Rakt Pishachchh - 12 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 12

The Author
Featured Books
Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 12

॥ रक्त पिशाच्छ…॥ 18+ भाग 12

फक्त 18+ प्रौंढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..

लेखक:जयेश झोमटे (जेय)

भाग 12

 

शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.������!

भाग वाचण्या अगोदर टीप -कृपया हदयाचा त्रास असणा-यांनी हा भाग वाचु नये.

 

भाग 12

 

डोंगरमाथ्यावरुन भडक भगव्या रंगाचा अर्धा सुर्य हळु-हळु दलदलीत खेचावा तसा खाली खेचला गेला तसे ह्या पृथ्वीतलावर अंधाराने हुकुमत गाजवायला सुरुवात केली. अंधार पडताच आकाशातुन काळे कावळे (का,का,का,)ओरडत आप-आपल्या घरी जाऊ लागले नी वटवाघळू बाहेर फिरु लागले.एन जानेवारी महिनासुरु असल्याने धुक्याची तरंग आज जरा लवकरच उठली होती !

राहाजगडच्या जंगलात एका मोठ्या जांभळीच्या हिरव्या झाडावर एक टिटवी-आपल्या टीव-टिव आवाजात ओरडत होती.तिचे पिवळे डोळे पुढे स्थिरावले होते आणि समोर पाहुन ती टिव-टिव करत ओरडत होती. ती टिटवी ज्या जांभळीच्याझाडावर बसली होती, त्या झाडापासुन तीस मीटर अंतरावर काही एका जागेत पंधरा -वीस लाकडाच्या झोपड्या दिसत होत्या.जेमतेम दहा-अकरा फुटाच्या भक्कम बांधणीने उभारलेल्या झोपडया.त्या झोपड्यांमध्ये एक झोपडी खुपच वेगळी होती- तिची ऊंची आणी लांबी पाहता ते एक देऊळ असाव असंच वाटत होत.बत्तीस फुटांवर पसरलेल्या त्या झोपडीची रचना पुढील प्रमाणे होती.चौही बाजुंना लाकडांच्या भिंती होत्या, आणी आत जाण्यासाठी एक कालोखी चौकट होती -आत अंधार असल्याने आतल काही दिसत नव्हत. आणि त्या चौकटीवर दरवाजा बसवला नव्हता.ती टीटवी एकटक त्या अंधा-या चौकटीकडे आपले पिवळे डोळे रोखुन पाहत बसलेली.जणु तिला त्या खोल अंधारात कोणाच्या तरी आस्तित्वाचा भास होत-होता किंवा खरच काहीतरी आत होत.पन काय? ती टिटवी एकटक आप्ल्या पिवळ्या डोळ्यांनी त्या अंधा-या चौकटीकडे पाहतच बसलेली, क्षणा क्षणाला तिचे लहान डोळे बारीक होत जात जणु कैम-या सारखी ती आपल्या डोळ्यांच झुम वाढवुन त्या अंधारात काय आहे हे पाहण्याच प्रयत्न करत होती. की तेवढ्यातच अचानक वेगाने त्या अंधारातुन रिनाच पांढराफट्टक, तोंडातले टोस्कूले पिवळे दात बाहेर आलेला दात विचकुन हसणारा, चमकदार हिरव्या बुभळांचा त्यात एक चीर असलेला-कपाळावर हिरवी नस फुगुन आलेला अमानवीय चेहरा बाहेर आला.तो चेहरा जसा वेगाने बाहेर आला तशी ती टीटवी आपल्या पोटातल्या देठापासुन टिव टीव..करत..ओरडली आणि पंख फडफडवत आकाशात उडाली.जणु हे असल विचित्र भयावह ध्यान पाहुन तिच्याही ह्दयाचा थरकाप उडाला असावा.काळ्या चौकटीतुन रिना एका कोळ्यासारखी चार पायांवर चालत बाहेर आली व जागेवर ऊभी राहिल.काटकुल राखाडी रंगाच शरीर वर उजळुन निघालेल्या चंद्राच्या प्रकाशात मेलेला मूडदा जागेवर उभ आहे की काय अस भासून देत होता..तिच्या अंगावर एक तपकिरी रंगाचा ड्रेस होता आणि काळे केस डोक्यावर एकाजागी बसवुन बांधलेले.

