Bavra Mann - 16 in Marathi Love Stories by Vaishu Mahajan books and stories PDF | बावरा मन - 16 - Lucky You.....

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

बावरा मन - 16 - Lucky You.....

निंबाळकर घरी पोहचतात... त्यांच्या मागे पुरोहित फॅमिली देखील येते...

" काय झालं.. सगळ्यांना अचानक का बोलावल आहे..." यशवंत

" आम्हांला पण माहित नाही... आम्हांला वंशचा कॉल आला कि इथे या..." मनीष

" तुम्ही बसा ना... रुचिका पाणी आण..." रोहिणी

रुचिका आणि सिया चहा पाणी बघायला जातात...

नक्की काय झालय कोणाला काही कळत नव्हतं... त्यामुळे सगळेच अस्वस्थ होते...

" विराज अरे एकदा त्यांना कॉल करून बघ ना..." समीर

" हो काका..." विराज मोबाइल काढतो...

तितक्यात वंशची एन्ट्री होते...

" राहू देत... आले वंश..." राजमाता विराजला थांबवतात...

" बसा... सिया पाणी..." मंजिरी सियाला बोलतात... सिया त्याला पाणी देते...

" काय झालं वंश... तुम्ही सगळ्यांना घाईत इथे का बोलावल..." संजना अखेर सगळ्यांच्या मनातला प्रश्न करतात...

" सांगतो आत्या साहेब..." वंश

" रिद्धींचा एक्सिडेंट ज्या ट्रकने झाला होता... तो ट्रक ड्रायव्हर सापडला आहे..." वंश उसासा टाकत बोलतो....

" काही सांगितल का त्याने... कोणी सांगितल त्याला..." विराज लगेंच त्याला विचारतो...

" त्याला रॉकी नावाच्या contract killer ने पैसे दिले होते या कामासाठी..." वंश

" आणि त्या रॉकीला कोणी सांगितलं..." अंकित ना राहून विचारतो...

" सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा... पण मी एवढ्या सहजासहजी कोणालाही सोडणार नाही... कितीही जवळची व्यक्ती असली तरी..." वंश शांतपणे बोलत असला तरी त्याच्या आवाजात जरब होती...

जवळची व्यक्ती ऐकून निंबाळकरांना आता काळजी वाटू लागली होती... जवळच्या कोणी जर हे केलं असेल तर कसं फेस करावं हा गहिरा प्रश्न आता समोर उभा होता...

" मॅक्स..." वंश मॅक्सला खुणावतो...

मॅक्स बाहेर जाऊन गार्डला इशारा करतो... त्याच्या पाठोपाठ काही लेडीज गार्ड त्या मुलीला पकडून आणतात....

" समिधा..." रोहिणी आश्चर्याने हळू आवाजात बोलतात...

" मला इथेच आणायच होत तर फोन करायचा होता मी स्वतः आले असते... असं पकडून कशाला आणल आहे... काय झालं मावशी..." समिधा हात सोडवत बोलते... गार्ड तिला सोडुन जातात....

" वंश समिधा इथे..." अंकित

" ओह तु बोलावल आहेस मला..." समिधा वंशजवळ जाते...

" हो सांगतो.... अंकित हा पेनड्राईव्ह साउंडला कनेक्ट करशील... " वंश मॅक्स कडचा पेनड्राईव्ह अंकितला देतो...

अंकित पेनड्राइव साउंडला कनेक्ट करून स्टार्ट करतो... सगळ्यांच लक्ष आता साउंड सिस्टीमवर होत....

रेकॉर्डिंग सुरु होते... तसें सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती.... जशी रेकॉर्डिंग पुढे जातं होती... त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या रेषा बदलत होत्या... समिधाच्या चेहऱ्यावरचा रंग केव्हाच उडाला होता....

संपूर्ण रेकॉर्डिंग संपली.... तरी हॉल मध्ये शांतता होती... काय बोलाव...? काय रिऍक्ट व्हाव..? कोणाला काही कळत नव्हत....

