डिकीतला सस्पेन्स भाग ४ (अंतिम)
भाग ३ वरून पुढे वाचा .........
पोलिस स्टेशन मधे रामभरोसे आणि त्याचा दोस्त यांना आणल्यावर, अर्धा तास त्यांना तसंच बसवून ठेवलं. त्या लोकांची सारखी चुळबुळ चालली होती.अधून मधून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होते, सांगोळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होते. त्यामुळे रामभरोसेची अस्वस्थता आणखीनच वाढत होती. अगदी हलक्या स्वरात ते एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगोळे टिपत होता. अर्धा तास झाल्यावर रामभरोसेचा संयम सुटत आला होता. तो सांगोळेला म्हणाला “और कितनी देर हमे बिठाके रखेंगे ये तो बता दो. अरे साब हमने कुछ नहीं किया हैं. क्यूँ सता रहे हो ?”
“साब बिजी हैं, उनका काम खतम होने के बाद तुम्हें बुलाएंगे. तब तक चुप चाप बैठे रहो.” सांगोळेनी कडक शब्दांत समाज दिली. शेवटी शेंडे साहेबांनी त्यांना बोलावलं. चौकशी सुरू झाली.
“रामभरोसे, इतनी जलदी मे कहाँ जा रहे थे ?” – शेंडे
“साहब, कहीं जाना मना हैं क्या ?” – रामभरोसे.
“अरे नहीं नहीं, ऐसेही पूछा, शामको मिले थे तब तो कोई जल्दी नहीं थी इसलिए.” शेंडे पाठ सोडायला तयार नव्हते.
“हमने कुछ नहीं किया हैं, आप क्यूँ हमारे पीछे पड़े हैं ?” – रामभरोसे.
“बस, इतना बतादो की कहाँ जा रहे थे और क्या काम था, फिर तुम्हारी छुट्टी कर देंगे.” शेंडे साहेबांनी डाव टाकायला सुरवात केली.
“साहब, गाँव जाना पड़ रहा हैं, कुछ खेती का लफड़ा हो गया हैं.” – रामभरोसे.
“मेरा दोस्त नायब तहसीलदार हैं दारव्हा मे, तुम चाहो तो मैं चिट्ठी देता हूँ तुम्हारा काम शायद बन जाएगा.” शेंडे साहेबांनी आता फास आवळायला सुरवात केली.
रामभरोसे ट्रॅप मध्ये अलगद अडकला.
“साहब मेरा खेत सुल्तानपुरमे हैं.” रामभरोसे कुरकुरत म्हणाला. “दारव्हा का तहसीलदार क्या मदद करेगा ?”
“खेत सुल्तानपुरमे हैं तो तुम दारव्हा क्यूँ जा रहे थे ?” – शेंडे आता गिरमीट चालवत होते.
“मैं दारव्हा जा रहा था ?” रामभरोसे क्षण भर विचारात पडला. मग म्हणाला “हाँ वो ऐसा हैं की हमारा एक दोस्त वहाँ रहता हैं उसको साथ मे लेना था.”
रामभरोसे जेंव्हा क्षणभर थांबला तेंव्हा शेंडे साहेबांची खात्रीच पटली की काही तरी गडबड आहे म्हणून. ते म्हणाले “क्यूँ ? ऐसी क्या खास बात हैं ?”
“वो सुल्तानपुरके पटवारी को जानता हैं, हो सकता हैं मामला फिट हो जाए.” रामभरोसेनी सारवा सारवी करण्याचा प्रयत्न केला. पण शेंडे साहेबांनी अजून एक डाव रामभरोसे समोर फेकला.
“अच्छा, ऐसी बात हैं क्या ? ठीक हैं तुम जा सकते हो.” – शेंडे.
“ठीक हैं साहब हम चलते हैं, पहेलेही काफी देर हो चुकी हैं.” – रामभरोसे
“रामभरोसे,” शेंडे साहेब म्हणाले. “मैं सोच रहा था की हमारी वजहसे तुम लोगोंको काफी परेशानी उठानी पड़ी हैं और बहुत लेट भी हुआ हैं, अभी तुम लोगोंको बस भी नहीं मिलेगी, इसलिए हम तुमको दारव्हा छोड़ देते हैं. हमारी गाड़ी मे चलोगे तो जल्दी पहुँच जाओगे. और लगे हाथ तुम्हारे दोस्त से भी मिलना हो जाएगा. करपे गाड़ी निकालो. हम अभी दारव्हा जा रहे हैं. क्या नाम बताया था तुमने, तुम्हारे दोस्त का ?”
“साहब आप क्यूँ तकलीफ उठा रहे हो, हम चले जाएंगे.” आता रामभरोसेच्या चेहऱ्यावर चल बिचल दिसायला लागली.
साहेबांनी गंगाधरला खूण केली. त्यांनी हातातला दंडा टेबलावर ठेवला.
“नाव सांग.” – शेंडे.
“साहब नाम जानकर क्या करोगे ? हम सिदे साधे लोंग हैं. जाने दीजिए हमे.” आता रामभरोसे विणवणीच्या पायरीवर उतरला होता.
साहेबांनी आता दंडा हातात घेतला आणि उठून उभे राहिले.
“नाव सांग” – शेंडे.
“हनुमानसिंग” – रामभरोसे.
“पत्ता ?” – शेंडे.
“माहीत नाही साहेब” – रामभरोसे.
साहेबांनी दंडा टेबल वर आपटला आणि म्हणाले
“पत्ता सांग लास्ट चान्स”
“साहेब घर माहीत आहे, पत्ता नाही.” - रामभरोसे.
“ठीक आहे. चल. गाडी तयार आहे. आपण निघू.” – शेंडे साहेब, आता जरा जरबेच्या स्वरात बोलले.
आता रामभरोसेच्या दोस्ताला कंठ फुटला. तो रामभरोसेला म्हणाला
“रामभरोसे, लगता हैं हम फस गए हैं. कुछ लें देके निपटालों यार. उसीमे हमारी भलाई हैं.”
सांगोळे मधेच बोलले.
“रामभरोसे तुझ्यापेक्षा तुझा हा दोस्तच शहाणा आहे. एकदम लायनीवर आला. मांडवली करायचीय ? बोल काय म्हणतोस ? आमचे साहेब तसे दयाळू आहेत. तुला त्रास होणार नाही.”
रामभरोसे नी थोडा विचार केला त्याला राग आला होता. त्याच्या दोस्तानी माती खाल्ली होती. पण आता काही उपयोग नव्हता. ते आता पुरते अडकले होते. आता मांडवली करणं हा एकच उपाय समोर दिसत होता. धीर करून तो म्हणाला.
“साहब हम छोटे लोग हैं. शादी के लिए पचास हजार जमा किया था, वो आप ले लीजिए.”
“मामला बताओ उसके बादही बात करेंगे.” सांगोळेच बोलला.
“साहेब, नीलाक्षी मला खूप आवडली होती. तिच्याशी मला लग्न करायचं होतं.”
नीलाक्षीचं नाव ऐकलं, आणि सगळे सावध झाले. आत्ता पर्यन्त त्यांची अशी समजूत होती की छोट्या मोठ्या चोरीची, किंवा एखाद्या वाटमारीची केस असेल, किंवा एखादी फसवा फसवीची भानगड असेल म्हणून. पण आता अनपेक्षितपणे प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. सगळे सावरून बसले.
“मी तिला लग्नाबद्दल विचारणार होतो पण मला कळलं की हरीश ने तिला मागणी घातली आहे. साहेब, मी वाईट माणूस नाहीये. आपण दुसऱ्याचा आदर करतो. साहेब मग मी नीलाक्षीचा विचार मनातून काढून टाकला. पण दोन तीन दिवसांनी हरीश भेटला आणि म्हणाला की नीलाक्षीने फायनल नकार दिला आहे. आणि आता तो गावी जाणार आहे. त्याच्या घरच्यांनी एका दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलं आहे मग आता तो लग्न तिच्याशीच करणार आहे.”
“मग ?” – शेंडे. आता शेंडे साहेबांना पोस्ट माऱ्टेम चा रीपोर्ट आठवला. त्यांच्या कपावरच्या रेषा तटतटल्या सगळा नूरच बदलून गेला. आणि ते त्यांच्या स्वरात उमटलं. आता आवाज एकदम करडा झाला होता.