बाजूला असलेल्या एका झोपाडीत मशालीचा तांबडा प्रकाश पेटलेला दिसत होता.बाकीच्या झोपड्या अंधारात होत्या.पिशाच्च रिनाने तिरकसपने त्या पेटलेल्या मशालीच्या उजेडात चमकणा-या झोपडीच्या दिशेने पाहिल आणि हळूच आप्ल्या नाकपुड्या फुगवून एकश्वास घेतला, लाल ओठांवरुन जीभ फिरवली. एका कोळ्यासारख शरीर विशिष्ट प्रकारे वाकवत ओठांवर विखारी हास्य आणत ती त्या झोपडीपाशी जाऊ लागली.त्या झोपडीत एक आदीवासी स्त्री चुली बाजुला बसली होती...तीच नाव संभा होत. समोर आपल्या नव-याला म्हंणजेच दुंक-याला आपल्या दिड वर्षाच्या लहान लेकरा सोबत सुखाने खेळत असतांना पाहुन -आनंदाने सुखावली गेलेली. ते सुख...सुख.. म्हंणजे नक्की काय असतं ? ते हेच तर नाही ना?

आजच्या युगात लग्न झाल-दोन वर्षात मुल जन्माला घातल की

संसार प्रप्ंच सुरु होतो-संसारात लक्ष घालाव लागत-मुलगा मोठा होईल

त्याच्या अभ्यासाच, वह्या-पुस्तक, कपडे, नको नको ते विचार डोक्यात घोळावु लागतात.मग तो संसार प्रपंच करणारा माणुस नेहमी पैश्याच्या मागे धावु लागतो-आणि ह्या जीवनाभराच्या पैस्या सोबत खेळल्या जाणा-या पकडम- पकडाईच्या खेळात त्या मांणसाला आपल्या परिवाराला पुरेसा वेळच देता येत नाही! मग म्हातारापणात येवढ सर्व करुन ही तुमची किंमत शुन्य असते.का बर.? कारण तुम्ही आपल्या परिवारासमवेत वेळ घालवलेला नसतो! अहो पैसा काय तुम्ही मेल्यावर बरोबर घेऊन जाणार आहात का? नाही ना? मग! काही मांणस असा विचार करतात... की खुप पैसे जमा करुन ठेऊ..इतके..की आपल्या मुलांना घरी बसुन खायला मिळेल..काम धंदा करायची गरज भासणार नाही.अहो..पन मी काय म्हंणतो ? येवढ सगळ्ं करण्याची काय गरज आहे?तुम्ही ज्या प्रकारे आयुष्यभर मेहनत केलीत तसंच त्यानाही थोडीफार करु द्यात की ! तुम्ही कमावलेला पैसा तुम्ही स्व्त,साठी स्व्त,च्या म्हातारपणात वापरा! कारण जो पर्यंत मुलाच लग्न होत नाही त्याच्यावर तुमच हक्क असतो! आणि एकदा का मुलाच लग्न झाल..की तो हक्क त्याच्या बायकोकडे जातो..! बस्स आता येवढे दोन शब्द सांगुन मी कथेला सुरुवात करतो..तसंही मोलाचे शब्द सांगणारा मी काही कोणि संत महात्मा नाही. मी एक साधासा हाडा मांसाने बनलेला माणुस आहे.

एका कोळ्यासारखी हाता पायांवर चालत..पिशाच्च रिना ज्या जंगली आदिवास्याच्या झोपडीच्या दिशेने निघालेली , त्या झोपडी बाहेर दरवाज्यासमोर एका काळ्या रंगाचा कुत्रा बांधला होता.त्यांच नाव बिचहा..होत. जो की पिशाच्च रिनाला पाहुन मोठ-मोठ्याने विशिष्ट प्रकारच्या आवाजाने (भव,भव,भव करत ) भुंकत होता.तिला पाहुन गुर-गुरत होता. जागेवरच उभ राहुन शेपटी हालवत तिच्या दिशेने हल्ला करण्यासाठी जाऊ पाहत होता.परंतु गळ्यात एक चांमड्यापासुन बनवलेला पट्टा असल्याने त्याला पुढे काही जाता येत नव्हत.त्याच्या ह्या अशा अवस्थेवर ती पिशाच्चरुपी रिना दात विचकुन त्याच्याकडे पाहत हसत होती-त्याला आपले धार-धार दात दाखवून, डोळे वटारुन येऊ-येऊ अशी पोज देत नख हलवत डिवचत होती.ज्याने ते कुत्र अजुन भडकत (;भाऊ..भाऊ,भाऊ..करत) मोठ्याने भुंकत होत.

" अव , जरा बघा की कशापाई भुकतय बिचहा..?" मगाचपासुन येणारा तो कुत्र्याचा आवाज आता असहनीय झाला होता.म्हणुनच संभा म्हणाली. तिच्या ह्या वाक्यावर तिचा नवरा दुंक-या हळुच आपल्या जागेवरुन उठला.

