G.. Ganveshacha - 4 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | ग...गणवेशाचा - भाग ४

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

ग...गणवेशाचा - भाग ४

ग…गणवेशाचा भाग ४

मागील भागावरून पुढे…




रखमाला एका शाळेचं आंगण जाण्याचं काम आहे असं कळलं तेव्हा रखमाने मुन्नीला बरोबर घेऊन जायचं ठरवलं.

दोन्ही लहान मुलांना आज्याला सांभाळायला सांगीतलं.

" राणे तू रोजच्या कामावर कधी जाशील?"

" हे साळचं काम झालं की जाईन." रखमा म्हणाली.


"साळेचं काम लवकर झालं नाही मंजी! त्यापेक्सा तू ऊद्या सांगून दे का परवा कामाले न्हाई येनार. तू सुट्टीचं घेत नाय कदी. एखांदी घेतली तर का होते!"

रखमालापण आज्याचं म्हणणं पटलं. ती कामाला निघाली. कामावर गेलं की ऊद्या येणार नाही म्हणून सांगायचं हे तिनी मनाशी पक्कं ठरवलं.



****



सकाळी सकाळी रखमा आणि मुन्नी दोघी शाळेकडे निघाल्या. एवढ्या सकाळी कामाला जायचं मुन्नीच्या जीवावर आलं होतं. पण शाळेच्या ओढीनी ती रखमा बरोबर निघाली होती. शाळेच्या जवळ आल्यावर मुलांचा गोंधळ तिच्या कानावर आला तसे तिचे डोळे चमकले. शाळेच्या आवारात शिरताच तिचे डोळे भीरभीरत सगळीकडे बघू लागले.



गणवेश घातलेल्या मुलामुलींकडे ती हरखून बघू लागली. रखमा त्या शिक्षीकेला भेटून कामाचं विचारत होती. ती शिक्षीका तिला समजाऊन सांगत होती पण मुन्नी मात्र वेगळ्या जगात शिरली होती. ती आपण इथे का आलो हेच विसरली होती. रखमाने तिचा दंड धरून हलवलं तेव्हा ती भानावर आली.



"चाल ग लवकर लवकर झाड. काय बघतीस इतकं त्या पोरांकडं?" रखमा


"माय मले बी वाटे की असा साळंचा झगा घालावा.तेंच्यासारखं साळत जावं" मुन्नी अजून तंद्रीत होती. रखमाला तिचं मन कळलं. ती हळूच तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाली,


"मले कळते ग तुझी इच्छा.पर म्यां तरी काय करू. एवड काम करते पन पैका नाय उरत.अन् तुझा बाप समदा पैका दारूत उडवते.कसं घालू तुले साळंत? चाल काम सुरू कर."



दोघीजणी झाडू लागल्या. मुन्नीचं मधूनमधून लक्ष त्या मुलांकडेच जात होतं तसं झालं की झाडायचं थांबवून ती मुलांकडे बघत बसे. रखमाचं लक्ष गेलं


रखमाने शाळेचं अर्धअधिक पटांगण भरभर झाडून काढलं पण मुन्नीला आंगणाचा जो भाग झाडायला दिला होता तो तिने अर्धापण झाडला नव्हता. " रखमा …" शिक्षीका


" जी मॅडम." रखमा



"अगं आंगण झाडायला तू तुझ्या मुलीला आणलेस बरोबर पण ती झाडत नाही नुसतीच उभी आहे?"


शिक्षीकेने असं म्हणताच रखमाचं लक्ष मुन्नी कडे गेलं. मुलं मुली शाळेच्या बगीच्यात मनसोक्त खेळत होते. मुन्नी त्यांचं खेळणं भान विसरून बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकू लागला जणूकाही कुठला खजीना मुन्नीच्या हाती लागला होता.



" मॅडम माझ्या मुलीला साळा लई आवडते.ती त्या मुलांकडेच बघत हाय. मी झाडून टाकते ते आंगण. माफी करा मॅडम " रखमा शिक्षीकेला म्हणाली.


" अगं माफी कशाला सांगतेस. मुन्नी त्या मुलांकडे बघतेय म्हणजे काही गुन्हा नाही केला तिने. तिला शाळा आवडते ही गोष्ट किती महत्वाची आहे.लक्षात येतय का तुझ्या?" शिक्षीका



" व्हय मॅडम.पन साळंत नाय माझ्या मुलीला पाठवता येणार. पैसे लागते. थे नाय जी आमच्याजवळ." रखमाच्या आवाजातील निराशा बघून शिक्षीका म्हणाली,


" एवढी निराश नको होऊ.एकदा निवांत ये भेटायला.मी सांगीन तुला सगळं"


" जी." शिक्षीका निघून गेल्यावर रखमा मुन्नी जवळ गेली. मुन्नी हातात झाडू घेऊन त्या खेळणा-या मुलांकडेच बघत होती. रखमाने तिच्या हातून झाडू घेतला तरी तिला कळलं नाही



रखमा मुन्नी कडे बघत होती. मुन्नीचा आनंदाने डवरलेला चेहरा बघून रखमाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या मनात आलं मुन्नीला शिकण्याची आवड आहे पण आपलीच ऐपत ठेवली नाही.


