Rakt Pishachchh - 9 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 9

The Author
Featured Books
Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 9

रक्त पिशाच्छ 18+ भाग 9

 

फक्त 18+ प्रौंढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.

लेखक:जयेश झोमटे (जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे

 

भाग 9 ! रक्त पिशाच्छ क्वीन पुन्नर आगमन माहीती.

ड्रेक्युला काउंट.

 

पाठीत कुबड असलेली भुरी चेटकीण टेबलावर ठेवलेल्या त्या अ-मृत्यु नामक पुस्तकाचा एक-नी-एक पान हातावाटे उलटून, डोळ्यांखाली घालत पुढे-पुढे ढकलत होती. तसे तिचे ते दोन पांढरट डोळे त्यातला तो काळा टीपका डावीकडून उजवीकडे फिरत होता.पुस्तकाची पान तसं म्हणायला मळली गेलेली- परंतु फाटली मात्र नव्हती.जणु अमानविय शक्तिनेच ते पुस्तक बनल असाव. त्या प्रत्येक-पुढे जाणा-या पानावर वेग-वेगळ्या भुतांची चित्र, नावे त्यांची सर्वकाही इत्यंभूत माहीती लिहिलेली होती.परंतु भुरीला जे हव होतं त्या शिवाय मात्र त्या माहीतीचा तिला काहीही फायदा नव्हता, पुस्तकाच पान पलटता-पलटता भुरी बाजुला ठेवलेल्या त्या वळ-वळणा-या पांढ-या अळ्यांच्या काचेच्या बरणीत हात घालत होती, आणी हातात जितक्या अळ्या घेता येतील तितक्या घेऊन तोंडात कोंबत होती, आणी चवीने चघळत ,मचाव-मचाव करत खात होती- तीची हीच क्रिया पुन्हा-पुन्हा चाललेली.ड्रेक्युलाचा मात्र तिच्याकडे लक्ष नव्हत, कारण तो पाठमोरा उभा जो होता.

" भेटलं..! भेटलं.." भुरी आपल्या किन्नरी आवाजात मोठ्याने ओरडलीच तिचा आवाज ऐकुन त्या सैतानाने हळुच गिरकी घेत तिच्याकडे पाहिल, त्याच्या चेह-यावर एक भयंकर छद्मी हास्य उमटल होतं.हसु काय असतं भले ते ह्या सैतानाला कोठून ठावुक असणार ! नाही का? शेवटी सैतानच तो.टेबलावर असलेल्या त्या भल्यामोठ्या पुस्तकावर एक पान थांबवलेल दिसुन येत त्या पानावर भल्यामोठ्या अक्षराने काळ्या रंगात एक नाव लिहिल होत-पिशाच्चराज , पुढे एक आकृती होती.एका मानवा ऐवढ वटवाघळुच केसाल डोक,नाक आत गेल होत, लांब मोठे सशासारखे कान , लाल रक्त निखा-यांसारखे रागाने वटारलेले डोळे,जे पाहताच पाहणा-याच्या च्या मनात भय निर्माण होईल, जबडा रक्ताच्या लालसेने वासलेलाच होता त्या जबड्यातुन त्या सैतानाचे सुळ्यासारखे चार धार धार दात दिसत होते.खालच शरीर हात-पाय- सर्व काही बलदंड फुगीर असुन त्यावर काळ्या रंगाचे केस उगवलेले, हातांवर पोलादासारखी धार असलेली नख होती जणु सावजाच काळीज उपटून खाईल.आणि पाठीमागे डावी-उजवीकडे दोन मोठे काळ्या रंगाचे पंख उघडलेल्या अवस्थेत दिसत होते. त्या पिशाच्च आकृतीखाली एक टीप-लिहीली होती.

