Sant Eknath Maharaj Ganga read the scripture in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | श्री संत एकनाथ महाराज - २५

Featured Books
Categories
Share

श्री संत एकनाथ महाराज - २५

श्री संत एकनाथ महाराज” 25

एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

 

सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् । तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम् ॥२९॥

 

सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥ गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी जे होय सुखप्राप्ती । तें सुख निश्चितीं निर्गुण ॥८५॥ सर्व भूतीं वसे भगवंत । तोचि मी हा तात्त्विकार्थ । ऐसेनि मदैक्यें सुखप्राप्त । तो निजसुखार्थ निर्गुण ॥८६॥ देखिल्या निजात्मसुखस्वरुप । स्वयें होइजे सुखरुप । हे निर्गुणसुखाचे निजदीप । झडल्या पुण्यपाप पाविजे ॥८७॥ आपण सुखस्वरुप सर्वांगीं । सुखस्वरुप स्वयें भोगी । हे निर्गुण सुखाची मागी । भक्तीं अतंरंगीं भोगिजे ॥८८॥ कल्पांताचें पूर्ण भरितें । उरों नेदी नदीनदांतें । तेवीं निर्गुण सुख येथें । देहेंद्रियांतें उरों नेदी ॥८९॥ जेवीं मृगजळीं जळ नाहीं । तेवीं परब्रह्माच्या ठायीं । प्रपंच स्पर्शिलाचि नाहीं । तें सुख निर्वाहीं निर्गुण ॥३९०॥ ज्या सुखाची मर्यादा । करितां न करवे कदा । सुखें सुखस्वरुप होइजे सदा । हे सुखसंपदा निर्गुण ॥९१॥ त्रिगुण आणि निर्गुण । यांचें दाविलें भेदलक्षण । आतां त्याचें उपसंहरण । ग्रंथांतीं जाण हरि करी ॥९२॥

 

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

 

द्रव्यं देशः फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः । श्रद्धाऽवस्थाऽऽकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥३०॥

 

द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्दें वनग्रामभेद । फळशब्दें सुखउद्बोध । सत्वसंबंधविभागें ॥९३॥ काळशब्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नांव ज्ञान । कर्म म्हणिजे मदर्पण । कर्ता तो जाण असंगी ॥९४॥ श्रद्धाशब्दें आध्यात्मिकी । अवस्थाशब्दें जागरणादिकी । आकृतिशब्दें उपरिलोकीं । देवतादिकीं क्रीडन ॥९५॥ जो गुण वाढे देहांतीं । जेणें गुणें होय अंतःस्थिती । त्या नांव निष्ठा म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९६॥ भिन्न भिन्न भाग अनेक । किती सांगूं एकेक । अवघें जगचि त्रिगुणात्मक । जाण निष्टंक निजभक्ता ॥९७॥ संसार समस्त त्रिगुण । यांमाजीं मी अवघा निर्गुण । ते तुज कळावया निजखूण । गुणनिरुपण म्यां केलें ॥९८॥

 

एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

 

सर्वे गुणमया भावाः पुरुषाव्यक्तधिष्ठिताः । दृष्टं श्रुतमनुध्यातं बुद्धया वा पुरुषर्षभ ॥३१॥

 

देखिजे अथवा ऐकिजे । कां मनें जें जें चिंतिजे । तें तें अवघेंचि जाणिजे । मायागुणकाजें त्रिगुणात्मक ॥९९॥ करावया त्रिगुणांचें मर्दन । प्रकृतिनियंता पुरुष भिन्न । तो सर्वदा सर्वांगें निर्गुण । वर्तवी गुण निजसत्ता ॥४००॥ पुरुषावेगळें समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत । त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥१॥ नरदेह पावोनियां येथ । जे न साधिती गुणातीत । ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥२॥ तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती । तेव्हांचि तूं गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥३॥ हरिभक्तांमध्यें वरिष्ठ । यालागीं निजमुखें वैकुंठ । उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥४॥ त्रिगुणगुणीं सविस्तारु । दृढ वाढला संसारतरु । त्याचे छेदाचा कवण प्रकारु । तो शार्ङगधरु सांगत ॥५॥

श्लोक ३२ वा

एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः । येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः ॥३२॥

भक्तियोगेन मन्निष्ठो मद्भावाय प्रपद्यते । सत्वादि तिन्ही गुण एथ । केवळ आणि मिश्रित । पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मी निश्चित बांधोनी ॥६॥ त्रिगुणकर्मांस्तव जाण । जीवासी झालें दृढ बंधन । जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥७॥ घटीं भरल्या समळ जळ । त्यामाजीं रवि दिसे समळ । घटींचें डोलतांचि जळ । कांपे चळचळ रविबिंब ॥८॥ तेवीं त्रिगुणांचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण । तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥९॥ जितावया गुणबंधन । रिघावें सद्गुरुसी शरण । तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्वगुण अतिशुद्ध ॥४१०॥ पायीं जडली लोहाची बेडी । ते लोहेंचि लोहार तोडी । तेवीं सत्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥११॥ तेथ प्रवेशावया गुणातीतीं । अवश्य करावी गुरुभक्ती । जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥१२॥ ज्यासी गुरुचरणीं भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो । तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥१३॥ जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसंपन्न । गुरुरुपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥१४॥ उद्धवा ऐसें माझें भजन । समूळ जाणशी तूं संपूर्ण । यालागीं ’सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ।१५॥ भाग्यें नरदेह पावल्या जाण । अवश्य करावें माझें भजन । येचि अर्थीचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥१६॥

एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ॥३३॥

गुणसङगं विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः । ज्या नरदेहाकारणें । अमर उत्कंठित मनें । त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥१७॥ नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान । तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनी ॥१८॥ करितां माझें अनन्य भजन । सहजें वाढे सत्त्वगुण । सत्वगुणास्तव जाण । उपजे ज्ञान सविवेक ॥१९॥ विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती । शोधितसत्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥४२०॥ करितां माझें अभेद भजन । होय स्वानंदाचें स्वादन । त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥२१॥ नरदेह जोडलिया हातीं । प्राण्यासी एवढी प्राप्ती । यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥२२॥ हें भागवतींचें अतिगुह्य ज्ञान । मुख्यत्वेंसी भक्तिप्राधान्य । भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥२३॥ नरदेह जोडल्या जाण । माझी भक्ति करिती विचक्षण । भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥२४॥ पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती । तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥२५॥