यशवंत आणि मंजिरी सोफ्यावर शांत होऊन बसले होते... रुचिका मंजिरीला आधार देत होती... त्यांना काहीच समजेना झालं होत.... जिला रिद्धी सारख समजलं तीच आज त्यांच्या मुलीच्या जीवावर उठली होती...

समिधाला मात्र त्याच काही नव्हतं.... ती मनात हाच विचार करत होती कि वंशला कस कळाल... तिने सर्व तयारी करून सर्व घडवून आणलं होत... ती विचारात असताना सगळीकडे आवाज घुमला....

सटाकssssssssss 👋🏻👋🏻👋🏻👋🏻👋🏻 रोहिणी रागाने धरधरत होत्या... समिधाला काही कळण्याआधी परत आवाज आला.... सटाकssssssss... 👋🏻👋🏻👋🏻👋🏻👋🏻 लागोपाठ तीन चापट तिच्या गालावर बसल्या होत्या... शेवटची चापट जोरात पडल्याने समिधा खाली पडली....

" हिम्मत कशी झाली तुझी रिधुसोबत अशी वागायची..." अंकित तिच्याजवळ खाली बसला...

" अंकित अरे काय झालं... समु तु खाली का बसली आहे..." अर्चना घाईत आता येतात... आणि समिधाला उभ करतात....

" या तुमचीच कमी होती... तुमच्या मुलीचे प्रताप तुम्हांला माहीत असतील ना..." विराज

" विराज आवाज.... " यशवंत त्याला शांत राहायला सांगतात... त्यामुळे विराज शांत होतो...

" काय केलं तिने असं कि तु एवढा ओरडतो आहेस..." अर्चना तावाने बोलतात... पण त्यांच्या बोलण्याने वंशच्या मुठी आवळल्या जात होत्या...

" तुमच्या मुलीला आम्ही आमची मुलगी मानल... आणि हिने माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय... तरी तुम्हांला वाटत कि त्याने शांत बसाव..." मंजिरी मात्र आता बोलल्या...

" ताई तिला काही झालं तर नाही ना.... जिवंत आहे कुठे मेली आहे..." अर्चना पटकन बोलून गेल्या... त्यांच्या बोलण्याने वंशचा कंट्रोल सुटला आणि त्याने तिथला फ्लॉवरपॉट जोरात खाली आपटला... हॉल मध्ये काचेचे तुकडे विघुरले होते... त्याच्या राग ओकत असलेल्या डोळ्यांना पाहुन तर अर्चना कापायला लागल्या..

" ह्या फ्लॉवरपॉटची जशी हालत आहे ना... तुमच्या मुलीची अशीच हालत करायला मला 2 सेकंद पुरेसे आहेत... किती २ सेकंद✌🏻✌🏻.... " वंश अर्चना समोर बोट करून बोलतो...

" आमच्या घरात मुलींवर हात उचलत नाही म्हणून हि व्यवस्थित आहे नाही तर अशी हालत केली असती कि स्वतःला आरशात बघू शकली नसती..." वंश संतापला होता...

" माझ्या मुलीला मारायचा हक्क हिला कोणी दिला... काय बिघडवल होत तिने तुझं... आणि तुला दुसऱ्यांना एवढं वाईट बोलवतच कसं... पहिली आई आहे जी स्वतःची मुलगी खून करायला निघाली तरी तिला साथ देते आहे...." यशवंत देखील आता चिडले होते...

" तरी तुम्हांला अजून हे माहीत नाही तिने रिद्धी सोबत हे दुसऱ्यांदा केलं आहे... पहिल्या वेळेस मी दुर्लक्ष केलं पण या वेळेस नाही... तुला सुटका नाही...." वंशच्या बोलण्याने सगळ्यांना दुसरा धक्का बसला...

" दुसऱ्यांदा म्हणजे...." अंकित न समजून बोलला...