देवानं त्यात नवरा पण दारूडा दिला. यात पैसे वाचवणं जमायची नाही उलट रोजचा दिवस मुलांच्या पोटात चार घास कसे घालायचे हा प्रश्न रखमाच्या मनाला जाळत असे. मुन्नीला शिकवावं असं रखमाला वाटलं तरी कसं शिकवणार? रखमाचं झाडणं झाल्यावर ती शिक्षिकेकडे पैसे घ्यायला गेली. नियमानुसार तिला शंभर रुपये मिळणार होते.शिक्षीकेने तिला दिडशे रुपये दिले. ते बघून रखमा म्हणाली


" मॅडम पन्नास रुपये जादा दिले."


" रखमा हे पन्नास रुपये मुन्नी चे आहेत."


" मॅडम पन तिने काम नाही केलं. फुकट पैसे नको." रखमा


"तुझा प्रामाणिक पणा मला आवडला. मुन्नीला शाळेत जावसं वाटतंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे पैसे मी देते आहे. हे पैसे शाळेचे नाहीत.तिच्या डोळ्यातलं शाळेचं स्वप्न विरून जाऊ देऊ नको. ही तुझी जबाबदारी आहे.जेव्हा तुला वाटेल तू ये माझ्याकडे मी सागेन.


" शिक्षीका " व्हय मॅडम." रखमाने पैसे घेतले आणि निघाली


मुन्नी अजूनही मुलांचे खेळ बघत होती.तेवढ्यात बेल वाजली आणि सगळी मुलं आपापल्या वर्गात गेली.मुन्नीचा चेहरा पार ऊतरला. तेवढ्यात तिथे रखमा पोचली.


" चाल व घरी." रखमा मुन्नीला म्हणाली.


" माय किती बेस लागत होतं ते पोरं खेळे तवा." मुन्नी


" हो. मले बी बेस वाटलं.पन तुले नाय साळंत पाठवू शकत. तू घरी दोघांना सांभाळती तवा म्यॅ जाते नं कामाला. तू साळंत गेली तर कसं व्हईन?" रखमा म्हणाली.


रखमाच्या या बोलण्यावर मुन्नीने नाईलाजाने होकारार्थी मान हलवली.


रखमाने आत्ता शिक्षीकेने सांगीतलेली गोष्ट मुद्दामच मुन्नीला सांगितलं नाही.जे झेपणार नाही ते स्वप्न का दाखवावे पोरीला असं रखमाला वाटलं.


****


घरी जाताना मुन्नी कितीदा तरी मागे वळून बघत होती. एकदा एका सायकल वाल्याला धडकली तेव्हा रखमा तिच्यावर ओरडली.


" ए भयताडपना नको करू. सीधी चाल.थे साळेकड पाहू पाहू चालू नग." रखमाच्या ओरडण्याने मुन्नी ने नाईलाजाने शाळेकडे बघणं बंद केलं.


दिवसेंदिवस तिच्या डोळ्यात शाळेचं स्वप्न घट्ट रूजून बसू लागलं. तिला क्षणभरही शाळेत शिवाय करमेना. शाळेत काय शिकवतात? ती कोणती पुस्तकं आहेत? याची तिला काहीही माहिती नव्हती तरी शाळेचा गणवेश, पुस्तकं, दप्तर हे तिच्या साठी आनंदाचं देणं झालं असल्याने तिला बसता उठता डोळ्यात शाळाच दिसायची.



रस्त्याने जाताना मुन्नी रखमाशी अजीबात बोलत नव्हती. शाळेत तिला फार वेळ थांबता आलं नव्हतं म्हणून तिला वाईट वाटलं. तिच्या घराजवळून जाणारी शाळेतील मुलं पण आज तिला दिसणार नव्हती. याचही तिला वाईट वाटलं.


" मुन्नी राग आला का तुले?"

आईची माया वेडी असते हेच खरं. खूप वेळ मुन्नी बोलली नाही म्हणून रखमाला राहवलं नाही. तिने तिच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं.


"मुन्नी मले कळते तुले का म्हनायचं हाय.पन मी का करू शकते ग? पैसे नाय भेटत तेवडे."


मुन्नी ने रखमाकडे वळून पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. ते पाणी बघून रखमाचा जीव अजून गलबला.


" माय म्हंजी मला कधीच साळत जायला भेटणार नाय?" मुन्नी


" भेटेल मुन्नी. आपून वाट बघायची. आपून पैसे जमवू." रखमा मुन्नीचा मूड चांगला व्हावा म्हणून तिला खोटा दिलासा देत होती.


" माय. मी तुज्यासारखं काम करते.मंग खूप पैसे जमेल मंग मी साळत जाईन." हे वाक्य बोलताना मुन्नी चे डोळे चमकत होते.


" नाय मुन्नी तू काय नाय करनार. तुले साळत जाऊ वाटतं नं मंग काम नाय करायचं." रखमा


"नाय करनार काम.पन मले साळत जायला भेटेल नं?"


मुन्नीच्या या प्रश्नावर रखमाने नजर चोरतच "हो."म्हटलं.


मुन्नी आनंदाने झपझप घरी जायला ‌निघाली.


____________________________

क्रमशः ग…गणवेशाचा

लेखिका.. मीनाक्षी वैद्य

_