"टीप- हे रुप आहे पिशाच्च प्रजातीतल्या सर्वात क्रुर,शक्तिशाली पिशाच्चराजच.-हे रुप तेव्हाच दिसत जेव्हा पिशाच्च राज अती क्रोधहिंत होतात- एक गोष्ट लक्षात ठेवा -पिशाच्चराजच हे रुप म्हंणजेच तुमचा मृत्यु आहे!" भुरीने ही टीप वाचली नी थेट एक थर-थरता कटाक्ष ड्रेक्युलावर टाकला ! तसे तिला दिसल की तो थंड नजरेने लाल ओठांवर छद्मी हास्य करत तिच्याकडेच पाहत आहे, सर्रकन अंगावर एक काटा उभा राहिला त्या बिचारीच्या, काय ते रुप काय तो दरारा महाभयान होता तो सैतान भगवंतालाही न घाबरणारा-रक्तपिपासु सैतान.

भुरीने गपचूप मान खाली घालून दुसर पान पलटल - पुढे काही अनुक्रमणिका नुसार माहीती होती.

अनुक्रमाणिका

1] पिशाच्चांचा उदय-जन्म

2]पिशाच्चराज बनण्याच्या विद्या

3]पिशाच्चराज वासना -स्त्री पुरुष

4]पिशाच्चराज स्वभाव

5]पिशाच्चराज वस्त्र

6]पिशाच्चराज प्त्नी

7]पिशाच्चराज प्रजात मृत्यु

8]पिशाच्च वध

बाकीची माहीती सोडून भुरीने सातव्या अंकावर बोट ठेवत वाचायला सुरुवात केली.

7] पिशाच्च मृत्यु-> पिशाच्चराज ही प्रजात अमर आहे तिला म्रुत्यु हा शब्द लागु होत नाही- हजारो -लाखो-करोडो वर्ष उलटतील परंतु पिशाच्चाराज प्रजातीच मृत्यु कधीच होत नाही, परंतु त्यासाठी त्यांना एक अमृत सतत प्राशन कराव लागत. आणी ते अमृत म्हंणजेच रक्त पृथ्वीतळावर वावरत असलेल्या मानवाच ताज रक्त!

जितक रक्त पिशाच्चप्रजात प्राशन करेल तितकेच ते जगत राहतील -रक्त, वासना,कामक्रीडा, संभोग हेच त्यांच खर आयुष्य आहे.एकवेळ समजा त्यांना रक्त मिळाल नाही तर त्यांच्या शरीराची चाळण होईल, ते अखंड निद्रेत जातील परंतु मृत्यु ओढावणार नाही.परंतु जर का पिशाच्चराजच्या ह्या अशक्तपणाच्या निद्रेचा फायदा घेऊन, देवधर्माकरणा-या नीच लोकांनी त्याच्या छातीवर वार केला , त्याच ह्दय काढून जाळुन टाकल, तर मात्र रक्त न मिळाल्यामुळे ह्या अशक्तपणाचा फायदा घेऊन हे नीच मानव त्याच काळ बनु शकतात.पिशाच्च प्रजातीतल्या पिशाच्चाच एकदा का अंत झाल , की त्या पिशाच्चाला पुन्नरजिवीत करता येत नाही ! कारण एकदा का ह्दयावर वार झाला की पिशाच्चाच शरीर राखेत रुपांतरीत होत त्याचा नाश पावतो." येवढी ओळ वाचुनच भुरीने त्या सैतानाकडे पाहिल त्याच राखाडी रंगाच तोंड , जरा पडल्यासारख वाटत होत.तरीही त्या

चेह-यावरच भेसुर-:क्प्टी-असुरी-नीचपणा गेला नव्हता.

भुरीने एक आवंढा गिळला नी पुढे अजुन काहीतरी लिहिल होत ते वाचु लागली.

" पिशाच्च ह्या प्रजातीत वासना ही रक्ता इतकीच महत्वाची आहे ! पिशाच्चराजला जी कोणी स्त्री मनापासुन आवडते तो त्या स्त्रीला आपली राणी म्हणुन कायमच आपल्या समवेत राहुनी घेतो.पिशाच्चराज हे तीन पेक्षा जास्त विवाह करु शकत नाहीत. पिशाच्चराज हे आपल्या राणीसाठी काहीही करु शकतात , त्यासाठीच ह्या अंधकारराजकाने पाताळातल्या एका सैतानी देवाशी एक करार केलाय. त्या करारानुसार जर कधी काळी कोण्या पिशाच्चराजच्या राणीच अंत झाल. तर तिच्या मृत्युच्या ठिक शंभर वर्षानंतर तिच पुन्हा एकदा जन्म होईल -परंतु हा जन्म असेल मणुष्य प्रजातीत."