" अंकित आणि सियाच्या रिसेप्शन पार्टी मध्ये हिने रिद्धीच्या कोल्ड्रिंक मध्ये अल्कोहोल मिक्स केली होती.... ज्याने रिद्धीचा कंट्रोल सुटेल... मी हे पाहिलं आणि धराला सांगून रिद्धीच्या हातातल ड्रिंक सांडल..." वंशने सांगितल्यावर आता विराज अजूनच चिडला होता....

" वंश तुम्हांला हिच करायच ते करा... मी बघतो कोण हिला वाचवत..." विराज रागात अर्चना कडे पाहुन बोलला..

" काय करणार तु मला... पोलीसांच्या ताब्यात देणार... हम्म्म.. 😀😀😀😀.. पण या सगळ्याला तु आणि तुझी फॅमिली जबाबदार आहे..." समिधा वंश जवळ जावून त्याच्या छातीवर बोट ठेवून बोलते...👉🏻👉🏻👉🏻

" या तुझ्या ग्रेट आजीबाईंनी जर तुझं लग्न रिद्धी सोबत ठरवलं नसतं तर हे झालच नसतं... लग्नाच्या प्रत्येक फंक्शन मध्ये त्यांच्या मागे फिरले तुला मिळवायला... मिळवायला.... मॉम तर तुझ्या आईसोबत पण बोलली होती... पण नाही त्यांनी सगळं या आजीबाईंवर सोडून दिल... पुजेला जेव्हा विषय काढला मला वाटलं माझं आणि तुझं लग्न ठरणार आहे...😀😀 पण यांनी रिद्धीला मागणी घातली... सगळी मेहनत मी घेऊन फळ तिला भेटलं...😡😡 मग कशी सोडणार होते तिला म्हणून रिसेप्शनला तिला अल्कोहोल देणार होते... म्हणजे ती तमाशा करेल आणि हे लग्न मोडेल तर ती धरा येऊन तिला धडकली आणी ड्रिंक सांडल... माझा प्लॅन वाया गेला...😡😡😡... आता तुला मिळवायच म्हणजे तीला बाजूला कराव लागेल ना म्हणून तिचा विषयच बंद करायचा ठरवला आणि तिला उडवायला लावलं... कारण वंश फक्त या समिधाचा झाला पाहिजे.. फक्त समिधाचा....😀😀😀 पण नाही तिला माझं सुख कसं बघवेल म्हणून जिवंत राहिली...😡😡" समिधा रागात तिने केलेला सर्व सांगत होती... तीच बोलणं संपताच जोरात तिच्या गालावर बसली... एवढ्या जोरात बसल्याने ती धडकन खाली पडली...

आता पर्यंत शांत असलेल्या अंकितला मात्र आता सहन झालं नाही आणि त्याने जोरात वाजवली....

" अंकित अरे बहीण आहे तुझी ती..." अर्चना समिधाजवळ जात बोलतात....

" होती... बहीण होती... तिने रिधुसोबत जे केलं आहे ना त्यानंतर ती माझी कोणी नाही... इथून पुढे माझा आणि हिचा संबंध संपला... जर तु रिधुच्या जवळपास जरी पुन्हा दिसली किंवा तिच्या वाटेला गेलीस तर माझी कधी ना पाहिलेली बाजू पाहशील..." अंकित रागात तिच्यासमोर बोट करुं बोलतो...

" अंकित तु शांत हो..." सिया त्याच्या हाताला धरून बाजूला घेते...

" वंश तुम्ही काय ठरवलं आहे तीच... तुम्हांला योग्य वाटेल तर करा..." यशवंत

" रक्षितला कळवलं आहे... तो येइलच.... पण तुला एवढ्या सहज बेल भेटणार नाही याची पूर्ण काळजी घेईल मी... तुझ्या जागी जर मुलगा असताना तर त्याला पोलिसांपर्यंत देखील पोहचु दिलं नसतं... lucky you..." वंश बोलतो आणि मागून रक्ष लेडीज कॉन्स्टेबल सोबत आत येतो...

" हे सर्व पुरावे आहेत तिने स्वतः confess केलं आहे कि हा accident तिने घडवून आणला आहे... आणि हे दुसरे proof ज्यात तिचा drugs gang सोबत हात असल्याचे आहेत ..." मॅक्स रक्ष कडे सर्व पुरावे सोपवतो...