" व्हई..थांब म्या बघतु! तोवर..ह्याला घे.?" त्या दुंक-याने अस म्हंणतच हळुच आपल्या दीड वर्षाच्या मुलाला त्याच्या आईकडे सोपवल व बाहेर आला..दरवाज्याची चौकट ओलांडून एक कटाक्ष समोर वस्तीवर टाकला तसे त्याला थोड आश्चर्य वाटलं.कारण आज त्याच्या झोपडी व्यतिरीक्त कुणाच्याही झोपडीत उजेड दिसत नव्हता.रोज सायंकाळ झाली की प्रत्येक झोपडीत एक मशाल पेटली जायची..काही आदिवासी

मित्र सोन्या, मन्या..,मदन्या बाहेर फिरताना दिसायची...बाजुला असलेल्या मंदिरात रघुबाबा रोजची मोठ्याने टाळ वाजवत आरती म्हणायचे त्या आरतीचा आवाज तिथली स्मशान शांतता भंग करायचा. ती आरतीही आज सुरु नव्हती. आज बाकीच्या दिवसांपेक्षा काहीतरी विलक्षण घडत होत.वर आकाशातुन खाली पड़णा-या चंद्राच्या निळसर प्रकाशात, त्या झोपड्या एका प्रेताला गाडल्या जाणा-या कबरीसारख्या उभ्या आहेत असं भासत होत्या. एका कब्रस्तानात उभ असल्यासारख सर्व दिशेला चिडूचुप शांतता ,नी थंड गारवा पसरला गेलेला.रातकिड्यांची किरकिर उभ्या नग्न आसमांनात भेसुर , दुखी विव्हळ फोडून गुणगुणत वाजत होती. काहीवेळा अगोदर रिनाने ज्या एका आदिवसी मदन नामक इसमाला विषारी डंख मारलेला.त्याला ही आपल्या सारख बनवुन तिने प्रथम त्याच्या घरावर हल्ला चढवला.मदनने आपली बायको , लहान मुलगा सर्वांना लुचुन स्व्त:सारख बनवल होत. आणि त्यांच्या मार्फत पुढच्या झोपडीवर ह्ल्ला करुन अस करता-करता पुर्णत जंगली आदीवासी मांणस लुचली गेलेली. अपल्या झोपडीतल्या दरवाज्याच्या चौकटीत उभ राहून तो आदिवासी माणुस आजुबाजूला अंधारात पाहत होता. चंद्राच्या निळसर कड्या प्रकाशात त्या समोरच्य झोपड्या काळ्या-निळ्या दिसुन येत होत्या. समोर झोपडीच्या उघड्या असलेल्या दार-खिडक्यांमधुन एक दोन वेळा त्या आदिवासी मांणसाला दोन पिवळे डोळे लुक-लुकताना दिसले होते. जे डोळे पाहुन सर्व प्रथम तर अंगावर शहारा उभा राहिला होता-परंतु सेक्ंदापुरत पाहिलेल हे दृश्य भल मनावर सत्याचा पगडा कसा ठेवु शकतो? मानव त्याला भासच समजणार ! नाही का? त्या दुंक-याला ही हेच वाटल.दरवाज्या बाजुला एक पेटलेली मशाल लटकवल होती-जी हातात घेऊन त्याने हळुच आपल्या चेह-यासमोर आणली, त्या मशालीच्या उजेडात त्याचा भ्यायलेला चेहरा उजळुन निघालेला दिसत होता.आतापर्यंत कुत्र्याचा आवाजही शांत झाला होता , चौही दिशेंना फक्त विशिष्ट प्रकारच्या( व्हू,व्हू,व्हू,व्हू) वा-याचा आवाज काय तो बोच-या थंडी सहित अंगाला झोंबत होता.एक आवंढा गिळुन तो आदिवासी माणुस मशालीच्या उजेडात झोपडीच्या पाय-या उतरुन खाली आला.उजव्या बाजुला कुत्र्याला बांधल होत तिकडे जाऊ लागला. एक-एक पाऊल सावधानतेने वाढवत तो त्या दिशेला पोहचला.आणी पोहचताक्षणीच समोरच दृष्य पाहुन हातातली मशाल थर थरु लागली-पोटात भितीने ढवळू लागल...पुढे खाली जमिनीवर त्या काळ्या कुत्र्याच मेलेल प्रेत पडल होत..शरीर हात-पाय सर्वकाही पुढे बसलेल्या अवस्थेत होते...आण कुत्र्याची मान 360 च्या अंशात गोल मागे फिरवली होती...तोंडातली जीभ बाहेर आलेली तिला मागची शेपुट निताणुन बांधली होती. आणी विस्फारलेले मधाळ डोळे एकटक त्या दुंक-यावर खिळले होते.त्याच ते विचित्र प्रेत त्या मशालीच्या तांबड्या उजेडात अघोरी भासत होत. विचित्र माणुसकीला काळीमा फासणारी मौत मिळाली होती त्या मुक्या जनावारास. परंतु कोणि मारल होत? का मारल होत?! हे असल भयान दृष्य पाहुन..तो आदिवासी भीतीने माघारी फिरला...आपल्या बायको मुलाच्या काळजीपोटी झोपडीच्या दिशेने जाऊ लागला.

□□□□□□□□□□□□□□□

चंद्राच्या निळसर उजेडात राहाजगडच्या वेशीवर पाच सफेद रंगाचे तंबु ठोकलेले दिसुन येत होते. प्रत्येक तंबूत एक कंदिल पेटला होता, त्या कंदिलाच्या प्रकाशात कोंडूबा दिन्या व काहीसैनिक दमुन विश्रांती घेत बसलेले अस दिसत होत.तर बाकीचे काही उर्वरीत दहा बारा सैनिक हातात तळवारी,भाले अंगावर चिलखत चढवून वेशीवर पाहारा देत होते. की तोच दुरुन तपकीरी रंगाचा घोडा तबडक तबडक आवाज करत आला आणी त्या सैनिकांसमोर थांबला.घोड्याचा आवाज ऐकुन तंबुत झोपलेले बाकीचे सैनिक ही बाहेर आले.तसा घोड्यावरुन एक माणुस उतरला...मित्रांनी हा तोच माणुस होता ज्याने जत्रेसाठी नियम बनवले होते.

" प्रधान जी आपण आण इतक्या रातच्याला.. समंध.. ठिक हाई नव्ह.?" कोंडूबा तंबुमधुन बाहेर येत म्हणाले. अच्छा तर मित्रांनो हे आहेत राहाजगडचे एकमेव प्रधान यार्वशी, त्यांच्या साहसी, चातुर्यवाण बुद्धीला पाहुन महाराजांनीच त्यांना राहाजगडचा प्रधान बनवला होता.

यार्वशी प्रधान आपल्या घोड्यावरुन खाली उतरले व कोंडूबाकडे पाहत म्हणाले.

" सगळ ठिक आहे कोंडूबा! आम्ही फक्त हे पाहायला आलो आहोत की पाहारा कसा चालू आहे, ! वेशीवर सर्वकाही ठिक तर आहेना?"

" तुम्ही काय बी काळजी करु नका बघा प्रधानजी ! आमच्या सैनिकांचा येशीवर लेय करडा पहारा चालु हाई, ! डोळ्यात तेल घालुन पाहारा देतायेत..पोर..! साधी मुंगी बी आत येणार नाय बघा.!" कोंडूबा आपल्या अत्माविदारक विश्वासाने म्हणाले.त्यांच हे वाक्य ऐकुन यार्वशी प्रधानजींच्या ओठांवर एक मंद स्मितहास्य पसरल.त्यांनी एक हात

हळुच कोंडूबांच्या खांद्यावर ठेवला व म्हणाले.

" आमचा विश्वास आहे तुमच्यावर कोंडूबा, " काहीक्षण यार्वशी प्रधानजी थांबले त्यांनी कोंडूबांना काही खाजगी बोलायच होत की काय ते त्यांना सैनिकांपासुन बाजुला घेऊन आले व गंभीर आवाजात हळुच म्हणाले.

" कोंडूबा आता मी काय सांगत आहे ते निट लक्ष देऊन ऐका ?सांज उलतुन गेली आहे वेशीबाहेरुन आता कोणिही आत येण्याची परवानगी मागत असेल...तर त्याला वेशीआत घेऊ नका!

आणी कोणत्याही सैनिकाला काहीही झाल तरी..वेशीबाहेर पाऊल टाकु देऊ नका! कारण महाराजांजवळून आम्हाला अशी माहीती मिळाली आहे , की वेशीबाहेर साक्षात मृत्यु फिरतोय.. ! न जाणे कोठून कोणत्या मितीतुन खुद्द सैतान आपल्या गावच्या वेशीवर येऊन ठेपलाय.?ज्याला ना आकार आहे ना उकार..!"

" क..क्क...काय ! म्हंजी..येवढ दिस जे काही इचीत्र घडत व्हत त्यामाग खरच सैतान हाई !" कोंडूबा पटकन हळुच म्हणाले.

" हो कोंडूबा, पन एक गोष्ट लक्षात ठेवा? सैनिकांना हे कळू देऊ नका नाहीतर ते घाबरतील.. त्यांच धीर खचला जाईल. तुम्ही आमच्या विश्वासतले आहात म्हणुनच मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही सर्व सांभाळून घ्याल " प्रधानजींनी कोंडूबांच्या खांद्यावर ठेवलेला हात जरा दाबुन धरला.

" ते समद ठिक हाई प्रधानजी , पर इथ जमलेला एक नी एक सैनिक माझा लेक हाई आण एक बाप आपल्या लेकांस्नी अस खोट कस बोलु शकतु! जर त्यांना काय झाल म्हंजी..एक येळ माणुस असत तर जिता फाडला असता बघा..पर ह्या सैतानी उपद्रवांस्नी आम्ही सामन्य माणुस कस थांबु शकतु?" कोंडूबा म्हणाले.

" कोंडूबा,त्याची काळजी तुम्ही करु नका! फक्त काहीच दिवसांच प्रश्ण आहे.कारण महाराजांच्या ओळखीचे एक स्वामीभट्टाचार्य आहेत !" प्रधानजी पुढे काही बोलणार की तोच मध्ये कोंडूबा उच्चारले.

" काय..!" कोंडूबांच्या भुवया मोठ्या झाल्या तोंडाचा आवासला डोळ्यांत एक अद्भूत चमक उमटली.

" शिव..शिव..शिव ! " कोंडूबांनी दोन्ही हात जोडले व पुढे म्हणाले.

" स्वामींना, बोलावणार हाईसा महाराज." कोंडूबांच्या काहीक्षणा अगोदर चेह-यावर दिसणारे त्रासीक भीती मिश्रित भाव आता दुर जाऊन चेहरा प्रसन्नतेने उजळुन निघाला..चेह-यावर हास्य पसरल, !

" तुम्ही ओळखता स्वामींना?"

" अहो प्रधानजी स्वामींना कोण ओळखत नाय हो ! साक्षात शिवाचा अवतार आहेत हो स्वामी! म्या बी कुठून घाबरलो कोणास ठावुक पन जसा तुमच्या तोंडून स्वामींचा उच्चार बाहेर पडला..अहो मला काय धाड भरली..! अव तुम्ही काय बी तरास वाटून घेऊ नका बघा ! ,आता स्वामी येणार हाईत म्हंटल्यावर म्या बघतू समद इथल."

कोंडूबा म्हणाले. यार्वशी प्रधानजींनी स्वामींना पाहिल तर नव्हत परंतु त्यांच्या एका नावाने कोंडूबांच्यात चेह-यावरच्या त्रासिक,भीतीचा सर्वनाश त्यांच्या शक्तिंचा आणि त्यांच्या स्वाभाविक गुणांचा प्रचिती कळवत होता. स्वामींच्या नावाने कोंडूंबांच्यात झालेला बदल त्यांनी पाहिला होता जे स्वामींचा वृत्तांत कळवत होता.

आता फक्त स्वामींची भेट राहाजगडला होन बाकी होत. पण ती कधी होणार ? ते नियतीलाच ठावुक.!