" मणुष्य प्रजातीत! " ड्रेक्युला स्व्त:शीच पुटपुटला.

होय मनुष्यप्रजातीत जन्म होईल.राणीचा जन्म मणुष्य प्रजातीत झाल्यावर ते कस ओळखाव? एक प्रश्ण आणी त्या पुढे उत्तर होत.

->पिशाच्चराणीच जन्म मणुष्य प्रजातीत कोठे कसा झाला हे ओळखण्यासाठी कोणत्याही एका(स्त्री-पुरुष) सैतानी प्रजातीतल्या सैतानाचा बळी द्यावा लागेल. सैतानाच हदय काढून ते धड़-धडत हदय ग्रहण करुन झाल्यावर-पिशाच्चराणीच नाव घ्याव लागेल.नाव उच्चारताच पिशाच्चराणीच रुप आणी ती कोठे राहते हे तुम्हाला तुमच्या बंद डोळ्यांआड दिसुन येईल. एक गोष्ट लक्षात असूद्या पिशाच्चराणीला मागील जन्मीच सर्वकाही आठवण्याकरीता , पिशाच्चराजने तिच रक्त प्राशन कराव , रक्त प्राशन केल्यावर ती मणुष्यरुप धारण केलेली पिशाच्चराणी संमोहित होईल, पिशाच्चराजची गुलाम होईल -त्याचवेळेस पिशाच्चराजने तिला आपल्या स्व्त:च्या शरीरातल रक्त पिण्यास द्याव-ज्याने त्या पिशाच्चराणीला सर्वकाही आठवेल , ती पुन्हा एकदा सैतानी धर्मात येईन. भुरीने येवढ सर्व वाचुन व गप्प राहत एक कटाक्ष समोर टाकला. त्या सैतानाच्या चेह-यावर काय आनंद पसरला होता. जे शब्दांत वर्णन करने नाही.त्या राखाडी रंगाच्या चेह-यावरचे डोळे वटारले गेलेले,लाल ओठ गालात हसताना ताणले गेलेले, ज्यांच विचित्र u आकार झाला होता.एक मेलेले प्रेत कस हसेल, तसं त्या सैतानाच्या चेह-यावर हसु पसरलेल, जे पाहून त्या भुरीच्याही काळजात धडकी भरली.

" शाब्बास... भुरी... शाब्बास..! आज मी तुझ्यावर खुप खुष झालो आहे... ! सांग..- ड्रेक्युला काहीक्षण थांबून पुढे म्हणाला.सांग काय हवंय तुला माझ्याकडून? "

ओठांवर असुरी हास्य करत तो सैतान घोग-या आवाजात म्हणाला, त्याच्या डोळे जरा पापण्यांन आड दिसेनासे झाले होते जणु काही षडयंत्र चालु असाव. भुरी त्या सैतानाच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकुन भलतीच खुष झालेली आनंदाने किन्नरी आवाजात खिदळत हसू लागलेली, तो द्रोहकाल मात्र तिच्याकडे एकटक ओठांवर असुरी मंद स्मित हास्य ठेऊन पाहत होता.भुरीने हळूच आपले पांढरट बुभळ, त्यातला काला टीपका त्या कोटवर स्थिरावला.जे पाहुण त्या ड्रेक्युलाने हळुच काळ्या कोटच्या आत हात घालून तो सोनेरी रंगाचा ब्रश बाहेर काढला.त्या ब्रशआ पाहताच भुरीचे डोळे हव्यासाने चमकले-त्या दोन्ही डोळ्यांत ब्रशची चमकणारी सोनेरी रंगाची छवी दिसु लागली.

" घे !" आपल्या राखाडी रंगाचा धार-धार नखांचा पंजा असलेला हात त्या सैतानाने पुढे केला, ज्या हातात तो सोनेरी रंगाचा ब्रश धरलेला.ब्रशच्या शेवटच्या टोकाला एक सोनेरी पंख जोडून होता जो की त्या ब्रशच्या सौंदर्यात भर घालायचा.तो जादूचा ब्रश आपला होणार ह्या आनंदाने भुरीचा आनंद गगनांत मावेनासा झालेला.ब्रशकडे पाहत-पाहत

तिने आपली पाऊल वाढवल-आणि तो ब्रश घ्यायला निघाली.

