावा! बर वाटल! या आता"
" जी!" अस म्हंणतच काशीने मान हलवली , वाड्याबाहेर निघुन जाऊ लागली.
सावकार एकटक ती वाड्याची चौकट ओलांडून जाईपर्यंत तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत बसलेला.
" काय ओ ! तुम्हाला कव्हापासन नोकरांची येवढी फिकिर पडली म्हणायची!" ढमाबाई जरा आश्चर्यकारकपणे सावकाराकडे पाहत म्हणाल्या. इकडे काशीने वाड्याची चौकट ओलांडून बाहेर प्रवेश केला..त्याचवेळेस रामु सावकाराने संत्याकडे पाहत एक जोरदार चापट त्याच्या कानशीळात बसवली."फट्ट " आवाज झाला.
" अहो कश्याला मारताय माझ्या भावाले!" ढमाबाईंचा आवाज काहीक्षण चढला होता..काजळाने भरलेले डोळे सावकाराला रोखुन पाहू लागले होते की तोच." हीच चापट म्या तुमच्या गालाव बशीवणार हुतो
पन आवर घातलय म्या! तुमच्या असल्या घोडचुकीं मुळ काल मालकास्नी फक्सत तीन बळी घेता आले माहीती हाई का तुम्हाला.आण त्यामुळ मालक जाम चिडलेत आपल्यावर."
" आव पन म्या काय केल?"
" काय केल! वर तोंड करुन मलाच इचारताय ! अव" रामुने आजूबाजूला पाहिलं , संत्या , लंकेश, ढमाबाई, आणी खुद्द तो धरुन तिथे कोणिही नाही पाहुन तो पुढे बोलु लागला.
" आपल्या वाड्यात जेवढ बी नोकर हाईत, ते समद च्या समद सैतानाचे बळी हाईत! हे माहीती हाई नव्ह तुम्हाला? मंग त्यांच्यावर तुम्ही असा आत्याचार कराल तर ती समदी आपल्या वाड्यात राहतील का? आण
तुमच्या ह्या अत्याचाराला कंटाळून परवा एक नौकर वाडा सोडून गेला!
आण त्यामुळ काल मालकास्नी एनवेळेस फक्तस्त एकच नैवेद्य देता आल, आण त्यामुळ मालकास्न फक्त तीनच बळी घेता आले..! त्यातला एक
पोर वाचला.. ! त्यामुळ.!"
" बाबा.! " वाड्याच्या चौकटीतुन शलाका रामुसावकाराला आवाज देतच बाहेर आली. तसा रामुसावकाराने सर्वांना डोळ्यांमनी आई इशारा करत गप राहा अस सांगुन तो विषय तिथेच थांबवला.
" अव या या..या..! शालूबाई..काय म्हंता?
रामु सावकार हसतच झोपाळ्यावर बसला.. बाकीचेही हसू लागले.शलाका हळूच तिथे चालत आली.झोपाळ्या बाजुला तिची आई ढमाबाई..तिच्या बाजुला गालावर हात ठेवुन संत्या उभा होता.
" काय झाल मामा..गालावर का हात ठेवलय?"
सावकार एकटक पुढे पाहत झोपाळ्यावर झुळत होता. त्याउलट तिच्या ह्या वाक्याव र लंकेशच्या तोंडावर एक कुत्सिक हास्य आल व म्हणाला.
" काय नाय ग छकुले? मामाला पान खाताना चूकुन खडा लागला!" लंकेशने एकवेळ रामु सावकाराकडे पाहील, ते एकटक झोपाळ्यावर बसुन पुढे मागे झुळत होते.
" बर ते जाऊदे तु कुठ निघालीस?" संत्या विषय बदलत म्हणाला.
" मी जरा महालात चालले आहे , महाराणींच काहीतरी काम आहे आमच्याकडे! अस निरोप घेऊन एक सैनिक आला होता." शलाका म्हणाली.
" अव मंग अस बोलत कशापाई बसला आहात ? जावा पाहू तुम्ही लवकर ! बाहेर दोन घोडागाडी ऊभी आहेत त्यातली एक घेऊन जावा !न्हाई तर महाराणी वाट बघत बस्त्याल."
रामु सावकार पटकन हसत म्हणाला..त्याच हे वाक्य उच्चारताना डोळे काहीक्षण एका विशिष्ट लयीने चमकले होते. शलाकाने फ्क्त होकारार्थी मान हलवली व तेथुन निघुन गेली.
"मालकीनबाई..! तुमच्याकडे जेवढ दागदागिन असतील नव्ह तेवढ
समद आपल्या लेकीच्या गळ्यात चढवा..! " रामु सावकाराने हळनारा झोपाळा थांबावला व ढमाबाईंकडे रोखून पाहील व म्हणाले." वाटलस तर नवीन मागुन घ्या " रामु सावकाराने आपली एक भुवई उंचावली."पाहिजे तेवढा पैसा खर्च करा..पन आपलीच लेक त्या दारासिंहच्या घरची सुन व्हाला पाहिजे म्हंजे पाहिजेलच."
"व्हय त्याची तुम्ही काय बी काळजी करु नका!"
ढमाबाई आपले लाल दात दाखवत हसत म्हणाली. रामुने फक्त होकारार्थी मान हलवली व पुढे म्हणाला.
" संत्याऊ - लंक्या माझ एक काम हाई तुमच्याकड!"
" जी आबा!"
" त्या भटास्नी मालकाच ठाव शोधलया ,आण त्यो कवा बी दारासिंहची भेट घेईल त्यांस्नी सर्व सांगल. सैनिकांना घेऊन.. त्या तळघरात पोहचल.आण दिवसा मालका च्या झोपेचा फायदा घेऊन त्यास्नी खपवाचा चानस तो भट सोडाचा न्हाई! म्हणुन म्या अस ठरवलय मालकास्नी आता इथ आणायच !"
" ठिक हाई आबा तुम्ही फ्क्सत मालकाच ठाव सांगा , मी आण मामा घेऊनच येतू मालकाला.!"
लंकेशने संत्याकडे पाहिल तो ही तैयारच होता.
" ठिक हाई ऐका तर ? राहाजगडच्या येशीपल्याड जंगलात कालजल नदीच्या दुस-या टोकाला झाडायेळ्यांनी सजलेली एक गुहा हाई त्या गुहेत आपल्या पुर्वजांनी एक तळघर बांधल हाई , आण त्या तलघरातच आपला देव एका कबरीत झोपला हाई ! "
" ठिक हाई आबा येतु आम्ही! " लंकेश म्हणाला व लागलीच जायला निघाला त्याच्या समवेत त्याचा मामा संत्याही निघाला.
" थांबा ! " सावकाराच सर्व लक्ष पुढे होत..आवाज आला व तो ऐकुन दोघेही जागीच थांबले, मागे वळुन पाहील.
" एक गोष्ट लक्षात ठेवा? " सावकार झोपाळ्यावरुन उठला.त्याने आपल्या चिनी गोटी येवढ्या घा-या डोळ्यांनी दोघांवर एक धीर गंभीर कटाक्ष टाकल व पुढे म्हणाला.
" काय बी झाल ?तरी मालकाची कबर अंधारात उघडू नका! न्हाई तर!"
रामु सावकाराने एक आवंढा गिळला - सकाळच्या उन्हात त्याच्या कपाळावरुन येणारा तो ओघळता द्रव बिंदु पुढे जे काही घडेल त्याची शाश्वती देत होता- मृत्यु..!"
□□□□□□□□□□□□□
काळ घडलेल्या भयानक घटनाक्रमाने महाराजांचा रात्रीचा डोळा लागला नव्हता. कारण ते जे काही अमायावी, दुस-या मितीतुन आपल्या मितीत आल होतं, ते आता गावात ही शिरल होत. त्याच्या शक्तिचा त्याच्या हैवानियतचा खेळ आपल्या उभ्या डोळ्यांनी महाराजांनी पाहिला होता. ते तीन तीन प्रेत क्षणाला क्षणाला डोळे बंद करताच डोळ्यांसमोर येत हदयाचे ठोके वेगाने धावत होते.
महालाबाहेर बागेत हिरव्यागार गवतावर चार सफेद रंगाच्या लाकडी खुर्च्या ठेवलेल्या ,मधोमध एक गोल टेबल होता. त्यावर एक सफेद काचेचा जग, बाजुलाच कप -बश्या ठेवलेल्या.
महाराज एका खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या बाजुला एका खुर्चीवर महाराणी बसलेल्या हातात जग घेऊन त्या कपात वाफाळता गरम चहा ओतत होत्या.
" महाराज नका हो येवढी काळजी करु! सर्वकाही ठिक होईल पाहा."
महाराणी वाफाळता कप महाराजांना पुढे सरकवत म्हणाल्या.
" नाही महाराणी ! आता काही ठिक होणार नाही! येवढ्या दिवस आम्ही जी भिती दाबुन धरली होती.ती आता सत्यात उतरलीये..ते जे काही अभद्ररुपी क्लिष्ट शक्ति वेशीबाहेर घुटमळत होती तिने आतागावात प्रवेश केला आहे..आता पुढे काय नव संकट उभ राहिला असेल देवच जाणो."
" क्षमास्वी महाराज-महाराणी ! आपल्या चर्चेत व्यत्यय आणल्याबदल.! परंतु आम्ही एक महत्वाचा निरोप घेऊन आलो आहोत."
यार्वशी प्रधान महाराज- राणी यांसमोर कमरेत लवून पुन्हा जागेवर उभ राहत म्हणाले
" कसला निरोप! त्रिकाळ गुहेचा!" महाराणी जरा आनंदीत होत म्हणाल्या.
" क्षमस्वी महाराणी अद्याप त्रिकाळ गुहेवरुन आमचा गुप्तचर निरोप
घेऊन आला नाही आहे! "
" अच्छा मग अस दुसरा कोणत महत्वाच निरोप आहे? " महाराणीच म्हणाल्या..महाराज तर खुर्चीला पाठ टेकवुन डोकवर करुन डोळे मिटून बसलेले.परंतु कान मात्र सर्वकाही बोलण ऐकून घेत होते..
" महाराणी वेशीवर एक जंगली आदिवासी रघुभट्ट नामक इसम आले आहेत! त्यांना महाराजांची तातडीने भेट घ्यायची आहे!"
प्रधानजींच्या मुखातुन जस हा वाक्य निघाला महाराजांनी खाडकन आपले डोळे उघडले.
" योगपुरुष !" महाराज म्हणाले.
सरता वाट.. प्रकाशाची..
सुरु होई वाट गर्द अंधाराची..
...
क्रमश:
कंमेंटस रेटिंग नक्की द्या वाचक दोस्तांनो..���������
पुढच्या भागात पाहा...
1] शलाकाला महारानी ताराबाईंनी महालात का बोलावल आहे?.
2] लंकेश संत्या कसे घेऊन येतील आपल्या मालकाला घरी? की रघु बाबा पोहचतील त्यांच्या अगोदर तळघरात?
3] आंबोच्या मसनात द्रोहकालच्या डंखाने माखलेली तीन प्रेत आहेत ! ती जिवंत होऊन आंबो आणि मेघावती साठी घातक तर ठरणार नाहीत ना?"
4] त्रिकाल गुहेचा निरोप येईल का पुढ़च्या भागात.?
...