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

काळजल नदीच्या काळ्या पाण्यातुन एक लाकडी बोट रघुभट्ट,आणी दोन उर्वरित आदिवास्यांसहित राहाजगडच्या दिशेने निघाली होती.त्या दोघांचीही नावे पुढील प्रमाणे-बोट हाकलणारा झिंग्या, रघुभटांबाजुला बसलेला संत्या अशी होती. बोटच्या दोन्ही तर्फे गर्द झाडी दिसुन येत दोन्ही तर्फेची झाडे विशिष्ट पध्दती ने एका बोगद्यासारखी एकमेकांना जोडली गेलेली. आणि त्या जोडल्या गेलेल्या झाडांच्या काही फांद्यांमधुन हलकासा चंद्राचा प्रकाश ज्याप्रकारे जऊल आल्यावर ढगांच्या थोड्याश्या भागांमधुन सुर्याप्रकाशाची किरणे बाहेर पडतात तसा बाहेर पडत होता. इकडे काळ्या पाण्यात पांढ-या चंद्राच प्रतिबिंब उमटल होत.की पुढच्याक्षणाला त्या प्रतिबिंबावर नदीबाजु असलेल्या हिरव्यागार गवतातुन एका पिवळसर बेडकाने उडी घेतली.तसा एक छोठासा विशिष्ट प्रकारचा (डूबुक) आवाज होत वर पाणी उडाल आणि पाण्यात तरंग उठली जात त्या चंद्राच प्रतिबिंब कागद चुरगळून टाकल्यासारख दिसु लागल. हातात गोल जाड लाकुड घेऊन बोटच्या मागच्या फळीवर एक आदीवासी बसला होता.आणि त्या जाडजुड लाकडाला पाण्यावरुन फिरवत तो बोटला दिशा दाखवत होता.त्याच नाव झिंग्या होत. झिंग्या पुढेच रघुभट्ट आपल्या गंभीर चेह-याने खाली मान घालुन बसले होते.त्यांच्या चेह -यावरचे भाव इतके गुढ अनाकलनीय होते की त्या झिंग्या आणि संत्याच्या मुखातून एक शब्द ही बाहेर पडत नव्हता.फक्त आजुबाजूला असलेल्या झाडाझुडपांतुन रातकीड्यांची किरकिर -तर कधी-कधी जंगलातल्या एका रानटी श्वापदाची विव्हळ (व्हू..व्ह..व्हू.व्हू..) ऐकु येत होती. रघुभट्ट एकटक खाली पाहत बसलेले.. बोट पाण्यावरुन चालत एक एक झाड मागे मागे सोडत हळु-हळू अंतर कापत होती -की अचानक रघुभटांच्या पुर्णत शरीराला एक झटका बसला , व त्यांच्या नाकपुड्या एका मोठ्या श्वाससहित फुगल्या गेल्या. येवढवेळ रघुभट गप्प बसले होते आणि आता अचानक अशी हालचाल केली जे पाहुन ते दोघे काहीक्षण घाबरलेच.तर झिंग्याच्या मनात विचार आल ! म्हाता-याला येड लागल की काय. रघु भट ओठ विशिष्ट प्रकारे हळवत एका मांजरीला उंदराच वास याव तसे मान डाविकडुन उजवीकडे फिरवु लागले-नाकपुड्या जोर जोराने फुगवून श्वास घेऊ लागले -त्यांनी हळूच बाजुला बोटच्या फळीवर एक पांढरी कापडी पिशवी होती, त्यात हात घातला आणि पिशवीतुन एक पिवळा दगड बाहेर काढला.तो दगड आपल्या पंजात धरुन त्यांनी कपाळाला लावला-आणि तोंडातल्या तोंडातच आवाज न येण्यासारख मंत्र म्हणु लागले. तसा काहीवेळाने तो पिवळा दगड मंत्रशक्तिने चमकु लागला...दगडातुन प्रकाशबाहेर पडू लागला,दगड चमकत आहे हे पाहुन रघुभटांनी आपले बंद डोळे खाडकन उघडले.पुन्हा एकदा नाकपुडया फुगवुन एक मोठा श्वास घेतला आणि झटकन डाव्या बाजुला अंधारात झाडाझुडपांच्या दिशेने मान वळवुन पाहील व , ज्या हातात तो दगड होता तो हात हवेत उंचावला..व दुप्पट वेगाने खाली आणत तो दगड वेगाने डाव्याबाजुला असलेल्या झाडांच्यात भिरकावला...आणी पुढे जे काही घडल अनाकलनीय,अविश्वासू होत. हातात धरलेला एक पक्षी जसा मुक्त व्हावा आणि पंख फड-फडवत वेगाने पुढे ऊडत जावा तसे तो चमकणारा पिवळा दगड हवेत उडत उडत पुढे जातच होता.

" झिंग्या पोरा... बोट थांबीव? ती वाट दिसतीया तिथ बोट थांबीव."

रघु भटांनी डाव्याबाजुला पाहत हात उंचावला -झिंग्याने एकवेळ रघुबाबांकडे मग त्या दिशेला पाहिल..त्याच्या नजरेस चंद्र प्रकाशात एक मोकळी वाट दिसली.आणी त्या वाटेवर एक गोल होडी पालथी पडलेली दिसली. ! जी की वयगुची होती..!

□□□□□□□□□□□□□□□□□

होळीसाठी लाकड आणण्यासाठी राहाजगडच्या दुस-या मार्गातून नाग्या, रुश्या- भुश्या, चिंत्या,जंगलात गेले होते.त्यांना राहाजगडच्या वेशिवर सैनिकांचा पाहारा आहे हे माहीत होत म्हणुनच चौघांनी दुसरा रस्ता पकडला होता.राहाजगड गावाला चौहीबाजुंनीच जंगलाने वेढा घालुन आपल्या मिठीत सामावून घेतलेल.

चौघांनाही सुकलेली फाटी शोधता शोधता वेळेचा थांगपत्ताच राहिला नव्हता..आज वेळ अशी काही वेगाने पळत होती..की पाहता-पाहता सूर्य जाऊन संध्याकाळ होऊन जात , आकाशात गोल चंद्र उगवुन आला होता. दिवसा उजेडात छान भासणा-या झाडाच्या मोठ-मोठ्या आकृत्या आता कालपट निळसर दिसत होत्या. जंगलातल्या झाडांझुडपांमधुन निघालेल्या वाकड्या तिकड्या पायवाटेला तुडवत हे चौघेही गावच्या दिशेने निघाले होते. सर्वात पुढे भुश्या , त्याच्या मागे रुश्या , मग चिंत्या , आणी चौथा सर्वात शेवटी चालत होता लंगडा नाग्या. चौघांच्याही खांद्यावर सुकलेल्या फाट्यांचा भाडा होता. इतकाही जड नव्हता की खांदे दुखु लागतील.

" ए माद×××नो.....! चालवा की पाय बिगि-बिगिन.! आई×××नो

बोल्लु व्हतु का नाय मी? त्या मसनातली लाकड घेऊ आण देऊ

व्हळी पेटवाला..? पर मांझ मेल्याच कोण ऐक ना..आता घ्या

..मरा.!भुगता..आता भुगता.!"

सर्वात शेवटी एका पायाने अपंग असलेला नाग्या लंगडत-लंगडत चालत होता तोच आपल्या घोग-या आवाजात म्हणाला. एक पाय अपंग असल्याने बिचा-याला चालता तर निट येत नव्हत त्यातच खांद्यावर हे वझ , आणी त्याच्या मसनातल्या फाट्यांच्या आइडियाला कोणीही भाव दिल नसल्याने आता त्या गोष्टीचा डोक्यात राग शिरला होता.

मागुन त्याची काहीमिनीटांपासुन अखंड बडबड सुरु होती. पुढचे तिघे मात्र गप्प ते ऐकत होते जसे की त्या तिघांचही नाग्याच्या बोलण्यावर लक्षच नसाव.सर्वात पुढे असलेला पैलवान भुश्या , मागे असलेला रुश्या , आणी तिसरा चिंत्या..तिघांच्याही चेह-यावर एकच भाव पसरले होते. तिघांच्याही चेह-यावरचे भयरसाने न्हाऊन निघालेल्या त्या छटांचभाव दर्शन त्या निळसर चंद्राच्या उजेडात ऊठून दिसत होत. परंतु अस काय झाल होत? म्हंणजेच ते तिघेही इतके घाबरले का होते? जसे की अवतीभवती काहीतरी अक्ल्प्निय,अकल्पित घडत होतं, किंवा घडल असाव! ज्याची जाणिव ह्या तिघांनाही झाली होती ?

भुश्याने आपल्या खांद्यावर असलेल्या फाट्यांतुन एक मोठा फाटा बाहेर काढला, त्या फाट्याला जंगलातल्या एका झाडाची चार-पाच पान तोडुन त्या फाट्यात घुसवली , आणी तो फाटा पायवाटेबाजुलाच एका जागेवर अलगद जमिनीत रोवला.ही सर्व क्रिया त्याने चालता-चालताच केली. भुश्याच्या ह्या कृतीच निदर्शन फक्त रुश्या आणि चिंत्या दोघांनीच केल होत.कारण मागे लंगडा नाग्या चालता चालता ह्या तिघांनाही जीव खावुन शिव्या देत होता-आणि हे तिघे जणु नेहमीचंच

असल्याप्रमाणे दुर्लक्ष करुन पुढे पुढे चालत होते...! आणि आणि राहुन एकाच जागेवर येत होते असं का?

□□□□□□□□□□□□□□

दुंक-याच्या मनात वाईट विचारांनी काहूर माजवल होतं -आज आजूबाजूला घडणा-या विलक्षण घटणांचा विचार डोक्यात भुंग्यासारखा घोंघावत होता. ते विचार आपल्या बायकोला सांगावेत मनातल्या विचारांना कोठेतरी खाली कराव ह्यासाठी दुंक-या झोपडीच्या लाकडी पाय-या चढुन, मशाल पुन्हा दरवाज्याजवळ आडकवून पुन्हा झोपडीत शिरला...! तसे त्याची पावले जागेवर थांबली , एकप्रकारे भयाने गोठलीच गेली...पुढच दृष्य पाहून डोळे खोंंबणीतुन बाहेर यावे इतके मोठे झाले.आतल काळिज बाहेर येईल की काय इतका मोठा तोंडाचा आ वासला गेला एकप्रकारे वाचाच गेली होती त्याची.

पुढे खाली जमिनीवर दुंक-याची बायको मरुन पडली होती. मगाशी पाहिलेला तिचा चुलीतल्या तांबड्या उजेडात चमकणारा सोनेरी रंगाचा चेहरा मेलेल्या प्रेतासारखा पांढराफट्ट पडला होता. तिच्या पांढ-याफटूक चेह-यावर चुलीचा तांबडा उजेड चिता पेटल्यासारखा पडला होता.वाचा बसल्यासारख तोंड आवासळ गेलेल-विस्फारलेले काळपट डोळे एकटक वर छताला स्थिरावले होते..जणु वर काहीतरी होत दुंक-याने ते हेरळ आणि हळु-हळू वर पाहायला सुरुवात केली.आपल थर-थरत डोक अगदी स्लोमोशनने वर-वर घेऊन जायला सुरुवात केली. पुढे काय दिसेल? काय असेल वर ? सैतान ? की काही जंगलातलच रानटी.. वस्तीत शिरल होत-ज्याने आपल्या बायकोच आणि बाकी वस्तीवाल्यांचही म्हढ पाडल होत.? आता आपल काय होणार? भीतीपोटी मनात पळून जाण्याचा विचारही शिवत नव्हता.