□□□□□□□□□□□□□□

दोन मजली राझगड महाल समोर दिसत होत. महालाच्या चारही भिंती सफेद रंगाच्या असुन बाहेरुन खुप सा-या खोल्या दिसत होत्या जे की खिडक्यांवरुन समजत होत.महालात प्रवेश करण्यासाठी एक भलामोठ्ठा दहा -बारा फुटाचा दोन झापांचा दरवाजा दिसुन येत होता.दरवाज्याच्या दोन्ही बाजुला भिंतींवर एक-एक तांबडया रंगाची मशाल पेटलेली आणि त्या मशाली बाजुला हातात भाला घेऊन दोन सैनिक उभे होते.

" आर आपल्या गावच्या वेशीवर काय तरी इपरीत घडतय माहीतीये का? " पहिला सैनिक पुढे पाहतच म्हणाला.

" आर माहीतीये की ! त्या दोघांना मारल्या पासुन मलाच नाय तर अक्ख्या गावास्नी बी माहीती झालया.गावात बघीतल नाय व्हंय तु ! रातच्याला कोण कुत्र बी बाहेर भटकनास झालय. समदा गाव रातच्याला मसनात बदलतय आर अस म्हंणतायेत की गावच्या येशीवर सैतानाची फौज आलीया , !" तो दुसरा सैनिक सुद्धा पुढे पाहत म्हणाला.त्या दोघांचही बोलन एकमेकाच्या चेह-याकडे पाहुन होत नव्हत.

" आर पन मला एक समजना झालंय, त्यो सैतान आपल्या येशीवरच काहून भटकतोय.. गावात काहून येत नसल ! "

" आर ये बाबा, काय येडा बिडा झालायंस का ! कशापाई गावात याला पाहिजी म्हंतुस! आर दोन दिवसावर होळी हाय लेका, माहीतीये नव्ह ? आण ते ब्याद जर गावात आली तर...!" इतक म्हंणतच तो दुसरा सैनिक थांबला जणु पुढचे शब्द तोंडातुन बाहेर येत नसावेत , किंवा ते उच्चारताना मनात एक अनामिक भिती उत्तपन्न झाली असावी.

" नाहीतर काय र..:?" येवढवेळ समोर पाहत बसलेल्या त्या प्रथम सैनिकाने शेवटी , त्या दुस-या सैनिका कडे वळून पाहिल.त्याच्या चेह-यावर तो काय बोलणार हे जाणून घेण्याची भय मिश्रित उत्सुकता दिसुन येत होती.

" आर न्हाई तर रक्ता मांसाची होळी खेळल त्यो सैतान आपल्या गावात !" तो दुसरा सैनिक इतकेच म्हणाला.परंतु ते वाक्य उच्चारताना त्याच्या कपाळावर घाम जमा झालेला, डोळे जरा विस्फारलेले, तोंड जरा वासल गेलेल, आणि त्या मशालीच्या तांबड्या प्रकाशात त्याच ते भेदरलेल तोंड जरा भयान काळजाच ठोका चुकवणार भासत होत.

