Marriage Talk (Part 3) in Marathi Short Stories by लेखक सुमित हजारे books and stories PDF | लग्नाची बोलणी (भाग 3)

Featured Books
Categories
Share

लग्नाची बोलणी (भाग 3)

आवडीचे बनवलेल असत त्यांच्या लाडक्या लेकीने आता रात्रीच्या अकरा वाजलेले असतात माई आबा रमा आणि विश्वनाथ हे सगळेजण बाहेरच्या अंगणात बसलेले असतात
आणि त्यांच्या गप्पा गोष्टीना सुरवात होते लगेच माई विश्वनाथला म्हणते अरे बाळा विश्वनाथ आपल्याला आता रमेच लग्न करून दिल पाहिजे त्यावर रमा लगेच म्हणते काय ग माई माझ वय आहे का लग्नाच हो तर तुझं लग्नाचं वय झाल आहे आता लवकरच तुझ लग्न उरकून दिल पाहिजे आबा म्हणाले काय हो आबा तुम्हीपण अगं नाही खरच तुझं लग्न करून दिल पाहिजे आबा हसत हसत म्हणाले आणि रमा लाजून धावतच आतच्या खोलीत निघून जाते त्यावर विश्वनाथ म्हणतो चला तर ठरल मग मी लगेचच कामाला लागतो स्थळ शोधण्याचा आधी मला सांगा नेमकी सुरवात कुठून करायची मला त्यावर माई म्हणते अरे हो हो हो किती घाई करशील विश्वनाथ म्हणतो तस नाही ग माई मी रमेच्या लग्न लावून देण्याच्या कल्पनेने
ईतका आनंदीत आहे की विचारू नकोस त्यावर माई म्हणाल्या ठीक आहे तुझ्या मनासारखं होऊ दे विश्वनाथ म्हणाला मी पहिले एक काम करतो माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत संजय जोशी जे मला एक वर्षा आधी पुणे ला भेटले होते मी ऑफीसच्या काही कामानिमित्त पुणे ला गेलो होतो तेव्हा त्यावेळी त्यांच्याबरोबर बोलताना अचानक त्यांनी लग्ना संदर्भातला विषय काढला होता ते म्हणाले विश्वनाथ भाऊ तुमच्या बघण्यात कोणती मुलगी असेल तर मला सांगा हा कारण माझ्या मुलाच्या लग्नासाठी स्थळ शोधतो आहे पण हवे तशी मनासारखी स्थळ भेटत नाही
जी स्थळ येतात ती पण योग्य येत नाहीत असे ते म्हणत होते मी पण म्हणालो ठीक आहे जोशी साहेब माझ्या नजरेत कोणी मुलगी असेल तर मी आवश्यक तुम्हाला सांगेन तर माई माझं काय म्हणणं होतं (तसा माझा विचारच आहे) की आपण जर रमेच लग्न जोशींच्या मुलाबरोबर ठरवल तर अस ना तस जोशी हि आपल्या मुलासाठी स्थळ शोधत आहेत म्हणून मी म्हंटल तुझं काय आहे म्हणणं यावर माई अरे विश्वनाथ तू म्हणतोस ते ठीक आहे पण मुलगा कसा आहे त्याची विचारपुस केली आहे का काही माहिती काढली आहे का माई म्हणाल्या त्यावर लगेच विश्वनाथ बोलला नाही ग माई पण तू काही काळजी करू नकोस मी आताच कामाला लागतो माहिती काढण्याच्या तू निश्चिंत रहा माई म्हणते ठीक आहे पण जरा लवकरात लवकर बघ उशीर करू नकोस चालेल माई मी उद्याच सकाळी पुणे ला जायला निघतो जोशींचे एक जवळचे नातलग पुण्यात राहतात तर मी त्यांची भेट घेऊन येतो हा पण जरा सांभाळून विश्वनाथ जोशींना कळता कामा नये माई तू चिंता करू नकोस मी बरोबर सांभाळून घेईन तितक्यातच आबा तिथे येतात आणि विचारतात काय चालल आहे इकड तुमच्या माय लेकाच मला हि कळू दया जरा आबा तुम्ही आलात या बसा इकडे हो हो बसतो आणि आबा खुर्चीवर बसतात तितक्याच विश्वनाथ म्हणतो काही नाही हो आबा मी आणि माई रमेच्या लग्नाविषयी चर्चा करत होतो तुम्हाला काय वाटत आबा जर आपण रमेच लग्न जोशींच्या मुलाबरोबर ठरवल तर कारण माई आणि माझा हाच विचार आहे माई पण तेच म्हणते आहे की आपण जोशींच्या मुलाबरोबर लग्न ठरवायला काही हरकत नाही पण मुलाची व त्याच्या कुटुंबाची नीट चौकशी कर अस माईच म्हणन आहे हा मग कर उशीर करू नकोस हो हो आबा मी चोकशी करणारच आहे त्यासाठीच तर उद्या सकाळी मी पुण्याला चाललो आहे पण तुमचा होकार आहे का