Night Games - Episode 8 in Marathi Horror Stories by prajakta panari books and stories PDF | रात्र खेळीते खेळ - भाग 8

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

रात्र खेळीते खेळ - भाग 8

अनुश्री काही मार्ग सापडतो का ? हे शोधू लागली. ती पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्री आपण हार कस काय करत आहात.... त्यावर ती स्त्री विचित्र पद्धतीने हसत म्हणाली.. अग हे तिरडीसाठी करत आहे..... आणि हसू लागली.... अनुश्रीला थोड विचित्रच वाटल पण आपल्याला काय करायचे आहे अस म्हणत ती ने तो विषय तिथेच सोडून दिला..... व पुन्हा तिला विचारू लागली इथून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे काय? तुम्ही ये जा करत असाल ना म्हणून विचारल त्यावर ती स्त्री मोठमोठ्याने हसू लागली...... आणि तिला म्हणाली काय इथून बाहेर पडण्याचा मार्ग......... अग इथे येणाऱ्याचा मार्गच संपतो...... आणि तु बाहेर पडण्याचा मार्ग विचारालेस हा हा हा हा............. अनुश्रीला वाटल या बाईला वेड लागलय वाटत म्हणून अस बडबडतेय आपण हिला विचारूनच चूक केली आपणच शोधू आता मार्ग..... अग मला कसल वेड लागतय तुम्हीच वेड होशीला......... अनुश्री दचकलीच हिला मनातल कळत कि काय....... मनातलच काय इथल्या प्रत्येकाची हालचाल कळते आम्हाला....... आणि परत हसू लागली.... अनुश्रीला आता तिची भिती वाटू लागली म्हणून ती तिथून दुसरीकडे जावू लागली..... ती थोड पुढे गेली.... तिथे तिला चार वेगवेगळे मार्ग दिसू लागले... ती ने आधी पहिल्या मार्गाने जायच ठरवल.... ती पहिल्या मार्गावरून जावू लागली.... थोड्या अंतरावर गेली तोवर तिला आश्चर्य वाटल मगाशी जी स्त्री ज्या झाडाखाली बसलेली ती तिथेच आलेली.... व परत समोर चार मार्ग दिसत होते..... ती ने आता दुसऱ्या मार्गावरून जायच ठरवल व ती जावू लागली...... थोड अंतर पार केल्यासारख वाटल म्हणून ती ने मागे पाहिले तर पुन्हा ती तिथेच होती जिथे तिला ती स्त्री दिसलेली...... यामुळे ती तर खच्चत चाललेली पण तरीही स्वतः ला धीर देत. आपल्याला आपल्या मित्रांना भेटायचे असेल तर हार नाही मानायची अस मनाशी ठरवत होती... ती ने आता तिसऱ्या मार्गावरून जायच ठरवल व पुढे जावू लागली... परत ती ने काही अंतर पार केल्यावर मागे वळून पाहिले तर परत एकदा तिला झटकाच बसला कारण ती परत त्याच ठिकाणी होती जिथून ती पुढे गेलेली.... मनातली हिंमत तर तुटत चाललेली.... पण तरीही मित्रांना भेटायचे म्हणून ती पुढे जावू लागली चौथ्या मार्गाने पण यावेळी सुद्धा ती तिथेच होती.... तिला कायच समजेना कि हे काय होतय... ती तशीच ओरडली अरे इथून बाहेर पडण्याचा मार्गच नाही काय? तोवर परत त्या स्त्रीचा आवाज घुमला.... इथे आल्यानंतर मार्ग बंदच होतो.... ते ऐकून तर अनुश्रीचा उर भरून आला.... तीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले...... आता कस बाहेर पडायच...... एकतर शरीरातले त्राण संपत आलेले आणि आता मनातले त्राण पण संपत आलेले.... तसच पाण्यावाचून जीव तळमळू लागलेला... ती तशीच खाली ढासळली......
थोड्या वेळाने ती च्या कानात एक आवाज हळूवार पद्धतीने तिथल्या गवतालाही कळणार नाही अशा पद्धतीने कुजबुज करू लागला ... ये बाळा अग इथे का कोलमडून पडलेस तिथे तुझे सगळे मित्र अडचणीत आहेत... त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मी तुला सांगू शकते पण तुला माझ्यापर्यंत पोहोचावे लागेल त्यासाठी तुला योग्य मार्ग ओळखावा लागेल व जरी मार्ग चूकला तरी येणाऱ्या अडचणींचा सामना करत परत येथे येवून परत सुरूवात करावी लागेल‌. पण तु आता जी चूक केलीस ती तुला टाळावी लागेल... तु पुढे जाऊन पुन्हा मागे पाहिलेस तर पुन्हा चकव्यात अडकशील तुला पुढे जायच आहे मागे न वळता. उठ लवकर उठ तुझे मित्र अडचणीत आहेत. जर तु हार मानलीस तर कोणीच नाही वाचणार उठ........ मित्रांचा प्राण जाईल या वाक्यानेच अनुश्री ताडकन उठली. ती ने मनाशी ठरवल आता आपल काहीही होवू दे आपण लढायचच....... ती परत विचार करू लागली नेमक कोणत्या मार्गावर जायच. कोणता मार्ग आपल्याला तिच्याकडे घेऊन जाईल.... पण इथे उभ राहून ते समजन शक्यच नव्हते तिला प्रत्येक मार्गावर जावून शहानिशा करण गरजेचच होत..... परत ती ने पहिल्या मार्गावरून जायच ठरवल.... ती पुढे जावू लागली यावेळी ती ने मागे पाहायच टाळल आणि पुढे पुढे जावू लागली... अचानकच तिला समोर हाडांचे सापळे दिसू लागले ते तिच्यावर झडप घालू लागले. एक सापळा तीचा पाय पकडू लागला व दुसरा तिचा हात पकडू लागला ती त्यांना बाजूला हटवू लागली. तरीही ते तिच्या मागेच लागले ती परत माघारी वळू लागली तर एकाने तिला जोरात मागे ओढले... आणि ते बोलू लागले... अस कस आमच्याशी खेळण्याआधीच तु बाहेर जाशील आ... बाकिचे पण तिच्या भोवती गर्दी करू लागले.... थोडावेळ तर ती गोंधळूनच गेली पण परत आता काय करायच हा विचार करू लागली तस ती ने इथे आल्या आल्या एक गोष्ट नोटीस केलेली.. हे सापळे त्या पाण्यापाशी जावून परत येत होते त्याच्यातला एक सापळा तर पाण्याला पाहून घाबरूच लागला आपल्याला यांना तिथे घेऊन जाव लागेल व पाण्यात पाडाव लागेल.... ती तिच्यात असलेली शक्य तेवढी ताकद लावून त्यांना ढकलत पुढे पुढे जावू लागली तरीही ते तिच्या हाताला पायाला वेढा घालत होती ती पूर्ण ताकदीनिशी त्या पाणी साचलेल्या मोठ्या खड्ड्यापाशी आली लागलीच त्यात जावून उभी राहिली. ज्या सापळ्यांनी ती चे हात पकडलेले ते ओरडतच बाजूला होवू लागले व बाकिची पण बाजूला जावू लागली... आता ती ने स्वतः ला पूर्ण भिजवून घेतल व शक्य तितक बळ एकवटून पुन्हा त्या मार्गावरून मागे गेली... ती पुन्हा हार करणारी स्त्री दिसलेल्या ठिकाणी गेली... परत तिला समोर चार मार्ग दिसू लागले... आताच घेतलेल्या अनुभवामुळे ती प्रचंड घाबरलेली. ती ने एक सुस्कारा सोडला.. पुढचा मार्ग तपासावा कि नको अशी संभ्रमित अवस्था झालेली तिच्या मनाची... दुसरा मार्ग यापेक्षा भयानक असेल तर असा विचार पण आला तीच्या मनात तोच त्या हळू आवाजात कुजबूजलेल्या स्त्रीच बोलवण आठवल... आणि मित्रांच्या काळजीने ती ने पुन्हा ठाम निर्णय घेतला... आणि दुसऱ्या मार्गावरून जावू लागली मागे न बघता.... ती चालत चालत दुसऱ्या मार्गावरून आत गेली. पण समोर पाहिल्या पाहिल्या तीच्या उरात धडकीच भरली.... समोर डोळे नसलेली, कान नसलेली, जख्मांनी भरलेली काही मृत शरीर तिथे एकमेकांना मारत बसलेली. अनुश्रीला पाहून ती भलतीच खुश झालीत आता आपली भुख मिटनार म्हणून नाचू लागली... ती जीभ चाटत चाटत तीच्या जवळ येवू लागली... तीला वाटल आता काय आपल खर नाही..... पण तीच मन तिला सांगू लागल. नको नको हरू तु तुझे मित्र संकटात आहेत..ती त्यांच्याशी हातापायी करू लागली. पण त्यांची संख्या जास्त असल्यामुळे तिची ताकद कमी पडत होती... त्यातील एका मृत शरीराने तीचा हात चावला त्यातून रक्त गळू लागल ते पाहून ती आणखीच चवताळली. तरीही ती मनाला समजावत होती काहितरी मार्ग नक्कीच सापडले तोवर ती च लक्ष त्या समोर जळून राख झालेल्या चितेकडे गेल ती तशीच त्यांच्याकडून सुटका करण्याचा प्रयत्न करत करत तसच ताकद लावत लावत त्यांना दूर ढकलून पळत धडपडत त्या चितेपाशी गेली व त्या राखेत हात घालून ती ने ती राख सगळ्यांवर फेकली तशी ती किंचाळत जळू लागली... नंतर ती परत मागे जात जात आधीच्या ठिकाणी पोहोचली... आणि पुन्हा मनात निर्धार करून तिसऱ्या मार्गावर जायच ठरवल तोवर तीला आपल्या मागे ती स्त्री गुरगुरत उभी आहे अस जाणवल. तीला क्षणभर वाटल मागे वळून बघाव पण ती ने ते कटाक्षाने टाळले. त्या स्त्रीला तिला तिसऱ्या मार्गावर पोहोचू द्यायच नव्हत म्हणून ती तिला मागून पकडायला गेली तोवर तीचा हात पोळला... अनुश्रीच्या लक्षात आले मगाची राख थोडी तशीच आहे म्हणूनच अस असाव... ती मागे न बघताच तिसऱ्या मार्गावरून जावू लागली.... या मार्गात मात्र तिला वेगळीच अनुभूती जाणवली... मस्त फुलांचा सुगंध सुटला होता.. आजूबाजूला वेगवेगळी रोप डूलत होती... तीच्या समोर एक रक्षक आला तो तिला म्हणू लागला चला ना राजकुमारी तुमच्यासाठी काही सोनारांना बोलवल आहे ते तुमच्यासाठी हिरे, मोती आणि पाचूपासून बनवलेले दागिने घेऊन आलेत... चला ना ते पाहून तर ती मंत्रमुग्ध झाली पण ती ने लगेच स्वतः ला त्या मोहापासून दूर ढकलत मनाला समजवल नाही अनू तुझ्यासाठी तुझे मित्र हेच सगळ्यात अनमोल आहेत तुला त्यांना वाचवण्यासाठी त्या स्त्रीची भेट घ्यायची आहे..... ती च्या मनात हा विचार आला तोच समोरच दृष्य गायब झाल व समोर एक स्त्री दिसू लागली...