ते दोघांच्याही चेह-यावर तेच भाव पसरलेले.आजुबाजुचा वारा काहीक्षण व्हू-व्हू करत वाहू लागलेला, नी त्या वा-यात पसरलेली स्मशान शांतता चेटकीणी सारखी विकृतपणे नाचत होती, खिदळत-फिफीफी करत ह्सत होती.अंधाराच साम्राज्य चौही दिशेना अस काही पसरलेल ज्या अंधारात, मानवाला काळोख दिसत असतो , त्याच अंधारात काहीतरी विलक्षण व ह्या अखंड विज्ञानाला ही लाजवेल अस काहीतरी सरपटत, उड्या मारत राहाझगडच्या दिशेने येत होत.त्या दोघांच्याही डोक्यात नाना त-हेच्या तर्कांनी हल्लबोल केलेला-दोघेही त्या भीतीच्या छायेखाली तुडूंब बुडालेले की तोच एका घोडागाडीच्या आवाजाने ती स्मशान शांतता भंग पावली- समोरुन एक घोडागाडी आली आणि त्या दोघांपासुन थोड दुर थांबली ज्याने त्या दोघांचीही भीती काहीक्षण दुरावली गेली.घोडागाडीच दार उघडल , घोडागाडीतुन युवराज उतरले नी थेट दरवाज्याच्या दिशेने चालत आले, त्या दोन सैनिकांनी युवराजांना पाहुन भाला पुढे करत, डोक थोड पुढे सरकवल.परंतु युवराजांनी त्या दोघांकडे न पाहता ते थेट महालात घुसले.महालातला प्रथम भलामोठ्ठा हॉल रिकामाच होता.फ्क्त कंदिल, पेटलेले दिसत होते.त्या रिकाम्या हॉलकडे पाहून काहीक्षण थांबुन युवराज जिन्याच्या दिशेने निघाले की तोच युवराजांच्या कानांवर पाठिमागुन एक हाक ऐकु आली.

तसे ते मागे वळले , त्यांच्या नजरेस रुपवती दिसल्या.

" दादा साहेब!..कोणाला शोधत आहात ?" रुपवती म्हणाल्या

" तुम्ही अजुन जाग्या आहात? झोपला नाहीत?"

" अहो दादा साहेब तुमची वाट पाहत बसलो होतो आम्ही."

"आम्ही?..म्हंणजे!" युवराज न समजुन म्हणाले. तसे त्यांच्या ह्या वाक्यावर रुपवतीने सकाळपासुन ते आतपर्यंतची सर्व हकीकत त्यांना सांगितली.रुपवतींच्या तोंडून हे सर्व ऐकताच युवराजांचा चेहरा जरासा पडला गेला , जे बदल पाहुन रुपवती म्हणाल्या.

" काय झालंय दादा साहेब! तुम्हाला लग्न करायचं नाही का!" रुपवती काहीक्षण थांबून पुन्हा पुढे म्हणाल्या." की कोण्या मुलीवर तुमच प्रेम आहे, तसं काही असेल तर आम्हाला सांगा! वाटलस तर त्या विषयावर आम्ही स्व्त:हा बाबासाहेब आणि आईसाहेबांशी बोलु.!"रुपतींच्या तोंडून हे वाक्य ऐकताच, युवराजांच्या मनाला कस थंड जाणवल थोडा धीर आला, जणु काही जड ओझच मनावरुन हलक झालं असाव.युवराजांना आपल्या बाहिणीवर पुर्ण विश्वास होता-त्यांनी ते सर्व काही रुपवतींसमोर मांडल जे जे घडल कस घडल ते सर्व. तस्या काहीवेळाने ते सर्व ऐकुन रुपवती म्हणाल्या.

" काय ? ती गरोदर आहे?" रुपवती जराश्या विस्फारलेल्या नजरेनेच युवराजांकडे पाहत म्हणाल्या.युवराजांनी आपली मान खालीच घातली होती ते रुपवतीकडे पाहत सुद्धा नव्हते जणु त्यांना स्व्त:ची लाज वाटत असावी! रुपवतीने एकवेळ आपल्या दादासाहेबांकडे पाहिल-आणि हळुच पुढे सरसावल्या तिने त्यांच डोक आपल्या हाताने वर केल.

" जे झाल ते झाल दादासाहेब तुमच्याकडून जे घडल गेल, ते चुकीच आहे परंतु आता पुढचा विचार करायला हवा -होणा-या बाळाचा विचार करायला हवा -आम्ही लागलीच उद्याच्या उद्या सकाळीच बाबासाहेब आणि आईसाहेबांशी बोलतो."

" परंतु त्यांचा होकार असेल का? आणि जर का त्यांचा ह्या लग्नासाठी विरोध असेल तर आम्ही ही शपथ घेतो- की आम्ही मेघा सोडून कधीच दुस-या परस्त्री समवेत विवाह करणार नाही " युवराज त्याच अवस्थेत खाली मान घालुनच म्हणाले.

