A Trip to the Sanctuary - Part 3 in Marathi Thriller by Dilip Bhide books and stories PDF | अभयारण्याची सहल - भाग ३

Featured Books
  • ऋषि की शक्ति

    ऋषि की शक्ति एक बार एक ऋषि जंगल में रहते थे। वह बहुत शक्तिशा...

  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

Categories
Share

अभयारण्याची सहल - भाग ३

अभयारण्याची सहल 

भाग ३

भाग २  वरुन पुढे वाचा....

संदीप ज्या झुडपात पडला होता ते निवडुंगाचं बेट होतं आणि त्याच्या शरीरात काटे  घुसले होते. चेहऱ्यावर सुद्धा काटे रूतले होते. पंज्याच्या फटकार्‍याने संदीपचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, पण संदीपला त्या वेळी काहीच जाणवलं नाही आणि ती वेळ काट्यांची पर्वा  करत बसण्याची नव्हती. त्यानी आता खाली पडलेली काठी उचलली आणि पुन्हा एक उरल्या सुरल्या शक्तिनिशी जबरदस्त प्रहार वाघाच्या जबड्या वर केला.

वाघ मागे सरकला पण जाता जाता त्याने पंजा मारलाच. संदीप च्या चेहऱ्या वरून आता रक्ताच्या धारा वाहत होत्या. डोळ्यात, नाकात  रक्त गेलं होतं त्यामुळे त्याला काही दिसेना. हातानेच त्याने चेहऱ्यावरचे रक्त पुसले. वाघ आता थोडा दूर जाऊन बसला होता. पोजिशन अशी होती की संदीप आणि शलाका एका बाजूला आणि कार दुसऱ्या बाजूला आणि दोन्ही च्या मध्ये वाघ होता त्यामुळे त्यांना जागाही सोडता येईना. दोन्ही पार्ट्या आता एकमेकांच्या मुव्हमेंट कडे लक्ष देवून बघत होत्या.

वाघाच्या डरकाळ्या आणि सतत वाजणारा हॉर्न, तिन्ही शोध कर्त्या पार्ट्या नी ऐकल्या होत्या. ते लोक धावतच तिथे येऊन पोहोचले. सगळा प्रकार पाहिल्यावर त्यांनी हातातले रिकामे डबे वाजवायला सुरवात केली. एकदमच आवाजाचा गोंधळ सुरू झाला. वाघाला काही ते आवडलं नाही, त्यांनी एकदा सावजा कडे पाहीलं, मग जी जनता मोठा आवाज करत त्याच्या रोखाने येत होती त्यांच्या कडे पाहीलं आणि मग त्यानी जंगलाकडे मोर्चा वळवून झेप घेतली आणि दिसेनासा झाला. वाघ पळून गेला.

सुरक्षा रक्षक आलेले दिसल्यावर संदीप चं गोळा केलेलं सर्व अवसान गळून गेलं. त्याची शुद्ध हरपली. शशांक आणि नलिनी आधीच खूप घाबरले होते, त्यांचं  सुद्धा अवसान सुटलं आणि ते पण बेशुद्ध झाले. एकटी शलाकाच तेवढी, अजून सावध  होती. तिनेच सर्व माहिती लोकांना दिली.

अॅम्ब्युलन्स बोलावून संदीपला चंद्रपूरच्या सिविल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं. आणि तिथे प्रथमोपचार केल्या नंतर त्यांच्याच सल्ल्याने नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलं.

मेडिकल मधे, आता संदीप चे आई वडील पण आले होते. संदीपला स्पेशल रूम मध्ये ठेवलं होतं. संदीपला अजून शुद्ध आली नव्हती म्हणून सगळेच काळजीत होते. पण डॉक्टरांनी दिलासा दिला. रक्तस्त्राव बराच झाला आहे आणि अशक्त पणा पण त्यामुळे फार आहे. परत वाघाशी सरळ सामना झाल्यामुळे जबरदस्त शॉक पण बसला असण्याची शक्यता आहे. तेंव्हा काळजी करू नका थोडी वाट बघू.

