Bhaybhit - 1 in Marathi Horror Stories by Ankit Bhaskar books and stories PDF | भयभीत - 1

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

भयभीत - 1

भयभीत

 


लेखक :- अंकित भास्कर

 

 

" हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....?"
                    ' तिच्या ' मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनवर एका अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत ' ती ' म्हणाली.
" तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. "
     " हा...! कोण बोलताय आपण.....? आई कुठे आहे.......? काय झालंय तिला......? "
      समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ' ती ' आश्चर्याने विचारू लागली.
" हे बघा, तुमच्या आईकडे वेळ खूप कमी आहे आताच डॉक्टर सांगून गेलेत. मी पत्ता मेसेज करतोय तुम्ही लवकर या "
" पण........ "
         बोलतच तिच्या हातात असलेल्या मोबाइलचा कॉल कट झाला. समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ती जवळच्या भिंतीचा आधार घेत खालीच बसली. तिच्या हातात असलेला मोबाईल खाली जमिनीवर आदळला. समोर एक अनोळखी व्यक्ती तिच्या आईची अवस्था दुरावल्याची सांगत होता. डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत न्हवते. खरतर ती एका अनोळखी शहरात आपल्या १२ बाय ८ च्या खोलीत एकटीच राहायची.  घरची आर्थिक परिस्थिती दुरावल्याने कॉलेज सोबत एक छोटीसी  जॉब करायची. एका अनोळखी शहरात अनोळखी ठिकाणी अनोळखी रूममध्ये एकटेच राहण हे तिच्यासाठी खूप नवीन होते. घरात फक्त ती व तिची आई हे दोघेच होते. कॉलेजचा पहिला महिना असल्या कारणाने ती आपल्या आईला सोबतीला आणू सकली न्हवती. तिची ही अवस्था ऐकून तिला रहाऊन राहत न्हवत. आपल्या रुमच्या एका कोपऱ्यात तीच रडण मुसमुसन सुरू झालं होत. काही क्षणात तिच्या मोबाइलच्या नोटिफिकेशन ट्यून ने तिचा लक्ष वेधून घेतलं. तशी ती थोडी भानावर आली. पांढऱ्या रंगाच्या बल्बच्या प्रकश्यात पूर्ण रूम पांढऱ्या रंगाच्या भिंतीने आणखीनच गडद वाटत होत. रूमच्या एकीकडे एक लाकडी कपाट, एक छोटंसं बेड, बाजूला असलेल्या टेबलावरील प्लॅस्टिकच्या भांड्यात असलेल्या फळांच्या बाजूला चकाकत असलेला प्यूर स्टेनलेस स्टीलचा चाकू जे बल्बचा उजेडात चमचम करत लकाकात होता. पण तिला ह्या कोणत्याच गोष्टीचा भान न्हवता. भान होता तो फक्त मोबाईलवर आलेल्या त्या बातमीचा.. मोबाइलचा पासवर्ड खोलून नोटीफिकेशन बघितल तर एक मेसेज तिथं आलेला. मेसेज वाचून आपल्या मैत्रिणीला कॉल केलं. तीन रींगच्या नंतर समोरून एक आवाज आला.
" हॅलो.. हा बोल ग ह्या वेळेला का बर कॉल केली सगळे झोपले आहेत. वेळ बघितली आहेस काय..? रात्रीचे दिढ वाजलेत. ह्या वेळेला काय झालं..? "
" अग माझ्या आईची तब्येत बरी नाही म्हणून मला कॉल आला होता. तू प्लीज माझ्या रूमवर येऊ शकते काय..? मला काय करावं हे समजत नाही आहे.. प्लीज ये न.."
" थोड नीट सांगशील का काय झालं ते...?"
" तू प्लीज ये न मला खूप भीती वाटायला लागली आहे.."
" भीती आणि तुला .... कधीपासून.....?"
मस्करीच्या स्वरात आलेल्या आवाजाला उत्तरत ती समोर बोलू लागली.
" प्लीज तू लवकर ये खरंच भीती वाटायला लागली आहे.."
" हम्म... ठीक आहे घरून निघतांना कॉल करते ठीक आहे...."
इतकं बोलून कॉल कट झाला. तशी तिची नजर पूर्ण रुमभर फिरू लागली. एक अनामिक भीतीने तिच्या मनात घर केलेलं. भीती... भीती कसली हे पण तिच्या समजण्या पलीकडचे झालेले. अचानक रूमचा बल्ब चरचर करत खाडकन फुटला. तस लकाकणाऱ्या रूममध्ये काळोख पसरला. सगळ काही शांत झालं होत. त्या भयाण शांततेत तिची वाढत चालणारी काळजाची धडधड मात्र तिला स्पष्ट ऐकू येत होती. भीतीने घश्याला कोरड पडलेली. अशातच  ती पाणी पिण्यासाठी किचनकडे जाण्यासाठी वडली. रूममध्ये भयाण काळोख पसरलेला असल्या कारणाने बाजूच्या लाकडी टेबलावर असलेल्या माचीसची काडी उगारली  तशी ती जागेवरच स्तब्ध झाली. समोरच दृश्य बघून काळीज जोरजोरात धडधडू लागलं. एक काळीकुट्ट मानवी आकृती तिच्या समोर येऊन कुठेतरी काळोखात नाहीशी झाली. हातात पेटत असलेल्या कडीच्या फिक्कट नारंगी उजेडात ती मानवी आकृती स्पष्ट दिसत होती. तिचे लाल तांबूस रंगाचे डोळे माचीसच्या काडीच्या त्या  फिक्कट नारंगी उजेडात आणखीनच गडद वाटत होते. तो दृश्य बघून ती दोन पाऊल मागेच सरकली. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी रूमची बेल वाजवली. तशी तिची भीती आणखीनच जोर पकडू लागली. तशी पुन्हा एकदा बेल वाजली. आता ती हळूहळू रूमचा दरवाज्याकडे निघाली. हळूच दार उघडल तर तिची मैत्रीण तिथं आलेली. तिला बघताच ' ती ' तिला कवटालीच. अश्रूंचा वर्षाव सुरू झाला.
" काय झालंय..? इतकी काय घाबरली आहे...? "
" आई.........."
          धमसून रडत आपली परीस्थिती सांगत होती. तिला पकडताच तिची मैत्रीण रूमचा आत आली. ' सिमाच्या ' घशाला कोरड पडल्याकारणाने ती आपल्या मैत्रिणीचा हात सोडत आत किचन मध्ये गेली थोडंसं पाण्याचा घोट घेत मागे बघितल तर तिची मैत्रीण कुठेच दिसत नव्हती. तिला शोधत ती दरवाज्याच्या दिशेने निघाली तोच बाजूच्या मोबाईलची रिंग झाली. मोबाईलकडे लक्ष करत तिने कॉल रिसिव्ह केला. तस समोरून आवाज आला.
" हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? "

 


समाप्त

 

संपर्क - bhaskarankit157@gmail.com

किंव्हा 

What's app :- 7767883042

 

कथा कशी वाटली आणि कथेत काही सूचना असतील तर नक्की कळवा. 😊