" त्यांची चिंता तुम्ही करु नका ते आम्ही पाहून घेऊ.! " रुपवती मंद स्मित हास्य करत म्हणाल्या. व ते दोघेही आप-आपल्या आरामखोलीत निघुन गेले.

□□□□□□□□□□□□□□□□□

एक-एक पाऊल वाढवत कुबड असल्याने पाठीत वाकत-वाकत भुरी द्रोहकाल जवळ पोहचली, त्या बिचारीच्या मनात ब्रश मिळेल ह्या हेतुन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

" दे..दें,...दें..! हिहिहियिहिहिह्यी.." एका लहान मुलासारख हात पसरवत, तर कधी विचीत्र हसत.. किन्न-या आवाजात बोलत भुरीने द्रोहकालच्या हातात असलेल्या त्या सोनेरी रंगाच्या ब्रशला हात लावला -आणि पुर्णत जोर लावून स्व्त:कडे ओढला.परंतु तो ब्रश काही केल्या हातात येत नव्हता जणु त्या सैतानाने घट्ट पकडून ठेवल असाव.

" अरे दें ना....माझां बरश..! आरे दे ना माझां बरश..!" भुरी लागो-लागो लाग एकच वाक्य उलटून बोलु लागली, परंतु त्या सैतानाने काही तो ब्रश सोडला नाही. उलट त्याने आपला दुसरा धार-धार नखांचा राखाडी रंगाचा हात जलद वेगाने पुढे वाढ़वुन थेट भुरीचा गळा आवळला आणि त्या कुबड्या भुरीला थेट अलगद एका हातानेच जमिनीवरुन एक फुटपर्यंत वर उचल्ल. त्या हातांची धार-धार नख मानेत रुतली , काळपट रक्त बाहेर पडु लागल आणि भुरीला श्वास न मिळाल्यामुळे तिचे हात पाय विशिष्ट प्रकारे हळू लागले.

" सोड मले सोड ! मले मारु नको..मले तुझ ब्रश नको..पन मले..सोड...!" भुरी जिवाच्या आकांताने ओरडून प्राणाची भिक मागु लागली, आणी तिच्या दयनीय अवस्थेवर तो सैतान मात्र हसू लागला

एक पाश्वी आनंद त्याला मिळु लागल. श्वास न मिळाल्याने भुरीने त्याच्या हातावर मारायला सुरुवात केली तसे त्याने तिला अलगद हवेत दूर हिबाळून दिल, तसे ती थेट दहा-बारा फुट मागे उडून त्या खोलीबाहेर येत त्या जाड-जुड फळीच्या दरवाज्यावर आदळली, दरवाजा त्या जोरदार धक्क्याने पुर्णत उघडला गेला. ती झाप त्या भुरीच्या कुबडावर बसतात तिच्या देहात एक भयंकर आर्तवेदना उमटली, नाका-तोंडातुन कालपट रक्त बाहेर पडू लागल. आपली वेळ आली आहे, आता सुटका निश्चित नाही ह्या सैतानाची शक्ति आपल्यापेक्षा बरीच वरचढ आहे हे भुरीला कळून चुकल होत, त्याच्याशी लढा देन अशक्य होत.शेवटी मदत केली,त्याचा पश्चात्ताप आणि क्रोध उफाळून वर आला.

" हरामखोर म्या तुझी मदंत केली..! आणि तु..माह्या विश्वासघात केलस..मलेच मारायला निघालोस हरामखोर..!" द्रोहकाल आतापर्यंत तिच्या जमिनीवर पडलेल्या देहाजवळ पोहचला होता, त्याने हळूच दोन्ही गुढघे वाकवले आणि गुढघ्यांवर बसला व पुढच्याक्षणाला तोंड वासल त्या तोंडातुन खालून आणि वरुन मिळुन अशे एकुण चार धार धार पांढरट दात बाहेर आले

" विश्वास. ! हा हा हा हा !" आपले धार-धार सुळ्या सारखे दात दाखवत आजुबजुला पाहत तो हसु लागला, त्या अंधारात ते घोगर हसु दुर-दुर पर्यंत गुंजू लागल..व काहीवेळ हसु थांबल्या नंतर तो पुढे म्हणाला

"" विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही मी - ! तुला जाणून घ्यायचंय कोण आहे मी.. ऐक तर ?"..नीच अंधकार आहे मी.

