three allegorical story in Marathi Motivational Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | तीन रूपक कथा

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

तीन रूपक कथा

तीन रूपक कथा
१) लय
ती हिवाळ्यातील पहाट होती. सूर्य आपल्या सोनेरी किरणांनी चराचराला स्पर्श करत होता.दंवात हिरवी पाती चिंब भिजून गेली होती.मंद हवेच्या लहरींवर रानफुलांचा धुंद करणारा मंद मंद सुवास सगळीकडे दरवळत होता.सारी सृष्टी हसत होती.पक्ष्यांची किलबिल वातावरणात संगीत जागवत होती.निसर्ग सहस्र हातांनी सौंदर्याची उधळण करत होता.
अश्यावेळी एका हिरव्यागार अळवाच्या पानावरील दवबिंदू स्वत:शीच खुदूखुदू हसत होता.सोनेरी किरण त्या दवबिंदूवर पडल्यामुळे तो विलक्षण सुदंर दिसत होता. कुणालाही मोह पडावा अस देखण रूप होत त्याच !वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळ्या रंगाच्या छटा त्यातून बाहेर पडल्याच्या भास होत होता. सम्राटाच्या मस्तकावरील मुकूटामधला हिरा ही लाजावा अेवडा तेजस्वी होता तो दवबिंदू ! आपल्या विलक्षण सुदंर रूपावर तो स्वत:फिदा झाला होता. स्वत:च्या प्रेमात पडला होता.त्याला वाटल सारे जग त्याच्याकडे बघतय ...

त्याच्या सौंदर्याचा हेवा करतय.गर्वाने तो फूलून गेला. एव्हड्यात त्या वाटेने जाणारया वाटसरूने तो दवबिंदू पाहिला. "व्वा!किती सुदंर...दुसरा सूर्यच जणू...!
हे एेकून दवबिंदू मनोमन मोहरला . ज्या सूर्यकिरणांनी त्याला एवड मोहक बनवल त्या पेक्षाही आपण सुदंर व तेजस्वी आहोत अस त्याला वाटल.मीच सर्वांहून सुदंर... तेजस्वी... माझ्यसारखा मीच! माझ्या मुळेच या सूर्यकिरणांनां अर्थ प्राप्त झाला... दवबिंदू स्वत:शी पुटपुटला . एव्हड्यात क्षणभर सूर्यासमोर एक ढग आला.मघापासून विलक्षण सुदंर दिसणारा तो दवबिंदू रंगहीन व बेढब दिसू लागला. तो घाबरला ... दुखावला ... सूर्यकिरणांशिवाय आपल्या सौंदर्याला अर्थ नाही हे तो समजला.
पण पुन्हा मळभ दूर झाले.सूर्यकिरणांनी पुन्हा त्या इवल्या दवबिंदूला गोंजारल.तो पुन्हा चमकू लागला . सहस्र सूर्य त्या थेंबात चमकू लागले.
"छट...! मघाचा तो फक्त भास होता. मीच सर्वांहून सुदंर ...हेच खर सत्य ...! " तो पुटपुटला.
पण एव्हाना सूर्य वर आला होता. पाहटेची कोवळी किरण आता दाहक बनली होती.बघता बघता तो दवबिंदू वाफ बनून संपू लागला.
"अरे वाचवा ....वाचवा ... कुणीतरी वाचवा...! तो अोरडला. धडपडू लागला.पण क्षणा-क्षणाला त्याच अस्तित्व संपू लागल.तो वातावरणात मिसळून गेला. कदाचित पुन्हा उद्या मला दवबिंदू बनण्यासाठी! मघापासून स्थितप्रत्न्यासारख गप्प बसलेल अळवाच पान सुस्कारून म्हणाले 'हे अस रोजच घडतं ....!'

२) तृप्त

लोक धावताहेत ...आस्तिक; नास्तिक स्री-पुरूष सारेच मिळेल त्यां वाहनाने पळताहेत.सर्वांचे ल क्ष्य एकच -गणेशमंदीर!
सगळीकडे एकच धमाल...एकच वार्ता ...गणेशजी
दूध पी रहे है!
हातात दुधाची वाटी व चमचा घेऊन गणपतीला दुध पाजण्यासाठी आॉफिसला दांडी मारून लोक पळताहेत.
असाच एक गर्दीचा लोंढा तिला ढकलत झपाझप -गणेशमंदीर मंदिराच्या दिशेने गेला. तिला क्षणभर कळेना हे का धावताहेत ते! तिच्या कडेवरचे मूल मघापासून भुकेने रडत होते. "दुधु दे...दुधु दे..."असाच एकच घोष त्याने लावला होता. फुटका कप आणि एकमेव शिल्लक राहिलेला रूपया हातात घट्ट धरून तिची नजर इकडे-तिकडे भिरभिरत होती. पण लोकांना दुधाच्यी वाट्या घेऊन पळताना बघून ती पण आशेने त्यांच्या सोबत धावली. -गणेशमंदीरा बाहेर भलीमोठी रांग लागलेली होती.आतुरतेने लोक वाट
पाहत होते.
मंदिराबाहेर दुध विकलं जात होते. तिने रूपया व कप पुढे केला.
"चल हट...शंभर रूपया लिटर दूध आहे समजलं!"
हताशपणे तिने रांगेतल्या बाईकडे दुधासाठी याचना केली.
"भिकारडी कुठली!" त्यां बाईने झिडकारले.
तसा तिचा कप निसटला व पडून फुटला. निराश होऊन ती मंदिराच्या मागे आली. क्षणात तिच्या डोळे
लकाकले. गाभारा भरून सांडलेल दूध भिंतीच्या पाईपमधून जमिनीवर पाझरत होते. खाली बसून तिने आपला फाटका पदर त्या दुधाने भिजवला व थेंब थेंब मुलाच्या तोंडात पिळू लागली. जिभेवर पडणारे थेंब तो मुलगा आघाशा सारखा पिऊ लागला. परत परत पदर भिजवून ती मुलाच्या तोंडात पिळू लागली.
एका तृप्त क्षणी तो मुलगा प्रसन्नपणे हसला.
लोकांवर संतापलेली ती शांत झाली. घामेजलेला रूपया कनवटीला खोचून ती सुस्कारली. दूर कुठेतरी अंतराळात तो विनायकही समाधानाने प्रसन्नपणे हसला.
१)
पूर्णत्व 


त्या बागेत असंख्य रंगीबेरंगी फुले फुलली होती. निळी, पिवळी, गुलाबी, भगवी, सोनवर्षी अशा नाना रंगांनी नटलेली फुले मन मोहून टाकत होती. त्या साऱ्या फुलांत एक चिमुकलं पांढरं फूल उदासपणे अंग चोरून उभं होतं. सारी रंगीत फुले त्या फुलाकडे बघून हसत होती... खिदळत होती.
"ते पाहा दुर्दैवी फूल...!” एक गुलाबी फूल गर्वाने खिदळले.
"आम्ही देवाची आवडती म्हणून त्याने आम्हाला असे सुंदर सुंदर रंग दिले...! हे तर प्रभूचे नावडते...!" सारी फुले एका सुरात ओरडली.
बिचारं पांढरं फूल ! शरमेने मान खाली घालून बसलं. विचार करू लागलं, 'खरंच का मी देवाला आवडत नाही? रंगाचा एखादा ठिपका तरी त्याने मला द्यायला हवा होता.'
गरीब बिचारं फूल मनातल्या मनात कुढत बसलं.
तेवढ्यात खट्याळ वाऱ्याची झुळूक त्या बागेत शिरली. सारी फुलं वाऱ्यावर डोलली. पण पांढरं फूल मात्र गप्प उभं राहिलं.



"चिमुकल्या फुला, तू असा उदास का? हसत का नाहीस?" वाऱ्याने विचारलं. ___“मी गरीब... ही फुले बघ कशी रंगीबेरंगी आहेत. त्या फुलांकडे फुलपाखरे, भुंगे धावताहेत! मला कुणीच विचारत नाही. सारी फुले मला हसतात, चिडवतात."
वारा हसला. फुलाला गोंजारत बोलला... "वेड्या, तुझा रंगच खरा ! हे सारे रंग म्हणजे तुझ्या रंगांचे तुकडे. हे सारे रंग एकत्र आले की तयार होतो पांढरा रंग...! पावित्र्याचं प्रतीक! तूच खरं देवाचं आवडतं फूल. म्हणून तर देवाने आपल्या आवडता पवित्र रंग तुला दिला... पूर्णत्व दिलं!"
पांढर फूल प्रसन्न झालं. उदासी झटकून दिमाखात हसत उभं राहिलं.

बाळकृष्ण सखाराम राणे .