" don't worry vansh.... ती इतक्या सहजा सुटणार नाही... बरेच charges लागणार आहे तिच्यावर... येतो मी... घ्या हिला..." रक्ष कॉन्स्टेबलला समिधाला arrest करायला सांगून तिला घेऊन जातात... तिच्या मागे अर्चना देखील जातं असतात...

" थांब..." रोहिणी अर्चना जवळ जातात...

" इथून पुढे या घरात पाय ठेवायचा नाही... आज आलीस ते शेवटच..." रोहिणी बोलून दरवाजा बंद करतात...

झाल्या प्रकाराने सगळेच धक्क्यत होते...

" रिद्धीला याबद्दल काही सांगू नका ती त्रास करून घेईल... येतो मी...🙏🙏" वंश बोलून हॉस्पिटल निघून जातो...

" दादा - वहिनी समिधाने जे केलं ते माफ करण्यासारख नाही आहे... तरी मी तुमची माफी मागते....🙏🙏🙏" रोहिणी दोघांसमोर हात जोडतात...

" रोहिणी तु का हात जोडते आहे.... जिने केलं आहे तिला काडीमात्र पश्चाताप नाही... आणि आम्ही तुला काही बोललो देखील नाही आहोत... नको वाईट वाटून घेऊ..." मंजिरी त्यांचे हात खाली करून त्यांचे डोळे पुसतात...

" तुम्ही सगळे आराम करा... मी हॉस्पिटल जातो..." विराज

" नको विराज तु घरीच थांब... वंश तिथेच गेले असतील..." समीर

पुरोहित घरी गेल्यावर सगळे रूममध्ये निघून जातात.....

..................

.............................

वंश हॉस्पिटलला आल्यानंतर त्याला आशिषने बोलवल्याच सांगतात... म्हणून तो त्याच्या केबिनमध्ये जातो...

" काय झालं... all ok.... " वंश

" सर्व ठीक आहे... मी हेच सांगायला बोलावल होत कि रिद्धी आता ठीक आहे तर तिला उद्या डिस्चार्ज दिला जाईल.... फक्त काही दिवस हाताची काळजी घ्यावी लागेल... बाकी काही अडचण नाही... " आशिष

" ok... thank you.... " वंश त्याला भेटून रिद्धीच्या रूम मध्ये जातो...

रिद्धी आणि धरा गप्पा मारत होत्या... धरा तिला तिलकचे फोटो दाखवत होती... वंश आल्यानंतर धराने मोबाईल बंद केला...

" तु घरी जा... मी आहे इथे..." वंश

" ठीक आहे... काही वाटलच तर मला फोन कर... Bye वहिनी... get well soon..." धरा बाय बोलून निघून गेली...

वंश रिद्धी शेजारी असलेल्या चेअरवर जाऊन बसला... त्याला काहीच कळत नव्हतं कि तिच्यासमोर काय रिऍक्शन द्यावी... रिद्धी मात्र त्याच्याकडे स्मित चेहऱ्याने बघता होती... पण अशक्तपणा अजूनही होता...

तिला बघून देखील त्याच्या मनाला शांतता मिळतं नव्हती... त्याला गरज होती तीच्या उबदार मिठीची... त्याचा चेहरा बघून तिला समजल होत म्हणून तिने त्याच्या समोर हात पसरला आणि डोळ्यांनी जवळ बोलावल...

तो पूर्णतः खचला होता... समिधा बोललेली सर्व शब्द त्याच्या मनाला लागले होते.... त्याने अलगद तिच्या भोवती मिठी मारली... रिद्धी त्याच्या पाठीवर रब करत त्याला शांत व्हायला सांगता होती.... हळूहळू तिच्या मिठीत तो सर्व विसरत होता....

" You ok... " रिद्धी हळू आवाजात बोलली...

" हम्म्म..." वंशने फक्त हुंकार भरला... थोडा रिलॅक्स झाल्यानंतर तो वेगळा झाला...