काळोख हा नेहमीच धोका देतो- तो काळोख आहे मी. वासनेने भरलेला स्व्त:च्या परिवारातल्या सदस्यांच शोषन करणारा वासनांधीश आहे मी! रक्ताची तहान भागवण्यासाठी स्व्त:च्या मातेचाही रक्त लुचणारा -रक्तपिपासु आहे मी! हजारो वर्ष जगुन राहत करोडो-अब्जाधीश प्राण हरण करणारा यमालाही घाबरवणारा-अंधकारराजक आहे मी. ह्या पृथ्वीतळावर पुन्हा एकदा माझ साम्राज्य पसरवण्यासाठी-ह्या पुथ्वीतळावर राज करायला आलेलो अंधकारराजक ड्रेक्युला आहे मी."

एकनी एक शब्दासरशी ते सुळ्या सारखे दात चमकत होते:न डोळ्यांत असलेले बुभळ, विस्तवासारखे तापले गेलेले.जणु क्रोध असाकाही उफाळून वर आलेला की शब्दांत वर्णन करने नाही. अचानक त्या सैतानाच रुप पालटू लागल- शरीरावरचा तो कोट तो सदरा-ती काळी पेंट सर्वकाही फाटल , आणी तिथे एक भयानक सैतान तैयार झाला. मानवा ऐवढ वटवाघळुच केसाल डोक, लांब मोठे सशासारखे काळे टोकदार कान , लाल रक्त उतरुन निखा-यांसारखे रागाने वटारलेले डोळे,जे पाहताच भुरीला आपला मृत्यु दिसला परंतु अस भयंकर मृत्यु येईल अस स्वपनात ही विचार केला नव्हता तीने , त्या सैतानाचा जबडा रक्ताच्या लालसेने वासलेलाच होता त्या जबड्यातुन त्या सैतानाचे सुळ्यासारखे चार धार धार दात दिसत होते.खालच शरीर हात-पाय- सर्व काही बलदंड फुगीर शक्तिधारक असुन त्यावर काळ्या रंगाचे केस उगवलेले,! शेवटी त्या सैतानाने अति क्रोधहिंत पणामुळे आपला रुप बदल्ल होत.पुढच्याक्षणाला त्याने वर पाहत तोंडातुन एक भलीमोठ्ठि मेघगर्जना केली आणि आपल पुर्णत शरीर भुरीच्या दिशेने खाली झेपावुन दिल -तसा भुरीच्या तोंडून एक शेवटची आर्तकिंकाळी बाहेर पडली-! काहीवेळातच हाड मांस रक्त लुचून झाल्यावर शेवटी भुरीचा लाल रक्ताच्या थेंबांनी माखलेला हाडांचा सापळा काय तो तिथे शिल्लक राहिला. तसे तो अभद्र आकार रुप धारण केलेला सैतान जागेवर उभा राहिला.त्याच ते तोंड रक्ताने माखल होत, आणी त्या सुळ्यासारख्या दातांत भुरीच धड-धड करणार ह्दय होत.जे की त्याने समोर पाहतच कच्चकन चावल.आणि तोंडावाटे एक शब्द बाहेर काढला मेनका.-"

तसे त्या सैतानाच्या मेंदूची एक तार छेडली गेली, रागाने चमकणारे लाल डोळे आता निळ्या प्रकाशाने चमकुन निघाले, व त्या चमकणा-या दोन निळ्या डोळ्यांत त्याला राझगडची युवराज्ञी रुपवती दिसली.

" मी येतोय राहाजगड वासीयांनो तुम्हा सर्वांसमवेत रक्तमांसाची होळी खेळायला !" त्या सैतानाच्या मुखातुन आवाज निघाला, आणी त्याचवेळेस आकाशात ब्रम्हास्त्र फुटाव्या तश्या विजा कडाडल्या जाऊ लागल्या,आणी त्या आवाजाने समंद आसमंत दणाणुन निघाल.

 

क्रमश.: