“हरि पाठ” 2 १०
स्वहिताकारणें संगती साधूची
। भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥
हरि तेथें संत संत तेथें हरी
। ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे
। तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष
। वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥
वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी
। एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
११
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया ।
आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण
निर्गुण हरिपायीं ॥२॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी
। गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी
। अभिमानियांसी नर्कवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी
। एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
हरि बोला एकांतीं
हरि बोला लोकांतीं । देहत्यागांतीं हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां
। उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं
। एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१५
एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच
। छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव
। मायोपाधी शिव बोलिजेति ॥२॥
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग
। सिंधु तो अभंग नेणें हरी ॥३॥
शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे
। रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्र\-क्षेत्रज्ञातें जाणताती
ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
अर्थाविण पोथी
वाचुनी काय ॥२॥
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव
। भावावीण देव कैसा पावे ॥३॥
अनुतापेवीण भाव कैसा राहे
। अनुभवें पाहें शोधूनियां ॥४॥
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी
। एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
१९
परिमळ गेलिया वोस फुल देठीं
। आयुष्या शेवटीं देह तैसा ॥१॥
घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून
किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊन सावध । कांहीं
तरी बोध करीं मना ॥३॥
एक तास उरला खट्वांग रायासी
। भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरि तयाला साधनीं । एका
जनार्दनीं हरि बोला ॥५॥
या रे या रे धरूं
हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाहीं ॥३॥
साधुसंत गेले आनंदीं राहिले
। हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनीं मांडिलें दुकान
। देतो मोलावीण सर्व वस्तु ॥५॥
२३
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी
चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा
। पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज
मोकलील ऐसें नाहीं ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहें
। कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपें
त्याचा नाश झाला ॥५॥
२४
दुर्बळाची कन्या समर्थाने केली
। अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
हरिकृपा होतां भक्तां निघती दोंदें
। नाचती स्वानंदें हरिरंगीं ॥२॥
देव भक्त दोन्ही एकरूप झाले
। मुळींच संचलें जैसें तैसें ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती
। ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनीं कल्पेंची मुराला
। तोचि झाला ब्रह्मरूप ॥५॥
२५
मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष
। तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें
। व्यापकें भारले तोचि हरि ॥२॥
कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झाले
। हरिपाठीं आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय
। हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणें येथूनी । एका
जनार्दनीं हरि बोला ॥५॥
अमृतमय ॥२॥
धन्य त्याचें कुळ सदा पैं सुफळ
। दिननिशीं पळ रामनाम ॥३॥
नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम
। वाचेसी सुगम रामनाम ॥४॥
५
सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदी
कळिकाळ शास्त्र सांगे ॥१॥
ब्रह्मांडनायक ऐसें जें कौतुक
। तेंचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें ॥२॥
आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा
। परिपूर्ण सरिता अमृताची ॥३॥
नामा म्हणे अनंत कां करिशी संकेत
। उद्धरिले पतित युगायुगीं ॥४॥
६
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो
उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥१॥
नारायण नारायण हेंचि पारायण
। उद्धरले जन इहलोकीं ॥२॥
तुटती यातना कर्माच्या भावना
। जडजीवउद्धारणा नाम स्मरा ॥३॥
नामा म्हणे राम हा जप परम । न
लगती नेम नाना कोटी ॥४॥