" काय झालं...." रिद्धी त्याचा हात हातात घेत बोलली... वंशने नकारार्थी मान हलवत काही नाही म्हणून बोलला आणि तिच्या हातावर ओठ टेकवले....

" वंश मला घरी जायचा आहे... मला कंटाळा आला आहे इथे..." रिद्धी त्याचा मूड हलका करण्यासाठी बोलते....

" तुला मजा वाटावी म्हणून नाही इथे आणल आहे.... उद्या डिस्चार्ज देणार आहेत..." वंश

" 😏😏😏😏...." रिद्धीच्या रिऍक्शनवर वंशला हसू आलं....

" हेच बघायच होत मला... केव्हा पासून सिरीयस चेहरा घेऊन बसले आहेत.... तुम्ही असे खूप वाईट दिसतात.... 🤭🤭..." रिद्धी अशक्तपणा असूनही त्याला चिडवत होती...

" कोण किती वाईट दिसत हे आपण तुला डिस्चार्ज दिल्यानंतर बघु... सध्या आराम कर... नंतर सगळे हिशोब पूर्ण करायचे आहेत....😉😉" वंश तिचा बेड खाली करतो...

वंशच्या बोलण्याचा टोन समजून रिद्धीचे गाल ब्लश करतात... वंश तिच्या कपाळावर ओठ टेकवतो... त्याच्याकडे बघत रिद्धीला झोप लागते....

..................

............................

दुसऱ्या दिवशी रिद्धीला डिस्चार्ज दिला गेला....वंश आणि विराज तिला घेऊन घरी आले.... तिला भेटायला पुरोहित फॅमिली तिथेच आली होती.... अशक्तपणा असला तरी तिने सर्वांना नमस्कार केला... संजनांना ती पहिल्यांदा भेटत होती... पण तिच्या वागण्याने संजनाला ती आवडली....


रिद्धी नसल्याने धरावर थोडा प्रेशर आला होता... रिद्धी नंतर डिझाइनचे सर्व कामं धरावर होत... पण तिने सर्व योग्यरित्या सांभाळल होत... तिच्या कामावर विराज चांगलाच impress होता...

.......................

.............................

शेवटी गणेश चतुर्थीचा दिवस आला.... संपूर्ण वृंदावन सजवल गेलं होत.... वंश आणि पुरोहित कुटुंबीयांना निमंत्रण दिलं गेलं होत.... सरंजामे ( सियाची फॅमिली ) परिवार त्यांच्या गणपतीची स्थापना करून येणार होते... रिद्धी पूर्ण रिकव्हर झाली होती.... त्यामुळे तिच्यात चांगलाच उत्साह संचारला होता...

रिद्धीची गँग , विकी आणि सायली अकॅडेमी मध्ये बाप्पा स्थापन करून पोहचले होते... विराज , अंकित आणि वीर गणपती आणायला गेले होते....

गणपती येण्या अगोदर पुरोहित वृंदावनला पोहचले... यशवंत आणि समीरने सगळ्यांच स्वागत केलं...

रुचिका आणि सियाने त्यांच्या चहा - नाश्त्याची व्यवस्था केली... मंजिरी आणि रोहिणी पुजेची तयारी बघत होत्या... रिद्धी रूममध्ये रेडी होत होती... त्यामुळे सर्व मुली तिच्याजवळ होत्या... मुलींनी ठरवून साडी नेसायच ठरवलं होत....

वंश आणि समर सगळ्यांसोबत बसले होते.... पण वंशची नजर रिद्धीला शोधत होती...

" वंश येतील त्या... किती वाट बघताय...😀" समर त्याच्या जवळ जाऊन हळू आवाजात बोलला...

" काय करणार... त्यांना पाहिल्याशिवाय राहवत नाही ना...😉 " वंश डोळा मारत बोलताना अचानक शांत होतो... त्याची नजर एकाच ठिकाणी स्थिरावली.... म्हणून समरने मान वळवली आणि गालात हसत मान हलवली...

समोरुन स्टेअरवरून रिद्धी खाली येत होती...