“मग मी नीलाक्षीला विचारलं. पण तिने नाही म्हंटलं आणि वर माझी औकात पण काढली. मला खूप राग आला साहेब, तुम्हीच सांगा साहेब, औकात काढल्यावर कोणालाही राग येईल.” रामभरोसे आता पोपटा सारखा बोलायला लागला होता.
“बरोबर आहे. तुझ्या जागी मी असतो तर मला पण राग आला असता, मग तू काय केलस ?” – करपे म्हणाले.
“हा माझा दोस्त सालन सिंग यांनी सुचवलं की आपण तिला किडनॅप करू आणि सुलतानपूरला घेऊन जाऊ. तिथे गेल्यावर तिच्याशी शादी कर. एकदा लग्न झाल्यावर मुली कुठे जात नाहीत. मग मी आमचा दूसरा दोस्त हनुमान याला बोलावून प्लॅन सांगितला. त्याला पण पटलं. मग त्यांनी त्याचा एक दोस्त आहे विकी नावाचा, त्याची व्हॅन आहे. त्याला पण सामील करून घेतलं. आणि मग आम्ही पक्का प्लॅन बनवला. मग ठरलेल्या दिवशी तिला किडनॅप केलं.” एवढ बोलून रामभरोसे थांबला.
“फिर, क्या हुवा ? लड़किका खून क्यूँ किया ?” शेंडे साहेबांनी विचारलं.
“हमने नहीं मारा साहब, वो अपनेसेही मर गई.” – रामभरोसे
“रामभरोसे खोटं बोलू नको. तुम्हाला जर यातून सुटायचं असेल तर पूर्ण खरं खरं सांग. काही लपवा छपवी केलीस तर तुलाच महागात पडेल.” – करपे.
“तिच्या तोंडात बोळा कोंबला होता साहेब,” रामभरोसे सांगत होता. “आणि तशीच तिला व्हॅन च्या मागच्या जागेत झोपवलं होतं. जीव गुदमरून ती केंव्हा मेली ते कळलंच नाही. मध्ये एका निर्जन ठिकाणी दोन मिनिटांसाठी थांबलो होतो तेंव्हा तिच्याकडे बघितलं, तेंव्हा कळलं की ती या जगात नाहीये. आम्ही सगळेच घाबरलो होतो साहेब, आमच्यात भांडणं झाली. पण विकीने आम्हा सगळ्यांना शांत केलं. आणि म्हणाला की जे झालं ते झालं आता यातून सुटायचा मार्ग शोधावा लागेल त्याचा विचार करू.”
“मग काय प्लॅन ठरला ?” – शेंडे.
“काहीच नाही साहेब, आम्ही असेच चाललो होतो.” रामभरोसे पुढे म्हणाला “यवतमाळला आल्यावर एका धाब्यावर विकीला आयडिया सुचली आणि आम्ही एका गाडीमध्ये तिला टाकून दिलं. मग तसंच नागपूरला जाऊन सुलतानपूरची वाट धरली साहेब.”
“कोणाच्या गाडी मधे टाकलं ? काय नंबर ची गाड़ी होती ?” – शेंडे.
“वो पता नाही साहब, जो गाड़ीकी की डिकी खुल गई, उसमे झटसे डिकी मे बॉडी डाल दी और जलदी जलदी मे हम वहाँसे निकाल गए.” – रामभरोसे
“मग ?” – शेंडे.
“मग काही नाही साहेब, सात आठ महिन्यांनंतर सर्व शांत आहे असं पाहून वापस पुसदला आलो.” – रामभरोसे
“तुम्ही त्या मुलीवर ती मेल्यानंतर बलात्कार केला. तो कुठे ?” हा प्रश्न विचारतांना शेंडे साहेबांचे डोळे लाल बूंद झाले होते.
“वो एक बहुत बडा पाप किया साहब हमने असं म्हणून रामभरोसे रडायलाच लागला.”
पोलिसांनी चौघांना अटक केली सर्व पुरावे, काबुली जबाब जमा केले, विकिची व्हॅन जब्त केली, आणि त्यांच्यावर खून, बलात्कार आणि अपहरणाचा खटला दाखल केला.
**** समाप्त ****
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com