शलाका सुरवातीपासून त्यांच्या बरोबरच होती. त्याला स्पेशल रूम मध्ये हलवल्यावर तिने सगळ्यांना सांगून टाकलं की तीच रूम मध्ये राहून त्याची काळजी घेणार. सगळ्यांनी तिला  बरंच समजावलं की आता त्यांचे आई वडील आले आहेत तेंव्हा ते लोक काळजी घेतील. संदीप ची आई म्हणाली की

“मुलगा अॅडमिट असतांना मी घरी कशी राहू? माझं चित्त थाऱ्यावर राहणार नाही.”

पण शलाका नी  त्यांना पटवून दिलं की, तिच्या रक्षणासाठी त्यानी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली होती तेंव्हा आता त्याला जरूर असतांना ती इथून हलणं शक्यच नाही. तिच्या निर्धारा पुढे सगळ्यांनाच हार मानावी लागली. शशांक नी सुद्धा सांगून पाहिलं पण शेवटी त्याला सुद्धा तिचं म्हणण ऐकावं लागलं. आता संदीप चे  आई वडील सकाळी 10 वाजे पर्यन्त येऊन शलाका ला रीलीव करतील, आणि संध्याकाळी सहा सात वाजे पर्यन्त थांबतील आणि संध्याकाळी शलाका येईल आणि ती सकाळी दहा वाजे पर्यन्त थांबेल असं ठरलं. संदीप च्या आईला तिचं कौतुकच वाटलं. दोन तीन दिवसांत तिच्या बरोबर भरपूर गप्पा झाल्या होत्या, कारण शलाका संध्याकाळी चार पांच वाजे पर्यन्त येऊन जायची.  संदीपच्या आइनी तिला विचारलं सुद्धा की

“एवढ्या लवकर कशाला येतेस, चांगली 2-3 तास झोप काढून यायचं.”

तर शलाका म्हणाली की, “घरी माझी फार घालमेल होते हो. मन थाऱ्यावर

नसतं. इथे आल्यावर जरा शांत वाटतं. पेशंट आपल्या समोर असला की बरं वाटतं.”

त्यावर संदीपच्या आईनी मान डोलावली. म्हणाली “खरं आहे ग बाई, घरी खरंच मन लागत नाही.”

असंच बोलता बोलता शलाकांनी मधेच केंव्हा तरी संदीपच्या आईला विचारलं की “बाकी सगळे आले पण संदीपची बायको कशी नाही आली ते?”

“अग त्याचं लग्नच झालेलं नाहीये अजून. वेळ आहे. पण ते जाऊ दे. तू घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार होतीस तेंव्हा नेमकं काय घडलं ते सविस्तर सांग, आम्हाला फार उत्सुकता आहे. अगदी सगळं सांग.” – संदीप ची आई.

मग शलाका नी, तिला पाठीशी घालून संदीप नी एका हाती वाघाशी कसा लढा दिला याचं चक्षु:वैसत्यम म्हणजे आखों देखा हाल, रनिंग कॉमेंटरी असं इत्थंभूत वर्णन केलं. एक एक अगदी बारीक सारिक गोष्टींचं वर्णन केलं. संदीपच्या आई, बाबांचा उर अभिमानाने भरून आला. आणि हे सांगताना शलाका चे डोळे पण असे काही चमकत होते की त्याचा अर्थ सर्वांच्याच लक्षात यावा. पण हे पाहून शशांक मात्र थोडा अस्वस्थ झाला. तो घरी गेल्यावर नलिनीला म्हणाला सुद्धा

“नले, तुझ्या काही लक्षात येतेय का? शलाका बहुधा संदीप मध्ये गुंतत चालली आहे.”

“अहो, स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तीचं रक्षण केलेय त्यानी. कृतज्ञतेची भावना आहे. अजून काही नाही. तो बरा झाल्यावर सगळं पुन्हा नॉर्मल होईल. तुम्ही उगाच काळजी नका करू.” – नलिनी.  

“अग पण रात्री सुद्धा शलाका त्याच्या रूम मधे राहतेय.” – शशांक

“मग? अहो हॉस्पिटल आहे ते, हॉटेल ची रूम नाही.” नलिनी म्हणाली. “उगाच काही शंका कुशंका काढू नका. अहो उपकाराची परतफेड नावाची काही चीज असते की नाही? करू दे तिला तिच्या मनासारखे. तिचं समाधान होऊ दे. प्रत्यक्ष मृत्यूला सामोरी जाऊन परत आली आहे ती. तिच्या विचारात आमूलाग्र बदल झाला आहे.”

“तसं बरोबरच आहे तुझं. विचारात खरंच बदल जाणवतो आहे. ठीक आहे. चालू द्या.” – शशांकने माघार घेतली.

पाचव्या दिवशी रात्री, संदीपला शुद्ध आली. त्यांनी डोळे उघडले. पण त्याला काहीच बोध होईना. त्याला शुद्ध आलेली पाहून शलाका बेड जवळ गेली. पण तो पर्यन्त संदीपनी थकून परत डोळे मिटले होते. शलाका नर्सेस डेस्क वर गेली आणि तिने मेट्रन ला माहिती दिली. ती लगबगीने आली आणि संदीपला तपासलं. पांच मिनिटं थांबली आणि शलाकाला म्हणाली की सर्व ठीक आहे लवकरच शुद्धीवर येतील. पुन्हा जाग  येईल तेंव्हा लगेच सांगा.

दोन एक तासांनी सांदीपला पुन्हा जाग आली. त्यांनी कुशी वर वळण्याचा प्रयत्न केला पण वेदना होत होत्या, मग त्याला सलाईन लावलेलं दिसलं. तो विचार करत होता मग त्याला हळू हळू आठवायला लागलं. त्याच्या लक्षात आलं की तो हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून. तो पर्यन्त शलाका बेड जवळ पोचली होती.

“कसं वाटतंय आता?” शलाकाने  विचारले.

संदीप तिच्याकडे बघून क्षीण हसला.

“मी आलेच” असं म्हणून शलाका मेट्र्न ला सांगायला गेली.

संदीप विचार करत होता की, ‘हॉस्पिटल मध्ये सहसा केरळी किंवा अँग्लो इंडियन नर्सेस असतात. मग मराठी नर्स कुठून आली? आणि गंमत म्हणजे तिच्या अंगावर त्यांचा टिपिकल पोशाख पण नाहीये. काय भानगड आहे? आणि एकदम गेली कुठे? मला पाणी हवय पण ही गायब. खरं म्हणजे इथे आईने असायला हवं होतं. आई, बाबांना कुणी कळवलं नाही की काय? पण असं कसं होईल सर्व मित्रांना त्याचं घर माहीत होतं. अरे, पण मित्रां पैकी सुद्धा कोणी दिसत नाहीये. काय गौड बंगाल आहे कळत नाही.’

तेवढ्यात शलाका आणि मेट्रन रूम मध्ये आल्या.

“कैसा लग रहा है बेटा? अच्छा हैं ना?” मेट्रन नी विचारपूस केली.

संदीप नुसताच हसला आणि मान हलवली.

BP, पल्स, मोजून झाल्यावर मेट्रन, आराम करो असं सांगून चालली गेली. आता खोलीत फक्त संदीप आणि शलाका.

“खूप कोरड पडली आहे जरा पाणी देता का?” – संदीप.

“हो देते ना. अरे बापरे थांबा, विचारून येते.” – शलाका.  

“कोणाला?” – संदीप.

“मेट्रन ला.” आणि असं म्हणून ती पळाली. पांच मिनिटांनी वापस आली. म्हणाली, “चालेल म्हणताहेत. चहा, दूध सुद्धा द्यायला हरकत नाही असं म्हणाली मेट्रन.”

मग शलाका ने  त्याला चमच्याने थोडं पाणी पाजलं.

“अहो असं चमच्याने का देता आहात? भांडं द्या नं.” संदीप म्हणाला.

“अहो तुम्हाला उठता येणार नाही. आणि झोपून भांड्याने पाणी पिता येणार नाही. ठसका लागला तर प्रॉब्लेम होईल.” – शलाकाने उत्तर दिल.  

संदीप ने थोडी हालचाल केली पण तेवढ्याने सुद्धा त्याला वेदना झाल्या.

“मला काय झालय ?” संदीपने विचारले.

 

क्रमश:.....

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.