नेव्ही ब्लू कलरची साडी त्याला नारंगी काठ , काठाला मॅचिंग डिझाइनर ब्लाउज , हलकासा मेकअप , ओठांना पिंकिश लिपस्टिक , केस मोकळे सोडून खाली थोडे कर्ल केले होते...

रिद्धीने खाली येऊन सगळ्यांना नमस्कार केला...

" औक्षवंत व्हा...." राजमाता तिला आशिर्वाद देतात...

" खूप छान दिसत आहात...." संजना तिच्या गालवर हात ठेवून बोलल्या...

" 🙂🙂🙂...." रिद्धीने स्माइल करून वंशकडे पाहिल तर तो अजूनही एकटक बघत होता.... बाहेर गाडीचा हॉर्न वाजला तसा होत भानावर आला....

विराज आणि अंकित बाप्पाला घेऊन आले.... मंजिरीने त्यांना ओवाळून आता घेतलं....

" गणपती बाप्पा...." वीर

" मोरया..." सगळे

विराजने बाप्प्पांची स्थापना केली... सिया अंकितच नवीन लग्न झाल्यामुळे त्यांना पूजा करायला सांगितली...

रिद्धी आणि वंश शेजारी बसले होते.... रिद्धी वंशला बघत होती...

व्हाईट कुर्ता पायजमा त्यावर पिस्ता कलरचा जॅकेट , जेल सेट हेअर , ट्रिम बिअर्ड , आणि त्याची रिद्धीसाठी असलेली किल्लर स्माइल...


" I know I'm looking hot.... म्हणून असं बघू नको... समोर तुझ्या लाडक्या बाप्पांची पूजा सुरु आहे..." वंश तिच्या कानाजवळ जाऊन बोलला...

त्याच्या गरम श्वासांनी रिद्धीच्या अंगावर शहारा आला... म्हणून तिने मान समोर वळवली... त्यावर वंश गालात हसला...

पूजा झाल्यानंतर आरतीला सुरुवात झाली.... रिद्धांशने ( रिद्धी वंश ) सोबत आरती केली होती... रिद्धीसाठी हा गणेशोत्सव खूप आनंदाचा झाला होता....

आरती झाल्यानंतर विराज रुचिका , सियांकित आणि रिद्धांशने जोडीने नमस्कार केला....

" रिधु या वेळेस काय मागणार बाप्पाला..." सिया

" ते मी बाप्पाला सांगते...." रिद्धी हसत बाप्पा जवळ गेली...

" बाप्पा दरवेळेस तु माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतोस.... आजपर्यंत मी जे जे मागितल तु मला दिलं आहेस.. माझ्या लाईफमध्ये वंशला पाठवून तु मला खूप मोठं गिफ्ट दिलं आहे... त्यासाठी खुप खूप थँक्यू.... माझ्या सगळ्या परिवाराला नेहमी आनंदात ठेव.... त्यांच्या चेहऱ्यावर असलेला हा आनंद असाच राहू दे... बस मला अजून काही नको..." रिद्धी बाप्पाच्या कानात बोलते... आणि नमस्कार करून बाजूला होते...

सर्व झाल्यानंतर सगळ्यांना जेवणावर ताव मारला.... रिद्धी आणि वंश टेरेसच्या गार्डन मध्ये बसले होते... वंशने तिच्या भोवती हात गुंफले होते... रिद्धी त्याच्या छातीवर डोकं थेवुन बसली होती....

" वंश मीडियाला काय सांगायच आहे... मी अजुन बाहेर पडले नाही आहे... पण उद्या पासून जॉईन होणार म्हणजे त्यांना हॅन्डल करण आल..." रिद्धी मान तिरकी करुन त्याच्याकडे पाहते...

" wait.... " वंश तिच्या मोबाईलमध्ये काही तरी शोधतो...

" हे काय मध्येच..." रिद्धी गोंधळून बाजूला होऊन विचारते....

" wait princess... " वंश typing करत बोलतो...

" done... " वंश मोबाईल तिच्याकडे देतो...

“When I saw you I fell in love, and you smiled because you knew.” 💖💖✨✨ #Riddhansh

" Are you serious... 😳" रिद्धी थक्क झाली होती... वंशने त्यांच्या relation बद्दल रिद्धीच्या social media handel वर post केली होती....

" yes... I'm serious... आपण ठरवलं होत ना तिलक झाल्यानंतर सांगायच मग सांगितल..." वंश रिलॅक्स होऊन बोलतो...

" तुम्ही काय मागितल बाप्पाकडे..." रिद्धी त्याच्या हाताला विळखा घालून बसते...

" जे तु मागितल तेच..." वंश

" काहीही..." रिद्धी

" princess कुठे बाहेर जाऊया... आपल्याला वेळच नाही भेटला आहे.... " वंश तिचा हात हातात घेऊन बोलतो...

" कधी जाऊया...." रिद्धी त्याच्याकडे बघून बोलते...

" sunday..." वंश

" ok... कुठे जाणार..." रिद्धी excite होऊन विचारते...

" ते surprise असेल..." वंश

" OK fine... " रिद्धी त्याला मिठी मारुन बसते.... वंश तिला मिठीत घेतो.....

....................

...................................

...............................................

दुसऱ्या दिवसापासून रिद्धीने ऑफिस आणि अकॅडेमी जॉईन केली....

पुरोहित कुटुंबीय जयपुर परतले होते.... जाताना त्यांनी रिद्धीला जयपूर पाठवण्याबद्दल कळवू बोलून गेले होते.... यशवंत रावांनी देखील पाठवू म्हणून सांगितले होते....

रिद्धी देखील बरी झाली होती... त्यामुळे समीर आणि फॅमिली लंडनला निघणार होते.... लवकरच बिझनेस वाईल्ड अप करून ते भारतात परतणार होते...

सिया आता लवकर भेटणार नाही म्हणून सगळी गँग तिला भेटायला आली होती.... संपूर्ण दिवस त्यांनी सोबत घालवला होता... कॉलेजमध्ये असताना त्यांनी संपूर्ण मुंबई पाहिली होती तरी देखील तो दिवस त्यांनी मुंबई दर्शन केलं....

सकाळी लालबागच्या राजाच दर्शन घेऊन त्यांचा दिवस सुरु झाला होता... त्यांनंतर त्यांनी छोटा काश्मीर गाठल.... तिथे बोटींग करून भेळचा आस्वाद घेतला... त्यानंतर सर्वांनी मॉल गाठला.... आदीने आधीच मूवीचे तिकीट बुक केले होते... मस्त पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स घेऊन त्यांनी " दगडी चाळ २ " मूवी एन्जॉय केला....

मुव्ही बघुन मुलींनी शॉपिंग सुरु झाली... मुलं त्यांच्यामागे बॅग्स सांभाळत फिरत होते.... पण सियाची शॉपिंग आधीच झाल्याने त्यांनी जास्त वेळा घालवला नाही... संध्याकाळ होत आली होती....

कॉलेजला असताना संध्याकाळी सगळे मरिन ड्राईव्हला जायचे... त्यामुळे आजही त्यांची गाडी तिकडे वळली होती....



रिद्धीला जेव्हा शांतता हवी असायची तेव्हा ती इथेच यायची....

त्यानंतर डिनर साठी Soho House ला गेले... छान असा डिनर एन्जॉय करून ग्रुप सेल्फीने दिवसाचा शेवट केला... निरोप घेवून सगळे घरी परतले...

दमल्यामुळे रिद्धी आण वंशचे रात्री बोलण झालं नव्हतं... म्हणून वंशने Good Night मेसेज करून फोन साईड ठेवला... लाईट ऑफ करून झोपून गेला...

दुसऱ्या दिवशी समीर आणि फॅमिली लंडन निघून गेले... आणि रिद्धी आता sunday ची वाट पाहू लागली....

क्रमशः

पुढच्या पार्टमध्ये जाऊया फिरायला.... बघुया वंश काय सरप्राइज देतो आहे....