झोपडीच्या वर काही माळा नव्हता लाकडापासुन बनवलेलच रिकाम छप्पर होत. मशालीचा उजेड वर पोहचत नव्हता, ज्याने वरचा सर्व भाग अंधारात बुडून गेलेला. त्या आदिवासी मांणसाने हळूच वर पाहिल.

वरचा भाग गुढ अंधारातुन न्हाऊन निघालेला.तो एकटक त्या अंधारात आपल्याडोळ्यांनी निरखुन पाहु लागला तसा वरच्या छतावर काहीतरी असल्यासारखा भास त्याला होऊ लागला. कारण अंधार जरी गर्द गडद असला तरी त्यात वळवळणार ते अपरिचीत, दुस-या मितीतल अभद्र ध्यान काळपट पातल द्रवासारख दिसत.पाहता-पाहता सेक्ंद जाऊन मिनीट उलटला , त्यासरशी त्या अभद्र,क्प्टी , अघोरी शक्तिने आपल रुप बाहेर काढल कारण आईता मिळालेला सावज तो असंच सोड़णार नव्हता. एका पुतळ्यासारखा जागेवर उभ राहुन तो एकटक अंधारात पाहत होता..... की तोच पुढच्याक्षणाला त्या अंधारात दोन पिवळेजर्द डोळे चमकले, तो वरचा गर्द अंधार बाजुला सारला जात तिथे एक लाल रंगाचा उजेड पसरला..आणि त्या उजेडात त्याला जे दृष्य दिसल ते मानवाच्या कल्पनाशक्तिची थेर उडवणा-यां मधल होत.

लाल रंगाने उजळून निघालेल्या वरच्या लाकडी छपरावर त्या आदिवासी माणसाचा दिड वर्षाचा मुलगा एका कोळ्या सारखा चिपकुन बसलेला.

हाता पायांसहित पुर्णत शरीर राखाडी रंगात परावर्तित झालेल, लहानस गोल मटोल टक्कल पडलेल डोक कलिंगडासारखा फुगल होत...त्यावर असलेले ते थोडेफार केस मुंजासारखे मधोमध बांधलें होते.डोळ्यांतल्या दोन खोंबण्या काजव्या सारख्या पिवळ्या रंगाने चमकत होत्या...आणि वरच्या पातळ भुवया जाड काळ्या झाल्या होत्या..शरीरातल्या हिरव्या नसा फुगून वर आल्या होत्या-एका लहानश्या मुलाच देखण गोंडस रुप बिघडवुन ह्या क्लिष्ट शक्तिने त्याच्या रुपाची एक विकृत छवी जन्माला घातली होती.जी पाहुन त्या बापाच्या काळजाचा पाणी-पाणि झाल होतं.

ते लहानस पोर एकटक त्या आदिवासी मांणसाकडे पाहत खुदकन हसल.(हिहिहिही..!" घोगर -हसताना त्याच ते तोंड उघडल , तोंडातुन चार सुळ्यासारखे दात बाहेर आले. " आले..बा..ब..बा आला.."

दीड वर्षाच लहान पोर ते..त्याच्या तोंडून निघाल एक घोगरा बडबडता आवाज.तो आवाज ऐकून एकवेळ त्या लहान मुलाच्या बापाच्या कानाचे पडदे फाटले , काळजात चर्रर्र झाल.. आणि त्या पिशाच्चरुपात बदलेल्या लहान मुलाने थेट वरुन आपल्या बापाच्या अंगावर उडी घेतली.हवेत उडी घेतानाच त्याचा जबडा वितभर वासला , त्या जबड्यात एक सोनेरी रंगाचा प्रकाश चमकला जात असंख्य काळेभोर लहान हात वळवळताना त्यात दिसले..जणु त्या आदिवादी मांणसाचा गळा आवळण्यासाठी , रक्त लुचण्यासाठी निघाले असावेत.दीड वर्षाच गोंडस पोर ते पन त्याच रुप हदयाच थरकाप उडीवणार , पाचावर धारण बसवणार होत.

आणी हे असल भ्यावह रुप पाहून त्या आदिवासी मांणसाला हे कळून चुकलं होतं की हा आपला मुलगा नाही !..तर सैतान आहे -सैतान.

रक्त..मांस लुचण्यासाठी उताविळ झालेला सैतान आहे. आणि त्याच्या शक्ति पुढे आपला काय निभाव लागणार ? म्हणुनच तो आदिवासी एकटक समोरुन येणा-या मृत्युला स्विकारण्यातच भल समजुन गेला आणि पुढच्याक्षणाला त्या झोपडीत एक कानठळ्या बसवणारी आर्त किंकाळी घुमली!"आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ......." काहीवेळाने हवेत विरुन गेली....!!! आता पुढचा नंबर कोणाचा होता?

□□□□□□□□□□□

 

क्रमश